सोडवा
.
राशीला या आलाय राहू, कवितेचा लकडा नका लावू!
(गद्यामधल्याच ओळी सगळ्या, खाली-वरती रचून ठेवू!!)
श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ!
फुलेपाकळ्या,चंद्रचांदण्या निवडत-चिवडत सरसर पोहू!!
विडंबन पडता पुन्हा एकदा, कविता दुसरी उधार घेऊ!
तोंड पोळता,बोट चेपता "सोडवा,सोडवा" म्हणत राहू!!
=======================
बेसनलाडू.............. १७-०७-२००८
प्रेरणा: स्वातीताई फडणीसांचा गोडवा (हा कलाविष्कार)
प्रतिक्रिया
18 Jul 2008 - 1:59 am | सर्किट (not verified)
कविता मारून सूर : ६
निवडत-चिवडतः ९
बोट चेपता: १०
एकूण : ८
(तसा आज सकाळचा "बोट" वरचा तुमचा मूड पाहता, "सोडवा" आले हे बरेच झाले. कारण त्या मुडात राहिला असतात, तर "*डवा" नावाचे विडंबन येते की काय, अशी भीती वाटत होती. कारण हल्ली ते देखील सभ्यतेत बसते.)
- सर्किट
18 Jul 2008 - 2:05 am | बेसनलाडू
खाली-वरतीचा एक मार्क का कापला?
(टॉपर)बेसनलाडू
18 Jul 2008 - 2:12 am | सर्किट (not verified)
पुनर्गुणांकन करता, "खाली-वरती" ह्या पूर्ण ओळीला ९ गुण.
त्यामुळे एकूण ८.५.
क्षमस्व.
- सर्किट सर
18 Jul 2008 - 1:57 am | केशवसुमार
बेलाशेठ,
तुम्ही सुद्धा..
ज ब रा विडंबन.. हा हा हा..
(सोडवा सोडवा)केशवसुमार
18 Jul 2008 - 1:58 am | धनंजय
नाही जमले तितके.
म्हणजे तुमचे वृत्त स्वतंत्र म्हटले तर अगदी तंतोतंत पाळलेले आहे. पण मुळातल्या कवितेपेक्षा प्रत्येक ओळ थोडी लांबली आहे...
18 Jul 2008 - 2:02 am | बेसनलाडू
मूळ कवितेतल्या मीटरमधल्या इन्कन्सिस्टन्शीशी इमान राखले असते,तर मजा नसती आली;म्हणून त्याच्या आधारावर स्वतंत्र मीटर निवडले :) त्यामुळे गेय झाले असे वाटते.
(वृत्ताभ्यासक)बेसनलाडू
18 Jul 2008 - 2:14 am | सर्किट (not verified)
विडंबनाने, मूळ कवितेतील मीटरच्या इन्कन्सिस्टन्सी शी इमान न राखणे सभ्यतेत बसते का ? असा नवीन कौल टाकावासा वाटतो आहे.
- सर्किट
18 Jul 2008 - 2:53 am | प्रियाली
हे विशेष.
अवांतरः गोडवा वर कोणकोणत्या xडवा ने ;) विडंबन करता येईल याची उजळणी मगाशी केली होती. त्यापैकी एक आलेच.
18 Jul 2008 - 10:41 am | चतुरंग
छान विडंबन बेलाशेठ!
(स्वगत - काय ताकद आहे बघा कवितेची, एकेक करुन लोक विडंबनाच्या आखाड्यात शड्डू ठोकून उतरत आहेत! आता पुढला नंबर कोणाचा? :? )
चतुरंग
18 Jul 2008 - 11:39 am | विसोबा खेचर
श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ!
ही कल्पना आवडली! :)
18 Jul 2008 - 11:45 am | छोटा डॉन
तसं मला "काव्य आणि विडंबन" ह्यातले काही जास्त गम्य नाही ...
पण ही कविता समजली आणि मस्त वाटली ...
एक उत्तम विडंबन !
एक शंका,
"श्रोत्यांच्या या करड्या दर्यात, कविता मारुन सूर घे"
याऐवजी
"श्रोत्यांच्या या कोरड्या दर्यात, कविता मारुन सूर घेऊ"
असे असेल तर काव्याचा अर्थ बदलेल काय ?
समजा बदलला तर तो ह्या "कवितेच्या" साच्यात "फिट्ट" होणार नाही का ?
[अनावश्यक] शंकेखोर - छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
18 Jul 2008 - 11:51 am | बेसनलाडू
श्रोत्यांच्या या करड्या दर्यात = दर्यादिल पण करड्या अभिरुचीचे (आवडले तर डोक्यावर घेणारे,नाहीतर आपटवणारे;शिस्तीचे/जाणकार/प्रामाणिक श्रोते या अर्थी) श्रोते असणारा हा मिपाचा दर्या => करडा दर्या
कोरडा दर्या म्हटले तर तो विरोधाभास होईल ना! म्हणजे (दर्यादिल) श्रोत्यांचा दर्या कोरडा असेल का?त्यात अभिरुची आणि आस्वादाचा ओलावा असेलच ना?
(स्पष्टीकारक)बेसनलाडू
18 Jul 2008 - 12:00 pm | छोटा डॉन
"करड्या अभिरुचीचे" जे स्पष्टीकरण दिले त्याच्याशी सहमत आहे ...
एकदम मान्य.
"कोरडा दर्या" हा इथे नक्की विरोधाभास होऊ शकतो पण एखाद्याला [ मी नाही ]जर "विरक्त किंवा नैराश्य" भावनेने ही कविता लिहायची असल्यास तेथे "कोरडा दर्या" चालु शकेल.
तज्ञांनी ह्याबद्दल मते सांगावीत ...
बाकीचे आपेल स्पष्टीकरण उत्तम ...
ह्या ठिकाणी "करडा दर्या" हेच समर्पक ...
(सहमत)छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
18 Jul 2008 - 12:06 pm | आंबोळी
विडंबन आवडले.
नुसतेच आवडले नाही तर आम्ही स्फूर्ती ही घेतली. ;)
आंबोळी
18 Jul 2008 - 3:19 pm | मनीषा
छानच आहे...
.... आता हातात चक्र (विंडबनाचे) घेउन सर्व कवि (तां) चे पाणि पाणि करणार तर..
ह. घ्यालच---
18 Jul 2008 - 8:02 pm | अभिज्ञ
आज मिपावर विडंबनाची लाटच आलेली दिसतेय.
बेलाशेठ ,जबरि झालेय.
मजा आली.
अभिज्ञ
19 Jul 2008 - 2:00 am | स्वप्निल..
हेच म्हनायचे आहे...
बेलाशेठ .. विडंबन लइ भारी..आवडले
सुरु राहु दया तुमची चक्की अशीच...
स्वप्निल..
18 Jul 2008 - 8:17 pm | मदनबाण
जबरा.. फार आवडले..
मदनबाण.....