"परतीच्या वाटेवर....."
वारयाच्या वेगाने चाललेल्या राजसच्या कारसमोर क्षणार्धात ,अकस्मात एक आकृती गाडीलाआडवी झाली ,आणि काही कळायच्या आत राजसने सगळा जोर लावून कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला .
भीतीने गच्च बंद झालेले डोळे उघडून "एव्हड्या काळोख्या रात्री ते ही घाटामध्ये गाडीखाली कोण आल ? आणि गाडीचा अप्पर डीपर चालू असताना मला कस कोणी दिसलं नाही ,कोण असेल ?एखादा प्राणी ?कि कोणी मनुष्य ? पण कुणाचा किंकाळण्याचा आवाज तर नाही आला ,पण टायर स्पीड ब्रेकरवर गेल्यावर जसा फील येतो तसा काहीस जाणवलं ,नक्कीच काहितरी झालय म्हणून घामाने डबडबलेला राजस गाडीतून बाहेर आला .
नीट न्याहाळून बघितले काहीही नव्हत ,खाली वाकून ,मागे पुढे होवून पाहिले तरी कुणीही नव्हत ? मला भास तर नाही झाला ना?
गाडीच्या हेड लाईट सोडला तर आजूबाजूला किर्र अंधार होता दुरदुरपर्यंत मनुष्यजातीच्या अस्तित्वाचा मागमूस नव्हता या विचारानेच राजस घाबरा झाला ,आणि पुन्हा गाडी स्टार्ट करणार तोच.....
एक कर्ण- कर्कश किंचाळीने गाडीत पेंगलेली तेजू खडबडून जागी झाली , बावरलेली , गोंधळलेली...
, भितीन तीच काळीज धडधडत होत .राजस कुठे आहे?गाडी का थांबवली आहे नक्की काय गडबड आहे ?
आता ऐकलेली किंकाळी कुणाची होती ?राजसला काही झाले तर नाही ना?
तेजूने राजसला दोन तीन आवाज दिले काहीच रिप्लाय नाही, ती एकदम घाबरी झाली अंगावर काटा
आला ,घाईत थरारत्या हाताने तिने राजसचा मोबाईल डायल केला
पण रिंग गाडीतच वाजत होती मोबाईल गाडीतच होता
" देवा काय होतंय हे ?राजस राजस ओरडून तेजूचा घसा कोरडा पडला होता
भीतीने अर्धमेली झालेल्या तेजुला पुन्हा एकदा ती आर्त किंकाळी एकू आली
आणि ती आवाजाच्या दिशेने पळू लागली
पण तिला अचानक जाणवलं कि कुणीतरी तिचा पाठलाग करत आहे
मागे बघायची तिची हिम्मत होत नव्हती ,पण कुणीतरी नक्कीच होत म्हणून ती जीव मुठीत धरून वाट दिसेल तशी सैरावैरा पळू लागली ,एकीकडे राजसला आवाज देत होती ,एकीकडे ती अज्ञात शक्ती /व्यक्ती तिचा पाठलाग करीत होती
कुणीतरी मागून तिच्या खूप जवळ आलेलं आणी त्या व्यक्तीचा रक्ताळलेला हात फक्त तिला दिसला
आता ती झुडूपामधून काट्या-कुट्यातून पळत होती ती व्यक्ती तिच्या खूप जवळ येत होती, दमलेल्या तेजुचे त्राण सर्व प्राण तिच्या पायात जमा झाले होते
तिची हृदयाची धडधड तिला स्पष्ट एकू येत होती घामेजलेली तेजू , भीतीने अवसान गळालेली तेजू नुसती जीवाच्या आकांताने ओरडण्याचा खूप प्रयत्न करीत होती पण हे काय ?
सर्व शक्तीनिशी ओरडून हि तिच्या कंठातून आवाज बाहेर येत नव्हता रिमोटने टि. व्हि .चा आवाज म्युट होतो तसा काहीसा !
भांबावलेली तेजू कुठल्यातरी डोंगर दरीत असलेल्या दगडी पायर्या उतरून खाली पळत होती जीव वाचवत होती आणि अचानक तिचा पाय पायरीवरून निसटला ,खोल गर्तेत कोसळली !
अन दचकून भीतीने गच्च मिटलेले डोळे उघडले
समोर राजस होता तिच्याकडे सांशक नजरेने पाहत होता , तिला न्याहाळीत होता
तेजुने त्याला लगेच मिठी मारली घाबरलेल्या तेजुला क्षणभर हायसे वाटले
सभोवताली पहिले तर तो त्यांचाच बेडरूम होता
म्हणजे म्हणजे ?
तिने स्वताशीच म्हटले " ओह माय गॉड ! हे स्वप्न होत? किती भयंकर ,माझा विश्वास बसत नाहीये
भीतीने घामाघूम झालेल्या तेजूने राजसकड पाहिलं,
हो ते कळल मला तू झोपेत ,किंचाळत होईस , झोपेतही किती एक्सप्रेशन्स होते तुझ्या चेहर्यावर !
भूत बित पाहिलास न स्वप्नात ? बरोबर ना?
नाही म्हणजे आपण मघाशी हॉरर सिनेमा पहिला तो डोक्यातच घोळवत बसली असशील ना ?
काय पण तुम्ही मुली किती भित्र्या असता नाही ? अग पहिला ना कि तिथेच सोडून द्यायचं असत इतका विचार नाही करायचं बघ किती घाबरली आहेस तू !
तू पाहिलं आहेस का कधी भूत बित ? तुला कधी भेटलय का ?
मग अशा फालतू गोष्टीवर ईतका विचार?
तुला ना एक रात्र अंधारया खोलीतच कोंडून ठेवतो, त्याशिवाय काही भीती जाणार नाहीये तुझी !
नाही, नको नको ,राजस प्लीज अस नको करू प्लीज प्लीज मला भीती वाटते म्हणून तेजू रडू लागली
राजस : " अग अग ,मी गम्मत केली तुझी मी खरच अस वागेन का तुझ्याशी?"
लग्न झाल्यापासून बघतोय किचन मध्ये वाटी जरी पडली तरी कसली दचकतेस? सतत कुणीना कुणी बरोबर हव असता तुला ?
रात्रीच किचन मध्ये एकटीने जाऊन पाणी पिण्याची हिम्मत नाही होत तुझी म्हणूण पाण्याची बॉटल उशाशी घेऊन झोपतेस , म्हणजे आय मीन इतकी का घाबरतेस तू ?
का का ? सान्ग कि मला, कशाची भीती दड्लीय एव्हढी तुझ्या मनामध्ये ?सान्ग ना?
तेजू रडता रडता अचानक शांत झाली अन डोळे रोखून ,स्तब्ध राजसकडे एकटक पाहू लागली .
क्रमश :
.
प्रतिक्रिया
6 Sep 2011 - 12:28 pm | मन१
आणि मग काय झालं?
6 Sep 2011 - 1:03 pm | पियुशा
आणि मग काय झालं??
ते नेक्स्ट भागात :)
6 Sep 2011 - 12:37 pm | इंटरनेटस्नेही
जबरदस्त! चांगली कथा!
6 Sep 2011 - 12:49 pm | किसन शिंदे
इंट्या नक्की कथेबद्दलच बोलतोयस का?
6 Sep 2011 - 12:50 pm | किसन शिंदे
प्रकाटाआ
6 Sep 2011 - 1:20 pm | ५० फक्त
कथेची चांगली सुरुवात मजा येणार आहे वाचायला,
पण
''काय पण तुम्ही मुली किती भित्र्या असता नाही'' पण पाशवी शक्तींबद्दल हे असे उदगार काढल्याबद्दल राजसला जी शिक्षा होईल छे छे कल्पनाच करवत नाही मला तरी, त्यापासुन वाचवा हो प्लिज त्याला लेखिकाबै.
6 Sep 2011 - 1:27 pm | प्रचेतस
पियुशाबैंनी बरेच दिवसांनी वेंट्री मारून कथेची चांगली सुरुवात केलीय. कथेच्या पहिल्या अर्ध्या भागावर 'डरना मना है' च्या पहिल्या कथेचा (सोहैल खान-अंतरा माळी अभिनीत) प्रभाव दिसून आला.
" alt="" />
6 Sep 2011 - 3:26 pm | विनीत संखे
मलाही हेच वाटलं पण पियुशाताई ट्विस्ट आणतील ही आशा आहे.
6 Sep 2011 - 6:21 pm | माझीही शॅम्पेन
अगदि १०००००००+ सेम बोल्तो !
10 Sep 2011 - 12:51 am | अत्रुप्त आत्मा
@--- पियुशाबैंनी बरेच दिवसांनी वेंट्री मारून कथेची चांगली सुरुवात केलीय. कथेच्या पहिल्या अर्ध्या भागावर 'डरना मना है' च्या पहिल्या कथेचा (सोहैल खान-अंतरा माळी अभिनीत) प्रभाव दिसून आला.
@--- या वरुन यक आठवलं,सत्यनारायण असो वा सत्यविनायक -देव बदलतो,पात्र बदलतात...कथानक त्येच ;-) ह्रातं
अवांतरः- या शिनुमा नंतर ह्यी अंतराबाय कुट्ट दिसली नाय ?ब्भवतेक त्येज्यातल्या ठंडीनी अजारी पडली असावी ;-)
6 Sep 2011 - 2:27 pm | पियुशा
@ वल्ली मी हा सिनेमा अजुन पर्यन्त पाहिलेला नाहिये .
पण माझी कथा एका वेगळ्या धाटणीने जाणार आहे याची खात्री बाळ्गा :)
6 Sep 2011 - 9:16 pm | प्रचेतस
तशी खात्री बाळगत आहेच. :)
6 Sep 2011 - 3:02 pm | सविता००१
पियु रॉक्स अगेन. पटापट लिही पुढचे भाग आता.....
6 Sep 2011 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार
"प्रगतीच्या वाटेवर....."
6 Sep 2011 - 3:20 pm | ५० फक्त
''पण माझी कथा एका वेगळ्या धाटणीने जाणार आहे याची खात्री बाळगा'
ओ उगा तो वल्ली चिडवतोय अन तुम्ही का चिडताय, असं कशाला सिक्रेट ओपन करताय, अगदि त्या पिक्चरवरुन प्रेरणा घेउन लिहिलिय कथा असं म्हणायचं.
@ वल्ली, ''भांबावलेली तेजू कुठल्यातरी डोंगर दरीत असलेल्या दगडी पायर्या उतरून खाली पळत होती जीव वाचवत होती आणि अचानक तिचा पाय पायरीवरून निसटला ,खोल गर्तेत कोसळली '' हे वाचुन तुला एखादा किल्ला किंवा डोगर नाही का रे आठवला, मला तर कोरिगडाच्या पाय-या आणि कम्युनिस्ट आठवत होते, फक्त रे...., असो उगा अतिपरिचयात नको.
बाकी, स्टार्ट बाकी भारीच ओ, नावं पण लई भारी पात्रांची, राजस आणि तेजु,
राजस म्हणलं की पुर्वी दुरदर्शनवर एका भजनाच्या कार्यक्रमात एक गायिका , '' राजस सुकुमार मदनाचा पुतळा ' गायच्या हातात टाळ घेउन ते आठवतं, ' '
म्हणणा-या मंजुषा पाटीलांसारखा तो चेहरा पण डोक्यात फिक्स आहे पण नाव लक्षात येत नाही.
6 Sep 2011 - 9:11 pm | प्रचेतस
ओ पियुशाबै मी काही तुम्हाला चिडवत नाहीये, आणि तुम्हीपण उगाच चिडू नका. तुम्ही स्वतःच ती तूनळी वरची फिल्म पहा. तुम्हाला स्वतःलाच ते साम्य जाणवेल.
अर्थात तुमच्या आणि रामूच्या कल्पनेतील पराकोटीचे साम्य बघून डोळे पाणावले.
@ ५०- अगदी अगदी, हेच दृश्य डोळ्यासमोर आले होते.
11 Sep 2011 - 11:45 am | पियुशा
@ वल्ली अरे यार तुम्ही म्हण्ता ते खर आहे ओ
पण मी काहि कॉपी नाही केल
मुळात मी हा पिकचर पाहिलाच नव्हता बर झाल तुम्ही सान्गितल ते :)
धन्स हो !
नाहितर मि पा करानि " रामु " नाव पाड्ल असत माझ ;)
असो पुड्चा भाग वाचुन सान्गा मला नक्की :)
6 Sep 2011 - 4:08 pm | पियुशा
ओके ओके ५० फक्त :)
6 Sep 2011 - 5:24 pm | स्पंदना
पहिली कथा अन त्याच्या नायकाला वार्यावर सोडुन फक्त पॉश दिसतात म्हणुन राजस अन तेजु यांच घोड फुड दामटल्या बद्दल निषेध.
ओ बाय पयला त्यांच काय ते कोड सोडवा आन मग हिकड्...तंवर प्रतिसाद न्हाय. तशीबी भ्या वाटतया वाचुनच.
6 Sep 2011 - 6:55 pm | आत्मशून्य
आणि राजस फारच सालस वाटतोय... त्याला संभाळा, काळजी वाट्टेय.
6 Sep 2011 - 6:58 pm | शुचि
वाचतेय. भीती वाटते आहे पण :(
6 Sep 2011 - 7:18 pm | रेवती
वाचतिये.
6 Sep 2011 - 8:04 pm | सूड
वाचतोय !!
पर तिच्या वाटेवर
6 Sep 2011 - 8:59 pm | स्वाती२
पुढिल भागाच्या प्रतिक्षेत!
9 Sep 2011 - 9:59 pm | अन्या दातार
>>आणि गाडीचा अप्पर डीपर चालू असताना मला कस कोणी दिसलं नाही ,कोण असेल ?
एकाच वेळेस गाडीचा अप्पर आनि डीपर कसा चालू असेल? अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे?
>>गाडीच्या हेड लाईट सोडला तर आजूबाजूला किर्र अंधार होता
गाडीचे हेडलाईट्स खुपच डीम असावेत. मग अप्पर-डीपर मारुन काय उपयोग? खरंच एखादा स्पीडब्रेकर असेल पण दिसला नसेल
>>गाडीच्या हेड लाईट सोडला तर आजूबाजूला किर्र अंधार होता दुरदुरपर्यंत मनुष्यजातीच्या अस्तित्वाचा मागमूस नव्हता या विचारानेच राजस घाबरा झाला ,आणि पुन्हा गाडी स्टार्ट करणार तोच..
लेखिकेला मराठी व्याकरणाचे पुस्तक द्या हो कुणीतरी. ५ मिनिटे हे वाक्य कसे वाचावे या विचारातच संपली! हेड लाईट सोडल्यावर आजूबाजूला किर्र अंधार कसा पसरेल हे कुणी सांगेल काय?
समग्र कथेवर एक प्रश्न
तेजूच्या स्वप्नात राजसचे अनुभव आणि एक्स्प्रेशन्स कसे काय दिसत होते?
9 Sep 2011 - 10:40 pm | ५० फक्त
श्री. अन्या दातार, मला तुमच्या एवढ्याच प्रश्नाचे उत्तर देता येत आहे.
'एकाच वेळेस गाडीचा अप्पर आनि डीपर कसा चालू असेल? अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे?''
पॅलिओ, (माझ्याकडे आहे), लिनिआ, इंडिगो काही मॉडेल, व्हिस्टा सर्व मॉडेल, मांझा सर्व मॉडेल, फोर्ड क्लासिक व फिएस्टा नविन, होंडा सिविक व अॅकॉर्ड, या सग़ळ्या गाड्यांना डबल बॅरल हेडलॅम्प आहेत त्यामुळे यात अपर व डिपर दोन्हि एकदम लागु शकतात, परंतु हे दोन्हि एकदम लागलेले असल्यास हया गाडिच्या चालकास अतिशय व्यवस्थित दिसते पण समोरच्याची बत्ती गुल होते,
पण एक अवांतर शंका, ही कथा भारतातच घडत असावी असा संकुचित विचार का केला तुम्ही, लेखिकेचा अनुभव व कल्पनाविलासशक्ती पाहता ही कथा इतर देशात घडत असण्याची शक्यता नाकारता येत नाहि. तेजु आणि राजस नावाच्या भारतीय व्यक्तींनी भारताबाहेर राहु नये असा विचार का करता तुम्ही. सोदाहरण स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
9 Sep 2011 - 10:45 pm | अन्या दातार
>>पण एक अवांतर शंका, ही कथा भारतातच घडत असावी असा संकुचित विचार का केला तुम्ही
कसं आहे माहिती आहे का, कि मी जाऊन जाऊन खरगपुरपर्यंतच जाऊ शकलो हो. बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार??
10 Sep 2011 - 12:55 am | विश्वनाथ मेहेंदळे
>>बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार??
अरे भावा, IIT त जाऊन काय उपेग रे मग ? देशाचाच विचार करायचा असेल तर साध्या कालिजात जायचे होते. उगाच तिकडची एक सीट फुकट गेली ना, एखादा अमेरीकेच्छुक नसता का गेला त्या सीट वर ? ;-)
(सदर प्रतिसाद दिल्यावर आम्हीं भूमिगत झालो आहोत )
12 Sep 2011 - 3:41 am | बाळकराम
<<कसं आहे माहिती आहे का, कि मी जाऊन जाऊन खरगपुरपर्यंतच जाऊ शकलो हो. बाहेरच्या देशांचा विचार माझ्या डोक्यातच नाही येत. काय करणार??>>
सगळ्यांनाच कसं जमणार बाहेरच्या देशात जाणं, नाही का? तुम्ही खरगपुरात सुखी आहात ना, ते महत्त्वाचं!
12 Sep 2011 - 3:38 am | बाळकराम
<<लेखिकेला मराठी व्याकरणाचे पुस्तक द्या हो कुणीतरी. ५ मिनिटे हे वाक्य कसे वाचावे या विचारातच संपली!>>...
आधी तुम्ही तुमचं शुद्धलेखन सुधारा आणि मग व्याकरणाच्या गमजा मारा!
उदा. अप्पर आनि डीपर , खुपच डीम
9 Sep 2011 - 11:04 pm | ५० फक्त
श्री. अन्या दातार, आपण वर जो प्रश्न विचारलेला आहे, त्यानुसार आपल्या डोक्यात बाहेरच्या देशांचा विचार येत नसावा हे पटत नाहि, कारण तसे असेल तर आपण ''अशी कोणती (भारतीय) गाडी असावी बरे?'' असे न विचारता अशी कोणती गाडी असावी बरे?'' असा प्रश्न विचारला असता ? या उलट आपणांस भारतीय गाड्यापेक्षा बाहेरच्या देशातील दोन दिवे असणा-या गाड्यांची जास्त माहिती असावी असे वाटते आहे.
10 Sep 2011 - 12:44 am | अत्रुप्त आत्मा
@--- या उलट आपणांस भारतीय गाड्यापेक्षा बाहेरच्या देशातील दोन दिवे असणा-या गाड्यांची जास्त माहिती असावी असे वाटते आहे....ह्हा ह्हा ह्हा ह्हा ह्हा.... :bigsmile: क्या पकड्या है? सिक्सर मारनेकू गया और पीछे देखा तो हिटविकेट... ;-)
12 Sep 2011 - 10:59 am | समीरसूर
उत्सुकता वाढवणारी आहे...
येऊ द्या पुढचे भाग लवकर...