प्रदीप कुलकर्णी ह्यांची '...मी खरा की तू खरा?' ही अप्रतिम गजल अनेक प्रश्न उभे करुन गेली आणि त्या प्रश्नांना वाचा फुटली ह्या काव्यातून!
........................................
...मी खरा की तू खरा ?
........................................
बॉस मज माझा विचारी - मी खरा की तू खरा ?
ही पुरे झाली 'हुशारी' - मी खरा की तू खरा ?
मध्यरात्री काल मी जे काम त्याचे उपसले...
आज तो म्हणतो दुपारी - मी खरा की तू खरा ?
उत्तराची मेल नाही धाडता आली मला...
प्रश्न आला तोच भारी - मी खरा की तू खरा ?
शेवटी घोळात मी! सार्याहुनी मोठ्या जरा...
मी पगारी; तू करारी - मी खरा की तू खरा ?
बॉस माझा, आणि त्याचा...याचसाठी झुंजती
याचसाठी 'चॅट'मारी - मी खरा की तू खरा ?
बातम्या देशील माझ्या बॉसला माझ्या परी....
व्हायची 'खानेसुमारी' - मी खरा की तू खरा !
बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे...
'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा !
कोण जाणे काय झाले? बॉस मी झालो अता -
- प्रश्न मी आता विचारी - मी खरा की तू खरा ?
चतुरंग
प्रतिक्रिया
3 Jul 2008 - 2:07 am | केशवसुमार
रंगाशेठ एकदम झकास विडंबन..
सगळ्याच द्विपदी आवडल्या..
(सध्याचा बॉस) केशवसुमार
स्वगतः मी खरा की तो खरा ?
3 Jul 2008 - 2:25 am | श्रीकृष्ण सामंत
वाचून करमणूक झाली
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
3 Jul 2008 - 4:02 am | बेसनलाडू
आवडले;पण काही द्विपदी संदिग्ध वाटल्या.अर्थाच्या दृष्टीने गझल,विडंबन किंवा कोणतेही काव्य - जितके स्पष्ट,सहज तितके जास्त अपीलिंग :) विडंबन बाकी ओघवते झाले आहे.शब्दरचनेत कोठेही ओढाताण नाही,लय सांभाळली आहे.कार्यालयीन स्लँग्जचा वापर आणि एकंदर वातावरणनिर्मिती विशेष वाटली. कीप इट् अप्
(कामगार)बेसनलाडू
3 Jul 2008 - 8:36 am | विसोबा खेचर
बरळ तू सोईप्रमाणे जे तुला बरळायचे...
'बाटली' सांगेल प्यारी - मी खरा की तू खरा !
रंगा, हे मस्त! :)