एकदा वाटलं कविता करावी...
सोप्पं तर असतं..
'र' ला 'र' आणी 'ट' ला 'ट',
त्यात काय एवढं...
जमेल की आपल्यालाही
एवढे काय आपण 'हे' आहोत...
थोडे छान, थोडे दुर्बोध,
थोड रुपकात्मक,थोडे तरल,
काही मात्र अगदीच वास्तव
लिहू आपण चार शब्द...
मात्रा देखील जमतीलच की,
वृत्त थोडी अडखळ्तील ही,
कवयत्रिचे देउन नाव,
निभावून ही जाईलच की...
मग वाटले नको असे,
मग वाटले नकोच ते,
मिळेल फटका, होईलही कौतुक,
पण कशाला हवे जोडायला
आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....
( इतरत्र पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
1 Dec 2011 - 12:54 pm | स्पा
पण कशाला हवे जोडायला
आपलं पोतेरं कवितांच्या मलमली गालिच्यांना.....
सहिच
1 Dec 2011 - 12:54 pm | प्रचेतस
प्यारे, झकास रे एकदम.
शेवटी तूही कविता प्रसवलीसच. :)
1 Dec 2011 - 12:57 pm | सुहास झेले
मस्त.... सध्या मिपावर कवितांचा पाऊस पडतोय .... :) :)
1 Dec 2011 - 1:17 pm | अन्या दातार
अजुन येऊदेत.
1 Dec 2011 - 1:28 pm | गणपा
अभ्यास दांडगा दिसतोय. ;)
1 Dec 2011 - 1:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
आजकाल प्यारे पण कविता करायला लागला तर!!
असो. ;)
1 Dec 2011 - 1:50 pm | आत्मशून्य
इथं प्रतिसादच लिहायला नको,
सोपाच तर असतो, कोणीही देतो
'फ' ला 'फ' आणी 'फ' ला 'फ',
त्यात काय एवढं...
देइलच की कोणिही
तसेही आपण सगळे 'हे'च आहोत...
मग वाटले नको असे,
मग वाटले करू तसे,
देऊया का फटका ? नको....
त्यापेक्शा करूया कौतुक... मस्त कवीता हो प्यारे१
1 Dec 2011 - 2:30 pm | पियुशा
प्यारे तुम्ही पण ?
कविता छान ,खासकरुन शेवट्च कड्व :)
1 Dec 2011 - 2:48 pm | मेघवेडा
मस्त! अत्यंत वास्तववादी! :)
आज स्वतःला कवी म्हणवून घेणार्यांपैकी ८०% लोकांनी असा विचार करून आपलं काव्यमक्षिकाप्रजनन थांबवण्याचं ठरवलं तर मराठी साहित्याचं भविष्य आणखी उज्ज्वल होईल!
1 Dec 2011 - 6:16 pm | वपाडाव
एकदम पर्सनली घेउन एकही कविता न प्रसवण्याचा निर्णय घेतला गेला आहे......
1 Dec 2011 - 3:33 pm | सुहास..
हा हा हा हा हा
पेटलेत आज सगळे !
1 Dec 2011 - 3:43 pm | वाहीदा
अरे हे पण वाचलेस का
http://www.misalpav.com/node/8987
आपल्या मिपाच्या शाहरुख ने लिहीलेले काव्य ..
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
-- कवी शाहरुख
कोनी 'ट' ला 'ट' आनि 'क्ष' ला 'क्ष' जुळिवतंय
आनी पब्लिक त्ये आगदी आतून आलंय म्हनतंय
आमानी नाय कवा काय आतून आल्यागत वाटनांर
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
लोकं लिवत्यात कोड्यात अन गाव म्हनतंय भारी
आमी मात्र मनात म्हनतुंय हाय काय ही भानगड तिच्यामारी
असली आमची भाषा गावंढळ तरी शिंपल शिंपल लिवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
परत्येक वळीतला काना मात्रा उकार येलांट्या मोजत्यात
आनी साळंतल्या बीजगनितावानी बेरीज वजाबाकी करत्यात
आसलं काय गनित आमी नाय मांडनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
निम्म्यांच्या कवितेत असत्यात पानं फुलं फळं अन पक्षी
आनी राहिलेल्यास्नी दिसतिया ढगांमदी नक्षी
चंद्र सूर्य तारे नदी शेप्रेट फ्रेममदी ठेवनार
तरीबी तिच्यायला आमी येक कविता करनार !!
हाय काय आनी नाय काय म्हननार
आनी तिच्यायला आमीबी येक कविता करनार !!
-- कवी शाहरुख
1 Dec 2011 - 3:54 pm | मेघवेडा
ब्येस हाय! वर आणतोच! :)
1 Dec 2011 - 4:48 pm | प्यारे१
खरंतर वपु म्हणालेत तसं दासबोधानंतर कुणी काही लिहायची गरजच नव्हती.
प्रचंड प्रतिभावान अनेकानेक कवी आजूबाजूला असताना आणि भूतकाळात होऊन गेलेले असताना उगाच आपल्या खा*पायी खरेच कविता 'पाडत' असतात. (खर्या चांगल्या कवी आणि लेखकुंनी ह घ्या ;) )
बाथरुम सिंगर्सनी मी पहा कशी रफी सारखी तान घेऊ शकतो असे म्हणण्यासारखे काहीसे आहे.
मार्च २०१० मध्ये अशाच शेजारच्यांच्या कवनकळांमुळं प्रसूत झालेली ही सिझर्ड कविता आहे. http://www.mimarathi.net/node/941
मिपावरच्या भाद्रपद महिन्याच्या (सौजन्य धमु) उन्नतीकाळात आज हे संदर्भ तितकेच लागू पडतात म्हणून इकडं प्रकाशित करावीशी वाटली.
सूज्ञांस अधिक सांगणे न लगे.
1 Dec 2011 - 7:21 pm | पैसा
प्यारे पण कविता करायला लागला!!! प्रेरणाच भारी आहे.
1 Dec 2011 - 9:49 pm | विदेश
एकदा तरी कविता करावी वाटली -
वाचावीही वाटली, यातच सारे आले .