बार बार देखो हजार बार देखो !

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
8 Mar 2012 - 5:26 pm

ज्या काळात हेमंत कुमार, नौशाद, सचिन देव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन हे लोक
प्रसिद्धिच्या शिखरावर होते त्या काळातही प्रसिद्धिपासून दूर राहून काम करणारी काही माणसे होती

कलाकारापेक्षा त्याची कला अधिक प्रसिद्ध व्हावी
असं भाग्य फ़ार थोड्यांच्या वाट्याला येतं.

संगीतकार रवी, जयदेव हे त्यापैकीच

रवी यांचे काल मुंबईत निधन झालं.

पण ते रसिकांसाठी अनेक सुरेल आठवणी मागे ठेवून गेले आहेत.

हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण
त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल

याउलट आहे रवी यांचे

जरा त्यांच्या कलाकृतीवर नजर टाकूया

दिल की थी आरजू की कोइ

ये राते ये मोसम नदीका किनारा
जब चली ठंडी हवा
लो आ गयी उनकी याद
ऐ मेरी जोहरा जबी
तोरा मन दर्पन ...
ये जुल्फ अगर खुलकर
छुलेने दो नाजूक..
चलो एक बार फिर से
ये वादिया ये फिजाये
बार बार देखो
चंदामामा दूर के (रवी यांनीच लिहिलेले)
चौदहवी का चांद हो
तूझ को पुकारे मेरा प्यार
नीले गगन के तले

आशा भोसले, महंमद रफी, महेन्द्र कपूर यांच्या आवजाचा अतिशय सुरेख
नि वैविध्यपूर्ण वापर रवी यांनी केला आहे.

देव करो नि आमच्या मनातील रवी यांच्या सांगितिक स्मृती कायम ताज्या राहोत

कलासंगीतसंस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

पुढिल वाक्यास जोरदार आक्षेप :

हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण
त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल .

१. मुळात हे पटलेले नाही.
२. स्व. रवी ना मोठे करताना एल.पी / आर.डी. ला कमी का केलेत ? आशुराव हे नाही पटले.

रवी यांच्या बद्दल बोलणे - स्पष्ट बोलणे आज जनरीतीस धरून नाही म्हणून थांबतो.

प्रदीप's picture

8 Mar 2012 - 8:36 pm | प्रदीप

इथे लेख टाकला हे चांगले केलेत.

पण एकाद्याची भलावण करतांना विनाकारण दुसर्‍यांवर बरीवाईट टीका करण्याची जरूर काय आहे?

ज्या काळात हेमंत कुमार, नौशाद, सचिन देव बर्मन, रोशन, शंकर जयकिशन हे लोक
प्रसिद्धिच्या शिखरावर होते त्या काळातही प्रसिद्धिपासून दूर राहून काम करणारी काही माणसे होती

कलाकारापेक्षा त्याची कला अधिक प्रसिद्ध व्हावी
असं भाग्य फ़ार थोड्यांच्या वाट्याला येतं.

संगीतकार रवी, जयदेव हे त्यापैकीच

हेमंतकुमार सोडून वर उल्लेखिलेले संगीतकार 'ए' ग्रेडचे होते. म्हणजे ते तेव्हाच्या काळातील इतरांपेक्षा कमर्शियली अधिक यशस्वी होते. रवि 'बी' अथवा 'सी' ग्रेड संगीतकार होता (ह्या माझ्या ग्रेड्स नव्हेत, त्या श्रेण्या तेव्हा प्रचलीत असलेल्या मिळकतीच्या उतरंडीशी निगडीत होत्या. आणि त्या सर्वांना ह्या ग्रेडस कुणी जहागीर दिल्या नव्हत्या. त्या त्यांना स्वकष्टाने मिळवाव्या लागल्या व टिकवाव्या लागल्या).

एकादा कलाकार अधिक यशस्वी असणे हे वाईट का समजले जावे? आणि प्रसिद्धीपासून दूर राहून तो काम करत होता, म्हणजे नेमके काय? एखाद्या क्षेत्रात-- मग ते चित्रपट संगीताचे असो अथवा एखाद्या चाकरमान्याचे (आय. टी., एकॉनॉमिस्ट अथवा अन्य कुणीही उच्चशिक्षीत) --- यश्स्वी होण्यासाठी नुसती बुद्धीमत्ताच नव्हे, तर इतरही बरेच काही असणे जरूरी आहे. तेव्हा कुणी संगीतकार त्याच्या कामात अत्यंत निपुण असला तरीही तेव्हढेच त्याला यशस्वी होण्यास, व म्हणून प्रसिद्ध पावण्यास पुरेसे नाही. दुसर्‍या शब्दात हेच सांगायचे तर असे म्हणेन की वरीलपैकी काही तसेच अन्यही काही संगीतकार यशस्वी व प्रसिद्ध होण्यात त्यांच्या सांगितीक स्किल्सव्यतिरीक्त इतरही काही बाबी त्यांच्यापाशी होत्या (हे मी चांगल्या अर्थाने म्हणतोय. उदा. गुणी माणसांना हेरून आपल्याशी ठेवण्याची खुबी, अगदी थोडक्या वेळेत अनेक चाली बांधता येणे इत्यादी). ह्याविषयी आता इथे फार लिहीत नाही.

तुमच्या आर. डी. व एल. पींवरील टीकेविषयी इतकेच म्हणतो-- त्यांचे फारसे तुम्ही ऐकले नसावे. तेव्हा अजून बरेच पुढे जायचे आहे!

चौकटराजा's picture

8 Mar 2012 - 8:42 pm | चौकटराजा

काही माणसे अशी असतात की त्यांचची कला गाजते पण ते फारसे गाजत नाहीत. आपले काम प्रामाणिकपणे करत प्रसिद्द्धी परांगमुख रहावे
असा त्यांचा पिड असतो, त्यातील दोन संगीतकार म्हणजे एन दत्ता व रवि.
रवि नी कोणत्या प्रकारचे गाणे केले नाही ते सांगा !
रवि यानी खराब कामगिरीने निर्मात्याला धोका दिला असा चित्रपट सांगा !
आपल्या काळात ज्याच्या एकाच्याच आहारी रवि गेले असा गायक सांगा !
त्या काळात रवि यांचे सूत बी आर फिलल्मस गोयल प्रोडक्शन, ए व्ही एम यांच्याशी मस्त जमले. चालीत तोच तो पणा येत असला तरी
ओपी नय्यर साहेंबांसारखेच दर्जेदार संगीत ते देत राहिले.

त्याना पत्रकारांचे प्रेम विशेष मिळाले नाही पण सरकारी, एन्जीओ व रसिक यानी त्याना भरभरून गौरविले आहे.
रविसाहेब, आपल्या बद्द्ल आमचा मनात नितांत आदर !
जिंदंगी इत्तफाक है , कलभी इत्तफाक थी आजभी इत्तफाक है !
जिंदगीमे प्यार करना सीख ले, जिसको जीना है वो मरना सीख ले !

प्रदीप's picture

9 Mar 2012 - 7:40 am | प्रदीप

काही माणसे अशी असतात की त्यांचची कला गाजते पण ते फारसे गाजत नाहीत. आपले काम प्रामाणिकपणे करत प्रसिद्द्धी परांगमुख रहावे
असा त्यांचा पिड असतो, त्यातील दोन संगीतकार म्हणजे एन दत्ता व रवि.

हे प्रसिद्धीपराड्गमुख प्रकरण नेमके काय आहे? म्हणजे इतर काही संगीतकार स्वतःहून प्रसिद्धीच्या मागे धावत होते, आणि रवि ह्यांच्यामागे मीडीया धावली तरी त्यांनी स्वतःस कोषात गुरफटून ठेवले व प्रसिद्धीपासून ते दूर राहिले? असे काही झाले असल्याचे माझ्या तरी ऐकिवात नाही.

झाले ते इतकेच की 'सी' ग्रेड' चे संगीतकार असल्याने, त्यांना आपसूकच 'ए' किंवा 'बी' ग्रेडच्या संगीतकारांइतकी प्रसिद्धी मिळाली नाही.

रवि यानी खराब कामगिरीने निर्मात्याला धोका दिला असा चित्रपट सांगा !
आपल्या काळात ज्याच्या एकाच्याच आहारी रवि गेले असा गायक सांगा

संगीतकाराच्या कारकीर्दीचे ईव्हॅल्यूएशन करण्याचे हे मापदंड तितकेसे संपूर्ण नाहीत. संगीतकार किती लवचिक आहे, त्याच्या चालींत किती वैविध्य आहे, तो किती थोडक्या वेळेत काम देऊ शकतो, अशी अनेक परिणामे त्यात येतात. त्यावरून त्यांची तत्कालिन बाजारात किमत ठरते.

रवि ह्यांनी रफी, महेंद्र कपूर, लता व आशा ह्यांव्यतिरीक्त अन्य कुठल्या गायक गायिकांकडून काम करून घेतले आहे? कुण्या एकाच्या आहारी रवि जाण्याचा फारसा प्रश्न खरे तर नसावा, कारण कुठल्या गायक/ गायिकेकडून गीत गाऊन घ्यायचे हे त्यांचे त्यांना प्रत्येक वेळी कितपत ठरवता येत होते, हे आपणास नक्की माहिती नाही. काही पॅटर्न्स मात्र लक्षात येतात--- रवि बी. आर. चोप्रांचे नेहमीचे संगीतकार होते (एन. दत्ता होते सुरूवातीस, त्यानंतर रवि ह्या कँपात दाखल झाले). बी. आर. ह्यांनी लतास घेणे वगळले कारण बहुधा रॉयल्टीवरून काही मतभेद असावेत. तेव्हा तिथे नेहमी आशाच गायली (पुढे मला वाटते, 'आँखे'च्या दरम्यान हे मतभेद मिटले, तेव्हा तिथे लता आली). तेच महेंद्र कपूरचे. त्यातून त्यांची रेकॉर्डिंग्स असत त्या दिवशी टॉप गायक/ गायिका त्यांच्यासाठी उपलब्ध असत किंवा नाही, हा अजून एक मुद्दा झाला.

रवि ह्यांच्या गीतांचा मीही चाहता आहे. त्यांच्या चार गाण्यांची नुसती जंत्रावळी देण्यापेक्षा लेखात त्यांच्या रचनांविषयी काही जास्त माहिती आली असती तर ते उचित ठरले असते. एखादे गीत आपल्याला आवडले तर ते का, हे थोडक्यात सांगता यावे? उदा-- अमुक एक मेलडी, मधल्या जागांतील करामती इत्यादी. तसे लिहीणे ह्या कलाकारास समर्पक श्रध्दांजली ठरली असती. दुर्दैवाने इथे तसे झाले नाही.

एखादा संगीतकार आपणास आवडतो, हे ठीकच आहे. पण तो हुच्च कसा होता ह्याविषयी लिहीतांना इतर 'नीच' कसे होते हे लिहीणे चुकिचे आहे. त्यात पुन्हा कुणीतरी प्रसिद्धी पराड्गमुख होता, साधे सुती कपडे कसे नेहमी घालत असे, चहा व्यतिरीक्त त्याला इतर कसलेही व्यसन नव्हते, अगदी आर्थिक दृष्ट्या शक्य असतांनाही त्याची स्वतःची गाडीही नव्हती, पायीपायी तो कसा स्टृडियोत जायचा इत्यादी टिपण्णी फॅक्च्युअली बरोबर असेल अथवा नसेल पण ती गैर जरूर आहे.

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 9:45 am | चौकटराजा

संगीतकारात ए ग्रेड बी ग्रेड असे काही नसते. ए ग्रेड बी ग्रेड असेल ते ते एखादे गीत आहे असे म्हणता येईल फरतर. माझी प्रोफाईल पहाल
तर मी रवि यांचा "फॅन" नसल्याचे आपल्याला आढळून येईल .मी ओपी नय्यरचा " फॅन" आहे पण सर्वश्रेष्ठतेत मी मार्क शंकर जय किशनना
देतो. ग्रेड ही एखाद्या फॅक्टर वर ठरवता येईल फारतर ! . उदा. असे म्हणता येईल की ट्रेंड सेटर म्हणून आरडी, ए आर ग्रेट सिंपली गॉड ! पण
मेलडी मधे त्याना ७० वा २००० च्या युगाचे ओपी वा सी रामचंद म्हणायचे काय ?

प्रदीप's picture

9 Mar 2012 - 10:40 am | प्रदीप

वर मी अगोदरच लिहील्याप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत ह्या ग्रेड्स 'नोशनली' होत्या. संगीतकाराच्या कमर्शियल यशानुसार त्यांना पैसे मिळत, ते मिळण्याची एक नोशनल उतरंड होती, त्याला ते ए, बी, सी ग्रेड्स असे म्हणत.

तुम्हा -आम्हास ज्या ग्रेड्स ठरवायच्या आहेत अथवा नाहीत, ते वैयक्तिक झाले. (तुमच्या प्रमाणेच शंकर जयकिशनचा मीही निस्सीम चाहता आहे). एकाद्याला कुठले संगीत आवडावे अथवा नाही, ह्याविषयी माझी काहीच टिपण्णी नाही, खरे तर. रविचे मलाही काहीकाही आवडलेले आहे; कालच मी येथील खरडफळ्यावर त्याच्या एका गीताच्या ओळी लिहील्या आहेत. आजच्या अनेक तरूणांना शंकर जयकिशन काय, नौशाद काय, उषा खन्ना काय, रवि काय-- सगळेच बोअर वाटतात; त्यांपैकी कुणाला रहमान अथवा हिमेश रेशमियाही आवडत असतील, त्याविषयी अजिबात वाद नाही.

पण माझा आक्षेप अनेकदा लोक आर्टिस्ट्सकडून ज्या 'अपेक्षा ठेवतात' (साधी रहाणी, दोन धोतरे आलटून पालटून वापरत, प्रसिद्धीपराड्गमुखता, सहजसाध्यता (approachability) त्यांविषयी आहे. त्यांविषयी ह्या धाग्यावर चर्चा नको, खरडीतून करता येईल अथवा वेगळा धागा काढून.

विनोद१८'s picture

8 Mar 2012 - 10:55 pm | विनोद१८

आशु जोगकाकूना नमस्कार.........^........

प्रथम संगीतकार रवी ह्याना आदरान्जली..!!!!

आपल्या 'हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण
त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल'
ह्या वाक्याला माझा पहिला आक्षेप. काहीतरी उगीच लिहायचे म्हणून लिहीला गेलेला एक लेख असे वाटते.

खरोखरच आपल्याला त्यान्चे 'श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल' असे वाटत असेल तर पुन्हा क्रुपया असल्या विषयावर कधी काही लिहुन स्वताचे हसे करुन घेऊ नका. ज्या महान सन्गीत्कारान्ची नावे आपण घेतलीत त्यान्च्या कामाची एकमेकाबरोबर तुलना कधीच होउ शकत नाही, प्रत्येकाचा रन्ग वेगळा ढन्ग वेगळा अगदी सगळेच वेगळे.

राहता राहिला प्रश्ण 'आपल्या श्रवणीय कष्टाचा' त्यासाठी आपले बिघडलेले श्रवणयन्त्र ENT Specialist कडे जाऊन त्याची मरम्मत करून घ्यावी असा सल्ल नाइलाजाने देतो, असो.

कधीतरी आर. डी., लता व किशोर एकत्र किवा आर. डी., आशा व किशोर किवा आर. डी. व आशा किवा आर. डी. व लता जरूर ऐका.....उत्तर मिळेल.

विनोद१८

आपल्या 'हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण
त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल' ह्या वाक्याला माझा पहिला आक्षेप. काहीतरी उगीच लिहायचे म्हणून लिहीला गेलेला एक लेख असे वाटते.

मला स्वता: ला एल पी व आर डी यांचे फिल्म संगीतातील योगदाना बद्द्ल आदर आहे हे प्रथम कबूल करतो. दोघांनाही मिळालेल्या संधी व त्यानी निर्मिलेले संगीत यात ते जुन्या जमान्याचा ओपी, रवि, नौशाद, एस जे, सी आर, यांच्या तुलनेत मागेच आहेत. पारसमणि, दोस्ती
सति सावित्री लुटेरा, सरगमम, कर्ज यांचे संगीत कोण विसरेल. तीसरी मंझील, हरे राम., जवानी दिवानी, बहारो़के सपने, सागर , अमर प्रेम
१९४२ कोण विसरेल बरे ? सवाल आहे प्रमाणाचा !

चिरोटा's picture

9 Mar 2012 - 1:31 pm | चिरोटा

हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रसिद्ध व्यक्ती तशा थोरच असतात. LP नी सुश्राव्य गाणी दिली आहेतच पण सुमार गाण्यांचे प्रमाणही बेसुमार आहे. रवि ह्यांनी मोजकी गाणी दिली ती बर्‍याच अंशी ऐकायला चांगली वाटतातं. नौशाद्,ओपी ,सी. रामचंद्र ह्यांचा क्लास वेगळा होता. त्यांनी अनेक चित्रपटांना गाणी दिली आणि त्यातली बहुतांशी क्लासिक म्हणता येतील.

चौकटराजा

यांची प्रतिक्रिया आवडली

विनोद यांचीही भावली, शेवटी काय मिसळीवर लोकशाही आहे.

प्रचेतस's picture

8 Mar 2012 - 11:27 pm | प्रचेतस

हिंदीमधे राहुलदा, लक्ष्मी प्यारे असे अनेक संगीतकार आहेत ज्यांचं काम प्रचंड आहे पण
त्यातलं श्रवणीय काम मात्र कष्टाने शोधून काढावे लागेल

याउलट आहे रवी यांचे

हे सोडून लिखाण आवडले.

+१

हेच म्हणतो..

जोग यांनी दिलेली गाणी एकाहून एक सरस आहेत.

रवि यांना श्रद्धांजली.

मस्त कलंदर's picture

9 Mar 2012 - 11:08 am | मस्त कलंदर

बहुतेक जणांनी विशिष्ट वाक्यांबद्दलची नापसंती दर्शवली आहे, माझेही त्यांना अनुमोदन.
प्रदीप यांचे प्रतिसाद वाचनीय आहेत आणि त्यांची कलाकारांच्या प्रसिद्धीपराङमुखते विषयीचे विचार पटले. एकाचे गुण सांगताना दुसर्‍यांना कमे लेखू नये हेही आलेच.

वपाडाव's picture

9 Mar 2012 - 3:05 pm | वपाडाव

प्रत्येक वाक्याशी बाडिस...

लक्ष्मी प्यारे यांनी

मोहमद अजीज
शब्बीरकुमार अशा अदखलपात्र

व्यक्तीं कडून गाणी गाऊन घेतली
त्यामुळे स्वस्तात काम होत असे

याला कचर्‍यातून कला असेही म्हणतात.

त्यामुळे
"हसता हूवा नूरानी चेहेरा"
"चाहूंगा मै तूझे सांज सवेरे" (विलक्षण आर्त गाणे)

सोडलं तर हाती काहीच लागत नाही

त्यामुळे

गीतकार म्हणून देखील शकील बदायुनि, साहिर लुधियानवी
अशांची गरज न भासता

आनंद बक्षींवर काम भागत असे

त्यामुळे
"मै तेरा जानु और तू मेरा दिलबर है"
"इलु का मतलब आय लव यु "
"माय नेम इज लखन"

"मैं हूँ प्रेमरोगी मेरी दवा तो कराओ"
"जुम्मा चुम्मा दे दे"

अशी बडबडगीते निर्माण होत
जय हो !

चौकटराजा's picture

10 Mar 2012 - 8:04 am | चौकटराजा

आशू, एक धागा एकाने काढल्यावर दुसरे तो भरकटवतात . अपरिहायपणे .
पण धागा काढणार्‍याने तरी असे करू नये.
लक्ष्मी प्यारे. आर्डी ए आर रेहमान - ओव्हर व्हॅल्यूड? ? असा नवीनच धागा का काढत नाही ?

आशु जोग's picture

10 Mar 2012 - 9:17 am | आशु जोग

चौकटराजा

आपले म्हणणे एकदम मान्य

पैसा's picture

10 Mar 2012 - 5:16 pm | पैसा

रवी याना श्रद्धांजली! अनेक गोड गाणी देऊन त्यानी आमचं मध्यमवर्गीय जीवन समृद्ध केलं होतं.

प्रदीप यांचे प्रतिसाद आवडले. इतर कोणाही संगीतकारावर पूर्ण रद्दी किंवा टाकाऊ असा शिक्का मारू नये. अगदी अन्नु मलिक किंवा बाप्पी लाहिरी यानीही काही चांगली गाणी दिली आहेत.