इशान्य भारतातील यावेळची माझी आसाम मधील पहीली असाइनमेंट होती गोसाईगाव या सब डिव्हीजन असलेल्या शहरात. येथे सेवा भारतीचे अनेक प्रोजेक्ट आहेत ज्याचे अकाउंटस नियमीत करण्याची जवाबदारी मला दिल्या गेली होती. या भागात मला पुढे एकट्याने जाता यावे व या भागाची व तेथील कार्यकर्त्यांची माहिती मला व्हावी या हेतुने उल्हासजीनी मला त्यांच्या प्रवासात येण्याबद्दल सुचविले. त्याप्रमाणे मी २७/१/२०१२ ला सकाळी उल्हास जी व आमचा ड्रायवर कार्यकर्ता असे तिघे संस्थेच्या बोलेरोने प्रवासाला निघालो. बरपेटा येथे एक कार्यकर्ता आम्हाला सामील झाला मग आम्ही बोंगाइगाव येथील त्या भागात कार्य करणार्या श्री ब्रम्हा या बोडो कार्यकर्त्याच्या घरी चहा व नाश्त्या साठी थांबलो. तेथील प्रकल्पाचे को-ऒर्डिनेशन यांच्या कडे असल्याने त्यांच्या घरी चर्चा करुन आम्ही तेथील कामाचा आढावा घेतला. तेथुन मग आम्ही गुरुफेला या गावी गो-ग्राम प्रकल्पावर गेलो.येथे शंकरदेव शिशु निकेतन या नावाने सभोवतालच्या गरिब मुलांसाठी शाळा चालविल्या जाते.
हा प्रकल्प संस्थेच्या ३ एकर जागेवर उभा असुन. गावातील घरे हे पर्यावरणाशी सुसंगत कशी असावी या साठी एक घर बांधुन उभे केले आहे.
परिसरात उपलब्ध असलेल्या सामग्रिच्या सहाय्याने हे घर स्थानिक लोकांच्या सहाय्याने उभे करण्यात आले आहे. परिसरात समोर फुलझाडे व परसात भाजीची लागवड करण्यात आली आहे.
त्याच प्रमाणे औषधी झाडे सुध्दा लावण्यात आली आहेत ज्यात अश्वगंधा हे मुख्य औषधाची रोपे आहेत.
तसेच प्रत्येक घर आर्थीक दृष्ट्या स़क्षम असावे या दृष्टीने परिसरात ज्युट ची लागवड करुन पिके आल्यावर त्यावर प्रक्रिया करुन त्याचा ताग तयार करुन त्याद्वारे विविध वस्तु तयार करण्याचे शिक्षण येथे दिल्या जाते.
या तयार वस्तु संस्था रास्त भावाने विकत घेउन त्या गोहाटीच्या बाजारात विक्रि करण्याची व्यवस्था देखील याच संस्थेद्वारे होइल अशी योजना आहे.
ज्युट लागवड व प्रोसेसींग साठी आवश्यक पाणी हे जवळच असलेल्या गावातील नदि पुरवते. ही नदी पुर आल्यानंतर नेहमी आपले पात्र बदलत असल्याने स्थानीक लोक हीला पगली नदी म्हणतात.
संस्थेने येथे आरोग्य मित्र देखील ठेवले आहेत्त ते ग्रामीण लोकांचे स्वास्थ्य निट रहावे या दृष्टीने योग्य मार्गदर्शन तर करतातच पण याशिवाय ते त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्याचे दृष्टीने आवश्यक ते शिक्षण घेउन तज्ञ असतात. तसेच तेथील शिक्षीत ग्रामस्थांना प्रथमोपचार व विशिष्ठ आजारावर योग्य ते औषधोपचार करण्याचे देखील शिक्षण देतात. अशा अनेक आरोग्यमित्रांची फळी ही आसपासच्या गावात स्वास्थ्य संवर्धनाचे कार्य करित असते. शिक्षण, आरोग्य व स्वयंरोजगार या तिन आघाडीवर सुदुर व जाण्यास अवघड गावात ही संस्था व त्यांचे कार्यकर्ते लढत आहेत.
प्रतिक्रिया
7 Mar 2012 - 12:46 pm | पप्पुपेजर
खुप प्रेरणादायी लिखाण !!!!!
7 Mar 2012 - 2:04 pm | उदय के'सागर
त्या पर्यावरणाशी सुसंगत असलेल्या घराच्या आजुबाजुला केवढी कमालिची स्वच्छता आहे ...किती सुदंर आहे त्याचा सभोवताल..खुपच छान आणि स्वच्छ :)
7 Mar 2012 - 2:33 pm | सुकामेवा
अभिनंदन सेवा भारतीच्या कामाचे व त्यासाठी झटणाऱ्या सर्व लोकांचे.
7 Mar 2012 - 2:55 pm | अत्रुप्त आत्मा
अधाशी उदय यांचेशी सहमत.... :-)
7 Mar 2012 - 3:10 pm | सर्वसाक्षी
उत्तम कार्य. गरजपूर्ती, रोजगार व अरोग्य असे सर्वकाही साधले आहे
7 Mar 2012 - 7:19 pm | अन्या दातार
उत्तम कार्य. असे अनेक प्रोजेक्ट्स तुमच्या हातून घडोत, पुढे आमचीही मदत तुमच्या कार्यास होवो हीच इच्छा. :)
8 Mar 2012 - 7:29 am | ५० फक्त
उत्तम कार्य करत आहात आपण, आपणांस लक्ष लक्ष शुभेच्छा.
8 Mar 2012 - 7:59 am | पैसा
ईशान्य भारतात या सेवेची गरज आहेच, पण इतरत्रही आपापल्या भोवतालच्या निसर्गाशी सुसंगत राहून काय करता येईल याचा विचार करून प्रत्येकाने आपला हातभार लावला तर पर्यावरणाचे बरेच प्रश्न सुटतील.
8 Mar 2012 - 9:11 am | तर्री
अगदी सरळ व पश्ट विचाराचे म्हणजे ही रा.स्व.संघाशी ( विचाराने) संबंधित आहे का?
असेलही , नसेलही.
आपले कार्य स्पृहणिय आहेच. आम्ही काय करू शकतो ?
आपल्या असाइनमेट ला शुभेच्छा.
8 Mar 2012 - 2:01 pm | हंस
हो. ही संस्था रा.स्व.संघाशी निगडित (किंवा परिवारातील म्हणा) आहे.
9 Mar 2012 - 1:07 pm | पिंगू
उत्तम लोकसेवेच्या कार्याबद्दल अभिनंदन. बाकी ह्यामध्ये खारीचा वाटा कसा उचलू शकेन याची माहिती दिली तर आणखी उत्तम होईल.
- पिंगू
13 Mar 2012 - 8:05 am | विश्वास कल्याणकर
एकदा मित्र मंडळींसोबत इशान्य भारताची सहल काढा. गोहाटी ला सेवा भारती, पुर्वांचल चे कार्यालय , लाचीत नगर येथे आहे. तेथे श्री उल्हासजी कुळकर्णी यांचेशी संपर्क साधा ते तेथील सेवा प्रमुख आहेत. अन्य मदत लागल्यास मला अवश्य कळवा.
11 Mar 2012 - 8:56 pm | रघु सावंत
साहेब नविन छान माहिती मिळाली. आमच्या तळ कोकणात ज्यांची जास्त जमीन तसेच शेती नाही त्यांच्या करिता असे काही करता येईल का हो
13 Mar 2012 - 8:10 am | विश्वास कल्याणकर
इच्छा तेथे मार्ग प्रमाणे आधी काय करायचे ते ठरवा मार्ग आपोआप तुम्हाला दिसु लागेल. शुभेच्छा. काही तरी करायचे असे मनात येणे ही च सुरुवात असते.
13 Mar 2012 - 8:55 am | चिंतामणी
प्रत्यक्षात सुंदर रित्या आणले आहे. सर्वत्र हा विचार आचरणात आणला गेला तर किती छान होइल असा भाबडा विचार मनात येउन गेला.
पूर्वांचलाचा हा सचीत्र लेख सुंदर.
14 Mar 2012 - 3:44 pm | विश्वास कल्याणकर
लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशिश करने वालों की कभी हार नही होती. तुमचाच कित्ता गिरवतोय.
13 Mar 2012 - 10:05 am | सुहास झेले
स्तुत्य उपक्रम..... :)