परतीच्या वाटेवर
परतीच्या वाटेवर - २
परतीच्या वाटेवर - ३
परतीच्या वाटेवर - ४
परतीच्या वाटेवर - ५
परतीच्या वाटेवर - ६
परतीच्या वाटेवर... भाग-७
हॉलमध्ये राजस ,आई ,बाबा ,बसलेले होते सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचली होती ,तेजुच्या अस वागण्यामागचा खुलासा ऐकण्यासाठी सर्वांचे प्राण कानाशी आले होते .
तेजुच्या आईने एक दीर्घ उसासा टाकला अन ती बोलू लागली .
*****************************
तेजू एकुलत एक अपत्य आमच !!लहानपणापासून बडबडा स्वभाव ,दगडाला हि बोलायला लावेल असा ,पण समजूतदार अन प्रेमळ !तेजुच्या बाबांच्या सतत बदल्या व्हायच्या , पण यावेळी तीच कोलेज पूर्ण होईपर्यंत आम्ही इथेच राहणार अस तिघांचही एकमत झाल होत .त्यामुळे मी अन तेजू याच शहरात राहिलो ,तिचे बाबा महिन्यातून १- २ यायचे ,भेटायला ,सर्व रुटीन व्यवस्थित चालू झालेलं ,हा परिसर शांत होता शहराच्या वर्दळीपासून जरा दूर ...म्हणून निवांत वाटायचं .
साधारण ३-४ वर्षामागे आमच्या घराशेजारी एक वृद्ध महिला एका तरुण मुलीबरोबर राहायला आली होती , आमच्या घरासमोरच असलेल छोटेखानी घर त्यांनी भाड्याने घेतलं होत ,रोज सकाळी तेजूची लगबग असायाची कोलेजला जाण्यसाठी , तिचा टिफिन बनवता बनवता माझ लक्ष समोरच्या घराकड नेहमी जायचं ,तेजुला ओट्यावर बसून घाई घाई नाश्ता करायची सवय होती , आमच्या माय लेकींच्या गप्पा चालायच्या ,तेव्हडीच शिदोरी मला दिवसभर पुरायची ,कारण तेजू कॉलेजला गेली कि मला घर खायला उठायचं ,मग मी स्वत: ला कामात गुंतवून घ्यायचे ती येईपर्यंत !
घरातली सगळी कामे आटपून मी बागेत येऊन बसायचे तिथूनही माझ लक्ष का कोण जाणे समोरच्या घराकडे जायचं ,घर नेहमी बंद बंद असायचं ,कधी कधी ग्यालरीत त्या वृद्ध आज्जी बसलेल्या दिसायच्या,त्याचा तो अवतार मला थोडा भयानक वाटायचं , त्यांचे अस्ताव्यस्त पांढरे कुरळे केस , त्यांचा चेहरा झाकून टाकायचे कधी कधी ती तरुण मुलगी त्यांचे अस्ताव्यस्त केस तेल लावून सावरून द्यायची ,दोघी गप्पा मारायच्या ,हसायच्या ,पण मी बघतेय हे लक्षात आल कि लगेच उठून घरात निघून जायच्या ,दरवाजा बंद करून घ्यायच्या अस दोनदा तीनदा झाल .मला थोड अपराध्यासारख वाटल , पण माझी काय चूक होती ,जाऊ देत ! मी बागेत बसनच बंद करून टाकल .
मला त्यांच वागण खटकायचं , पण कुतूहल कायम असायचं ह्या अश्या का वागतात ? बाहेरच्या जगाशी संबंध तोडून टाकल्यासारखा !
एकदा मी अन तेजू अशीच संध्याकाळी बागेत बसलो होतो गप्पा मारत , तितक्यात ती मुलगी अतिशय वेगाने घराबाहेर बाहेर पळत गेली .गेट लावून घेण्याच हि तिच्या लक्षात आल नाही ,मी अन तेजू एकमेकींकड बघत बसलो हा काय प्रकार आहे?
तेजू : आई काही प्रोब्लेम तर नसेल ना ग ? घाबरल्यासारखी वाटत होती .
आई : हो ग ,पण कस कळणार ? माझी तर आत जायची हिम्मत होत नाहीये ,मग विचारणार कस ? तेव्हढ्यात ती मुलगी लगबगीने पुन्हा घरात शिरली अन धाडकन दरवाजा लावून घेतला
गेटसमोर उभ्या असलेल्या आम्हा दोघींकडे तिने पूर्ण दुर्लक्ष केलेलं जाणवलं मला. !
" जाऊ देत ,आपल्यालाच का एव्हढा पुळका ? त्याच ते बघून घेतील आपल्याला काय ? अस म्हणत तेजुने मला अक्षरश: ओढत घरात आणले .
जेवण झाली ,सगळ आटपून मी टी व्ही ऑन केला रात्रीचे दहा - साडेदहा वाजले असतील तेव्हढ्यात कुणीतरी घाई घाईने गेट खोल्ल्याचा आवाज आला ,मी जरा घाबरलेच, नाही म्हटलं तरी हि कॉलनी थोडी आउट सायीडला होती , अन तस नवीन असल्यामुळे कुणाशी असा सलोखा हि नव्हता. त्यामुळे साहजिकच थोडी भीती वाटली .रिक्षा गेटसमोर थांबली ती मुलगी घाईघाईत खाली उतरली रिक्षावाल्याच्या मदतीने तिने त्या वृद्ध बाईला घरात नेले त्याचे पैसे देऊन तिने लगेच दरवाजा बंद केला
तेजू हे सर्व खिडकीतून पाहता पाहता म्हणाली " आई ही समोरची फॅमिली थोडी विचित्र नाही का वाटत ,कधी येतात कधी जातात ? काही थांगपत्ता लागून देत नाहीत ,
हेच ,हेच,म्हणतेय मी तुला किती दिवसापासून .अन आहेत तरी किती घर ?
३-४ ते हि किती लांब लांब ! हेच अगदी गेटसमोर आहे राहून राहून लक्ष जातच ना ?अन काल रात्री तर इतके भयंकर हुंकारण्याचे आवाज येत होते त्या घरातून ,वाटलं तुला उठवाव पण तुझ सकाळच कोलेज म्हणून नाही उठवल मला तर झोपच नाही आली रात्रभर !मला वाटत त्या आज्जीनच काहीतरी त्रास होत असावा
पण विचारणार कस ?बर ते आपल्याशी काय इतर शेजार्याचीही बोलत नाही तेजू : आई फार काळजी करतेस तू जाऊ दे झोप बघू म्हणत तेजूने हातात धरलेला पडदा सोडून मागे वळणार तोच समोरच दार पुन्हा उघडल,
तीच मुलगी घाइघाइत गेटजवळ आली पण गेट न उघडताच पुन्हा परत गेली. दोनेक मिनिटांनी परत बाहेर आली यावेळी तीन गेट उघडल अन रस्त्याच्या मधोमध येऊन आमच्या घराकडे टाचा उंचावून पाहू लागली ,शेवटी निर्धार पक्का केल्यावर तिने गेट खोलून दारावरची बेल वाजवली
मी गोंधळले होते पण तेजुने लगेच दरवाजा उघडला
समोर ती मुलगी उभी होती काळजीने घेरलेली संकोचलेली वाटत होती
"दीदी, मी प्रिया ,सामने वाले घरमे रेहती हु ,मुझे हेल्प करेंगी प्लीज ?"
तेजू तत्परतेने पुढे होऊन म्हणाली
" कैसी मदत बोलो न बोलो ,जरूर करूंगी , क्या हुवा ?
मी तेजुला डोळ्यानेच ( थांब ) खुणावत पुढे आले
“. हा ...क्या केह रही थी तुम ? क्या हुवा ?”
"आंटी मेरी दादी बहोत तकलीफ मे हे ,उन्हे क्लिनिक लेके गयी थी अभी पर......"
शायद हॉस्पीटलाईज्ड करना पडे ,मी किसीको जाणती नही यहा ,क्या आप मेरी मदत करेंगे ?
तिचा तो काळजीग्रस्त चेहरा बघून नाही म्हणन फार अवघड वाटत होत अन मदत करायला जाव तर तिथेही ढीग भर शंका - कुशकानी घेरल होत .काय कराव मला तर कळेनास झालेलं !
तेजू : आई ,इतका कसला विचार करतीयेस ?पाहू तरी आधी काय कंडीशन आहे ते ? अग पण ..अग पण... करता करता तेजू त्या अनोळखी मुलीबरोबर रस्ता ओलांडून गेलीसुद्धा !
तिच्या मागे जाणे भागच होते कसाबसा दरवाजा बाहेरून लावून मी ही घाइघाइत त्या घरात घुसले .
घुसल्या घुसल्या घरामध्य अतिशय कुजट वास आला नाकाला पदर लावून मीही दोघींच्या मागे आतल्या खोलीत घुसले तीची आजी अत्यवस्थ वाटत होती बहुतेक श्वास घ्यायला त्रास होत असावा तिचे डोळे पांढरे अन खोल गेलेले होते .ती मुलगी दादीची पाठ चोळत होती .
" तेजू दोन मिनिट थांबली अन लगेच म्हणाली " आई तुम्ही दोघी ह्यांना घेऊन दारात या मी काही मदत मिळते का ते बघते तेजू पळतच बाहेर आली मला त्या घरात भयंकर अस्वस्थ वाटत होते " मदत करण्यापेक्षा " आलिया भोगासी हाच विचार तरळून गेला मनात “
“
दोनच मिनिटात दारात एक थ्री सीटर उभी राहिली रिक्षावाल्याच्या मदतीने दादिला रिक्षात बसवले
दादी वेदनेने विव्हळत होती
" भैय्या सिटी हॉस्पिटल जल्दी “
त्या दादिपेक्षा मला तेजुच्या काळजीन घेरलेल, मी हि बसले रिक्षात !
गेल्या गेल्या त्यांना अॅडमीट करून घेतलं ,
दादी पाय घसरून पडल्यामुळे खुब्याला दुखापत झाली होती डॉक्टरांनी खुलासा केला
*****************
ती मुलगी शून्यात एकटक बघत बसली होती मख्ख चेहऱ्याने
तेजू तिला दिलासा देत होती " सब ठीक हो जायेगा
डॉक्टरांनी " पेशंटचे नातेवाईक आपणच का ? विचारले
मी हो... नाहि.. करत असताना प्रिया उठून समोर आली
मी आहे ,मला सांगा माझ्याव्यतिरिक्त कुणीही नाहि.
तिने सर्व प्रोसिजर पूर्ण केल्या
१७-१८ वर्षाच्या प्रियाने डॉक्टरांनाहि अवाक करून सोडलं होत .
******************************8
दादीला ८-१० दिवसानन्तर डिसचार्ज मिळाला कमरेला एक बेल्ट अन हातात व्हीलच्या काठी सोबत !
प्रियाने हे सर्व इतक व्यवस्थित हातळल होत कि मला अन तेजुला तीच फार कौतुक वाटायला लागल.
मी तर कधी कधी तेजुला लटका टोमणाही मारायचे " प्रिया बघ केव्हडूशी आहे तरी किती व्यवथित करते सगळ ,अन आमच्या महाराणीला सगळ आयत द्यावं लागत हातात ,मग तेजू गाल फुगवून बसायची ,मला तीच हसू यायचं !
तिच्या दादीला घरी आणल्यावर आम्हा मायलेकीन त्तीने एका संध्याकाळी घरी बोलावले होते
प्रियाची दादी बिछान्यावर पडून होती ,तिचे डोळे अगदी निस्तेज भेसूर होते तेजू तिच्या जवळ जाऊन बसली ,तशी दादीने तेजूचा हात दोन्ही हातानी गच्च धरला तिच्या चेहर्यावर स्मित उमटले ,तिला काहीतरी बोलावेसे वाटत होते पण ,प्रिया मध्येच तिला गप्प बसवत म्हणाली " दादी जल्दी इमोशनल हो जाती है "
मला दादीच्या डोळ्यातली अगतिकता , असहायता ,स्पष्ट दिसत होती
तसाही मी आज ठाम निर्णय घेऊन आलेच होते की काही झाल तरी मला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे मी आज प्रियाकडून घेणार !
" प्रिया तुम्ही दोघीच असता इथे ,बाकीचे म्हणजे आई बाबा तुझे परगावी असत्तात का ?
प्रिया मक्ख बसली होती .बराच वेळ काहीच उत्तर देईना ,मला जरा अवघडल्यासारख वाटलं ,ती भयान शान्तता नकोशी वाटत होती मग मीच म्हणाले " मैने तुमको ...............
" आंटी , उगीच मला लाजवू नका प्लीज !
किती मदत केलीय तुम्ही माझी “
माझ्या भुवया उंचावलेल्या पाहून “मला छान मराठी बोलता येत आंटी म्हणत प्रियाला पहिल्यांदाच हसताना बघितलं आम्ही दोघींनी “
प्रिया बोलू लागली इतके दिवस मनात साठवून ठेवलेल्या वेदनांना तिने मोकळी वाट करून दिली तिची हकीकत मनाला सुन्न करून गेली
,४-५ महिन्यापूर्वी तलरेजा दाम्पत्य हत्याकांड फार गाजल होत , ,पेपर मध्ये " प्रॉपरटीच्या वादावरून भावाने केला सख्या भावाचा खून !”अशा आशयाची मोठी बातमी पेपरला छापुन आली होती , तलरेजा हत्याकांडबद्दल रोज र्वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध झाल्या ,
नव ते जून होणारच या उक्ती प्रमाणे या घटनेवरही पडदा पडला होता .पण मागे राहिली होती प्रिया अन तिची दादी ! तलरेजा दाम्पत्याची प्रिया हि एकुलती एक मुलगी आई बापच छत्र हरपलेल ,काका जेलमध्ये ,बाकीचे नातेवाईक पोलिसांचे लफडे नको म्हणून परागंदा झालेले , अशा अवस्थेत प्रियाला रोज कुणीतरी फोन करून केस मागे घेण्यासाठी धमकावत होते ,अन हि मागे राहिलेली प्रॉपरटी गिळायला बरेच कावळे टपले होते ,
वयोवृद्ध दादी शरीराने तर थकली होती , ,पण मनाने खचली नव्हती ,तिला प्रियासाठी जगायचे होते
, कोवळ्या प्रियाकडे बघून रोज देवाकड एक एक श्वास मागत होती .
अचानक उपटलेले नातेवाईक , सतत मिळणाऱ्या धमक्या , पोलिसांचा ससेमिरा , काही वासनांध लोकांच्या लबलबनाऱ्या नजरा , हे सर्व प्रियाला नकोस झाल होत . आपण स्वत: ला देखील कायमचे संपवून यातून मुक्त व्हावे असे तिला नेहमी वाटत होते पण म्हातार्या दादिकडे बघून तिने हा विचार सोडून आल्या परिस्थितीला सामोर जायचं निर्णय घेतला ,म्हणून तिने तो बंगला भाड्याने दिला आणी आजीला घेऊन एकटी दूर शहराबाहेर इथे रहयाला आली या कामी तिच्या पप्पांच्या एका जिवाभावाच्या मित्रांनी तीची खूप मदत केली
कुणाला थांगपत्ता लागेल म्हणून प्रिया काळजी घेत होती , आता दादीचा
तरी सहवास लाभू दे !
सारखा एका भीतीदायक सावटाखाली जगण किती क्लेशकारक असता हे प्रियाच्या ओघळत्या डोळ्यातून जाणवत होत .दादीला कुणी काही करेल ? किंवा तिला काय झाल तर आपण कायमचे पोरके होऊ या भीतीमुळे प्रियाने कोलेज अर्धवट सोडलं होत .ती सतत दादिबरोबर राहायची ती अन तिची दादी हेच दोघींचं विश्व !
कुणी आपल्याला पाहिलं , आपला पत्ता कळेल या भीतीमुळे ती घराची दार, खिडक्या सतत बंद ठेवायची
कुणालाही घरात येऊ देत नव्हती ,कुणाशीही ओळख वाढू देत नव्हती .
प्रिया सांगत होती.....
तेजुला अन मला गहिवरून आल " तिची परिस्थिती तीच ,दुख ,भावना शब्दात व्यक्त करण्यापलीकडल्या होत्या
मला तर राहून राहून स्वत: ची लाज वाटत होती ,आपली अर्धी हयात गेली पण आजही आपण किती छोट्या छोट्या गोष्टीनी डळमळून जातो , त्रागा करतो ,नशिबाला ,दैवाला दोष देत राहतो आततायीपणा करतो ,
अन हि प्रिया
त्या क्षणी मी अन तेजुने ठरवले प्रियाच्या पाठीशी उभे राहायचे ,तीच डोंगरा एव्हढ दुख : आपण हलक नाही करू शकत पण , पण तिला आधार देऊ तर नक्कीच शकतो
तेव्हापासून प्रिया आमच्या आयुष्याच एक अविभाज्य घटक बनली .तेजुच्या बाबांनीही तिला तेजू इतकच प्रेम दिल तिला अन तिच्या दादीला आम्ही आमच्या घरात आणल ,
“तू दादीची काही काळजी करू नकोस ,तुझ शिक्षण पूर्ण कर आम्ही आहोत त्यांची काळजी घ्यायला "
तेजुच्या बाबांचं हे आश्वासक वाक्यामुळे प्रिया पुन्हा कॉलेजला जाऊ लागली .
दादीच्या चेहर्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता मला तर आमची फ्यामिली पूर्ण झाल्यासारखी वाटत होती
दोघी कॉलेजलागेल्यावर मी दादिशी खूप गप्पा मारायचे ,आता मला घर खायला उठत नव्हत , एकट - एकट वाटत नव्हत .प्रिया अन तेजू तर एक जीव कि प्राण झाल्या होत्या
कधी -कधी रात्री गच्चीत गप्पा मारत बसायच्या इतक्या कि न अभ्यासच भान ,ना खाण्यापिण्याच ,
मी नेहमी रागवायचे " अग काय हे ,तुझ्या तोंडात तीळ देखील भिजायचा नाही तेजू , किती बडबड बडबड , किती गप्पा मारणार?
प्रिया अन तेजू साठी काय करू अन काय नको असा होऊन जायचं एक मळभ दूर झाल होत ,
एक दिवस असाच दुपारी निवांत गप्पा मारत बसलो होतो तोच घरातला फोन खणखणला
मी : ह्यालो .कोण बोलतंय ?
पलीकडे एक इसम बोलत होता " हा चौधरीचा नंबर आहे का ?
मी : हो चौधरी चाच नंबर आहे बोला काय काम आहे ?
समोरचा इसमथोडा काचरर्ल्यासारखा झाला
अंम.... मला मी , mr. चौधरीशी बोलता येईल का ?असतील तर देता का प्लीज ?
मी ( वैतागून ) आपण कोण ? अन ते नाहीयेत सध्या बाहेरगावी आहेत ? तुम्ही मला सांगा मी निरोप देईन त्यांना
तेजश्री चौधरी आपली मुलगी का ?
तेजूच नाव एकूण माझे हातपाय लटपटायला लागले होते ,धडधड अचानक वाढली
" तुमच्या मुलीचा इथे बायपास हायवेवर अक्सिडेन्ट झाला आहे आम्ही त्यांना क्रिपलानी नर्सिंग होम मध्ये घेऊन जात आहोत तुम्ही प्लीज त्वरित या एका दमात सर्व सांगून फोन बंद झाला .
मला तर भोवळ आल्यासारखे झाले पण तेजू ,काय झाल असेल तेजुला ? नको त्या वाईट शंकांनी माझे हातपाय गळाले, मखकन खाली बसले ,लटपटत्या हाताने कशीबशी पर्स उचलली
अन दरवाजा उघडला
" क्या हुवा ? अरे क्या हुवा? हे दादीचे शब्द पाठमोरे एकले होते फक्त !
***********************************************************************************************
तेजुच्या अन प्रियाच्या काळजीन जीव अर्धमेला,बैचेन झाला होता ,सारखी देवाला हात जोडत होते " देवा रक्षा कर मुलींची रस्त्यातच तेजुच्या बाबांना फोन केला ,ते त्वरित निघाले
कशीबशी हॉस्पिटलला पोहचले बरीच गर्दी जमा झाली होती
**************************************
तेजू बेशुद्ध होती ,भयंकर लागल होत तिला ,सगळ्या हाताला पायाला पट्ट्या बांधलेल्या,चादर रकताने माखलेल्या होत्या लेकीला अस बघण्याची दुर्दैवी वेळ माझ्या आयुष्यात आली होती
डॉक्टरांनी केबिन मध्ये बोलावले
" हे बघा ,तिला सिरीयस इंजुरीज आहेत , पण ती कव्हर होईल हळूहळू "dont worry"
बट आय एम व्हेरी सॉरी दुसरी मुलगी वाचू शकली नाही
इतका वेळ तेजुशिवाय मला कुणीच दिसत नव्हत ,लक्ख्कन डोक्यात प्रकाश पडला अरे आज तेजू अन प्रिया बरोबरच निघाल्या होत्या ,माझ्या स्वार्थीपणाची लाज वाटली मला !
*********************************
प्रियाला पाहण्याचं धाडस माझ्यात उरल नव्हत तेजुच्या बाबांनी मला सावरत रूम मध्ये नेल
समोर एक गाठोड होत , प्रियाच गाठोड .पोस्त मार्टेम करून कापूस भरून गच्च बांधून ठेवलेलं
दुखणे परिसीमा गाठली होती " प्रत्यक्षदर्शी जे हॉस्पिटल मध्ये आले होते ते हळहळत होते
आमच सांत्वन करीत होते
" अहो चाकच गेल होत पोटावरून
कोवळा जीव फार तडफडला , ह्याच हाताने उचलून आणल मी तिला " आयुष्य एव्हडेच म्हणायचे तिचे
"आले देवाजीच्या मना,कुणाचे काही चालेना "
***********
दादीला काय सांगू ? सारखा सारखा दादीचा चेहरा आठवत होता
प्रियाला अम्बुलन्स मध्ये घरी आणले आजूबाजूचे लोक जमा झाले मी तर कुठल्याही मनस्थितीत नव्हते
तेजुच्या बाबांनी दादिला आधार देत बाहेर आणेलेल दादीच्या डोळ्यात भयंकर भीती दाटून आली होती
प्रियाच शेवटच दर्शन घेण्याच भाग्य हि आम्हाला कुणाला लाभल नाही
सर्व विधी तेजुच्या बाबांनी पार पाडले
*************************************************
दुसर्या दिवशी तेजू शुद्धीवर आली मीच बसले होते एकटी आय सी यु मध्ये
तेजू वाचली आहे सुखरूप आहे म्हणून देवाचे आभार माणू कि कोवळ्या प्रियाचा असा दुर्दैवी अंत झाला म्हणून देवाला शिव्या घालू ?
तेजू " आई ,तू रडतेस कशाला हे बघ मी ओके आहे ?' हा पण अंग फार जड झालाय ग ,ठनकतय हात हि वळवता येत नाही
" इंजेक्शनला घाबरणार्या तेजुला ठिकठिकाणी स्टिचेस होते ब्यान्डे़ज होते ,एका हाताला प्लास्टर होते तरी ती माझ सांत्वन करीत होती
" आई प्रिया कुठेय दिसली नाही मला सकाळपासून बोलाव न तिला ?
तेजुच वाक्य ऐकून मला हुंदका अनावर झाला "आता तुला काय सांगू ..................
अग तू काय सांगतेस मला माहितेय सगळ ,तुम्ही दोघ फार काळजी करता ना माझी ?
मला प्रियाने सांगितलं सगळ
मी : “प्रियाने: ?
हो.. हो.., प्रियाने काल रात्री माझ्या उशाजवळ माझ्या केसावर हात फिरवत बराच वेळ बसून होती
मला म्हणाली काळजी करू नकोस ,अन घाबरुही नकोस , तेव्हा मी तिला म्हटलेलं " अग मला फार बोर वाटतंय इथे ,कधी घरी जाइन अस वाटतंय ,इथला वास मला सहन होत नाही
तू मला भेटायला येण्यापेक्षा माझ्याजवळच रहा ना प्लीज ,
“,मी तुला भेटायला येत जाईल रोज “, अस प्रॉमिस केलेय प्रियाने !
मला त्या क्षणी वाटल कि तेजुला काही माहिती नाही त्यामुळे ती बडबडतेय
एकदा असच रात्री झोपलेलं असताना मला तोच हुंकाराच ,रडण्याचा भेसूर आवाज आला
मी दचकले ,उठून बसले ,तेजू नव्हती तेजू कुठेच नव्हती ,
शंका म्हणून गच्चीत पाहायला गेले तेजू बसलेली होती कठड्यावर
हसत होती गप्पा मारत होती नेहमी जशी मारायची तशी ...............
तेजुच्या आईच हे वाक्य संपतंय न संपतंय
तस राजसच्या आईला हुडहुडी भरून आली
तेजुच्या आईच बोलन मध्येच खुंटल...
राजसच्या आईला तांबोळी बाबांचे शब्द आठवू लागले
राजसने आईच्या खांद्यावर शॉल टाकली ................
****************************************************
देवघरातल्या मुर्त्या काळपट पडल्या होत्या , जळमट लागली होती
एक वार्याची थंडगार झुळूक आली ,खिडकीचे पडदे हलले ,
तेजुच्या उशाजवळचे पुस्तक धपकन खाली पडले
कुणीतरी रुममध्ये आल्याचा राजसला भास झाला , झोपेत असलेल्या तेजूच्या चेहर्यावर हसू उमटले
अन राजसच्या अंगावर शीर शिरी आली ........................
क्रमश :
( अजुन एक भाग मग सम्पवतेय कथा :) )
प्रतिक्रिया
17 Nov 2011 - 3:08 pm | परिकथेतील राजकुमार
शिर्षक वाचतानाच जीभ लुळावल्याने, आता डोळ्यांचे काय होणार ह्या भितीने पुढील वाचन केले नाही ;)
17 Nov 2011 - 3:08 pm | जाई.
लवकर येउ देत पुढचा भाग
17 Nov 2011 - 4:39 pm | धनुअमिता
हा ही भाग उत्तम. पुढचा भाग लवकर येउ देत.
17 Nov 2011 - 4:48 pm | प्रास
भरपूर टंकलेखन झालंय की या भागात..... हरकत नाही, कथानक वेगाने सरकतंय.
छान छान!
पुलेप्र
:-)
17 Nov 2011 - 5:20 pm | किचेन
पुढे काय होणार?
भीती वाटतीये!
17 Nov 2011 - 5:34 pm | आत्मशून्य
संकल्पना तो मस्त है ही ही लेकीन लिखाण भी शूध्द लग रहा है.
17 Nov 2011 - 7:27 pm | रेवती
चांगली चाललिये कथा!
पुढील लेखनास शुभेच्छा.
17 Nov 2011 - 8:35 pm | मोहनराव
येउदे पुढचा भाग!! वाचतोय!!
17 Nov 2011 - 9:04 pm | स्मिता.
हा भागही छान झालाय आणि मोठा असल्याने समाधानही झालं.
18 Nov 2011 - 9:38 am | प्रचेतस
मस्त लिहिले आहेस.
शेवटचा भाग येउ दे आता लवकर.
18 Nov 2011 - 11:15 am | प्रकाश१११
छानच लिहिता. उत्तम भाषाशैली.
पु.ले.शु.
20 Nov 2011 - 1:31 pm | प्रभाकर पेठकर
भितीदायक तरीही उत्कंठावर्धक आहे कथानक. वाचण्यासाठी अंगी धाडस हवे. अभिनंदन.
कथेच्या पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
20 Nov 2011 - 4:20 pm | ५० फक्त
मस्त लिहिलं आहेस, मजा आली वाचायला.
इथं अशा अजुन थोड्या भयकथा झाल्या ना की डरना मना है चा दुसरा पार्ट काढता येईल आपल्याला.
1 Dec 2011 - 11:22 pm | शित्रेउमेश
पुढच्या भागाची वाट बघतोय...
शेवट काय होईल?? तेजू बरी होईल?? प्रिया तिला सोडेल???
3 Dec 2011 - 8:47 am | प्रकाश१११
छान चाललीय मालिका. मस्त.भाषेला छान लय आहेच.
पु..भा. शु.