|| वैभव संपन्न गणेश ||

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
14 Aug 2011 - 11:14 pm

|| वैभव संपन्न गणेश ||

१९७८ साली मी विद्यार्थी दशेत असताना बेलूर आणि हळेबीड येथील मंदिरे पहावयास गेलो होतो.तेथे असलेल्या गणेशमूर्ती पाहिल्या आणि मी भारावून गेलो.त्या दागिन्याने खूप सजवलेल्या होत्या पण मला ते दागिने जास्त बोजड वाटले. माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपल्या पारंपारिक मूर्तीला असे दागिने घातले तर आणि जरा नवीन पद्धतीचे दागिने घातले तर ती मूर्ती कशी दिसेल!म्हणुन मी दागिन्यांचा अभ्यास करु लागलो. भारतीय चित्रकार अब्दुल रहमान आप्पाभाई आलमेलकर यांच्याकडून मी दागिन्यांचा अभ्यास केला.त्यावेळी आमच्याकडे पांडुरंग भिकाजी चव्हाण म्हणुन वयोवॄद्ध कारागीर होते,त्यांच्याकडून मातीच्या दागिन्यांचा अभ्यास केला आणि १९८४ साली प्रथमतः आमच्या घरचा गणपती दागिन्यांनी मढवलेला शुशोभित केला.

पहिला दागिन्यांनी मढवलेला गणपती आणि त्यावेळी आमच्याकडे मोरगावचे गाढे गणेशभक्त वेदशास्त्र संपन्न गजानन पुंडशास्त्री गणपती दर्शनास आले. ते गणेशमूर्ती पाहुन अतिशय खूष झाले.मूर्ती पाहताच म्हणाले काय वैभव आहे! जणु काही देवांचा राजाच्.वैभव संपन्न अशी आपली एखाद्या राजा बद्धल कल्पना असते असा राजा.

गणपती अथर्वशीर्ष आणि गणेश कोश यांच्या आधारावर ही गणेशमूर्ती बनवली आहे. पारंपारिक बैठक सौम्य पण तिक्ष्ण नजर.त्याच्या कानात कर्णफुले आणि बिकबाळी आहे. उजवा हात अभय व वरदहस्त आहे.त्याच हातात दात धरलेला आहे,की जे गणपतीने लेखणी आणि शस्त्र म्हणून वापरले आहे.सोंडेवर ॐ आहेच पण त्यावर कमळाची नक्षी काढलेली आहे. कमळाचा त्याने शस्त्रासारखा उपयोग केला आहे.एका राक्षचा वध केल्याचा गणेश पुराणात उल्लेख आहे,हे कमळ त्याला ब्रम्हदेवाने दिले(गणेशपुराण उपा.खंड अ.१०)यालाच रद असे म्हणतात.परशुरामाशी झालेल्या युद्धात त्याला ही शक्ती प्राप्त झाली.त्याच हातावर लाल रंगानी स्वस्त्तिक काढलेले आहे.स्वस्तिकाचा संबंध तर गणपतीशी अगदी निकटचा आहे.कोणत्याही धार्मिक मंगल कार्यात कुंकवाने किंवा चंदनाने स्वस्तिक काढायची प्रथा आहे.स्वस्तिक हे ओमकाराचे स्वरुप मानलेले आहे,आणि गजानन हा ओमकार आहे.

डाव्या हातात मोदकाची वाटी आहे.मोदका इतके गजाननाला दुसरे प्रिय पक्वान्न नाही.याला विशेष कारण ते देवांनी अर्पण केलेले आणि प्रत्यक्ष मातेच्या पार्वतीच्या हातून मिळालेले आहे.मागील हातात पाश आणि अंकुश आहे.पाश हे सुर्याने किंवा वरुणाने दिलेले आयुध आहे.(स्कंद पुराण सनत्कुमार संहिता अध्याय ७२ श्लोक ८४ ते ८७ गणेश उपासना खंड अ.१०)सोंडेत अमॄत कुंभ आहे.त्यामधे अमॄत तर आहेच पण सर्व ग्रहांना ज्याने पादाक्रांत केले ते नवग्रह सुद्धा त्यामधे आहेत्.असा अमॄत कुंभ तो भक्तांना देत आहे.

डोक्यावर मुकुट तुरा आहे.जेव्हा गणेशाने सेंदुरासुराचा वध केला तेव्हा ब्रम्हदेवाने आपल्या कन्या सिद्धी आणि बुद्धी यांचा विवाह गणेशाशी लावुन दिला, तेव्हा ब्रम्हदेवाने मुकुटतुरा गणेशाला बहाल केला.

गळ्यात कंठा,हार आहे.मोहनमाळ,बाजुबंद्,पोटावर बंधन्,कंबरपट्टा,पायात पैंजण,पाचही बोटातंगठ्या असे चारही हात गंडमाळ्,सोंडपट्टा घातलेला आहे.लाल रंगाचा कद नेसलेला आहे.अंगावर भरजरी शेला आहे.अगदी त्याचे वाहन उंदीर हा सुद्धा दागिन्यांनी सजवलेला आहे.असा हा गणपती रत्नजडीत सिंहासनावर बसलेला आहे.मागील प्रभावळ ही नागाची आहें. नागाचा अर्थ कालातीतता असा लावला जातों.नाग हा कालाचेच प्रतिक मानलेले आहे.पौराणिक संदर्भात गरुडाचा पक्ष घेउन अदितीसाठी गणेशाने नागांशी युद्ध केले,त्यांना जिंकले असा उल्लेख आहे.

असा हा "वैभव संपन्न गणेश" भक्तांना पावतो अशी आमच्याकडे येणार्‍या ग्राहकाची श्रद्धा आहे. अनेकांची न होणारी कामे त्या वैभवसंपन्न गणेशाला नवस बोलल्यावर होतात व नवस पूर्ण करण्यासाठी वैभवसंपन्न गणेश मूर्तीची ऑर्डर आमच्याकडे देतात्.भक्तांच्या मनात ही मूर्ती एव्हढी भरते की पुढे दरवर्षी ते याच मूर्तीची ऑर्डर देतात.

काही नामांकित व्यक्ती पुढील प्रमाणे:---

१) महेंद्र कपुर २)महेश कोठारे

३)प्रकाश तुलसीयानी ४)रूपकुमार राठोड

५)गोपिनाथ मुंडे ६)विलास अवचट

७) सर्वांच्या लाडक्या लता मंगेशकर हे दर वर्षी "वैभवसंपन्न गणेशमूर्ती" नेतात.

श्री.उद्धव ठाकरे आणि श्री.सुर्यकांत महाडिक आणि कै.प्रमोदजी नवलकर यांच्या कार्यालयात कायमस्वरुपी वैभवसंपन्न गणेशमूर्ती विराजमा झाली आहे.


मूर्तीकार प्रदीप रामकृष्ण मादुस्कर
मो. ९८९२२१५८७६
घर.२२०९२२६७

माझे मनोगत :--- गेल्या वर्षी डिंसेंबर मधे यशोधरेने तिच्या एका लेखात गणेशकोषाचा संदर्भ दिला होता.मी त्याविषयक तिला काही माहिती विचारली होती.तिने मला सांगितले की तो आता कुठेच मिळत नाही.या गणेश कोषावर (गणपती बद्धल) अधिक माहिती मिळावी असा विचार मनात होता, नंतर जालावर गणेशकोष /गणेश पुराण यावर शोध घेतला...शोध घेत असतानाच अचानक मादुस्कर असे नाव कुठल्याश्या लेखात मिळाले आणि मग मादुस्कर असा शोध जालावर घेतला,तेव्हा त्यांच्या वरचे काही लेख सापडले (त्यात वैभव संपन्न गणेश असा उल्लेख होता.) त्यात त्यांच्या गणेशमूर्तींच्या व्यवसाया विषयी वाचायला मिळाले.मनात इच्छा झाली त्यांना जाउन भेटावे.हल्ल्लीच काही महिन्यांपूर्वी तो योग आला आणि त्यांची भेट झाली. :)
मादुस्कर काकांनी त्यांच्या मूर्तींची कार्यशाळा मला दाखवली,तसेच वैभव संपन्न गणेश या मूर्ती विषयक वरील माहिती दिली.
आता गणपती जवळ येत आहेत तेव्हा ही माहिती इथे द्यावी असे वाटल्याने हा धागा टाकला.

(गजाननाचा दास)

संस्कृतीधर्मप्रकटनविचार

प्रतिक्रिया

चैतन्यकुलकर्णी's picture

14 Aug 2011 - 11:23 pm | चैतन्यकुलकर्णी

गणेश व गणेशासंबंधी माहितीही सुंदर व महत्वपुर्ण.
हल्ली बाजारात मिळणार्‍या बहुतांश मुर्तींच्या हातात शस्त्र वगैरे काहीच नसते. वस्तुतः वरीलप्रमाणे शास्त्रशुद्ध रीतीने मुर्ती बनवून पुजा केल्यास समाधान लाभेल.
लेखाबद्द्ल धन्यवाद.

जाई.'s picture

14 Aug 2011 - 11:33 pm | जाई.

सोप्या शब्दात छान माहिती दिलीत

लेखाबद्दल धन्यवाद

इंटरनेटस्नेही's picture

15 Aug 2011 - 1:11 pm | इंटरनेटस्नेही

.

अन्या दातार's picture

15 Aug 2011 - 12:15 am | अन्या दातार

अथर्वशीर्षाच्या काही श्लोकांचा अर्थ आज या लेखात मिळाला. माहितीसाठी अत्यंत धन्यवाद!

गणा मास्तर's picture

15 Aug 2011 - 1:43 am | गणा मास्तर

घाटावर गणेश मुर्ती मिळतात त्या स्टॉलवर. कोकणात मुर्तीशाळा असतात. मला वातत त्याला कारखाने असे पण म्हणतात. प्रत्येक घरचा पाट मुर्तीकाराच्या घरी नेउन दिला जातो. मग मुर्तीकार २-३ महिन्यात त्यावर मुर्ती बनवतात.
मागच्या वर्षी रत्नागिरीला अशा कारखान्यांना भेट दयायचा योग आला होता.
गणपती बाप्पा मोरया !!!

आपल्या इथे कोणी कोकणातले सभासद असतील तर यावर जास्त लिहु शकतील.

गणा मास्तर
भोकरवाडी बुद्रुक

रेवती's picture

15 Aug 2011 - 6:08 am | रेवती

फारच माहितीपूर्ण लेख!

चिरोटा's picture

15 Aug 2011 - 11:39 am | चिरोटा

उपयुक्त शास्त्रोक्त माहिती.
धन्यवाद.

इंटरनेटस्नेही's picture

15 Aug 2011 - 1:11 pm | इंटरनेटस्नेही

.

निनाद's picture

15 Aug 2011 - 12:07 pm | निनाद

वेगळी माहिती वाचायला मिळाली. लेख आवडला.

पर्नल नेने मराठे's picture

15 Aug 2011 - 12:31 pm | पर्नल नेने मराठे

हे मादुस्कर माझे शेजारी आहेत. मदनबाण आमच्या बिल्दिग मधे येउन गेलास तु

विनायक प्रभू's picture

15 Aug 2011 - 12:43 pm | विनायक प्रभू

व्वा.
सुंदर मुर्ती.
अवांतरः मदन बाण ह्या वर्षी बसवणार आहात ना गणपती?

अवांतरः मदन बाण ह्या वर्षी बसवणार आहात ना गणपती?
वरील फोटोत दिसणारा गणपती हा माझ्याच घरातील आहे.मादुस्करकाकांनी गणपतीचे दिवस नसताही माझ्यासाठी ही गणेश मूर्ती आयुधां सकट बनवुन दिली. १ मे ला बाप्पा माझ्या घरी कायम स्वरुपी वास्तव्यासाठी आला. :)
बाकी तुमच्या प्रश्नाचा रोख कळला...

सौंनी पसंत केलाय का रे हा गणपती?

मदनबाण's picture

15 Aug 2011 - 10:08 pm | मदनबाण

नाही.

ह्या वर्षी बसवणार आहात ना गणपती?
सर, तुम्हाला वेगळा प्रश्न विचारायचा असेल.
गणपती जरूर बसवतील्........विसर्जनाचे आत्ताच सांगता येणार नसेल.;)

विनायक प्रभू's picture

15 Aug 2011 - 1:16 pm | विनायक प्रभू

सायच्यांनो हे न कळ्वल्याशिवाय कळणार कसे?
असो.
अभिनंदन.

सहज's picture

15 Aug 2011 - 2:24 pm | सहज

मुर्ती व माहीती आवडली रे बाणा!

सुरेख माहिती.
मूर्तीही सुंदर आहे.

पाषाणभेद's picture

16 Aug 2011 - 9:08 am | पाषाणभेद

मदणा, वरचा फोटो 'वैभव संपन्न गणेशाचा' च ना? सुंदर मुर्ती आहे. (आणखी फोटो हवे होते.)

बाप्पाची मूर्ती खूपच सुंदर आहे.

किसन शिंदे's picture

16 Aug 2011 - 11:57 am | किसन शिंदे

बाप्पांच्या सुंदर मुर्तीसोबत लेखनही सुंदर झाले आहे.

॥ गणपती बाप्पा मोरया ॥

प्राजक्ता पवार's picture

16 Aug 2011 - 5:21 pm | प्राजक्ता पवार

सुंदर मुर्ती आहे .माहितीपुर्ण लेख .