"!!.....मधुचंद्र......!!"

जेनी...'s picture
जेनी... in जनातलं, मनातलं
28 Feb 2012 - 12:17 pm

शब्दाविना ओठातले ..........

झंकार भावनांचे ........

एका नववधूच्या मनातले .........

संसाराची नुकतीच सुरुवात करण्याआधी आयुष्यभर साथ देण्याची ..सगळ काही वाटून घेण्याची ,

सुखात असो वा दुखःत ..कधीही एकट न सोडण्याची ..समजून घेण्याची अन समजून राहण्याची ,

अश्या बर्याच काही इच्छा नववधूच्या मनात असतात .

त्याच संसाराच्या पहिल्याच पायरीवर तिच्यासाठी महत्वाचा असतो तो त्याचा सुखद सहवास ..

त्याचा अंतरमनाला जोडणारा स्पर्श , खूप काही मनात येवून जातं .जुन्या आठवणीना उजाळा देवून जातं .

क्षणात मन पलीकडे ..क्षणात अलीकडे येवून जातं ..थोडी चलबिचल ...थोडीशी हुरहूर ..थोडी उत्सुकता ..

थोडस काहूर ..सगळच व्यस्त अन सगळच बोलक ..

ओठावर असत पण बोलताच येत नाही ..लाजणार मन उघडताच येत नाही .

विसावलेली नजरही मग वर उचलता येत नाही ..

तेच काहीस ....

___________________________________________________

नववधू प्रिया मी बावरते
लाजते पुढे सरते , फिरते......

आज राहून राहून सारख्या ह्या ओळी आठवत होत्या . त्यातला नववधू हा शब्दच तर आज जगत होती मी .
केवढा गोड वाटतो ना हा शब्द ऐकायला . त्या शब्दात बरच काही लपून बसलय...पण आज अक्षरशा स्वताहा
तो अनुभव घेत असताना असंख्य कळ्या आपल्या अवतीभोवती उमलल्याचा भास होतोय ..भास नसावाच हा .
माझ अबोल मन कुठेतरी आज बाहेर येवून माझ्यातल्याच ह्या नववधुशी सुसवांद साधतय.

मघाशी , या नवीन नात्यान ,अचानक ओंजळीत भरलेली सगळी नातेवाईक मंडळी ,सगळे मोठे छोटे ..सगळे
सगळेच ..आपल किती कौतुक करत होते . त्यात जवळच वाटलेलं नणंद ...हे खास नात ,मैत्रिणीसारखी वाटली ,खेळकर ,बडबडी .किती चटकन आपलीशी वाटायला लागली .उगाच चिडवत होती मला , पण छान वाटत
होत . तीच सारख वाहिनी वहिनी करण ..ऐकत रहावस वाटत होत .

"ए वहिनी ..भावू खूप चिडतो हा ...सांभाळ आता तूच ..घट्ट पदराला ..नाही नाही ओढनीला बांधून ठेव हां ..

हम्म कळेलच तुला हळू हळू ..पण तू तर आधीच जादू करून ठेवलियेस त्याच्यावर ..त्यामुळे तुझ्यावर चिडेल

कि नाही शंका आहे बुवा !!.

आणि खळखळून हसली .मला काहीच सुचल नव्हत बोलायला .पण नंतर हळूच हातात हात घेवून , अगदी जवळच्या मैत्रिणीसारखी समजावण्याच्या अन छेडण्याच्या सुरांना एकत्र करून बोलली ,

" पण भावू खूप छान आहे ,खूप समजूतदार ...आणि महत्वाच म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा

मग तो लहान असो कि मोठा , खूप आदर करतो ..त्यामुळे तुलाही ह्या घरात तितकाच मान सन्मान ..आदर

मिळेल .ह्यात अजिबात शंका नाही , आजपासून हे घर सांभाळण्याच .. त्यातली नाती घट्ट बांधून ठेवण्याच

जवाबदारीच काम तुझ ...हो पण घाबरू नकोस हा आम्ही सगळ्या बाजूने तुझी मदत करू ....हां पण भावुला मात्र

तूच सांभाळ हां ..तो अगदी लहान मुलांसारखा आहे अजूनही .. त्याची बहिण आहे म्हणून गुणगान नाही हां गात

मी !..खरच मला अभिमान आहे त्याचा .." .

डोळ्यात पाणी तरळल होत तिच्या . मला त्या घरातल्या नात्यात ओलाव्याची जाणीव होऊ लागली .

परत हसरा चेहेरा करून . माझा चेहेरा दोन्ही हातात धरून " किती गोड दिसतेयस .

आज आमचा भावूराया ..एकदम फिदा हुसेन बनणार बहुतेक ," अस म्हणून क्षणात मला एकट ठेवून

निघूनही गेली .

किती लहान आहे हि ,पण केवढ समजावून गेली .काहीच क्षण सोबत होती ,पण तेवढ्या वेळात संपूर्ण कुंटुंबाच हसर चित्र दाखवून गेली .जाताना ती दार बंद करून गेली .जणू आता ह्या क्षणात हि सगळी दार तात्पुरती बंद ठेव अस सांगून गेली .माझ्याही मनाच दार हळूहळू उघडू लागल .

सजवलेल्या त्या खोलीकडे बघत माझ मन एकदम मोहोरून गेल . लक्ख प्रकाश होता खोलीभर ..सगळ्या
वस्तू नेट नेटक्या लावलेल्या . मंद गार वारा खिडकीतन हळूच आत येत होता .पूर्ण चंद्र आभाळात चांदण्यांशी गप्पा मारण्यात दंग होता .ग्यालरीत ठेवलेल्या , मोजता येणार नाहीत इतक्या कुंड्या ..अन त्यात उमललेली फुल ..अगदी रातराणी सुद्धा . इतक प्रसन्न दरवळणार वातावरण ..मी नुकतीच न्हावून बाहेर आल्यासारखी झाले .मधोमध सजवलेला पलंग . गुलाबाच्या फुलांच्या माळा चारी बाजूला सोडलेल्या .

मध्येच एखाद पांढर गुलाब ..एखाद गुलाबी ,तर कुठे जाई जुई ..निशिगंध.

लाल गुलाबाच्या पाकळ्यांनी पूर्ण पलंग भर स्वतःच्या शरीराच अंथरून केल होत . कुठेही जागा शिल्लक नव्हती .
थेम्बा थेम्बानि पावसाची सर सजावी ....एकमेकांच्या श्वासांनी आयुष्य सजवाव तसं पाकळ्या पाकळ्यांनी पलंग सजला
होता . बाजूच्या टेबलवर काचेच्या नाजुकश्या एका भांड्यात बरीच मोगर्याची फूल आणि दुसर्या भांड्यात लाल ..गुलाबी ..पिवळ्या गुलाबाच्या पाकळ्या ..ठेवल्या होत्या .

त्याच्या सजावटीकडे बघूनच कळत होत . सगळ दृश्य पाहून एक अनामिक हुरहूर मनात दाटू लागली .सगळच नवीन होत .नवीन घर नवीन माणस नवीन जागा ...अगदी ह्या वस्तूही नवीन . त्यात फक्त एकच तर व्यक्ती ओळखीची होती माझ्या ..ज्याच्यावर विश्वास टाकून मी माझी नाती मागे ठेवून आले होते .नव्या नात्यात स्वतःला गुंफून घेण्याची इच्छा होती मनात ..पण ..अजून कसा आला नाही ..:(

आज पहिली रात्र ..आमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याची रात्र ...

एकांतात मिळून पाहिलेली सहवासाची स्वप्न ....खरच किती स्वप्नाळू होतो ना आम्ही दोघही .सगळ सगळ क्षणात डोळ्यासमोरून तरळून गेल .त्याचं मला पहिल्यांदा पहायला येन .आमच मग चोरून भेटन ..उशिरा आल्यामुळे नेहेमीच होणारी छोटी छोटी भांडण .किती सुख होत त्यातही .मला लाडी गोडी लावताना .त्याच्याकडे बघून खर तर खूप मजा वाटायची .पण तरीही उगाच राग ताणून ठेवायची मी .त्याने आणखीन मनधरणी करावी म्हणून .कधी कधी तर
अगदी लहान मुलाना समजवावं तस समजवायचा ,

म्हणायचा आयीस्क्रीम देवू का ? तुला चोकलेट आवडत का ?...

गोड वाटायचं सगळच . अश्या गोड आठवणींची गाठ मी माझ्या सुखाच्या पदराला बांधून आयुष्यभर ती सुटू नये
ह्याची काळजी घेईन ..फक्त तू साथ दे मला ..माझ मन ,मनाशीच बोलत होत .

एकटक चंद्राकडे लावलेली नजर पुन्हा विचलित झाली .भल्या मोठ्या माझ्या वेणीला मी पाठीवरून पुढे घेतल .
आणि एक मिश्कील हास्य सगळीकडे पसरल . माझी ती लांबसडक वेणी ,.माझी नव्हतीच मुळी. मला भारी हौस होती
लांब केसांची ,पण आईने लहानपणी केस कधी खांद्याच्या खाली जावूच दिले नाहीत ..आणि मोठ झाल्यावर फ्याशन्च्या नादात त्या केसांची लांबी मी कधी वाढूच दिली नाही ..त्यामुळे आत्ता जेव्हा वेणीची गरज पडली तेव्हा मात्र कृत्रिम वेणीचा मार्ग अवलंबावा लागला . खूप सुंदर आणि सुगंधी गजर्यांची वेणी .अतिशय अथक प्रयत्न करून , अगदी मिळेल तिथे पिना घुसवून रात्रीपर्यंत टिकावी ह्या हिशोबाने बसवण्यात आली होती ..जड वाटायला लागलहोत डोक ..पण एक दिन के लिये चालता ह्ये यार अस म्हणत दुर्लक्ष करण चालू होत . किती वेळ झालाय ..हा कुठे राहिलाय ??.त्याला कळत नाही का कि आज तरी लवकर याव म्हणून ?? ..कुणीतरी आपली वाट बघतय म्हणून ...

मित्र ..आणि मित्र ..पण आज तरी निदान ..जावूदे ..

माझा चेहेराही माझ्या नकळत हावभाव व्यक्त करू लागला.पाकळ्या पाकळ्यात आज तुझ माझ नात उमलणार होत. उमललेल्या फुलाला खर्या अर्थाने आज भ्रमराचा स्पर्श होणार होता . रात राणीही आज स्वतःच स्वतःच्या सुगंधान धुंद
झाली होती .चंद्राच्या त्या गोड सहवासात चांदण्या गुंतून पडल्या होत्या , अन मी ...मी अशी एकटीच त्याची वाट बघत बसलीय . पण एकटी कुठेय ..सतत त्याचा भास ..त्याची चाहूल ..मला एकटी राहू देईल तर शपथ !. आज च नाहीय ..तर हे तो माझ्या आयुष्यात आल्यापासून असच चालू आहे ,जणू मला एकटीला राहूच द्यायचं नाही असा विडा उचलाय .

आजही मी व्यस्थ आहे आणि तेही त्याचीच वाट बघण्यात .

पलंगाच्या चारीबाजूने सोडण्यात आलेल्या गुलाबाच्या फुलांच्या माळा माझ्याकडेच बघतायत कि काय असा भास झाला मी अगदी त्यांच्या जवळ जावून उभी राहिले ..अन इतक्यात पुन्हा गार वार्याची झुळूक हळूच आत येवून त्या माळाना स्पर्शून गेली ..उगाच खोड्या काढत होता वारा ..सगळी फूल लाजली ..माझ्या लाजन्याशी स्पर्धाच जणू .....

आज त्यांची अन माझी अवस्था तशी एकच तर होती ..आजचं मनातल वादळ ..मी कुणालाच सांगू शकत नव्हती .आज सगळेच पडदे हळूहळू मनावर सरकत होते .त्याची वाट बघत होते .क्षणात तो कुठूनसा येईल अन ह्या सगळ्याच पडद्यांना सर्रकन दूर करेल ..पण ..खरच आता मात्र फार झाल हां ..यायला हवा इतक्यात ..कुठे बसलाय ,कुणास ठावूक्क ..??

मघाशी विचार करता करता पुढे घेतलेली वेणी मी हाताने कुरवाळत होते . शालूचा तो भरजरी पदर ..त्या पदरावरची
नाजूक नक्षी ,अन त्या नक्षीत भरलेले मोती ..माझी नजर त्या एकेका मोत्यावरन फिरू लागली . खरच स्त्रीच आयुष्य
किती सुंदर असत ना . ह्या नक्षीत बसवलेल्या मोत्यांसारख . असा मोती , जो सुंदर गोष्टींच सौंदर्य आणखीन
खुलवण्यासाठी वापरला जातो आज मीही ह्या घरात आलेय ..हे सुंदर नात्यांनी सजलेलं .. माणसांनी गजबजलेलं ..
अन प्रेमाने बहरलेल घर ..ह्या सुंदर घराला आता मी माझ्यातल्या गुणांनी सुशोभित करणारं ..इथल्या प्रत्येक
वस्तूवर माझ एक अस्तित्व निर्माण करणारं ..घरातल्या माणसांच्या मनावर प्रेमाच शिंपण करणारं ..ह्या घरात
एकमेकांवर प्रेम करणारी गोड मानस आहेत ..त्यावर मी माझ्या पदरातल्या मायेच पांघरून धरणारं ..घरातल्या
छोट्यानवर विश्वासाची अन आधाराची पाखरण करणारं ..कशीही वेळ येवू दे पण घर एकत्र ठेवणार ..विस्कटणार
नाही माझ्या स्वप्नांची रांगोळी , बिघडणार नाही घातलेली घडी , मोडणार नाही माझ रेशमी घरटं ,पावलोपावली
असेल समजूतदारपनाशी गट्टी . सगळ काही असेल ते फक्त ह्या माझ्याच घरासाठी ".

क्षणभर माझ मन अगदीच भावूक झाल .

पुन्हा नजर फुलांच्या माळातून डोकावणाऱ्या निशिगन्धाकडे गेली .मधूनच जाई ,जुई सुद्धा माझ्या जवळ येण्याची चाहूल
घेत होत्या . मी अलगद निशिगन्धेला स्पर्श केला .पण हा स्पर्श थेट खोल मनात जावून पोहोचला . माझ मन पुन्हा
मोहोरलं ..अंगावर एकच शहारा येवून गेला ..त्याच्या स्पर्शाची आठवण आली . असाच तर स्पर्श करायचा हळूच
..हळ्वा स्पर्श ..नेहेमी बोलका स्पर्श . कधी त्याला ओठांनी बोलायची गरजच पडली नव्हती . त्याचा अलगद होणारा
स्पर्श ..अगदी तो जवळ नसतानाही माझ्यावर त्याची छाप ठेवून जायचा . तो पहिल्यांदा भेटायला आला होता तेव्हाच त्याचं निरागस रूप डोळ्यासमोर आलं .

आता मी खरच लाजले , अगदी तेव्हा लाजली होती तशीच .

जास्त बोलत नव्हता ,पण सहवासच अतिशय प्रभावी होता त्याचा .साधासाच चेहेरा ..पण उठुन दिसणार व्यक्तिमत्त्व
खोडकर नजर हि मात्र खासियत होती त्याची . डोळ्यात सहजा सहजी पहाण सोप नसायचं माझ्यासाठी .असंख्य गोष्टी
दाटीवाटी करून हजर व्हायच्या मनात .म्हणून मग त्याच्या नजरेत पाहण्याचं सहसा टाळायची मी .पण
भेटण्याची आतुरता जी फक्त त्याच्या डोळ्यातच दिसायची तिला मात्र पाहण्याचा मोह आवरायचा नाही मला.मग
काय त्यातच तर फसायची मी . त्या नजरेत बेधुंद होवून भीजूनच बाहेर यायची . तोच आता किती वाट पहायला
लावतोय मला .नेहेमी चोरून पहायची त्याला ,

पण आज मात्र धिटुकल्या नजरेन त्याच्या नजरेत पहाणार .हम्म माहितीय कि आज तो नेहेमीपेक्ष्या जरा जास्तच खोड्या काढणार नजरेन ..पण तरीही ..तरीही आज मी त्याच्या डोळ्यात ..फक्त माझ्यासाठी असणार प्रेम ..माझ्यासाठी असलेली आतुरता ..हेच बघण्यात यशस्वी होवून दाखवणार ..पण खर सांगू ..त्या नजरेतल्या खोडकर पणामुळे तर मी त्याच्या इतकी जवळ आले होते . त्याच्या नजरेनच मला त्याच्या दिशेन वाहण्यास भाग पाडलं. खट्याळपणा चालू असायचा .अस काहीस बघायचा ..कि नजर आरपार भेदून जायची . आज त्याच नजरेच मी मनापासून स्वागत करणार ..आज मी , माझ्या
डोळ्यातल्या त्याच्याबद्दल वाटणाऱ्या विश्वासानेच त्याला हरवणार .

मला अगदीच गालातल्या गालात हसू आलं .

घड्याळ काट्यांचा प्रवास सावकाश रित्या करतोय अस वाटल . बराच वेळ निघून गेलाय .कधी येईल हा ?
कि मीच उतावीळ झालेय त्याला पहाण्यासाठी ?..काहीच कळेना . शालू फारच जड होता ...वेनिनेही मान जड झाल्यासारखं वाटू लागलं.अंगावरचे इतके दागीने .

बापरे मी तर एवढे सगळे एकत्र या आधी कधीच घातले नव्हते !

ड्रेसिंग टेबलच्या उंच उभ्या आरशासमोर जावून उभी राहिले .सकाळपासून किती धांदल ..गडबड ..गोंधळ ..
सगळे आपल्याला सजवण्यात दंग होते आणि आपण मात्र त्याच्यासाठी सजतोय एवढीच एक जाणीव मनात ठेवून
सजत होतो, नटत होतो . सगळेच कौतुक करत होते ,पण फक्त त्याने डोळेभरून आपल्याकडे पहात राहावं ..

हीच गोष्ट सारखी मनात येत होती .

सगळेच दागिने छान पण त्यात उठून दिसणार माझ मंगळसूत्र त्यातल्या त्या नाजूक दोन वाट्या ,म्हणतात
एक वाटी म्हणजे माहेरची आठवण अन दुसरी सासरची .माहेराहून जे काही आपल्याला मिळाल ते ह्या एका वाटीत
असत अन सासरी जे काही मिळणार ते दुसर्या वाटीत असत .दोन्हीकडची नाती ..ती सगळी मानस ..आपुलकी ,प्रेम,रुसवे ..फुगवे ..सगळ सगळ सांभाळताना स्त्रीची नक्कीच थोडीफार ओढाताण होत असेल ...पण तिचा जोडीदार
तिच्या पाठीशी भक्कम उभा असेल तर हीच सगळी नाती तिला हलक्याफुलक्या त्या फुल्पाखारान्प्रमाने वाटतात
कुठल्याही फुलावर बसा तिथून फक्त आपलेपनाच मिळणार . मी त्या मंगळसुत्राच्या वाट्याना अलगद बोटांनी वर
उचललं, अन हे मंगळसूत्र त्याने माझ्या गळ्यात घाल्तानाचा तो क्षण आठवला . तमाम जनसमुदायच्या उपस्थितीत
देवाब्राह्मणांच्या साक्षीने हे सौभाग्याच लेन त्याने माझ्या गळ्यात घातल होत . चिमुटभर कुंकू माझ्या भांगात भरलं
होत . मला त्यावेळी त्याच्याकडे पहायची फार इच्छा झाली होती ,पण नाही पाहू शकले .जे स्वप्न दोघांनी एकत्र
पाहिलं होत ते स्वप्न प्रत्यक्षात उतरत होत .त्याचच समाधान , तो आनंद ..मला त्याच्या डोळ्यात पहायचा होता
माझ्या डोळ्यातला आनंद त्याला दाखवायचा होता , पण नाही पाहू शकले .

कस पहाणार एवढ्या लोकांच्या समोर !

क्षणात नजर आरश्यात गेली .मी स्वतःला न्याहाळू लागले . आज खूप सुंदर दिसत होती मी , पण हे सगळ त्याने
बोलाव अस वाटत होतं. कधीचे वाटेकडे डोळे लागलेत .दाराकडे राहून राहून पाहतेय मी ….आता येईल ..मग
येईल ..पण काहीच नाही . साधी चाहूल सुद्धा नाहीय दार उघडण्याची . हिरमुसलेल्या माझ्या गालावर पुन्हा अलगद
फुलांच्या माळेतल्या गुलाबाची पाकळी येवून पडली . आणि मी पुन्हा माझ्या आठवणींच्या विश्वात जावून पोहोचली .

व्यालेनटाइन डेचा तो दिवस पुढे आला ..

त्या दिवशी खर तर आम्हाला भेटताच नाही आल.. दूर होतो आम्ही एकमेकांपासून ..पण मन माझ चोवीसतास त्याच्याच जवळ असायचं .मी फोन केला होता त्याला .त्याच्या आवाजात हरवून गेले होते .त्याला क्षणभरही गप्प बसू दिल नव्हत .सारख बोल ना ..बोल ना .आणितो म्हणायचा ,

"बोलतोय ना , श्वास तरी घेवू कि नको मध्ये "?

पण त्याला कस सांगणार ,कि मला सगळ मनात साठवून ठेवायचं आहे म्हणून.

तो बोलत होता .त्याचा प्रत्येक शब्द पाण्याच्या ओल्या थेम्बानी नटलेल्या सुंदर गुलाबासारखा जाणवत होता ..
हळुवार ते गुलाबरूपी शब्द मला स्पर्श करून जात होते . त्याने विश केल होत …….सोबत

" मी आजपर्यंत कधीच कुणाला व्यालेनटाइन विश केल नाही ...you are the first one lucky girl "..हे वाक्य ..:P

काहीच गरज नसताना .निष्पाप मन कस असत ..ह्याच जिवंत उदाहरण ..त्याला अस का वाटल नाही ? आपण अस
म्हटल्यावर ती विश्वास ठेवेल का?.तिला का वाटणार नाही कि हा प्रत्येक मुलीला असच म्हणत असेल
म्हणून ??..खरच हे सगळे प्रश्न मनात उभे राहिले होते ..पण हृदयातन एकच आवाज येत होता ...
ठेव विश्वास ..खर असो ,खोट असो ..फक्त त्याच्या त्या शब्दावर विश्वास ठेव जे तुझ्या काळजात खोलवर रुतून
आपली स्वतंत्र जागा बनवतायत . त्याच्या त्या आवाजावर विश्वास ठेव ..जो ऐकून तू तुझ्यात उरत नाहीयस .
ऐक ते शब्द ..ओळखायचा प्रयत्न कर त्यातल्या निरागसतेला …सगळ काही सांगतील ते .त्याच सांगण्यावर विश्वास
ठेव . आणि मी तेच केल . ठेवला विश्वास .आज तोच विश्वास मला त्याच्यासोबत सप्तपदी चालताना
माझी साथ करून गेला .

सोबत असेन ,तुझ्याबरोबर असेन..अस वचन देवून गेला .

त्या गुलाबाच्या पाकळीने तो ओला स्पर्श पुन्हा जागा झाला .माळेत सजवलेली सगळीच फूल मला त्या त्या क्षणांची आठवण करून देवू लागली .आता मला प्रकर्षाने त्याची कमतरता जाणवू लागली . सारख लक्ष दरवाजाच्या न होणार्या हालचालीकडे जात होत . आता दार उघडेल ..अन तो हळूच आत येईल ..उशीर झाल्यामुळे ..वाट बघायला लागल्यामुळे माफ करशील ?
अशी चिन्ह चेहेर्यावर आणेल .हसर्या ओठांनी ..बोलक्या डोळ्यांनी ..त्याच्या आयुष्यात माझ स्वागत करेल .

पण ये ना रे लवकर !....अजून किती वाट बघू तुझी !.....या आधी एवढी वाट मी कधीच पाहिली नव्हती तुझी .

अस कस ? नेहेमीच तर मी अधिरतेन त्याची वाट पहायची ..अन नेहेमीच या आधी मी तुझी कधीच एवढी वाट
पाहिली नाही अस म्हणायची .प्रत्येक भेटीत ह्याच तर कारणावरण भांडण ठरलेल असायचं ..रुसन ..फुगण ..
मनवण चालूच असायचं .पण आजची अधिरता आतुरता काही निराळीच आहे रे ! नेहेमी लपून भेटायचो .
आजच्या भेटीसाठी सार्या जगाची परवानगी मिळालीय आणि त्यात तुझ अस उशिरा येण.
एकेक क्षण वाया घालवन अजून किती छळणार आहेस किती जड झाल आहे रे सगळ ..हे दागिने ,
हा शालू , हि वेणी पण तू येवून माझ कौतुक करे पर्यंत मला हे सगळ सहन करायचय माझ्या बांगड्यांची कीन
कीन तुला ऐकवायचीय .वेणीतल्या मोगर्याचा गंध तुला द्यायचाय .डोळ्यातल्या काजळाची तीट लावायचीय .
तुही आज किती साजरा दिसत होतास ..हे तुला सांगायचय..माझ्या मैत्रिणीच्या तोंडून ऐकलेले तुझे गोडवे पुन्हा
पुन्हा बोलून बघायचेत .माझ्या पदरावरच्या मोत्यांच्या नक्षीत तुझा चेहेरा लपवाय्चाय.

आज ह्या सगळ्या फुलातमीच किती सुंदर दिसतेय ह्याची पावती तुझ्याकडून हवीय ..!!.

आता मात्र थकले हा मी येतोयस ना?? ..किती बोलू एकटीच स्वतःशी ??..तुझा आवाज ऐकायची फार फार इच्छा होतेय आज तुझ्या सहवासाची मी मनापासून वाट बघतेय ...

आजची रात्र चांदण्यान्सोबत जागवायचीय...

स्पर्शान तुझ्या सजवाय्चीय..ह्या गोजिर्या गुलाब पाकळ्यांची सोबत करायचीय ..

सगळच सजलंय..सारं बहरलंय..तुझ्या येण्याची आतुरतेन वाट बघतंय ..

तू येशील ..माझ्या लटक्या रागावर हसशील ...आणखीन रुसल्याच माझ नाटक ,

क्षणात फोल ठरवशील ..हळुवार हनुवटीला धरून चेहेरा माझा न्याहाळशील ..

चंद्र ..तारे ..सूर्य ...सारच ओवाळून टाकशील ..लाजलेल्या माझ्या कांतिला ,

मिठीत तुझ्या घेशील ..आकाशातला पूर्ण चंद्र ..मिठीत घेवून पाहशील ..

आज माझ्या सौंदर्याच नको तितक कौतुक ऐकायचय...आज मला तुझ्या आवाजातच गुंतून रहायचय..

तुझ्या ओंजळीवर माझी ओंजळ धरायचीय..सुखाची ,समाधानाची सर त्यात झेलाय्चीय ..

आज ..प्रत्येक क्षणी तुझा सहवास अनुभवायचाय ...तुझ्या स्पर्शात न्हावून निघालेल्या

मनाला तो द्यायचाय ..ये णा ..वाट बघन किती टोचणार्या काट्यासारख असत ..

तुला कधी कळणार रे ..?

कधी तुझ अबोल मन ..माझ्या मनाशी मन मोकळ करणार रे ..?

बघ ना डोळ्यात माझ्या ..वाट बघून थकल्याचीच चिन्ह दिसतील ..

हळूहळू पुढे सरकणार्या रात्रीशी भांडताना दिसतील ..

कोवळ्या मनाची परीक्षा घेन बास कर रे आता ..

तुझ्या आकाशातल्या ह्या ताऱ्याची चम चम तुझ्याचसाठी आहे ..

तुझ्या पावसातली ,तुला भिजवणारी सर हि मीच आहे .तुझ्या मनाची चलबिचल माझ्याचमुळे आहे ..

मला लागलेली तुझी ओढ त्याच प्रतिक आहे ..

वेड्यासारखं मन दाराजवळ धावून जायचं .पलंगाच्या कोपर्यावर शरीर विसावायचं .मनातून मोठमोठ्याने हाक ओठांपर्यंत पोहोचायची अन कसलीच कुठे हालचाल नाही , हे बघून ओठातच थांबायची . हळूच मग फुलांच्या माळाही हलू लागायच्या .माझ्या मनासोबत त्याही हेलकावे खाऊन जायच्या .कंटाळून मी पलंगावर मधोमध जावून बसले .शालूच्या पदरालाहि भोवताली पसरवलं .पायातल्या पैण्जनाना न्याहाळू लागले .हातातल्या हिरव्या चुड्याशी खेळू लागले .माळेतली निशिगंधा , मध्येच डोकावणारी जाई जुई .. पसरवलेल्या गुलाबांच्या पाकळ्या , त्याच्या नावाने चिडवू लागल्या .

मला माझ्या सार्या मैत्रिणी आठवू लागल्या ...

हळूच लाजून मग ओठही हसले माझे .गालावरच्या कधीतरी दिसणार्या खळीला खुलवू लागले . शालूचा जड वाटणारा पदरही हलका वाटू लागला .वेनीतला मोगरा माझी मस्करी करू लागला . बहुतेक तो आलाय ..इकडेच येतोय ..क्षणात मन बोलून गेलं ..अन माझ्या काळजात धस्स होवून गेल .खूप आवाज होऊ लागला धडकण्याचा ..मलाच येवू लागला आवाज माझ्या बोलण्याचा ..

हो त्याच्या येण्याचीच चाहूल होती .जी माझ्या मनाला आधीच लागली होती .इतका वेळ स्वतःशीचबबोलणार मन ..अचानक शांत झाल .आजूबाजूचे जिवंत आभास यानाही गप्प करून गेल .आता मात्र एकांत जाणवू लागला ..त्याच्या जवळ येण्याचा अंदाज येवू लागला .वाराही जरा जास्तच खट्याळ वाटला .सर्रकन अंगावर काटा ठेवून गेला .
मनही माझ मोहोरल्यासारख काहीस .काहीस भांबावल्या सारख झाल ..अन ,

दारावर त्याच्या पावलांच आगमन झालं .

श्वास माझे काळजाला भिडू लागले .त्याच्या दार उघडण्याचे आवाज येवू लागले . कसे होते हे क्षण ? . आधीचे अन आत्ताचे. तो नव्हता तेव्हा वेड्यासारखी वाट पाहत होते .आत्ता तो आलाय तर मन घाबरलय...का घाबरलय पण ?.अनोळखी थोडीच आहोत एकमेकांसाठी .मग? ..नवीन आहे का हे सगळ माझ्यासाठी?.......कदाचित नेहेमीच्या भेटीपेक्षा हि भेट निराळी आहे ?.

साकार होणार्या स्वप्नांची सत्याशी काहीतरी साखळी आहे .

प्रश्न मनाचे , उत्तरही मनच देत होतं .श्वास मात्र मध्ये मध्ये आपल मत मांडत होतं .भास आता खरा झाला होता .तो हळूच दार उघडून आत आला होता .आज त्याच रूप राजबिंड दिसत होत . मोती कलरच्या शेरवाणीत जरा जास्तच खुलत होत .हलकासा रंग चेहेर्यावरही उतरला होता ..सावळाच रंग ..पण उठून दिसत होता . मी फक्त त्याला येतानाच पाहिलं ..नंतर मात्र माझी नजर मला उचलनच शक्य होईना .

एक अनामिक भीती , अनामिक हुरहूर ..काळजाच्या अंतरी दाटली होती .

बावरलेलं मन अन मोहोरलेल तन मी सावरून बसली होती . नकळत दोन्ही हाताची बोट एकमेकांत गुंफली
होती .भरजरी शालूत , तारुण्यान नटलेली मी ,दागिन्यांनी सजलेली मी ,माझ्यातच गुंतली होती .तोच गुंता त्याने नजरेन सोडवला .क्षणभर एकटक माझ्याकडे बघून हरवून गेला . माझा राग कधीचाच निवळला होता ..जणू कधी आलाच नव्हता ..
नेहेमी उशिरा येण्यान रुसून बसणारी मी ..आज माझ्या मनाचा कल काहीसा भलतीकडेच होता .नजर खाली पडतच नव्हती ..क्षणात जवळ आला .अलगद फुलमाळा बाजूला करून ...माझ्या समोर येवून बसला .

माझी कावरी बावरी अवस्था पाहून हसू आवरेना त्याला .मी मात्र जास्तच अस्वस्थ झाले .तसा तोही नरमला .हळूच हनुवटी बोटांनी वर करून , डोळ्यात पाहण्याचा त्याचा प्रयत्न .पण डोळ्यांना ते जमेना , लाजून चूर चूर झाली मी .
सौंदर्याची वेगळीच छटा चेहेर्यावर येवून थांबली होती .मग मागे वळून त्यान भांड्यातला मोगरा ओंजळीत भरला .
त्या मोगर्याच्या सुगंधाचा माझ्यावर वर्षाव झाला .रंगीबेरंगी पाकळ्यांची ओंजळहि माझ्यावर बरसली .माझा कण अन कण बहरून गेला .

मोगर्याचा दरवळ जणू माझ्यातनच येतोय अस भासू लागलं .

पाकळ्यानप्रमाणे माझही मन हलक हलक होऊ लागलं .मघापासून छळणारी अनोळखी भीती आता काहीशी कमी झाली .अनमाझ्याही नकळत मी त्याची झाली .माझे दोन्ही हात हातात घेवून माझ्या लाजऱ्या बुजर्या चेहेर्याकडे पाहत त्याने त्याचे अनमोल शब्दमाझ्यावर उधळले .

" खूप लोभसवाण रूप दिसतंय तुझ ......अगदी आभाळातल्या त्या चंद्राच्या चांदनी सारख उजळ अन स्वछ .
अशीच राहा कायम .माझ्या आयुष्यात तुझ मनापासून स्वागत .माझ आयुष्य ...माझ घर ..माझी माणस सगळच आता तुझ आहे ,आजपासून जे असेल ते सगळ तुझ माझ नसून आपल्या दोघांच असेल . तुझ्या सुंदर स्वछ गुणांच्या प्रकाशाने आपल घर उजळव , नितळ झर्यासारख प्रेम तुझ माझ्या आयुष्यात वाहुदे, प्रत्येक वेळी नवीनच भासणारी ती पावसाची सर , आपल्या आयुष्यात नवनवीन क्षण घेवून येईल .कधी विजांचाही गडगडाट होईल ,पण मी असेन तुझ्यासोबत तशीच साथ तुझीही
मला हवीय .

नवीन आयुष्याची सुरुवात ..पाहिलेल्या स्वप्नांच्या पूर्तीतन करण्याचा प्रयत्न करू .

हलक्या फुल्क्या रुसव्यानी ..गनतीत नसणाऱ्या छोट्या छोट्या भांडणांनी सजवू ..

पावलोपावली माझा आधारच जाणवेल तुला ..

अपेक्षांची ओझी कधीच नाही देणार , तू समजूतदार आहेस ..त्याची कधी मला गरजच नाही वाटणार .

तुझ्यावर प्रेम केलय मी ..तुझे गुण तुझे दोष ..सगळ मान्य आहे मला ..

माझ्या प्रेमात तुझ्या दोषाना सामावून घेण्याची ताकद आहे म्हणा ",

गालातल्या गालात हसू लागला.मिश्किल मन कुठे तरी हळव्या मनाची साथ सोडू लागलं .मलाही ते कळू लागलं.
त्याच्या नजरेत पहाणारी माझी नजर ..एकरूप झाली .काही कळायच्या आत मी त्याच्या मिठीत सामावून गेली
त्याच्यात विरघळून गेली .

माझ्या नव्या आयुष्याची आता खर्या अर्थाने सुरुवात झाली .

मांडणीआस्वादलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

अत्यंत कंटाळवाणे, स्वप्नबंबाळ व शब्दबंबाळ लेखन..!

असो, पुढील लेखनाकरता शुभेच्छा..

"मी तुमच्याशी मुळीच सहमत नसलो तरी तुम्हाला तुमचे मुद्दे निडरपणे मांडू देण्याचा तुमचा अधिकार अबाधित रहावा याकरता मी प्राणपणाने लढेन. तीच खरी सशक्त लोकशाही असेल..!"

सहमत :P

कॉमन मॅन's picture

28 Feb 2012 - 12:33 pm | कॉमन मॅन

आपल्या लेखासंबंधीची आमची प्रतिक्रिया खिलाडूवृत्तीने घेतल्याबद्दल आपलेही मनापासून अभिनंदन व आभार..:)

जेनी...'s picture

28 Feb 2012 - 12:48 pm | जेनी...

अभिनंदन व आभार..

NOT WELCOME .... |( \(

पण कॉम्या काका ..तुमची चुक नाहि त्यात ..
तुम्हाला झाडावरच एखाद फूल पाडायला सान्गितल तर तुम्ही त्या झाडाला हलकस हालवुन नव्हे तर ते झाड गदागदा हलवनार्यान्पैकि असाल तर तुम्हाला नाय कळ्नार ह्यातल .:D

असो कन्टाळवान वाटल तरि वाचलत त्याबद्दल धन्यवाद :)

कॉमन मॅन's picture

28 Feb 2012 - 5:23 pm | कॉमन मॅन

तुम्हाला झाडावरच एखाद फूल पाडायला सान्गितल तर तुम्ही त्या झाडाला हलकस हालवुन नव्हे तर ते झाड गदागदा हलवनार्यान्पैकि असाल तर तुम्हाला नाय कळ्नार ह्यातल .

ठीक आहे. तुम्हीच पाडा काय ती फुलं.. तीदेखील अगदी हळुवारपणे! ;)

लिखाण आवडले.
(मिशा टोचल्या का नाही याचा काहीच उल्लेख नाही)

मी-सौरभ's picture

28 Feb 2012 - 12:57 pm | मी-सौरभ

लिखाण आवडले.

पूर्ण वाचलसं तरी का???

प्रचेतस's picture

28 Feb 2012 - 12:59 pm | प्रचेतस

अभ्यास वाढवा. ;)

मी-सौरभ's picture

28 Feb 2012 - 1:10 pm | मी-सौरभ

तुम्ही प्रयत्न वाढवा... :D

नावातकायआहे's picture

28 Feb 2012 - 1:43 pm | नावातकायआहे

>>तुम्ही प्रयत्न वाढवा...
:-) :-) लै खास!!

५० फक्त's picture

28 Feb 2012 - 6:43 pm | ५० फक्त

आणि ज्यांना मिशा नाहीत त्यांनी मिशा वाढवा.

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2012 - 1:20 pm | अत्रुप्त आत्मा

@पूर्ण वाचलसं तरी का???

५० फक्त's picture

28 Feb 2012 - 1:38 pm | ५० फक्त

पुर्ण वाचल्यावर प्रतिसाद द्यायला किबोर्ड दिसला असता का , खाच्या नसत्या का झाल्या डोळ्यांच्या अन झिणझिण्या नसत्या का आल्या मेंदुला,

मालोजीराव's picture

28 Feb 2012 - 2:16 pm | मालोजीराव

पूर्ण वाचलसं तरी का???

..."!!.....मधुचंद्र......!!" भाग २ च्या प्रतीक्षेत...लवकर टाका :P

-मालोजीराव

अन्नू's picture

28 Feb 2012 - 2:31 pm | अन्नू

भाग २ च्या प्रतीक्षेत...लवकर टाका

Smiley
अर्रे.. म्हणजे मेन मधुचंद्र बाकीच आहे की अजुन, हे तर विसरलोच होतो!

काही कळायच्या आत मी त्याच्या मिठीत सामावून गेली त्याच्यात विरघळून गेली..

....तो अभी पिक्चर बाकी है मेरे दोस्त... :P

सोत्रि's picture

28 Feb 2012 - 1:41 pm | सोत्रि

वल्ली,
तुम्हाला फारच काळजी ब्वॉ मिशा टोचण्याची :D

बाकी लिखाण छान!

- (काळजी न करणारा) सोकाजी

तुम्हाला फारच काळजी ब्वॉ मिशा टोचण्याची Laughing out loud

अहो सुब्या डोळ्यांसमोर आला.

मा. वल्ली, वेळ मिळेल तसं आणि शक्य झालं तर पुर्ण वाचा, यावेळी बहुदा मिश्या नसतील.

अन्नू's picture

28 Feb 2012 - 1:42 pm | अन्नू

दुसर्‍यांच्या अशा प्रायव्हेट गोंष्टींमध्ये आम्ही डोकाऊ इच्छीत नाही.:P

एक जुनं गाणं अगदी बरोबर फिट्ट बसतंय थोडा चेंज करुन ' मधु कुठे ? अन चंद्र कुठे ? , कशाचा कशाला पत्ताच नाही, तुमच्या लिखाणावरच्या माझ्या आधीच्या प्रतिसादाच्या उदा. १. मउ कणिक २. परातीबाहेरची कणकेची रांगोळी च्याच रांगेत , हा प्रकार म्हणजे पिठाच्या गिरणीतल्या पिठानं भरलेल्या भिंतीसारखा झालाय, ना गि-हाईकाला उपयोग ना मालकाला.

कालच, मराठी दिन साजरा झाला किमान त्याचा तरी भाग ठेवायचं, अशुद्धलेखनाला काही मर्यादा असाव्यात ही किमान अपेक्षा. संदर्भासाठी मा. किचेनतै ना विचारा किंवा त्यांचे सुरुवातीचे लेखन आणि त्यावरचे प्रतिसाद वाचा. वाक्यं कुठं तोडावीत, जोडाक्षरं कशी टाइप करावीत याचा काहीतरी संदर्भ घ्या. एवढ्या सुंदर आणि त्याच बरोबर हॉट विषयावर लिहिताय तर म्हणुन शुद्धलेखन महत्वाचं नाही असं नाहीये.बोलीभाषेत टाईप करणे म्हणजे प्रत्यक्ष उच्चारानुसार टाइप करणे नव्हे, त्याला सुद्धा लिखाणाचे नियम लागु होतातच.

बाकी, जास्त काही वाचणं शक्य झालं नाही म्हणुन पास.

पुन्हा एक नम्र विनंती, लिहिलेलं इथं टाकण्यापुर्वी जरा एक दोन वेळा वाचुन पाहात जा.

प्रचेतस's picture

28 Feb 2012 - 1:50 pm | प्रचेतस

कालच, मराठी दिन साजरा झाला किमान त्याचा तरी भाग ठेवायचं,

भाग हवंय का भान हो?

विजुभाऊ's picture

28 Feb 2012 - 2:55 pm | विजुभाऊ

कालच, मराठी दिन साजरा झाला किमान त्याचा तरी भाग ठेवायचं,

अरेबापरे.मधुचंद्र हा मराठी दिनाचा भाग कसा होईल?

अन्या दातार's picture

28 Feb 2012 - 3:08 pm | अन्या दातार

अरेबापरे.मधुचंद्र हा मराठी दिनाचा भाग कसा होईल?

बलात्कारापेक्षा मधुचंद्र चांगला ना ;)
यासंदर्भात एक इंग्रजी वाक्य* आठवले, तशी स्थिती इथे तरी नको वाटते :(

*अधिक माहितीसाठी व्यनि करावा

अग्गो बाई! मी आणि माननीय... हे वाचूनच माझ्या मनातल्या बागेत फुल उमललीयेत,फुलपाखर त्यावर बागडतायत , कोकिला कुठेतरी कुहू कुहू करतीये आणखी बरंच काही.धन्यवाद हो ५० फक्त काका.पुलंसाठी जसं त्यांच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण म्हण्जे कोणा दुकानदाराने त्यांना साहेब म्हणून हाक मारली तो होता ...अगदी तसंच माझं झालंय.मी हवेत उडतीये, ढगात बागडतीये,वाऱ्याशी मस्ती करतीये आणि आणि बरचं काही...

धन्यवाद तेवढं पार्टीचं लक्षात ठेवा म्हणजे झालं, आणि हो, लिहिणं पण जाम सुधारलंय हो.

माजि अाठवन काढलि.तरि महन्ल सकाल धरुन उचक्या का लागतायत.

टवाळ कार्टा's picture

26 Jan 2016 - 4:23 pm | टवाळ कार्टा

कुथे होता तूमी किचेनतै...ईते कित्ती लोकंन्नी तूमाची अटवान काल्डी

साबु's picture

28 Feb 2012 - 1:48 pm | साबु

किती किती गोग्गोड.... मधुमेह होइल ना?

@पूर्ण वाचलसं तरी का??? :) :)

चौकटराजा's picture

28 Feb 2012 - 2:14 pm | चौकटराजा

लेखाच्या लांबीची उर्मी संपेना जणू लेख म्हणजे मधुचंद्राची रात्रच चालू आहे ! लेखाच्या लांबीच्या प्रमाणात ती साजरी झाली असेल तर मज्जाच आहे ब्वा ! ( इथे एक डोळा बारीक केलेली स्माईली आहे असे समजावे)

२ मिनीटही नाही लागले हो वाचुन काढायला!! नक्कीच वाचायचा वेग वाढलाय माझा! ;)
बाकी नेहमीप्रमाणेच सुंदर स्वप्नरंजन! पुलेशु!

चांगले लिखाण. डॉट डॉटचे ब्रेक्स खूप आलेत.. ब्रेकवरुन आठवलं..

विरघळून जाणं हे ठीक पण त्यातल्या आनंदाला म्हणा किंवा सुखाला म्हणा, मधुचंद्रानंतर चारसहा महिन्यातच कचकावून ब्रेक लागू नये याची काळजी भानावर असतानाच घ्यावी असा आमचा आपला एक सर्वांना जनहितार्थ सल्ला..

बाकी मधुचंद्रात काय होईल सांगता येत नाही.. आमचा एक मित्र आपल्या मधुचंद्रावर असताना त्याच्या तोंडात नेमकं त्यावेळचं "दो बकेट पानी अब बचाना है रोजाना" हे पालुपद बसलं होतं आणि तो सदासर्वदा ते गुणगुणत असायचा..
त्यामुळे आपोआपच पत्नीविरसजनक नियमन घडलं असे ऐकतो..

धन्या's picture

28 Feb 2012 - 4:05 pm | धन्या

विरघळून जाणं हे ठीक पण त्यातल्या आनंदाला म्हणा किंवा सुखाला म्हणा, मधुचंद्रानंतर चारसहा महिन्यातच कचकावून ब्रेक लागू नये याची काळजी भानावर असतानाच घ्यावी असा आमचा आपला एक सर्वांना जनहितार्थ सल्ला..

गविकाकांचा सल्ला असे सदर आता सुरु करावेच आपण.

बाकी मधुचंद्राबद्दल काय बोलावे. झरझर स्क्रॉल करतानाही मधुचंद्र संपता संपेना. :)

बाकी मधुचंद्राबद्दल काय बोलावे. झरझर स्क्रॉल करतानाही मधुचंद्र संपता संपेना.

धनाजीराव किमान तुम्ही तरी असं म्हणू नये...तुम्ही तर हा लेख विशेष रुची घेऊन चघळत चघळत वाचायला हवा !
-मालोजी

नंदन's picture

28 Feb 2012 - 5:26 pm | नंदन

आमचा एक मित्र आपल्या मधुचंद्रावर असताना त्याच्या तोंडात नेमकं त्यावेळचं "दो बकेट पानी अब बचाना है रोजाना" हे पालुपद बसलं होतं आणि तो सदासर्वदा ते गुणगुणत असायचा..
त्यामुळे आपोआपच पत्नीविरसजनक नियमन घडलं असे ऐकतो.

हनीमोर इन misery! :)

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 3:08 pm | वपाडाव

झाली, लागली, गेली, बसली, होती.

च्या ऐवजी झाले, लागले, गेले, बसले, होते असं वापरता आलं असतं असं वाटलं नै का बै तुम्हाला...

सानिकास्वप्निल's picture

28 Feb 2012 - 11:51 pm | सानिकास्वप्निल

सगळ्याच मुंबईकर (स्त्रीया)आली , गेली, होती म्हणत नाही ओ

कवितानागेश's picture

1 Mar 2012 - 12:31 am | कवितानागेश

बरोबर आहे.
मुंबईला कायपण बोलायचे काम नाय!
:)

बरोबर आहे ..
मुम्बैकर स्वताचि स्टायिल बनवतात आणि ती वापरतात
दुसर्‍यान्च अनुकरनही करत नाहित :P

हारुन शेख's picture

28 Feb 2012 - 3:19 pm | हारुन शेख

नेहमीच असे स्वप्नरंजन कराल तर प्रत्यक्ष अनुभवातल्या संवेदना बोथट होतील.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Feb 2012 - 3:24 pm | बिपिन कार्यकर्ते

=))

स्मिता.'s picture

28 Feb 2012 - 3:19 pm | स्मिता.

पूजा ताई, लेख मी वाचलाच नाहीये. कारण रोजच्या रोज एक-एक लेख वाचायला २ तास मी नाही हो देवू शकत. त्यामुळे आज पुरत्या फक्त 'नववधू प्रिया मी बावरते लाजते पुढे सरते , फिरते......' या नंतरच्या काही ओळी वाचायला घेतल्या. त्या पुढे देतेय. त्यात काही शब्द अधोरेखित केले आहेत. त्यांचा अर्थ कळवलात तर पुढचे वाचायला घेईन.

"ए वहिनी ..भावू खूप चिडतो हा ...सांभाळ आता तूच ..घट्ट पदराला ..नाही नाही ओढनीला बांधून ठेव हां ..

हम्म कळेलच तुला हळू हळू ..पण तू तर आधीच जादू करून ठेवलियेस त्याच्यावर ..त्यामुळे तुझ्यावर चिडेल

कि नाही शंका आहे बुवा !!.

आणि खळखळून हसली .मला काहीच सुचल नव्हत बोलायला .पण नंतर हळूच हातात हात घेवून , अगदी जवळच्या मैत्रिणीसारखी समजावण्याच्या अन छेडण्याच्या सुरांना एकत्र करून बोलली ,

" पण भावू खूप छान आहे ,खूप समजूतदार ...आणि महत्वाच म्हणजे घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा

मग तो लहान असो कि मोठा , खूप आदर करतो ..त्यामुळे तुलाही ह्या घरात तितकाच मान सन्मान ..आदर

मिळेल .ह्यात अजिबात शंका नाही , आजपासून हे घर सांभाळण्याच .. त्यातली नाती घट्ट बांधून ठेवण्याच

जवाबदारीच काम तुझ ...हो पण घाबरू नकोस हा आम्ही सगळ्या बाजूने तुझी मदत करू ....हां पण भावुला मात्र

तूच सांभाळ हां ..तो अगदी लहान मुलांसारखा आहे अजूनही .. त्याची बहिण आहे म्हणून गुणगान नाही हां गात

मी !..खरच मला अभिमान आहे त्याचा .." .

डोळ्यात पाणी तरळल होत तिच्या . मला त्या घरातल्या नात्यात ओलाव्याची जाणीव होऊ लागली .

परत हसरा चेहेरा करून . माझा चेहेरा दोन्ही हातात धरून " किती गोड दिसतेयस .

आज आमचा भावूराया ..एकदम फिदा हुसेन बनणार बहुतेक ," अस म्हणून क्षणात मला एकट ठेवून

निघूनही गेली .

कॉमन मॅन's picture

28 Feb 2012 - 4:36 pm | कॉमन मॅन

कारण रोजच्या रोज एक-एक लेख वाचायला २ तास मी नाही हो देवू शकत.

हा हा हा... अंमळ छान वाक्य.. :)

मा. स्मिताताई, ' कारण रोजच्या रोज एक-एक लेख वाचायला २ तास मी नाही हो देवू शकत.' मराठी वाचकांच्या अशा निराशावादी प्रतिसादामुळेच मराठी लेखकांचे मनोधैर्य ढासळते आणि मराठी लेखनाचा आणि लेखकाचा उत्कर्ष का काय तो होवु शक्त नाही.

किचेन's picture

29 Feb 2012 - 8:51 pm | किचेन

सहमत. त्यातल्या त्यात माझ्यासारख्या नवोदित लेखकांच जास्त.

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 9:45 pm | अन्या दातार

त्यातल्या त्यात माझ्यासारख्या नवोदित लेखकांच जास्त.

लेखकांच?? :o :o
आजवर तुम्हाला तै म्हणत होतो, आता दादा वगैरे म्हणावे काय?? ;)

समजून घे रे, प्रत्येक गोष्टीत उगीच खुसपट काढण्याची सवयच काही लोकांना इथे.वर वाचाल नाहीस का? मी सध्या हवेत आहे त्यामुळे अशा छोट्या छोट्या चुका होणारच.कळलं?

सानिकास्वप्निल's picture

28 Feb 2012 - 11:54 pm | सानिकास्वप्निल

कारण रोजच्या रोज एक-एक लेख वाचायला २ तास मी नाही हो देवू शकत.

१००% सहमत

आणी वरचा लेख तर खुपचं कंटाळवाणा वाटला :(

कवितानागेश's picture

1 Mar 2012 - 12:39 am | कवितानागेश

म्हंजे इतर शब्दांचा अर्थ कळला का गं तुला?????
मला कुणीतरी सुचल, महत्वाच, तरळल, एकट या पदार्थांबद्दल महिती द्या हो!

असो.
पूजाताई विनोदी अंगानी जाणारे किस्से मात्र छान लिहितात. ( शप्पथ! :) )
त्यामूळेच की काय कुणास ठाउक?
हे वरचे सगळे वाचतानापण मध्येच फिस्स्कन् हसू येत होते! ;)

पैसा's picture

1 Mar 2012 - 9:31 pm | पैसा

=)) =))=))

पूर्ण लेख नाही वाचु शकले पुजाताई...

जरा विषयांतर केलत तर बरं होईल आता .

मृत्युन्जय's picture

28 Feb 2012 - 5:19 pm | मृत्युन्जय

माफ करा पण लेख जमला नाही आहे. खुप बोर झाले. असो. पुलेशु.

अवांतरः तुम्हाला दुखवण्याचा हेतु नाही. जे वाटले ते सरळ सांगितले

मी-सौरभ's picture

28 Feb 2012 - 6:15 pm | मी-सौरभ

वरच्या प्रतिसादकांनी एवढे टंकले आहे की आता तुम्हा लिहील्याने फार फरक पडत नैय्ये ;)

संपादित.

हा सुज्ञ वाचकांचा अपमान आहे :D

हा सुज्ञ वाचकांचा अपमान आहे

हे तुम्ही बोलताय ?:-O कमालच म्हनायचि ...

तुम्हीच म्हनालात ना " पूर्ण वाचलत तरी का?"

खरड्वह्या बर्र्या मन लावुन्श्यानि वाचताय :P

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 7:27 pm | वपाडाव

खरड्वह्या बर्र्या मन लावुन्श्यानि वाचताय...

धागे वाचले नाहीत तर काही फरक पडत नाही... पण खरडवह्या वाचल्याच पैजेत हा मिपाचा 'अलिखित कानुन' आहे...

मी-सौरभ's picture

29 Feb 2012 - 1:00 pm | मी-सौरभ

माझं उत्तर टंकल्याबद्दल आभारी आहे.. :)

५० फक्त's picture

28 Feb 2012 - 6:30 pm | ५० फक्त

समयोचित प्रतिसाद

बाकि सगळ्यात जास्त आवडलेला प्रतिसाद
फक्त ५० रु.

यांचा ....तीनदा ,चारदा वाचला . मस्तच एकदम ..

सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया वाचुन भन्नाट वाटलं.

हसुन हसुन पूरेवाट :D :D :D

५० फक्त's picture

28 Feb 2012 - 6:47 pm | ५० फक्त

'फक्त ५० रु. ' - अरे अरे, ही काय भानगड आहे, ते रु. कुठुन आलं आमच्या मागं, त्या ५० फक्त चा संदर्भ माहित नसेल तर माझं प्रोफाईल पहा इथलं, एक आख्खा लेख लिहिलाय त्यावर. असो.

चुकुन रुपये लागला ...

पण तुमच अक्ख प्रोफाइल पाहिल ,त्यात कुठेच फक्त ५० चा संधर्भ लागला नाहि :(

नाव गाव आणि शिक्शन फक्त कळल .
:(

मृगनयनी's picture

28 Feb 2012 - 8:06 pm | मृगनयनी

पूजा.... खूप अल्लड भावनांचा निष्पाप लेख वाचल्यासारखे वाटले... :)

अजून येऊ देत... ऐक्चुली... आधी असे वाटले, की चुकून दोन्ही भाग तू या एकाच लेखात लिहिलेस की काय? ;) ;) ;) ;) ;)

बाकी वर वल्ली'जींनी म्हटल्याप्रमाणे सुब्बुच्या मिश्यांचे काय गं पूsssss... ;) ;) ;)

५० फक्त's picture

29 Feb 2012 - 7:47 am | ५० फक्त

माझ्याविषयी :
http://misalpav.com/node/17095

आदिजोशी's picture

28 Feb 2012 - 6:40 pm | आदिजोशी

स्वप्नातल्या गोग्गोडपणाचा अतिरेकी ओव्हरडोस झालेली जिलबी पाकात बुडवून साखरेत घोळवून जॅमसोबत तुकड्या तुकड्याने खाताना वाटेल तसं वाटलं

५० फक्त's picture

28 Feb 2012 - 6:48 pm | ५० फक्त

एका गाण्याची ओळ आठवली, ' स्वप्नातल्या सुखांचा स्वप्नीच वेध घ्यावा ' उगा ते शब्दात उतरवायचा प्रयत्न करु नये.

स्वप्नातल्या गोग्गोडपणाचा अतिरेकी ओव्हरडोस झालेली जिलबी पाकात बुडवून साखरेत घोळवून जॅमसोबत तुकड्या तुकड्याने खाताना वाटेल तसं वाटलं >>>>

=)) =)) =)) =))

अ‍ॅड्या लेका, डिसक्लेमर टाकत जा की, ठसका लागला की !!

सुहास झेले's picture

1 Mar 2012 - 4:05 pm | सुहास झेले

हा हा हा ... खरंय !!

लेख वाचला नि कुहू आठवली.

स्मिता.'s picture

28 Feb 2012 - 8:35 pm | स्मिता.

हा हा हा! अगदी पर्फेक्ट आठवण काढलीस... आहि हो, 'लेख वाचला' याबद्दल कौतुक!

वपाडाव's picture

28 Feb 2012 - 9:04 pm | वपाडाव

लेख वाचायला वेळ नाही पण प्रत्येक प्रतिक्रिया बरोब्बर वाचता हो येउन...
(ह घ्या न घ्या जे घ्या ते घ्या)

जेनी...'s picture

28 Feb 2012 - 9:08 pm | जेनी...

हेहेहे ..

अगदी खरय हं ! :D

मलाही हाच प्रश्न पडला होता आत्ता ..:P

(ह घ्या न घ्या जे घ्या ते घ्या)
( गरज आहे :D )

स्मिता.'s picture

28 Feb 2012 - 11:29 pm | स्मिता.

अरे वप्या... प्रतिक्रिया बायटी-किलोबायटी मधे असतात, गिगाबायटी नसतात!!!
किती सगळं उकलून सांगायला लागतं रे तुला. (आणि कुठल्यातरी प्रतिसादातच वाचलं की असे धागे वाचण्यापेक्षा त्यावरच्या प्रतिक्रिया वाचण्यात जास्त मजा ;) )

सूड's picture

1 Mar 2012 - 1:54 pm | सूड

>>अरे वप्या... प्रतिक्रिया बायटी-किलोबायटी मधे असतात, गिगाबायटी नसतात!!!
हे वाक्य काहीसं असं: लेखांच्या भदाड्या काटेरी गुलाबांपेक्षा प्रतिसादांची नाजूक प्राजक्तपुष्पं मनाच्या परडीत ठेवायला कोणाला आवडणार नाही वप्या !! ;)

अननुभवी मुलांची निरागसता जपा.

धमाल मुलगा's picture

29 Feb 2012 - 12:08 pm | धमाल मुलगा

रेवतीकाकू, यु टू? :D

@पूजा: खाली मराठे प्रतिक्रियेत म्हणतात त्यावर जरुर विचार करा. खूप फायदा होईल हे नक्की. तुम्ही छान लिहू शकताय, आणखीही छान लिहाल फक्त शेवटचा सफाईचा हात फिरवायला विसरु नका आणि नवनवे विषय हाताळून पहा. :)

पुस्तक वाचणं आणि संगणकाच्या पडद्यावर वाचणं ह्यात मोठी तफावत असते. लेख खूप मोठा असेल तर रटाळ वाटू शकतं. वाचकांचा लेखातला रस कमी होऊ शकतो. शक्यतो अशा प्रकारच्या लेखांचे भाग करावेत आणि ते प्रकाशित करावेत.

पुलेशु :)

अन्या दातार's picture

29 Feb 2012 - 1:08 pm | अन्या दातार

शक्यतो अशा प्रकारच्या लेखांचे भाग करावेत आणि ते प्रकाशित करावेत.

हम्म! चांगला मुद्दा आहे. पण एकदा का लेखाखाली क्रमशः आले, की लोकांच्याही भन्नाट प्रतिक्रिया येतात पण गुलजार नारीचा छडाच लागत नाही ;)

मराठे's picture

28 Feb 2012 - 11:54 pm | मराठे

तुमच्यामधे पोटेंशिअल आहे.
इतक्या सूचना मिळालेल्याच आहेत त्यात थोडी भर घालतो: (फक्त टेक्निकल सूचना आहेत, मूळ कथा-कल्पनेबद्धल टीका नाही)

१. एका लेखाची लांबी साधारण दोन/तीनदा स्क्रोल करावं लागेल एवढीच ठेवा. पण रिकाम्या ओळी नको.
२. योग्य ठिकाणी परिच्छेद पाडा.
३. विरामचिन्हांचा उपयोग करा पण अतिरेक नको.
४. लेख लगेच प्रकाशीत न करता, दुसर्‍या दिवशी करा. करण्यापूर्वी पुन्हा एकदा वाचून पहा. (शक्य असेल तर दुसर्‍या कोणालातरी प्रूफरीड करायला द्या).

बाकी, मघाशी म्हंटल्याप्रमाणे इथे मिळणार्‍या प्रतिसादांमुळे लेखन बंद करू नका, तुमच्यात पोटेंशियल आहे ते योग्य प्रकारे वापरा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा (पुलेशु)!

मराठे काका धन्यवाद ,

खरतर हा लेख मी फार आधी लिहिला होता ,पहिल्यांदा लिहिला तो " चिंब पावसानं " पण त्याची लांबी कमी म्हणून लोकाना आवडला असेल हे लक्षातच आल नाही ,आणि ह्या आधी समूहांवर लिहायची मी , वाचक मिळाले ,त्यांच्या प्रतिक्रियाही मिळायच्या ,पण लेखाला आणि लिहिणार्याला ,त्याच्या लिखाणात सुधारणा हवी असेल तर वाचकान सोबत
लेखक ,लेखीकेंच्या प्रतिक्रियाही जास्त महत्वाच्या असतात ,ते मात्र नाही मिळाल मला . " टिंब कमी कर " ह्या व्यतिरिक्त कसल्याच सुचना मिळाल्या नाहीत . मीच स्वताहून स्वतःच्या लिखाणात जमेल तसे बदल करत गेले .आणि नंतर काही चांगल लिहील गेलं .सुरुवातीला इथे आवडत लिखाणच टाकलं .त्यावर इथल्याच लोकांनी म्हणजे बिपीन कार्यकर्ते ,छोटा डॉन ,सागर (वल्ली ) अनिरुद्ध दातार (अन्या ) , ह्यांनी खरड वहीत बर्याच उपयोगि आणि चांगल्या सुचना केल्या ,पण इथे आल्यावर जिलेब्या पाडू लेख काय ते कळाल .त्यामुळे हे धाडस केलं .

सगळ्यांनाच आपण सगळ लिहिलेलं आवडेल अस नाही ,कुणाला स्वप्नरंजन आवडत तर कुणाला वास्तवदर्शन ,पण मार्गदर्शन हे हवच....माझ्याकडे ह्या गोष्टीची मुळापासून कमतरता होती ,

परिच्छेद कसा व कुठे पाडायचा हे शाळेत जरी शिकलो असलो तरी रोजच्या आयुष्यात त्याचा कितपत उपयोग होतो ..हे अजूनही कळाल नाहीय .

पण इथे आल्यावर छोट्या छोट्या गोष्टी नोटीस करून ..बर्याच लोकांनी चांगले सल्ले दिले त्याबद्दल नक्कीच आभारी आहे .

दादा कोंडके's picture

1 Mar 2012 - 8:56 pm | दादा कोंडके

सुरुवातीला इथे आवडत लिखाणच टाकलं...

लेखकाला/लेखिकेला, त्याचं/तीचं 'आवडतं लिखाण कुठलं?' असं विचारणं म्हणजे कोंबडीला 'तुझं आवडतं अंडं कुठलं?' असं विचारण्यासारखं आहे असं कुठेतरी वाचलं होतं.

आकाशी नीळा's picture

29 Feb 2012 - 9:14 am | आकाशी नीळा

पूर्ण वाचु शकलो नाही.
लांबलेली गोग्गोड कथा...

परिकथेतील राजकुमार's picture

29 Feb 2012 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार

छान लेखन आणि नेहमीप्रमाणेच त्याच्यावरती प्रतिक्रियांचे भिकार अवांतर.

सगळे नेहमीप्रमाणेच....

तिमा's picture

29 Feb 2012 - 1:01 pm | तिमा

आधी प्रतिक्रिया वाचल्या आणि मग रॅपिड रिडिंग केले. इतक्या उच्च दर्जाचे साहित्य मिपावर प्रथमच प्रकाशित झाले असावे.
इतकी निरागसता आत्तापर्यंत कोणामधेच पाहिली नव्हती.
पुवाशु.
वा = वाचकांना
असो.

च्यामारी लैच इन्ट्रेस्ट घेत्लेला दिस्तोय मधुचंद्रात मिपावाल्यानी :P

अन्नू's picture

1 Mar 2012 - 9:05 am | अन्नू

च्यामारी

Smiley च्यायला मुली पण असे शब्दप्रयोग वापरतात??

अन्नु काका
अहो च्यायला पूल्लिन्गि म्हनुन मुल वापरत असावेत :P

आणि च्यामारी स्त्रिलिंगी म्हनुन मुली वापरतात :D

निदान मी तरी वापरते :P

कळल बरं काक्कू :P
बाकी ह.घ्या ते. घ्या (काय म्हणत्यात ते घ्या!)
पण राग मानू नका ;)

अहो च्यायला पूल्लिन्गि म्हनुन मुल वापरत असावेत

आणि च्यामारी स्त्रिलिंगी म्हनुन मुली वापरतात

यंग जनरेशन का काय म्हणतात ते हेच असावं. ;)

रामजोशी's picture

1 Mar 2012 - 9:24 am | रामजोशी

पवार दादा मस्त लिहिलय. च्यामारी हे लिंगबदल का करतात कोणास ठावूक

ह्म्म

विचार केला पाहिजे ह्या प्रतिक्रियेवर ...

इतक्या सगळ्या प्रतिक्रियेंच काहिच वाटल नाहि
पण ही अतिशय फालतू आणि खालच्य दर्जाची प्रतिक्रिया आहे .

आज पहिल्यांदा मिपावर आल्याच वाईट वाटलं.

चालुद्या.

मालोजीराव's picture

1 Mar 2012 - 11:58 am | मालोजीराव

अशी प्रत्येक प्रतिक्रिया मनावर घ्यायला लागलात तर रोजच वाईट वाटेल तुम्हाला...प्रतिक्रिया येताते तर...आंदो आंदो करायचं... :P
- मालोजीराव

कवितानागेश's picture

1 Mar 2012 - 1:38 pm | कवितानागेश

मधुचंद्राची वाटचाल शंभरीकडे!

स्मिता.'s picture

1 Mar 2012 - 1:58 pm | स्मिता.

मधुचंद्राची वाटचाल शंभरीकडे!

हाऊ रोमँटिक!! ;)