(रेडा म्हणे वडाला)

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
18 Jun 2011 - 9:23 am

आमची प्रेरणा

रेडा म्हणे वडाला "भलताच जाच आहे
दोरे बरे अरे हा यमराज त्रास आहे.

ने-आण मी करावी, यमभार मी वहावा
तरी मजसी तो म्हणे की, "तू बावळाच आहे!"

ना इंक्रिमेंट काही, ना सुट्टी घे कधी जो
ऐसा गुलाम त्याला नेहमी हवाच आहे.

जातो आता निघोनि धाडून मेल त्याला
कैसे हरेल प्राण ? मग कोण भार वाहे ?

वैविध्य वाहनाचे त्या पाहूदेच आता
सांगेन जॉब माझा हा सातवाच आहे."

बघा जमलंय का ते !!
अवांतरः त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही, ते समस्यापूर्ती साठी दिल्यासारखं वाटतं. ;)

भयानकहास्यकरुणअद्भुतरसकविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Jun 2011 - 9:33 am | प्रचेतस

हा हा हा.
लै भारी रे सूड. मजा आली.

प्रीत-मोहर's picture

18 Jun 2011 - 9:46 am | प्रीत-मोहर

हाहाहा सुडक्या :)

पैसा's picture

18 Jun 2011 - 9:58 am | पैसा

विडंबन जमलं! या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांची मनोगतं कळतायत! मस्त!

आत्मशून्य's picture

18 Jun 2011 - 10:00 am | आत्मशून्य

:)

प्यारे१'s picture

18 Jun 2011 - 10:04 am | प्यारे१

मस्त रे सुड्या.

आता कोण कंपूबाज याचा आडवा छेद घेणार? ;)

लई भारी रे, मस्त मजा आली, आता वटपॉर्णिमा सोप्पं लाईफ जगणा-या पुरुषांना जवळचा सण वाटेल आणि वडाची अनामिक भिती वाटणार नाही.

मेघवेडा's picture

18 Jun 2011 - 11:35 am | मेघवेडा

हा हा हा! क्लास!

अमोल केळकर's picture

18 Jun 2011 - 12:08 pm | अमोल केळकर

हा हा मस्तच :)

अमोल केळकर

नगरीनिरंजन's picture

18 Jun 2011 - 12:15 pm | नगरीनिरंजन

मस्त रे! रेड्याचेही मस्त चितारलेस अंतरंग!

किसन शिंदे's picture

18 Jun 2011 - 12:28 pm | किसन शिंदे

हा.हा.हा

सुड लयं भारी रे.

परिकथेतील राजकुमार's picture

18 Jun 2011 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार

आयटी हमालांच्या दु:खाला वाचा फोडणारे जळजळीत लेखन.

हमाल मुलगा

धन्या's picture

18 Jun 2011 - 1:12 pm | धन्या

हे विडंबन बाकी क्लासच आहे...

वर पर्‍या म्हणतोय तसं आयटी हमालांच्या दु:खाला वाचा फोडणारे जळजळीत लेखन.

लगे रहो भाई, हम आयटीवाले तुम्हारे साथ हैं (जब तक अच्छी ऑफर नही मिलती तब तक :) )

रमताराम's picture

18 Jun 2011 - 7:44 pm | रमताराम

बिचारा रेडा. आणि त्याला स्विच मारायलाही फारसे पर्याय नाहीत, स्पेशलायजेशनचा हाच त्रास असतो साला.

(स्पेशलायजेशनवाला) रमताराम

सूड's picture

18 Jun 2011 - 8:42 pm | सूड

जे ब्बात, ररा काका!! :D

प्रभो's picture

18 Jun 2011 - 9:15 pm | प्रभो

ररा, कंस संपायच्या आधी ' रेडा' हा शब्द लिहायचा राहिला का?? ;)

सुड, भारी रे!!

रमताराम's picture

20 Jun 2011 - 7:57 pm | रमताराम

लिहिला होता आधी, पण नंतर रेडे मोर्चा घेऊन येतील या भीतीने डिलिटला.

भडकमकर मास्तर's picture

18 Jun 2011 - 11:32 pm | भडकमकर मास्तर

उत्तम जमलंय.. धन्यवाद

निवेदिता-ताई's picture

20 Jun 2011 - 7:49 am | निवेदिता-ताई

छान ,छान

गणेशा's picture

20 Jun 2011 - 4:19 pm | गणेशा

मस्त जमली आहे कविता

राजेश घासकडवी's picture

20 Jun 2011 - 5:42 pm | राजेश घासकडवी

समस्त यमग्रस्त रेड्यांची तळमळ ओतलेली आहे.

जोशी 'ले''s picture

23 Jun 2013 - 3:49 pm | जोशी 'ले'

मस्त :-)

बॅटमॅन's picture

23 Jun 2013 - 4:16 pm | बॅटमॅन

हाहाहा , मस्त जमलंय रे सुडक्या!!!!

पैसा's picture

23 Jun 2013 - 4:40 pm | पैसा

तू वटपौर्णिमेला रेड्याचे मनोगत लिहिले होते इतके आठवत होते. पण नेमकी लिंक सापडेना! हा धागा वर आणणार्‍यांना धन्यवाद!

वटपौर्णिमेनिमित्त धागा वर आणत आहे. ;)

पैसा's picture

12 Jun 2014 - 11:15 pm | पैसा

त्या आणखी दोन कवितांची पण आठवण झाली होती!

रेवती's picture

12 Jun 2014 - 11:52 pm | रेवती

अजरामर काव्य!

कवितानागेश's picture

17 Jun 2014 - 12:31 pm | कवितानागेश

पुनर्वाचनाचा आनंद घेतला. :)

आयुर्हित's picture

13 Jun 2014 - 2:38 am | आयुर्हित

कविता मनापासुन आवडली, पण रेड्याचीच किव आली.
रेड्याला हे माहितच नाही की आता बुलेटट्रेन(स्पीड)चा जमाना आलाय!

यावर यमराजाचे मनोगत....!

सूड's picture

2 Jun 2015 - 4:06 pm | सूड

वटपौर्णिमेनिमित्त धागा वर आणत आहे. ;)

मधुरा देशपांडे's picture

2 Jun 2015 - 4:19 pm | मधुरा देशपांडे

:)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Jun 2015 - 4:30 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

आज हिच कविता मला व्हॉट्सअ‍ॅपला आली रे बाबा =))

हायला..त्यांना ओरजिन सांगा!! =))

विशाल कुलकर्णी's picture

2 Jun 2015 - 6:03 pm | विशाल कुलकर्णी

चला वॉट्सअ‍ॅपला आली म्हणजे तुम्ही फेमस झालात राव. कविता चोरी व्हायला सुद्धा भाग्य लागतं. ;)
बाकी भन्नाटच ,लै भारी

वेल्लाभट's picture

2 Jun 2015 - 6:22 pm | वेल्लाभट

कहर ! जाम आवडली !

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2015 - 6:47 pm | डॉ सुहास म्हात्रे

लई भारी ! विडंबन मस्तच झालंय !!

विवेकपटाईत's picture

2 Jun 2015 - 7:34 pm | विवेकपटाईत

त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही.
आज सकाळी सौ. ने वट पूजा केली (मला माहितच नव्हते आज वट पूर्णिमा आहे.). आत्ता येताच चहा बरोबर साबूदाण्याची उसळ होती. मी विचारले आज काय आहे. ती आज वट पूर्णिमा आहे. मी गमतीने म्हणालो आपला सातवा आहे. सौ. म्हणाली माझा तर पहिलाच आहे, पुढील ६ जन्मे आणखीन तुमच्या डोक्यावर मिरे वाटायचे आहे.....

अन्नू's picture

4 Jun 2015 - 5:51 pm | अन्नू

माझा तर पहिलाच आहे, पुढील ६ जन्मे आणखीन तुमच्या डोक्यावर मिरे वाटायचे आहे.....

म्हणूनच म्हणतो..
..

नूतन सावंत's picture

2 Jun 2015 - 8:12 pm | नूतन सावंत

हाहाहा. सूड काढलायत अगदी.

वेल्लाभट's picture

3 Jun 2015 - 11:08 am | वेल्लाभट

सूड उगवतात; काढत नाहीत.

काळा पहाड's picture

3 Jun 2015 - 11:13 am | काळा पहाड

सध्या ज्या धागे वर दिसतायत ते म्हणजे (रेडा म्हणे वडाला) आणि (चा)वटपौर्णिमा.
हेच का अच्चे दिन?