एकदा सहज असे वाटले कि स्वप्नांच्या गावी फिरून यावे .. थोडेसे आठवणींचे गाठोडे घेऊन एकटेच बाहेर पडावे .. निवांत स्वतः स्वतःला शोधून पाहावे. काही तरी जुने फिरून नव्याने मिळते का पाहावे .. नाही जरी मिळाले तरी जुने विश्व पुन्हा एकदा अनुभवावे ..
म्हणून मग आठवणींचे गाठोडे उघडून बसले नि - त्यात कधी हरवून गेले माझे मलाच कळले नाही. स्वप्नांच्या गावी जाण्याची गरजच जणू उरली नाही. जुनीच स्वप्ने पुन्हयांदा नवी वाटू लागली.
मला पण माझी भीती वाटू लागली. पण स्वप्नेच ती किती वेळ सुखावण्याची ताकद असणार त्यांच्यात ?? परिस्थितीचे भान दिल्याशिवाय ती तरी कशी सत्यातून जाणार ?
मी पण मग हट्टाला पेटले. पुन्हा एकदा स्वप्नात हरवायचे ठरवून त्यांचा मागोवा घेऊ लागले. का कुणास ठाऊक ? मन परत उगाच शहारले .. तलम कापड अंगावर घेतल्यासारखे, मोरपीस गालावर फिरल्यासारखे ..
प्रतिक्रिया
23 Nov 2011 - 11:57 am | अन्या दातार
अजुन स्वप्नात आहात की जाग्या झालात???
ही माझी सहजच चौकशी बरं ;)
23 Nov 2011 - 12:14 pm | वपाडाव
बादलीभर पाणी टाकुन झोप उडव रे बाळा त्यांची.....
23 Nov 2011 - 12:21 pm | रुमानी
छान !
मल हि वाट दुर जाते ,ह्या गान्यचि आठवन झालि.
बाकि तसे झाले तर ............ मज्जा!!!!!!!!!!!!
23 Nov 2011 - 12:24 pm | सोत्रि
मस्त मुक्तक, आवडले!
स्वप्नांच्या जादुई दुनियेत रमायला मलाही आवडते.
- (स्वप्नाळू) सोकाजी
चित्रः आं.जा.वरून साभार
23 Nov 2011 - 12:33 pm | मीनाक्षी देवरुखकर
मला स्वप्न खुप अवद्तत.
स्वप्नन्मधे जग्न महत्वच
वस्त्तव खुप निरशवदि अस्त , पन स्वप्न कशि मस्त अस्तत्त ?
सहिच
जम अवद्ल लेख.. तुम्हि लिहित जा, अम्हि वचत जतो
23 Nov 2011 - 1:31 pm | सूड
एक प्रश्न !!
तुमचं सदस्यनाम तुम्ही कसं काय टैप केलंत ब्वॉ ?? नाही, प्रतिसाद टंकताना तुमची चाललेली तारांबळ वाचून वाटलं हो.
23 Nov 2011 - 1:52 pm | किचेन
:)
मला वाटतय कि तुम्हि काहि मदत केलि असणार!
23 Nov 2011 - 2:11 pm | प्यारे१
किचेन आधी स्वतः सेट्ट्ल व्हा. नंतर दुसर्यांना मदत करा.
नाहीतर 'आपलंच धड नाय आन दुसर्याचं बगून उपयोग काय' असं व्हायचं. बरोबर ना?
23 Nov 2011 - 2:38 pm | वपाडाव
तुला दुसरं काय सुचलं नाय का बे.....
आपण सांगे लोकाला..... वेग्रे वेग्रे....
23 Nov 2011 - 3:09 pm | सूड
तसंच असतं रे !! आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, पण दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ पटकन दिसतं. (म्हणी पण जमायला लागल्या ब्वॉ)
23 Nov 2011 - 5:03 pm | पियुशा
@ सु.दे
____/\____ खपले ;)
23 Nov 2011 - 12:53 pm | मन१
अलगद अल्लाद स्वप्नाच्या दुनियेतून फिरवून आणलत..
23 Nov 2011 - 1:16 pm | मदनबाण
हल्ली सहजराव दिसेनासे झाले आहेत ! मला वाटलं त्याबद्धलच हा धागा हाय की काय ! ;)
23 Nov 2011 - 3:06 pm | सर्वसाक्षी
<<मन परत उगाच शहारले .. तलम कापड अंगावर घेतल्यासारखे, मोरपीस गालावर फिरल्यासारखे ..>>
शहारले की मोहरले?
दंगलींच्या आठवणींनी मन शहारते
प्रेयसीच्या आठवणीने मन मोहरते.
मोरपीस, तलम कपडा वगैरे (वैग्रे नाही) गोष्टी दुसर्या कलमाशी जुळतात असे वाटते.
तज्ञांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती
24 Nov 2011 - 1:32 am | प्रभाकर पेठकर
प्रेयसी दंगलखोर असेल.
23 Nov 2011 - 5:04 pm | navinavakhi
जुन्या आठवणी कितीही हव्याशा वाटल्या, तरी त्या सत्याची बोचक जाणीव करून देतच असतात. अशा वेळेस मोहरायला होत नाही शहारायला होतं !!
23 Nov 2011 - 5:10 pm | पियुशा
@ नविनवखी
जुन्या आठवणी कितीही हव्याशा वाटल्या, तरी त्या सत्याची बोचक जाणीव करून देतच असतात. अशा वेळेस मोहरायला होत नाही शहारायला होतं !!
वाह वाह ! क्या लिखेला है मस्त रे एकदम :)