काय करावे या किड्याला
साला लिहिता लिहु देत नाही
डोक्यात बरेच येत असते
पण डोळ्यांना पाहु देत नाही.
सुचत असते पान उघडल्यावर
'हे'...'हे'...लिहायचे..
पण बसले एकदा लिहायला
की..ते-तेच का रहायचे..? :-(
कुठे जातो विरुन एकदम
लेखनाचा अट्टाहास..?
का होतो मनात मात्र
लिहुन झाल्या सारखा भास?
या वैतागावर मी नक्की
उपाय काय शोधू..?
दुष्ट माझ्या या प्रतिभेला
कुठल्या तळातुन खोदू?
माहितीये मला तीही लाबाड
माझ्या इतकिच आळशी आहे.
खालच्या बाजुनी भोक पडलेली
ती पाण्याची कळशी आहे.
वरुन मेली भरलेली
ती कल्पनांशी जुळते
जमिनीवर टेकली,उचलली काय..
सारखी खालुन गळते.
म्हणुनच साला होत असतो
कल्पनांचा अव्याहत र्हास
साठा मात्र होत नाही
हाच आहे खरा त्रास...
प्रतिक्रिया
28 Dec 2011 - 3:04 pm | प्रचेतस
लै भारी भटजीबुवा.
म्हणूनच म्हणतो
बोळे लावा, तुंबू द्या जरा.
28 Dec 2011 - 3:19 pm | अत्रुप्त आत्मा
@-म्हणूनच म्हणतो
बोळे लावा, तुंबू द्या जरा. :bigsmile:
तुमचे म्हणने ऐकतो मी
बोळा लावतो...तुंबू द्या
पण बोळा लावताना..बकिचे हसतात
त्या साठी एक तंबु द्या.. :-D
28 Dec 2011 - 3:23 pm | पक पक पक
तो बोळा बिळा काय लाउ नका, वाहु द्या अजुन
28 Dec 2011 - 3:43 pm | प्रचेतस
बाकीचे हसतात, हसू द्या,
तंबु लावून तुंबु द्या
तुंबल्यानंतर फटकन फुटेल,
तुमची प्रतिभा झरझर झरेल.
28 Dec 2011 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा
@-तुंबल्यानंतर फटकन फुटेल,
तुमची प्रतिभा झरझर झरेल. >>> वरची कविता म्हणजे तुंम्हाला अपेक्षित परिणाम साधला गेल्याचे द्योतक आहे....त्या मुळे मला अता काही काळ भिजु द्या ;-)
28 Dec 2011 - 3:21 pm | पक पक पक
ऐकदम झक्कास्,लै आवड्ली भाउ.........
28 Dec 2011 - 3:36 pm | अन्या दातार
मस्त!!!
28 Dec 2011 - 6:10 pm | मी-सौरभ
हे तर चांगलयं एका कल्पनेला चिकटून राहण्यापेक्षा
सतत नवीन कल्पना करत राहणे चांगले नाही का??
28 Dec 2011 - 6:46 pm | मनीषा
अरेरे !!
28 Dec 2011 - 9:54 pm | अत्रुप्त आत्मा
@-अरेरे !!काही सुलभ>>> पुढे काही अठवलं नाही काय??? काय लिहावं ते?
28 Dec 2011 - 10:34 pm | मनीषा
अरेच्च्चा !! हे राहीलच का इथं ?
सॉरी हं !
आता पुढीलप्रमाणे वाचा -
अरेरे !! फार वाईट वाटले ... काळजी घ्या
आणि हो - कविता आवडली
28 Dec 2011 - 11:31 pm | अत्रुप्त आत्मा
@अरेरे !! फार वाईट वाटले ... काळजी घ्या>>>घेतो हं :-)
@आणि हो - कविता आवडली>>> थांकू हो काकू :-)
29 Dec 2011 - 3:15 am | पाषाणभेद
छान कल्पनेतले काव्य आहे.
29 Dec 2011 - 4:11 am | टुकुल
मजेशीर कविता
--टुकुल
29 Dec 2011 - 10:49 am | सोत्रि
झक्कास हो गुर्जी!
ती प्रतिभा का कोण ती भेटली जणू तुम्हाला ;)
वर पाभेंचीही पोच मिळाली!
- (किंचीत काव्यप्रेमी) सोकाजी
अवांतरः गाथा तंबाखूचीचं काय झाले?
29 Dec 2011 - 3:01 pm | अत्रुप्त आत्मा
@ती प्रतिभा का कोण ती भेटली जणू तुम्हाला>>> मला(ही) तसच वाटतय :-)
@अवांतरः गाथा तंबाखूचीचं काय झाले?>>> अता अ-भंग लेखन करावे अश्या सुप्त विचारात आहे. ;-)