✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

(रेडा म्हणे वडाला)

स — सूड, Sat, 06/18/2011 - 09:23
आमची प्रेरणा रेडा म्हणे वडाला "भलताच जाच आहे दोरे बरे अरे हा यमराज त्रास आहे. ने-आण मी करावी, यमभार मी वहावा तरी मजसी तो म्हणे की, "तू बावळाच आहे!" ना इंक्रिमेंट काही, ना सुट्टी घे कधी जो ऐसा गुलाम त्याला नेहमी हवाच आहे. जातो आता निघोनि धाडून मेल त्याला कैसे हरेल प्राण ? मग कोण भार वाहे ? वैविध्य वाहनाचे त्या पाहूदेच आता सांगेन जॉब माझा हा सातवाच आहे." बघा जमलंय का ते !! अवांतरः त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही, ते समस्यापूर्ती साठी दिल्यासारखं वाटतं. ;)

प्रतिक्रिया द्या
11575 वाचन

💬 प्रतिसाद (40)

जमले जमले

प्रचेतस
Sat, 06/18/2011 - 09:33 नवीन
हा हा हा. लै भारी रे सूड. मजा आली.
  • Log in or register to post comments

हाहाहा सुडक्या

प्रीत-मोहर
Sat, 06/18/2011 - 09:46 नवीन
हाहाहा सुडक्या :)
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Sat, 06/18/2011 - 09:58 नवीन
विडंबन जमलं! या वटपौर्णिमेच्या निमित्ताने सगळ्यांची मनोगतं कळतायत! मस्त!
  • Log in or register to post comments

जय हो.

आत्मशून्य
Sat, 06/18/2011 - 10:00 नवीन
:)
  • Log in or register to post comments

मस्त रे सुड्या. आता कोण

प्यारे१
Sat, 06/18/2011 - 10:04 नवीन
मस्त रे सुड्या. आता कोण कंपूबाज याचा आडवा छेद घेणार? ;)
  • Log in or register to post comments

लई भारी रे, मस्त मजा आली, आता

५० फक्त
Sat, 06/18/2011 - 10:53 नवीन
लई भारी रे, मस्त मजा आली, आता वटपॉर्णिमा सोप्पं लाईफ जगणा-या पुरुषांना जवळचा सण वाटेल आणि वडाची अनामिक भिती वाटणार नाही.
  • Log in or register to post comments

हा हा हा! क्लास!

मेघवेडा
Sat, 06/18/2011 - 11:35 नवीन
हा हा हा! क्लास!
  • Log in or register to post comments

हा हा मस्तच अमोल केळकर

अमोल केळकर
Sat, 06/18/2011 - 12:08 नवीन
हा हा मस्तच :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

मस्त रे! रेड्याचेही मस्त

नगरीनिरंजन
Sat, 06/18/2011 - 12:15 नवीन
मस्त रे! रेड्याचेही मस्त चितारलेस अंतरंग!
  • Log in or register to post comments

हा.हा.हा सुड लयं भारी रे.

किसन शिंदे
Sat, 06/18/2011 - 12:28 नवीन
हा.हा.हा सुड लयं भारी रे.
  • Log in or register to post comments

आयटी हमालांच्या दु:खाला वाचा

परिकथेतील राजकुमार
Sat, 06/18/2011 - 12:35 नवीन
आयटी हमालांच्या दु:खाला वाचा फोडणारे जळजळीत लेखन. हमाल मुलगा
  • Log in or register to post comments

खासच...

धन्या
Sat, 06/18/2011 - 13:12 नवीन
हे विडंबन बाकी क्लासच आहे... वर पर्‍या म्हणतोय तसं आयटी हमालांच्या दु:खाला वाचा फोडणारे जळजळीत लेखन. लगे रहो भाई, हम आयटीवाले तुम्हारे साथ हैं (जब तक अच्छी ऑफर नही मिलती तब तक :) )
  • Log in or register to post comments

ज-ह-ब-ह-रा

रमताराम
Sat, 06/18/2011 - 19:44 नवीन
बिचारा रेडा. आणि त्याला स्विच मारायलाही फारसे पर्याय नाहीत, स्पेशलायजेशनचा हाच त्रास असतो साला. (स्पेशलायजेशनवाला) रमताराम
  • Log in or register to post comments

जे ब्बात, ररा काका!!

सूड
Sat, 06/18/2011 - 20:42 नवीन
जे ब्बात, ररा काका!! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

ररा, कंस संपायच्या आधी '

प्रभो
Sat, 06/18/2011 - 21:15 नवीन
ररा, कंस संपायच्या आधी ' रेडा' हा शब्द लिहायचा राहिला का?? ;) सुड, भारी रे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

नाय रे

रमताराम
Mon, 06/20/2011 - 19:57 नवीन
लिहिला होता आधी, पण नंतर रेडे मोर्चा घेऊन येतील या भीतीने डिलिटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

उत्तम जमलंय.. धन्यवाद

भडकमकर मास्तर
Sat, 06/18/2011 - 23:32 नवीन
उत्तम जमलंय.. धन्यवाद
  • Log in or register to post comments

छान ,छान

निवेदिता-ताई
Mon, 06/20/2011 - 07:49 नवीन
छान ,छान
  • Log in or register to post comments

मस्त जमली आहे कविता

गणेशा
Mon, 06/20/2011 - 16:19 नवीन
मस्त जमली आहे कविता
  • Log in or register to post comments

मस्त

राजेश घासकडवी
Mon, 06/20/2011 - 17:42 नवीन
समस्त यमग्रस्त रेड्यांची तळमळ ओतलेली आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

जोशी 'ले'
Sun, 06/23/2013 - 15:49 नवीन
मस्त :-)
  • Log in or register to post comments

हाहाहा , मस्त जमलंय रे

बॅटमॅन
Sun, 06/23/2013 - 16:16 नवीन
हाहाहा , मस्त जमलंय रे सुडक्या!!!!
  • Log in or register to post comments

हाहाहा!

पैसा
Sun, 06/23/2013 - 16:40 नवीन
तू वटपौर्णिमेला रेड्याचे मनोगत लिहिले होते इतके आठवत होते. पण नेमकी लिंक सापडेना! हा धागा वर आणणार्‍यांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

वटपौर्णिमेनिमित्त धागा वर आणत

सूड
गुरुवार, 06/12/2014 - 21:05 नवीन
वटपौर्णिमेनिमित्त धागा वर आणत आहे. ;)
  • Log in or register to post comments

हाहा!

पैसा
गुरुवार, 06/12/2014 - 23:15 नवीन
त्या आणखी दोन कवितांची पण आठवण झाली होती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अजरामर काव्य!

रेवती
गुरुवार, 06/12/2014 - 23:52 नवीन
अजरामर काव्य!
  • Log in or register to post comments

+१

कवितानागेश
Tue, 06/17/2014 - 12:31 नवीन
पुनर्वाचनाचा आनंद घेतला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रेड्याचीच किव आली

आयुर्हित
Fri, 06/13/2014 - 02:38 नवीन
कविता मनापासुन आवडली, पण रेड्याचीच किव आली. रेड्याला हे माहितच नाही की आता बुलेटट्रेन(स्पीड)चा जमाना आलाय! यावर यमराजाचे मनोगत....!
  • Log in or register to post comments

जाहिरात

सूड
Tue, 06/02/2015 - 16:06 नवीन
वटपौर्णिमेनिमित्त धागा वर आणत आहे. ;)
  • Log in or register to post comments

:)

मधुरा देशपांडे
Tue, 06/02/2015 - 16:19 नवीन
:)
  • Log in or register to post comments

आज

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 06/02/2015 - 16:30 नवीन
आज हिच कविता मला व्हॉट्सअ‍ॅपला आली रे बाबा =))
  • Log in or register to post comments

हायला..त्यांना ओरजिन सांगा!!

सूड
Tue, 06/02/2015 - 17:27 नवीन
हायला..त्यांना ओरजिन सांगा!! =))
  • Log in or register to post comments

चला वॉट्सअ‍ॅपला आली म्हणजे

विशाल कुलकर्णी
Tue, 06/02/2015 - 18:03 नवीन
चला वॉट्सअ‍ॅपला आली म्हणजे तुम्ही फेमस झालात राव. कविता चोरी व्हायला सुद्धा भाग्य लागतं. ;) बाकी भन्नाटच ,लै भारी
  • Log in or register to post comments

कहर ! जाम आवडली !

वेल्लाभट
Tue, 06/02/2015 - 18:22 नवीन
कहर ! जाम आवडली !
  • Log in or register to post comments

लई भारी ! विडंबन मस्तच झालंय

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 06/02/2015 - 18:47 नवीन
लई भारी ! विडंबन मस्तच झालंय !!
  • Log in or register to post comments

त्या 'सातवाच आहे' ला काही

विवेकपटाईत
Tue, 06/02/2015 - 19:34 नवीन
त्या 'सातवाच आहे' ला काही धक्का लावावासा वाटतच नाही. आज सकाळी सौ. ने वट पूजा केली (मला माहितच नव्हते आज वट पूर्णिमा आहे.). आत्ता येताच चहा बरोबर साबूदाण्याची उसळ होती. मी विचारले आज काय आहे. ती आज वट पूर्णिमा आहे. मी गमतीने म्हणालो आपला सातवा आहे. सौ. म्हणाली माझा तर पहिलाच आहे, पुढील ६ जन्मे आणखीन तुमच्या डोक्यावर मिरे वाटायचे आहे.....
  • Log in or register to post comments

.

अन्नू
गुरुवार, 06/04/2015 - 17:51 नवीन
माझा तर पहिलाच आहे, पुढील ६ जन्मे आणखीन तुमच्या डोक्यावर मिरे वाटायचे आहे.....
म्हणूनच म्हणतो.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

हाहाहा. सूड काढलायत अगदी.

नूतन सावंत
Tue, 06/02/2015 - 20:12 नवीन
हाहाहा. सूड काढलायत अगदी.
  • Log in or register to post comments

सूड उगवतात; काढत नाहीत.

वेल्लाभट
Wed, 06/03/2015 - 11:08 नवीन
सूड उगवतात; काढत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नूतन सावंत

सध्या ज्या धागे वर दिसतायत ते

काळा पहाड
Wed, 06/03/2015 - 11:13 नवीन
सध्या ज्या धागे वर दिसतायत ते म्हणजे (रेडा म्हणे वडाला) आणि (चा)वटपौर्णिमा. हेच का अच्चे दिन?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा