'ईगल्स' भरारी

प्रास's picture
प्रास in जनातलं, मनातलं
23 Aug 2011 - 1:41 pm

१९७० च्या दशकात लॉस एंजलीस मध्ये तयार झालेला, अमेरिकेतील चार्टस मध्ये ५ पहिल्या क्रमांकाची गाणी देणारा, ६ ग्रॅमी अ‍ॅवॉर्ड्स जिंकणारा, ६ पहिल्या क्रमांकाचे अल्बम असणारा म्युझिक ग्रूप म्हणजे 'ईगल्स'.

ग्लेन फ्रे, डॉन हॅनली, बर्नी लीडन आणि रँडी मीस्नर यांच्या या 'ईगल्स'ची गोष्टच जरा वेगळी आहे. मुळात यांच्यातील एकही म्युझीशियन कलिफ़ोर्निअन नाही. हे चौघे १९७१ साली प्रसिद्ध अमेरिकन गायिका 'लिंडा रॉनस्टेट' हिचे टूर-मेम्बर्स म्हणून लॉस एंजलीस, कॅलिफोर्नियाला एकत्र आले. एकत्र काम करता करता त्यांचा एक छान गट बनला. ''लिंडा'ने स्वत:च त्यांना त्यांचा स्वतंत्र म्युझिक ग्रूप बनवण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच 'ईगल्स'चा जन्म झाला.

अनेक प्रसिद्ध गाणी देणारा हा ग्रूप सुरुवातीला अमेरिकन कंट्री (लोकसंगीत) सादर करायचा पण पुढे प्रथितयश रॉक ग्रूप म्हणून नावाजला गेला. १९७१ पासून बनलेला हा ग्रूप १९८४ मध्ये फुटला आणि त्यातील प्रत्येकाने आपले स्वतंत्र सांगीतिक करिअर केले. १९९४ साली त्यांचे रीयुनियन होऊन 'ईगल्स' पुन्हा एकदा जोमाने आपलं संगीत सादर करत आहेत. दरम्यान काही सभासद गळले, काही नवे आले. सध्या 'ईगल्स', ग्लेन फ्रे, डॉन हॅनली सह जो वॉल्श आणि टिमूथी श्मीट यांचा ग्रूप आहे.

या अशा 'ईगल्स'चं इथे एक गाणं देतो. मला खात्री आहे की हे सगळ्यांना नक्कीच आवडेल.....

"Hotel California".

त्यावेळचा ग्रूप मेंबर डॉन फेल्डर याचे प्रमुख म्युझिक संयोजन असलेलं हे गाणं डॉन हॅनली, ग्लेन फ्रे आणि स्वत: डॉन फेल्डर यांनी लिहिलेलं आहे. फेल्डर स्वत: गायक नव्हता पण चांगला वादक आणि संगीतकार होता. त्याने तयार केलेल्या संगीताने बाकी जण खूप प्रभावित झाले आणि त्यांनी त्या संगीतावर गीतलेखनाला सुरुवात केली. त्या काळात कॅलिफोर्निया मध्ये एक वैशिष्ठ्यपूर्ण मतप्रणाली जोरावर होती. कोणतीही कृती ही त्यात किती जास्त सुख आणि किती कमी दु:ख यातच मोजली जायची. या प्रणालीच्या अनेक उपकल्पना होत्या, त्यातलीच एक होती, असं ठिकाण की जिथे जायचे तुम्ही ठरवता पण त्यातून बाहेर पडायची कृती करायचे अधिकार तुम्हाला नाहीत, अशी काहीशी...... या अशाच कल्पनेवर हे गाणं बेतलेलं आहे.

एक भटका प्रवासी 'हॉटेल कॅलिफोर्निया' मध्ये येतो. इथे सगळा झगमगाट आहे, उपभोगाची सर्व साधनं आहेत आणि इथे तुम्ही हवं ते करू शकता पण इथून बाहेर मात्र पडू शकत नाही. एकदा आत आलात की तुम्हाला यातल्या परिस्थितीचे घटक बनूनच राहणं आवश्यक होतं. दुसरे सर्व मार्ग बंद होतात आणि तुमचा तुमच्यावर काहीच कंट्रोल राहत नाही. परिस्थिती प्रवाह-पतितागत होते. ज्योतीवर झेपावणार्‍या पतंगासारखी त्याची अवस्था होते, त्याला कळतंय की यात नाश आहे पण ते थांबवणं त्याला शक्य नसतं. एक प्रकारे त्याच्या स्वत:च्या आयुष्याच्या कल्पना उध्वस्त होतानाच त्याला दिसतात.

(जणू एखादे आजच्या काळासारखे अमेरिकन ड्रीम, तुम्ही स्वेच्छेने अमेरिकेत जाऊ शकता पण तिथून तुम्हाला परतणं कितीही मनात आणलं तरी शक्य होत नाही किंवा मग आपल्या हिंदी सिनेमांमध्ये म्हणतात तसं, "गुनाहोंके दुनियामें आप कदम तो अपनी मर्जीसे रखतें हैं मगर वहाँसे बाहर अपनी मर्जीसे नहीं निकल सकते।".... हे असं आपलं मला एकूण या गाण्याच्या अर्थावरून वाटतंय...)

यातला शेवटचा गिटारवरचा भन्नाट म्युझिक-पीस कोणत्याही वादकाला आपल्याला वाजवता यायलाच हवा अशी महत्त्वाकांक्षा पैदा करणारा आहे. टोटल जबरा......

१९९४ च्या रीयुनियन नंतर झालेल्या एका कार्यक्रमात या गाण्याचं अ‍ॅकॉस्टिक वर्जन ऐकायला मिळतं..... पुन्हा एकदा...... निव्वळ अप्रतिम.......

"Love Will Keep Us Alive"

'ईगल्स'चा विषय चालू आहे तर त्यांची आणखी काही खास गाणी इथे द्यायला कोणतीही हरकत नसावी.

त्यांच्या १९९४च्या रीयुनियनच्या वेळी त्यांचं एक गाणं प्रसिद्ध झालं. जीम कापाल्डी, पौल कार्रेक आणि पीटर वेल यांनी लिहिलेलं, "Love Will Keep Us Alive", हे ते गाणं. मुळात हे पॉलने श्मीट या गिटारिस्टसाठी, ते जेव्हा एकत्र म्युझिक ग्रूप बनवण्याचा विचार करत होते तेव्हा बनवलेलं. पण त्यांचा तो मनसुबा काही प्रत्यक्षात येऊ शकला नाही. पुढे श्मीट ईगल्स ग्रूप मध्ये सहभागी झाल्यावर त्याने हे गाणे ईगल्स रीयुनियन टूर-प्रोग्रामसाठी वापरले. या गाण्याची जातकुळी मूळ ईगल्सच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या प्रेमगीतांसारखीच असल्याने ईगल्सने ते आपल्या नावावर सादर करणं स्वाभाविकच होतं.....

तुम्हालाही आवडेल हे गाणं, त्यातले शब्द आणि ईगल्सचं सुंदर सादरीकरण......

"Take It Easy"

"Take It Easy" हे ईगल्सचं आणखी एक सुंदर गाणं, त्यांची 'सिग्नेचर ट्यून'च!

जॅकसन ब्राउनी आणि ग्लेन फ्रे यांनी लिहिलेलं हे गाणं फ्रे यानेच गायलेलं आहे. 'रॉक एन रोल' लोकप्रिय होण्यामध्ये या सारख्या गाण्यांचा खूप मोठा हातभार आहे.

या गाण्याची पार्श्वभूमी बघा, ब्राउनी ने स्वत:च्या पहिल्या अल्बमसाठी हे गाणं लिहायला सुरुवात केली. पहिलं कडवं लिहून झाल्यावर त्याचा त्यावेळचा शेजारी फ्रे याने ते ऐकलं तर त्याला ते फारच आवडलं. तेव्हा ब्राउनीने हे गाणं फ्रेच्या नव्या ग्रूपसाठी (ईगल्स) देऊन टाकलं. नंतर फ्रे ने याचं दुसरं कडवं लिहीलं आणि ते ईगल्स तर्फे सादर केलं. पुढे ब्राउनीने स्वत:च्या ग्रूप बरोबरही हे गाणं गायलं पण आधी म्हंटल्याप्रमाणे ते ईगल्सचीच सिग्नेचर ट्यून मानलं गेलं....

तेव्हा ही ईगल्स ची सिग्नेचर ट्यून ऐकायलाच हवी....

इथे हे गाणं मस्त ऐकू येतं.....

इगल रीयुनियन नंतरचं सादरीकरण, तितकंच भन्नाट.

ही गाणी केवळ एक झाँकी आहेत म्हणू. लिहावं तितकं थोडं. ज्याने-त्याने आपली आवड जोपासावी नि वाटावी, यामुळे आपण एकमेकांच्या जीवनात आनंदच वाटणार आहोत, नाही का?

आज इतक्या वर्षांनंतरही जगभरातून अनेक लहान-थोर मंडळींसाठी 'ईगल्स' आणि ईगल्सची गाणी ही मर्मबंधातली ठेव आहे. अनेकदा यांच्याकडून ईगल्सच्या संगीताचा गुणवत्तेच्या कसोटीवर फूटपट्टीसारखा वापर होतो. याला कारणही आहेच -

'इगल्स' रॉक अ‍ॅण्ड रॉल संगीतक्षेत्राच्या आकाशात तीस वर्षांनंतरही तितक्याच ताकदीने भरार्‍या मारत आहे.

संगीतप्रकटनआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वैर परी's picture

23 Aug 2011 - 1:54 pm | स्वैर परी

वर नमूद केलेली गाणी केवळ अप्रतिम आणि सूथिंग आहेत. 'हॉटेल कॅलिफोर्निया' तर निव्वळ अजरामर आहे.
यात एक भर 'तकिला सनराईस' ची. धन्यवाद माहिती शेअर केल्याबद्दल! :)

अत्यंत सुंदर परिचय..

अरे मित्रा .. एकदम भरभरुन बोलण्यासारखं नाव काढलंस.. ईगल्स..

हॉटेल कॅलिफोर्नियाच्या सर्व पॉसिबल एडिशन्स अगदी कॉलेजच्या दिवसांपासून जमवल्या आहेतच. आणि पाश्चात्य संगीताची थोडीशीसुद्धा आवड असलेल्या कोणत्याही तरुणाच्या मनात एक कोपरा "हॉटेल कॅलिफोर्निया"ने नक्की व्यापला असणार. लेजंड आहे ते.. आणि ईगल्ससुद्धा. कॉलेजात गिटारवर कॉर्ड धरुन सतत वाजवत असायचो. त्यात शेवटी असणारे म्युझिकल पीसेस अद्वितीय आहेत. (यू कॅन नेव्हर लीव्ह.. या शेवटच्या शब्दांनंतर शेवटापर्यंत वाजणारे नुसते वाद्यसंगीत. कल्लोळ आहे नुसता..

हॉटेल कॅलिफोर्नियाचे असंख्य अर्थ लावले गेले. ड्रग्जच्या व्यसनापासून ते लॉस एन्जेलिसच्या शहरी लाईफच्या कॅप्टिवेटिंग शक्तीपर्यंत अनेक..

शिवाय त्यांचं "लाईंग आईज" सुद्धा माझं भयानक आवडतं गाणं. हल्लीच्या कितनी देर तक मधे त्यातले तुकडे वापरले आहेत.

.............

अजून असेच येऊ देत. डोअर्स, आबा, क्रिस आयझॅक, बॉन जोव्ही...

स्पा's picture

23 Aug 2011 - 2:15 pm | स्पा

लेख आवडल्या गेला आहे

मुलूखावेगळी's picture

23 Aug 2011 - 2:26 pm | मुलूखावेगळी

छान लेख
आनि गाण्यांची माहितीही सुंदरच
हॉटेल कॅलिफोर्निया सगळ्यात जास्त छान वाटते.

यातला शेवटचा गिटारवरचा भन्नाट म्युझिक-पीस कोणत्याही वादकाला आपल्याला वाजवता यायलाच हवा अशी महत्त्वाकांक्षा पैदा करणारा आहे.टोटल जबरा......

सहमत

जाई.'s picture

23 Aug 2011 - 10:59 pm | जाई.

+१००००००००००

अत्रुप्त आत्मा's picture

23 Aug 2011 - 3:54 pm | अत्रुप्त आत्मा

आणी हॉटेल केलीफोर्नीया....आमचा जीव की प्राण...येकदम खल्लास....दील नॉस्टेलजीक हो गया...थांकू

जे.पी.मॉर्गन's picture

23 Aug 2011 - 4:52 pm | जे.पी.मॉर्गन

जबर्‍या ! मी स्वतः ह्याबाबतीत बर्‍यापैकी औरंगजेब आहे. पण हे प्रकरण एकदम आवडेश ! "होटेल कॅलिफोर्निया" जसं भन्नाट तशीच "डेस्परॅडो" आणि "द लास्ट रेसॉर्ट" पण.

अरे बाकी पण बॅन्डस् बद्दल लिही ना मित्रा. माझ्यासारख्या पाश्चिमात्य संगीतातल्या अडाण्याला पिंक फ्लॉइड, डायर स्ट्रेट्स, रोलिंग स्टोन्स, बॅकस्ट्रीट बॉईज असल्या नावांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्यांच्याविषयी असं लेखन वाचायला आवडेल.

हा लेख भारीच ! :)

जे पी

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 6:11 pm | पल्लवी

>>तशीच "डेस्परॅडो" आणि "द लास्ट रेसॉर्ट" पण.
मी आता हेच्च लिहीणार होते !!!

वात्रट's picture

23 Aug 2011 - 5:13 pm | वात्रट

--------अरे बाकी पण बॅन्डस् बद्दल लिही ना मित्रा. माझ्यासारख्या पाश्चिमात्य संगीतातल्या अडाण्याला पिंक फ्लॉइड, डायर स्ट्रेट्स, रोलिंग स्टोन्स, बॅकस्ट्रीट बॉईज असल्या नावांबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. त्यांच्याविषयी असं लेखन वाचायला -------->>>१००% सहमत

डायर स्ट्रेट्स - वॉक ऑफ लाईफ, सल्टन्स ऑफ स्विंग

डोअर्स - लाईट माय फायर, पीपल आर स्ट्रेंज..

आर ई एम - मॅन ऑन द मून, एव्हरीबडी हर्टस, एंड ऑफ द वर्ल्ड

बिली जोएल - अपटाऊन गर्ल, रिव्हर ऑफ ड्रीम्स, वी डिडंट स्टार्ट द फायर

ड्युरान ड्युरान- व्हाईट वेडिंग, कम अनडन, ऑर्डिनरी वर्ल्ड

बॉय जॉर्ज - बाउ डाउन मिस्टर, कर्मा कमिलिअन

जॉर्ज मायकेल - प्रेयिंग फॉर टाईम, लास्ट ख्रिसमस आणि व्हॅम ग्रुप सोबतची सर्वच

बोनीएम - रिव्हर्स ऑफ बॅबिलॉन, डॅडी कूल, स्टिल आय अ‍ॅम सॅड, बॉब मार्लेसोबत "नो वुमन नो क्राय"

आबा - निना प्रेटी बॅलेरिना, एस्.ओ.एस., फर्नांडो.

यूबी ४० - कांट हेल्प फॉलिंग इन लव्ह, ब्रिंग मी युअर कप, रेगी म्युझिक, रीझन्स.

क्रिस आयझॅक- सॅन फ्रान्सिस्को डेज, फाईव्ह फिफ्टीन, एक्सेप्ट द न्यू गर्ल, विकेड गेम, ग्रॅज्युएशन डे

गन्स अँड रोजेस- पेशन्स, नोव्हेंबर रेन

मेटालिका- अनफर्गिव्हन, व्हेरेव्हर आय मे रोम.

क्वीन - अंडर प्रेशर, अनदर वन बाईट्स द डस्ट, लिविंग ऑन माय ओन, आय वाँट टू ब्रेक फ्री (क्वीन हे प्रकरण तुम्ही आधी कव्हर केलं आहे.).

क्लिफ रिचर्ड्स - यंग वन्स, आउटसाईडर, समर हॉलिडे, डान्सिंग शूज, बॅचलर बॉय (स्वतः खरोखरच बॅचलर होऊन म्हातारा झालेला अत्यंत लाडका गायक)

मायकेल जॅक्सन (यावर तर ग्रंथ होईल.. झालेही आहेत आधीही) थ्रिलर, बिली जीन आणि असंख्य.

...............

काही नाही.. पुढच्या लिखाणासाठी रिट्रो इफेक्ट तापवणे आणि विषय सुचवणे असे दुहेरी काम चालू आहे.

निखिल देशपांडे's picture

23 Aug 2011 - 6:32 pm | निखिल देशपांडे

माझे काही अ‍ॅडिशन्स

गन्स अँड रोजेस- स्विट चाईल्ड ऑफ माईन

मेटालिका- नथिंग एल्स मॅटर्स

बॉब डिलन,पिंक फ्लॉईड, गन्स अँड रोझेस, एरिक क्लॅप्टन अशा अनेक लोकांनी सादर केलेले : नॉकिंग ऑन हेवन्स डोर...

पिंक फ्लॉइड: अनादर ब्रिक ईन द वॉल.. we dont need no education असे शब्द असणारे गाणे कॉलेज अ‍ॅन्थमच म्हणावे लागेल, फ्लॉईडचे पुढचे गाणे म्हणजेच कंर्फटेबली नंब

ऑएसिसः वंडरवॉल

ग्रिन डे: बुलावॉर्ड ऑफ ब्रोकन ड्रिम

निर्वाणा: लिथियम

लिंकिन पार्क : फ्रॉम दि इनसाईड

प्रास's picture

23 Aug 2011 - 7:02 pm | प्रास

नोंद घेतली गेली आहे हे वेगळे सांगायला नको....

:-)

जे.पी.मॉर्गन's picture

24 Aug 2011 - 12:42 pm | जे.पी.मॉर्गन

हा आणि निखिलचा प्रतिसाद कॉपी पेस्ट करून घेतल्या गेलेल्या आहे :)

जे पी

निखिल देशपांडे's picture

23 Aug 2011 - 6:21 pm | निखिल देशपांडे

वेल वेल..
ईगल्स... हॉटेल कॅलिफॉर्निया लई भारी आठवणी...
काहीही कळत नसताना सुद्धा त्या अमेझिंग गिटार साठी अनेक वेळा एकलेले गाणे.. माझ्या माहिती नुसार ईगल्स चा शेवटचा अल्बम २००७ चा.. लाँग रोड टु ईडन....

टेक ईट इझी हे गाणे बहुदा स्कूटीच्या पहिल्या अ‍ॅड मधे वापरल्या गेले होते. आफ्ताब शिवदासानी पावसात झाडा खाली उभा असतो आणि त्याची गर्लेफ्रेंड स्कुटी घेउन येते आणि पिवळा रेनकोट काढते अशी काही अ‍ॅड...

यात आत्ता पर्यंत आलेल्या प्रतिसादात एकानेही निर्वाणाचे नाव नाही घेतले हे बघुन आश्चर्य वाटले.. कर्ट कोबेन आज असता तर अशा चर्चा करुन सुद्धा आता खुप दिवस झालेत.. कोबेन च्या लाईफ बद्दल लिहायचे आहे पण बघुयात कधी वेळ मिळतो ते... तो पर्यंत निर्वाणाचे मॅन हु सोल्ड द वर्ल्ड

प्रास's picture

23 Aug 2011 - 7:01 pm | प्रास

कर्ट कोबेन लायनीत उभा आहेच हो!

आवडतो तो ही आपल्याला..... त्याच्या गुणदोषांसकट.....

:-)

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 6:25 pm | पल्लवी

अतिशय आवडते गाणं !! आणि माहिती लिहिलिये प्ण भारी ! आवड्ले.

उगीच जाता जाता :
हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा ह्या गाण्यासंबधी अनेक अफवा ऐकण्यात आल्या. म्हणजे हॉटेल कॅमिफोर्निया हे एक चर्च होते जेथे सॅटॅनिक बायबल लिहिले गेले आणि ब्लॅकमॅजिक वगैरे करण्यात येत असे ; आणि गाण्याचे शब्द म्हण्जे काळया शक्तिच्या जागेचे वर्णन आहे ( you can never leave, etc ) इ.इ. उपलब्ध माहीतीनुसार हे कधीच सिदध वगैरे झाले नाही, पण ह्या गाण्याचा विषय निघाला की हे ही चर्चिले जातेच !

आत्मशून्य's picture

23 Aug 2011 - 7:05 pm | आत्मशून्य

सिस्टम ओफ अ डाऊन मधलं लाइफ इज वॉटरफॉल एकदम जबर्‍या. रो़क साँग ऐकंणे म्हणजे त्यातील भावभावना कर्कशपणा व नंतर अचानक तयार होणीरी शांतता याचा खेळ मनाने सूक्षपणे अनूभवणे होय, म्हणूनच याची खरी मज्या अमली पदार्थ घेऊन मगंच ऐकण्यात येते असं का म्हणतात याचा अंदाज हे गाणं ऐकताना योग्य नीरीक्षण/फिल केले तर सहजी येऊ शकतो. हे करताना संगीतातील कर्कशपणा व शांतता याचा खूबीने झालेला वापराचे निरीक्षण करून मनामधे जी विशीश्ट उत्तेजना व पोकळी अत्यंत तीव्रतेने पण एकामागोमाग येणार्‍या लाटांप्रमाणे पाठोपाठ आलटून्पालटून व विषीश्ट अंतर राखून नीर्माण होते / संपूर्ण भरून राहते ज्याची उपमा केवळ बेभान करणार्‍या आनंद लहरीं अशाच शब्दामधे व्यक्त होऊ शकते, अशा उर्जात्मक आनंद लहरी शरीरात जिरवणे (मनातल्या मनात जीरवणे) आवाक्याबाहेर होत राहील्याने त्याचा अविश्कार बेहोशपणे बेधूंद होणे , ऊत्तेजीत होणे, विक्षिप्त वर्तन घडणे या स्वरूपात एखाद्या अनियंत्रीत स्फोटाप्रमाणे जीवात जीव असे पर्यंत वारंवार व्यक्त होत राहीला तर यात आश्चर्य ते काय. आणी सोबतच गाण्यात जर फिलॉसोफीची जोड असेल तर अजून काय पाहीजे त्या क्षणाला.......

_______

रॉक्सी म्यूजीक इफ देर इस समथिंग , अप्रतीम गाणं. याचा वापर डॅनीअल क्रेगच्या फ्लॅशबॅक्स ओफ अ फूल मधे तर इतका जबर्‍या करण्यात आला होता की बास..... अक्षशहः हडभडून आलं... गाण आहेच तसं मस्त, प्रेमाची आर्त साद घालणारं. .... शेक योर हेअर गर्ल विद द पोनीटेल... टेक्स मी राइत्ट बॅक व्हेन यु वेर यंग, थ्रोव योर प्रेशीअस गिफ्ट इंद एर.. वॉच देम फॉल डाऊन व्हेन यु वेर यंग.... अहाहा.. शेवट तर अप्रतीम

बाकी मायकेल जॅक्सन तर आपलं आद्य दैवत. एखाद्या गाण्यातील शब्द, भावार्थ, भावना, एनर्जी, चाल व ठेका, थीम, नृत्य वा प्रत्यक्ष चित्रीकरण करावे ते फक्त व फक्त मायकेल जॅक्सननेच... न भूतो न भविष्यती.. पून्हा मायकेल जॅक्सन होणे नाही, त्याचे वान्ना बी स्टार्टींग समथींग जास्त फेवरीट. टू हाय टू गेट ओव्हर टू लॉव टू गेट अंडर.. यू स्टक इंद मीडल.. द पेन इज थंडर बाकी एकॉन ने ही वान्ना बे स्टार्टींग समथींग मस्त रीमेक केलय....