परतीच्या वाटेवर - भाग २
अरे छोडो यार , किती भीत बसणारेस अजून ?दोन कप मस्त कॉफी मारुया ,
तेजू : "मी नाही बनवनारेय पण "
ओके ,ओके डोक्याला, ताण नको घेउस "जस्ट रिलॅक्स " मी कॉफी बनवतो मस्त ओके !
कॉफी घेतल्यावर फ्रेश वाट्तय ना ? रीलॅकस झोप बघू आता . गुड नाईट म्हनत राजस झोपी गेला.
रात्रीचे तीन साडेतीन वाजले तरी तेजू जागीच होती .पहाटे पहाटे तेजुला झोप आली
सकाळी रोजच्या वेळेला राजस उठला पण तेजू उठली नाही ,स्वताची आवराआवर करून तो ऑफिसला जायला निघण्यापूर्वी तेजुला उठवायला हवे म्हणून तो पुन्हा बेडरूम मध्ये गेला तेजुला दोनदा- तीनदा हलकेच हलवले तरी ती उठली नाही एरवी जरा खुट्ट झाल कि लगेच ती उठून बसते ,आज काय झाल ? रात्री भीतीमुळे निट झोपली नसेल , झोप सुधरत नाहीये म्हणून कदाचित !
पण तिला उठवणे गरजेच होत मेन डोर आतून बंद करायला .
कारण लॅच - की आईबबाकडे दिली होती . म्हणून राजसने तिला “ तेजू ए तेजू उठ ना दोन मिनिट प्लीज ,मी निघतोय दरवाजा बंद करून घे आतून “
तरी तेजू उठली नाही ,त्याने सहज तेजुच्या कपाळावर हात लावला तर तिचे अंग एकदम थंड पडले होते "
तेजू ए तेजू अग काय झाल ? ए तेजू अग उठ न? राजस गोंधळला होता तेजू एकदम गाढ झोपली आहे कि बेशुद्ध आहे काहीच कळायला मार्ग नव्हता .तेजुच शरीर अगदी निपचित निश्चल , डेड बॉडी सारख !
राजसच्या मनात वाईट शंका येऊ लागल्या ,काय झाल नक्की हिला ?
त्याने थरथरत्या हाताने तेजुच्या नाकासमोर दोन बोटे लावली
“ओह माय गॉड” व्हाटस द हेल ? हिचा श्वास तर बंद आहे
क्षणाचा हि विलंब न लावता त्याने दरवाजा उघडला
आणि तो धावत धावत जीने चढू लागला
घाबरलेल्या राजसला बिल्डिंगला लिफ्ट आहे हे सुद्धा लक्षात आल नाही.
त्यांच्या अपार्टमेंट मध्येच बोरा नावाचे नावाजलेले कार्डियो - लॉजिस्ट राहत होते
राजसचे फॅमिली फ्रेंड + डॉक होते ते , आणि राजसच्या बाबांची हार्ट सर्जरी आणि ट्रीटमेंट हि त्यांच्याकडेच झालेली होती
राजसने बेलवर हात ठेवला तो दरवाजा उघडेपर्यंत तसाच !
डॉक नुकतेच झोपेतून उठलेले दिसत होते
" अरे राजस सकाळी - सकाळी ?WHAT HAPPEND ? इतका घाबरलास का तू ?
राजसचा थरकाप झाला होता , त्याला धाप लागली होती घसा कोरडा ,धड बोलताही येईना
अडखळत ,धापा टाकत जस बोलता येईल तस
“डॉक तेजू.... . तेजूचा. श्वास बंद झाला आहे शरीर बर्फासारख थंड पडल आहे
प्लीज डॉक प्लीज हरी ,प्लीज तुम्ही लवकर चला तेजूला काहीतरी झालाय प्लीज “ !
ओके, ओके ,म्हणत डॉक नाईट ड्रेस मध्येच राजस बरोबर फलॅटवर आले बेडरूमचा दरवाजा ढकलला
पण
पण बेडवर तेजू नव्हतीच
आश्चर्य चकित डॉक ने : " व्हेर इज शी ? कुठ आहे तेजू ?
राजसचे डोके बधीर झाले तो भिरभिरल्या सारखा तेजुला शोधू लागला
तेव्हड्यात किचन मधून हातात कॉफीचे दोन मग घेऊन तेजूने बाहेर येताना
डॉकला " अरेच्या, गुड मोर्निंग डॉक, आज सकाळी कसे काय ? “
गरमागरम कॉफीचा एक मग तेजुने डॉकच्या हातात दिला
राजस एकदम गोंधळला “अशक्य !” impossible !
५ - ६ मिनिटापूर्वी मी जे पाहिलं ,फील केल ते काय होत ?
केवळ भास ,अशक्य !
राजस : " प्लीज तुम्ही तिला चेक करा एकदा, गडबड आहे काहीतरी ?
तेजू : डॉक काय झाल ?का चेक करताय मला ?
डॉक : हो हो मला माहित आहे तू ओके आहे असे म्हणत ,
डॉक ने तेजूचा ब्लड प्रेशर ,ठोक्यांच काउन्ट चेक केला, टेम्परेचर ही नॉर्मल होत .
डोक : ए तू उगीच घाबरतो आहेस " शी इज परफेक्ट "
तेजू : अरे पण हे का?" मला काय धाड भरलीय " मी ओके आहे
राजस : अग काही नाही हे डॉकना रुटीन चेक अप करतात दर दोन तीन महिन्यांनी तू नवीन आहेस न म्हणून तुला माहित नव्हत, ओके !
राजस डॉकला फलाट पर्यंत सोडवायला गेला पण डॉक काय बोलतोय याकडे त्याच अजिबात लक्ष नव्हत .
डॉक : इट्स ओके, राजस अस होत रे ! तुझी हल्ली जागरण होत असतील ना?
" यु नीड रेस्ट " ;) असा लाजरा टोमणा मारून अन त्याबरोबर डोळे मिचकावून मिश्कील हसत डॉक अंतर्धान पावले
राजस : तेजू मी आज सुट्टी घेतो तसे पण आज रात्रीच्या ट्रेनने आईबाबा परत येत आहेत
तेजू: कशाला सुट्टी ? ट्रेन साडेसातची आहे ना ? मग?
तू येशील ना तोपर्यंत , मग कशाला हवीय सुट्टी ??
राजस : तू नक्की बरी आहेस न ? म्हणजे ?
तेजू: अरे हो ......पण हाच प्रश्न तू मला सारखा सारखा का विचारतोयस मघापासून ?
राजस : काही नाही सहज ,ओके चल मी येतो काही लागल ,अडचण असेल तर प्लीज कॉल
कर ,टेक केअर !
दिवसभर राजसच ऑफिसमध्ये लक्ष लागल नाही राहून राहून त्याला तेजूची सुन्न अवस्था खरी होती कि मलाच झोप निट न झाल्यामुळे भास झालाय हे कोड उलगडत नव्हत.
असो ,
चला आता आईबाबा परत येतील आता काही टेन्शन नको
जवळ जवळ महिनाभराच्या चारधाम यात्रेनंतर ते परतणार होते
नवदाम्पत्याला जरा तरी मोकळीक मिळावी या हेतूनेच राजसच्या आई बाबांनी तीर्थयात्रेच प्लानिंग
केले होत
कारण राजसच लग्न तस घाई घाईतच झाल होत " चट मंगनी पट ब्याह " टाईप !
गुरुजींनी सहज म्हणून खडा टाकून पहिला आणि
सुंदर तेजूचा फोटो सगळ्यांनाच आवडला होता त्यानंतर लगेच आठवडाभरात पाहण्याचा कार्यक्रम
झाला ,पसंती झाली आणि महिनाभरात लग्न झालेही ,घाई तेजुच्या घरच्याकडून झाली होती .
तिच्या बाबांचं प्रकृती अस्वास्थ्याच कारण असल्यामुळे त्यांना तेजुच लग्न याची डोळा याची देही पाहायचं होत .
सर्व व्यवस्थित पार पडल होत तेजुच्या घरच्यांना तर आभाळ ठेंगण झाल होत सर्व नातेवाईक ,मैत्रिणी ,पै पाहुण्यांना तेजूचा हेवा वाटेल असाच स्थळ होत राजसच !
तेजू लग्न होवून घरी आली ,वातावरण एकदम प्रसन्न झाल
पुढे १५ दिवस त्याचं फिरणं ,नातेवाईक ,मित्राच्या पार्ट्या वैगेरे वैगेरे यात छान पैकी एन्जोय करण्यात गेलेलं होते
आधी कुठेही शॉपिंगला चल, म्हटलं तरी नाक मुरडणारा राजस तेजू अन आईबरोबर शॉपिंग करता करता , पिशव्या सांभाळत नकळत कधी त्यांचा हमाल झाला त्यालाच कळल नाही .आता त्याला त्याच्या नावडत्या भाज्या केवळ
तेजुने बनवल्या म्हणून कधी नव्हे त्या चविष्ट लागत होत्या.
बाबा हि गप्पात ,शॉपिंग मध्ये सामील होउन ,कधी कधी मुलाला कंपनी ( ;) )देऊन रिटायर आयुष्य मस्तपैकी एन्जोय करत होते सर्व कस एकदम व्यवस्थित !
देवाकडे मागितलं ,त्या पेक्षा त्यान भरभरून दिलय म्हणूनच हे सुख अबाधित राहावं म्हणून देवदर्शन करण्याचा कार्यक्रम ठरवला होता .
आणी आज बरोबर एक महिन्यांनी राजसचे आईबाबा परतणार होते राजसने घाई घाई काम उरकले आणि घराकडे मोर्चा वळवला
घरी पोहचला बेल वाजवली ,एकदा, दोनदा ,तीनदा,...........
दार उघडल नाही ,राजस तेजुला आवाज देऊ लागला
परत एकदा त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली
" आता काय कराव ? ओ शिट... मी आज ऑफिसला यायलाच नको होत .
अस म्हणत त्याने बंद दरवाजावर रागात मुठ आदळली आणि दरवाजा उघडला दारात तेजू उभी होती " एक हात कमरेवर ठेवून "अरे हे काय राजस कित्ती बेल वाजवता तुम्ही ? दोन मिनिट दम नाही, मी जरा ड्रेस चेंज करत होते न किती घाई ?
मोरपंखी कलरच्या पंजाबी मध्ये तेजू फारच मोहक दिसत होती क्षण भर तो ब्ल्यांक झाला
“आता तू दारातच थांबणार कि घरात येणार ? आता नाही उशीर होत का?
साडेसात पर्यंत ट्रेन येईल स्टेशनवर
तुम्ही बघत काय बसला आवर बघू पटकन “
हरवलेला राजस " अ हो हो आलोच १० मिनिटात !
म्हणत बाथरूमकडे वळला
शॉवर चालू केला आंघोळ करतानाही सकाळी घडलेला किस्सा काही केल्या डोक्यातून जात नव्हता .
मस्तपैकी फ्रेश झाल्यावर " चलो छोडो यार सकाळी उगीच इंडिकेटर लागले होते आपले , भासच असेल कदाचित !
अस बोलून त्याने दरवाजा खोलायाचा प्रयत्न केला पण दरवाजा उघडत नव्हता
जाम झाला कि काय ? म्हणत त्याने पुन्हा दरवाजाच नॉब धरून दरवाजा ओढला ,काही केल्या दरवाजा उघडत नाहीये म्हणून त्याने तेजुला मोठ्याने आवाज दिला
" तेजू ए तेजू प्लीज चेष्टा नको , बाहेरून कडी लावली असशील तर खोल पटकन प्लीज ,उशीर होतोय
तेजू ए तेजू प्लीज यार !
बाहेरून काहीही रिप्लाय नाही ५ मिनिट झाली झाली राजसची खुडबुड चालू होती दरवाजा खोलण्यासाठी
आता राजस चिडला होता
राजस ने बाथरूमच्या दरवाजाला कान लावला बहुतेक आपली फजिती करून तेजू हसत असेल पण कुठेही कसलीही खुडबुड नाही एकदम चिडीचूप पिन ड्रोप सायलेन्स !
त्याला आठवत होत कि त्याने अंघोळीला जाण्यापूर्वी म्युजिक प्लेयर ऑन केला होता रोजच्या सवयीप्रमाणे त्याचाही आवाज नाही
राजसाला हि भयाण शांतता विचित्र वाटत होती .सकाळपासून घडलेला हा दुसरा प्रसंग होता.
पुन्हा एकदा प्रयत्न म्हणून बाथरूमच दार उघडायला गेला आणि त्या आधी ते आपोआप हळुवार उघडल गेल
जरा रागातच त्याने तेजुला आवाज दिला
" मी आतमधून तुला इतके आवाज दिले तुला ऐकू येत नाही का ? जाणूनबुजून तू अस केलेस ?
तेजू : " मला आवाज दिला ? कधी ? मी तर इथेच होते? का काय झाल ?
राजस : खर सांग " मस्करीची कुस्करी होण्याआधी " तू दरवाजा बाहेरून बंद केला होतास आणि मी चिडलो म्हणून तू गुपचूप कडी उघडली हो ना?
तेजू : मी अन कशाला तुमची चेष्टा करू ? अहो फक्त अर्धा तास आहे आपल्याकडे त्यात स्टेशन इतक लांब असताना मी तुमची अशी फजिती का करू ? सांगा ना ? ती किंचित चिडलेली होती
मिनिटभर, राजसने तेजुच्या निरागस चेहऱ्याकडे पहिले .
राजस एकदम ओशाळला
बहुतेक दरवाजा जामच झाला असेल ऑयलिंग करावा लागेल
"सॉरी तेजू मी उगीच चिडलो तुझ्यावर "
ठीके ...ठीके.... तेजू लटक्या रागातच बोलली
“चला ,खूप लां.......ब जायचं आहे, निघूया का?
असे म्हणत तेजू गालातल्या गालात हसली
क्रमश :
प्रतिक्रिया
12 Sep 2011 - 1:35 pm | आत्मशून्य
आणि राजस फारच सालस वाटतोय... त्याला संभाळा, काळजी वाट्टेय त्याची. असो, आता कथेतील मूख्य ट्वीस्टच्या प्रतीक्षेत.
12 Sep 2011 - 1:57 pm | sagarparadkar
>> “चला ,खूप लां.......ब जायचं आहे, निघूया का?
असे म्हणत तेजू गालातल्या गालात हसली
हा लांबवलेला "लां.......ब" शब्द काळजाचा ठोका चुकवणारा आहे .....
12 Sep 2011 - 2:35 pm | प्रास
फारच लां.......ब चा विचार करता, सागरराव!
बाकी पियुशाबाई, कथा छान रंगवत आहात. राजसरावांची काळजी वाटू लागलीय खरी......
पुलेप्र
:-)
12 Sep 2011 - 3:49 pm | कवितानागेश
:)
मस्त लिहितेयस पियु.
12 Sep 2011 - 4:05 pm | पियुशा
धन्स हो आत्मशुन्य ,प्रास ,माउ ,सागर :)
12 Sep 2011 - 4:16 pm | स्पा
पियू श्या SSS,
चान चान
लिव्लय.
:)
-- (परतीच्या वाटेवर लोकल मध्ये लोंबकळणारा) स्पा
12 Sep 2011 - 4:20 pm | किसन शिंदे
उत्कंठावर्धक कथा लिहल्या गेलीय... हि तेजु पछाडलेली वाटतेय..
12 Sep 2011 - 4:41 pm | रेवती
उत्कंठावर्धक होत चाललिये कथा!
12 Sep 2011 - 4:46 pm | ५० फक्त
तेजु पछाडलेली नाय राजस राहतो ती बिल्डींगच पछाडलेली आहे, ते डॉक्टर पण अंतर्धान पावले म्हणे. पुण्यात अशी एक बिल्डींग आहे गेरा जंक्शनला तिथं तर राहात नाहीत ना हे दोघं.
अवांतर - तिर्थयात्रेची आयडिया कोणाची ? रॉयल्टी कोणा देणार ?
13 Sep 2011 - 10:16 am | पियुशा
@ ५० फकत
तिर्थयात्रेची आयडिया कोणाची ? रॉयल्टी कोणा देणार ?
मला द्या की ! ;)
12 Sep 2011 - 4:48 pm | वपाडाव
मला काही ठिकाणी खटकतंय ते असं की,
तेजुकडुन राजसचा उल्लेख कधी एकेरी होतो तर कधी आदरार्थी....
काय ते उलगडुन सांगा बरं.....
का मला पण भास होतायेत.....
बाकी, कथनाची इश्टाइल अन कथा दोनीबी खल्लास....
अवांतर :: मोरपंखी रंगाच्या पंजाबीतला तेजुचा फोटो इथे डकवावा ही नम्र विनंती....
12 Sep 2011 - 4:56 pm | इरसाल
12 Sep 2011 - 5:00 pm | पियुशा
ईरसाल,
चेन्डु बॉन्ड्रीपार गेला आहे ;) ;)
12 Sep 2011 - 5:18 pm | इरसाल
असा कसा.
वपाडाव ची इच्छा.
12 Sep 2011 - 5:40 pm | वपाडाव
मोरपंखी रंग हाच की नाही यावर जाणकारींनी प्रकाश टाकावा.....
अवांतर :: फटु थोडे मोठे हवे होते. फक्त कपडे ठळक दिस्तायत. तेजु नाही....
12 Sep 2011 - 5:45 pm | इरसाल
14 Sep 2011 - 5:01 pm | पियुशा
@ ईरसाल
मोरपन्खी रन्गचा ड्रेस आहे हो
मोराच्या पिसाचा ड्रेस नाही :)
12 Sep 2011 - 4:50 pm | आदिजोशी
सॉलिडच. पुढचे भाग टाका पटापट आता
12 Sep 2011 - 4:52 pm | पियुशा
@ व. प्या.
तेजुकडुन राजसचा उल्लेख कधी एकेरी होतो तर कधी आदरार्थी....
ते माझ्याकडूण झालय लिहिन्यात :)
आता उल्लेख एकेरीच राहु देइन (शन्का निरसन झाले का?) ;)
12 Sep 2011 - 5:44 pm | वपाडाव
ते तुझ्याकडुनच होणार ना.....
पण ह्या लहान-सहान गोष्टींची काळजी घेतली की वाचायला जाम मजा येते....
माणुस गुरफटुन जातो कथेत....
12 Sep 2011 - 5:35 pm | ५० फक्त
''ते माझ्याकडूण झालय लिहिन्यात
आता उल्लेख एकेरीच राहु देइन (शन्का निरसन झाले का?''''
बोंबला ते तुम्हाला चालेल पण राजसच्या आईबाबांना चालेल का विचारा, त्यांच्या लाडाकोडात वाढवलेल्या एकुलत्या एक मुलाला एकेरी केलेलं त्याच्या बायकोनं.
आणि ते आयडियाच्या रॉयल्टीचं काय, व्यवस्थित टाळ्ताय तुम्ही.
@ वपाडाव, मला वाटलं आता सासु सासरे येणार आहेत म्हणल्यावर आदरार्थी सुरु केलं का काय सुनेनं, दोघंच होते तेंव्हा चालत होतं सगळं. सगळे बॅचलर नुसते अशा भावनेच्या कल्पना करता येत नाहीत कसं व्हायचं रे तुमचं ?
12 Sep 2011 - 6:00 pm | प्रचेतस
मस्त लिवलय पियुशा,
सुरुवातीला 'डरना मना है' च्या वाटेनं जाणारी कथा एकदम वेगळे वळण घेते आहे. पुढचा भाग लवकर येउ दे आता.
12 Sep 2011 - 7:35 pm | गणेशा
हा भाग मस्त झाला आहे.. आवडला..
असेच लिहित रहा.. वाचत आहे
12 Sep 2011 - 7:51 pm | मन१
वाचतोय. पुढलाही भाग टाका लवकर.
12 Sep 2011 - 10:14 pm | शिल्पा ब
छान लिहिलंय. पुढचे भाग लवकर लवकर टाक.
13 Sep 2011 - 8:53 am | पिंगू
मस्त भाग झालाय.. आता पुढचे भाग कधी टाकतेस?
- पिंगू
13 Sep 2011 - 1:21 pm | श्यामल
उत्कंतावर्धक मस्त कथा ! :smile: पुढील भाग लवकर येउ दे..........
13 Sep 2011 - 3:33 pm | प्राजक्ता पवार
छान लिहिलंय .
14 Sep 2011 - 6:36 am | स्पंदना
एकुण सगळाच लोचा है तर? वाचायच भ्या वाटत्ये . जरा लवकर संपवा.