आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
प्रेषक – जी. ईश्वरन पुण्यातील नाडी केंद्राचे संचालक.
3. प्रश्न - मला तर उलट त्या नाडीवाचकाच्या हातचलाखीवर हसण्याऐवजी त्याने १०० सत्यमाहिती शोधण्याच्या त्याच्या कसबाचे कौतुक वाटले असते. पुढे आपण असे ही म्हटले आहे की त्या नाडीवाचकाच्या हातून तुम्ही ती नाडीपट्टी हिसकाऊन घेतलीत व त्यात वाचनाच्या वेळी त्या खोलीत एक व्यक्ती पायात सँडलघालून आल्यामुळे केंद्राच्या शुचितेचा भंग केला गेला असे जे त्या आलेल्या एका व्यक्तिच्या संदर्भातील कथन होते ते त्या पट्टीत नसल्याचे आढळले असे म्हटले आहेत. याचा अर्थ त्या पट्टीवरील लिखाण व त्याची भाषा आपणांस वाचता येते असा होतो. तसे असेल तर मी एक फोटो आपणांस पाठवू इच्छितो. हा फोटो श्री. ‘ओका’ यांनी डॉ. जयंत नारळीकर(ज्या खगोलशास्त्रज्ञाला २००४ साली ‘पद्मविभूषण’ म्हणून सम्नान्मानित केले गेले होते.) यांना पाठवला होता.(श्री. रिसबुड विंग कमांडर ओक (Oak) नावाचा उच्चार ‘ओका’ असा मुद्दाम करून त्यांचा शक्यतो पाणउतारा करण्याचा प्रयत्न करत असत. त्याचा हा पुरावा) आणि नंतर तो फोटो डॉ दाभोळकर (जे गेले अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची निरीश्र्वरवादी संस्था महाराष्ट्रात चालवतात) यांनी एका सभेत पुण्यातील तमिळभाषा जाणणाऱ्या लोकांनी त्या पट्टीतील मजकूर वाचावा असे जाहीर आवाहन केले होते.
उत्तर – जर मला आपण चांगल्या दर्जाची फोटोची कॉपी पाठवली तर मी त्यात काय लिहिले आहे ते कळवीन. जर मला नाडीपट्टीचे ताडपत्र पाठवलेत तर त्याची कार्बन कसोटी करून त्या पट्टीचे आयुष्य किती हे देखील शोधून सांगेन. पण तुम्ही ते पाठवण्याची तसदी घेतली नाहीत.
माझे (श्री. ईश्वरन यांचे)स्पष्टीकरण -
1. श्री बी. प्रेमानंदांनी त्यांना स्वतःला तमिळभाषेतील मजकूर वाचायला येतो किंवा नाही ही बाब मुद्दामच गुलदस्तात ठेवली आहे. अर्थातच येत नाही. कारण त्यांना कूटतमिळ वाचायला आले असते तर तात्काळ लक्षात आले असते की जे भविष्य म्हणून सांगितले जात आहे, ते ग्राहकाकडून कोणत्या ना कोणत्या युक्तीने मिळवून सांगितले जात नसून ते त्या पट्टीत खरोखरच कोरलेले आहे. हे मान्य करावे लागले असते. कधी क्वचित प्रसंगी वाचनाच्या वेळी घडणाऱ्या घटनांचा उल्लेख ही केला जातो. पायात सँडल घालून त्या खोलीत प्रवेश करणाऱ्या व्यक्तीबाबत तसे झाले असण्याची शक्यता आहे.
2. श्री रिसबुडांनी त्यांना तो फोटो न पाठवण्यामागे कारण असावे. त्याच सुमारास अंनिसने पेपरात गाजावाजा करून पुण्यात २९ सप्टेंबर १९९५ रोजी एका नाडीपट्टीचा फोटो शो केला होता. त्याचे ते कारण असावे. त्या सभेत ड़ॉ. दाभोळकर सोडून अंनिसचे १००हून जास्त सभासद हजर होते. त्यामधे वर्तमानपत्रातील आवाहन वाचून तीन तमिळ भाषा जाणणारे लोक उपस्थित होते. त्यांना तो फोटो दाखवण्यात आला तेंव्हा मीडियाच्या दोन कॅमेऱ्यासमोर (नंतर लेखी) त्यांनी जाहीर केले की त्या फोटोतील भाषा तमिळच आहे. जुनी लिपी असल्याकारणाने ती वाचायला सामान्यपणे अवघड आहे.पुण्यातील तमिळांनी अनपेक्षितपणे अंनिसच्या मताविरुद्ध निकाल दिल्याने कदाचित रिसबुडांना तो फोटो बी. प्रेमानंदाना पाठवावा असे वाटले नसावे.
3. कोणतेही नाडी केंद्र आपल्याकडील नाडी पट्ट्यांची कार्बन कसोटी करायला देण्याच्या फंदात पडणार नाही कारण ज्या संस्थांचा मूळ हेतूच नाडी भविष्याला कोणत्याही थराला जाऊन बदनाम करण्याचा आहे अशांना सहकार्य कोण का म्हणून करील? मात्र विंग कमांडर ओकांसारख्या निस्पृह व सचोटीने वागणारऱ्यां शोधकांना प्राचीन महर्षींनी केलेल्या या लोकोत्तरसेवेचा शोध घेण्यासाठी आमच्यापैकी कितीतरी नाडीकेंद्रांनी त्यांना आपणहून फोटो काढायची नुसती परवानगी दिली नाही तर त्यांना फोटो उपलब्ध करून देण्याला तत्परतेने मदत केली आहे.
4. हे मात्र नक्कीच आश्चर्य आहे की बी. प्रेमानंदांसारख्या व्यक्तीने, ज्याने आपले सर्व आयुष्य पत्रिकेवरून किंवा अन्य मार्गांनी केल्या जाणाऱ्या भविष्यकथनाला थोतांड म्हणून सिद्ध करण्याचा वसा घेतला आहे, ज्यांना मनात आणले तर घरबसल्या (पोदनूर हे गाव केरळ व तमिलनाडूच्या सामेवर आहे) नाडी ग्रंथांच्या पट्या उपलब्ध होऊ शकतात, त्यांनी जर-तरची भाषा वापरून, ‘मला जर कोणी नाडी पट्टीचे पान आयते आणून दिले तर मी माझ्या मर्जीच्या प्रयोगशाळेतून त्या पट्टीची तपासणीकरून त्या ताडपट्टीचे आयुष्य ठरवीन, त्यातील लिखाणाची शहानिशा करीन’ अशी नुसती गर्जना करणे, त्यांना किंवा त्याच्या सारख्या विचारांच्या व्यक्तींना व संस्थांना किती लांछनास्पद आहे? अशांना आपणहून शोधकाम करायला कोणी अडवले आहे ? जर ते आमच्या केंद्रात नाडी महर्षींच्याकडे श्रद्धाभावाने नाडी भविष्याचे रहस्य जाणून घ्यायला आले तर आम्ही त्यांना नक्कीच योग्य ती मदत करू. पण नाडी वाचकांची व पर्यायाने नाडी महर्षींची मस्करी करायला आलात तर मात्र आपल्याकडून सहकार्य मिळणार नाही.
४. प्रश्न – असे मानले जाते की शके ३०० च्या सुमारानंतर भविष्यशास्त्राच्या संदर्भात ऋर्षींचा उल्लेखांना सुरवात होते.त्यामुळे अस्सल नाडी पट्यांचे आयुष्य १७०० वर्षांपेक्षा जुने नसावे.
प्रतिक्रिया
12 Apr 2011 - 3:13 pm | गवि
मी तुमची ही सीरीज वाचतो आहे. मला नाडी पट्ट्या यांविषयी काहीच माहिती नाही. अर्थात त्यामुळे माझे मन कलुषित, पूर्वग्रहदूषित नाही पण वाचून काहीच पदरात पडत नाही आहे.
या लेखमालेमागे बरेच पूर्वसंदर्भ असावेत, जे माझ्यासारख्या नवीन वाचकांना माहीत नाहीत / कळत नाहीत.
शिवाय मांडणी पाहू जाता,
कोणता प्रश्न आहे ?
कोणते उत्तर आहे?
नेमके काय सिद्ध करण्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे?
यातले काही म्हणता काही कळत नाही. कदाचित माझी आकलनशक्ती कमी पडली असेल.
नाडीच्या जेन्युईननेस पर्यंत पोचण्याआधी मुळात काय म्हणायचंय हे वाचकांना स्पष्ट कळलं पाहिजे अशी माझी विनंती आहे.
उदा.
तुम्ही प्रश्न म्हणून जे दिलंय..
3. प्रश्न - मला तर उलट त्या नाडीवाचकाच्या हातचलाखीवर हसण्याऐवजी त्याने १०० सत्यमाहिती शोधण्याच्या त्याच्या कसबाचे कौतुक वाटले असते. पुढे आपण असे ही म्हटले आहे की त्या नाडीवाचकाच्या हातून तुम्ही ती नाडीपट्टी हिसकाऊन घेतलीत व त्यात वाचनाच्या वेळी त्या खोलीत एक व्यक्ती पायात सँडलघालून आल्यामुळे केंद्राच्या शुचितेचा भंग केला गेला असे जे त्या आलेल्या एका व्यक्तिच्या संदर्भातील कथन होते ते त्या पट्टीत नसल्याचे आढळले असे म्हटले आहेत. याचा अर्थ त्या पट्टीवरील लिखाण व त्याची भाषा आपणांस वाचता येते असा होतो. तसे असेल तर मी एक फोटो आपणांस पाठवू इच्छितो. हा फोटो श्री. ‘ओका’ यांनी डॉ. जयंत नारळीकर(ज्या खगोलशास्त्रज्ञाला २००४ साली ‘पद्मविभूषण’ म्हणून सम्नान्मानित केले गेले होते.) यांना पाठवला होता.(श्री. रिसबुड विंग कमांडर ओक (Oak) नावाचा उच्चार ‘ओका’ असा मुद्दाम करून त्यांचा शक्यतो पाणउतारा करण्याचा प्रयत्न करत असत. त्याचा हा पुरावा) आणि नंतर तो फोटो डॉ दाभोळकर (जे गेले अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती या नावाची निरीश्र्वरवादी संस्था महाराष्ट्रात चालवतात) यांनी एका सभेत पुण्यातील तमिळभाषा जाणणाऱ्या लोकांनी त्या पट्टीतील मजकूर वाचावा असे जाहीर आवाहन केले होते.
यात प्रश्न काय आहे ? कुठे सुरु ? कुठे संपले ?
आणि त्यानंतर खाली दिलेलं उत्तर तरी काय आहे?
आणि पुन्हा माझे (श्री ईश्वरन यांचे )स्पष्टीकरण काय आहे? त्यांचा एकमेकांशी काही ताळमेळ आहे का?
ज्या संस्थांचा मूळ हेतूच नाडी भविष्याला कोणत्याही थराला जाऊन बदनाम करण्याचा आहे अशांना कार्बन टेस्टसाठी पट्टी देण्याच्या फंदात पडणार नसलेल्या केंद्राकडून नि:स्पृह व्यक्तीस मात्र फोटोच का देण्यात येत आहेत. त्यांना कार्बन टेस्टसाठी का बरे पट्ट्या दिल्या जात नाहीत. काय गुप्त राखायचे आहे.
केवळ एक वाचक म्हणून होत चाललेले माझे मत मांडले आहे. नाडीच्या बाजूने की विरोधी या मुद्द्याला स्पर्शही केलेला नाही आणि करण्याचा उद्देशही नाही. ते एक अत्यंत योग्य शास्त्र असूही शकेल.
पण या लिखाणामुळे किंवा लिखाणपद्धतीमुळे उद्देशाच्या उलटा परिणाम तर होत नाहीये ना आणि वाचकांना कन्विन्स करण्याऐवजी कन्फ्यूज केले जात नाहीये ना ते तपासून आपल्या उद्देशाला अधिक मदत व्हावी यासाठी.
तुमचा उद्देश कळकळीचा दिसतोय म्हणून लिहिले. एरवी लिहिले नसते.
क्षमेसह,
गवि.
12 Apr 2011 - 6:02 pm | आत्मशून्य
मला सूध्दा असाच अनूभव आहे लेखन वाचताना.
12 Apr 2011 - 8:36 pm | शशिकांत ओक
आत्मशुन्य आणि आपणासारखे अनेक या विषयावर मत प्रदर्शन करून आपली जागृतता दर्शवतात असे नव वाचक हो,
मी नेमक्या प्रश्नांची उत्तरे देत नाही वा टाळतो असा आपला आणि काहींचा आक्षेप असेत तर त्याला मी असे का करतो याचे कारण समजून घ्या. दोन व्यक्ती एखाद्या विषयावर तेंव्हाच चर्चाकरून विचार विनिमय करू शकतील जर त्यांच्यात अनुभवांची पातळी समान असेल तर... समजा मी पॅरिसला जाऊन आयफेल टॉवर पाहून आलोय आणि त्याचे वर्णन मी ज्यांनी तो पाहिलेला नाही अशांसमोर करू लागलो आणि जर ते माझे म्हणणे त्यांनी तो अद्याप पाहिलेला नाही म्हणून नाकारू लागले तर मी काय म्हणेन? आधी आपण पॅरिसला जाऊन तो आहे का नाही याची खात्री करा. ती झाली की तो तेथे आहे तर मग तो कसा आहे, उंची, रुंदी, लांबी आणि अन्य बाबींची चर्चा तो पाहिल्यावरच विधायकपणे होऊ शकेल. हे आपणांस मान्य व्हावे. मी पॅरिसला जाणार नाही पण तो टॉवर तेथे नाही असे तर्काने ठरवणार असे कोणी म्हणाला तर मी त्यांच्या तर्कांना अनुभव घ्या व मग बोला असेच म्हणत राहणार.
आपणांस अशा परिस्थितीत आणखी काही सुचवता आहे तर मी विचार करीन. बर धाग्यांवर लेखन करून याचा निर्णय होऊ शकत नाही मग जोपर्यंत कोणी प्रत्यक्ष कृती करायला पुढे धजत नाही तोवर मी माझा हात पुढे करून ही काही उपयोग होत नाही असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. चला आपण व अन्य कोणी येताय पुढे?
13 Apr 2011 - 10:49 am | आत्मशून्य
.
13 Apr 2011 - 11:21 am | गवि
का का टा प्र ?
का काढून टाकली प्रतिक्रिया?
चांगली मुद्द्याला धरून तर होती की.
14 Apr 2011 - 12:48 am | आत्मशून्य
.
14 Apr 2011 - 2:09 pm | टारझन
गप्प बसायचे ठरवले आहे .
- नेतील तिक्डे
12 Apr 2011 - 7:33 pm | शशिकांत ओक
गगनविहारी आणि आपणासारखे अनेक नव मिपा मित्र हो,
नाडी ग्रंथ भविष्य हा विषय गेले काही वर्षे चर्चेत आहे. थोडक्यात असे की आपण असे मानतो की आपली रोजच्या व्यवहारातील नावे (अवकडहाचक्रातील नव्हे) आपल्या घरातील आईवडिलांच्या किंवा वरिष्ठांच्या सल्याने वा आवडीने ठेवले जाते. मात्र तीच नावे (आई, वडील, विवाहित असेल तर जोडीदाराचे) जर तमिळसारख्या सुदूर राज्यातील भाषेतील समजायला अवघड लिपीत, आपण निरा पितो त्या ताडाच्या झावळ्यांच्या कापून तयार केलेल्या पत्राप्रमाणे पट्ट्यात शिक्षण, नोकरी-व्यवसाय, जन्म दिनांकासकट, रामायण, महाभारत ग्रंथांत निर्देशित प्राचीन महर्षींच्या लेखनातून कोरून ठेवलेला आहे असे आढळले तर तो एक अविश्वसनीय प्रकार मानला पाहिजे. महर्षी आपापल्या नावानी सांगितल्याजाणाऱ्या ताडपत्राच्या पानातून व्यक्तीचे भविष्य कथन करतात. दैवी उपाय सुचवतात.
आता असे काही म्हटले की बुद्धिवादी विचारकांच्या कपाळाला आठ्या पडतात आणिअसे काही असूच शकत नाही असे ते अनुभव न घेताच म्हणू लागतात.
माझा या विद्येशी काही वर्षांपुर्वी परिचय झाला. आधी बनवाबनवी आहे असे वाटून आणि नंतर पुन्हा पुन्हा अनुभव घेऊन त्यातील सत्यता काय असावी याचा शोध घेण्यासाठी माझ्या हातून लिखाण झाले. ते पुस्तक रुपाने बाजारात आहे. त्यातून आपल्याला या विषयाची साद्यंत माहिती मिळेल.अशी आशा आहे.
भारतात आता अनेक नाडी केंद्रे स्थापित झाली आहे. परंतु त्या केंद्रातील लोक काही ना काही कारणांनी बुद्धिवादी विचारकांच्या म्हणण्याला दुर्लक्षुन उत्तरे द्यायचे टाळतात आणि त्यातून आणखी शंका व संशय बळावतो.
एका नाडी केंद्रातील संचालकांशी याबाबत चर्चा केली असता, त्यांनी बी. प्रेमानंदांच्या काही छापील लेखांतून सुचित केलेल्या विधानांवर आपले काय मत आहे ते समजून घेऊन मी वाचकांच्या विचारार्थ पुढे ठेवत आहे. लेख १९९६ -९७ च्या सुमाराचा आहे. पण हा विषय न शिळा होणारा आहे म्हणून त्याची मिपावाचकांना झलक मिळावी म्हणून हे लेखन केले आहे.
विज्ञानवादी लोक नाडी ग्रंथांना थोतांड ठरवण्याच्या नादात किती व कशी अशास्त्रीय विधाने करतात. जे नेहमी प्रत्यक्ष प्रमाण, अनुभवावर आधारित निष्कर्षांवर भर देतात तेच लोक नाडी ग्रंथांची त्यातील भाषेची व मजकुराची साधी प्राथमिक कसोटी करायला का टाळतात व मात्र गणिती आकडेमोडीतून व तर्कांवरून नाडी ग्रथांना असंभवनीय म्हणून थोतांड मानतात. प्रत्यक्षात नाडीग्रंथांचे सत्य स्वरुप काय आहे याचा अनेकानेक प्रयोग करून पडताळा घ्यावा व नंतर त्यांना वाटल्यास आपल्या तर्काधिष्ठित विचारांवर जरूर अटळ राहावे. असे करायला काय काय करायला हवे याचे मार्गदर्शन ही या लेखाचा नंतरचा भाग आहे.
12 Apr 2011 - 8:32 pm | शशिकांत ओक
भुतकाळ अगदी बरोबर सांगितला गेला पण भविष्य मात्र चुक ठरले
अनेक नाडी ग्रंथांचा अनुभव घेतलेले वा घेऊ इच्छिणारे मित्रहो,
या प्रश्नाचा ओहापोह मी माझ्या पुस्तकात उदाहरणे देऊन केला आहे. त्याचे थोडक्यात असे उत्तर देता येईल की भविष्य पाहिल्यानंतरच्या घटनांत ती व्यक्तीही भविष्य घडवण्यात सामिल असते म्हणून त्याच्या कर्तृत्वाचा वाटा त्यातील कथनांच्यावर प्रभाव पाडतो. कधी कधी कथने मुद्दाम चुकवली जातात कारण त्यातुन अन्य संबंधित व्यक्तींचा कर्म सिद्धांतही सिद्ध करायला लागतो. तो कसा हे पुस्तकात सविस्तर दिले आहे
13 Apr 2011 - 10:14 am | रणजित चितळे
माझा अनुभव येथे देऊ इच्छीतो,
मी २००५ साली एकदा बंगळुरला आलो होतो, तेव्हा होसुरला (२० किमी दुर) कोण्या परिचीतांकडे गेलो होतो (ते तमिळ आहेत). त्यांच्या बरोबर जाता जाता मला नाडी ज्योतीष ची पाटी दिसली. काय आहे ते बघावे म्हणून मी त्याच्या कडे गेलो. त्याने आंगठ्याचा ठसा घेतला व काही वेळात काही पत्त्या घेऊन आला. त्याने मला फक्त हो - नाही हे म्हणायला सांगीतले विचारलेल्या प्रश्नांना. (तो तमिळ मधून बोलत होता व मी इंग्लीश मधून माझे स्नेही भाषांतर करत होते). पत्त्यांवर काही तही कोरलेले मला दिसत होते.
त्याने पहीली पत्ती काढली - म्हणाला - आपली आई आपल्या लहानपणीच वारली.
मी - हो.
तो - आईचे नाव अमुक होते.
मी - नाही.
त्याने ती पत्ती ठेवून दुसरी काढली.
तो - वडील सरकारी खात्यातून निवृत्त झाले.
मी - नाही.
त्याते ती पत्ती ठेवून तिसरी काढली.
वडीलांचे नाव अमुक आहे.
मी - हो.
भाऊ सरकारी नोकरीत आहे.
मी - हो.
बायको अमुक अमुक नावाची आहे.
मी - हो.
आता तो म्हणाला की पत्ती मीळाली. पुढे त्याने ती तामीळ मधुन वाचली व त्याचा माझ्या स्नेह्याने भाषांतर केले.
माझ्या बद्दल चे सगळे आराखडे बरोबर होते. माझे जे व्यक्ती चित्र ते बरोबर निघाले.
काही गोष्टी आता कळते बरोबर पण झाल्या आहेत. आता पुढे बघू.
मला कोणी तरी सांगीतले की ती लोकं आपले मन वाचू शकतात बाकी नाडीत काही नाही - हे जरी बरोबर मानले तरी कोणी तरी आपले मन ओळखतो हा चमत्कार नव्हे का.
13 Apr 2011 - 12:56 pm | आत्मशून्य
आपणाला चमत्कार आवडतात तर हॅरी पॉटर एंजोय कराना. भवीष्य अचूक वर्तवले जातेच की नाही हीच एकमेव कसोटी नाडीपट्यांबाबत लावणे योग्य.
साहेब, असे अनावश्यक चमत्कार बघून, आपण आपल्या भवीतव्याबाबत, आयूश्याबाबत संपूर्ण नीश्चींत होणार आहात का ? नक्कीच नाही ती नीश्चींतता फक्त आणी फक्त भवीश्यकथनाती घटनांच्या अनूभवातील सत्यासत्यतेवर अवलंबून असते. आणी ती जर का भेटली तर मग ऊर्वरीत आयूश्य शांत व क्षुब्धतारहीत मनाने जीवनातील सर्व चांगल्या वाइट घडामोडीना तटस्थपणे तोंड देत हरीनाम अथवा आपल्या आवडीच्या छंदामधे जीवन व्यतीत करून सार्थकी लावणे, आनंदी राहणे शक्य आहे अन्यथा सगळा सावळा गोंधळच आणी अनावश्यक पैशांचा अपव्ययसूध्दा.
13 Apr 2011 - 1:37 pm | रणजित चितळे
मी एक अनुभव कथन केला. हा अचानक आलेला मला अनुभव होता. त्या आधी नाडी शास्त्रा बद्दल माझ्या मनात उत्सुकता पण नव्हती व त्या विषया बद्दल उदासिन पण नव्हतो. हा धागा वाचताना मला तो अनुभव आठवला व मिपावर तो मांडला.
14 Apr 2011 - 1:13 pm | चिरोटा
बेंगळूर परिसरात नाडी केंद्रे आहेत का? असल्यास व्य . नि. ने कळवा. ह्या वीकांताला जावून येवू शकतो.आणि येथे अनुभव सांगु शकतो.
15 Apr 2011 - 11:11 am | शशिकांत ओक
जर कर्म सिद्धांतही सिद्ध करायचा आहे तर पट्टी बघण्यात वेळ, पैसा, श्रम, बूध्दी कशाला वाया घालवायची ?
हा प्रश्न जसा आपणाला आहे तसा मला ही तो पडला होता व आहे. मात्र या प्रश्नाचे उत्तर महर्षींच्याकडे मिळेल. कारण ज्यानी त्याची रचना केली त्यांना त्यांच्या कार्यकारणाची जाणीव असल्याशिवाय ते अथवा कोणीही अशा लेखनाला सुरवात करणार नाहीत.तरीही ते उत्तर काय असेल किंवा नसेल याचा प्रत्येकाने आपापल्यापरीने शोध घ्यावा नाही तर विषय डोक्यावरून जाणारा म्हणून सोडावा. ही वैयक्तिक ऐच्छिक बाब आहे.
आपण कॅसेट व वही याचा नाश केलात ठीक आहे आपली मर्जी. इतर अनेकांना नाडी ग्रंथांनी दिलासा दिला. काहींना नवनवीन कार्यची प्रेरणा मिळाली. काहींचे आरोग्याचे प्रश्न सुटले. अनेकांची चुकीची निवड वेळीच सावध केल्याने सुधारली गेली असे मी लोकांच्या प्रतिक्रियेंवरून आलेले अनुभव ते जे सांगतात त्याची मी फक्त झलक म्हणून पुस्तकात, लेखात लिहितो. मला आलेले अनुभव मी वेळोवेळी नमूद केले आहेत. काहींना ते साहस होते. काहींना नाहीं. काहींचे अनुभव तसे नसतील तर त्यांनी ते मनमोकळेपणाने लिहावेत. त्यात गैर काहीच नाही.
मी फक्त असे असे नाडीग्रंथ माझ्यापाहण्यात आले आहेत, त्याचा माझा अनुभव असा असा आहे असे म्हणतोय,सांगतोय. आपल्या त्यात रस नसेल तर ठीक आहे पण म्हणून तुमचे जे मत तेच इतरांचे असेल असे नाही. त्यामुळेच जगातील सर्वांचे कथन त्यात नसणार. कित्येकांनी वही वाचता येत नाही म्हणून रद्दीत जमा केली तर कॅसेटकडे ढुंकून पाहिले नाही. मात्र एखादी घटना अशी घडून गेल्यावर नाडीत नक्की काय म्हटले होते याची शोधाशोध करणारे भेटले.असो. मी लृवरील लेख नाडी ग्रथ केंद्रवाल्यांचे विचार प्रसतूत करत आहे कारण ते काय म्हणतात त्यांची काय कैफियत असते याची वाचकांना कल्पना यावी.