१८५७ अ हेरीटेज वॉक (५)

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
3 Aug 2011 - 5:41 pm

मागील दुवे
१८५७ अ हेरीटेज वॉक http://misalpav.com/node/18261
१८५७ अ हेरीटेज वॉक (२) http://misalpav.com/node/18312
१८५७ अ हेरीटेज वॉक (३) http://misalpav.com/node/18381
१८५७ अ हेरीटेज वॉक (४) http://misalpav.com/node/18464
दिल्लीतील बंड मोडून गेले होते.२१ सप्टेंबर ला दिल्ली ( शहाजहानाबाद) पूर्णपणे ताब्यात घेतले. भारतीय स्वातन्त्र्य संग्रामाच्या दृष्टीने हा एक मोठा मानसीक आघात होता. टाकलेली जबाबदारी पूर्ण झाल्या नंतर दुसर्‍या दिवशी २३ सप्टेंबरला जॉन निकोलसनचा मृत्यू झाला.
(असे सांगतात की कडव्या शिस्तीचा भोक्ता असलेला निकोल्सन हा विक्षीप्त म्हणून प्रसिद्ध असला तरीही त्या सैनीकांत तो फार आदरणीय होता. त्याच्या कबरीवरची फुले उचलुन बंडखोर शीख / जाट सैनीकानी इंग्रजांविरुद्ध न लढण्याची शपथ घेतली )

कोनत्याही युद्धाचे परीणाम अटळ असतात. या स्वातन्त्र्य युद्धामुळे भारतावर 30,000,000 पौंडाचे कर्ज लादले गेले. उध्वस्त , जळती गावे हे सारे विषेषतः उत्तर भारतात जास्तच जाणवले.
१८५७ च्या स्वातन्त्र्य युद्धाचा भारतावर परीणाम अटळ होता. तसा तो इस्ट इंडीया कंपनीबाबत देखील अटळ होता. स्वातन्त्र युद्धा मुळे धास्तावलेल्या ब्रीटीश नागरीकानी भारताचे जबाबदरी एखाद्या व्यापारी कंपनी वर नको तर संपूर्णपने ब्रीटीश सरकारने घ्यावी या मागणीला जोर चढला
भारतावरील इस्ट इंडीया कंपनीची सत्ता १८५८ च्या गव्हर्न्मेंट ऑफ इंडीया अ‍ॅक्ट नुसार इंग्लंड च्या राणीच्या हातात गेली. नीळ रेशीम सुती कापड अफू यांच्या व्यापार करण्यासाठी निर्मान केलेल्या व्यापारी कंपनीने हिंदीमहासागरावरचे जवळजवळ २५० वर्षांपासूनचे अधिराज्य खालसा झाले.
इस्ट इंडीया कंपनीला १६१२ साली मुघल शाहजादा जहांगीरने भारतात व्यापार करायला परवानगी दिली. त्यानंतर इथल्य परकीय व्यापारावर त्यांचेच वर्चस्व राहीले.
१६८२ शाहेस्तेखानाने ( तो च तो .महाराजानी बोटे छाटलेला... )बंगालचा सुभेदार असताना मुघल साम्राज्यभर व्यापार करण्याची परवानगी हा तर कंपनी ची महती वाढवणारा महत्वाचा टप्पा झाला.
मुघल सल्तनीत इस्ट इंडीया कंपनीला सल्तनतीची नाणी छापायचे हक्क मिळाले होते. कोणी किती नाणी छापयची हे कंपनी सरकार ठरवत होते.
इस्ट इंडीया कंपनी हे साध्य केले ते त्याना मिळालेला राजाश्रय आणि भारतात त्यानी आणलेली
" तैनाती फौज" ची सोय. इथल्या राज्याराज्याना तैनाती फौजीच्या हत्याराने परावलंबी बनवले.
सैन्यदळ आउट सोर्स करायचा हा मार्ग अर्थात इथल्या राज्यांचा काळ ठरला.
१ जानेवारी १८७४ साली इस्ट इंडीया कंपनीचे विलीनीकरण झाले. आणि इस्ट इंडीया कंपनीचे नाव नामशेष झाले.
इंग्रज भारतात आले येथील जनतेवर त्यांचे बरे वाईट परीणाम झाले. आजतागायत भारतावर बरीच आक्रमणे झाली मात्र इंग्रजांचे आक्रमण आणि इतर आक्रमणे यात फरक होता. इतर जण येथील भूभाग बळकवायला संपत्ती लुटायला आले आणि इथलेच झाले.
इंग्र्ज आले होते ते व्यापारासाठी. भारतातील भूभाग त्यानी केवल बळकावलच नाही तर त्याची अक्षरशः लूटमार केली. सोने ,जडजवाहीर, खनीज संपत्ती , लाकूड ,जंगल संपत्ती,जे काही लुटता येईल ते लुटले. बदल्यात काहीच दिले नाही. असे म्हंटले जाते की युरोपात जी औद्योगीक क्रांती झाली ती बहुतेक सर्व हिंदुस्थानच्या संपत्तीतूनच झाली.
१८५७ च्या लढ्या नंतर कंपनी सरकारचे राज्य गेले आणि ब्रीटीश सरकारचे राज्य आले. केवळ एक राज्यपद्धती गेली आणि दुसरी आली इतकाच हा बदल नव्हता तर एकुणातच इंग्रजांच्या मनोवृत्तीतही बराच बदल झाला होता.
इथे इंग्रज आले त्यानी येताना सोबत स्वतःच्या चालीरीती आणल्या पण त्या सर्वसामान्य जनतेने स्वीकारलेल्या नव्हत्या. अजूनही इथे त्याना हवे तसे इंग्रज धार्जीणे लोक बनवण्यासाठी शिक्षण पद्धती उपलब्ध नव्हती. तसे लोक घडवणारे शिक्षण नव्या सरकारने आखले. त्यासाठी १८५७ च्या संग्रामनन्तर जुने गर्वन्मेम्ट कॉलेज बंद करून त्या जागी सेंट स्टीफन कॉलेज सारख्या संस्थांची स्थापना केली.
ब्रीटीश सरकारने भारताचे दायीत्व स्वीकारले त्यात बर्‍याच अडचणी होत्या . सर्वात प्रथम म्हणजे इथले सैन्य पुनर्स्थापित करणे. यासाठी ब्रीटीश सरकारने पायदळाची एक स्वतन्त्र रेजीमेन्ट भारतात स्थापीत केली.
स्वातन्त्र्य संग्रामात कंपनी सरकारचे बरेचसे सैनीक विरोधात गेले नाहीत . ते भारतीय असूनही ब्रिटीशांसाठी लढले. त्यानी बंड केले नाही.या सैन्यात भारतीयांचाच भरणा अधीक होता. दिल्लीच्या लढ्यात वापरल्या गेलेल्या ११२०० च्या फौजेत ७९०० पेक्षा जास्त सैनीक भारतीय होते. या सैनीकांशिवाय युद्ध लढलेच गेले नसते.
ब्रीटीश सरकारचे राज्य आल्या नंतर मात्र या सैनीकाम्वर विश्वास ठेवणे सरकारला कठीण वाटू लागले.
सरकारने सैन्यात ब्रीटीश जवानांचे प्रमाण वाढवले. इथल्या देशी लोकांच्या तुकड्या कमी केल्या.
येसुदास रामचंद्र हे गृहस्थ दिल्लीच्या गवर्नमेंट कॉलेज मध्ये १८४४ ते १८५७ दरम्यान गणीताचे प्राध्यापक होते. इंग्रजी शिक्षणाबद्दल त्याना आस्था होती. त्यानी ख्रिस्चन धर्म देखील स्वीकारला होता.
अशा लोकांची मात्र बरीच पंचाईत झाली. इंग्रजांच्या बाजूचे म्हणून देशी लोक त्याना दोन हात लांबच ठेवत आणि ब्रीटीश सरकार ;हे लोक जन्माने भारतीय म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवयाला तयार नव्हते
कंपनी सरकारचे जे अधिकारी भारतात आले होते त्या पैकी काहीना भारताबद्दल त्याना प्रेम वाटू लागले होते त्यानी भारतीय चालीरीती आत्मसात केल्या होत्या. त्यांचे खाणे पिणे पेहेराव इतकेच काय तर मेल्या नंतर थडगी देखील इथल्या मोघली अंमलदारांसारखी नक्षीदार करायला लागले होते.
खाणे पिणे व इतर षौक यात हे अधिकारी मोघली राजपुत्र सरदारांच्या तोडीस तोड होते. अशा ब्रीटीश अधिकार्‍यांचे नाव त्यांच्याच लोकानी "व्हाईट मुघल" असे पाडलेले होते. मेजर जनरल चार्ल्स स्टुअर्ट हा ब्रीटीश असूनही त्याने बर्‍याच हिंदु चालीरीतींचा अवलंब केला होता. गंगेत संध्या करणे , देवपूजा करणे वगैरे हा नित्यनेमाने करायचा . त्याने ब्रीटीश स्त्रीयाना साडी वापरा असे सांगायला सुरवात केली. सैन्यातील शिपायाना दाढी मिशा राखायल परवानगी दिली.
कॅप्टन चार्ल्स कर्कपॅट्रीक हा खर्‍या अर्थाने व्हाईट मुघल नावास पात्र होता. तो हैद्राबदाच्या निझामाच्या पदरी होता.त्याने इस्लाम स्वीकारला होता. पान खाणे हुक्का ओढणे , मुजरा पहाणे इत्यादी नबाबी षौक त्याने आत्मसात केले होते. वेष पेहेराव तर तो इथल्या लोकांसारखाच करी. पर्शीयन आणि उर्दू या भाषा बोलायचा. त्याने हैद्रबादच्या निझामाच्या प्रधानाच्या नातीशी लग्न देखील केले होते.
या गृहस्थांचा एक नबाबी षौक म्हणजे त्याला १३ बायका होत्या. तो रोज त्या सर्वांसोबत संध्याकाळी गावातून हत्तीवरून फेरफटका मारे. विशेष म्हणजे तो स्वतः एका वेगळा हत्तीवर सर्वात पुढे असे आणि इतर प्रत्येकीसाठी स्वतन्त्र हत्ती असायचा. अशी १४ हत्तींची वरात रोज हैद्राबादमध्ये निघायची.
कंपनी सरकारचा अस्त होऊन ब्रीटीश सरकारचा अंमल सुरु झाल्या नंतर या गोष्टी अर्थातच कमी कमी होत गेल्या.
भारत एका नव्या युगाच्या दिशेने वाटचाल करू लागला.
( क्रमशः)

इतिहासअनुभव

प्रतिक्रिया

पैसा's picture

3 Aug 2011 - 10:25 pm | पैसा

"पांढरे मुघल" आणि त्यांची माहिती खूपच मनोरंजक! "व्हाईट मुघल्स" पुस्तकाची आठवण झालीच.

विकास's picture

4 Aug 2011 - 1:53 am | विकास

असे म्हंटले जाते की युरोपात जी औद्योगीक क्रांती झाली ती बहुतेक सर्व हिंदुस्थानच्या संपत्तीतूनच झाली.

या संदर्भात मला टाईम्स मधील Why India's Rise is Business As Usual हा लेख आठवतो.

त्या लेखातील मुद्दे थोडक्यात :

  1. युरोपिअन्स आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेची वाताहात झाली.
  2. १६०० मधे जेंव्हा ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनी स्थापन झाली - तेंव्हा ब्रिटीशांची वार्षीक वाढ (जीडीपी) जगाच्या १.८% होता तर भारताचा जगाच्या २२.५%.
  3. तेच आकडे १८७० मधे ब्रिटीशांचे ९.१% झाले आणि भारत इतिहासात प्रथमच अविकसीत राष्ट्र म्हणून गणले गेले.
  4. डॉलर्सच्या मोजण्यामधे, चीन अमेरिकेस २०३०/२०४० मधे मागे टाकेल तर भारत २०५० च्या सुमारास
  5. ब्रिटीशांमुळे जरी काही चांगल्या गोष्टी भारतात आल्या असल्या तरी त्यांनी लक्षात ठेवावे की त्यांनी भारताचा राजकीय, सांस्कृतीक नाश करून दारीद्र्य आणले.
  6. आता इतिहास परत बदलत आहे. ब्रिटनमधला सर्वात मोठा श्रीमंत भारतीयच (लक्ष्मी मित्तल) आहे आणि सर्वात मोठी स्टीलची कंपनी पण भारतीयांच्या (टाटा) ताब्यात आली आहे.
llपुण्याचे पेशवेll's picture

4 Aug 2011 - 11:29 am | llपुण्याचे पेशवेll

विकास यांच्या शब्दा शब्दाशी सहमत आहे.

सुनील's picture

4 Aug 2011 - 11:50 am | सुनील

दोनेक वर्षांपूर्वी वाचलेल्या एका लेखात (ब्रिटिशाने लिहिलेल्या) असे म्हटले होते की, भारतीय लोक ब्रिटिशांचे जॉब्स बळकावतात असे नव्हे तर, ब्रिटिश लोक दोनशे वर्षांपूर्वी भारतीयांचे बळकावलेले जॉब्स त्यांना परत देत आहे!

मराठी_माणूस's picture

4 Aug 2011 - 1:53 pm | मराठी_माणूस

इंग्र्ज आले होते ते व्यापारासाठी. भारतातील भूभाग त्यानी केवल बळकावलच नाही तर त्याची अक्षरशः लूटमार केली.

हिंदी मधे एक म्हण आहे , "अपनी गलि मे कुत्ता भी शेर " . तात्पर्य , प्रत्येकाचा एक मर्यादीत भाग असतो जिथे तो वर्चस्व गाजवु शकतो . इथे मुठभर ईंग्रजानी आपल्या "गल्ली" च्या किततरी बाहेर येउन खुप काळ वर्चस्व गाजवले.
सकल हिंदुस्तानी लोकानी मानात आणले असते तर ईंग्रजाना मुंगी सारखे चिरडले असते .पण दुर्दैवाने तसे घडले नाही.

सकल हिंदुस्तानी लोकानी मानात आणले असते तर ईंग्रजाना मुंगी सारखे चिरडले असते .पण दुर्दैवाने तसे घडले नाही.
जेंव्हा सूरत शिवाजी महाराजनी लुटली त्या वेळीस इंग्रजांच्या वखारीत केवळ ४९ सैनीक /शिपाई होते. त्यानी त्या तिथे एक सैनीकी मार्च काढला होता. शिवाजीचे सैन्य इंग्रजांच्या वखारीच्या आसपास देखील फिरकले नाही. हा एक दाखला पुरेसा आहे इंग्रजांच्या शौर्याचा.
इंग्रज शूर होते या पेक्षाही त्याना भारतीय लोक आपल्यावर शस्त्र उगारणार नाहीत याची खात्री होती.
शिवाजी ने इंग्रजांना चांगले होते.
ब्रिटिश लोक दोनशे वर्षांपूर्वी भारतीयांचे बळकावलेले जॉब्स त्यांना परत देत आहे!
सुनील ब्रीटीशानी भारतातील केवल संपत्ती लुबाडली नाही तर भारतात गुलामीची मानसिकता रुजवली.
जणू भारताचे स्वत्व लुबाडले.
इंग्रज भारतात येण्यापूर्वी सर्वसाधारण भारतीय पुरुष सशस्त्र असायचा . इंग्रजानी राजकीय स्थैर्याच्या नावाखाली कायदे करून भारत निशस्त्र केला. अगदी शब्दशः नाही पण त्यानी भारताचे खच्चीकरण केले

विकास's picture

4 Aug 2011 - 4:51 pm | विकास

जेंव्हा सूरत शिवाजी महाराजनी लुटली त्या वेळीस इंग्रजांच्या वखारीत केवळ ४९ सैनीक /शिपाई होते. त्यानी त्या तिथे एक सैनीकी मार्च काढला होता....

सहमत.

ब्रीटीशानी भारतातील केवल संपत्ती लुबाडली नाही तर भारतात गुलामीची मानसिकता रुजवली. जणू भारताचे स्वत्व लुबाडले....पण त्यानी भारताचे खच्चीकरण केले

खरेच आहे. आज आपण त्यातून काही अंशी बाहेर आलो असलो, येत असलो तरी आपले स्वत्व अजूनही शोधतच आहोत असे वाटते. (येथे स्वत्व हा शब्द मी अभिमान, गर्व वगैरे अर्थाने म्हणत नाही आहे,)

सुखी's picture

12 May 2022 - 11:53 pm | सुखी

याचा पुढचा भाग आहे का?

अमरेंद्र बाहुबली's picture

14 May 2022 - 11:26 pm | अमरेंद्र बाहुबली

विजूभाऊ हे काय?? ही मालिका अर्धवट का?? कितितीतरी वेगळी माहीती मिळाली. अतिशय रंजक मालिका आहे. कृपया पुढे चालू करा. तुम्हाला १८५७ मध्ये बलिदान गेलेल्या सैनिकांचा वास्ता.

श्वेता२४'s picture

30 May 2022 - 2:05 pm | श्वेता२४

अतिशय माहितीपूर्ण लेखमाला. पहिला भाग वाचायला सुरुवात केली आणि कधी पाच भाग वाचून झाले कळलंच नाही. बरीट माहिती नव्याने कळली.

विजुभाऊ's picture

30 May 2022 - 5:12 pm | विजुभाऊ

ही मालीका सुरू करताना मी दिल्लीत होतो. तेथे एक हेरीटेज वॉक कार्यक्रमात गेलो होतो. त्यावेळे सुचलेले पाहिलेले लिहिले.
लेखनमालीकेचा उद्देश १८५७ चा लढा आणि मुख्यतेकरून दिल्ली तील घडामोडी याबद्दलच लिहायचे होते.
या लेखमालीकेला ११ वर्षे होऊन गेली.
पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेय.
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांना शिंदियांसारख्यां अनेक राज्यकर्त्यांनी साथ दिली त्यामुळे त्यांचे फावले.
दुसरे असे की भारतीय जनतेला स्वतःची भारतीय अशी ओळख पटलेली नव्हती. एकसंघ भारत या पेक्षा प्रत्येकाला स्वतःचे राज्य महत्वाचे वाटत होते. ते टिकवणे महत्वाचे वाटत होते.
त्यामुळे इंग्रज पूर्णपणे नेस्तनाबूत झाले नसते.
तिसरे म्हणजे भारतात सर्वात मोठ्या प्रमाणात निर्नायकी होती.
चौथे म्हणजे १८५७ चा लढा उठाव हा उत्तरभारतात जितक्या प्रकर्षाने झाला तितका तो दक्षीण भारतात नाही झाला.