नुकतेच गेल्या महिन्यात उस्ताद झाकिर हुसेन यांच्या एका कर्यक्रमात मॅनेजमेंट टीम मध्ये काम करण्याची (सुवर्ण)संधी प्राप्त झाली. त्यांच्या सहवासात आमची पूर्ण टीम तब्बल दोन दिवस होती.
त्यांच्या स्वभावाबद्दल सांगायचं झालं तर प्रवासापासूनच हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व उलगडत गेलं. आम्ही कार्यक्रमाच्या शहरात पोचत असतानाच गाडीच्या ड्रायवरला चहा विचारण्यापासूनच ते नंतर त्याच्यासोबत चहा एंजॉय करेपर्यंत आम्हाला समजून चुकलं, की आपले पुढचे दोन दिवस एका उमद्या आणि नम्र कलाकरासोबत जाणार. नंतर त्यांनी ड्रायवरला उठवून चला आता मी गाडी चालवतो म्हणत तासभर गाडीही चालवली...आणि पुढे "तेवढाच तुम्हाला आराम...!!" अशी पुस्तीही जोडली.
आम्ही प्रवासातून दमून हॉटेल वर पोचल्यावर सर्वजण नाश्त्यासाठी एकाच टेबलवर बसलो होतो...त्यांनी 'मुझे बहोत भूक लगे है, अच्छासा क्रिस्पी डोसा खिलाओ' असे सांगितले. हॉटेलचे कर्मचारी तर त्यांच्यासठी तत्परच होते...लग्गेच त्यांच्या टेबलवर डोसा हजर झाला. एक घास घेणार इतक्यातच तिथे जेवायला आलेल्या एका फॅमिलीने त्यांना पाहिले व फोटोसाठी आग्रह करू लागले. आम्ही सर्वजण पाहतच राहिलो की आता त्यांची प्रतिक्रिया काय असणार...पण हातातला घास तसाच खाली ठेऊन त्यांच्याबरोबर उत्साहाने फोटो काढून घेणार्या झाकीरजींकडे आम्ही विस्मयाने पाहतच राहिलो!! इतके दमलेले असूनही कुठेही त्यांच्या चेहर्यावर कंटाळा वा त्रासिक भाव नव्हते.
कार्यक्रम झाल्यावर सुद्धा थंडीत कुडकुडणार्या तरीही मनापासून कार्यक्रमाचा आस्वाद घेणार्या ज्येष्ठ नागरिकाची आस्थेने चौकशी करणारा हा कलावंत विरळाच!!! झाकीरजींच्या कार्यक्रमाबद्दल मी काय लिहिणार? ते तर सर्वश्रुतच आहे. अतिशय नादमय आणि मंत्रमुग्ध करणारा त्यांचा तबला ऐकून सार्थक झाल्यासारखे वाटले!!
एकुणच त्यांच्या सहवासात एक खरा कलाकार आणि खरा माणूस आम्हाला पाहायला मिळाला हे आमचे नशीब. वयाच्या बासष्ठाव्या वर्षी त्यांच्या ठायी असलेल्या उत्साह आणि नम्रतेच्या या संगमाला शतश: प्रणाम!!!
प्रतिक्रिया
17 Mar 2012 - 7:00 pm | यकु
झाकीर? ६२?????
विश्वास नाय बसत.
18 Mar 2012 - 10:06 am | पियुशा
६२?????माझा पण नाही बसत पण गुगल सर्च मारला
उस्ताद जाकीर हुसेन born 9 March 1951
सो विश्वास ठेवावाच लागेल :)
18 Mar 2012 - 10:25 am | अक्षया
इथे नविन आहे मी.
:)
गप्पा मारण्या करिता कोणता ऑपशन आहे?
18 Mar 2012 - 12:33 pm | पियुशा
@ अक्षया
साइड्ला खरडवही म्हनून जो ऑप्शन आहे त्याचा वापर करा :)
17 Mar 2012 - 7:14 pm | पैसा
आठवणी छानच आहेत, पण खाण्याच्या टेबलावर बसलेल्या माणसाला उठवून फोटो काढायची हौस असणार्या मंडळींचा केवळ राग येतो.
17 Mar 2012 - 7:27 pm | प्रभाकर पेठकर
एवढ्या मोठ्या कलावंताच्या सहवासात दोन दिवस राहायला मिळणं आणि त्यांना कला सादर करताना पाहणं हा आनंद अवर्णनियच म्हणावा लागेल. नशिबवान आहात.
18 Mar 2012 - 10:47 am | अक्षया
इथे नविन आहे मी.
गप्पा मारण्या करिता कोणता ऑपशन आहे?
18 Mar 2012 - 10:58 am | यकु
तुम्ही खरंच नवीन दिसताय.
तुमच्याशी लोकांनी मारलेल्या गप्पा 'माझी खरडवही '* मध्ये दिसतील.
तुम्हाला लोकांशी गप्पा मारायच्या असतील तर प्रत्येकाच्या प्रोफाईलवर ' यांची खरडवही पहा' हा पर्याय आहे. तिथे तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारु शकता.
हा मेन बोर्ड आहे सगळ्या जगाला दिसणारा. खरडवह्या सदस्य नसलेल्यांना दिसू शकत नाहीत.
*माझी म्हणजे माझी नाही, तुमची.
'गप्पा मारण्या करिता कोणता ऑपशन आहे ' ही तुमची स्वाक्षरी तर नाहिये ना?
18 Mar 2012 - 11:04 am | अक्षया
:) ही स्वाक्षरी नाही .
उत्तर मिळाले नाही म्हणुन लीहीले...
17 Mar 2012 - 8:16 pm | दादा कोंडके
विथ ड्यु रिस्पेक्ट, मला कलाकरांचा बाबतीत लोकांचे आलेले हे असले अनुभव वाचून कायम गंमत वाटत आलेली आहे.
ते कलाकार म्हणून ग्रेट आहेत. त्यामुळे ह्या कलाकारांकडे एक कलाकार म्हणूनच बघावं.
बाकी एका संकुचित वलयात राहून हा विनय, नम्रता, साधेपणा वगैरे दाखवणं हा एक स्वार्थच असतो. स्वतःच्या फॅन्सना दुखवून त्यांना चालणारच नसतं. स्वतःला कुठल्या लोकांसमोर कसं प्रोजेक्ट करावं हे ते जाणून असतात. स्पिक मॅके मध्ये काम करणार्या मित्रानं, हेच कलाकार बिदागी थोडी कमी पडली तर ऐन वेळेला कलटी मारतात, ऐन वेळी भारतातले कार्यक्रम सोडून बाहेरच्या देशात कसं पळतात हे बघितलं आहे. जेंव्हा लोकांना दुखावण्याची पाळी येते तेंव्हा शिताफीनं हे लोक आपल्या सेक्रेटरींना पुढे करतात.
ह्या कलाकारांकडून बाकी पिपल मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला छान शिकायला मिळेल. शुभेच्छा!
17 Mar 2012 - 8:34 pm | रेवती
दोन्ही बाजू आहेत याला.
कलावंतांनी कमी बिदागी स्विकारून काम का करावे?
पुरेशी बिदागी मिळत असताना, कार्यक्रम ठरलेला असताना निघून जाणे मात्र बरोबर नाही.
फ्यान कंपनीनेही समोरच्याचे खाणेपिणे चालू असताना बाजूला वाट बघत उभे का राहू नये?
19 Mar 2012 - 6:29 pm | विजुभाऊ
स्पिक मॅके मध्ये काम करणार्या मित्रानं, हेच कलाकार बिदागी थोडी कमी पडली तर ऐन वेळेला कलटी मारतात, ऐन वेळी भारतातले कार्यक्रम सोडून बाहेरच्या देशात कसं पळतात हे बघितलं आहे
कार्यक्रम केल्यानंतर हातात बिदागी मिळाली नाही तर कलाकार अक्षरशः काहीच करू शकत नाही.
कलाकाराने तसे वागणे यात त्याचे पूर्वानुभव कारणीभूत असतात. मराठीतले एक नामवंत कलाकार यासाठी नाटकाच्या दुसर्या अंकाच्या अगोदर मानधनाचे पाकिट स्टेजवर मागत असत
20 Mar 2012 - 1:53 am | दादा कोंडके
आता हे वाचा.
ह्यात उस्ताद म्हणतात,
"खेळणे बंद झाले तरी क्रिकेटचे वेड कणभरही कमी झाले नाही. 2011 च्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना चालू असताना माझे कॉन्सर्ट चालू होते. मी मैफिलीत तबला वाजवत होतो, तरी तबला आणि पायाच्या मध्ये मी मोबाईलवर क्रिकेटची वेबसाईट उघडून ठेवली होती आणि लाइव्ह स्कोअर पाहात होतो. मध्येच इंटरनेट कनेक्शन तुटले तर संयोजक मित्राला खूण करून स्कोअर काय झाल्याची विचारणा केली. दोन मिनिटांत त्याने चिठ्ठी पाठवून स्कोअर कळवला."
आता मला सांगा, ज्याला क्रिकेटचं वेड वगैरे असून सुद्धा वर्ल्डकप फायनल मॅचच्या वेळी (जीचं टाइमटेबल कित्येक महिने आधिच माहित असतं) हे कॉन्सर्ट करत होते. आणि दिडक्या मोजून आलेल्या प्रेक्षकांसमोर चोरून स्कोर बघितल्याचं मलातरी अजिबात कौतुक नाही. उलट, एखादा प्रेक्षक असं करत असला तर भर मैफलित त्याचा अपमान करायला सुद्धा कमी केलं नसतं.
मी तेच तर म्हणतोय, एक कला सोडली तर ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. त्यामुळे त्यांच्या साधेपणाचं, विनयशिलतेचं वगैरे कौतुक नको.
20 Mar 2012 - 7:57 am | अन्या दातार
ज्याची त्याची आवड! शेवटी तुम्हीही दिडक्या घेऊन हपिसात बसून मिपा-मिपा खेळताच की तुम्हीही. का? कामाच्या वेळी फक्त काम केलं पाहिजे हे जर कलाकाराच्या बाबतीत म्हणत असाल तर स्वतः त्यातून सूट का घेता?
शेवटी मैफल कशी झाली हे महत्वाचं. अष्टावधानी असल्याशिवाय एखादा कलाकार इतकी मोठी रिस्क घेईल असं वाटत नाही. कारण कितीही झालं तरी प्रेस्टीजचा प्रश्न असतो. एकदा जर का ही इज्जत धुळीस मिळाली तर त्याचा खूप मोठा फटका बसतो.
उच्च पदाला पोचल्यावर कित्येकांचे पाय जमिनीवर रहात नाहीत. अश्या वेळेस ज्यांचे पाय जमिनीवरच घट्ट राहतात त्यांना तो मान का देऊ नये? उस्तादजींची विनयशीलता उठून दिसत नाही का?
20 Mar 2012 - 9:13 am | मूकवाचक
उ. निजामुद्दीन खानसाहेबांच्या एका सत्कार सोहळ्यात त्यांना स्टेजवर चढताना पायातली चप्पल वारंवार निसटून त्रास होत असल्याचे पाहून उ. झाकिर हुसेन यांनी चक्क त्यांचे जोडे उचलत त्यांना आधार देत मदत केली होती, ती देखील अगदी सहजपणे. एखादा शागिर्द सुद्धा असे काही करताना बिचकेल. काही गोष्टी रक्तात मुरलेल्या असल्याशिवाय, खोलवर तसे संस्कार असल्याशिवाय करता येत नाहीत. अदबशीरपणाची 'अॅक्टिंग' कुणी जन्मभर सातत्याने करू शकत नाही. ढोंग असेल तर कधी ना कधी उघडकीस येतेच.
नीतीमत्तेच्या गप्पा मारणे सोपे आहे. आयुष्यभर रियाझ, तपस्या केलेल्या कलाकारांची कला आज सगळीकडे बोकाळलेल्या पायरसीमुळे फुकटात ऐकता/ पाहता येते. त्यामुळे कलाकाराला त्याच्या दर्जाप्रमाणे रॉयल्टी मिळणे वगैरे तर सोडाच, त्याचे आल्बम बाजारात येणे कमी होउन शेवटी आल्बम प्रकाशित होणे या माध्यमातून अक्षरशः पाच पैसे देखील मिळू नयेत अशी वेळ आलेली आहे. 'ज्याने पाप केले नाही त्याने पहिला दगड मारावा' असे ख्रिस्तवचन आहे, त्याप्रमाणे ज्याच्या संग्रही एकही पायरेटेड एमपी३ नाही, अशानेच कलाकारांवर दांभिकतेचे आरोप करावेत असे विनम्रपणे सुचवतो. असो.
20 Mar 2012 - 5:36 pm | दादा कोंडके
शेवटी तुम्हीही दिडक्या घेऊन हपिसात बसून मिपा-मिपा खेळताच की तुम्हीही.
माझी आणि उस्ताद साहेबांची तुलना केल्यामुळे ड्वाले पाणावले! :)
तेच ना, एकदा मोठ्ठा कलाकार म्हटला की मग सगळ्या घटणा हव्यातशा चिकटवता येतात. आणि त्याच्या साध्या साध्या गोष्टी अजूबाजुची मंडळी रंगवून सांगतात. (त्यात त्या कलाकाराच्या मोठ्ठेपणापेक्षा खरंतर, मी तीथं होतो हेच सांगायचं असतं, आणि त्यात जर कलाकार निवर्तला असेल तर अशा उपटसुंभांची गद्रीच-गद्री होते (कारण त्या घटणांचा खरे-खोटेपणा तपासणारा दुवाच नसतो!) :))
पद वगैरे कुठलं आहे हो? (उस्ताद, पंडीत ई पदं कुठली युनिवर्सिटी देते ते मला माहीत नाही) कलाकार, खेळाडू वगैरे मंडळी फक्त लोकांमुळेच मोठ्ठी होतात.
आता कुणी आवरा म्हणायच्या आत आवरतं घेतो! ;)
21 Mar 2012 - 10:52 am | शिल्पा ब
मोठ्ठ्या पदव्या घेतलेले फार मोठ्ठे असतात? वा!!
तेंडुलकर किंवा उस्ताद हुसेन यांच्याकडे पदवी नसेल पण त्यांचे कसब जगाला वेड लावेल असेच आहे. असो.
शेवटी ज्याची त्याची समज.
20 Mar 2012 - 3:40 am | शेखर काळे
त्यांच्या कलेवर अवलंबून असते.
आणि ही कला शाश्वत असते याची काहीच शाश्वती नसते. तेव्हा वेळ असतांना त्यांनी दोन पैसे आपल्या गाठीशी बांधले तर त्यात काही वावगे वाटू नये.
आपणही कुठे वस्तू दोन पैशांनी स्वस्त मिळत असेल तर तेथे धावतोच की.
त्यांनीही कुठे त्यांना पैसे जास्त मिळत असतील तर तेथे का जाऊ नये ?
ही गोष्ट खरी -
ह्या कलाकारांकडे एक कलाकार म्हणूनच बघावं.
पुढे कार्यक्रम संपला की ती ही आपल्याच सारखी तहान-भूक-झोप लागणारी माणसे असतात,
- शेखर काळे
20 Mar 2012 - 9:48 am | अक्षया
अहो, ह्या कलाकाराचा दर्जा कीती महान आहे हे इथे सांगणे अवघड आहे, केवळ पैशासाठी कार्यक्रम करणाऱ्या कलाकारांपैकी हे नाहीत, आणि त्यांना तसे करण्याची गरजही नाही. त्यांनी अनेक भारतीय गरीब पण महान कलाकारान चे पूर्ण कुटुंब पोसली आहेत ते सुद्धा कुठेही त्याचा साधा उल्लेखही न करता फक्त शब्दासाठी आणि कलेचा आदर करण्यासाठी.
ते माणूस म्हणून किती महान आहेत ह्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे काही कलाकारान बाबतीत असेल तसे पण...
अशा दिग्गज कलाकारांबाब्तीत असे उद्गार काढताना आधी त्यांची पूर्ण माहिती घ्यावी... असे मला मनापासून वाटते.
17 Mar 2012 - 10:26 pm | निवेदिता-ताई
अरे भाई वाह ताज बोलो
18 Mar 2012 - 12:35 pm | सांजसंध्या
अभिनंदन !
अशा कलाकाराबरोबर काम करायला मिळाल्याबद्दल..
19 Mar 2012 - 2:04 pm | इरसाल
तुम्ही खरचं लकी आहात.
19 Mar 2012 - 2:18 pm | अक्षया
आभारी आहे.. :)
तो एक अविस्मरणीय अनुभव आहे...
20 Mar 2012 - 12:50 pm | अस्मी
खरंच भाग्यवान आहात...
छान आठवणी, आणि नेटकेपणे मांडल्यायत.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा..लिहीत राहा.
21 Mar 2012 - 9:47 am | अक्षया
:) आभारी आहे हो मधुमती...
20 Mar 2012 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार
अशा प्रकरच्या एका जुन्या चर्चेवरती नीधप ह्यांनी दिलेला प्रतिसाद आठवला.
22 Mar 2012 - 5:51 pm | वेल्लोकॅस्त
अक्षया जी,
तुमचा लेख आवडला, आणि तुम्हाला एवढ्या मोठ्या कलाकार व्यक्तिमत्वा बरोबर काम करण्याची संधी मिळाली त्या बद्दल तुमचेही अभिनंदन.
आपल्या समाजात 'इतरांना नावे ठेवणे' हा जन्म सिद्ध अधिकार मानला जातो, त्याचाच प्रत्यय वरील काही प्रतिक्रिया वाचून येतो, आता मला सांगा उस्ताद झाकीर भाई किती बिदागी घेतात येथ पासून ते थेट people management वैगेरे पर्यंत बोलून काय मिळते ते मला तरी समजत नाही...,
आणि हीच लोकं स्वतः कोणासाठी पदरचा १ रुपया तरी खर्च करत असतील का..? याची शंका येते..! ते नोकरी करताना फुकट करतात का? पगार घेतातच ना..? मग इतरांच्या बाबतीत बोलण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही! आणि झाकीर भाईन सारख्या कलाकारा बद्दल बोलायची तर 'लाय...' हि नाही.
अतिशय नितळ आणि स्वच्छ असे हे व्यक्तीमत्व आहे, तुम्ही नमूद केल्या प्रमाणे ते आजही कित्येक गरीब कालाराकारांची कुटुंबे अक्षरशः पोसत आहेत, ते हि त्याचा कुठे हि गाजावाजा न करता. त्यांच्या अमेरिकेतील वास्तव्या बद्दल हि खूप काही बोलले जाते, पण फार कमी लोकांना हे माहित आहे कि तिथे राहून तेथील इच्छुकांना नियमित मोफत तबल्याचे शिक्षण देतात. भारतात आल्यावर कार्यक्रम संपल्यावर कित्येक पडद्यामागच्या दुर्लक्षित कामगारांची पाठ थोपटायची ते विसरत नाहीत तसेच त्यांच्या पेक्षा ज्येष्ठ कलाकारांच्या पायावर मस्तक टेकवायला कमीपणा मानत नाहीत.
आज हा तबल्याच्या दुनियेचा शेहेन्शहा कित्येक जणांचा देव, गुरु तसेच पोशिंदा हि आहे, अश्या या महान कलाकाराला मनापासून 'सलाम'.
23 Mar 2012 - 12:09 am | दादा कोंडके
तुमच्या प्रतिक्रियेतलं एकेक वाक्य घेउन खौट उत्तर लिहिणार होतो. पण मध्येच कंटाळा आला आणि ही प्रतिक्रिया एका व्यक्तीपूजक माणसानं खूप उत्तेजित होउन लिहिली आहे त्यामुळे त्याच्यापर्यंत उत्तर पोहोचणारच नाही असं वाटलं. त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेला प्रचंड विनोदी प्रतिसाद एव्हडं म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो.
बाकी एकेक वाक्य घेउन धोबीपछाड उत्तरं लिहिणार्या मिपाकरांचा खरंच हेवा वाटतो.
23 Mar 2012 - 12:23 pm | अक्षया
हम्म छान!!!
विनोदी नाही आहे ते लिहिलेल खर आहे... :)
दोन शब्दात मान्य केल्या बद्दल धन्यवाद...
22 Mar 2012 - 6:06 pm | अक्षया
धन्यवाद!!
मिपावर स्वागत
असेच लिहित रहा...
23 Mar 2012 - 1:01 am | यकु
झाकीर हुसैन यांच्याबद्दल एका गोष्टीचा हेवा करण्यासारखा आहे.
युट्यूबवर रविशंकर आणि झाकीर यांचे वालिद अल्लारखां यांच्या त्या काळात अमेरिकेत चित्रांकन केलेल्या क्लिप आहेत.
अल्लारखां फक्त वाजवणार आणि रविशंकर त्या इंग्लिश श्रोत्यांना काय वाजवलं आहे, कसं वाजवलं आहे हे उलगडून सांगणार.
मग पुन्हा अल्लारखां फक्त वाजवणार आणि श्रोत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट.
मला निश्चित माहित नाही, पण अल्लारखांना इंग्लिश बोलता येत नसावी.
आज फक्त झाकीर यांच्याकडे नजर टाकली तरी पुरेसं आहे.
जाताजाता: झाकीर (शागीर्द) आणि अल्लारखां (उस्ताद) या दोन घनपाठींच्या स्वाहाकारातून प्रकटणारं नादब्रह्म आणि ते प्रकटताच जाणकार श्रोत्यांनी तर्जन्यांच्या द्वारे केलेला निशब्द घोष पहाण्यासारखा आहे. त्यानंतर 8.47 वर अल्लारखांनी झाकीरकडे टाकलेला दृष्टीक्षेप 'बेटा, तु माझे पांग फेडलेस' हेच सांगणारा आहे.
23 Mar 2012 - 2:01 am | दादा कोंडके
खत्राच. सलाम या कलाकाराला!
23 Mar 2012 - 12:40 pm | अक्षया
8-)
24 Mar 2012 - 2:46 pm | दादा कोंडके
तुम्हाला या धाग्यावर, "अय्या कित्ती छान! एव्हड्या मोठ्या कलाकाराबरोबर काम करायची संधी मिळाली, भाग्यवान आहात" अशाच प्रतिक्रिया हव्यात का?
वरतीच म्हणल्याप्रमाणे पुष्कळवेळा लोकांना असल्या प्रसंगात मोठ्ठ्या लोकांच्या कौतुकापेक्षा मी तीथं होतो हेच सांगायचं असतं.
बाकी, मी झाकीर हुसेन, तेंडूलकर यांच्याबद्दल वैयक्तीक पातळीवर बोलतच नाहिये. कला-खेळ सोडली तर ही आपल्यासरखीच आहेत असं माझं म्हणणं आहे हे पुन्हा सांगतो. या मोठ्या लोकांना हे माहित असतं की, समाजात रहायचं म्हणजे नुसता पैसा आणि कला असून चालत नाहीत. लोकांमध्ये एक "फिलाँथ्रोपिस्ट" म्हणून एक प्रतिमा म्हणा, गुडवील म्हणा, लागतं. थोडेसे पैसे, थोडासा वेळ किंवा प्रसंगी स्वभावाला किंचीत मुरड घालून या मोबदल्यात ते ती प्रतिमा व्यवस्थीत सांभाळून असतात. जे आपण सगळेच करतो. कलाकार-खेळाडू यांना थोडसं जास्तं करावं लागतं कारण तेच त्यांचं अॅसेट असतं.
आपण थोडीशी व्यक्तीपुजा कमी केली आणि त्यांना "माणूस" म्हणून अॅक्सेप्ट केलं की मग त्यांच्या असल्या साधेपणाचं, विनयाचं किंवा दानशुरतेचं कौतुक राहणार नाही, आणि त्यांनी घरासमोरून उड्डाणपूल जाउ नये म्हणून राजकीय वजन वापरलं किंवा सत्यसाईबाबा गेल्यावर रडले तर दु:ख पण होणार नाही.
24 Mar 2012 - 2:49 pm | मराठी_माणूस
वाक्या वाक्याशी सहमत
24 Mar 2012 - 3:57 pm | अक्षया
सगळ्याच प्रतिक्रिया तितक्याच माझ्यासाठी महत्वाच्या आहेत.
मी तिथे होते हे सांगण्यात हि काही विशेष नव्हते.. कारण अशा बर्याच कार्यक्रमाला मी नेहमीच जात असते. आणि फक्त ते सांगण्यासाठी लेखप्रपंच करायची मला काही जरुर नव्हती. मिपावर आल्यावर पहिलाच लेख आपण झाकीरजींवर लिहावा असं मला वाटलं, इतकंच!
तुम्ही म्हणालात ते अगदी खरे आहे कि हे कलाकारही आपल्यासारखी माणसेच आहेत, काहीच शंका नाही त्यात. हे लहान प्रसंग तुमच्या आमच्या बाबतीत घडले तर काही विशेष नसते परंतु ते ज्या जागी आहेत तिथे गेल्यावरहि पाय जमिनीवर असणे हे मला विशेष वाटले..!!
असो.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.... :)
23 Jun 2012 - 10:58 am | स्वप्निल घायाळ
अरे येड्या तुझ्या खोट्या नावाला तरी जाग !!!
if you really do not belive in idol worship, then why have you kept your name dada kondke you should have publushed your real name...
We worship there talent and not them...
तुझ्या तोंडून सचिन तेंडूलकर नाव शोभत नाही...
23 Jun 2012 - 6:07 pm | दादा कोंडके
हे पहा साहेब, आम्हाला काय शोभतं अन काय नाही ते आमचं आम्ही पाहून घेउ. तुमच्या तोंडात शोभणार्या गोष्टी देउ का? :|
22 Jun 2012 - 11:07 am | श्रीरंग_जोशी
खरंच एवढ्या मोठ्या व गुणी कलाकारासोबत काम करायला मिळणे हि भाग्याची गोष्ट आहे.
अन तो अनुभव या लेखाद्वारे इतरांबरोबर वाटून आपण भले काम केले आहे.
23 Jun 2012 - 12:00 pm | मोदक
उस्तादजींचे नाव ऐकले की आठवतो २००८ चा वसंतोत्सव....
राहूल देशपांडेंच्या गायनानंतर.. शिवमणी, शंकर महादेवन, E U श्रीनिवासन् आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना ऐकणे हा "अनुभव" होता.
कवड्याच्या माळा आणि हलका तबल्याचा आवाज यांनी केलेली शिववंदना सुरू असताना शिवमणीने फुंकलेला शंख क्षणात वेगळ्या विश्वात घेवून गेला. पुढचे ३ तास भान हरपण्याचे होते.
शिवमणीने त्याच्या असंख्य वाद्यांच्या सहाय्याने तबल्याला केलेली साथ, कधी गंमत म्हणून केलेली स्पर्धा.. आणि सगळ्या Sophisticated आणि अत्याधुनीक वाद्यांना केवळ तबल्याने दिलेले उत्तर.. अप्रतीम...!!!
शंकर महादेवन आणि E U श्रीनिवासन् ना साथ करताना मुद्दामहून घेतलेला दुय्यमपणा, बाकीच्या कलाकारांना योग्य मान देणारे, दाद देणारे आणि त्यांची कला आणखीन खुलवणारे उस्तादजी.
तबला वाजवताना एका क्षणी तबल्यातून काढलेला शंखाचा आवाज.. एक एक तान म्हणून दाखवून तबल्यातून तसेच काढलेले बोल.. गणपतीची वेगवेगळी नावे आणि ती नावे तबल्यातून बोलून दाखवून मिळवलेली दाद.
__/\__
शेवटी "कार्यक्रम संपला आहे" असे संयोजकांना सांगावे लागले यातच सर्व आले.
(यानंतर रमणबागेतून सिंहगड रोडवरील रूमवर एका वेगळ्याच धुंदीत चालत आलो होतो :-))
23 Jun 2012 - 12:34 pm | अक्षया
अरे वा !
अनुभव छानच आहे.
प्रत्यक्ष अनुभवल्यामुळे कल्पना करू शकते..:)
23 Jun 2012 - 10:36 am | अक्षया
धन्यवाद :)
11 Sep 2012 - 12:04 pm | लीलाधर
एवढ्या मोठ्या कलाकारासोबत दोन दिवस एकत्र अनुभवायला मिळाले हे खरेच कौतुकास्पद आहे. आणि त्यात तुम्ही तुमचा अनुभव आम्हाला शेअर केलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार :)
11 Sep 2012 - 12:48 pm | sagarpdy
कार्यक्रम पुण्यात झाला नव्हता तर?! याच दरम्यान त्यांचा आणि पं. रविशंकर यांचा पुण्यात कार्यक्रम झाला होता.
असो एव्हढ्या मोठ्या असामीला एव्हढ्या जवळून पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन !
11 Sep 2012 - 3:35 pm | डावखुरा
मस्त अनुभव...
मला आठवते..जळगांव मध्ये पहिला बालगंधर्व संगीत महोत्सव होता..
तेव्हा नुकतीच ती रात्री दहाच्या आतची कार्यक्रमबंदी लागु झालेली होती..
झाकीर हुसैन यांना तेव्हा प्रथमच ऐकायची संधी मिळाली होती..
आणि ती एक अविस्मरणीय स्मृती बनुन मनाच्या एका कोपर्यात कायमची कोरली गेली आहे..
अविस्मरणीय परफॉरमन्स..
सर्व देवतांचे नाव तबल्यावर वाजवुन दाखवले..
नंतर उजव्या एका हाताने एक ताल कंटीन्यु वाजवत राहुन दुसर्या हाताने ईतर सर्व ताल जवळपास अर्धा तास हे वादन...वाह उस्ताद..खरंच जवाब नहीं ईनका..
पुन्हा एकदा त्या अविस्मरणीय क्षणांची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यु..अक्षया ताई..
1 Aug 2017 - 4:54 am | रुपी
अरे वा! धागा आणि प्रतिसादांमधून काही छान अनुभव वाचायला मिळाले.