तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in जनातलं, मनातलं
28 Feb 2012 - 2:08 am

तथाकथित ‘चमत्कारां’चे वैज्ञानिक संशोधन
खालील कथन प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ या ग्रंथातील संदर्भ टीप क्रमांक 2 वरून उद्धृत केले आहे.

येथे ‘चमत्कारां’ना ‘तथाकथित’ हे विशेषण लावण्याचे कारण ‘चमत्कार’ नावाची गोष्ट अस्तित्वात नाही, हे आहे. ज्या घटनांना ‘चमत्कार’ समजण्यात येते, त्या वास्तविक निसर्ग-नियमानुसार घडणाऱ्या नैसर्गिक घटना असतात. त्या तशा नसत्या तर त्या घडल्याच नसत्या. त्या कशा घडतात याविषयीचे नियम भौतिकशास्त्रातील गृहितकृत्यांच्या आधारे कळत नसल्यामुळे त्या भौतिकशास्त्राचे नियमोल्लंघन करतात असे भौतिक शास्त्रज्ञ चुकीने – अज्ञानाने- समजतात व त्यांना ‘चमत्कार’ सदरात ढकलतात. वास्तविक त्यांच्या विषयीच्या कार्यकारणभावाचे आपले अज्ञान मान्य करणे व घाईने कोणत्याही निर्णयाला न येणे हा वैज्ञानिक शहाणपणा आहे. प्रस्तुत विभागात ‘चमत्कार’ हा शब्द अवतरण चिन्हात ठेवण्यापाठीमागची लेखकाची हीच भूमिका आहे हे वाचकांनी ध्यानात घ्यावे.
दुसरी गोष्ट ‘चमत्कार’ हा शब्द सर्व अतींद्रिय घटनांना उद्देशून या ठिकाणी वापरला आहे. हेही वाचकांनी ध्यानात ठेवावे.
अतींद्रिय घटनांचे संशोधन व अभ्यास करणाऱ्या शास्त्राला प्रारंभी, Psychical Research हे नाव देण्यात आले होते. हल्ली त्याला Parapsychology (परामानस शास्त्र) असे म्हटले जाते. अतींद्रिय घटनांना पुर्वी Psychic Phenomena म्हणत असत. हल्ली त्यांना Extra Sensory Perception(ESP) म्हणजे ‘अतींद्रिय प्रत्यक्ष’ म्हणून संबोधले जाते. घटनांची नाव बदलल्यामुळे त्यांचे स्वरूप बदलत नाही. हा नावातील बदल त्या घटनांकडे पहाण्याचा शास्त्रज्ञांचा दृष्टीकोन अधिक शास्त्रीय बनल्याचे सूचित करतो. याचा अर्थ पूर्वीच्या अतींद्रिय घटनांच्या अभ्यासकांचा दृष्टीकोन अशास्त्रीय किंवा कमी शास्त्रीय होता असा मुळीच नाही.
Psychical research किंवा Psychic Phenomena यामधील अतींद्रिय घटनांचे मूळस्वरूप निर्देशित करणारा ‘Psyche’ हा शब्द असून त्याचे दोन अर्थ आहेत. एक ‘आत्मा’ व दुसरा ‘मन’. या अतींद्रिय घटनांना आत्मा जबाबदार आहे, असे पुर्वीचे संशोधक समजत असत. (म्हणून त्यांचा भर मरणोत्तर आत्म्याच्या अस्तित्वाच्या संशोधनावर प्रामुख्याने असे. (त्यांचे तत्कालीन टीकाकार त्यांना ‘भूत संशोधक’ म्हणून याच कारणासाठी हिणवत असत!)
हल्लीचे संशोधक मानवी मनच याघटनांना कारणीभूत आहे असे समजतात. पण मानवी मनाच्या कर्तृत्वाचे संशोधन ‘शास्त्रीय’ व त्याच्या आत्म्याच्या कर्तृत्वाचे संशोधन ‘अशास्त्रीय’ किंवा (कमी शास्त्रीय) हे तरी कशाच्या आधारे ठरवणार? याविषयीचे शास्त्रीय निकष कुणालाच माहित नाहीत. अतींद्रिय घटनांचे कारकत्व वास्तविक ‘आध्यात्मिक तत्व’ च (Spiritual Principle) आहे. यालाच येथे ‘अतींद्रिय’ हा पर्यायी शब्द वापरला असून ‘अतींद्रिय शास्त्र’ हेच ‘अघ्यात्मिक शास्त्र’ (किंवा ब्रह्मविज्ञान) असल्याचे गृहित धरून ‘मना’च्या वा ‘आत्म्या’च्या कर्तृत्वाचा वादच गैरलागू ठरवण्यात आला आहे. पाश्चात्य शास्त्रज्ञांना योगशास्त्राचा परिचय नसल्यामुळे वस्तुतः हा वाद निर्माण झाला आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.

मांडणीविचारमाहितीआस्वाद

प्रतिक्रिया

आबा's picture

28 Feb 2012 - 2:47 am | आबा

कार्यकारणभावाचे आपले अज्ञान मान्य करणे व घाईने कोणत्याही निर्णयाला न येणे हा वैज्ञानिक शहाणपणा आहे.
चमत्कार, अतींद्रिय शक्ती वगैरे गोष्टीचा जन्म कार्यकारणभाव शोधण्याच्या घाई मधूनच झालाय !

(बाय द वे : वैज्ञानिक / अवैज्ञानिक ठरवण्याचे निकष आहेतच, ते तुम्हाला माहितही असतिलच, त्यामुळे परत लिहिण्यात अर्थ नाही)

चौकटराजा's picture

28 Feb 2012 - 9:40 am | चौकटराजा

श्री ओक यानी जे काही दिले आहे तो लेख आहे की न्रिरनिराळ्या व्याख्यांचा कोश ?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Feb 2012 - 1:16 pm | अत्रुप्त आत्मा

@तो लेख आहे की न्रिरनिराळ्या व्याख्यांचा कोश ?>>>

तो लेख आहे.... असा

मालोजीराव's picture

28 Feb 2012 - 2:55 pm | मालोजीराव

लेख डोक्यावरून गेला आहे...लसिथ मलिंगाच्या बाउन्सर सारखा !
प्रयत्न केला...'लेकीन बल्ला लगानेकी कोशिश नाकाम '
- मालोजी

वैज्ञानिक संशोधन म्हणताना हे लक्षात घ्यावे लागेल की विज्ञानाची व्याख्या केवळ भौतिकाशीच संबन्धित आहे. अभौतिक गोष्टींचे विज्ञान आहे का ? योगदर्शनाला विज्ञान म्हणावे का ? योगदर्शन हे 'दर्शन' म्हणजे अनुभवण्याचे शास्त्र आहे असे म्हटले जाते. ते अनुभवणाऱ्यानी चमत्कारांचे समर्थन केले आहे. ते खरे कसे समजायचे ?

चौकटराजा's picture

28 Feb 2012 - 2:37 pm | चौकटराजा

विज्ञान म्हणजे फिजिक्स व रसायन ई बी एस सी वा एम एस सी होताना येणारे विषय अशी मर्यादित व्याख्या त्याची करायचीच कशाला ? कार्य व कारण यांचा संबंध शोधणारे शास्त्र अशी त्याची व्याख्या व्यापक का असू नये. मग त्यात योगशास्त्र ही आलेच ! व भोगशात्र ही आलेच.
अभौतिक असे काही विश्वात नसतेच ! आपल्याला येणारा राग प्रत्यक्ष दिसतो का ? पण तो कमी करणारी उपशामक रसायने आहेत. ( त्यांच्या उपयुक्ततेला मर्यादा आहेत.) . आपापल्या भाव भावना ह्या शरीरातील भौतिक्तेचीच प्रोजेक्शन्स असतात.

मनीषा's picture

28 Feb 2012 - 5:03 pm | मनीषा

याला काय म्हणावे?

मागील पानांवरून पुढे चालू ...?
की
रिपीट टेलीकास्ट?

चौकटराजा's picture

28 Feb 2012 - 7:54 pm | चौकटराजा

मिसळपाव ई वर मिसळीवर पुन्हा तर्री मागितल्यास " जादा आकार " अशी बेडेकरी पाटी लागली की रिपीट टेलेकास्ट कसे होतील ?