इस्त्रायली-इटालियन वास्तु विशारद डेव्हीड फिशर यांनी एका नव्या फिरत्या इमारतीचे डिझाईन केले आहे.
चित्र स्त्रोत - ऑब्सर्वर.कॉम
वैशिष्ट्ये
ही संभाव्य ६८ मजली स्कायस्क्रॅपर मजलेवार गोलाकार फिरणारी असणार आहे.
एका मजल्याचे एक आवर्तन पुर्ण होण्यास ९० मिनटे लागतील [एका मिनीटाला ६ मिटर या गतीने] व आतल्या लोकांना मळमळणार नाही :-) असे फिशर म्हणाले.
प्रत्येक मजला हा "डोनटच्या" आकाराचा असणार आहे.
विंड टर्बाईनच्या तंत्रज्ञानाने ही इमारत गोलाकार फिरताना स्व:ताची उर्जानिर्मीती देखील करु शकणार आहे.
लोक स्वताची कार अगदी आपल्या मजल्यावर घराच्या दरवाज्यापाशी नेउ शकतील अशी व्यवस्था केली जाणार आहे.
३६० अंशात फिरल्याने खिडकीतुन शहरातील बर्याच भागचे दर्शन होणार.
प्रत्येक मजल्याची प्रदक्षीणा इतर मजल्यांपेक्षा वेगळी असणार त्यामुळे बाहेरुन इमारतीचा आकार म्हणजे एक वेगळेच लाटेसारखे बदलते स्वरुप असणार.
अर्थात अश्या फिरत्या इमारतीचे डिझाईन करणारे फिशर हे पहीले वास्तुविशारद नव्हेत. मागील वर्षी दुबई प्रॉपर्टी रिंग ह्या कंपनीने २०० गाळे असलेली फिरती इमारतीच्या आराखडा प्रसिद्ध केला होता. सोलार पॉवर ने नियंत्रीत तंत्रज्ञानावर आधारीत इमारतीत एक मजला गोलाकार फिरायला एक दिवस लागणार आहे.
फिशर म्हणाले की ही बिल्डिंग संपुर्णता पार्ट बाय पार्ट कारखान्यात बनेल व प्रत्यक्ष जागेवर फक्त जुळवली जाईल. बांधायला २२ महीने लागतील. साधारण ३३० मिलीयन यु एस डॉलर्स ही तितकी महाग किंमत नाही. आपल्या घरातुन ३६० अंशात शहराचे दर्शन घडवणारी एकमेव इमारत ह्या वैशिष्ट्यामुळे सर्व युनिट्स हातोहात खपतील असा फिशर यांचा दावा.
सध्या मास्को व दुबई यांनी अश्या इमारती मधे रस दाखवला आहे. अर्थात सध्याचे तेलाचे भाव बघता "दुबई" असे चमत्कार खरच प्रत्यक्षात आणु शकते. ;-)
ह्या इमारतीचे कल्पना दाखवणारी चित्रफीत येथे!!
स्त्रोत - डायनॅमीक आर्कीटेक्चर डॉट कॉम
प्रतिक्रिया
25 Jun 2008 - 3:47 pm | अमोल केळकर
सहजच विचार आला , हे डिझाईन मुकेश अंबानीला त्यांच्या नवीन महालासाठी दाखवलेतर?
म्हणजे बघा आपल्या महालातील वरच्या मजल्यावरुन सी फेस बघणार्या मुकेशभाईंना दिवसातुन काही वेळा तरी मजला फिरत असल्याने अस्सल मुंबईचे / मुंबईकरांचे दर्शन घडेल. ;;)
25 Jun 2008 - 3:58 pm | मनस्वी
हम्म्म.. खरंय!... पण..... त्याने त्याला काही फरक पडेल असं वाटतं?
बाकी इमारतीची संकल्पना अदभुत आणि सुरेख!
हा माझाही दावा आहे!
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
25 Jun 2008 - 3:48 pm | स्वाती दिनेश
बाहेरुन इमारतीचा आकार म्हणजे एक वेगळेच लाटेसारखे बदलते स्वरुप असणार.
कविकल्पनाच वाटते आहे!
मस्त चित्र आणि अचंबित करणारी माहिती!
टॉवरवर असलेले फिरते रेस्टॉरंट माहित होते पण आता सगळा टॉवरच्या टॉवर फिरणार म्हणजे.. कल्पनेच्या पलिकडचेच आहे!
स्वाती
25 Jun 2008 - 4:45 pm | आनंद घारे
साधारण ३३० मिलीयन यु एस डॉलर्स ही तितकी महाग किंमत नाही
म्हणजे चौरस फुटाला किती पडतील?
26 Jun 2008 - 8:47 am | सहज
चित्राताईंनी दिलेल्या ह्या दुव्यावरच्या माहीतीनुसार
चौरस फुटाचा भाव -यु एस डॉलर ३०००
१३३० चौ फू लहान गाळा साधारण ४ मिलीयन व १२९०० चौ फू चा ३८.७ मिलीयन
Sales of individual apartments will begin in September, with asking prices of around $3,000 per square foot. The smallest, at 1,330 square feet, would cost about $4 million and the largest, a 12,900-square-foot villa, $38.7 million.
25 Jun 2008 - 4:49 pm | II राजे II (not verified)
:)
छान आहे प्रोर्जेक्ट चलचित्रे देखील पाहीली...
राज जैन
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!
25 Jun 2008 - 6:17 pm | ऍडीजोशी (not verified)
फिरतं घर सोडाच, दोन्ही हात लांब करून फिरता येईल इतकं तरी घर मुंबईत असावं असं माझं स्वप्न आहे :)
आपला,
चाळकरी ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
25 Jun 2008 - 7:58 pm | वरदा
काय मस्त कल्पना.... ह्या इमारतीत एकदा जायचा मला चान्स मिळाला तरी पुरे.....
25 Jun 2008 - 8:00 pm | अनामिक
या बिल्डिंग मध्ये दक्षिणेकडे पाय न करता झोपायचं कसं?
आपला,
अनामिक
28 Jun 2008 - 12:36 am | सर्किट (not verified)
झोपताना शीर्षासन करणे हा एकमेव पर्याय आहे.
- सर्किट
25 Jun 2008 - 8:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजा,
आपली माहिती अजबच आहे !!!
चलचित्र पाहिली, अद्भुतच !!!
मोठ्या राहाटपाळण्यात बसल्यावर डोळे गरगरतात आपलं कसं जमायचं राव !!! :(
वास्तु विशारद डेव्हीड फिशरला साष्टांग दंडवत !!!
25 Jun 2008 - 9:18 pm | भाग्यश्री
फार्र भारी प्रकार दिसतोय हा! चित्रं पाहून तर चाट पडले!
स्ट्रॅटोस्फिअरच्या फिरत्या रेस्टॉरंट मधे पहील्यांदा गेले होते, तेव्हा इतकी अवाक झाले होते की धड जेवण पण गेले नाही, नुस्तेच वरून लास वेगास पाहणे चालले होते.. ! या बिल्डींग मधे राहीले तर काय होईल!!
खूप मस्त !! काय एकेक चमत्कार येतात ना...!
http://bhagyashreee.blogspot.com/
26 Jun 2008 - 3:56 am | चित्रा
या बातमीबद्दल धन्यवाद, हे अजिबात माहिती नव्हते..
अत्यंत धाडसी आणि आकर्षक कल्पना, पण ही आपल्याला का बरे आधी सुचले नाही असे अनेक आर्किटेक्ट लोकांना वाटले असणार!
जे काही वाचले त्यावरून अशी इमारत बांधणे आजच्या घडीला अशक्य वाटत नाही, पण अत्यंत अवघड आहे. कुठच्याही बिल्डिंग कोडमध्ये अशा इमारतीसाठी कलमे नसणार, त्यामुळे अशी इमारत बांधणे हे इंजिनीअर लोकांसाठी दिव्य काम होणार :-) आणि त्यांच्या आजवरच्या सगळ्या शिक्षणाची परीक्षा पाहणारी असणार. :-)
त्यातच एबीसी न्यूजवर वरील इमारतीच्या आर्किटेक्टबद्दल अविश्वास दाखवणारी बातमी आहे - . http://abcnews.go.com/International/wireStory?id=5241644
आणि यावरून लोकांचे चर्वितचर्वण इथे पहा :-)
http://www.inhabitat.com/2007/05/16/david-fishers-twirling-wind-power-to...
26 Jun 2008 - 7:45 am | चंबा मुतनाळ
मागील वर्षी दुबई प्रॉपर्टी रिंग ह्या कंपनीने २०० गाळे असलेली फिरती इमारतीच्या आराखडा प्रसिद्ध केला होता. सोलार पॉवर ने नियंत्रीत तंत्रज्ञानावर आधारीत इमारतीत एक मजला गोलाकार फिरायला एक दिवस लागणार आहे.
म्हण्जे काही मजल्यांना सतत सूर्य आणि काहींना अजिबात नाही, असे नाहीका होणार?
मला आपले स्थिर घरच बरे!!
26 Jun 2008 - 8:35 am | विसोबा खेचर
छान छान! च्यामारी ऐकावं ते नवलंच...!
पण खरं सांगायचं तर माझ्यासारख्या दोन मजल्याच्या जुन्या इमारतीत राहणार्या आणि दोन टायमाचा डाळभात मिळवण्याची चिंता असलेल्या मुंबईकराला अश्या हालणार्या डुलणार्या अन् मारे फिरणार्या इमारतींचं काय पण कवतिक नाय! :)
बाकी चालू द्या.. :)
आपला,
तात्या बर्वा.
--
"काय अंतुशेठ, रत्नागिरी झकपक झाली हो तुमची! विजेचे दिवे आले. तुमच्या घरी आली की नाही वीज?"
"अहो छे हो! काळोख आहे तो बरा आहे. उद्या वीज येऊन बघायचं काय, तर पोफडे उडालेल्या भिंती अन् गळकी कौलच ना? ते बघायला वीज हो कशाला पाहिजे? आमचं दळिद्र आपलं अंधारातच दडलेलं बरं!
:)