टवाळखोरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

पिवळा डांबिस's picture
पिवळा डांबिस in जनातलं, मनातलं
27 Jun 2011 - 11:36 pm

आज ओळख करून घेऊ, मिपावर जन्मलेल्या पण जागतिक झालेल्या संघटनेची. सर्व टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणणारी "जमात-ए-कंपू"!

इतिहासात पाहिले असता, मिपाची तात्याची गादी गेल्यावर टवाळखोर लोकांना मिपावर वाली उरला नाही. टवाळखोरांची अवस्था दारूण होऊ लागली होती. तसेच सामान्य मिपाकर तर हुच्चभ्रूंच्या चालीरितींकडे आकृष्ट होऊ लागले होते. मिपावरील साहित्यावरचा हा सर्वात मोठा धोका टाळण्यासाठी आणीबाणीच्या काळा आधी उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली.

ही संस्था तळागाळातील टवाळखोर मिपाकरांना एकत्र आणण्याचे काम करते. हिची कोणतीही उपसंस्था नाही. टवाळखोरपणाचे एकमेव तत्व मिपाकरांपुढे ठासून मांडण्याचे काम या संस्थेमार्फत केले जाते.

सुमारे २००८ पर्यंत भारतीय टवाळखोर मिपाकरांना एकत्र करण्याचे काम या संस्थेने केले. नंतर या संस्थेचा उत्कर्ष सुरू झाला आणि ही संस्था जगभरातील टवाळखोर मिपाकरांची एक प्रमुख संस्था बनली आहे. इंडोनेशियात या संस्थेने मागे एक भला मोठा बाजार उठवल्यापासून ती सर्व टवाळखोर बांधवांच्या आदरास पात्र झाली आहे. अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे.

जमात-ए-कंपूचे कार्यकर्ते गुप्त आयडीखाली राहतात. ते कधीही स्वतःच्या जन्मजात नांवाने लिहीत नाहीत. त्यांचा मुक्काम सदैव मिपावरच असतो. ते टवाळखोरीला उत्तेजन देतात.
संस्थेतर्फे दर वर्षी मेळावा म्हणजेच मिपाकट्टा आयोजित केला जातो. याला मोठा प्रतिसाद लाभतो. पुण्यातला कट्टा सहाजिकच सर्वात मोठा असतो!!!!

या संस्थेची सर्व कामे इंटरनेटवरच होतात. पण गुप्त निरोपांचे सर्व व्यवहार मात्र फोनवरून किंवा इतर संकेतस्थळे वापरूनच पूर्ण केले जातात. त्यामुळे या संस्थेची माहिती संचालक मंडळाला फारशी होत नाही.
जमात-ए-कंपू कोणत्याही संपादकाशी एकनिष्ठ नाही त्यामुळे ही संस्था सदैव वादात असते!!!!

काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते. पण या संस्थेचा मिपाकर सभासदाच्या वस्त्रहरणाशी कोणताही संबंध नाही. ही संस्था फक्त भिकार लेखनाचे वस्त्रहरण करते....

आमेन!!!!
:)

धर्मइतिहाससमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

28 Jun 2011 - 11:57 pm | श्रावण मोडक

एकच प्रतिसाद आहे. एकवचनी - सडका!

अत्रुप्त आत्मा's picture

28 Jun 2011 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

विडंबन ठिकठाक केलत,पण तुंम्हाला विषयाचा अभ्यास असता तर ते फक्त भाषिक पातळीवरच राहिलं नसतं...अर्थात गंभीर विषयांचं विडंबन होऊ नये अश्या काही मताचा मी माणुस नाही...फक्त ते आशय गर्भ झालं असतं तर अजुन मजा आली असती...

बाकी मी भरभर कवनी लिहिणारा आहे अस तुंम्ही व्यक्त केलच आहे,फक्त तुमच्या सारखी भगवी कफनी माझ्याकडे नाहीये...(बराबर वळीकलं का नाय मी?) ...

...लाजेश खास-आडवी.......मग कुठेही असोत ते ओटी किंवा पडवी...ह्ही ह्ही ह्ही....

राजेश घासकडवी's picture

29 Jun 2011 - 2:33 am | राजेश घासकडवी

हे आशयगर्भ वगैरे काय असतं, आपल्याला काय माहीत नाही ब्वॉ... आणि ते भगवी कफनीचं तर स्स्सूप्पकन् बाउन्सर गेलं.

पण एक सांगावंसं वाटतं, फार टेन्शन घेऊ नका. अहो गमतीत चाललंय. मीही तसा तुमच्यासारखाच नवखा आहे इथे. आपल्यासारख्या नवख्यांनी एकमेकांशी भांडलं तर या कंपूबाजांसमोर आपला काय पाड लागणार? तेव्हा चिल..

आणि नावाच्या विडंबनाच्या बाबतीत काय बोलू? माझ्या नावाची प्रोफेशनल सही विडंबकाकडून शेकड्याने विडंबनं झालेली आहेत... त्यामुळे आल इज बेल.

परा ग

अत्रुप्त आत्मा's picture

29 Jun 2011 - 2:40 am | अत्रुप्त आत्मा

ऑल इज वेल...हम भी मजाक मजाक मे मजाक कर बैठे....चलने दो...

शिल्पा ब's picture

29 Jun 2011 - 3:04 am | शिल्पा ब

तुमचं नवखेपण गेलं नाही का अजुनही. नव्या नवरीला सुद्धा आठवड्याच्या आत घरात कामाला सुरुवात करावी लागते.

राजेश घासकडवी's picture

29 Jun 2011 - 3:20 am | राजेश घासकडवी

अहो शिल्पावैनी, नीलकांतजींनी काय म्हटलं होतं? बहुतेक लोक मिपावर सदस्यत्व घेतल्यावर साताठ महिने घाबरत घाबरत वावरतात, वाचनच जास्त लेखन कमी असं करतात. त्यामुळे एक वर्षाच्या आसपास सदस्यत्व असलेले सगळे नवखेच. चांगली तीनेक वर्षं निर्ढावल्यावर तुम्ही जुने होता.

तुमचा आयडी नंबर चार आकडी आहे ना? म्हणजे तुम्हीसुद्धा नवख्याच. हे तीन आकडी आणि दोन आकडी लोक खरे जुने, मुरब्बी, कंपूबाज...

आता तुम्हाला हौसच असेल घरकाम करण्याची तर काय बोलू... म्हणवा स्वतःला जुन्या.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

29 Jun 2011 - 3:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

बरं मग येत्या वर्षात तुम्ही पथ्यं सांभाळून घरकाम सुरू करणार का?

परिकथेतील राजकुमार's picture

29 Jun 2011 - 12:16 pm | परिकथेतील राजकुमार

कंपूबाहेरच्या एखादा धागा जरा पब्लिकनी उचलुन धरला की हे घासुगुर्जी आणि राडीयाबै लगेच येउन तो धागा हायजॅक करतात. ते नाही जमले तर धाग्याची खरडवही करतात. ह्या जुन्या सदस्यांना ताकिद मिळणे गरजेचे आहे.

घंटानाद..सध्या मुक्काम परभणी

प्यारे१'s picture

29 Jun 2011 - 1:01 pm | प्यारे१

>>>>घंटानाद..सध्या मुक्काम परभणी

फु ट लो.... :)

ए घंटा, आख्यान बंद केलं का? का तिथेपण घंटाच?

शाहरुख's picture

28 Jun 2011 - 8:29 pm | शाहरुख

हा हा ! वा गुरु !!

इंटरनेटस्नेही's picture

28 Jun 2011 - 9:29 pm | इंटरनेटस्नेही

हा हा हा! वाचुन मजा आली!

llपुण्याचे पेशवेll's picture

29 Jun 2011 - 11:03 am | llपुण्याचे पेशवेll

ऐला असं आहे होय. बरं आता सावध राहीन.

नर्मदेतला गोटा's picture

29 Jun 2011 - 10:45 pm | नर्मदेतला गोटा

हे सारे काय होऊन राहीले आहे
आपल्याला चेष्टा अजिबात सहन होत नाही, सारं कसं शिस्तीत, नियम पाळून व्हायला हवं हे आपले मत

वात्रटपणाला एकदम विरोध आपला
तर पोराहो आता दंगा एकदम बंद.

चाचा कानपुरीया ( गोटा नर्मदेतला)

ब्रिटिश टिंग्या's picture

29 Jun 2011 - 11:11 pm | ब्रिटिश टिंग्या

हॅ हॅ हॅ!

- टिंग्या
संस्थापक, लष्कर-ए-खरडा

आनंदयात्री's picture

29 Jun 2011 - 11:22 pm | आनंदयात्री

>>संस्थापक, लष्कर-ए-खरडा

ही पण एक टिंगीच (थाप) बरका !! ही संस्था अदिती, मनस्वी आणि अजुन काही अबलांना मैत्रीकिड्यापासुन मदत करण्यासाठी हेल्पलाईनच्या स्वरुपात आम्ही स्थापन केली होती. त्या काळाच्या गाजलेल्या खरडमोहिमांमध्ये श्री टिंगोजीराव खेडेकर यांचे कार्य वादातीत आहे पण त्यांचे संघटनेतील स्थान हे भाडोत्री अतिरेकी एवढेच होते हे नमूद् करु इच्छितो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2011 - 12:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अदिती, मनस्वी या काही अबला काय ... चालू द्यात तुमचे पालथे धंदे, आंद्याशेठ! मला खरडवही बंद करणे वगैरे जुन्या गमती आठवल्या. असो.

आनंदयात्री's picture

30 Jun 2011 - 12:42 am | आनंदयात्री

अहो अबला म्हणजे स्त्री. तुम्ही शालेय जीवनात समानार्थी शब्द तर नक्की पाठ केले असतील .. आठवा बरे.

-
आंदुत्सु

>>मला खरडवही बंद करणे वगैरे जुन्या गमती आठवल्या. असो.

मिपाच्या सर्वरवर फुका ताण येउ नये म्हणुन मी बापडा खव बंद करायचो त्याच काय काढलंन आता.

-
(नामानिराळा) आंद्यकांत

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

30 Jun 2011 - 12:51 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपाच्या सर्वरवर फुका ताण येउ नये म्हणुन मी बापडा खव बंद करायचो त्याच काय काढलंन आता.

याला म्हणतात ओढवून घेणे.
मी बिझी असताना फोन करण्याबद्दल बोलत होते. असो. मनस्वी कुठे आहे अलिकडे? (लैच अवांतर झालं का, समजून घ्या हो मंडळी!)

श्रावण मोडक's picture

30 Jun 2011 - 9:14 am | श्रावण मोडक

क्काय? अबला आणि स्त्री हे समानार्थी शब्द आहेत?
कॉम्प्लान प्या आणि मोठे व्हा. ;)
मालक, यापैकी एक 'अबला' तिथंच आहे. मागाहून ती बला वाटली नाही म्हणजे मिळवली. ;)

Nile's picture

30 Jun 2011 - 12:17 pm | Nile

(न्यूली)मॅरीड लोकांना पब्लिक मध्ये असली विधानं करावी लागतात म्हणतात. ;-)

पळा तिच्यायला...

श्रावण मोडक's picture

30 Jun 2011 - 12:20 pm | श्रावण मोडक

लग्न झालं असेल (किंवा नसतानाही तत्सम (या शब्दाचे वेगळे अर्थ माहिती करून घेण्याचा उपक्रम मी तरी केलेला नाही) तर तो पुरूष पब्लिकमध्ये कदापि स्त्रीचा अबला असा उल्लेख करणार नाही. जो करेल त्याला लगेचच ती सबला कशी असते याचा पुरावा क्लोज्ड एन्व्हायर्नमेंटमध्ये त्याच्या बायकोकडूनच मिळतो म्हणतात. इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी भर टाकावी ही विनंती (उरलेल्या काहींनी त्यावरून धडे घेऊन आपला मार्ग ठरवावा).

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jun 2011 - 12:24 pm | परिकथेतील राजकुमार

इथं काही अनुभवी आहेत. त्यांनी भर टाकावी ही विनंती

बिकांच्या प्रतिक्रीयेची वाट पहात आहे.

लपुन वारकर्ते

आनंदयात्री's picture

30 Jun 2011 - 7:05 pm | आनंदयात्री

श्रामो,नाईल्या आणि परा यांच्या अवांतर लेखनावर कारवाई होण्याची वाट पहात आहे.

-
सतत तक्रारकर्ते

पिवळा डांबिस's picture

1 Jul 2011 - 9:36 am | पिवळा डांबिस

मिपावर आवश्यक असलेल्या लेखनस्वातंत्र्याचे आम्ही किती पुरस्कर्ते आहोत हे माहिती असतांना सुद्धा तुम्ही आमच्याच धाग्यावर कारवाई होण्याची आशा बाळगतांना पाहून एक मिपाकर म्हणून आणि तुमचा एक पर्सनल मित्र म्हणून आम्हाला शरम वाटते......
त्यांना काय लिहायचं ते त्यांना लिहूद्यात, तुम्हाला काय लिहायचं ते तुम्ही मोकळेपणाने लिहा....
तुमच्या लेखनस्वातंत्र्याचाही मी पुरस्कर्ता आहे....
पण उगाच कारवाई वगैरे वशिल्याला यामध्ये आणू नका हो......
:(

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 9:57 am | श्रावण मोडक

येस. पिडांकाका, धन्यवाद. या मुस्कटदाबीचा मीही विरोध करतो. :)

आनंदयात्री's picture

1 Jul 2011 - 5:45 pm | आनंदयात्री

>>येस. पिडांकाका, धन्यवाद. या मुस्कटदाबीचा मीही विरोध करतो

मोडकांचे पण काका !!!
आता तुम्हीच ठरवा बॉ पिडाकाका ..

श्रावण मोडक's picture

1 Jul 2011 - 6:18 pm | श्रावण मोडक

मोठ्यांचा आदर करतो आम्हीही... :)

आनंदयात्री's picture

1 Jul 2011 - 7:06 pm | आनंदयात्री

>>मोठ्यांचा आदर करतो आम्हीही...

म्हणजे तुम्हाला मी भंपक वाटतो ? मी खरच तुमचा आदर करतो म्हणुन तुम्हाला आदरार्थी संबोधतो. मी भंपक नाही असे सिद्ध करायला काय करू ? अब्दुल कलामांविषयी अनादराने बोलु का ? परफेक्ट सोल्युशन .. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

30 Jun 2011 - 12:16 pm | परिकथेतील राजकुमार

अदितीच्या पराक्रमाचा विषय निघाला की पुण्यातली मिपाकर मंडळी हसण्यावारी नेतात कींवा उघड-उघड कमी लेखतात.

परुत्सु.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jul 2011 - 3:24 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पुण्याबाहेरही जग आहे हो पराशेट. पुणे विद्यापीठ आणि सदाशिव पेठ नदीच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना आहेत.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

1 Jul 2011 - 7:09 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>पुणे विद्यापीठ आणि सदाशिव पेठ नदीच्या दोन वेगवेगळ्या बाजूंना आहेत.
तुम्हाला गटाराच्या दोन बाजूला असे म्हणायचे आहे काय ?? असो, जिकडे छोट्याश्या टेकडीला (खरे तर पुटकुळी आहे ती) पर्वती म्हणू शकतात तिथे त्या नाल्याला प्रतिगंगा म्हणत नाहीत हेच खूप झाले.

सूड's picture

2 Jul 2011 - 4:39 pm | सूड

विजुभाऊ's picture

2 Jul 2011 - 10:00 am | विजुभाऊ

टिंग्या
संस्थापक, लष्कर-ए-खरडा

अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
टिंगीतै
खरडा फार खाल्ला तर विदर्भात एक व्याधी होते. याची नोंद ठेवा

मी-सौरभ's picture

29 Jun 2011 - 11:28 pm | मी-सौरभ

सेंचुरी साठी शुभेच्छा :)

बा.द् वे- टारु परत तडीपार का??

शेखर's picture

30 Jun 2011 - 12:51 am | शेखर

शंभरी भरण्यास मदत म्हणुन हा प्रतिसाद ;)

तुझ्याच शोधात....'s picture

30 Jun 2011 - 12:11 pm | तुझ्याच शोधात....

मस्त आहे मला हि घ्या यात..

नर्मदेतला गोटा's picture

1 Jul 2011 - 2:11 am | नर्मदेतला गोटा

फार टवाळक्या नकोत
बिन लादेन नाही पण

मुल्ला ओमर येत आहे

तो नाही तर आहेतच आपले.......

जाऊदे दिवे घ्या
--

तात्पर्य-
अंधार खूप झाला पणती जपून ठेवा

चतुरंग's picture

1 Jul 2011 - 5:20 am | चतुरंग

चान चान पिडांकाका, एकदम बिनपाण्यानेच केली आहेत की मूळ धाग्याची! ;)

(जमात्-ए-पंपू) रंग-ए-चतुर

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 6:20 pm | धमाल मुलगा

>>(जमात्-ए-पंपू) रंग-ए-चतुर
मी चुकून 'ज' ला काना वाचला आणि रंगाशेठची किती धुलाई होईल ह्या विचारानं खुर्चीतून सांडलो की. =))

गंगाधर मुटे's picture

1 Jul 2011 - 11:31 am | गंगाधर मुटे

आपुनबी वरीजनल टवाळखोरच्य है.

कंपूमे थोडीशी जगहा देवनाजी...! :)

धमाल मुलगा's picture

1 Jul 2011 - 6:16 pm | धमाल मुलगा

:D
क्यालिफोर्निया पीठासनाधिश श्री.श्री.श्री. पिवळा डांबिसमहाराज १००८ ह्यांच्या दिव्य प्रवचनाचा आज फारा दिवसांनी योग आला! कसं धन्य धन्य वाटलं बरं. :)

उस्ताद हलाल-मुर्गा बारामतीकर यांनी जमात-ए-कंपूची स्थापना भांडुप, मुंबई येथे केली.

=)) =)) =))
इच्चिभनं....डायरेक्ट पिसंच काढली का?
असो. हल्ली म्हणे हलाल-मुर्गा बारामतीकर स्थानबध्दतेत असतात आणि बंद ग्यालरीच्या कठड्याशी रेलून 'ने मजसि ने..परत भांडूपभूमीला...' असं गुणगुणत असतात अशी ऐकिव माहिती आहे. ;)

काही नवे मिपाकर लोक या संस्थेवर दहशतवादी असल्याचे आरोप करतात. तसेच या संस्थेतून कार्यकर्ते मिळवून मग त्यांचे दहशतवादी बनवले गेले असल्याची शक्यताही नोंदवली जाते.

सहमत आहे.
डांबिसरावांनी जमात-ए-कंपू ची 'लष्कर-ए-खरडा' ही अतिरेकी कारवायांना वाहिलेली उपसंघटना जाणून बुजून दुर्लक्षित केली आहे काय असा प्रश्न पडला. ;)
-मागीन भत्ते.

अमेरिकेतील टवाळखोर मिपाकर जमातीला एकत्र करण्याचे पवित्र कार्य श्री डांबिसमहाराज पिवळे यांच्या प्रेरणेने जोरात चालले आहे.

ह्या कार्याने प्रभावित होऊन पुढील वर्षी डांबिसमहाराजांना जंतरमंतर येथे 'टवाळपाल' बीलाच्या मागणीसाठीच्या आंदोलनाचे प्रमुखपद देण्याचे सरकंपूचालकांनी ठरवले आहे अशी बातमी आहे.
-आनंदछत्री.

छ्या:! काय राव डांबिसकाका, ते आपले जुने धंगे-धिंगाणे आठवून हल्ली आपण सगळे असे पुन्हा का करत नाही बरं ह्या विचारानं अंमळ हिरमुसलो राव.