साहित्य संमेलने दरवर्षी होत असतात. यंदाही ते होइल.
अनेकदा एखादी व्यक्ती साहित्य संमेलनाची अध्यक्ष का झाली असाही प्रश्न रसिकांना पडतो.
त्या व्यक्तीमुळे किमान त्या संमेलनाची शान वाढावी ही अपेक्षा असते.
संमेलनामधील पुस्तक प्रदर्शन, संमेलनाचे जत्रेसारखे स्वरूप
या गोष्टी रसिकांना मोहवून टाकणार्या असतातच.
पण
ज्या लेखकाला आपण केवळ त्याच्या पुस्तकातील लेखनातूनच भेटलो.
त्याला प्रत्यक्ष पाहता यावं, ऐकता यावं हीदेखील इच्छा असते.
मात्र
ज्याचं लेखन कधी भारावून जावून वाचलं नाही,
ज्याच्या लिखाणाने कधीही मनाची पकड घेतली नाही किंवा त्याहीपेक्षा ज्याचं साहित्य क्षेत्रात
नेमकं योगदान काय हा प्रश्न पडावा !
अशी माणसं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर जावून बसतात तेव्हा
रसिकांची निराशा होते.
अलिकडच्या काळात अतिशय गाजलेलं संमेलन म्हणजे आळंदीचं.
अध्यक्षा होत्या शांताबाई शेळके.
पण त्यानंतर काही अपवाद सोडले तर खराखुरा लेखक म्हणावा असा कोणी अध्यक्ष
झालाच नाही.
त्यामुळे
यावेळी तरी कुणी लेखक म्हणता येइल असा, ज्याच्या अध्यक्ष बनण्यामुळे मराठी वाचकांना खरेच आनंद होइल,
असा कुणी अध्यक्ष बनावा. ही इच्छा आहे.
धन्यवाद !
प्रतिक्रिया
18 Oct 2011 - 12:43 am | आशु जोग
अनिल अवचट किंवा 'पानिपत'कार विश्वास पाटील हे अध्यक्ष झालेले पहायला मिळावेत ही आस लागून राहीली आहे
18 Oct 2011 - 8:31 am | पाषाणभेद
आगामी मराठी साहित्यसंमेलनासाठी आम्ही काही प्रायोजक शोधले आहेत.
'संतोषकुमार श्रीवास्तव' , 'ओरबींदो चतर्जी' , 'श्रीनिवासन राव' आदी नावे आहेत.
त्याचप्रमाणे 'माणिकमोतीचंद- मराठी साहित्यसंमेलन', 'मडगाव गोवा पानमसाला - मराठी साहित्यसंमेलन' आणि 'जैन पाईपलाईन - मराठी साहित्यसंमेलन' असली नावे दिलीत तर हे उद्योजकही मराठी साहित्यसंमेलनासाठी तयार आहेत.
त्याचप्रमाणे गर्दी खेचण्यासाठी अमिताभ बच्चन, राखी सावंत, रेखा दिपीका पदूकोण, विद्या बालन यांनाही बोलावण्याचा विचार आहे. नाही म्हटले तरी ते मराठी मातीतच राहून हिंदीत का होईना पण बोलतील. बरोबरच राज ठाकरे, शरद पवार, विलासराव देशमुख, अजितदादा पवार आदी हक्काने येतीलच.
जेवणाला कॉन्टीनेंटल (प्रकाशन नव्हे) मेनू, ईटालीयन पास्ता, जपानी फुड, कॅरेबीयन सी फुड, केरळीय मसालेभात आहेच.
तेथे होणार्या पुस्तक प्रदर्शनात कथा-कादंबर्यांना काहीच उठाव नसतो. अन त्यातल्या त्यात कवितांच्या मालाकडे तर कुणी ढुंकूनही पाहत नाही. त्यामुळे होणार्या पुस्तक प्रदर्शनात केवळ मॅनेजमेंट, पर्सनल डेव्हलपमेंट, पाककृती, शालेय गाईड आदिंचीच पुस्तके ठेवण्यात येणार आहेत. मुळ साहित्याला कोण विचारतो हो?
18 Oct 2011 - 8:34 am | प्रचेतस
ओ पाभे, ज्योतिषविषयक साहित्याला विसरलात का हो? ;)
18 Oct 2011 - 9:20 am | पाषाणभेद
अरे हो. विसरलोच. बरी आठवण दिलीत.
ते स्टॉल लावण्यासाठी फिजूत्सू, ओकाची (दाट)झाडी आदी कंपन्यांशी संपर्कात आहे. त्याचप्रमाणे शब्दकोडी, विज्ञानकोडी, मुलाखतकोडी, आरोग्यशास्त्र, व्यायामशास्त्र, निद्राशास्त्र, योगशास्त्र, पैलवानशास्त्र, काळीविद्या, अघोरीविद्या, हे कसे करावे, ते कसे करावे आदींमध्येही नविन माल आलेला आहे.
:-)
ता.क.: आत्ताच आलेल्या माहितीनुसार चेतन भगत हे देखील या अध्यक्षपदासाठी उत्सूक आहेत असे समजले आहे. नाहीतरी भगत हे आडणाव सरळ सरळ मराठी वाटते आहे. कोणाला संशय नको! कसें? आपल्या कोकणात नाही का आपला भगत भुत हडळ उतरवण्यासाठी राहत? मग!
18 Oct 2011 - 9:29 am | ऋषिकेश
या दुव्यावर साहित्य संमेलनाध्यक्षांची यादी आहे. यापैकी कोण अध्यक्ष असु नये असे तुम्हाला वाटते? माझ्यामते यातील बहुसंख्य व्यक्ती या उत्तम लेखक-लेखिका/कवी-कवियित्री आहेत. मराठी भाषेत बर्याच जणांचे साहित्य गाजले आहे प्रसंगी मैलाचा दगड ठरले आहे.
नक्की कोणत्या नावांमुळे हा नकारात्मक सुर आळवला आहे हे कळेल का?
18 Oct 2011 - 12:34 pm | विश्वनाथ मेहेंदळे
>>नक्की कोणत्या नावांमुळे हा नकारात्मक सुर आळवला आहे हे कळेल का?
जे अध्यक्ष झाले ते खरेखुरे लेखक नव्हते की जोग यांना ते खरेखुरे लेखक आहेत हे माहित नव्हते, हा खरा प्रश्न आहे.
इथे त्यांना विंदांचे मराठी साहित्यातले योगदान माहित नाही, हा संदर्भ मी धरला आहे.
हा अविर्भाव बघून एका जुन्या मिपाकराची पराकोटीची आठवण येते आहे ;-)
18 Oct 2011 - 5:24 pm | गणेशा
१९९६ नंतर ही उल्लेखनिय लोक अध्यक्ष आहेत हे दिसतेच आहे..
माझ्यामते कोण कीती मोठा कलाकार - साहित्यकार आहे या पेक्षा त्याचे योगदान समाजात कसे रुजले आहे मनामनांचा थांग त्याने कसा घेतला आहे हे महत्वाचे..
कलाकार हा कधीच मोठा - लहान नसतो.. हा तो वेगळा असतो म्हनुन त्यात स्थर नसतो असे वाटते..
जाता जाता :
यादी मध्ये २००९ च्या आनंद यादवांचा उल्लेख आहे, त्यांना राजीनामा द्यावा लागला होता, हे शल्य पुन्हा आठवले..
18 Oct 2011 - 1:05 pm | परिकथेतील राजकुमार
आंतरजालावरील साहित्यकार ह्या पदासाठी ग्राह्य धरले जातात काय ?
तसे असल्यास माननीय श्री. चेतन सुभाष गुगळे अथवा माननीय श्री. विनायकदादा पाचलग हे अध्यक्ष झालेले पहायला मिळावेत ही आस लागून राहीली आहे.
19 Oct 2011 - 7:27 pm | शाहिर
श्री. चेतन सुभाष गुगळे यांच्या सारखे संतुलित लेखन करणारा दुसरा कोणी पहाण्यात नाही ..
त्या मुळे श्री. चेतन सुभाष गुगळे अथवा माननीय श्री. विनायकदादा पाचलग यांच्यात निवडणुक झाल्यास माझे मत श्री. चेतन सुभाष गुगळे यांनाच
20 Oct 2011 - 8:07 am | पाषाणभेद
तसे चेतनभाऊही चालतील पण नविन रक्ताच्या विनायकदादांना आमचा पाठिंबा. किंवा नाहीच जमले तर दोघांना दिड दिड दिवस द्यावा. कविसंमेलनाला मात्र विनायकदादाच हवे. चर्चासत्रासाठी चेतनभाऊ एकदम फिट्ट आहेत.
21 Oct 2011 - 9:22 pm | चेतन सुभाष गुगळे
गेल्या काही दिवसांत माझ्यासोबत या संकेतस्थळावर घडलेल्या तीन घटनांमुळे मी अगदी ठरवून कुठल्याही प्रकारचे प्रतिसाद अथवा नवे लेखन टंकलेले नाही. केवळ वाचनमात्रच इथे वावरतोय.
माझा या संकेतस्थळावर कुठल्याही प्रकारे सक्रिय सहभाग नसतानाही आपण तिघांनीही इथे माझी आठवण काढलीत व चार चांगले उद्गार माझ्याविषयी जाहीर रीत्या मांडलेत हे पाहून अतिशय आनंद झाला.
धन्यवाद.
19 Oct 2011 - 10:33 pm | आशु जोग
शाहीर नाव घेतलेली व्यक्ती
जरा जपून हो विषय काय आहे पहा
21 Oct 2011 - 12:01 pm | शाहिर
<<यावेळी तरी कुणी लेखक म्हणता येइल असा, ज्याच्या अध्यक्ष बनण्यामुळे मराठी वाचकांना खरेच आनंद होइल,>>
<<असा कुणी अध्यक्ष बनावा. ही इच्छा आहे.>>
तुम्ही धाग्यामधे ज्या ओळी लिहिल्या आहेत त्यालाच अनुसरून प्रतिसाद आहे ..
आंतरजाला वरील लेखना सुद्धा साहित्यिक मुल्य आणि मान्यता मिळावी असे वाटले ..
श्री. गुगळे यांचे लेखन मला आवडते ..म्हणुन त्यांचे नाव सुचवले ...
यात काय चुकिचे आहे ते सांगा ... ते देखील <<असा कुणी अध्यक्ष बनावा. ही इच्छा आहे.> असे लिहिल्यामुळे...
24 Oct 2011 - 6:03 pm | चेतन सुभाष गुगळे
<< श्री. गुगळे यांचे लेखन मला आवडते ..म्हणुन त्यांचे नाव सुचवले ...
यात काय चुकिचे आहे ते सांगा >>
यात काहीच चूक नाही, पण जर का ते खरंच त्या हेतूने लिहीले असेल तर...
तुमच्या http://www.misalpav.com/node/19344#comment-344442 या प्रतिसादामुळे कदाचित त्यांना तुमच्या हेतूविषयी शंका आली असेल.
20 Oct 2011 - 11:51 pm | आशु जोग
पाषाण
अहो तुम्ही एवढी मोठी यादी दिलीत. मग त्या ॠजुता दिवेकर का नकोत
'डोंट लूज युवर माइंड लूज युवर वेट'
21 Oct 2011 - 9:44 pm | पाषाणभेद
खरोखर आंतरजालावरील आंजामसासंमेलन व्हायला पाहिजे. इतिहास पाहता आपली वेगळी चुल मांडणॅ योग्य आहे.
23 Oct 2011 - 1:40 am | निनाद मुक्काम प...
आंतरजालीय संमेलन भरले तर ते परदेशात भरले पाहिजे ( आज काल तसा ट्रेंड आहे.)
मग संमेलनात साहित्यासोबत नाच गायन ,स्थानिक कलावंतांचे कार्यक्रम मग भारतातून बोलावलेल्या साहित्यिक अथवा अभिनेत्यांचे मानापमान
मग त्यांची भारतीय प्रसारमाध्यमात खमंग चर्चा ........
माझ्या मते नारायण धारप ,बाबुराव अर्नाळकर ,गुरुनाथ नाईक , विजय देवधर( भाषांतर तज्ञ ) ह्यांच्यापैकी एकाला किंवा
आजच्या पिढीतील जेष्ठ अर्थतज्ञ गिरीश जाखोटिया ज्यांनी अर्थ शात्रासारखा क्लिष्ट विषय केंद्र स्थानी ठेवून मराठीत कादंबर्या लिहिल्या व लेखन केले.त्यांना साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी पाहायला आवडले असते.( ह्यातील आता धारप ,आणी बापूराव आज हयात नाहीत.)
22 Dec 2011 - 11:09 pm | आशु जोग
वसंत आबाजी डहाके यांचे अभिनंदन
2 Jan 2016 - 9:58 am | आशु जोग
यंदाचे अध्यक्ष संमेलनाच्या आधीपासूनच गाजू लागले आहेत. टिव्हीवरच्या चर्चा आणि लोकसत्ताचा अग्रलेख अशा अनेक गोष्टींना हे विषय पुरवणार असे दिसते.
2 Jan 2016 - 8:16 pm | चौथा कोनाडा
आगामी अध्यक्षांना किती फटके पडताहेत !
बिच्चारे श्रीपाल !!!
लोकसत्तावाल्यांनी खुपच वाईट बडवले आहे.
2 Jan 2016 - 8:16 pm | चौथा कोनाडा
http://www.loksatta.com/aghralekh-news/sripal-sabnis-slams-narendra-modi...