तिच्या वेड्या हृदयाला, माझे प्रेम कळेल का?
मित्रांनो, तुम्हीच सांगा, ती माझ्यावर प्रेम करेल का?
पावसाळ्याच्या त्या रात्रीत, ती चिंSS ब भिजली होती;
मला आठवते आमची, पहिली भेट तीच होती..!
झाडाखाली ऊभी राहून ती, रिक्शाची वाट पाहत होती;
अन् माझी वेडी नजर मात्र, तिच्यावरून हटत नव्हती.
मनात फक्त एकच विचार.. इतकं सुंदर कोण असेल का?
मित्रांनो, तुंम्हीच सांगा आता, ती मझ्यावर प्रेम करेल का?
सकळी कॉलेजात मात्र, बॉडी चांगलीच शॉक झाली;
हार्टची स्पीड वाढली न् बोटे घशातच पळाली...
काय झाले कुणास ठाऊक, वाटले मला झोपेचीच तंद्री आली;
अहो, तिच आमच्या क्लासची नवीन स्टुडंट निघाली!
या वात्रट-मेल्या मुलांच्या नजरेला, काही औषध मिळेल का?
मित्रांनो, तुंम्हीच जरा सांगा, ती माझ्यावर प्रेम करेल का?
चंद्रासारख्या चेहर्यावर तिच्या, एकच काळा डाग होता;
उजव्या ओठांच्या खाली तो, ऐ॓टीत, तिळ म्हणून बसला होता.
डाव्या गालावरच्या खळीने, उरली कमी पुरी केली होती;
'कुसुमाग्रजांच्या' कवितेतील हीच का हो ती प्रेयसी होती?
काय म्हणताय, करु का मग फ्रेंडशिप? पण ती एक्सेप्ट करेल का?
मित्रांनो, सांगा ना... ती माझ्यावर प्रेम करेल का?
तिच्या टपोर्या डोळ्यांमध्ये, मन हे माझे बुड़त होते;
गर्म- भिजलेल्या ओठांवर, आता ओठ माझे टेकले होते.
काळ्या-भुर्या दाट केसांतुन, तिच्या हळुवार, बोटे माझी फिरत होती;
अन् जगाला विसरुन ती नाजुक परी, बाहूपाशात माझ्या विरघळत होती!!
अहो.. कुठे हरवलात?, दिवास्वप्न आहे हे..! खरं कधी होईल का?
मित्रांनो सांगा हो... ती पण माझ्यावर प्रेम करेल का?
शनिवारी, लायब्रेरी मध्ये ना, एक गंमतच झाली;
टपोर्या डोळ्यांची परी, माझ्याजवळ बोलायला आली.
थोड्यावेळाने माझ्याकडे बघुन मग, खुद्कन हसली;
म्हणाली,"अहो, अकाउन्ट समजावण्यासाठी तुंम्ही टीफीन का हो काढली?"
वरच्या प्रसंगातील माझा मुर्खपणा, तुंम्ही जरा विसराल का?
आणि खरंच सांगा मित्रांनो, ती मझ्यावर प्रेम करेल का?
पंधरावड्यात आमची गट्टी चांगलीच जमली होती;
ती स्वप्न-सुंदरी आता, माझी 'बेस्ट फ्रेंड' झाली होती.
या गोष्टीचा फायदा घेऊन मी, माझ्या भावना तिला सांगितल्या;
वेडी, खळखळून हसत, टळ्या पिटत म्हणाली,
"प्रणित, कविता बाकी मस्तच झाल्या!!"
जगातील सर्व मुली या, अशाच वेड्या असतात का...?
मित्रांनो, तुंम्ही तरी सांगा, ती माझ्यावर प्रेम करेल का?
१४ फेब्रुवारीला, सकाळीच, अर्जंट तिचा फोन आला...
लाजून म्हणाली, "प्रणित,लवकर ये ना, मनातलं माझ्या काही, सांगायचंय तुला"
आनंदाच्या भरातच, आमची स्वारी तिच्या घराकडे निघाली
पण क्षणांतच.......
अंधार होऊन; अशी, ट्रेनची धड-धड कानात का हो माझ्या घुमली?
आज, ती बोलण्याआधी तिला, मीच प्रपोज करु का?
मित्रांनो, बोला तरी.... ती माझ्यावर प्रेम करेल का?
पटरीवर विखुरलेल्या त्या शरीरातुन, प्राणपाखरु केव्हाच उडाले होते;
हातातील ते लाल गुलाब मात्र, झडुन.. माझ्याच रक्तात न्हाले होते.....
दारात ऊभी राहून ती आता, माझीच वाट बघत आहे......
"प्रणित, लवकर ये रे................................
ही माझ्या लग्नाची गोड़ बातमी मला, तुलाच आधी द्यायची आहे.......!!!!!"
माझ्या या वेड्या प्रेमाची, जाणिव तिला कधीतरी होईल का?
अन् माझ्या प्रेमाखातर ती, दोन अश्रु तरी गाळेल का...?
खरंच सांगा मित्रांनो.........
तिच्या वेड्या हृदयाला, माझे प्रेम कधी कळेल का?
माझ्यासारखीच ती पण कधी, मझ्यावर प्रेम करेल का.........................................
-अन्नू
प्रतिक्रिया
27 Dec 2011 - 12:19 am | अत्रुप्त आत्मा
तुमच्या या कवितेवर मी प्रतिक्रीया देऊ का?
मला सांगा तुमच्या बाबतीत, हे-खरच घडलय का? ;-)
27 Dec 2011 - 7:23 am | ५० फक्त
प्रणित, लवकर ये रे................................
ही माझ्या लग्नाची गोड़ बातमी मला, तुलाच आधी द्यायची आहे.......!!!!!"
तुम्ही केटरिंगची काँटॅक्ट घेता का हो, का हनिमुनच्या टुर बुकिंग करुन देता, लग्न ठरल्यावर तुम्हाला भेटायची एवढी घाई झाली होती तिला . आणि तुम्हाला आत्मविश्वास का काय तो नाहीच, कशावरुन तिनं तिचं लग्न तुमच्याबरोबर ठरवलं नसेल आधी पत्रिका तरी बघायची ना..
जाउदे मेलास ना आता सुखासुखी, जन्म दिलेले आईबाप, बरोबर वाढलेले भाउ बहीण सोडुन, चार सहा महिने दिसलेली पोरगी महत्वाची वाटली ना मग झालं मोक्ष मिळाला तुम्हाला. आता मग तुमच्या घरचेपण फार दुख: नाहीत करणार , रेल्वेकडुन नुकसान भरपाई, इन्शुरन्सचे क्लेम वगैरे चा विचार सुरु करतील लगेच.मिळतील गेला बाजार, २-४ लाख तर होतीलच की, बास झालं मग.
27 Dec 2011 - 7:35 am | सुहास झेले
ते रीड बिटवीन द लाईन्स म्हणतात, त्ये हेच काय? ;)
(ह.घे)
27 Dec 2011 - 2:46 pm | अन्नू
मिपा वरच्या स्पष्ट आणि रोकठोक प्रतिक्रीया मला आवडल्या. कलेची पारख करण्याआधी कलेची जाण असणे महत्वाचे असते, आणि ही जाण मला मिपावरच्या वाचकश्रोत्यांत (प्रखरतेने) जाणवली. खुप काही शिकायला मिळेल इथे तुमच्याकडुन मला हे पाहुन आनंद वाटला. :)
@ अतृप्त आत्मा=> ही कविता मेंदवाची उपजत वास्तवाशी याचा काहीएक संबंध नाही. ;)
@५० फक्त=> आपले लग्न ठरल्याची बातमी पहील्यांदा आपण आपल्या जवळच्या आप्तेष्ट व्यक्तींनाच अगोदर देतो नाही का. याचा अर्थ आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे- लग्न जुळवणारे कर्मचारी, भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले असतात की काय..!!!! :drunk: :lol:
28 Dec 2011 - 8:22 am | ५० फक्त
'@५० फक्त=> आपले लग्न ठरल्याची बातमी पहील्यांदा आपण आपल्या जवळच्या आप्तेष्ट व्यक्तींनाच अगोदर देतो नाही का. याचा अर्थ आपले सर्व आप्तेष्ट नातेवाईक किंवा मित्रमंडळी हे- लग्न जुळवणारे कर्मचारी, भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले असतात की काय..!!!! Drunk Laughing out loud' - अहो तसं नाही हो, जवळचे, आप्तेष्ट आपलं लग्न कधि ठरतंय यावर बारीक लक्ष ठेवुन असतातच आणि ते असेही लग्नाला येतातच अगदी आदल्या दिवशी सांगितलं तरी (जेवण चांगलं असणार असेल तर किंवा रिटर्न आहेर करणार असाल तर), पण भटजी, केटरिंगवाले, बँडवाले, किंवा हनिमुन बुकिंगवाले यांच्या फार फार मागं लागावं लागतं.
28 Dec 2011 - 3:11 pm | अन्नू
अगदी अगदी... पटलं! :lol:
27 Dec 2011 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार
हा प्रणित कोण ?
28 Dec 2011 - 3:15 pm | अन्नू
लेखनाच्या काल्पनिक विश्वातील माझी बाजु चालवणारे केवळ एक पात्र! :smile: