रानातली वाट.. एक न संपणारा परिघ -२
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती
गच्च ओल शिवार.. फुललेली कांती
हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी
पांढर्याफटुक ढगांची रेशमी दुलई
काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
बांधावर उभी कोवळी रानजाई
नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रीती
कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी...
भरारल रान सारं, गंधाळली माती ||
झिम्माड गर्द रानात.. टिफण चालती
सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती
औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती
घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची
------------- शब्दमेघ ( १६ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)
प्रतिक्रिया
16 Jun 2011 - 6:35 pm | पप्पु अंकल
..................पण अजुन काहीतरी हवय !
16 Jun 2011 - 8:35 pm | सूड
शीर्षक वाचून गविंची खव आठवली.
16 Jun 2011 - 9:15 pm | प्रकाश१११
गणेशा -खूप छान कविता. आवडली.अगदी मनापासून.
कविता वाचून मन भरून गेले. खूप शुभेच्छा !!
16 Jun 2011 - 10:35 pm | निवेदिता-ताई
खूप छान
17 Jun 2011 - 7:48 am | पाषाणभेद
फारच छान झाली आहे कविता.
17 Jun 2011 - 9:08 am | किसन शिंदे
मस्त कविता आहे....
पहिली दोन कडवी कोराईगडावर फिरताना तयार केली असावीस असं वाटतं. :)
17 Jun 2011 - 9:18 am | प्रचेतस
+१ असेच म्हणतो.
सुरुवातीला वाचताना झटकन कोरीगडच डोळ्यांसमोर येउन गेला.
सुरेख कविता रे.
17 Jun 2011 - 11:04 am | नगरीनिरंजन
वा! पावसाचा परिणाम फार झालेला दिसतोय कवी लोकांवर!
17 Jun 2011 - 12:05 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अहो ननि, पावसाचा परिणाम प्रत्येक संवेदनशील माणसावर होतच असतो, कविला व्यक्त करता येतो, इतकेच!! :)
17 Jun 2011 - 12:25 pm | नगरीनिरंजन
हो. अगदी बरोबर!
17 Jun 2011 - 12:04 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
क्या बात! क्या बात!! जियो!!
वाचनखुण साठवलेली आहे!! :)
17 Jun 2011 - 12:08 pm | विसोबा खेचर
सुंदर..!
17 Jun 2011 - 1:14 pm | गणेशा
प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनापासुन आभार
18 Jun 2011 - 4:06 pm | ajay wankhede
सुरेख कविता