Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by निनाद on Wed, 07/20/2011 - 05:48
लेखनविषय (Tags)
समाज
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
शिफारस
वाद
गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषांतराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन मागणी बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे. आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!' पुढे मराठीचे महत्त्व विषद करण्यासाठी ते माहिती देतात, 'गुगलची भाषांतर सेवा ६४ भाषांमध्ये उपलब्ध आहे. जगात मराठी भाषिक संख्येने पंधराव्या स्थानावर आहेत. याचा अर्थ मराठीहून संख्येने कमी असलेल्या ५० भाषांना या सेवेचा लाभ मिळतो. फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत. इंडिअन रीडरशिप सव्‍‌र्हे या संस्थेनुसार भारतात वृत्तपत्रांच्या वाचकसंख्येत हिंदीनंतर मराठी वाचकांचा क्रम लागतो. त्यानंतर मल्याळी व इंग्रजी वाचकांची संख्या आहे. मराठी भाषेत आता १० दूरदर्शन वाहिन्या सक्रिय आहेत.' असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे. मराठी माणसाची नाराजी गुगल पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून त्यांनी एक ऑनलाइन याचिका बनवली आहे. या याचिकेत सही करायला विसरू नका. दुवा: www.petitiononline.com/gmarathi तुमच्या प्रत्येक सहीचे महत्त्व आहे, आशा आहे यातून गुगलला काही तरी फरक पडेल! भरत गोठोसकर लिखित लोकसत्ता मध्ये आलेला गुगलला मराठीचे वावडे का? हा लेख.
  • Log in or register to post comments
  • 13026 views

प्रतिक्रिया

Submitted by सहज on Mon, 07/25/2011 - 11:30

In reply to +१ by निनाद

Permalink

अच्छा

तरीच मागे एकदा पुणे- मुंबई वातानुकूलीत सार्वजनीक वाहनातून प्रवास करताना वारंवारीता स्वरनियमन दूरवाणीवर सुप्रसिद्ध मराठी कलाकार श्री. मकरंद अनासपुरे यांच्या 'तुला शिकवीन चांगलाच धडा' असे काहीसे गाणे अथवा सिनेमाची माहीती असलेला मुलाखत तथा प्रचार /प्रसार कार्यक्रम ऐकू येत होता. आपल्याला काय ते हिंदी, मराठी व आंग्ल भाषेतील बोलणे इतके काय रुचले नाऽही पण मला किनै राव त्या मकरंद अनासपुरे यांच्या बोलण्याचा बाज लैच आवडुन र्‍हायलाना भौ!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 07/25/2011 - 12:19

In reply to अच्छा by सहज

Permalink

शक्यता नाकारता येत नाही.

शक्यता नाकारता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 07/22/2011 - 11:52

In reply to गुगलने जर आपल्या सेवा मराठी by मराठी_माणूस

Permalink

अति अवांतर

शिवसेना, मनसे न्युनगंडा ने बाधीत संघटना आहेत असे प्रतिसाद देणार्‍याला म्हणायचे आहे का शिवसेना आणि मनसेच नव्हे तर सर्वच फॅसिस्ट संघटना ह्या लोकांच्या उपजत न्यूनगंडाचा (कधी-कधी न्यूनगंड निर्माण करून) फायदा घेतात, हे जागतिक सत्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Fri, 07/22/2011 - 13:57

Permalink

असे असूनही गुगलने मराठीला दूर

असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे. कोरियन फ्रेन्च इन्टरनेवापरकर्त्यांइतके मराठी जाल-वापरकर्ते नसावेत हा एक अन्दाज... माझ्याकडे विदा नाही.. बाकी चालूद्यात
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Fri, 07/22/2011 - 17:22

In reply to असे असूनही गुगलने मराठीला दूर by भडकमकर मास्तर

Permalink

असे असूनही गुगलने मराठीला दूर

असे असूनही गुगलने मराठीला दूर का ठेवावे हे अनाकलनीय कोडे आहे.
काही सुविधा नाहीत तर इतका उच्छाद मांडलाय, दिल्यावर काय करतील अशी भिती असावी.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sat, 07/23/2011 - 04:08

In reply to असे असूनही गुगलने मराठीला दूर by भडकमकर मास्तर

Permalink

फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन

फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन या भाषिकांपेक्षा मराठी भाषिक अधिक आहेत.
कोरियन फ्रेन्च इन्टरनेवापरकर्त्यांइतके मराठी जाल-वापरकर्ते नसावेत हा एक अन्दाज...
Image removed. Image removed. मराठी कूठे दिसतीए का?
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 07/25/2011 - 11:16

In reply to फ्रेंच, इटालियन किंवा कोरियन by Nile

Permalink

मराठी कूठे दिसतीए का? आम्ही

मराठी कूठे दिसतीए का? आम्ही हिंदी कुठे आहे ते बघत होतो. ती पण नाही दिसत. भारतीय असण्याचा गर्व वाटणे कमी झाला १ टक्क्याने.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 07/25/2011 - 12:15

In reply to मराठी कूठे दिसतीए का? आम्ही by llपुण्याचे पेशवेll

Permalink

उत्तम आहे.

भारतीय असण्याचा गर्व वाटणे कमी झाला १ टक्क्याने.
तुमच्या तब्येतीला हा चांगला बदल आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Mon, 07/25/2011 - 12:25

In reply to उत्तम आहे. by Nile

Permalink

शुभेच्छांबद्दल धन्यवाद. बाकी

शुभेच्छांबद्दल धन्यवाद. बाकी प्रस्तुत आलेखामधे हिंदीचा उल्लेख नाही हे पाहून गंमत वाटली. व डेटा प्रेझेंट करणारा अंबळ गल्ली चुकला आहे का असे वाटून गेले. असो. अधिक खुलाशाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Mon, 07/25/2011 - 12:33

In reply to शुभेच्छांबद्दल धन्यवाद. बाकी by llपुण्याचे पेशवेll

Permalink

उद्देश.

प्रतिसादात दिलेला पाय चार्टचा उद्देश उद्धृत केलेल्या वाक्यांवर उजेड टाकण्याकरता होता. टॉप १५ इंटरनेट लँग्वेजेसचा तो चार्ट आहे, हिंदी टॉप १५ मध्ये आहे असा दावा तुमचा आहे का? त्याबरोबर अजून एक इमेज आणि स्रोत दिला होता, तो दूवा अचानक काम करेनासा झालेला दिसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 07/23/2011 - 02:36

Permalink

सही केलिये.

सही केलिये.
  • Log in or register to post comments

Submitted by धनंजय on Sat, 07/23/2011 - 04:52

Permalink

गूगल ट्रान्सलेट

गूगल ट्रान्सलेट सेवा मी हल्लीहल्ली वापरलेली नव्हती. आज पुन्हा बघितली पूर्वी त्यातून मिळणारी भाषांतरे पुरती हास्यास्पद असत. आता हिंदीमधील भाषांतरे तितकी वाईट नाहीत. उदाहरणार्थ त्याला पुढील इंग्रजी वाक्ये दिली :
- - - A friend of mine found that most people on the Google India team were Hindi speakers from Gurgaon. This probably explains their prejudice against Marathi. But it still leaves unexplained how Kannada, Gujarati, Urdu and Telugu languages are among those listed in the Google Translate software. - - - हिंदी भाषांतर : मेरे एक दोस्त ने पाया कि Google भारतीय टीम पर ज्यादातर लोगों को गुड़गांव से हिन्दी वक्ताओं थे.यह शायद मराठी के खिलाफ अपने पूर्वाग्रह बताते हैं.लेकिन यह अभी भी अस्पष्टीकृत पत्ते कैसे कन्नड़, गुजराती, उर्दू, और तेलुगू भाषाओं Google अनुवाद सॉफ्टवेयर में सूचीबद्ध उन लोगों के बीच हैं.
- - - कुठल्याही कामासाठी निरुपयोगी असले, आणि अर्थाचा अनर्थ होत असला, तरी पूर्वीइतके वाईट नाही. इंग्रजीतून वरील परिच्छेद स्पॅनिशमध्ये भाषांतरित करता त्या मानाने थोड्याच चुका सापडल्या. आणि ढोबळ अर्थग्रहणाकरिता भाषांतर उपयोगी होते. मराठी भाषांतर करता येत नसले, तरी मराठी भाषा त्या यंत्राला "ऑटो-डिटेक्ट" करता येते. वरील तिरप्या ठशातले वाक्य गूगल यंत्रात भरवता हे उत्तर मिळाले : We are not yet able to translate from Marathi into Hindi. हेही नसे थोडके. (मला वाटते की चांगल्या प्रकारचे भाषांतरकर्ते सॉफ्टवेअर बनवणे बरेच कठिण असावे. निनाद यांनी सांगितलेल्या गूगलग्रूपमध्ये प्रगती होत असल्यास उत्तम.)
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Sat, 07/23/2011 - 11:31

In reply to गूगल ट्रान्सलेट by धनंजय

Permalink

सहमत.

मराठी भाषांतर करता येत नसले, तरी मराठी भाषा त्या यंत्राला "ऑटो-डिटेक्ट" करता येते.
अगदी सहमत. अहो मराठी माणूस सुद्धा डिटेक्ट होतो. परवाच म्हणे एका मराठी माणसाने गुगलवरती 'फ्री लंच फॉर फाईव्ह पिपल इन फाईव्ह स्टार हॉटेल' असे सर्च केले तर त्याला रिझल्ट मध्ये 'काय कोकणस्थ का?' असे लिहून आले.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Mon, 07/25/2011 - 03:27

Permalink

4289

4289. फेसबुकावर पोस्टवल्या गेले आहे. बाकी प्रतिक्रियांमध्ये, धनंजयांशी सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Mon, 07/25/2011 - 17:12

Permalink

सही केली

4673 -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 07/25/2011 - 17:32

Permalink

४६८२ सही केलीय बघू सही होते

४६८२ सही केलीय बघू सही होते कि गलत. लई वैट आवस्था.......
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com