परतीच्या वाटेवर .......( अंतिम )

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
15 Dec 2011 - 1:44 pm

परतीच्या वाटेवर
परतीच्या वाटेवर " भाग - २
परतीच्या वाटेवर " भाग - ३
परतीच्या वाटेवर " भाग - ४
परतीच्या वाटेवर " भाग - ५
परतीच्या वाटेवर " भाग - ६
परतीच्या वाटेवर .......( अंतिम )

दिवसामागून दिवस चालले होते डॉक पाठकच्या इतक्या सेटिंग्ज होऊनही तेजुच्या वागण्यात यत्किंचितही बदल झालेला नव्हता, उलट ती आता जास्त हायपर झाली होती ,त्यामुळे राजस सोडला तर कुणाचीही तिच्या रुममध्ये देखील जाण्याची हिम्मत होत नव्हती
डॉक. पाठकच्या आजवरच्या कारकिर्दीत त्यांना अस अपयश क्वचित पाहायला मिळाल होत , तेजुच्या केसमध्ये आपण अजून निष्कर्षावर का पोहचत नाहीये ? हे कोड सोडवण्यासाठी त्यांनी पुन्हा सर्व केसचा तपशीलवार अन जोरदार स्टडी चालू केला होता ,त्यांचेही प्रयत्न चालूच होते.

सर्व कुटुंब या परिस्थितीमुळे खचून गेले होते ,शेजारी - पाजारी त्यात भर घालायला होतेच ,,कुणी म्हणे भूतबाधा अशी बरी होत नाही एखाद्याला घेऊनच जाते,कुणी मेंटल असायलमचा पर्याय सांगितला ,कुणी तर अगदी डीव्होर्स घेण्याचाही ,या गोष्टींचा सर्व कुटुंबावर परिणाम होत होता त्यातल्या त्यात राजसचे तर विचारायला नको
तेजुला सावरता सावरता तो स्वत: ला विसरून गेला होता ,एक हसत-खेळत कुटुंब नाहक एक वनवास भोगत होत

शेवटी सगळ्यांनी राजसची समजूत घातल्या नंतर तांबोळी बाबांना तेजुसाठी एकदा इथे आणण्याचे ठरले शेवटचा उपाय म्हणून
अतिशय नास्तिक असणारा राजस हे सर्व फक्त तेजू बरी व्हावी म्हणून तयार झाला होता
पुढाकार तेजूच्या आईने घेतला ,कारण तेजूला आधी या त्रासातून सोडवणारे एक गुरुजीच होते ,त्याना हि सर्व परिस्थिती माहित असल्या कारणाने डॉक याला काहीच करू शकणार नाही याची खात्रीही होती त्यांना !
गुरुवारचा दिवस ठरला ,तिवारींनी तांबोळी बाबांना तशी कल्पना देऊ केली होती आधीच !
**************************************************
राजसने गाडी एका झाडाखाली लावली तिवारी अन राजस टेकडी चढू लागले , सर्व मोकळ रान असल्यामुळे भर दिवसाही ती टेकडी भयान वाटत होती ,आजूबाजूला घोंगवत्या वाऱ्याचा आवाज , झाडाची सळसळ हलणारी पाने , वाळलेले गवत ,रणरणत उन , बकाल टेकडी एकदम मनुष्य नाही तर नाही चिटपाखरू देखील नाही ,अचानक राजस चालता चालता एका सपाट जागी थबकला , निरखून पाहिलं तर त्या जागेचा बराच मोठा भाग लालसर काळपट रंगाचा वाटत होता ,त्या मातीला एक प्रकारची उग्र दुर्गंधी होती
राजस : " ये क्या हे तिवारी ?
तिवारी : " कुच्छ नाही साब , बकरे का खून हे वो ,इनके उरूस मे बहोत बकरे काटे थे इधर !
राजसच्या अंगावर काटा आला , त्याला मळ- मळल्यासारख वाटल .
आई आपल्यासाठी अन तेजुसाठी कुठे कुठे भटकत होती या विचाराने त्याला कससच झाल .
दोघे आता टेकडी चढू लागले ,राजसला चांगलीच धाप लागली होती
तिवारी " साब आप बैठो , मे बाबा को बुलाके लता हु
राजस " हम्म ok पर जल्दी !
दोनेक मिनिटातच तिवारी तांबोळी बाबाबरोबर परतला राजसने बाबनाकडे नजर फिरवली कपाळावर
आठ्या जमा झाल्या , एक उसासा सोडला " हा बाबा काय करणारे आणिक "?
अस मनातल्या मनात म्हणत नकारार्थी मान डोलावली
" बेटा मेरे करनेसे कुछ नही होगा ,जो भी करेगा वो हि करेगा ,तुम बस भरोसा रखो "
राजस चमकला .
आता तिघे गाडीत बसले
शहराजवळ आल्यावर बाबा " बेटा कुछ चीजो कि जरुरत होगी और ! थोडी मेरे पास ही थोडी मार्केट से लेंगे
ठीक हे , म्हणत राजस ने गाडी एका अरुंद बोळीकडे वळवली ,वान पसार्यावाल्यांची ,खण , नारळ ,सुपार्या हळकुंड ,खारीक खोबरे ,गुलाल , उदबत्त्या , पान ,बिबवे ,बुक्का ,हळद कुंकू अन अजून काय काय विकत होते लोक
बाजार ओसंडून वाहत होता नुसता ,बोळ गर्दीने तुडुंब भरली होती.
राजसने गाडी अलीकडे पार्क करून ,गाडीत बसण्याला प्रीफरंस दिला
त्या चिवटश्या बोळीतला कलकलाट, गर्दी ,गोंधळ ,
या सर्व गोष्टीनी राजसला गुदमरायला झाले होते ,डोके ठाण ठाण करत होते
राजस " तिवारी अब क्या क्या लेना ही चलो ना जल्दी " जरा रागातच ओरडूनच विचारले ,
तिवारी ने मागे वळून बघितले सुद्धा नाही
"आयला ह्या तिवारीच्या " म्हणत राजसने गाडीचा दरवाजा खोलण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा लॉक्ड !
गाडीच्या काचा राजसने आधीच बंद करून घेतल्या होत्या बाहेरचा गोंगाट आत येऊ नये म्हणून ,त्या ही उघडण्याचा प्रयत्न निष्फळ झाला होता राजसने गाडीत ओणव होऊन मागचे दोन दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला पण काही साध्य झाल नाही आता मात्र राजसला नक्कीच काहीतरी गडबड आहे याची खात्री पटली होती . कारचे दरवाजे तर लॉक्ड झालेच होते , साईड विंडोवही लॉक झालेल्या होत्या .कसली तरी अनामिक भीती दाटून आली ,दरवाजा खोलण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले होते राहून राहून त्याला तेजुच्या आईच बोलन आठवत होत ,गाडीतला ए. सी. चालू असतानाही राजसला दरदरून घाम फुटला होता एक प्रकाराची दुर्गंधी त्याला जाणवली ,अवतीभवती कुणाच तरी अस्तित्व असल्याचा त्याला भास झाला ,असह्य दुर्गंधीने दम कोंडत होता राजस बधीर झाला होता , छातीवर दडपण आल्यासारखं वाटत होत ,भूत खेतांच्या कल्पनांना फाट्यावर मारणारा राजस अक्षरश : घामाने डबडबला होता काय कराव त्याला काही सुचेना तेव्हढ्यात तिवारीने कारचा मागचा दरवाजा
खोलून बाबाला गाडीत बसायला सांगितले
" ओह गॉड , राजसने सुटकेचा निश्वास टाकला.
राजसकडे विचार झालेल्या प्रकाराबद्दल विचार करायला देखील वेळ नव्हता
" आपलीच ही अवस्था आहे तर तेजुच काय होत असेल ? तेजू किती दिवसापासून हे सहन करत आहे या विचाराने राजस तळमळला ,आता त्याला फक्त लवकरात लवकरा घरी पोहोचायचं होत बस्स...

राजासने कार स्टार्ट केली
**************************************

तेजूचा रूमचा दरवाजा बाहेरून बंद केलेला होता .सकाळपासून तेजू नुसत भेसूर रडत होती ,ओरडत होती .
आजच वातावरनही अगदी नेभळंटच होत ,ढगाळ ,अतिशय निरुस्त्साही !
घरात पाउल ठेवल्या ठेवल्या बाबा काहीतरी कुजबुजले .तांबोळी बाबांनी घर भर फिरून कानोसा घेतला फक्त तेजुची रूम सोडून !तेजुच्या रूमला बाहेरून कडी घातलेली होती , सकाळपासून भेसूर ,अन अभद्र हुंकारत रडणाऱ्या तेजुच रडण थांबलेलं होत एक भयान शांतता पसरली होती घरभर !
राजसची आई अन तेजुची आई प्रचंड स्तिमित अन भयभीत झाल्या होत्या , तेजुचे बाबा प्रवासातच होते यायला पहाट होणार होती .
तिवारी : “ बाबाजी बैठीये ना “
डोळ्यानेच नाही खुणावत बाबांनी चौफेर नजर फिरवली
सर्वजन स्तब्ध उभे होते बाबांनी सगळ्याकडे पाहिले राजसच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले,
" बच्चे देखो में कोशिश करनेमें कसर तो नही छोडनेवाला पर कुछ हालात ऐसे पैदा हो जायेंगे कि तुम्हारा भरोसा डगमगा सकता है एक बार सोचलो आप सब ,बीच में ना रोक पायेंगे !
राजस : मतलब ? कैसे हालात ?
बाबा : देखो बेटा , रूह रूह होती है ,वो भली भी हो सकती है और बुरी भी किसी को भी तकलीफ पोहचा सकती हे ,इसको हमे बस में नहि करना बस आजाद कर देना हे,
तुम्हारी मा ने और तिवारी ने मुझे बच्ची के हालत का खुलासा कर दिया हे, गौरसे सोच लो एकबार

तेजुसाठी सर्व जन वाट्टेल ते करायला वाट्टेल तो धोका पत्करायला तयार होते
*****************************************************
रात्रीचा पहिला प्रहर सुरु झाला होता
बाबांनी हॉलच्या मधोमध काजळीने एक मोठे रिंगण तयार केले
रिंगणंभोवती बाबांनी तीन दिशेला तीन तेलाचे दिवे लावले , मधोमध एक लोबान (धूप ) पेटवले
त्याच्या मंद सुगंध हॉलमध्ये पसरला , पिशवीतल्या वस्तू काढून व्यवस्थित जगाच्या जागी मांडून ठेवल्या ,सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर बाबांनी हॉलमधले लाईट बंद करायला सांगितले ,तिवारीने ते तत्परतेने बंद केले
बाबांनी राजसला तेजुला बोलवायला सांगितल ,पण बाबांनी राजसला आत जाण्यास मनाई केली ,बाहेरूनच आवाज द्यायला सांगितला
राजसने तेजुला बाहेरूनच आवाज दिला " तेजू बाहेर ये ग जरा दोन मिनिट "
एक नाही दोन नाही , पाचेक मिनिट झाली ,
राजसने पुन्हा आवाज दिला तेजू ,प्लीज दोन मिनिट फक्त ,माझ ऐकणार नाही का तेजू ? आतून काहीच रिस्पोंस न मिळाल्यामुळे राजस रूमकडे जायला वळणार तोच ,बाबांनी त्याला हातानेच थांबवले , शांत राहायला सांगितले
बाबा त्याला काही तरी दाखवू इच्छित होते .
सर्वांच लक्ष दाराकडे लागून राहील , एक सावली हॉलच्या दिशेने सरकत होती , हळूहळू ,सर्वाचे लक्ष त्या सावलीकडे होत , हळूहळू त्या जागी दोन सावल्या दिसायला लागल्या ,सर्वजन हे विस्फारलेल्या डोळ्यांनी बघत होते ,
“ओह माय माय “अशक्य ! राजसचा स्वत : च्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.
राजस जे काही बघत होता ते अनाकलनीय होते
तेजू तेजू दरवाजात येऊन थबकली सर्वाकडे मलूल नजरेने पाहिलं ,
तेजुचे विस्कटलेले केस , रडून रडून सुजलेले,खोल गेलेले डोळे ,
अंगाने कृश झालेली ,वर्ण बर्यापैकी सावळा झालेला , ,तिच्या डोळ्यातील अगतिकता
, तिची झालेली अवस्था पाहून तेजुच्या आईला गलबलून आल लेकीसाठी जीव तुटत होता , राजसच्या आईची परिस्थितीहि काही वेगळी नव्हती दोघीही देवाचा मनोमन धावा करत होत्या " देवा ह्या वनवासातून सोडव तेजुला "
सकाळपासून रडणाऱ्या ,ओरडणार्या तेजुला इतक एकदम शांत अन निरागस झालेलं पाहून सर्वांना
आश्चर्याचा धक्का बसला होता ,
एखाद्या निरागस आज्ञा धारक बालकाप्रमाणे तेजू रिंगणात येऊन बसली

बाबांनी तेजुकडे पाहिले
" मेरे तरफ देखो बच्चे " तेजू थंडी वाजत असल्याप्रमाणे शरीराच मुटकुळ करून खाली मान घालून बसलेली ,तिच्या मोकळ्या केसांनी तिचा चेहरा झाकून गेलेला होता ,बाबा बोलतच होते काही मंत्र पुटपुटत होते , तिच्या आजूबाजूला कसल्याश्या वनस्पती ,जाळ्या- मुळ्या ठेवलेल्या होत्या ,
बाबांनी डोळे मिटून घेतले कुठली भाषा होती ते बाबांनाच माहिती !

त्या मिणमिणत्या उजेडात , ,बाबांची दाढी ,रूप, रंगोटी एकूणच त्या उजेडात भयानच वाटत होत तेजूची सावली भिंतीवर पडली होती ,ती हळूहळू मोठी होते आहे असा भास होत होता , .सगळ्याचा मनोमन देवाचा धावा चालू होता दार खिडक्या गच्च लावून घेतलेल्या होत्या वातावरण एकदम शांत अन थंड होत .
जसजसे बाबांचा आवाज वाढू लागला तशी तशी तेजू काहीतरी अस्पष्ट अस कुजबुजू लागली ,,
तिवारी एक पाउल मागे सरकला , ,बाबांनी मात्र बोलता - बोलता बाटलीतल पाणी तेजुवर शिंपडल , तशी तेजू विजेचा झटका लागल्यासारखी जागच्या जागी हलली , पण तिने मान वर केली नाही , बाबांचे मंत्र पठण चालू होते , घड्याळात बाराचे टोल पडले बाबांनी मंत्र मोठ्मोठाने बोलायला सुरुवात केली , तशी तेजू जागच्या जागी हळू लागली घड्याळ्याच्या दोलकाप्रमाणे !
बाबांचे मंत्रोच्चार चालूच होते तेजूची आई स्तब्ध उभी होती पण काळजीने चेहरा मलूल पडला होता ,मात्र राजासच्या आईला हा सर्व नवीन प्रकार होता त्या भांबवल्यासारख्या चाललेल्या प्रकाराकडे एकटक बघत होत्या
बाबांनी पेटवलेल्या लोबानवर एक वस्तू भारावली अन तेजुच्या दिशेने फेकली
फेकली,तशी तेजू चरफडली अन जोरात किंचाळली , अन कुणाला कळायच्या आत एक क्षणात तिने
बाबांचा गळा दोन्ही हाताने गच्च आवळला
सगळेजण धावले पण बाबांनी हातानेच सगळ्यांना "थांबा "अशी खूण केली
तेजुच्या तोंडातून आता विचित्र अन भयानक आवाज येऊ लागले एखाद्या श्वापदाप्रमाणे हुंकाराण्याचे आवाज !
बाबा सर्व शक्तीनिशी स्वताला सोडवत होते , तेजू इतकी हिंसक होईल याची कुणाला कल्पना देखील नव्हती
तिवारीचे तर विचारायला नको तो भीतीने गलीतात्र झाला होता ,हातपाय लटपटत होते ,कापर भरल्यासारखे
बाबांनी तिवारीला जायला सांगितले
सर्वजण चपापलेले होते , कुणाला काय कराव तेच समजत
राजसने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आईला , अन सासूला किचनमध्ये बळेबळे कोंडून घेतले .
राजसचे बाबा चिडून " होपलेस हा काय प्रकार आहे ? तरी मी सांगत होतो ,राजस असा मुर्खासारखा काय बघत उभा आहेस तो बाबा मरायचा ? आधी सोडव त्याला म्हणत राजसचे बाबा तेजुकडे धावले तेजुने त्यांना एक हातानेच इतका जोरात ढकललेल कि ते कोलमडुन पड्ले ,तिच्या शक्तीपुढे सर्व हतबल होते .
राजसने कसबस बाबांना सावरल

बाबा " बच्चे देखो , कोई तुम्हारा कोई बुरा नही चाहता , कोई तुम्हे परेशान नही देखना चाहता अपनेआप को तकलीफ मत दो देखो तुम्हारी वजह से कितने लोग परेशान हे ,तेजूची नख बाबाच्या गळ्यात रुतत चालली होती , बाबांचा गळ्याभोवतीचा पांढर्या रुमालाचा हळूहळू लाल रुमाल होऊ लागला .
सर्वजण इतके गर्भ गळीत झाले होते की काय करावे कुणालाच सुचत नव्हते
तांबोळी बाबा तेजूचा प्रतिकार ,वेदना चेहर्यावर स्पष्ट दिसत होत्या ,तरीही बाबाचा जप चालूच होता ,एव्हाना तेजू रिंगणातून बाहेर आलेली होती तिने बाबाना ढकलत ढकलत भिंतीवर आदळले , " अरे अल्ला मदत “ ! अस्फुट शब्द निघाले बाबांच्या तोंडातून !
बाबा कोसळले , तेजू जोरजोरात हसू लागली ,अगदी भयान ,सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला , तेजू हळूहळू राजसकडे सरकू लागली ,
राजसची आई आक्रोश करू लागली ,बाहेर काय चाललाय ह्या काळजीने , दोघींचीही जीवाची घालमेल झाली ,आतून दारावर जोरजोरात थापा पडत राहिल्या ,आक्रोश घुमत राहिला
तेजूने राजसकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला ,नजरेत नुसते निखारे धगधगत होते , हॉलमध्ये फक्त राजस अन त्याचे बाबा तेजुचा सामना करणार होते.
त्यात एकाएकी हॉलची एक खिडकी धाड धाड करत उघडली दिवे विझले
सगळीकडे अंधारच अंधार डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका दाट अंधार
त्यात फक्त ते दोन डोळे चमकत होते , ती आकृती राजसकडे सरकत होती ,
पण हे काय ?त्याला गच्च खिळल्यासारखे सारखे झाले ,न पुढे हलता येईना न मागे ,अगदी जायबंदी झाल्याप्रमाणे ! पापण्या जडावू लागल्या आपल्याला नक्की काय होत आहे हे राजसला समजेनास झाल , जीभ जड झाली घसा कोरडा पडला
कदाचित हि आपली शेवटची रात्र !
सकाळचा सूर्य बहुधा माझ्या नशिबी नसेल असे त्याला राहून राहून वाटत होते
पण काहीहि झाले तरी त्याला ह्या संकाटातून तेजुला सोडवायचच होत ,राजसाला आज स्वत: च्या जीवाची पर्वा नव्हती , जे होईल ते होईल .
तेजू राजसच्या एकदम समोर उभी होती , त्याच्याकडे न्याहाळून बघत होती , राजसच्या कपाळावर घामाचे सूक्ष्म दव जमा झाले होते घामाची एक थंड धार पाठीवरून खाली सरकली राजसने श्वास रोखून धरला होता , राजस तेजुच्या बकाल नजरेचा सामना करत होता ,तेजुचे उष्ण श्वास राजसला जाणवत होते , तेजू राजसकडे रोखून पहात होती , तिचे हात हळूहळू राजसला स्पर्श करत होते ,तिने राजसला दोन्ही हातानी घट्ट मिठीत आवळले इतके घट्ट कि राजसचा दम कोंडला , " मी एकटी नाही जाणार राजस प्रियाकडे तुम्हाला सोडून , तुम्हाला पण याव लागेल माझ्याबरोबर , “तुम्ही येणार न माझ्याबरोबर ?”म्हणत तिने पाश घट्ट आवळले ,
राजसचे बाबा ओरडले ", तू असा मख्खासारखा का उभा आहेस राजस ? plij do somthing "
राजस इतकेच पुटपुटला " मी यायला तयार आहे " राजसने एक दीर्घ श्वास घेतला
अन डोळे अगतिकपणे मिटून घेतले ,वातावरण सुन्न झाले ,सर्व काही जागच्या जागी थबकल्यासारख !
अन दुसर्या क्षणाला राजस खाली कोसळला
तेजू एका झटक्यासरशी बाजूला जाऊन कोसळली ,
अन पुन्हा तांबोळी बाबांकडे झेपावली ,बाबा प्रहार करतच होते,हातातलं पाणी तेजुवर शिंपडत होते , जोरजोरात मंत्र बोलत होते , तेजू असह्य वेदनांनी विव्हळत होती ,किंचाळत होती , प्रतिकार करत होती
बाबांचा मंत्राचा अन हातातील भारावलेल्या उदीचा ,वस्तूंचा एकसारखा मारा चालूच होता
हळूहळू किंचाळणे कमी झाले,तेजू शक्तिहीन झाली ,थकली होती ,धापा टाकत होती ,हात जोडत होती
" प्रिया मी नाही येणार , मला जगायचं ! मला राजसबरोबर जगायचं , आहे ,मला राजससाठी जगायचं आहे “ plij मला मुक्त कर !

अन दुसर्या क्षणाला अचानक एका सावलीपासून दुसरी सावली विभक्त झाली

राजसच प्रेम जिंकल होत .

बाबा क्षणभर थांबले " देखो बेटा , जो नही मिला वो तेरी किस्मत थी , अब जो हालत हे वो तुम्हारी खुद कि वजह से , अपने आप को मत जकडे रखो इस दुनिया से , ,दायरे अलग हे ,सिर्फ तकलीफ ही मिलेगी तुम्हे भी और इन सबको भी ,समझता हु कैसा दौंर हे ,मुश्कील हे ,पर इस दुनियासे वास्ता तोड के अपनी दुनिया मे सलामत और खुश रहो " अल्ला ताला तुम्हे जन्नत नवाजे बच्चे "
अन बाबाने डोळे मिटले भिंतीवर पडलेली एक सावली धुरासारखी विरघळून ,अनंतात विलीन झाली कायमची !
सगळ्याच्या आयुष्यातला एक कठीण काळ संपला होता , एक आक्रंदन थांबले होते कायमचे !

एकीकडे नवी पहाट होती , अन तेजू राजसच्या कुशीत निवांत विसावेली होती ...........

समाप्त :)

वाङ्मयलेख

प्रतिक्रिया

मन१'s picture

15 Dec 2011 - 2:13 pm | मन१

अपेक्षित पण रोचक शेवट.
मालिकेचा वेग व ओघ आवडला.

धनुअमिता's picture

15 Dec 2011 - 2:28 pm | धनुअमिता

+१

सहमत.

विशाखा राऊत's picture

15 Dec 2011 - 3:12 pm | विशाखा राऊत

मस्त पियु. ते प्लिज चे स्पेलिंग पण नवीन आहे

स्मिता.'s picture

15 Dec 2011 - 3:14 pm | स्मिता.

अतिशय वेगात कथा संपवलीस. एकंदरीत भयकथा छानच झाली. सर्व भागांत खिळवून ठेवले होते.

मस्त मस्त मस्त, शेवटी संपलं एकदाचं, बरं झालं, म्हणजे तेजुच्या साठी म्हणतोय मी, नायतर माझं काय खरं नाय.

अवांतर - शुद्धलेखन जरा भावनेच्या भरात डळमलं वाटतं, का ज्ञान विद्यार्थि विद्यार्थिंनिंना वाटुन संपत आलंय. आणि प्लिज तर एकदम भारी. असलं इंग्रजी ऐकुनच भुतं पळुन जायला पाहिजेत.

प्रास's picture

15 Dec 2011 - 3:57 pm | प्रास

अगदी अगदी.

विशेषतः

आजच वातावरनही अगदी नेभळंटच होत

हे वाचून तर मला वाटलं तेजु आणि प्रिया राहू देत, देवानं मलाच मुक्त करावं ;-)

हुश्श
मिळाली त्या भूताला परतीची वाट
पिवशे अंतिम भाग रोचक झालाय

इंटरनेटस्नेही's picture

15 Dec 2011 - 4:01 pm | इंटरनेटस्नेही

संपुर्ण कथा पुन्हा एकदा वाचुन काढली. अतिशय वेगवान व इंटरेस्टिंग कथा.

ह्या काय असा ,माका सामज्ला नाहि.......डळमला म्हंजे काय भाउ.....

रणजित चितळे's picture

15 Dec 2011 - 4:27 pm | रणजित चितळे

सगळे भाग वाचून काढले. खूप छान आली आहे. जन, सर्वजन असे शब्द जरा खटकतात आपण संपादन करावे ही विनंती.

पियुशा's picture

15 Dec 2011 - 4:39 pm | पियुशा

@ रणजीत ,५० फक्त
संपादनाची सोय उपलब्ध नाहिये सध्या, त्यामुळे थोड समजुन घ्या :)
पुढला लेख प्रकाशीत करन्यापुर्वी या सर्व बाबीचा नक्किच विचार केला जाइल
धन्यवाद :)

आत्मशून्य's picture

15 Dec 2011 - 4:47 pm | आत्मशून्य

हे शेवटी लेखिकेला मान्य झालं तर. ;)

पियू खूप छान लिहिलयस ग! आता परत एकदा सगळे भाग एकदम वाचून काढले.

कपिलमुनी's picture

15 Dec 2011 - 5:39 pm | कपिलमुनी

समर्थांची आठवण झाली

किसन शिंदे's picture

15 Dec 2011 - 7:26 pm | किसन शिंदे

लेखनशैली भिन्न आहे एकदम.

सर्व मोकळ रान असल्यामुळे भर दिवसाही ती टेकडी भयान वाटत होती
या कथानकातही टेकडीचा वापर झाल्यामुळे मला स्पावड्याच्या ग्रहणची आठवण झाली. टेकडीच्या ऐवजी घनदाट जंगल किंवा तत्सम ठिकाणाचा उल्लेख असता तर आणखी बर झालं असतं.

५० फक्त's picture

15 Dec 2011 - 9:52 pm | ५० फक्त

'या कथानकातही टेकडीचा वापर झाल्यामुळे मला स्पावड्याच्या ग्रहणची आठवण झाली. टेकडीच्या ऐवजी घनदाट जंगल किंवा तत्सम ठिकाणाचा उल्लेख असता तर आणखी बर झालं असतं.''

का बरं टेकडी का स्पा ची मक्तेदारी आहे का ?

प्रत्येक लेखकाच्या अनुभवविश्व आणि कल्पनाशक्तीच्या प्रत्यक्ष आणि अभिभौतिक प्रगमागम संरचनीय उत्प्रेक्षा अन विजातीय सुदुर संपुर्ण वाड्मयीन सुदृढतेवर अवलंबुन असणारे तेज त्याच्या लेखनातुन प्रकट होत असते आणि अशा प्रकारच्या विश्व्सार्वभौमिक शब्दमाध्यमास असा विरोध करणे या प्रगल्भ समाजाच्या आत्मोन्न्तीच्या मार्गात आडकाठी आणणे आहे.

अवांतर - मा. लेखिकाबाईस, सदर एकाच कथामालिकेत आपल्यावर येथील दोन लेखकांच्या कल्पनांचा सढळ रुपाने वापर केल्याचे दिसुन येत आहे. या बद्दल शुद्ध स्पष्टीकरणाची अपेक्षा करावी काय आम्ही ?

प्रचेतस's picture

15 Dec 2011 - 10:10 pm | प्रचेतस

टेकडी ही श्री स्पा यांची मक्तेदारी कशी काय असू शकते ब्वा.

होय मला हे म्हणायचे आहे, अगदी श्री. स्पा यांनी मिपाचे सदस्यत्व घेताना दिलेल्या नोटराइज्ड अ‍ॅफिडेव्हिट मध्ये किंवा त्यांच्या गावाच्या धाग्यामध्ये त्यांची टेकडी असल्याचा उल्लेख नाही.

मन१'s picture

15 Dec 2011 - 11:16 pm | मन१

प्रत्येक लेखकाच्या अनुभवविश्व आणि कल्पनाशक्तीच्या प्रत्यक्ष आणि अभिभौतिक प्रगमागम संरचनीय उत्प्रेक्षा अन विजातीय सुदुर संपुर्ण वाड्मयीन सुदृढतेवर अवलंबुन असणारे तेज त्याच्या लेखनातुन प्रकट होत असते आणि अशा प्रकारच्या विश्व्सार्वभौमिक शब्दमाध्यमास असा विरोध करणे या प्रगल्भ समाजाच्या आत्मोन्न्तीच्या मार्गात आडकाठी आणणे आहे.

ह्ये मराठित लिहिल्यासारखं वाटलं, वाचायलाही मस्त वाटलं पण अजाब्बात समजलं नै. ;-)

>>>ह्ये मराठित लिहिल्यासारखं वाटलं, वाचायलाही मस्त वाटलं पण अजाब्बात समजलं नै.
अहो त्ये ५० फक्त लेखक ह्यायतच ना?
आता स-मक्षिक- चुकलं चुकलं- समीक्षक व्हायची नेट प्रॅक्टीस करतायत.
समीक्षकांनी असंच बोला-ल्ह्यायचं असतं. तेनं लय भारी पन वाटतं. कुणी स्पष्टीकरण पण विचारत नाही. विचारलंच तर अजून ४ क्लिष्ट वाक्य टाकायची. ;)

शेवट आणि पूर्ण कथाही छान झाली आहे. जरा आणखी रंगवता आली असती..

- (धारपांचा पंखा) पिंगू

रेवती's picture

16 Dec 2011 - 7:29 am | रेवती

अपेक्षित शेवट.

sneharani's picture

16 Dec 2011 - 10:37 am | sneharani

केलीस कथा पुर्ण एकदाची!छान!

प्रभाकर पेठकर's picture

17 Dec 2011 - 11:06 am | प्रभाकर पेठकर

अभिनंदन पियुषा. एक सशक्त लेखन वाचावयास मिळाले. अशाच (भूत-प्रेत सोडून) कथा अजून येऊ देत.

देविदस्खोत's picture

19 Dec 2011 - 10:03 pm | देविदस्खोत

आपली कथा वेगवान होती....... उस्तुकता टिकवून ठेवणारी होती..... आवड्ली... पुढील कथेच्या प्रतिक्षेत.......

स्वातीविशु's picture

20 Dec 2011 - 4:20 pm | स्वातीविशु

लेखन खूपच छान जमले आहे. त्या प्रियाचे काय झाले? तिच्यावर आणखी एक भाग झाला असता......निराशा झाली त्यामुळे.......

शिल्पा ब's picture

21 Dec 2011 - 12:52 am | शिल्पा ब

कथा आवडली. लेखनशैलीपण छान आहे.
पण पियुषाला शुद्धलेखनाचे धडे देताना ५० फक्त स्वताच जरा डळमल्यासारखे झालेत नै का!!