पुन्हा ईशान्य भारत-२०१२

विश्वास कल्याणकर's picture
विश्वास कल्याणकर in भटकंती
5 Mar 2012 - 3:10 pm

मणीपूर मध्ये बिष्णुपुर जिल्ह्यात माइरैंग येथे नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंदसेनेच्या कार्याबद्दल चे स्मारक आहे. स्वतंत्र भारताचा पहिला झेंडा येथे १२ एप्रिल १९४४ ला फडकला होता.

"लोकताक" लेक(तलाव) इशान्य भारतातील सर्वात मोठा गोड पाण्याचा तलाव म्हणुन किबुल लाम्जाओ राष्ट्रीय उद्यान जगातील एकमेव तरंगणारा पार्क म्हणुन प्रसिध्द आहे. मणीपूर राज्यात इंफाल पासुन ४५ कि.मी वर जवळ जवळ ४० चौ.कि.मी परिसरात पसरलेला हा पार्क व त्यातील तळे अतिशय सुंदर. आहे. स्थानीय भाषेत पुम्डी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या वनस्पती व मातीच्या सडण्याच्या प्रक्रिये मुळे हा तरंगता आहे. येथे दुर्मीळ अशा एइद (नाचणारे हरिण) हरणांची वस्ती असते व ते पहाण्यासाठी आम्ही गेलो होतो परंतु दुर्दैवाने आम्हाला एकही हरीण दिसले नाही. सध्या ३००-४०० हरिणे असल्याची माहीती स्थानीक मार्गदर्शकानी दिली. या हरिणांचे संरक्षण व्हावे म्हणुन यास राष्ट्रिय उद्यान म्हणुन जाहीर करण्यात आले आहे. मणिपुरी मध्ये या हरिणाना संगाई म्हणुनही ओळखल्या जाते. जेंव्हा नद्यांना पुर येतो तेंव्हा येथील पाळीव जनावरांना या तरंगत्या जागेत गोठा करुन बांधल्या जाते जेणे करुन ही जनावरे पुरात वाहुन जात नाहीत वआपआपल्या गोठ्यात तरंगत राहतात. व पुर ओसरल्यावर मालक पुन्हा आपल्या जनावरांना घेउन जातात.

प्रसिध्द लोकताक लेक

तलावावर पसरलेली "फुमदी" वनस्पती जी तलावावर तरंगत असते. व या वरच हरिणे बागडत असतात.

दुर्मीळ पजातीचे हरिण

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

5 Mar 2012 - 6:15 pm | अत्रुप्त आत्मा

वाचताना आणी फोटो बघताना अतिशय इंट्रेस्ट वाटत होता,पण अचानक मॅच विनिंग ओव्हरला विज जावी तशी अवस्था झाली...अजुन आहेत असं वाटता वाटता फोटु अचानक संपलेच.... त्यामुळे सुरवातच नीट झाली नाही,तर या धाग्याला अर्धवट कसे म्हणावे? असा प्रश्न पडलाय.. :-(

लवकरात लवकर पुढचा पूर्ण भाग टाकावा...ही विनंती.

सुकामेवा's picture

5 Mar 2012 - 7:10 pm | सुकामेवा

बऱ्याच अपेक्षा बाळगून लेख उघडला परंतु वाचन सुरु होण्यापूर्वीच लेख संपल्या सारखा वाटला , कृपया घाईत असाल तर नंतर आजून माहिती टाका.

अमृत's picture

5 Mar 2012 - 7:24 pm | अमृत

अपेक्षाभंग झाला.

एकच फोटो ३ वेळा का टाकला.

अमृत

गवताळ प्रदेश तरंगता असेल असे वाटले नाही. हरणे फिरतात तर मनुष्य फिरू शकतात का?

आत्मशून्य's picture

6 Mar 2012 - 11:33 am | आत्मशून्य

कमालीचा त्रोटक लेख.