बुद्धीबळ आणि अंतरराष्ट्रीय राजकारण

कोलबेर's picture
कोलबेर in जनातलं, मनातलं
24 Oct 2007 - 10:56 am

ह्या आठवड्याच्या टाइमह्या नियतकालिकामध्ये इराणचे अध्यक्ष अहमदेनिजाद आनि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ह्या दोघांचा एकत्र अर्धंपान भरुन छापलेला फोटो बघितला आणि काळजात चर्र झाले. अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती. सोळाव्या शतकातली विचारसरणी असणारा अहमदेनीजाद आणि रशियात येन केन प्रकारे आपली सत्ता अबाधीत ठेवणारा पुतिन ह्या दोघांची युती ही भरकटलेल्या अमेरिकन नेतृत्वाची परिणीती आहे. पण रशियासारख्या एकेकाळी जरी महासत्ता असणार्‍या पण सध्या तरी एक दरिद्री राष्ट्र म्हणून ओळख असणार्‍या राष्ट्राच्या इराण युतीची जगाने पर्वा का करावी? त्यासाठी इथे थोडासा जागतिक इतिहासातील संदर्भ देतो.

सध्याच्या जगातील सगळ्यात ज्वलंत आणि संवेदनशील भाग म्हणजे कोणता? असे विचारले तर ह्याचे उत्तर कोणेही देईल 'मध्य पूर्वेतील देश'. 'कोणत्याही प्रश्नांवर बेसुमार कत्तली हा एकमेव उपाय आहे' ह्या विचारसरणीवर आधारलेल्या अनेक अतिरेकी संघटना ह्याच भागात आपली मुळे घट्ट रोवुन आहेत. परंतु ह्या सगळ्यांच्यातील पाशवीपणाला वाट करुन देण्यासाठी त्याना सशत्र करत आहे रशिया आणि त्यातुन फुटलेली राष्ट्रे.साधारण नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला रेगनच्या नेतृत्वाखाली संपत आलेले शीतयुद्ध अखेर सिनियर बुश साहेबाच्या करकिर्दित एकदाचे संपले आणि जगाने तिसरे महायुद्ध टळले असा सुस्कारा टाकला. पण ह्या शीतयुद्धामध्ये रेगनने वापरलेली एक क्लुप्ती म्हणजे रशियाशी केलेली शस्त्रास्त्र स्पर्धा असे मानले जाते. आधिच डबघाईला आलेला रशिया ह्या शस्त्रांस्त्रांच्या शर्यतीत पार कंगाल झाला आणि शेवटी अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे मोडकळीस आला. अनेक वर्षंचे शीतयुद्ध जरी संपले तरी त्याने मागे ठेवली ती रशिया आणि त्यातून फुटलेली कंगाल राष्ट्रे, ज्यांच्याकडे खाण्या पिण्याची मारामार होती पण त्याचबरोबर कधिही न वापरलेल्या कोर्‍या करकरीत आधुनिक शश्त्रास्त्रांचे ढिगारे गंजत पडले होते. प्रत्यक्ष युद्ध तर कधी खेळलेच गेले नाही मग काय झाले ह्या प्रचंड शस्त्रसाठ्याचे?

शीतयुद्धांनंतर शस्त्रांची ही प्रचंड कोठारे उघडली गेली आणि हेजबुल्ला ते अल कायदापासुन सुदान आणि लायबेरिया पर्यंत ५ ते ९५ वर्षां पर्यंतच्या सर्वांच्या हातात ह्या बंदुका पोहचु लागल्या. आज जगभरात जवळपास प्रत्येक अतिरेक्याच्या हातात दिसणारी ऑटोमेटीक कलाशीनिकव्ह (ए के ४७/५६) ही बंदुक रशीयन बनावटीची आहे. (आपला संजय दत्त ज्यासाठी आयुष्यभरसाठी गोत्यात आला ती देखिल हीच बंदुक) बंदुका, तोफा, इतकेच काय लढाऊ विमाने आणि हॅलीकॉप्टर पासून विध्वंसक क्षेपणास्त्रापर्यंत कुणालाही, कुठेही रशियातुन पोहिचवले जाते. आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीतुन कल्पना येईल की इराण आणि रशिया ह्यांची युती इतकी धोकादायक का आहे ते. इराणला न्युक्लिअर रिऍक्टअर्स खरेदी करायचे आहेत आणि पुतिन तो सौदा लवकरात लवकरात करून कमाई करण्याच्या तयारीला लागला आहे.अर्थातच, जिथले नेतृत्व अतिरेकी संघटनांच्या पाठींब्यावर ठरते अश्या देशांच्या हातात अणुबाँब देणे म्हणजे अवघ्या जगावर संकट ओढावून घेण्यासारखे आहे.


इतके सगळे निराशाजनक लिहिल्यावर ह्या काळ्या ढगाला चंदेरी किनार लावण्यासाठी एक आशाजनक घडामोड देखिल देतो. रशियात ही सगळी अंदाधुंदी जरी माजली असली तरी त्यातूनच पुढे येत आहेत गॅरी कास्पारोव्ह सारखे बुद्धिजीवी नेतॄत्व. होय हाच तो बुद्धिबळाचा बादशहा ग्रँडमास्टर कास्पारोव्ह. ह्या नावाने एकेकाळी बुद्धिबळात निर्माण केलेला दबदबा त्यामागील बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासा पुरेसा आहे. हाच कास्पारोव्ह आता पुतिन राजवटीच्या दंडुकशाहीसमोर दंड थोपटून उभारला आहे. गेल्या एक दोन आठवड्यातील अमेरिकन कार्यक्रमांमध्ये त्याची मुलाखत पाहिल्यावर त्याच्या हुशारीची चुणुक दिसुन आली. राजकारण आणि राजकारणी असे म्हंटल्यावर आपल्या मनात जे एक चित्र उभारते त्याच्या बरोबर उलट चित्र कास्पारोव्हच्या मुलाखतींमधून दिसले. रशियात लोकशाही आणण्यासाठी कास्पारोव्ह आणि त्याचे समर्थक अक्षरशः जीव धोक्यात घालत आहेत.

कास्पारोव्हच्या अमेरिकन टी.व्ही. वरील मुलाखतीमध्ये उत्तरे देताना अनेक ठीकाणी त्याने आपल्या बुद्धिमत्तेची चुणूक दाखवून दीली. लोकाशाही आणायाचा कितीही प्रयत्न केला तरी रशियातील मने कधीही लोकशाहीचा स्विकार करणार नाहीत हे विधान खोडून काढताना त्याने उत्तर आणि दक्षिण कोरिया, तसेच तैवान आणि पश्चिम पूर्व जर्मनीची उदाहरणे देऊन आपली ह्या विषयवारील पकड दाखवली. उत्तर कोरिया आणि दक्षीण कोरिया दोन्ही देशातील लोक हे एकच असले तरी उत्तर कोरिया हा कट्टर साम्यवादामुळे मागासलेला देश तर दक्षिण कोरिया हा लोकशाही आणि खुली अर्थव्यवस्था असणारा प्रगत देश आहे. लोकांची मने एखादी व्यवस्था कधीही स्विकारू शकणार नाहीत हे विधान किती तकलादू आहे हे त्यातुन दिसून येते. त्याचबरोबर अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले.

मंडळी, रशिया म्हणजे काही कॅलीफोर्निया नव्हे. आपल्या शत्रुंना जेवणात विष घालून मारणार्‍या कुटील पुतिनसमोर बुद्धीजीवी कास्पारोव्ह किती टिकणार हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. पण असं झाल्यास संपुर्ण जगाच्या दॄष्टीने ती आनंदाची बातमी ठरेल ह्याची मला तरी खात्री असल्याने कास्परोव्हला शुभेच्छा देऊन हा लेख संपवतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
हाच लेख आमच्या अनुदिनीवर देखिल वाचता येईल.

राजकारणप्रकटनविचारबातमी

प्रतिक्रिया

नंदन's picture

24 Oct 2007 - 11:05 am | नंदन

वेगळ्या विषयावरील लेख आवडला. राजकारणाच्या बुद्धिबळात चौसष्ट घरांपेक्षा अधिक घरे असतात आणि कुठलेही प्यादे कसेही चालू शकते, असे मागे कास्पारोव्हच म्हणाल्याचे आठवते. ही जाण असलेला कास्पारोव्ह यशस्वी व्हावा असं वाटतं. अर्थात, हे यश केवळ पुतीनला पदच्युत करुन सत्ता संपादणे एवढ्यापुरतेच मर्यादित नसावे, तर एकंदरीतच रशियात आणि सभोवतीच्या लहान राष्ट्रांत लोकशाही स्थापन व्हावी या व्यापक अर्थाने असावे.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

आजानुकर्ण's picture

24 Oct 2007 - 11:09 pm | आजानुकर्ण

लेख आवडला. नंदनच्या प्रतिक्रियेशी सहमत

(सहमत) आजानुकर्ण.

बेसनलाडू's picture

24 Oct 2007 - 11:26 am | बेसनलाडू

(वाचक)बेसनलाडू

गुंडोपंत's picture

24 Oct 2007 - 11:32 am | गुंडोपंत

बापरे! काय हे भयंकर लोक आहेत!
इतके खतरनाक रशियन लोक त्यात ते भुके कंगाल... शिवाय त्यांच्या कडे ते अणु तंत्रज्ञान!
आणी तेही ते असे रस्त्यावर विकायला बसल्यासारखेच बसले आहेत बरंका.

शिवाय त्यांनी आजवरच्या इतिहासात दाखवूनही दिलय... की ते तेला साठी काहीही करू शकतात.

त्यांनीच का तो मधे हल्ला केला होता आफ्रिकेवर...? जाऊ दे त्या देशाचे काय इतके... एक फालतू देश!
आणी मध्य पुर्वेचे.. ? इस्राएल व्हायला त्यांनीच मदत केली की काय?
ते स्मार्ट बाँब वगैरे चे नका हो सांगु मला... रशियाकडे कुठे तंत्रज्ञान आहे? ते फक्त अमेरिकाच दाखवोन देणार अफगाणीस्तानात .

व्हिएतनाम? नाव नका काढू... आमच्या निरपराध सैनिकांवर इतके अत्याचार केले त्यांनी...

बायोलॉजीकल वेपन्स? छे छे!!! हे सगळे आम्हाला करावे लागले हो... अहो रशियाचे भूत होते ना मागे... कुणी विकले? सद्दामला... आम्ही...? काय खोटे बोलताय... इराणलाही...? वॉटरगेट? आता बाकी हद्द झाली बरका खोटेपणाची!

अणुबाँब... मानवतेला काळीमा? अहो काय बोलताय... जगाला वाचवण्यासाठी एक चारपाच लाख लोक मेले तर काय बिघडले?

काय म्हणता.. इराक मध्ये तितकेचे मेले? अहो जगात अराजक माजेल अराजक!

आम्ही जगाला वाचवण्यासाठी काही तरी करतो आहोत. त्यात काही लोक मेले... तर इतके काय?
आणी जरासे तेल आम्हाला मिळाले तर काय झाले इतके दुखायला पोटात?

काय म्हणता, असे वर्ष गेले नाही की ज्या वर्षी अमेरीकेने युद्ध केले नाही? छे छे धादांत खोटे बोलता तुंम्ही... आम्ही अतिशय शांततावादी देश आहोत. लवकरात लवकर जगाला वाचवलेच पाहिजे असे आमचे ठाम मत आहे. आम्ही मागेही क्युबाला वाचवायचा खूप प्रयत्न केला पण काय करणार?

आणी तो व्हेनेझुएलाचा व्ह्युगो... अहो त्यांना कळत नाही... त्यांचा देश त्यांनी आम्हाला चालवायला एकदा दीला की त्यांची... वाट लागेल...?? काहीतरीच काय बोलता?
युद्धखोर तो रशिया आणी इराण!
त्यांनी युद्धच केले नाही गेल्या पाच वर्षात? अहो तयारी करतायेत ते तयारी !!! जग जाणार युद्धाच्या खाईत...
धिस इज टू मच.
इन गॉड वुई ट्र्स्ट!
इन द नेम ऑफ गॉड या इव्हील एक्सेस ला गाडा

काय म्हणात निधर्मी आम्हीआम्ही तेच म्हणतोय हो... एकदा जगात फक्त एकच धर्म शिल्लक उरला की निधर्मीवाद अतिशय एफेक्टीव्हली राबवता येईल... आमच्या चर्च मध्ये या ना एकदा चर्चा करू या यावर.

अरेरे... तुमचा अगदीच बुद्धीभ्रम झालाय हो... तुम्हाला मदतीची गरज आहे.
हे पहा, आमच्या रिसर्च बेस असलेल्या कंपन्या लवकरच तुमच्या देशात येतील त्यांची औषधे... महाग?
अहो काय बोलताय काय? जीव वाचवतोय तुमचा आम्ही...
चोरलेले ज्ञान?
काहीतरीच! आम्ही कधी तुमचेच ज्ञान चोरले? आम्ही ते लिखित स्वरूपात मांडले! त्याला काही चोरी नाही म्हणत!

छे! तुमच्या बोलणेच शक्य नाहीये बॉ!
कम्युनिस्टांच्या एजंटांना वेचून मारले पाहिजे हेच खरे!

आपला
गुंडोपंत

कोलबेर's picture

24 Oct 2007 - 12:34 pm | कोलबेर

गुंडोपंत तुमच्या उपहासात्मक प्रतिसादातून अमेरीकवरील संताप सहज दिसून येत असला तरी काहीसा लोकशाही विरोध आणि कम्युनिझम प्रेम देखिल जाणवल्याने हा प्रपंच. लोकशाही ही पद्धती आदर्श असो वा नसो आजच्या घडीला प्रत्येक विकसीत राष्ट्राने (एखाद दुसरा अपवाद वगळता) हीच पद्धती अवलंबली असल्याने ह्याचा प्रगतीशी थेट संबध असावा असे वाटते. त्याचबरोबर साम्यवादावर चालणारी राष्ट्रे ही तुलनेता मागास (नॉर्थ कोरीया, रशिया, २० वर्षापुर्वीचा चीन) असल्याने त्याचा देखिल अधोगतीशी संबध असावा असे म्हणण्यास जागा आहे. माझा साम्यवादाचा अभ्यास नाही पण जॉर्ज ऑरवेलचे 'ऍनीमल फार्म' हे सुंदर पुस्तक वाचल्यावर ही पद्धती 'प्रॅक्टीकल' नाही हे पटले.

गुंडोपंत's picture

24 Oct 2007 - 2:40 pm | गुंडोपंत

उपहासात्मक प्रतिसादातून अमेरीकवरील संताप
कोणताही संताप नाही !
फक्त सहजपणे दिसणारा भामटा दुट्टप्पीपणा!

लोकशाही विरोध आणि कम्युनिझम प्रेम देखिल जाणवल्याने हा प्रपंच.
नाही हे ही नाही... लोकशाही ला आजिबात विरोध नाही.

आणि
या उपहासात माझा सूर तसा दिसत असला तरी कम्युनिझमचे प्रेमही नाही.

फक्त अमेरिकन लोकशाहीच किती चांगली
आणि फक्त त्याच आणी त्याच विचाराने
पुढे जाणे कसे चांगले याला मात्र पूर्ण विरोध!

अमेरिकन राजकारणी कोणतेही प्रकरण फक्त त्यांच्याच बाजूने
दाखवण्यात वाकबगार आहेत.
त्यासाठी ते अमाप पैसा वेगवेगळ्या कंसल्टंट्सवर खर्च करत असतात.

तुझा लेखही मला तरी संपूर्णपणे एकांगी वाटला (व वरचे सुचत गेल!)

इराण हे इस्लामी राष्ट्र आहे वगैरे ठीक पण त्यांचा नेता लोकशाही
मार्गाने निवडून आलेला आहे हे एक वाक्य या सगळ्यात कसे काय 'विसरले' जाते बॉ?

शिवाय अमेरिकेने केलेली युद्धे ही दर वर्षी आहेत. इराणने इराक शिवायचे पाहता कोणते युद्ध केले आहे?
इराणला वाटणारी इस्राएल ची भीती मात्र सार्थ आहे.
त्यांचे एकुण वर्तन पाहता त्यांच्या जवळपासचा कोणताही देश अशी काळजी घेईलच.

मी रशिया किंवा इराणचे समर्थन करत नाहीये.
मात्र अमेरिकेची री ओढणेही जमणे शक्य दिसत नाही...

आपला
गुंडोपंत

कोलबेर's picture

24 Oct 2007 - 9:54 pm | कोलबेर

गुंड्याभाऊ मी ह्या लेखातून अमेरीकेची री ओढतो आहे असे आपल्याला का वाटले ते समजले नाही. ह्या लेखातील काही वाक्ये पुन्हा देतो आहे.

अमेरिकेचे सध्याचे अत्यंत अकुशल आणि बेजवाबदार नेतृत्व जगाला कोणत्या उंबरठ्यावर आणून सोडत आहे ह्याची ही प्रचिती. सोळाव्या शतकातली विचारसरणी असणारा अहमदेनीजाद आणि रशियात येन केन प्रकारे आपली सत्ता अबाधीत ठेवणारा पुतिन ह्या दोघांची युती ही भरकटलेल्या अमेरिकन नेतृत्वाची परिणीती आहे.

अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले.

त्याचबरोबर,आंतरराष्ट्रीय राजकारणावर काहीही लिहताना लेख एकांगी होऊ नये म्हणून आधी अमेरिकेची वारेमाप निंदा नालस्ती दर वेळेला केलीच पाहिजे का?

गुंडोपंत's picture

25 Oct 2007 - 7:17 am | गुंडोपंत

गुंड्याभाऊ मी ह्या लेखातून अमेरीकेची री ओढतो आहे असे आपल्याला का वाटले ते समजले नाही.
कारण सर्व लेखात एकदोन वाक्ये वगळता अमेरिकेचीच बाजू दिसते आहे.

१. त्यात एकाही रशियन वृत्तपत्राचा हवाला नाही.
२. एकाही इराणी वृत्तपत्राचा हवाला नाही
(फक्त कॉस्पॉरॉव्ह हाच एक मुद्द)
३. रशिया किंवा इराण च्या गतकालीन व आताच्या धोरणांचा उहापोह नाही.
४. (नंतर दिलेल्या) डॉक्युमेंटरी च्या दुव्यातही अमेरिकन नाव दिसते आहे.

जर लेख फक्त अमेरिकन माध्यमांवर आधारीत आहे असे दिसते आहे तर तर तसा (अमेरिकावादी) अर्थ काढणे वावगे कसे ठरू शकते?

आपला
गुंडोपंत

रशिया मधे निरोगी लोकशाही वाढो ही सदिच्छा! कास्पारोव्ह सकट अजूनही पर्याय मिळोत.

बाकी अंदाधुंद शस्त्रखरेदी विक्रीला सर्वच प्रगत देश व तसेच ते घेणारे पण कारणीभूत आहेत. अमेरिकेनेपण नको त्या लोकांच्या हाती शस्त्र ठेवली आहेत. एखादा देश जेव्हा शस्त्रे निर्यात करतो तेव्हा काही आंतरराष्ट्रीय नियमांना बांधील असतो. व बहूतेक सर्व निर्यात ही यूनॉ मान्य देशांनाच योग्य कारणासाठी नियमानुसार होत असते.

हे कत्तली, इ. साठी वापरले जातात ती शस्त्रे सर्व खाजगी कंपन्यांकडून येतात ज्यात म्हणे ९८ देश येतात. (वरच्या लिंक मधे तसे लिहले आहे. अजून माहीती मिळाली तर टाकीन. अजून एक संबधीत दुवा बघा)यादी विचाराल तर सर्व देश जिथे भानगडी आहेत ती. (साउथ अफ्रीका, इस्त्राइल, जपान देखील प्रमूख मंडळी आहेत)विकत घेतले जातील असे देशात सर्व प्रगत व प्रमूख देशातील खाजगी कंपन्यांनी टाकली आहेत दुकाने. अफगान-पाकीस्तान सरहद्दीवर तर टपर्‍या आहेत जिथे टायर पंक्चर काढल्यासारखे शस्त्रे देशभग, बनवणे इ. होते. आता एके-४७ ही बंदूक जगात कूठेही बनते (उल्हासनगर मार्केट टाइप). आपल्या देशात इंपोर्टेडचे आकर्षण असले तरी बरीच खाजगी शस्त्रेपण बनतात. हा विषय, आवाका फार वेगळा आहे.

बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट

गुंडोपंत's picture

24 Oct 2007 - 11:58 am | गुंडोपंत

बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट

नायदर मी!

अशा प्रकारच्या लेखाला काय म्हणातात हो ?

हां "एज्युकेटींग पिपल विथ राईट इन्फॉर्मेशन"

सहजरावजराइट म्हणजे का विचारताय?
राईट म्हणजे जी आपल्याला राईट असते तीच! ;)))

आपला
(जगाच्या राजकारणा विषयी जरासा अज्ञ असणारा)
गुंडोपंत

कोलबेर's picture

24 Oct 2007 - 12:42 pm | कोलबेर

अहमदेनीजादला न्युक्लिअर रिऍ़क्टर्स आणि अणु तंत्रज्ञान पुरवण्यास हीच युती कार्यशील आहे. आज कट्टर इस्लामवादाचा पुरस्कार करणारे नेतृत्व असलेल्या जगातल्या सगळ्यात ज्वलनशील राष्ट्राला (टेड कॉपेलची डीस्कवरी वरील डॉक्युमेंट्री) न्युक्लिअर तंत्रज्ञान मिळणे मलातरी धोक्याचेच वाटत आहे. अर्थातच अजुन ह्यामध्ये अनेक घडामोडी घडतील हे ही खरे पण सध्या पुरते निदान ही युती 'अभद्र' आहे इतके तरी तुम्ही विकत घेतलेत तेही नसे थोडके ;-)

बाकी पुतीनचे काही प्रॉब्लेमस असतील, पण इराण-रशियाची अभद्र युती जागतीक शांतता धोक्यात! आय एम नॉट बायींग इट, यट

म्हणजे मला म्हणायचे होते की रशिया व इराणची जागतीक शांततेला धोक्यात टाकणारी अभद्र युती झाली आहे हे मी मानत नाही. (लगेच खुश होऊ नकोस :-)) असेच काही पुरावा पाहून बुश, ब्लेयर खूश व समाधानी झाले होते सद्दामकडे अणूबॉम्ब आहे म्हणून, सापडला का?

असो मला तु वेगळा विषय हाताळतोयस ह्याचा आनंद आहे. इतकच. :-)

आणी इराणच्या अणूबॉम्बची भिती फक्त इस्त्राइलाच :-) व ते तो धोका हाताळायला समर्थ आहेत ;-)

बाकी इराणला "जे नको ते" आण्वीक तंत्रज्ञान हे पाकचा अब्दूलकादीर खान, तसेच नॉर्थ कोरीया व ब्लॅक मार्केट मिलीट्री टेक्नोलॉजी व त्या इराणचे स्वतःचे हुशार तंत्रज्ञ यांच्याकडून मिळाले आहे "रशिया देशाकडून नाही" रशिया जे तंत्रज्ञान देते ते रशियाच्या पर्यायाने आंतरराष्ट्रीय समुदायाच्या नियमतत्वात बसते तसेच. मांडवली तंत्रज्ञान रे. म्हणजे अणूबाँब बनवता येणार नाही व कायम देखरेख असेल असे.

रशिया नेहमी अमेरीका, युरोपीयन युनियन यांना आपली ताकद (उपद्रव मूल्य) दाखवायला वाया गेलेल्या मुलासारखी बेजबाबदार गोष्टी करून दाखवत असते किंबहूना तसे धमकावत असते, खरे करायचे नसते. सोव्हीयेत युनीयन मोडल्याला इतकी वर्षे झाली खरोखर रशिया वाईट असती तर एव्हाना सगळ्यांनी अणूबॉम्ब बनवला असता. मी रशियाचे समर्थन करत नाही आहे पण उगाच असे पण बोलणार नाही की रशिया जागतीक शांतता धोक्यात आणेल.

स्वाती दिनेश's picture

24 Oct 2007 - 11:47 am | स्वाती दिनेश

लेख आवडला,अरुण साधूंचे "तिसरी क्रांती" अपरिहार्यपणे आठवले.
स्वाती

विसोबा खेचर's picture

24 Oct 2007 - 11:49 am | विसोबा खेचर

रशियात ही सगळी अंदाधुंदी जरी माजली असली तरी त्यातूनच पुढे येत आहेत गॅरी कास्पारोव्ह सारखे बुद्धिजीवी नेतॄत्व. होय हाच तो बुद्धिबळाचा बादशहा ग्रँडमास्टर कास्पारोव्ह. ह्या नावाने एकेकाळी बुद्धिबळात निर्माण केलेला दबदबा त्यामागील बुद्धिमत्ता सिद्ध करण्यासा पुरेसा आहे.

वरूणदेवा,

आपण अतिशय सुंदर लेख लिहिला आहे. अश्याच काही उत्तमोत्तम लेखांची आपल्याकडून यापुढेही अपेक्षा आहे....

गॅरीचा फोटो क्लासच आहे. आम्हीही गॅरी कास्पारावचे निस्सिम भक्त आहोत...

आपला,
(फ्रेन्च डिफेन्स प्रेमी) तात्या.

कोलबेर's picture

24 Oct 2007 - 12:57 pm | कोलबेर

अश्याच काही उत्तमोत्तम लेखांची आपल्याकडून यापुढेही अपेक्षा आहे....

जरूर तात्या.. जिथे जिथे "लोकशाही" तिथे तिथे आम्ही :-) प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

24 Oct 2007 - 11:12 pm | विसोबा खेचर

जरूर तात्या.. जिथे जिथे "लोकशाही" तिथे तिथे आम्ही :-)

धन्यवाद!

आपला,
तात्या वेलणकर! :))

देवदत्त's picture

24 Oct 2007 - 2:03 pm | देवदत्त

माहितीपुर्ण लेखाबद्द्ल धन्यवाद.
माझे ह्यातील ज्ञान कमीच.. वाढवायच्या प्रयत्नात आहे.

देवदत्त
(अर्जुनाचा शंख)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Oct 2007 - 4:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला.
बुद्धीजीवी कास्पारोव्ह राजकारणात येतोय आणि लोकशाहीचा समर्थन करतो त्याचा आम्हालाही आनंद आहे.
वरुणराव,
असेच नवनवीन लिहीत राहा.
पण, वरुणराव तिकडे कास्पारोव आणि त्याच्या समर्थकांना वातावरण अनुकूल आहे का ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोलबेर's picture

24 Oct 2007 - 10:25 pm | कोलबेर

तिकडे कास्पारोव आणि त्याच्या समर्थकांना वातावरण अनुकूल आहे का ?

प्रसारमाध्यमांवर कडक निर्बंध घालून पुतिन जगाला आपल्या अप्रुव्हल रेटींगचे खोटे आकडे दाखवतो आहे. पण प्रत्यक्षात तिथली जनता मात्र ह्या सरकाराल विटली आहे असे कास्पारोव्ह म्हणाला. खरे खोटे ते रशियन्सच जाणोत.

गुंडोपंत's picture

25 Oct 2007 - 7:25 am | गुंडोपंत

प्रसारमाध्यमांवर कडक निर्बंध घालून पुतिन जगाला आपल्या अप्रुव्हल रेटींगचे खोटे आकडे दाखवतो आहे.

१. काही संदर्भ?
२. आकडेवारी?
३. आधी व नंतर अशी केलेली तुलना?

आपला
गुंडोपंत

कोलबेर's picture

25 Oct 2007 - 7:53 am | कोलबेर

१) संदर्भ : पुतिनचे अप्रुव्हल रेटिंग; मिडियावरील निर्बंध
२) आकडेवारी: वर दिलेल्या दुव्यावर पुतिनचे अप्रुव्हल रेटींग ८५% आहे.
३) एखाद्या राष्ट्राध्यक्षाचे अप्रुव्हल रेटींग ८५% च्या आसपास असेल तर अशी तुलना करण्याची गरज नाही असे वाटते. तसेही मुद्दा हा सध्याचे पुतिनचे अप्रुव्हल रेटींग तो अतिशय लाडका नेता असल्याचे भासवत आहे पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे असा कास्पारोव्ह चा दावा आहे. तेव्हा आधी व नंतर अशी तुलना कशासाठी हवी आहे?

गुंडोपंत's picture

25 Oct 2007 - 9:30 am | गुंडोपंत

वा!
पहिला संदर्भ योग्य आहे असे वाटते. पत्ता रशियाचा आहे!
(मात्र तरीही, रशियन वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर अमेरिकेची एफ १८ विमाने अमेरिकेचा अभिमान ही वाक्य खटकून गेले. असो!)

दुसरा संदर्भही ठीक आहे. पूर्ण वाचन करायला वेळ मिळाला नाही...
(त्यात पुतीनचे जसे मिडिया ऑडीट केले तसे बुश चे ही इराक युद्धाचे करता येईल.
मेलेल्या सैनिकांचे कोणतेही प्रक्षेपण करण्यास मनाई वगैरे - असे वाटले तरीही लिंक दिली यात सगळे आले.)

असो,
एकुण संदर्भासहीत लेख या प्रकाराने गुंडोपंत खुष झाले आहेत.
कोणतीच फेकफेकी केलेली नाही.
म्हणून मी तुझे कौतुक करतो!

तळमळीने लेख लिहिलास शिवाय सर्व शंकांचे वव्यस्थित निराकरण केलेस. त्वरीत प्रतिसाद दिलेस.
(माझ्या प्रतिसादात्मक फालतू उपहासाला ही शांतपणे उत्तर दिलेस...)
संपादक व्हायला कोलबेरराव लायक आहेत हे वारंवार या सगळ्यातून सिद्धच होते आहे असे वाटते.

या सगळ्या त्यांच्या गुणांमुळे ते जर निवडणूकीत असतील तर आमचे मत त्यांनाच! :))

आपला
आपल्या पुढील लेखाची वाट पाहणारा...
गुंडोपंत

चित्रा's picture

24 Oct 2007 - 8:01 pm | चित्रा

योग्य वेळी लेख लिहीलात. चांगला झाला आहे. कॉन्डी राईस यांचे या विषयातले काय मत तेही लेखात यायला हवे होते असे वाटते, पण लेख हा रशिया आणि इराण युती यावर असल्याने काही जास्त बिघडले नाही. कालच पी. बी एस वर showdown with iran पाहिले. हा दुवा मिळाला बघायला तर नक्की बघा. कास्पारोवचे माहिती नव्हते.

अमेरिकेने आपला स्वार्थ साधण्यासाठी लोकशाहीच्या नावाखाली चालवलेली दादगिरी लोकशाहीला बदनाम करत आहे असे देखिल कास्पारोव्हने नमूद केले.

म्हणजेच तो सर्वसाधारण जनमताच्या बाजूने बोलतो आहे असे वाटते आहे.

प्रियाली's picture

25 Oct 2007 - 2:36 am | प्रियाली

वेगळ्या विषयावरचा आणि वेगळ्या धाटणीचा लेख आवडला.

हॉलीवूड चित्रपटांची परीक्षणे, तंत्रज्ञान, प्रवासवर्णन आणि उत्तम प्रकाशचित्रकारी याबद्दल वरूणची ओळख होती, आंतरराष्ट्रीय राजकारणावरील या लेखाने ती अधिक वाढली. लेख उत्तम आहे.

शीतयुद्ध इतके फटदिशी आटपेल अशी त्या काळातल्या अमेरिकन नेतृत्वाला कल्पना नसावी. किंवा कुठलेही युद्ध संपल्यावर डाव कसा खेळावा हा विचार करण्यात अमेरिकन मुत्सद्दी कमजोर असावेत (अलीकडचे उदाहरण इराकयुद्धाचे घ्यावे.)

रेगनने शस्त्रास्त्रस्पर्धा हा एकच डाव खेळला नाही, तर त्याने ईश्वरशून्य सोवियतांवर प्रभू-आणि-अल्ला-भक्तांचे अमोघ अस्त्र सोडले. हे खरे म्हणजे गुपीत नाही. कुठल्यातरी लाचार स्थितीत बेनझीर भुत्तोंनी दिलेली मुलाखत मी वाचली, आणि आश्चर्य म्हणजे खुद्द त्यांनीही सांगितले की त्यांच्या पंतप्रधानकीच्या काळात पठाण प्रदेशातल्या मदरशांकडे केवळ सौदी अरबस्तानाचेच नव्हे तर अमेरिका आणि ब्रिटनमधूनही आर्थिक सहाय्य येत होते. (पुढे कधी या बाबतीत भुत्तोबाईंनी या बाबतीत जीभ सैल सोडली नाही!) त्या वाहत्या धनगंगेत आयएसआय ने तालिबानच्या पिशच्चाचे पोषण केले. याही गोष्टीकडे अमेरिकन मुत्सद्द्यांनी दुर्लक्ष केले. आगदी सप्टेंबर २००१ पर्यंत, अफगाणिस्तानातील उत्तरेच्या तालिबानविरोधी आघाडीचे, कुत्सित किंवा तालिबानशी समसमान उल्लेख मी अमेरिकन वर्तमानपत्रांत वाचत आलो आहे. (तालिबानच्या विजयी अफगाणिस्तान मोहीमेची खबर मठ्ठ अमेरिकन माध्यमांना कंटाळून मी बीबीसी-उर्दूवर समजून घेत होतो!)

शीतयुद्ध जिंकल्यावर या धर्मयुद्धभूमीवरचा विस्कळित पसारा नीट समजून घेण्यात अमेरिका कमी पडली, असेच मानावे लागेल.

पुढे गोर्बाचेव्ह वि. येल्त्सिन चढाओढीत पितृबुश-क्लिंटनांनी येल्त्सिनना भरभरून मदत केली. आणि येल्त्सिन मावळताना त्यांच्या चुनिंद्या पुतीनना साहाय्य केले. येल्त्सिनच्या काळात रशियाच्या संसदेला क्रमाक्रमाने लुळे करण्यात आले (त्या संसदेत साम्यवाद्यांचे वर्चस्व होते), आणि अध्यक्षाखाली सगळे अधिकार जमवण्यात आले, त्याबद्दल अमेरिकन वर्तमानपत्रांत मी येल्त्सिनांचेच समर्थन केलेले वाचले आहे. बालबुशनी पुतीनांच्या डोळ्यांत त्यांच्या आत्म्याचा वेध घेतला, तेव्हापर्यंत पुतीन रशियाचा एकाधिकारी हुकुमशहा झाले नव्हते - पण त्यांच्या आत्म्यात ती महत्त्वाकांक्षा बघण्यात अमेरिकेचे नेते कमी पडले.

या सगळ्यापेक्षा मला याचे आश्चर्य अधिक वाटते की सामान्य सुशिक्षित अमेरिकन माणसाला तालिबानादि कट्टरपंथीयांच्या निर्मितीत रेगनशासनाचा हातभार मुळीच ठाऊक नाही. ते सोडा येल्त्सिन-पुतीनच्या लोकशाहीविरोधी कृत्यांचे अमेरिकेकडून अगदी अलीकडचे समर्थन झालेले आठवत नाही. ही गुप्त-कारस्थान-वादी आख्यायिका नाही. येथील मोठ्या वर्तमानपत्रांच्या (न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टच्या) त्या त्या काळच्या सरकारसमर्थक लेखांचे वाचन आहे. (त्या मानाने सामान्य सुशिक्षित इस्राइली माणसाला पीएलओ विरुद्ध इस्राइलसरकारने हमस ला सबळ केले हे माहीत असते.) आपल्या पूर्वीच्या अदूरदर्शीपणामुळे नुकसान झाले हे न कळणारा अमेरिकन सुशिक्षिताचा अदूरदर्शीपणा म्हणजे मोतिबिंदू झालेल्याला डोळे येणे होय.

रशिया-ईरान वगैरेंच्या बाबतीत अमेरिका स्वतःच्या पायावर आणखी कशीकशी कुर्‍हाड घालेल ते सांगणे नाही. अमेरिका ही महाशक्ती कित्येकदा पूर्ण विचार न करता परराष्ट्र नीती आखते, हे गृहीतक जाणून भारताने या बाक्या प्रसंगी परराष्ट्र धोरण ठरवावे.

कोलबेर's picture

25 Oct 2007 - 7:19 am | कोलबेर

निव्वळ तालिबानच नव्हे तर टॉवर्स उडवणारा बिन लादेन आणि पर्यायाने अल कायदा हे देखिल अमेरिकेच्या जोरावरच पुढे आलेले आहेत. अफगाणिस्तानात रशियाला शह देण्यासाठी केलेली ती चाल होती. ही माहिती देखिल गुप्त-कारस्थान-वादी आख्यायिका नसून माझ्या मते सुशिक्षीत अमेरिकन लोकांना माहित असावी. इथल्या टी.व्ही वरच्या चर्चांमध्ये ह्याचा उल्लेख पाहिलेला आहे. त्याच बरोबर इथल्याच डिस्कवरीवर देखिल टेड कॉपेलच्या वर उल्लेखलेल्या'वर्ल्डस मोस्ट डेन्जरस नेशनः इरान' ह्या डॉक्युमेंट्री मध्ये ५० च्या दशकात इराणमध्ये बहरास आलेली लोकशाही सि.आय.ए आणि ब्रिटीश हेरांनी कारस्थाने रचुन आपल्या स्वार्थासाठी उलथुन लावली होती हा संदर्भ देखिल दिला आहे. खोमेनी आणि मुलतत्ववादी चळवळ इराण मध्ये त्यामुळेच सुरू झाली.

अमेरिका ही महाशक्ती कित्येकदा पूर्ण विचार न करता परराष्ट्र नीती आखते हे पूर्णपणे मान्य असले तरी त्यावेळाच्या संभाव्य पर्यांयांमध्ये (स्टालीनचा रशिया/माओचा चीन/हिटलर चा जर्मनी) पैकी कुणाचीही महाशक्ती बनण्यापेक्षा अमेरिका नक्कीच परवडली असे मला तरी वाटते.

गुंडोपंत's picture

25 Oct 2007 - 7:30 am | गुंडोपंत

त्यावेळाच्या संभाव्य पर्यांयांमध्ये (स्टालीनचा रशिया/माओचा चीन/हिटलर चा जर्मनी) पैकी कुणाचीही महाशक्ती बनण्यापेक्षा अमेरिका नक्कीच परवडली असे मला तरी वाटते.
वरूणदेवा,
हे १०१% सहमत!

माओ काय नि स्टालीन काय ही भयानक लोक होते...
ते पुढे आले नाहीत हेच बरे झाले.

आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

26 Oct 2007 - 2:23 am | सर्किट (not verified)

लेख आवडला. पुटिनचे अनेक विरोधक अचानक विषबाधेने गेल्या वर्षात कसे मेले ह्याचा शोध घेणे अत्यावश्यक आहे. अफगाणिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवण्याबद्दल अमेरिकेला दूषणे देणारे हे विसरतात की रशियाने अफगाणिस्तानवर स्वतःहूना आक्रमण केले होते. तेव्हा पुटिन स्वतः केजीबीत होते.

हेच आक्रमण रशियाने भारतावर केले असते (समजा), तर भारतालाही शस्त्रास्त्रे पुरवली असती अमेरिकेने. खरं की नाही ?

गुंडोपंतांची तळमळ समजली (त्यांना वॉटरगेट ऐवजी इराण-कॉण्ट्रा म्हणायचे असावे कदाचित.)

सर्व जगात शांती नांदावी ह्याबद्दल कुणालाही तळमळ वाटेलच.

अशाच चर्चा येथे व्हाव्यात, ही इच्छा.

- सर्किट

गुंडोपंत's picture

26 Oct 2007 - 5:53 am | गुंडोपंत

हा व्हिडियो
पाहणे महत्वाचे ठरावे
यात चार्ली ने व्यक्त केले विचार ५० -६० वर्षांनंतरही तसेच्या तसेच लागू होतात,
या सारखे आपले दुर्दैव नाही...!

आपला
गुंडोपंत

सर्किट's picture

26 Oct 2007 - 10:02 am | सर्किट (not verified)

चार्ली कम्युनिष्ट होता हे सर्वमान्य आहे.
कम्युनिष्टांचे बोलणे जगाने मनावर घेणे सोडले आहे.

- सर्किट