१८५७ अ हेरीटेज वॉक (२)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
18 Jun 2011 - 5:24 pm

मागील दुवा http://misalpav.com/node/18261
पेशवाई लयास नेणार्‍या माउन्ट स्टुअर्ट एल्स्फिन्टनने सातार्‍याच्या गादीवर छ.प्रतापसिंहांना बसवले. दत्तक वारसाच्या प्रश्नावरून १८४९ सातार्‍याची गादी खालसा देखील केली.
एका व्यापारी कंपनीची ,इस्ट इंडीया कंपनीची भारताच्या विशाल भूभागावर सत्ता प्रस्थापित झाली

हा माउन्ट स्टुअर्ट एल्फिन्स्टन वल्लीच होता. तो खरेतर एक स्कॉटीश व्यापारी होता.
इस्ट इंडीया कंपनीशी संबन्ध आल्यानंतर तो मुंबई इलाख्याचा गव्हर्नर बनला.एत्याचा पुतण्या लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन देखील मुम्बईचा गव्हर्नर झाला.( त्याच्याच नावे मुम्बईतले इल्फिन्स्टन रोड स्टेशन आहे) एल्फिन्स्टन सर्कल ( सध्याचे हर्निमान सर्कल) हे सुद्धा याच्याच नावाचे
भारतातील नेटीवाना शिकवण्यासाठी केलेल्या ब्रीटीश शिक्षण पद्धतीचा जो पाया मानला जातो त्या एल्फिन्स्टन कोड चा जनक हा माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टन. एल्फिन्स्टन कॉलेजला याचेच नाव दिले गेलेले आहे.
मुम्बैच्या मलबार हील वर बांधला गेलेला पहीला बंगला या माउन्टस्टुअर्ट एल्फिन्स्टनचा होता. त्या नंतर तिथे बर्‍याच इंग्रज अधिकार्‍यानी बंगले बांधले.आणि मलबार हील हे एक प्रतिष्ठीत ठिकाण बनले.
सातार्‍याची गादी दत्तक विधानाच्या प्रश्नावरून इस्ट इंडीया कंपनीने खालसा करायचे ठरवले. त्या वेळच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजाना अजिंक्यातार्‍यावर कैदेत ठेवण्यात आले.
छत्रपतिंची बाजू ब्रिटीश पार्लमेंट मध्ये मांडावी म्हणून रंगो बापुजी गुप्ते इंग्लंडला देखील जावून आले.
पण तेथे त्यांचे काहीच चालले नाही.
१८५७ च्या बंडाची बीजे या घटनेत रुजली गेली. रंगो बापुजी गुप्तेनी दुसर्‍या बाजीराव पेशव्यांचे चिरंजीव नानासाहेब आनि तात्या टोपे यांची गाठ घेवून एक सशस्त्र सेना बांधण्याचा घात घातला. सातारा सांगली बेळगावकोल्हापूर भागातून तरुणांची भरती देखील सुरू केली. पण ब्रीटीशाना तो बेत कळाला . भरती केलेल्या पैकी बरेचसे तरूण ब्रीटीशानी पकडून ठार केले. रंगो बापुजी गुप्ते ठाण्याला जांभळी नाक्यावर
( रंगो बापुजी गुप्ते चौक) एका लग्नाला येणार आहेत हे कंपनी सरकारला कळाले . त्यानी पोलीस पाठवले . रंगो बापुजी तेथून वेशांतर करून पळाले त्या घटने नंतर ते कोणालाच दिसले नाहीत. कंपनी सरकार कडे या घटनेची नोंद आहे Missing July 5, 1857
सती प्रथा बंद करणे संस्थाने खालसा करणे इस्ट इंडीया कंपनी बद्दल भारतीयांच्या मनात आकस होताच.
२९ मार्च १८५७ मीरतला झालेल्या मंगल पांडेने त्याच्या अधिकार्‍यावर हल्ला केला. मंगल पांडेवर खटला दाखल होऊन त्याला फाशीची शिक्षा झाली १८ एप्रील ला ठरवलेली फाशी कंपनी सरकारने १० दिवस अगोदरच अमलात आणली. त्याचा सहकारी जमादार इश्वरी प्रसाद ला २२ एप्रील ला फाशी दिली.
आग्रा अंबाला अलाहाबाद मीरत येथे कंपनी सरकारचे फार मोठे सैनीक तळ होते. २४ एप्रीलला लेफ्टन्ट कर्नल जॉर्ज कार्मिशेल स्मिथ ने त्याला पलटणीला फायर ड्रील ची आज्ञा दिली. सैनीकांच्या मनात काडतुसांत वापरल्या जाणार्‍या चरबीवरून असंतोष खदखदत होता. ९० पैकी ८५ जणानी फायर ड्रील करण्यास नकार दिला.
त्या सर्वांचे कोर्टमार्शल केले गेले त्या सर्वाना १० वर्षाचा कारावास ठोठावला गेला. सैनीक तळावरील सर्वांसमोर त्यांचे गणवेश उतरवले गेले. जेल मध्ये जाताना त्या ८५ सैनीकानी इतर सर्वांच्या बघेपणाबद्दल निषेध केला मीरत शहरात अशांतता पसरली .दुसर्‍या दिवशी गावात काही ठीकाणी जाळपोळ झाली काही सैनीकानी कैदेतील सैनीकाना बळाचा वापर करून सोडवण्याचा कट रचला जातोय अशी माहिती ब्रीटीश अधिकार्‍याना दिली पण त्यानी त्याकडे दुर्लक्ष्य केले. रवीवार असल्याने बरेचसे अधिकारी साप्ताहीक सुट्टीवर होते. संध्याकाळी सैनीक बंड करून उठले. त्याना शांत करण्यासाठी म्हणून केलेल्या गोळीबारात कंपनी सरकारचे स्वतःचेच लोक मारले गेले.
जमावाने संध्याकाळी बाजारात सुट्टीवर असलेल्या काही अधिकार्‍यांवर हल्ला केला. त्यात पन्नास लोक ठार झाले.
मीरत त्यानंतर शांत झालेच नाही. १० मे च्या दिवशी धनसिंग कोतवालाने कैदी सैनीकांना सोडवण्यासाठी जेलचे दरवाजे खुले केले. त्या ८५ सैनीकांसोबतच जवळ जवळ ८०० कैदी पसार झाले.
कंपनी सरकारचा अधिकारी मेजर जनरल हेवीट हा म्हातारा आणिआजारी होता.त्याने स्वतःच्या सैनीकाना काहीच आज्ञा दिल्या नाहीत. सैनीक कसेबसे स्वतःचे रक्षण करू शकले.
दुसर्‍या दिवशी बंडखोर सैनीकांचा बीमोड करायला आलेल्या सैनीकाना आढळले की बंडखोर सैनीकाने दिल्लीच्या दिशेने कुच केले आहे.
११ मे ला बंडखोर सैनीकांची पहिली तुकडी दिल्लीला पोहोचली. त्यानी दिलीच्या किल्ल्यात प्रवेश केला ८२ वर्षाच्या बहादूर शहा जफरला खिडकीतून हाक मारली आणि बंडाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. बादशहा ने साधे शिपाईगडी म्हणून त्यांना फारसे महत्व दिले नाही.पण राजवाड्यातील काहीनी बंडाला पाठिंबा दिला. दुपारपर्यन्त बंडाची बातमी शाजहानाबाद शहरभर ( शहाजहानाबाद : लाल किल्ला + आसपासचा परीसर) )पसरली.
दुपारी चंदरवाल मधील काही गुज्जरानी कम्पनी सरकरच्या सर न्यायाधीशांच्या घरावर हल्ला चढवला. ब्रीटीश तसेच स्थानीक ख्रिश्चन हे सुद्धा त्यांच्या रोषाचे रोख होते.
खरे तर त्याकाळी दिल्ली हे इस्ट इंडीया कंपनीचे तसे काही फारसे मोठे ठाणे नव्हते.मुघल बादशहा ची जी काही सत्ता उरली होती ती फक्त लाल किल्ला आणि त्या भोवतालच्या भिंतीच्या आत.
kashmiri gate
( लाल किल्ल्याच्या आतील शहरात जाण्यासाठी असलेले हे काश्मिरी गेट. आपण पहातोय ती किल्ल्याच्या आतील बाजू. बंडखोर या बाजूला होते पलीकडील बाजूस कम्पनी सरकारचे सैन्य होते. लढाई जवळजवळ जून १८५७ ते सप्टेंबर १८५७ अशी चार महिने चालली होती)
kashmiri gate2
कंपनी सरकारचा कारभार मुख्यतः कलकत्त्याहून चालायचा. दिल्लीत कंपनी सरकारच्या फक्त ३ पलटणी ( रेजीमेन्ट्स) होत्या. त्या देखील उत्तरेकडच्या कश्मिरी गेट जवळ. कंपनी सरकारच्या गार्ड्स नी हे गेट बंद करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यन्त उशीर झाल होता.
दुपारी शहरात एक मोठा स्फोट होऊन आगडोम्ब उसळला. कंपनी सरकारचा मॅगझीन डेपो ( बारूद खाना) जेथे होता तेथील अधिकार्‍यानी आपला प्रतीकार अपूरा पडतो आहे हे जाणवल्यानंतर दारुगोळा बंडखोर सैनीकांच्या हाती पडू नये म्हणून जिवाची जोखीम असतानाही दारूखान्याला आग लावून दिली होती.
barud khana
( हाच तो दारुखाना . कंपनी सरकारने त्या वेळेस असणार्‍या अधिकार्‍यांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले आहे. वर दिसणार्‍या मोठ्या पाटीवर अ८५७ सालच्या घटनेचा उल्लेख "बंड" असा आहे.भारत सरकारने त्याखाली एक छोटी करेक्षन नोट लावून त्यात भारत आणि पाकिस्तान सरकारानी या बंडाला स्वातन्त्र लढा म्हंटल्याचे त्यात नमूद केलेले आहे. पण मूळ लेख असलेली पाटी तशीच ठेवली आहे हे विशेष)
नंतर जवळजवळ ३००० बॅरल गनपावडर चा साठा असलेले एक मॅगझीन सैनीकांच्या हाती लागले. तेसुद्धा फारसा प्रतीकार न होताच. आता पर्यन्त विना नेतृत्व उठाव करणार्‍या बंडखोर सैनीकांची ही मोठी सरशी होती.
१२ मे ला बहादूरशहा लाल किल्ल्यात बर्‍याच वर्षानी दरबार भरवला . इतिहासकार विल्यम दालरिंपल लिहीतो की त्या वेळेस बहुतांशी इस्ट इंडीया कंपनीच्या सेनेतून पळून गेलेले बरेचसे सैनीकच त्या दरबारात हजर होते. त्यानी बहादुरशहा जफरला अगदीच घरगुती वागणूक दिली. काहिनी तर त्याला फारसा मानही दिला नाही. ( विल्यम डालरिंपल लिहितो की त्यावेळेस बहादुरशहा जफरचे वय ८१ वर्ष होते) बहादूरशहा दिल्लीत चाललेली लुटालूट फारशी पसंत नव्हती .त्याने या दरबारात बंडाला जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा केली. १६ मे रोजी बंडखोर सैनीक आणि लालकिल्ल्यातील नोकरानी ५२ युरोपीय लोकांना पकडून आणले .बहादूरशहाचा विरोध असतानाही त्या सर्वाना लालकिल्ल्यातील एका पिंपळाच्या झाडाला लटकावून फासावर चढवण्यात आले.
दिल्ली आणि शहराची परिस्थिती फारच बिघडली होती.बहादूरशहा जफर ने बंडखोर सैन्याच्या सेनापतीपदी त्याचा मुलगा मिर्झा मुघल याची नेमणूक केली. मिर्झा मुघल ला लढाईचा काहीच अनुभव नव्हता. बंडखोर सैनीक त्याला मान देत नव्हते त्याचे हुकूम मानत नव्हते. सैनीक आपल्या रेजीमेन्टच्या अधिकार्‍या शिवाय इतर कोणाचेही हुकूम मानायला तयार नव्हते.या सगळ्या गोंधळात देखील मिर्झा मुघलने शहरात ( शहाजहानाबाद) परिस्थिती नियंत्रणाखाली आणायचा प्रयत्न केला. शराबाहेर गुज्जर लुटालुट करतच होते.एकूणच अनागोंदी कळसाला पोहोचली होती. दिल्ली काबीज झाली अशी बातमी सर्वत्र पसरली. बंडखोर चहुबाजूनी दिल्लीत येवू लागले.
ग्वाल्हेरच्या राजांचे बंधु हिंदुराव शिंद्यांचे दिल्लीत ब्रीटीश रेसीडेन्ट शी फारच मित्रत्वाचे संबन्ध होते. ब्रीटीशानी हिंदुरावांच्या वाड्याचा आश्रय घेवून तेथून लढा चालू ठेवला. त्यांचा वाडा म्हणजे किल्लाच बनला होता.
ब्रीटीशानी सैन्याची जमवाजमव सुरु केली. टेलीग्राफ मशीनचा या काळात फारच उपयोग झाला.
त्याचे स्मारक म्हणून कंपनी सरकारने जेथे टेलीग्राफचे ओफिस होते तेथे एक टेलीग्राफ मेमोरीयल बांधले आहे. त्यावरील शिलालेखात एक नोंद आहे The electric Telegraph that saved India
Telegraph Memorial

(क्रमशः )

इतिहासलेख

प्रतिक्रिया

गोगोल's picture

18 Jun 2011 - 5:52 pm | गोगोल

वाचायला मजा येते आहे.

यकु's picture

18 Jun 2011 - 6:06 pm | यकु

पुढच्या लेखाची वाट पाहात आहे...

रंगो बापूजी गुप्ते यांच्या लंडनमधील प्रयत्नांबद्दल मागे एकदा बहुतेक लोकसत्तामध्ये लेख वाचल्याचे आठवते... लिंक सापडत नाहीय..

शैलेन्द्र's picture

18 Jun 2011 - 7:06 pm | शैलेन्द्र

छान... मजा येतेय वाचायला.. पण
"छत्रपतिंची बाजू ब्रिटीश पार्लमेंट मध्ये मांडावी म्हणून रंगो बापुजी गुप्ते इंग्लंडला देखील जावून आले.
पण तेथे त्यांचे काहीच चालले नाही.
१८५७ च्या बंडाची बीजे या घटनेत रुजली गेली"

हे फारसे नाही पटत..इतर कित्येक कारणांपैकी हेही एक इतकच..

पैसा's picture

18 Jun 2011 - 8:26 pm | पैसा

माहितीपूर्ण लेख. सोबतचे फोटोही छान आलेत.

सविता००१'s picture

19 Jun 2011 - 9:51 am | सविता००१

झकास चालले आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2011 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

-दिलीप बिरुटे

शिल्पा ब's picture

19 Jun 2011 - 10:33 am | शिल्पा ब

चांगली माहीती आहे.

विजुभाऊ's picture

20 Jun 2011 - 11:32 am | विजुभाऊ

१८५७ च्या बंडाची बीजे या घटनेत रुजली गेली"
हेलिहायचे कारण म्हणजे त्या वेळचा कोणताच सत्ताधीश(?) इस्ट इंडीया कंपनी सरकारच्या विरोधात जायचा विचारही करू शकत नव्हता. तैनाती फौज या हत्याराने इंग्रजानी सर्वच संस्थानिकाना दुबळे बनवून टाकले होते.
रंगो बापुजी गुप्ते यानी ऑर्गनाइज्ड लेव्हल वर असा विचार मांडला. त्यासाठी त्यानी तात्या टोपे तसेच बिठूर ला नानासाहेब पेशव्यांशी संपर्क साधला होता. तसेच स्वतःची हत्यारबंद फौज निर्माण कराचा प्रयत्न केला होता. अन्य कोणी असा विचारदेखील मनात आणलेला नव्हता.
खुद्द ग्व्हालेर च्या शिंद्यांचे भाऊ हिंदु राव यांच्या घरात त्यानी इंग्रजांचा किल्ला बनवला होता यावरून ब्रीटीशानी इथे किती पक्के बस्तान बसवले होते ते लक्षात येते.
"बीज रुजणे" हे या अर्थाने म्हणालो होतो.

विजुभाऊ's picture

20 Jun 2011 - 11:32 am | विजुभाऊ

१८५७ च्या बंडाची बीजे या घटनेत रुजली गेली"
हेलिहायचे कारण म्हणजे त्या वेळचा कोणताच सत्ताधीश(?) इस्ट इंडीया कंपनी सरकारच्या विरोधात जायचा विचारही करू शकत नव्हता. तैनाती फौज या हत्याराने इंग्रजानी सर्वच संस्थानिकाना दुबळे बनवून टाकले होते.
रंगो बापुजी गुप्ते यानी ऑर्गनाइज्ड लेव्हल वर असा विचार मांडला. त्यासाठी त्यानी तात्या टोपे तसेच बिठूर ला नानासाहेब पेशव्यांशी संपर्क साधला होता. तसेच स्वतःची हत्यारबंद फौज निर्माण कराचा प्रयत्न केला होता. अन्य कोणी असा विचारदेखील मनात आणलेला नव्हता.
खुद्द ग्व्हालेर च्या शिंद्यांचे भाऊ हिंदु राव यांच्या घरात त्यानी इंग्रजांचा किल्ला बनवला होता यावरून ब्रीटीशानी इथे किती पक्के बस्तान बसवले होते ते लक्षात येते.
"बीज रुजणे" हे या अर्थाने म्हणालो होतो.

सुनील's picture

20 Jun 2011 - 1:47 pm | सुनील

खुद्द ग्व्हालेर च्या शिंद्यांचे भाऊ हिंदु राव यांच्या घरात त्यानी इंग्रजांचा किल्ला बनवला होता यावरून ब्रीटीशानी इथे किती पक्के बस्तान बसवले होते ते लक्षात येते.

ह्यात आश्चर्य काही नाही.

ग्वाल्हेरचे शिंदे १८५७ च्या बंडात सामील नव्हते कारण त्यांचे राज्य खालसा झालेले नव्हते वा होण्याची शक्यता नव्हती.

किंबहुना, अशांपैकी (खालसा न झालेले) कोणीही संस्थानिक बंडात सामील नव्हता. हा लढा प्रामुख्याने इस्ट इंडिया कंपनीचे एकनिष्ठ सैनिक विरुद्ध कंपनीचे बंडखोर सैनिक अधिक खालसा संस्थानिक ह्यांच्यातीलच होता. ह्या बंडाचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले वरसईकर गोडसे भटजी यांनी त्यांच्या "माझा प्रवास" ह्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, सामान्य जनतादेखिल आपल्या खालसा संस्थानिकांना मनापासून साथ देत नव्हती.

पुलेशु. वाचतो आहेच.

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jun 2011 - 11:40 am | llपुण्याचे पेशवेll

छान. मस्तं चाललं आहे.

मृत्युन्जय's picture

20 Jun 2011 - 1:46 pm | मृत्युन्जय

The electric Telegraph that saved India

हे सरकारला माहिती नसेल असे वाटत नाही. आणि माहिती असेल तर त्यांनी तो खांब अजुन जतन करुन ठेवणे हे तद्दन मुर्खपणाचे लक्षण आहे. तीच गोष्ट लाल किल्ल्यावरच्या पाटीची,

मस्त माहिती ..

लिहित रहा ... वाचत आहे...

अवांतर : फोटो न दिसल्याने वाईट वाटले

विजुभाऊ's picture

23 Jun 2011 - 2:53 pm | विजुभाऊ

The electric Telegraph that saved India

हे सरकारला माहिती नसेल असे वाटत नाही. आणि माहिती असेल तर त्यांनी तो खांब अजुन जतन करुन ठेवणे हे तद्दन मुर्खपणाचे लक्षण आहे. तीच गोष्ट लाल किल्ल्यावरच्या पाटीची,
इतिहास हा इतिहास आहे. टेलीग्राफ स्मारक जसे आहे तसे जतन केले आहे यात मूर्खपणा काय?
दुसरी पाटी ही लाल किल्ल्यात नाही. ती मॅगेझीन ( लोथियन रोड) येथे आहे. तेथील लोकांचे शौर्य मानायला काय हरकत आहे?
अवांतरः शनिवार वाड्यात लोकानी "काका मला वाचवा " म्हणणारे नारायणराव पेशव्यांचे भूत जतन करून ठेवले आहे यात कसले शौर्य आहे? की शहाणपण आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

23 Jun 2011 - 3:05 pm | परिकथेतील राजकुमार

विजुभाऊ _/\_

प्रतिसाद संपादित करुन लेख वर आणायची आयडिया भन्नाटच.

प्रतिसाद संपादित करुन लेख वर आणायची आयडिया भन्नाटच.
नो कॉमेन्ट्स. स्वतःच्याच लेखावर स्वतःच प्रतिसाद देत लेखाचा ट्यार्पी वाढवायची युक्ती आम्ही वापरत नाही.
असो. ( शनिवार वाड्यावरची कोमेन्ट इतकी झोंबेल ऐशी कल्पना नव्हती )
तुमच्या म्हणण्याची दखल घेतल्या गेलेल्या आहे