परतीच्या वाटेवर
परतीच्या वाटेवर - २
" परतीच्या वाटेवर ..".भाग - ३
“ अग वेळ थोडाच आहे ,अन त्यात हे सिग्नल्स ,ट्राफिक पार करण्यात किमान अर्धा तास तरी जाणारेय .सव्वा सात इथेच झाले ,बस बघू तेजु पटकन म्हणत राजसने कार स्टार्ट केली मेन रोडवर आल्या नंतर समोरची वर्दळ पाहून राजसने कार रीव्ह्रर्स घेऊन बायपासच्या दिशेने वळविली.
तेजू : अहो राजस इकडून का चाललोय आपण ,बायपास आहे ना हा ?
राजस : हो ,आधीच उशीर झालाय तेजू त्यात हे ट्राफिक ! अन आईबाबा शिणलेले असतील प्रवासात म्हणून, बायपास ने जाउया ,वर्दळ नाहीये लवकर पोहचू.
तेजू : पण... पण ..राजस हा रस्ता निर्मनुष्य , भयाण आहे मला भीती वाटते फार या रस्त्याची ! .
उशीर झाला तरी चालेल आपण मेन रोडनेच जाउया ना , प्लीज !
राजस : अग आईबाबांना वाट पाहत ताटकळत ठेवायचं का स्टेशनवर ?
ते काही नाही उशीर झालाय आधीच, किमान बायपास ने तरी लवकर पोहचू
अन " मी असताना भीती कशाची वाटते ?
तेजू : लकडी पुलाबाद्द्ल बरेच भयानक किस्से एकेलेत मी ! अहो खरच मला भीती वाटतेय.
राजस : " ओ प्लीज.. ओह प्लीज शट अप तेजू ! .. तेजू ,एक लिमिट असते यार , झाल का परत तुझ भूत - पिशाच्च पुराण सुरु ?
“इथे अस आहे ,तिथे तस आहे ,ह्याने अस होत, त्याने तस होत ,”
अंधश्रद्धा नाही , पण शुद्ध बावळपणा म्हणतात याला !
“येऊ देत लकडी पूल तिथेच कार थांबवतो बघूया कोणत भूत भेटते ते ?”
म्हणत राजस हसू लागला .
तेजू : प्लीज तुम्ही मला घाबरवू नका तुमचा विश्वास नसेल पण माझा आहे ना ? लकडी पूल जसा जवळ आला तशी तेजू एकदम शांत झाली ,तिने डोळे गच्च मिटून घेतले .पुल पार करत असताना
राजसला वार्याची एक थंड झुळूक स्पर्शून गेल्यासारख जाणवलं आजूबाजूला इतकी झाडी आहे ,थंड असणारच ना ?
आई बाबा स्टेशनच्या बाहेर येऊन वाट पाहत उभे होते
राजस : सॉरी बाबा ...थोडासा उशीरच झाला.
बाबा : अरे असू दे, असू दे ,कसे आहात तुम्ही दोघ ?
तेजू : एकदम मजेत, अन तुमचा प्रवास कसा झाला बाबा ?
“एकदम मस्त “
चल निघूया...” कधी घरी पोहोचतोय असे झालेय बघ”
आई : हो ना , प्रवासाने शिणून गेलो बाबा. !
हो चला, निघूया म्हणत सगळे कार मध्ये बसले.
आई दमली होती तरी तिला राजसला अन तेजुला काय सांगू अन किती सांगू असे झाले होते
बाबा : महिनाभर मी सहन केली हिची टकळी !
"NOW TI'S YOUR TURN
म्हणाल्या नंतर राजस अन तेजू खळखळून हसले.
गप्पाच्या ओघात घर कधी आले कळलेच नाही
****************************************************
हुश्श.................पोहचलो बाबा एकदाचे घरी !
आई : राजस तुला सांगू का ? बर्याच दिवसांपासून घरापासून दूर राहिले ना , की घराची ओढ लागते रे ,जीव अगदी कासावीस होतो तसच काहीस आम्हा दोघांच झाल होत .
तिथल्या लोकांना एकत्र फिरताना ,जेवताना ,लहान मुलाबरोबर खेळताना पाहिलं
रात्री आपापल्या घरट्यात विसावलेले निवांत जीव पहिले ना ,कि घराची ,कुटुंबाची इतकी प्रकर्षाने आठवण होते ना ,फोनवर खुशाली कळतच होती पण तरीही तुम्हा दोघांना कधी पाहिलं अस झाल होत बघ मला !
अगदी १०० % सहमत ! म्हणत राजसने खांद्यावरची बॅग सांभाळत दरवाजा उघडला .
तेजू : आई , मी आधी सर्वासाठी आल घातलेला चहा आणते. तरतरी येईल ,मग फ्रेश व्हा ओके ! म्हणत ती किचनमध्ये गेली .
बाबा : हो रे , REALLY गरज आहे .
ट्रेनमधला पानचट चहा पिऊन चहाची चवच विसरलोय मी.
" ताझ्झा होले SSSSSS ..........." हे जाहिरातीचे स्लोगन बाबांनी ज्या लयीत, अन हातवारे करत गाऊन दाखवले ते पाहून सर्वांची हसून पुरेवाट झाली होती.
. राजसला खूप आनंदी अन प्रसन्न वाटत होते
सगळे फ्रेश होईपर्यंत तेजुने भरपूर तूप घातलेली गरमागरम मुग डाळीची खिचडी, कोशिंबीर अन पापड भाजून ठेवले होते खास आईबाबांना आवडते म्हणून !जेवायला बसल्यावर सगळ्यांच्या गप्पांना उधान आल होत.
जेवण चालू असताना गप्पा गोष्टी , करता करता खरकटी बोट सुकली, ताट सुकली ,पण गप्पा काही संपत नव्हत्या .
आई " अरे तुम्हाला काय सांगू किती सांगू अस झालय बघ मला, आम्ही दोघांनी किती किती पुरातन मंदिर पहिली ,देवदर्शन अगदी छान झाले , मनसोक्त भटकलो डोंगर ,दर्या ,निसर्ग , तिथलं वातावरण सर्व एकदम शांत ,निरामय ,भक्तीने भारावलेल !
देवाच्या दारात गेल न की ,मनातला कलह . राग ,द्वेष,लोभ ,मत्सर सगळ निवून जात रे ,मन कस हलक हलक होत. त्याच्या सान्निध्यात जग विसरायला होत .हा खरच अद्भुत अनुभव होता.
आईला अचानक काहीतरी आठवलं अन तिने पर्स मधून दोन रुद्राक्षाच्या माळा काढल्या
“अरे हो एक सांगायचं राहील, वैष्णव देवीला गेलो होतो न तिथे एक रात्र मुक्काम केला होता एका आश्रमामध्ये .तिथल्या एका महाराजांनी मला खास बोलावून ह्या दोन रुद्राक्षाच्या माळा दिल्या होत्या मी तुम्हा दोघासाठी घेतल्या तू घालणार नाहीस तू नास्तिक आहे हे माहित असूनदेखील !
पण तेजू तू तर घालशील न ? हे रुद्राक्ष फार दुर्मिळ आहे असे स्थानिक सांगत होते अन ते बाबा कुणी हि माळ मागितली तरी देत नाहीत म्हणे ! त्यांच्या मनाला वाटेल त्यांनाच देतात . आहे की नाही अलभ्य लाभ !
राजस : अग आई तू पण न .. आधी सांग किती पैशांना लांबवले त्या बाबांनी तुला ? दुर्मिळ म्हणे !
श्या ........
ह्या बाबांचं एकच काम असत लोकांना उल्लू बनवायचं ! बाकी काय नाही .
आई : तू गप्प बस , एक पैसा नाही घेतला त्याने .जाऊ देत ,तेजू हे घे, तू तर घालशील न ?
तेजू त्या माळेकडे एकटक बघत राहिली .
अग इतका विचार काय करतेस ? हे घे जवळ ठेव .
गप्पा मारता मारता रात्रीचे दोन कधी वाजले कुणालाच कळले नाही
बाबा : " अग तू महिन्याभराच पुराण आजच सांगणार का?
किती वाजाहेत बघ ,राजसला ऑफिस आहे न सकाळी मग ?जाऊ देत ना त्यांना झोपायला, गुड .... ना ई ट.... सन ...
*********************************************************
" किती छान अन फ्रेश वाटतंय ना आज , आई बाबा आल्यामुळे !
राजसने लॅपटॉप बंद करता करता तेजुला विचारले ,एक नाही दोन नाही म्हणून त्याने मागे वळून पहिले तेजू गाढ झोपलेली होती
झाल....... झोपल्या मॅडम्म , म्हणजे मी मघापासून एकटाच बडबडतोय पोपटासारखा !
राजसने लँप बंद केला तोहि पेंगललेलाच होता पडल्या पडल्या लगेच झोप लागून गेली
दारावर ठप... थप.... थप ...असा आवाज येत होता कुणीतरी राजसला मोठ्मोठाने आवाज देत होत
राजसने डोळे उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण डोळे गच्च !
“छाती दडपून श्वास बंद होतो आहे , कुणी तरी आपल नरड आवळत आहे “
असा भास झाला त्याला ,अन त्याने झटकन डोळे उघडले .
स्वप्न ?
पण दारावर खरोखर थप थप आवाज येतो होता ,दरदरून घाम फुटलेल्या राजसने दरवाजा उघडला
समोर आई होती .आईचा चेहरा भयभीत दिसत होता .
इतक्या रात्री ? " अग काय झाल आई ? बाबाना काही त्रास तर ?
आई : तेजू कुठाय ? कुठाय तेजू ? तुझ काही बिनसलंय का ?
राजस ने मागे पाहिले तेजू नव्हती अग आई कदाचित बाथरूम मध्ये असेल ती पण काय झाल सांगशील ? अन तुझ काही बिनसलंय का अस का विचारलं ?
आईने राजस हात धरला अन त्याला ओढत गॅलरीत नेले
अरे मी पाणी संपल म्हणून किचन मध्ये पाणी घ्यायला आले तर किचनची खिडकी उघडी होती म्हणून लावायला गेले तर हि दिसली एकटी, तेजुच आहे ना ?
अपार्टमेंट खाली असलेल्या लॉनवरील एक कोपर्यात असलेया बेंचवर तेजू भेदरल्यासारखी शरीराच मुटकुळ करून बसलेली होती .
ओह गॉ ..ड येस्स येस्स तेजूच आहे ती !
अग पण ती तिथे काय करते आहे एव्हढ्या रात्री?अन अशी एकटी ?
आई : हा प्रश्न मी तुला विचारायला हवा राजस ? ही काय भानगड आहे ते ?
राजस गोंधळला होता ,तेजू बाहेर गेली , मग दरवाजा आतून बंद कसा ?
मला काही कळत नाहीये आई हा प्रकार काय आहे तो ? " i am totaly blank now "
आधी तिला घेऊन येऊ मगच खुलासा होईल
डॅम इट .... प्रोबलेम तरी काय आहे तिचा ? let me know म्हणत राजस लिफ्टकडे धावला .
दोन्ही हाताने गुडघे पोटाशी कवटाळून बसलेल्या तेजुच्या हुंकाराने ती भयान रात्र , पुढे अघटीत,अकल्पित काहीतरी घडणार आहे याची पूर्वकल्पना देत होती .
क्रमश :
प्रतिक्रिया
21 Sep 2011 - 2:55 pm | इंटरनेटस्नेही
हाही भाग नेहमीप्रमाणे चांगला जमला आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
21 Sep 2011 - 3:18 pm | स्वैर परी
पियु मस्त लिहितेस ग! नेहमीप्रमाणे हा भाग आवडला आहे. आणि लिखाणातल्या चुका देखील फार कमी केलेल्या दिसत आहेत :)
21 Sep 2011 - 3:43 pm | पियुशा
धन्यु ग :)
21 Sep 2011 - 5:08 pm | मी ऋचा
ए लवकर लवकर टाक हां पुढचा भाग! हा मस्त झालाय हे सांगायला नकोच!
21 Sep 2011 - 5:54 pm | वपाडाव
तिच्या मारी, काय लिहिता ओ तुम्ही....
सुशिंची आठौण झाली हो.....
रहस्य उलगडुन सांगा बघु पटकन....
फारच भारी....
21 Sep 2011 - 6:08 pm | रेवती
मस्त लिहितियेस!
पुढचे लेखन लवकर येऊ दे!
21 Sep 2011 - 6:16 pm | मृत्युन्जय
चांगलं जमलय. सध्या सगळ्यांच्या अंगात रामसे बंधुंचे भूत शिरले आहे बहुधा.
अवांतरः रामसे, रामगोपाल. दोघांच्याही नावात राम असुन भूताचे पिक्चर काढतात. काय भानगड असावी :)
21 Sep 2011 - 6:23 pm | गणेशा
पुन्हा अप्रतिम
21 Sep 2011 - 8:18 pm | प्रचेतस
अतिशय उत्कंठावर्धक कथा, पुढच्या भागाची जाम उत्सुकता लागून राहिली आहे.
बाकी राजसच्या आई वडीलांना भाजलेली मुग डाळीची खिचडी आणि भाजलेली कोशिंबीर आवडते हे पाहून गंमत वाटली. ज्याची त्याची आवड दुसरे काय. ;)
21 Sep 2011 - 9:05 pm | मराठे
कथानक मस्त आहे.
अवांतरः सगळेजणं भुताखेतांच्या मागे हात धुऊन लागले आहेत जणू! :)
21 Sep 2011 - 11:31 pm | ५० फक्त
अगं बाई ग, काय करावं या सासवांना, आल्या घरात की रात्री बेरात्री उठायचं असं घरात अन बाहेर कोण कुठंय बघायचं, छे आता लवकरच त्या बिचा-या राजसला दुसरा प्लॅट बघावा लागेल. मदत करा रे कुणीतरी.
''भरपूर तूप घातलेली गरमागरम मुग डाळीची खिचडी, कोशिंबीर अन पापड '' - हातिच्या मला वाटलं बॅचलर थाळीचा मेन्यु होता की काय गेला बाजार किमान अननसाची खिचडी तरी करायची होती.
असुदे, पण कथा चाललीय एकदम मस्त, मजा येतीय वाचायला,
21 Sep 2011 - 11:41 pm | आदिजोशी
ताई जरा मोठे भाग टाका आणि पटापट टाका. असं टंगवत ठेवणं बरं नव्हे.
22 Sep 2011 - 6:06 am | शिल्पा ब
पटापटा पुढचे भाग टाकत चल गं..
22 Sep 2011 - 7:03 am | आत्मशून्य
तसं या भागात नवीन काहीच घडलं नाहीये, रूद्राक्ष सोडलं तर, पण वाचताना मात्र एकदम बाधून ठेवलं होतं... संपल्यानंतरच सूटल्यासारखं वाटलं बगा......
22 Sep 2011 - 9:23 am | किसन शिंदे
हा भाग वाचताना म्हणावं तसं भय वाटलं नाही, पण एकंदर पाहता भाग खिळवून ठेवणारा मात्र नक्की होता.
पियुषाबै, आशा आहे पुढचा भाग यापेक्षा जास्त घाबरवणारा असेल.
22 Sep 2011 - 10:03 am | पियुशा
@ वल्ली , ५० फक्त ,मुग डाळ खिचडी म्हनजे मुगाची दाळ घालुन केलेलि तान्द्ळाची खिचडी मला जाम आवड्ते म्हनुन
इथे कोम्बलि असो धन्यु :)
@ किसन अन आत्मशुन्य
पियुषाबै, आशा आहे पुढचा भाग यापेक्षा जास्त घाबरवणारा असेल
हो हो नक्कीच :)
बाकी सर्व वाचकान्चे मनापासुन आभार :)
22 Sep 2011 - 10:10 am | सविता००१
पियु, झक्कास लिहिते आहेस. पटापट लिही आता पुढचे भाग.
22 Sep 2011 - 10:14 am | पिंगू
भट्टी चांगलीच जमलीये.. आता लवकरच पुढील भागपण येऊ दे.
- पिंगू
22 Sep 2011 - 11:04 am | स्पा
पूर काय झला?
22 Sep 2011 - 12:20 pm | शुचि
मस्तच गं पियुषा
22 Sep 2011 - 12:31 pm | परिकथेतील राजकुमार
कथा पकड घेते आहे.
वाचतोय...
अवांतर :- स्वतःच्या धाग्याचा खरडफळा शक्यतो करु नये. तो बघून काही एक वेगळी आणि स्पष्ट प्रतिक्रिया द्यायचा मूड देखील निघून जातो.
22 Sep 2011 - 6:09 pm | विशाखा राऊत
पुढचा भाग कुठे आहे?
22 Sep 2011 - 6:47 pm | विनीत संखे
छान आहे हा भाग पण. पुढे?
22 Sep 2011 - 6:47 pm | विनीत संखे
छान आहे हा भाग पण. पुढे?
22 Sep 2011 - 7:55 pm | पैसा
सध्या मिपावर पितृपक्ष मस्त साजरा होतोय! घाबरवा अजून आम्हाला.