१८५७ अ हेरीटेज वॉक (३)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
25 Jun 2011 - 3:19 pm

मागील दुवे
१८५७ अ हेरीटेज वॉक http://misalpav.com/node/18261
१८५७ अ हेरीटेज वॉक (२) http://misalpav.com/node/18312
ग्वाल्हेरच्या राजांचे बंधु हिंदुराव शिंद्यांचे दिल्लीत ब्रीटीश रेसीडेन्ट शी फारच मित्रत्वाचे संबन्ध होते. ब्रीटीशानी हिंदुरावांच्या वाड्याचा आश्रय घेवून तेथून लढा चालू ठेवला. त्यांचा वाडा म्हणजे किल्लाच बनला होता.हिंदुरावाचा जेथे वाडा होता .त्या जागेवर सध्या बाडा हिंदुराव हॉस्पिटल आहे.
ब्रीटीशानी सैन्याची जमवाजमव सुरु केली. टेलीग्राफ मशीनचा या काळात फारच उपयोग झाला.
त्याचे स्मारक म्हणून कंपनी सरकारने जेथे टेलीग्राफचे ओफिस होते तेथे एक टेलीग्राफ मेमोरीयल बांधले आहे. त्यावरील शिलालेखात एक नोंद आहे The electric Telegraph that saved India

1
( हाच तो बाडा हिंदु राव ( फोटो अंतरजालावरून साभार) सन १८५८ )
2
हा फ्लॅग टॉवर येथे ११ मे रोजी बंडखोर सर्वप्रथम एकत्रीत झाले. ( फोटो आंतरजालावरून) १८५८
मिर्झ मुघल ने दिल्ली ( शहाजहानाबाद ) शहरात शांतता आणण्याचा प्रयत्न केला पण त्याची पोहोच फक्त लाल्ल किल्ल्याच्या भिंतींच्या आतच मर्यादीत होती . शहराच्या बाहेर गुज्जरानी लोकांकडून पैसे वसूल करायला सुरवात केले. दिल्ली शहरातील लोकांची अवस्था मात्र फारच बीकट झाली. लोक चिडून जो जो अभारतीय ( युरोपीय) दिसेल त्याला लुटू लागले.
इकडे ब्रीटीशानी सैन्याची जमवाजमव सुरु केली . ब्रीटीशांचे बरेचसे अधिकारी दिल्लीतेले उन्हाळ्यामुळे कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी सुटीवर गेलेले होते . लोकाना जमा करण्यात टेलीग्राफ मशीनचा या साठी फारच मोठा उपयोग झाला. २७ मे पर्यन्त त्यानी कर्नाल येथे असलेल्या काही सैनीकी तुकड्या दिल्लीत हलवल्या.
८ जून ला बदली की सराय येथे त्यांची बंडखोरांसमवेत पहिल्ली चकमक झाली. त्यात गुरखा पलटणीने बंडखोराना हुसकावून लावले. बंडखोरांचा बराचसा दारुगोळा या छोट्या चकमकीत कामी आला.
कंपनी सरकारच्या सैन्याने जनरल बर्नार्डच्या अधिपत्याखाली आता दिल्ली रीज चा ताबा घेतला होता. रीज हा यमुनेच्या ( काबूल गेट) जवळील साधारण १२०० यार्डाचा खडकाळ पट्टा आहे. दिल्लीचा उन्हाळा आणि रीज मधील वातावरण हे या रोगदायक होते. तरीही जनरल बर्नार्डने लढा चालूच ठेवला.१३ जून ला त्याने आपल्या सैन्याला हल्ला चढवायच आदेश दिला. काही गैर समजामुळे संपूर्ण तुकडी पोहोचु शकली नाही ऐन लढाईत हल्ल्याचा आदेश मागे घेण्यात आला.यातच
इकडे दिल्लीत रोज नवनवे बंडखोर सैनीक येत होते. त्यांच्या संख्येत भर पडत होती नव्या आलेल्यात बरेचसे अफगाणी मुजाहिदीन होते.बंडखोर आता प्रबळ होत होते. त्यानी हिंदुराव च्या वाड्यावर हल्ले चढवायला सुरवात केली.

१९ जून ला आणि २३ जून ला दोन मोठे हल्ले करण्यात आले तीनही बाजूने हल्ले चढवुन इंग्रजी फौजेची कोंडी करण्यात आली. कसेबसे हे हल्ले परतवून लावण्यात आले. रीज्मधील अवस्था फारच बीकट होती. हल्ले आणि आजारपण यामुळे ब्रीटीश सैन्य जेरीस आलेले होते. यातच जनरल बर्नार्ड कॉलरा मुळे मृत्युमुखी पडला.त्याचा कार्यभार घेणारा जनरल रीड हा सुद्धा आजारी होता. त्यामुळे आर्केड विल्सन ला मेजर जनरल च्या हुद्द्यावर बढती देवून नियुक्ती करण्यात आली. तो देखील अशक्त झाला होता. त्याच्या दिमतीला असलेला नेव्हील चेंबरलीन हा तरुण अधिकारी १४ जुलै ला गंभीर जखमी झाला. याच सुमारास पंजाब हून १४ ऑगस्ट ला ब्रीगेडीयर जॉन निकोल्सन ताज्या दमाच्या नव्या ४२०० सैनीकांची कुमक घेवून दिल्लीस आला. घाबरट आणि थकलेल्या आर्केड विल्सन च्या उलट निकोलसन हा फारच धाडसी आणि कणखर होता.
मिर्झा मुघल च्या अपयाशामुळे बहादूरशहा त्याच्यावर नाराज होता त्याने बरेलीहुन मोठी लूट आणलेल्या बख्त खान या कंपनी सरकारच्या गोलंदाजाला सैनापती घोषीत केले. १ जुलै ला दिल्लीत पोहोचलेल्या बख्त खानाने ९ जुलै ला एक मोठा हल्ला चढवला पण तो अपयशी ठरला. त्यानंतर तो छोटे मोठे हल्ले करतच राहीला बंडखोर सैन्याचे मनोधैर्य वारंवार येणार्‍या अपयशांमुळे हेलकावे खात होते त्यातच प्रत्येक हल्ल्या गणीक त्यांचा दारुगोळा कमी कमी होत होता. बख्त खानाने दिल्लीच्या उत्तरेकडे यमुना नदी ओलांडून ब्रीटीश फौजेवर पिछाडीवरून हल्ल चाढवायचा बेत आखला. २४ ऑगस्टला त्याने ८००० सैनीक आनि १३ तोफा घेवून पालम मार्गे नजफगड च्या दिशेने भर पावसात ला कूच केले पण ब्रीटीश सैन्याने पालम येथील यमुनेवरचा पूल अगोदरच उध्वस्त करून ठेवला होता. पावसाने आणि भुकेने सैन्याची अवस्था आणखीनच बीकट करून ठेवली बख्त खानाचीयोजना त्याने १० दिवस अगोदर अमलात आणली असती तर चित्र वेगळे दिसले असते. १४ ऑगस्ट ला आलेल्या जॉन निकोलसनने २४ ओगस्ट ला बख्त खान निघाला आहे हे कळतात २५ ऑगस्टला नजफगड कडे कूच केले.यावेळी चीफ मॅजीस्ट्रेट थिओफेलस मेट्कॅफ ( हाच १० मे च्या हल्ल्यात मरता मरता वाचला होता) निकोलसन ला मार्गदर्शन करत होता.
दुपारी ४ च्या सुमारस मॅटकॅफ ला बंडखोर सैनीकांच्या हालचालींचा स्पष्ट सुगावा लागला ४ तोफा निमच कारावान सराय ( तात्पुरते निवासस्थान) मधे होत्या तर इतर होत्या ९ तोफा पालम आणि सराय च्या दरम्यान होत्या. निकोल्सन ने त्याचे सैन्य दोन भागात विभागले एका तुकडी चे नेतृत्व करीत त्यानी नजफगडवर हल्ला चढवला अवघ्या २० यार्डावरून त्याने भारतीय सैन्यावर तोफांचा भडीमार केला बख्त खानाचे बराच प्रतीकार केला यात ब्रीटीश सैन्याचे कित्येक सैनीक घायाळझाले एकअधिकारी मृयुत्युमुखी पडला. पण बख्त खान निकोलसनची आगेकूच थांबवु शकला नाही. भारतीय सैनीकाना ( बंडखोराना) माघार घ्यावी लागली . बख्त खानाच्या सगळ्या तोफा ब्रीटीशांच्या हातात पडल्या.
उपासमार पाउस आणि सैन्यातील बेदीली ( बख्त खानाला सेनापती मानायला हिंदू सैनीक तयार नव्हते) या मुळे स्वातन्त्र्य लढा देणार्‍या सैन्याला हार पत्करावी लागली होती. त्यांचे मनोधैर्य अधीकच खचले.
१८५७ च्या दिल्लीच्या लढाईत नजफगडची लढाई हा ब्रीटीश सैन्याचा पहीला मोठा विजय होता. या मुळे ब्रीटीशांचे मनोधैर्य उंचावले गेले.

3
( तोफ गोळ्यांच्या मार्‍यामुळे उध्वस्त झालेले काश्मिरी गेट आणि त्याची तटबंदी ( चित्र आं.जा वरून) १८५८
(क्रमशः )

इतिहासलेख

प्रतिक्रिया

चेतन's picture

25 Jun 2011 - 6:47 pm | चेतन

विजुभाउ क्रमशः चांगलं चालु आहे. चित्रातला हिंदुराव वाडा इतका मोठा वाटत नाही आहे की ब्रिटीश तेथे तग धरु शकतील. १८५७ मध्ये मराठा सैनिकांनी काय भुमिका बजावली आणि बहादुर शहाकडे साधारण किती सैन्य होते?

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

चेतन

पैसा's picture

25 Jun 2011 - 6:56 pm | पैसा

माहिती नसलेले बरेच तपशील लिहिताय विजुभाऊ. फोटोही उत्तम.

पिवळा डांबिस's picture

25 Jun 2011 - 8:01 pm | पिवळा डांबिस

आजचा हेरिटेज वॉक आवडला.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Jun 2011 - 7:13 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह छान लेख. चित्रांमुळे रंगत आली आहे. अजून पूर्ण वाचलेला नाहीये. पण पूर्ण वाचून सविस्तर प्रतिक्रिया टंकेन.

अर्धवट's picture

26 Jun 2011 - 3:16 pm | अर्धवट

हजर

चित्रातला हिंदुराव वाडा इतका मोठा वाटत नाही आहे की ब्रिटीश तेथे तग धरु शकतील. १८५७ मध्ये मराठा सैनिकांनी काय भुमिका बजावली आणि बहादुर शहाकडे साधारण किती सैन्य होते?
तो वाडा कंपनी सरकारच्या सैन्याने त्यांचे युद्ध कार्यालय म्हणून वापरले. बंडखोर सैनीक शहाजहानाबादच्या( लाल किल्ला) च्य तटबंदीच्या आत आणि ब्रीटीश सैन्य बाहेर होते . सैनीक रीज च्या आश्रय घेवून लढत होते. या लढाईत काही उत्साही सैनीकानी रीज मधील गवताला आग लावून दिली त्यामुळे त्याना .उघड्यावर झोपावे लागत होते. त्यामुळे बरेच लोक आजारी पडत होते.
बहादूरशहा जफर हा नुसताच नावाचा राजा होता. कम्पनी सरकारच्या लेखी तो हिंदुस्तानचा शहेनशहा नव्हता तर फक्त किंग ऑफ दिल्ली होता. त्याची सत्ता फक्त लाल किल्ल्याच्या तटबंदीत होती. ती देखील नावापुरती. आयुष्यभर बहादूरशहा केवळ पतंग उडवणे आणि कविता ऐकवणे यातच मश्गुल असायचा. त्याच्याकडे स्वतःचे सैन्य असे काही नव्हते. जे काही होते ते त्याच्या किल्ल्यातील नोकरचाकरच होते.
बहादुरशहा जफर ला त्याचा "किंग ऑफ दिल्ली" हा खिताब देखील त्याच्या निधनानंतर संपुष्टात येइल असे कम्पनी सरकारने बजावले होते. लाल किल्ल्याच्या आत असलेल्या शहाजहानाबाद शहरात त्या सुमारास साधारण ९००० च्या आसपास बंडखोर होते. तसेच रोज कोठून ना कोठून नवीन लोक त्यात सामील होत होते