टिपुर आशेचं दाणं ... रानातली वाट......

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
28 Jun 2011 - 12:10 am

३.

आलं आभाळ दाटुन
दु:ख गेलया भरुन
थेंबागणिक र सारं
वेडावल मन रान ||

स्वप्न झिम्माड पान
कोरडं ठिकुर गाण
बांधावर विखुरलं
टिपुर आशेचं दाणं ||

कवा पाहिन मी सारं
माझ हिरव शिवार
बाया बापड्यांच्या मुखी
कवा हक्काची भाकर ||

आलं आभाळ दाटुन
दु:ख गेलया भरुन
पेरल्यात ओलशब्द
आस पावसाची बघुन ||

आलं आभाळ दाटुन
दु:ख गेलया भरुन ||

................ शब्दमेघ (२८ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)

१. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक : http://www.misalpav.com/node/18087
२. काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती : http://www.misalpav.com/node/18290
४. शिवार पिकल उद्या ... : http://www.misalpav.com/node/18515

(नोटः येथे आलेले शब्द ' आल', 'सार', 'कोरड'... हे बोली भाषेतील शब्द आहेत. आले, सारे, कोरडे... अश्या अर्थाचे ते आहेत. पण बोली भाषेत शेवटच्या शब्दावरील ठेका/लय लिखानातुन स्पष्ट दाखवता येत नसल्याने अनुस्वार दिलेला आहे)

करुणहे ठिकाण

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

28 Jun 2011 - 1:44 am | इंटरनेटस्नेही

चांगली आहे कविता. कीप इट अप.

झंम्प्या's picture

28 Jun 2011 - 10:56 am | झंम्प्या

कवितेने अगदी बांधावर उभ करून, शेतकर्याची दुख्ख दाखवली,

छान संवाद साधलाय या तीनही कवितेतून, कुठे हळूच मनातील स्वप्न अलगद, घडी उघडून दाखवावी तशी दिसतात,
झिम्माड गर्द रानात.. टिफण चालती
सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती
औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती
घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची

तर कधी, अगतिकता समोर उभी करता,

कवा पाहिन मी सारं
माझ हिरव शिवार
बाया बापड्यांच्या मुखी
कवा हक्काची भाकर ||

खूपच सुंदर वर्णन,

गणेशा's picture

28 Jun 2011 - 12:36 pm | गणेशा

मनापासुन धन्यवाद ...

मुळ कवितेपेक्षा हि तुमचा रिप्लाय छान आहे असे वाटते आहे.

..
सर्व प्रतिसादकांचे आभार

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

28 Jun 2011 - 11:07 am | मिसळलेला काव्यप्रेमी

स्वप्न झिम्माड पान
कोरडं ठिकुर गाण
बांधावर विखुरलं
टिपुर आशेचं दाणं ||

नि:शब्द!!