परतीच्या वाटेवर
परतीच्या वाटेवर - २
परतीच्या वाटेवर - ३
परतीच्या वाटेवर " भाग - ४
राजसच्या घरातली सकाळ आज नेहमीप्रमाणे प्रसन्न नव्हती
काही तरी विचित्र अन एका प्रकारच्या काळजीन सगळ्यांना घेरल होत .कुणी कुणाशी बोलत नव्हत .
सगळेच कसे निश्चल ,काळजीत बुडालेले ,धास्तावलेले !
राजसच्या आईने करून आणलेला चहा गार होऊन त्याच्यावर मलईचा पापूद्रा तयार झाला होता
आई : अहो मी काय म्हणते आपण तेजुच्या आई बाबांना बोलावून घ्यायचं का ? मला तरी हा प्रकार मानसिक नसून वेगळीच शंका येते आहे हो मला भयानक प्रकार वाटतो हा काहीतरी .
बाबा : काही नको उगाच घाबरून जातील ते ,अन तसही अजून डॉकने काहीच सांगितलं नाहीये ,त्यांचा सल्ला घेऊया आधी ,मग ठरवू काय ते ,अन वेगळ्या शंका कुशंका काढत बसू नको राजसकडे बघ कसा हरवल्यासार्खा बसलाय एकटा कालपासून ! एक शब्दहि बोलला नाहीये तो कुणाशी .
आई : त्याची काळजी आहे म्हणूनच बोलतेय मी, राजसच्या जीवावर बेतला होता प्रसंग ,मी एकटीन काय केल असत ? तो तिवारी धावून आला नसता तर काय झाले असते आज ? हा विचार करून धस्स होतंय मला अजुन !
बाबा : हे बघ तू जास्त टेन्शन घेऊ नकोस तुझा बी पी हाय झाला होता रात्री तू आराम कर बघू .
राजसच्या मानेवर ,गालावर खोलवर ओरबाडल्याच्या जखमा होत्या
“ हे बघ ह्या लिक़्विड ने थोडी आग होईल “म्हणत कापसावर लिक़्विड ओतून डॉक राजसच्या गाल्यावारल्या जखमा स्वच्छ करत होते .राजसची पापणी सुद्धा हलली नाही . तो खिन्न डोळ्यांनी खिडकीबाहेर एकटक पाहत होता
नीरमूढ झालेला होता .त्याच्या डोळ्यातील चमक ,ओठावरचे हास्य केव्हाच लोप पावले होते
त्याचा निस्तेज खालावलेला जखमांनी भरलेला चेहरा पाहून आईला गलबलून आल ती उठून किचनमध्ये गेली.
डॉक : राजस माझे एक डॉ मित्र आहे पाठक सुप्रसिध्द psychologist !
, आपण आज त्याला भेटणार आहोत .सॉरी तुला या अवस्थेत बाहेर घेऊन जातोय पण तूच सविस्तर माहिती देऊ शकशील
डॉक काय बोलत होते त्याकडे राजसचे लक्ष नव्हत त्याच्या डोक्यात्त असंख्य विचारांचं कोलाहल माजल होत
कालच्या घटनेमुळे तो आयुष्यात कधीही इतका अस्वस्थ अन हतबल झालेला नव्हता.
बाबा : " पण डॉक्क तेजुला नक्की झालय तरी काय ? कालची तिची अवस्था अन जो काही प्रकार घडला त्याची काहीही लिंक लागत नाही मला
डॉक्क : " हे बघा तेच फाईंड करायचं आहे आपल्याला , कि इतक हायपर कशामुळे झाली त्याच !
बाबा : तेच तर काळात नाहीये मला तेजुसार्खी इतकी सालस मुलगी ,राजसची अवस्था बघा डॉक्क , कसा हरवून बसलाय तो , त्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल त्यावेळी !
डॉक्क राजसच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले हे बघ राजस , मला वाटत तेजुला काहीतरी मानसिक त्रास असावा त्यामुळे कदाचित ती अशी वागली असेल माझे एक डॉ मित्र आहेत आपण त्यांना भेटूया तेच सविस्तर मार्गदर्शन करतील ,मग आपण त्यानुसार ट्रीटमेंटच बघुयात तू तयार हो निघुयात आपण लगेच !
राजस : डॉक तेजूला काय झालाय ? ती बरी होईल न ? मला काळजी वाटते तिची
डॉक : हे बघ मी तिला झोपेच इंजेक्शन दिलाय त्यामुळे ती ५-६ तास तरी आराम करेल अन तिचा डोक्यावरचा स्ट्रेस कमी होईल .अन हो प्लीज पण ती उठल्यावर तिला रात्री घडलेल्या प्रकाराबद्दल काही विचारू नका ओके तिला थोड relax होऊ देत ,मग बघूया . ओके !
बरोबर ११ वाजता डॉक राजसला घेऊन डॉ पाठकच्या हॉस्पिटल मध्ये पोहचले
चेह्र्र्यावरील जखमा दिसू नयेत म्हणू राजसने रुमालाने चेहरा बांधून घेतला होता
दोघेही त्यांच्या केबिन मध्ये येऊन बसले तेव्हढ्यात मागचा दरवाजा उघडत डॉ पाठक केबिन मध्ये Enter झाले
" ओह डॉ बोरा, सॉरी यार राउन्ड चालू होता थोडा उशीरच झाला .
डॉक : ओह फरगेट यार ! मी ओळख करून देतो हा राजस मी बोललो होतो ना ज्या केसबद्दल ?
डॉ पाठक : ओह येस ,येस आय सी , alright ओके राजस ,कसा आहेस तू ? अरे तु रुमाल सोड ना ,कॉफी घे ,
बी relax ! ओके !
राजसने चेहर्यावरच रूमला सोडला त्याचा चेहरा बघून डॉ पाठकचा हातातला कॉफीचा मग निसटता निसटता वाचला " ओह माय माय, अरे बाप रे ! इतक्या भयानक जखमा?
I JUST CANT IMAGIN , मामला सिरीयस आहे बोरा
डॉक : हो ना यार म्हणून तर मी तातडीने घेऊन आलो याला ह्या अवस्थेत .
सगळ नॉर्मल असताना अस का घडल ? हेच न सुटणार कोड आहे
अरे मी शेजारी आहे याचा ! मुलासारखा आहे हा माझ्या , नेहमीच येन - जान आहे माझ यांच्याकडे
अन तेजू इतकी गोड अन समजूतदार मुलगी आहे कि मलासुध्दा विश्वास ठेवायाल कठीण गेल
डॉ पाठक : ओके राजस तू फोनवर म्हणाला होतास कि तुमचा भांडण दूर, कधी किरकोळ वाद हि झाला नाहीये तुमच्यात ! किती दिवस झालेत लग्नाला? अरेंज मॅरेज आहे कि लव्ह मॅरेज ?
राजस : येत्या १६ ला ३ महिने पूर्ण होतील
डॉ पाठक : ओह i see म्हणजे " newly married" आहात तर !
असो .बर हे लग्न तिच्या होकाराने ,मर्जीने झाल होत का ? म्हणजे आय मीन तिच्यावर कुणी दबाव वैगेरे तर नाही न आणला या लग्नासाठी ?तुला माहितेय न आपली इंडिअन TENDNCY
राजस : मान्य डॉक, कि आमच लग्न घाई घाईत झालाय पण लग्नापूर्वी आम्ही फोनवर बोलत होतो तीन चार वेळा भेटलो हि होतो तेव्हा हाच प्रश्न मी तेजुला बर्याच वेळा विचारला होता डॉक ,अन हे हि सांगितलं होत कि पूर्ण विचार अंती निर्णय घे ,घाई करू नकोस
तेव्हा तीच म्हणाली होती कि "राजस हा निर्णय पूर्ण विचारांती घेतला आहे कुणीही दबाव आणलेला नाहीये स्वत चा निर्णय आहे हा माझा एकतर्फी नाहीये, मला तुम्ही आवडला आहात मनापासून !"
तिचा होकार कळल्यावरच लग्नाच डिसिजन फायनल झाला होता लग्न झाल्यानानातर हि सगळ व्यवस्थित चालू होत डॉक कधी साधा किरकोळ वादही झाला नाही आमच्यात अजूनपर्यंत अन मला कधी अस जाणवलं नाही कि ती या निर्णयामुळे दुखी आहे ते .
डॉक : तुझ्या आई बाबांशी कशी वागते ती ?रिलेशन कस आहे त्यांच ?
राजस : अगदी मुलीप्रमाणे डॉक फार काळजी घेते ती त्यांची , खर सांगू कधी कधी मला स्वत: ला लाज वाटते इतकी !
डॉक पाठक : ओके ओके रीलॅकस !
म्हणजे तुझ्या बोलण्यावरून हे क्लीअर झालाय कि तुम्हा दोघांच्या मॅरीड लाईफ मध्ये काहीही स्ट्रेस नाहीये
ओके ,डॉक बोरा आपण तेजुशी कधी बोलू शकतो ? त्यानुसार आपल्याला ट्रीट्मेन्टच बघावं लागेल न ?
डॉक : आज तिला पूर्ण आराम करू देत मग उद्या जमेल . हो ना राजस ?
राजस : काय झाल नक्की ? डॉ मला सांगा न प्लीज .
डॉक पाठक : कस आहे राजस ! प्रेम , दडपण ,भीती ,राग ,नैराश्य ह्या सर्व भावना म्हणजे मानवी स्वभावाच्या विविध पैलू असतात त्यानुसार एखाद्या व्यक्तीची प्रवृत्ती बदलत राहते म्हणजे घटनेनुसार व्यक्तीचे स्वभाव देखील बदलतात म्हणूनच मानवी स्वभाव हा स्थायी नसतो बदलत राहतो
तू म्हणतोस कि तुमच लाईफ अगदी सुरळीत आहे तर मग तिच्या पूर्व आयुष्याशी निगडीत काही बाबींचा / घटनाचा ,आपल्याला अभ्यास करावा लागेल
काही वेळा एखादी भावना एखादी एखादी पूर्व घटना ,अपघात जी तिच्या आयुष्यावर दीर्घकाळ प्रभावी ठरलेली असेल अथवा काहीतरी आकस्मिक बदला मुळे देखिला अस होऊ शकत .
कुठलीही एखादी भावना जेव्हा मेंदूवर हावी होते, मेंदूचा ताबा घेता तेव्हा अशा घटना ,अपघात घडत्तात याला एक प्रकारची मानसिक अवस्था अथवा आजार म्हणूयात आपण , पण तेजुला भेटल्याशिवाय आपण कुठल्याही निष्कर्षावर सध्या तरी पोहचू शकत नाही.
ओके ! बर काल काय झाल ते सविस्तर अन निसंकोच सांग अगदी पर्सनल असेल तरीही ओके !
राजस : आई बाबांशी बर्याच वेळ गप्पा मारून मग आम्ही दोघे झोपायला गेलो माझ ओफिसाच काम चालू होत तेव्हाच तेजू झोपून गेली होती . मला हि झोप लागली, उठलो ते आईने दार वाजवल्यामुळे ,तीन दाखवलं कि तेजू लॉन मध्ये बसलेली आहे ते
डॉक मला एक कळत नाही तेजू अंधाराला फार घाबरते रात्रीच बाहेर जायला टाळते ,अति होईल पण ती पाण्याची बॉटल
उशाशी घेऊन झोपते, एकटीला किचनमध्य जायला लागू नये म्हणून !
अन काल रात्री ती लॉन मध्ये एकटी ,आय मीन किती विरोधाभास आहे हा डॉक ?
तिला अस पाहून माझे हातपाय गळाले होते अहो खाली पोहोचेपर्यंत किति वाईट विचार आले माझ्या मनात !
बेंचवर तेजू गुडघ्यामध्ये तोंड लपवून रडत होती ,हा प्रकार माझ्या कल्पना शक्तीच्या बाहेर होता
तिच्या अश्या बेजबादार वागण्याचा राग तर फार आला होता मला ,पण मी आवरत घेत तिच्या दोन्ही खाद्याला धरून तिला उठवले अन विचारले
काय झाल तेजू इतक्या रात्री तू एकटी ? अन रडते का आहे ? बर नाहीये का तुला ? मला तरी उठवायचस मी आलो असतो तुझ्याबरोबर, एकटी का आलिस?
माझा प्रश्न संपायच्या आत ती मला बिलगली अन " म्हणाली " राजस मला तुम्हाला सोडून कुठेही जायचे नाही ,माझे खूप प्रेम आहे तुमच्यावर किती निरागस अन शांत वाटत होती ती
अन दुसर्या क्षणी तिने दोन्ही हाताने माझा गळा आवळला .तिची पकड इतकी मजबूत होती डॉक कि माझा श्वास अडकला होता तिची ती टोकदार नख माझ्या गळ्यात खोलवर रुतत होती ती जोरजोरात किंचाळत होती. तिचा आवाज , तो भयानक आवाज तिची ती पकड ,तीच ओरबाडण तिचा तो क्रुर आक्रमक चेहरा !
मी नाही विसरू शकत डॉक !
माझी अवस्था मी नाही सांगू शकणार मी तुम्हाला शब्दात !
तिवारी ने तिला पकडून देखील ती सारखी उसळून धावून येत होती दात विचकत होती जोरजोरात किंचाळत होती "
एकच वाक्य बडबडत होती " राजस मी तुला सोडणार नाही तू तेजुला का हिरावून आणलस माझ्यापासून “?असे म्हणतच ती खाली कोसळली भयंकर थकल्यासारखी अन अशक्त ,तरीही बडबडत होती "राजस मला तुम्हाला सोडून जायचे नाही "प्लीज मला वाचवा "
"
" डॉक प्लीज तेजुला बर करा , माझ खूप प्रेम आहे तिच्यावर, मी नाही जगू शकणार तिच्याशिवाय ,प्लीज डॉक तिला बाहेर काढा यातून काहीही करा पण तिला वाचवा, डॉ प्लीज प्लीज प्लीज !
अस बोलून राजसने कालपासून दाटलेल्या भरलेल्या डोळ्यांना वाट करून दिली
६ फुट उंचीला शोभेल अशीच देहयष्टी असलेला राजस अगदी लहान निरागस मुलासारखा ओंजळीत तोंड लपवुन रडू लागला .
क्रमश :
प्रतिक्रिया
29 Sep 2011 - 12:16 pm | सविता००१
मस्त लिहिते आहेस. आता पुढचे भाग पटापट येउदे गं...............
29 Sep 2011 - 12:24 pm | आत्मशून्य
नेहमीप्रमाणे पहीलं निदान हेच केलं जाणार, आणि नंतर हे त्यापल्याडचं काम आहे असं सांगणारं व निस्तरणारं कोणी तरी अवतरणार ;) आता स्किझोफ्रेनीया आहे म्हणनारे डॉक्टर लोक्स काय मूर्ख अस्त्यात काय की तेंचं निदान चूकत्यालं ? फैशनच आलीय राओ विज्ञानवाद्यांना अशा कथांमधून दगड ठरवायची... आपला अंमळ णिषेध. ;)
29 Sep 2011 - 12:42 pm | वपाडाव
आशुशी तंतोतंत सहमत.........
29 Sep 2011 - 1:59 pm | माझीही शॅम्पेन
पियशा कथा छान पकड घेत आहे ! पु ले श.
29 Sep 2011 - 2:22 pm | स्मिता.
हा ही भाग छान झालाय. आता पुढे काय हे वाचण्याकरता उत्सुकता ताणली गेली आहे.
पुढचे भाग पटापट टाक... लिंक तुटायला होतं.
29 Sep 2011 - 2:24 pm | गणेशा
मस्त लिहित आहात ...
पुढिल लिखानास शुभेच्छा !
29 Sep 2011 - 2:45 pm | मन१
तुम्ही लिहिलेले डॉ पाठक हे Psychiatrist असतील हो; psychologist नाही.
बहुतांश psychologist हे डॉक्टर नसतात. डॉ म्हणता येत नाही. ते वैद्यकीय उपचार करू शकत नाहित.
वैद्यकीय उपचार (औषध-गोळ्या देणे, शॉ़क ट्रीटमेंट देणे) psychiatrist करतात. आणि उपचारासाठी सहसा आधी ह्यांच्याकडे जायला हवे/ लोक जातात. काही जण psychologist व psychiatrist एकाच वेळी असतात.
आता मूळ लेखाबद्दलः-
लेख ओघवता आहेच.व्यवस्थित लिहिलाय. ज्या मार्गावरुन कथा पुढे जाते आहे त्यावरुन काही आडाखे बांधलेत ; बघुया पुढे काय घडते ते.
नक्क्की किती "बराच" वेळ गेला हे समजायला तुम्ही लिहिलेलं हे वाक्य
>> राजसच्या आईने करून आणलेला चहा गार होऊन त्याच्यावर मलईचा पापूद्रा तयार झाला होता
अगदि चपखल बसतं.चित्रदर्शी म्हणा हवं तर.
नीरमूढ हा शब्द आवडला. कुठे वाचला म्हणायचा आपण? स्वतःच बनवला असेल तर अधिकच कौतुक वाटतं.
29 Sep 2011 - 2:42 pm | किसन शिंदे
हम्म, चांगला झालाय हाही भाग.
पुढच्या भागाची थोडीशी हिंट मिळतेय...
29 Sep 2011 - 6:08 pm | रेवती
वाचतिये.
29 Sep 2011 - 7:05 pm | ५० फक्त
लेखन छानच आहे शंकाच नाही त्याबद्दल,
पण शंका आहे बरीच अवांतर -
डॉ.पाठक, जर केबिन मध्ये ईंटर झाले होते तर डॉक्टर कुठं झाले असावेत, बहुधा किचन मध्येच. आणि ईंटर करुन डॉक्टरी केलीय म्हणजे बराच जुना काळ आहे कथेचा, आता सगळे भाग पुन्हा नव्या संदर्भाने वाचावे लागतील मला. ती गाडी, ते रेल्वे स्टेशन तो लकडी पुल, बापरे. असो.
पण एक सांगतो, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अश्या प्रकारच्या वागण्याचा अनुभव आहे, त्यामुळं आत कुठंतरी जुन्या वहीची पानं उलटली जात आहेत.
30 Sep 2011 - 9:37 am | प्रचेतस
+१ टू ५०, हीच शंका मनी आली होती.
राजसबरोबर डॉक्क सुद्धा हरवून बसलेला दिसतोय.
अरे बापरे, डॉ. पाठकांना एकाच वेळी राजस, तेजू आणि डॉक्कवर उपचार करावे लागणार की काय?
30 Sep 2011 - 10:25 am | पियुशा
@ ५० फक्त
धन्स चुक दुरुस्त केली आहे :)
29 Sep 2011 - 7:41 pm | इंटरनेटस्नेही
.
30 Sep 2011 - 9:37 am | चिप्लुन्कर
वाचतो आहे ... छान लिहिता तुम्ही लवकर लवकर टंका पुढचे भाग ...
चिपळूणकर
30 Sep 2011 - 11:34 am | नन्दादीप
पु.ले.शु.
लवकर लवकर टाक ग पुढचे भाग.
30 Sep 2011 - 2:48 pm | प्रभाकर पेठकर
चारही भाग आज एकत्र वाचले. छान लिहीले आहे. कथानायिकेचा जो कोणी, आत्महत्या केलेला, प्रियकर असेल त्याला आता उजेडात आणावे.
1 Oct 2011 - 2:40 pm | दीप्स
खुप छान लिहिली आहे काथा पण खुप वाट नको बघायला लावुस. लवकर येउदे ग.