गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषांतराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन मागणी बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.
आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'
पुढे मराठीचे महत्त्व विषद करण्यासाठी ते माहिती देतात,
'गुगलची भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगात मराठी भाषिक संख्येने पंधराव्या स्थानावर आहेत. याचा अर्थ मराठीहून संख्येने कमी असलेल्या ५० भाषांना या सेवेचा लाभ मिळतो. फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
इंडिअन रीडरशिप सव्र्हे या संस्थेनुसार भारतात वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत हिंदीनंतर मराठी वाचकांचा क्रम लागतो. त्यानंतर मल्याळी व इंग्रजी वाचकांची संख्या आहे. मराठी भाषेत आता १० दूरदर्शन वाहिन्या सक्रिय आहेत.'
असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.
मराठी माणसाची नाराजी गुगल पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून त्यांनी एक ऑनलाइन याचिका बनवली आहे. या याचिकेत सही करायला विसरू नका.
दुवा: www.petitiononline.com/gmarathi
तुमच्या प्रत्येक सहीचे महत्त्व आहे, आशा आहे यातून गुगलला काही तरी फरक पडेल!
भरत गोठोसकर लिखित लोकसत्ता मध्ये आलेला गुगलला मराठीचे वावडे का? हा लेख.
प्रतिक्रिया
20 Jul 2011 - 6:51 am | सहज
केली आहे.
20 Jul 2011 - 7:36 am | निनाद
याच वेळी गुगलवर भाषांतराचे कार्य सुरू आहे हे दिसून येते. Marathi Linguistic Team नावाचा एक गट काम करतांना दिसून येतो आहे. या याचिकेद्वारे त्यांना अजून बळ मिळेल असे दिसते.
गटाचे काम पाहण्यासाठी किंवा त्यात सामील होण्यासाठी हे पाहा - http://groups.google.com/group/marathi-linguistic-team/about
20 Jul 2011 - 7:36 am | गणा मास्तर
मिसळपाव उघडले की गूगल क्रोम 'This website is in Hindi, translate' असा पर्याय देते. तो पण बदलायला हवा,
20 Jul 2011 - 7:45 am | निनाद
गुगलच्या मुंबई कार्यालयात फोन करून कुणी चौकशी करू शकेल का की गुगल मराठीवर काम करणारी टीम कोणती आहे ते.
त्यांचा संपर्क मिळाला तर अनेक गोष्टींचा खुलासा होईल असे वाटते.
गुगल कार्यालयाचा मुंबईतील पत्ता २६४-२६५ वासवानी चेंबर्स पहिला मजला डॉ. अॅनि बेझंट रोड असा आहे.
फोन 6611-7200
पुणे-मुंबईकर फोन आणि नेटवर्कींग करून माहिती काढणार का?
20 Jul 2011 - 9:06 am | किसन शिंदे
सही केली आहे.
20 Jul 2011 - 9:08 am | सूड
सही केल्या गेली आहे.
20 Jul 2011 - 9:11 am | मदनबाण
ह्म्म...
या साठी कोणाला तरी मेला मेली केली का प्रतिक्रिया दिल्याची आठवते...
इंग्रजी शब्दांच्या वापरा शिवाय माय मराठीचे पान हलत नाही असं हल्लीच कुठ तरी ऐकल्याचे स्मरते... ;)
वेळ मिळताच वरच्या दुव्यावर जाउन माझे मत नक्की नोंदवीन.दुव्या बद्धल धन्स. :)
20 Jul 2011 - 9:47 am | निनाद
मी गुगलच्या पानावर पाहिले. भारताच्या टीममध्ये तेथे सर्व लोक फक्त अमराठीच आहेत. त्यातही दिल्ली आणि गुरगावचा जास्त भरणा आढळला.
याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही.
20 Jul 2011 - 9:59 am | मराठी_माणूस
याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात?
दाट शक्यता आहे
पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही.
पैसा
23 Jul 2011 - 4:38 am | धनंजय
बेंगळूरात कन्नड बोलत नाहीत कारण कन्नड लोकांत एकजूट नाही आणि पैसा नाही (असे कन्नडिग लोक म्हणतात). कन्नड भाषा गूगल भाषांतर प्रणालीत कशी आली असेल, हे कोडे राहातेच.
25 Jul 2011 - 11:16 am | निनाद
नेहमीप्रमाणे १००% धनंजय मुद्दा! :)
आवडलाच!!
25 Jul 2011 - 5:52 pm | छोटा डॉन
बंगरुळात 'कन्नड' बोलली जात नाही असे मला गेल्या ३ वर्षात अजिबात दिसले नाही असे सांगतो.
उलट बंगरुळात 'कन्नड' ही आग्रहाने बोलली आणि बोलवली जाते असा अनुभव आहे असे नमुद करतो.
बंगरुळात बस, सरकारी संस्था, स्थानिक संस्था आणि कमेट्या, सार्वजनिक उपक्रम अशा सर्व ठिकाणी आग्रहाने कन्नड बोलली जाते.
रिक्षावाले, हॉटेलवाले, दुकानवाले, टपरीवाले आणि तत्सम किरकोळ धंदा करणारे (ह्यात प्रामुख्याने नॉन-कन्नडिगा म्हणजे तमिळ, तेलगु, मल्याळी आणि युपी/बिहारी आहेत) ही आग्रहाने कन्नड बोलतात.
बंगरुळसारख्या कॉस्मोपॉलिटिन शहरात अजुनही आग्रहाची 'कन्नड फलक' सक्ती आहे, भले ती कायद्याने असो वा मारुनमुटकुन असो.
तरीही बेंगरुळी कन्नडिगांना अजुनही व्यवहारात 'कन्नड्'चे प्रमाण 'पुरेसे' नाही ही खंत किंवा चीड असतेच.
मी ह्याच गोष्टी जर पुण्या / मुंबईशी तुलना करुन पाहिल्या तर इथे चक्क 'हिंदीचा बोलाबाला' जास्त दिसतो आहे.
पुण्या/मुंबईत आता बहुतांशी व्यवहाराची भाषा ही 'हिंदी' झालेली आहे असे 'मला' निदर्शनास येते आहे.
असो, ही उगाच एक प्रॅक्टिकल माहिती.
बाकी मुळ चर्चा प्रस्तावाशी फारसा सहमत नाही त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन नाही.
गुगलने मराठी द्यावे की नको ह्याबद्दल माझा कसलाच आग्रह नाही, मात्र दिले तर मला आनंद होईल असे सांगतो, मात्र ते तसे देताना ते 'हास्यास्पद' नसावे ही माझी अपेक्षा आहे.
- छोटा डॉन
26 Jul 2011 - 6:40 am | निनाद
सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. मात्र हे कन्नड वातावरण कसे टिकवले जाते आहे या विषयी उत्सुकता आहे.
२००८ मध्ये हिंदी भाषांतर आले तेव्हा ते अगदीच हास्यास्पद असे. परंतु ते बदलण्याची सोयही त्यातच असते. काही वर्षात हिंदीचे भाषांतर स्वरूप बर्यापैकी बदलले आहे.
त्यामुळे माझी मोठी अपेक्षा नाही.
20 Jul 2011 - 10:29 am | नितिन थत्ते
सही केली आहे.
डावलणे वगैरे शब्द जरा ओव्हरबोर्ड वाटतात.
20 Jul 2011 - 10:34 am | मराठी_माणूस
डावलणे वगैरे शब्द जरा ओव्हरबोर्ड वाटतात.
मग तुमचा कयास काय ?
20 Jul 2011 - 10:33 am | सुमो
केली आहे.
20 Jul 2011 - 11:13 am | सुनील
गूगल ही १००% व्यापारी कंपनी आहे. मराठीला वेगळे काढण्यामागे त्यांचा काही विशेष हेतू असेल असे अजिबात वाटत नाही. काही तांत्रीक अडचणींमुळे मराठीत सेवा देण्यास विलंब लागत असेल, हीच शक्यता जास्त.
असो, सही केली आहेच.
20 Jul 2011 - 11:17 am | निनाद
अगदी हेच माझ्याही मनात होते. पण अजून शोध घेतल्यावर गुगलची टीम दिसली म्हणून कुतुहल वाढले. त्यांचा बायस असेलच असे नाही. पण त्यात एकही मराठी नाव नाही आणि प्रमुख भारतीय भाषा असली तअसलीमराठी नाही हा 'योगायोग' खटकला इतकेच.
20 Jul 2011 - 11:30 am | पाषाणभेद
अच्छा! असे असेल तर फारच विचार करायला लावणारी अवस्था आहे.
गुगळ्याला कोपच्यात घ्यावे लागेल आता.
अध्यक्ष
आंतरजालीय म.न.से. (मराठी नवनिर्माण सेना)
20 Jul 2011 - 11:27 am | शिल्पा ब
सही केलीये.
20 Jul 2011 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार
सही केल्या गेली आहे.
825 Signatures Total :- ह्यात अजुन वाढ होईल अशी अपेक्षा.
20 Jul 2011 - 12:34 pm | माझीही शॅम्पेन
नक्की !
+ १ सही केल्या गेली आहे. ८३४
20 Jul 2011 - 12:35 pm | पांथस्थ
सही केलेली आहे!
20 Jul 2011 - 1:03 pm | गणपा
सह्या* केल्या गेल्या आहेत. :)
* हे अनेक वचन आहे. डु आयडी कधी कामी यायचे. ;)
20 Jul 2011 - 1:15 pm | यकु
पण तरीही हे अवांतर लिहिल्या वाचून राहवत नाही :
गुगल वर मराठी यावी म्हणून याचिका
खड्ड्यात गेलं ते गुगल.. व्यापारी कंपनीकडे याचिका कसल्या करताय?
मराठी माणसे म्हणून कुठेही याचना, विनंत्याच करीत सुटायचे काय ?
आहेत त्या भाषांतर सुविधांचा बोर्या वाजवलाय तेच आधी नीट करा म्हणावं..
देवनागरीत उपलब्ध असलेला कंटेट तसाही देवनागरीत सर्च मारला तर राउंड अप होतोच कि..
(व्यावसायिक अनुवादक ) यशवंत
20 Jul 2011 - 5:39 pm | सोत्रि
सहमत, अवांतर एक्दम छान आणि चपखल.
तरीही एवढे सगळे लोक करतायत तर सही केल्या गेली आहे.
- (मराठी याचक) सोकाजी
21 Jul 2011 - 5:41 am | निनाद
पिटिशनला मराठी पर्याय हा मागणी नसून याचिका असाच आहे असे वाटते.
असो. तुमच्या म्हणण्यात तथ्य आहे त्यामुळे शब्द बदलला आहे! :)
आता ठीक ना?
21 Jul 2011 - 11:08 am | चिरोटा
सहमत. यशस्वी कंपन्या आणि त्यातील कर्मचारी खूप ग्रेट असतात असा आपल्याकडे समज आहे. त्यात गूगल्/फेसबूक सारख्या 'जग बदलायला' निघालेल्या कंपन्या असतील तर बघायलाच नको.
21 Jul 2011 - 3:48 pm | सोत्रि
कशाशी सहमत आणि नेमके काय म्हणायचे आहे ते कळले नाही?
ते तसे नसते असे आपल्याला म्हणायचे आहे का? कर्मचारी खूप ग्रेट असणे ह्याचा कंपनीच्या यशाशी काहीही संबंध नसतो असे म्हणायचे आहे का ?
- (यशस्वी कंपनीचा खूप ग्रेट कर्मचारी ) सोकजी
21 Jul 2011 - 4:09 pm | परिकथेतील राजकुमार
ह्याच न्यायाने असे विचारावेसे वाटते की मिपावर दोन्-चार प्रगल्भ सभासद आहेत म्हणून मिपाला प्रगल्भ म्हणावे का? किंवा मिपाला प्रगल्भ म्हणल्याने सर्व मिपाकर प्रगल्भ समजले जातील काय ?
उपकथेतला पराक्रमकुमार
21 Jul 2011 - 4:34 pm | सोत्रि
'मिपा' जर सशुल्क केले तर ह्या प्रश्नाचे उत्तर आपोआप मिळेल, म्हणजे खरेच किती प्रगल्भ मिपाकर मिपावर आहेत हे कळेल :)
कारण जो पर्यंत यशाचा ( किंवा कशाचाही) 'अर्थाशी' अर्थाअर्थी संबंध येत नाही तोपर्यंत असले पोकळ प्रश्न मनाचे खेळ घडवून आणतात.
- (स्वयंघोषित प्रगल्भ) सोकाजी
21 Jul 2011 - 4:38 pm | परिकथेतील राजकुमार
आज काही न करता येवढे माज दाखवणारे उद्या पैसे भरल्यावर किती माज दाखवतील ?
कंपुग्रस्त
20 Jul 2011 - 1:28 pm | स्मिता.
सही केलीये.
20 Jul 2011 - 5:55 pm | धमाल मुलगा
सकाळपासून प्रयत्न करत होतो तर काय त्या सायटीला झालं होतं कोण जाणे..बघावं तेव्हा 'Internal server error' फेकत होतं. शेवटी आत्ता काम झालं बुवा. आत्तापावतो फक्त १३५७ जणांनीच अशा मागणीला पाठिंबा दर्शवलाय?
च्छ्या:! मराठी माणूस कधी सुधारायचा कोण जाणे.
20 Jul 2011 - 10:27 pm | नावातकायआहे
केली.
लंबर वाढला. १६९३.
21 Jul 2011 - 8:15 am | नरेशकुमार
सगळे आयडी कामाला लावलेले आहे.
(मोठ्या मुश्किलिने एक्स्सेल शोधली सकाळी. होते नव्हते तेवढे ईमेल वापरुन ट्राय मारत आहे.)
घरी मिसेसला ईमेल केला आनि तिच्या मैत्रीनींना पन सांगायला सांगितले आहे.
घरातले सगळे साईन कर्तील.
21 Jul 2011 - 10:08 am | ऋषिकेश
हाफिसातून ते संकतस्थळ ब्यान दिसते आहे :(
घरी जाताच सहि करतो.
बाकी गुगलने मराठीला वगळले हे कितपत योग्य आहे माहित नाहि कदाचित फक्त ट्रान्स्लेट मधून वगळले असेल. घरी गुगल्ची बहुतांश पाने (अगदी गुगल म्याप देखील) मराठीत आहेत
21 Jul 2011 - 4:01 pm | पाषाणभेद
मी मराठी प्रेमीच आहे. उगाचच वाद नको.
पण एक सांगा. या पिटीशनऑनलाईन.कॉम ही साईट ज्यांच्याविरूद्ध पिटीशन दाखल करतो ते पाहतात का? मला तर ती एक कमर्शीअल साईट वाटते आहे.
21 Jul 2011 - 6:12 pm | पुष्करिणी
२५१७
22 Jul 2011 - 7:41 am | नितिन थत्ते
आजच्या लोकसत्तात आलेले वाचकाचे पत्र-----
आपण मराठी भाषकांचा न्यूनगंड इतका खोल आहे की, तो कधी आणि कुठे अभिव्यक्त होईल हे सांगता येत नाही. आपण नेहमी अन्यायग्रस्त आहोत, असे वाटणे हे या न्यूनगंडाचेच एक लक्षण. गुगलला मराठीचे वावडे का?’ या लेखात हीच मनोभूमिका व्यक्त झालेली दिसते. गुगल ही एक नफा कमावणारी व्यावसायिक कंपनी आहे, त्यामुळे ती कंपनी आपल्या सेवा कोणत्याही भाषेसाठी उपलब्ध करून देऊन अथवा न देऊन न्याय अथवा अन्याय करणे तत्त्वत:च अशक्य आहे. गुगलने जर आपल्या सेवा मराठी भाषकांसाठी उपलब्ध केलेल्या नसतील तर त्यांना तसे करण्यास फारसा नफा जाणवलेला नसेल किंवा असलेला नफा दिसला नसेल. ही त्यांची व्यावसायिक चूक असू शकते. ती दुरुस्त करण्यास आपण गुगलला मदत करू शकतो. त्यामुळे मराठीच्या विकासाला हातभार लागेल, पण त्यासाठी आपल्यावर अन्याय झालेला आहे ही भावना बाळगण्याची अजिबात गरज नाही आणि ‘मराठी बाणा’ वगैरे दाखविण्याचीही गरज नाही. अस्मिता’ आणि अन्यायग्रस्तता’ या दोन बाजू असलेले नाणे आपण आपल्या चलनातून बाद करू, तेव्हाच आपले मराठीवरील प्रेम निर्भेळ होईल.
22 Jul 2011 - 7:52 am | निनाद
न्युनगंड आहे की नाही याच्याशी काही घेणं देणं नाही - भाषांतराची सर्व्हिस (फुकट) हवी आहे.
ती गुगल ने देवो किंवा अजून कुणी... ;)
22 Jul 2011 - 8:02 am | नितिन थत्ते
मान्य आहे. म्हणूनच पिटिशनवर सही केलीच आहे. (एकच)
मी गुगलच्या पानावर पाहिले. भारताच्या टीममध्ये तेथे सर्व लोक फक्त अमराठीच आहेत. त्यातही दिल्ली आणि गुरगावचा जास्त भरणा आढळला.
याचाही परिणाम असेल का मराठीला डावलण्यात? पण मग गुजराती कशी काय येते काही समजत नाही.
वगैरे गोष्टी "अन्याय" होत असल्याची भावना आणि म्हणून न्यूनगंड दाखवतात.
¦
22 Jul 2011 - 8:05 am | निनाद
अगदीच शक्य आहे!
आपला
निन्युन आपलं... निनाद!
24 Jul 2011 - 11:28 pm | पंगा
'Mary had a little lamb'चे हिंदी भाषांतर जेथे 'मेरी एक भेड़ का बच्चा था' असे होते, तेथे मराठीत भाषांतराची सुविधा नसणे ही नेमकी अडचण आहे की वरदान, याबद्दल साशंक आहे.
22 Jul 2011 - 10:21 am | मराठी_माणूस
गुगलने जर आपल्या सेवा मराठी भाषकांसाठी उपलब्ध केलेल्या नसतील तर त्यांना तसे करण्यास फारसा नफा जाणवलेला नसेल किंवा असलेला नफा दिसला नसेल
हे गृहीतक कशावर आधारीत आहे ? आणि अन्य भारतीय भाषा मधे उपलब्ध केलेल्या सेवा ह्या ज्यास्त फयदेशीर (नफा देण्यार्या) होत्या कींवा तसे जाणवले होते ह्याचा काही विदा आहे का ?
(अवांतरः शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्याला म्हणायचे आहे का )
22 Jul 2011 - 11:50 am | ऋषिकेश
हे सांगता येणार नाहि मात्र त्या मराठी माणसाच्या न्युनगंडाचा फायदा करून घेतात, तो कुरवाळतात हे नक्की (आता हे योग्य की अयोग्य हा वेगळा विषय आहे )
22 Jul 2011 - 12:54 pm | मराठी_माणूस
मराठीत पाट्या लावणे कायदेशीर असताना, मुद्दाम न लावणे, किंवा खोडसाळ्पणे अगदी बारीक टाईपात छापणे , मराठी गाणी रेडीओवर लावणे म्हणजे "डाउन मार्केट" समजणे. इथल्या ईंग्लीश वृत्तपत्रानी दखल न घेणे
ह्यातसुध्दा , मराठी माणसाचा न्युनगंड आहे का ?
22 Jul 2011 - 5:17 pm | ऋषिकेश
होय
मराठीत पाट्या लावणे कायदेशीर असताना, मुद्दाम न लावणे, किंवा खोडसाळ्पणे अगदी बारीक टाईपात छापणे , मराठी गाणी रेडीओवर लावणे म्हणजे "डाउन मार्केट" समजणे. इथल्या ईंग्लीश वृत्तपत्रानी दखल न घेणे
अधोरेखीत शब्द न्यूनगंडच दर्शवतात असे वाटते.
किती मराठी माणसांनी (न्यूनगंड बाजूला सारून) कायदेशीर पाटी न लावल्याबद्दल रितसर तक्रार केली आहे?
किती मराठी माणसांनी मराठी गाणी नसल्यास रेडीयो ऐकणे बंद केले आहे?
वर दिलेले प्रत्येक उदा हे व्यावसायिक आहे. ग्राहकाने माल घेणे बंद केल्यास सहज बदल होईल. मात्र आपल्याला कोणीतरी मारून राहिलेले आहे म्हणून कुढत रहाणे किंवा आकांडतांडव करणे हा न्यूनगंडाचाच परिणाम!
मुळ चर्चाविषय हा नसल्याने हा माझा या विषयावरील शेवटचा प्रतिसाद बाकी चर्चा व्यनी/खरडीतून अथवा वेगळा धागा उघडलात तर त्यावर करता येईलच
25 Jul 2011 - 11:14 am | llपुण्याचे पेशवेll
किती मराठी माणसांनी (न्यूनगंड बाजूला सारून) कायदेशीर पाटी न लावल्याबद्दल रितसर तक्रार केली आहे?
किती मराठी माणसांनी मराठी गाणी नसल्यास रेडीयो ऐकणे बंद केले आहे?
>> मूळात अशी कॄती करणे योग्य असे म्हणता येईल. पण परिणाम किती झाला? काहीही नाही. पुण्यामधे बसस्टॉपवर, अनेक दुकांनावर मराठी पाट्या नसल्यामुळे व्यथित होऊन सतीश गोरे नामक गृहस्थांनी एक चळवळ चालू केली होती. व त्या त्या ठीकाणी जाऊन पांढर्या कागदावर काळ्या शाईने लिहीलेले "कायद्यानुसार केवळ मराठीतच" असे लिहीलेले असे. त्यावर् कोणीही त्यांचे ऐकले असे वाटत नाही. कामगार आयुक्त शिंदे यांनी २००७ मधे अध्यादेश काढल्याव्रर एका कोपर्यात उपकार केल्यासारखे बोर्ड येऊ लागले. जिथे दुकानांची ही अवस्था तिथे रेडीओ केंद्रे ती ही खाजगी किती भाव देणार? पण खरोखर मनसे आंदोलनामुळे पुण्यात तरी ज्या हॉटेलात जाऊ तिथे मराठीमधे सेवा देणारा एकतरी वेटर असतो हा जाणवण्याइतका फरक आहे.
वर दिलेले प्रत्येक उदा हे व्यावसायिक आहे. ग्राहकाने माल घेणे बंद केल्यास सहज बदल होईल. मात्र आपल्याला कोणीतरी मारून राहिलेले आहे म्हणून कुढत रहाणे किंवा आकांडतांडव करणे हा न्यूनगंडाचाच परिणाम!
जिथे बहुतांश मराठी ग्राहकच इंग्रजी आणि अर्धवट हिंदीच्या नादापायी बाहेर मराठी बोलायला तयार नाहीत तिथे इतरांची काय कथा. त्यामुळे ज्या लोकांना मराठीचा अभिमान आहे त्या लोकांनी अशा कॄती करीत रहावे आमच्या त्याना सक्रिय पाठींबा राहील. बाकी आपल्या न्यूनगंडापायी ज्यांना असे काही करावेसे वाटत नाही त्यांनी त्या न्यूनगंडात खुशाल रहावे. बाकी बहिष्कार वगैरेचा किती परिणाम झाला माहीत नाही पण मनसे आंदोलनानंतर एफएम रेडीओ मधून मराठी आवाज येऊ लागले हे मात्र खरेच.
25 Jul 2011 - 11:19 am | निनाद
त्यामुळे ज्या लोकांना मराठीचा अभिमान आहे त्या लोकांनी अशा कॄती करीत रहावे आमच्या त्याना सक्रिय पाठींबा राहील. बाकी आपल्या न्यूनगंडापायी ज्यांना असे काही करावेसे वाटत नाही त्यांनी त्या न्यूनगंडात खुशाल रहावे. बाकी बहिष्कार वगैरेचा किती परिणाम झाला माहीत नाही पण मनसे आंदोलनानंतर एफएम रेडीओ मधून मराठी आवाज येऊ लागले हे मात्र खरेच.
+१ हेच म्हणतो!
25 Jul 2011 - 11:30 am | सहज
तरीच मागे एकदा पुणे- मुंबई वातानुकूलीत सार्वजनीक वाहनातून प्रवास करताना वारंवारीता स्वरनियमन दूरवाणीवर सुप्रसिद्ध मराठी कलाकार श्री. मकरंद अनासपुरे यांच्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' असे काहीसे गाणे अथवा सिनेमाची माहीती असलेला मुलाखत तथा प्रचार /प्रसार कार्यक्रम ऐकू येत होता.
आपल्याला काय ते हिंदी, मराठी व आंग्ल भाषेतील बोलणे इतके काय रुचले नाऽही पण मला किनै राव त्या मकरंद अनासपुरे यांच्या बोलण्याचा बाज लैच आवडुन र्हायलाना भौ!
25 Jul 2011 - 12:19 pm | llपुण्याचे पेशवेll
शक्यता नाकारता येत नाही.
22 Jul 2011 - 11:52 am | सुनील
शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्याला म्हणायचे आहे का
शिवसेना आणि मनसेच नव्हे तर सर्वच फॅसिस्ट संघटना ह्या लोकांच्या उपजत न्यूनगंडाचा (कधी-कधी न्यूनगंड निर्माण करून) फायदा घेतात, हे जागतिक सत्य आहे.
22 Jul 2011 - 1:57 pm | भडकमकर मास्तर
असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.
कोरियन फ्रेन्च इन्टरनेवापरकर्त्यांइतके मराठी जाल-वापरकर्ते नसावेत हा एक अन्दाज...
माझ्याकडे विदा नाही.. बाकी चालूद्यात
22 Jul 2011 - 5:22 pm | परिकथेतील राजकुमार
काही सुविधा नाहीत तर इतका उच्छाद मांडलाय, दिल्यावर काय करतील अशी भिती असावी.
23 Jul 2011 - 4:08 am | Nile
मराठी कूठे दिसतीए का?
25 Jul 2011 - 11:16 am | llपुण्याचे पेशवेll
मराठी कूठे दिसतीए का?
आम्ही हिंदी कुठे आहे ते बघत होतो. ती पण नाही दिसत. भारतीय असण्याचा गर्व वाटणे कमी झाला १ टक्क्याने.
25 Jul 2011 - 12:15 pm | Nile
तुमच्या तब्येतीला हा चांगला बदल आहे.
25 Jul 2011 - 12:25 pm | llपुण्याचे पेशवेll
शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
बाकी प्रस्तुत आलेखामधे हिंदीचा उल्लेख नाही हे पाहून गंमत वाटली. व डेटा प्रेझेंट करणारा अंबळ गल्ली चुकला आहे का असे वाटून गेले. असो. अधिक खुलाशाच्या प्रतिक्षेत.
25 Jul 2011 - 12:33 pm | Nile
प्रतिसादात दिलेला पाय चार्टचा उद्देश उद्धृत केलेल्या वाक्यांवर उजेड टाकण्याकरता होता. टॉप १५ इंटरनेट लँग्वेजेसचा तो चार्ट आहे, हिंदी टॉप १५ मध्ये आहे असा दावा तुमचा आहे का? त्याबरोबर अजून एक इमेज आणि स्रोत दिला होता, तो दूवा अचानक काम करेनासा झालेला दिसतो.
23 Jul 2011 - 2:36 am | रेवती
सही केलिये.
23 Jul 2011 - 4:52 am | धनंजय
गूगल ट्रान्सलेट सेवा मी हल्लीहल्ली वापरलेली नव्हती. आज पुन्हा बघितली
पूर्वी त्यातून मिळणारी भाषांतरे पुरती हास्यास्पद असत. आता हिंदीमधील भाषांतरे तितकी वाईट नाहीत. उदाहरणार्थ त्याला पुढील इंग्रजी वाक्ये दिली :
- - -
कुठल्याही कामासाठी निरुपयोगी असले, आणि अर्थाचा अनर्थ होत असला, तरी पूर्वीइतके वाईट नाही. इंग्रजीतून वरील परिच्छेद स्पॅनिशमध्ये भाषांतरित करता त्या मानाने थोड्याच चुका सापडल्या. आणि ढोबळ अर्थग्रहणाकरिता भाषांतर उपयोगी होते.
मराठी भाषांतर करता येत नसले, तरी मराठी भाषा त्या यंत्राला "ऑटो-डिटेक्ट" करता येते. वरील तिरप्या ठशातले वाक्य गूगल यंत्रात भरवता हे उत्तर मिळाले :
We are not yet able to translate from Marathi into Hindi.
हेही नसे थोडके.
(मला वाटते की चांगल्या प्रकारचे भाषांतरकर्ते सॉफ्टवेअर बनवणे बरेच कठिण असावे. निनाद यांनी सांगितलेल्या गूगलग्रूपमध्ये प्रगती होत असल्यास उत्तम.)
23 Jul 2011 - 11:31 am | परिकथेतील राजकुमार
अगदी सहमत. अहो मराठी माणूस सुद्धा डिटेक्ट होतो.
परवाच म्हणे एका मराठी माणसाने गुगलवरती 'फ्री लंच फॉर फाईव्ह पिपल इन फाईव्ह स्टार हॉटेल' असे सर्च केले तर त्याला रिझल्ट मध्ये 'काय कोकणस्थ का?' असे लिहून आले.
25 Jul 2011 - 3:27 am | आनंदयात्री
4289. फेसबुकावर पोस्टवल्या गेले आहे.
बाकी प्रतिक्रियांमध्ये, धनंजयांशी सहमत आहे.
25 Jul 2011 - 5:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
4673
-दिलीप बिरुटे
25 Jul 2011 - 5:32 pm | इरसाल
४६८२ सही केलीय बघू सही होते कि गलत.
लई वैट आवस्था.......