छचोर

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
12 Jul 2008 - 4:49 am

पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!
पाऊस इतका छचोर आहे साला!

प्रेमकाव्यकविताप्रकटनविचार

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

12 Jul 2008 - 5:25 am | भाग्यश्री

वा!!! खूप आवडली कविता.. कोसळणं,ढासळणं तर खूपच आवडलं!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jul 2008 - 9:24 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर

सही !!! दिसला आम्हाला पाऊस, तिच्या ओल्याचिंब केसावर आणि मानेवरही !!!

विसोबा खेचर's picture

12 Jul 2008 - 9:35 am | विसोबा खेचर

लै भारी कविता..! खूप आवडली...

'साला' हा शब्द अगदी सहजतेने आणि चपखल बसला आहे! :)

ढगावर पडणार्‍या मल्हाराच्या थापेची कल्पना खूप छान वाटली! अभिनंदन...

आपला,
(मल्हारप्रेमी) तात्या.

ऋषिकेश's picture

12 Jul 2008 - 9:43 am | ऋषिकेश

अहाहाहा बेला! साला बेष्ट कविता :)

पाऊस इतका छचोर आहे साला!
ओल्याचिंब केसांमधून रुळतो तुझ्या मानेवर
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो

वा वा! बहोत खूब :)
अजून येऊ दे

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

प्राजु's picture

12 Jul 2008 - 8:42 pm | प्राजु

अभिनंदन... मुक्तछंदातली ही तुझी मी वाचलेली पहिलीच कविता. खूप छान लिहिली आहेस.

हृषिकेश म्हणतो त्याप्रमाणे,
टपटपतो लाजलाजून,जमून भिवयांच्या पागोळ्यांवर
पडतो आम्ही दोघेही -पडली मल्हाराची थाप ढगांवर की
फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
हे अगदी खास...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

12 Jul 2008 - 9:46 am | मुक्तसुनीत

पावसाला "रकीब" मानणे : गमतीशीर कल्पना. गंमत आली वाचताना !

बेसनलाडू's picture

12 Jul 2008 - 10:02 am | बेसनलाडू

'रकीब' वरुन पाकिस्तानी गझल गायिका मुन्नी बेगम यांच्या 'आवारगी में हद से गुजर जाना चाहिये' या गझलेतला एक शेर आठवला -
मुझसे बिछडकर इन दिनों किस रंग में है वह
यह देखने रकीब के घर जाना चाहिये

:) :)
(स्मरणशील)बेसनलाडू

मुक्तसुनीत's picture

12 Jul 2008 - 10:22 am | मुक्तसुनीत

जखमी करणारा शेर ! :-)

रकीबांच्या टोळक्यासमोर आपली तक्रार करणार्‍या आपल्या प्रियेला उद्देशून मिर्झा गालिब म्हणतो :

जमा करते हो क्युं रकीबोंको ?
एक तमाशा हुआ , गिला न हुआ !
हाय , दर्द मिन्नत-कश्-ए दवा न हुआ,
मैं न अच्छा हुआ , बुरा न हुआ :-)

बेसनलाडू's picture

12 Jul 2008 - 10:47 am | बेसनलाडू

(खलास)बेसनलाडू

चतुरंग's picture

12 Jul 2008 - 9:58 am | चतुरंग

छचोर, साला हे चपखल शब्द टाकून एकदम बहार आली.
'मेघमल्हार' आवडला!
मस्त मुक्तछंद! :)

चतुरंग

केशवसुमार's picture

12 Jul 2008 - 12:58 pm | केशवसुमार

बेसनसेठ,
चित्रदर्शी रचना!! आवडली,
(छचोर)केशवसुमार

अनिल हटेला's picture

12 Jul 2008 - 10:44 am | अनिल हटेला

लै भारी!!

मस्त कविता!!!

एकदम सह्ज सुन्दर !!!

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

साती's picture

12 Jul 2008 - 1:22 pm | साती

फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
मस्तच रे बेला!
साती

पद्मश्री चित्रे's picture

12 Jul 2008 - 1:33 pm | पद्मश्री चित्रे

छान च आहे..
आणि सर्वात काय आवडलं असेल तर "छचोर" हे विशेषण
एक्दम सही...

शितल's picture

12 Jul 2008 - 5:34 pm | शितल

सर्वच कविता एकदम सह्ही...
:)

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Jul 2008 - 5:40 pm | ब्रिटिश टिंग्या

छचोर अन् साला हे शब्द योग्य ठिकाणी टाकल्यामुळे जास्त बहार आली.

फरक फक्त इतकाच -
तो कोसळतो,मी ढासळतो
दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं

क्लास!

(साला छचोर) टिंग्या :)

धनंजय's picture

12 Jul 2008 - 6:02 pm | धनंजय

मस्त कल्पना आहे.
वरकरणी छचोर पावसाविरुद्ध तळतळाट, आतून हळवेपणा.

नंदन's picture

12 Jul 2008 - 8:54 pm | नंदन

असेच म्हणतो. कविता आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

भडकमकर मास्तर's picture

12 Jul 2008 - 6:07 pm | भडकमकर मास्तर

उत्तम...
मजा आली...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रियाली's picture

12 Jul 2008 - 6:22 pm | प्रियाली

तो कोसळतो,मी ढासळतो

मस्त कल्पना.

छचोर साला शब्द कसा अगदी चपखल बसला आहे.

आनंदयात्री's picture

12 Jul 2008 - 6:59 pm | आनंदयात्री

मस्त रे बेला ... येउदे अजुन असेच साहित्य !!
:)

-(आनंदित) प्रसादलाडु

प्रमोद देव's picture

12 Jul 2008 - 9:12 pm | प्रमोद देव

काही म्हणा ह्या कविहृदयाच्या लोकांना साध्या गोष्टीतही खूप काही दिसते की जे आमच्यासारख्या गद्य(की गध्या?) लोकांना कधीच दिसत नाही. म्हणतात ना ... तेथे पाहिजे जातीचे!
बेला कविता आवडली.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

पिवळा डांबिस's picture

12 Jul 2008 - 11:11 pm | पिवळा डांबिस

दुसर्‍या कुणी तुला भिजवलं असं
की माझं पाणी पाणी होतं
आणि लाजून लाजून तुझंही
मग काय! - पावसाला आणखी पाणी मिळतं,भिजवायला!
क्या बात है!!!

दुसर्‍या कुणी भि़जवलं तुला,
तर माझ्याशी गाठ आहे.....
तुला ओलीचिंब करणं,
फक्त ह्यालाच माफ आहे...
हा पाऊस इतका छचोर आहे साला.....

-पिडा

बेसनलाडू's picture

12 Jul 2008 - 11:46 pm | बेसनलाडू

दुसर्‍या कुणी भि़जवलं तुला,
तर माझ्याशी गाठ आहे.....
तुला ओलीचिंब करणं,
फक्त ह्यालाच माफ आहे...
हा पाऊस इतका छचोर आहे साला.....
वा काका वा!
(माफीचा साक्षीदार)बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

13 Jul 2008 - 12:28 am | इनोबा म्हणे

बेलाशेठ, मस्त कविता! मजा आली.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

सर्किट's picture

13 Jul 2008 - 9:02 am | सर्किट (not verified)

कन्सेप्ट बद्दल तुला दहा पैकी दहा मार्क दिले बेला.

पण शब्दांत आणखी छान करता आलं असतं.

छचोर - १० मार्क (इथे मुजोर अस्तं तर ६ मार्क मिळाले असते.)
साला - ९

पण मल्हारची थाप ? - ० मार्क..

बघ , पुन्हा विचार कर.

- सर्किट

कोलबेर's picture

13 Jul 2008 - 10:54 am | कोलबेर

..म्हणतो..'मल्हाराची थाप' हे थोडे खटकले! ..बाकी १०/१०.. छचोर तर मस्तच!
बाकी ही नविन गुणांकन पद्धत आवडली
(थापाड्या) कोलबेर

बेसनलाडू's picture

13 Jul 2008 - 11:07 am | बेसनलाडू

मल्हाराची थाप ही (थापाड्या)कोलबेर मधली थाप नाही.
हे कळले नाही म्हणून ० की मला जी थाप मारायची नव्हती,तुमच्या दृष्टीने नेमकी ती पडली म्हणून ० हे मला तरी कळले नाही.असो. प्रतिसादाबद्दल अनेक आभार.
स्वाक्षरीतून खुलासा होईल,असे वाटते.बघा,पुन्हा विचार करा.
(तबलजी)बेसनलाडू

कोलबेर's picture

13 Jul 2008 - 11:15 am | कोलबेर

मल्हाराची थाप ही तबल्यावरचीच थाप वाटली होती स्वाक्षरीतुन निव्वळ एक शाब्दिक कोटी करण्याचा (अयशस्वी?) प्रयत्न केला होता. 'मल्हार' हा एक पावसाचा राग आहे तबल्याचा ताल नाही अशी कल्पना असल्याने 'मल्हाराची थाप' कल्पना खटकली होती. (० मार्क ही श्री. सर्किट ह्यांची कल्पना)
-(प्रामाणिक) कोलबेर
अवांतर :
स्वगतः ' अप्रकट' आस्वादकांचे देखिल 'प्रकट' आभार मानावे लागतात का? ;)

बेसनलाडू's picture

13 Jul 2008 - 11:38 am | बेसनलाडू

मल्हार पावसाचा राग आणि त्याने आभाळरूपी तबल्यावर मारलेली थाप अशी काहीशी ती कल्पना होती.आता कविता लिहितेवेळी, तबल्यावर तालाबरहुकूम थाप आधी आणि मग रागाचे उमटणे की आधी राग उमटणे (सूर आणि सूरक्रम हे रागाचे मूळ) आणि मग त्याने दिलेली तबल्यावरची थाप (उमट(व)लेला ताल व त्याची जोड) हा शास्त्रीय (अ?)विचार किंवा अगदी ताल आणि राग यांच्याविषयीचा पूर्ण शास्त्रीय अविचार यांपैकी एक किंवा दोन्ही कारणांमुळे एकूण खटकाखटकी झाली असावी,असा अंदाज आहे.कविता लिहिताना जिवंत असलेल्या भावनांच्या अंमलाखाली मी तरी स्वतःचे अशास्त्रीय डोके त्याच्या शास्त्रीय काउन्टरपार्टवर अधिराज्य गाजवण्यास पूर्ण मोकाट सोडतो.
(सुस्पष्ट)बेसनलाडू
अवांतर - आभार मानणे हे सौजन्य.अप्रकटांचे प्रकट आभार ही मिपावरीलच इतर काही कवी,विडंबनकारांकडून (कॉपीराइट्स नसल्याचा फायदा घेऊन) ढापलेली परंपरा.
(ढापुचंद)बेसनलाडू

बेसनलाडू's picture

13 Jul 2008 - 11:08 am | बेसनलाडू

सर्व प्रकट व अप्रकट आस्वादकांचे मनःपूर्वक आभार.
(आभारी)बेसनलाडू

सत्यजित...'s picture

22 Jul 2017 - 1:37 am | सत्यजित...

कविताही खासंच!

जेनी...'s picture

22 Jul 2017 - 6:01 am | जेनी...

मस्त एकदम ... खोडसळ ;)