जय श्रीराम...!!!

प्यारे१'s picture
प्यारे१ in जनातलं, मनातलं
12 Apr 2011 - 9:49 am

प्रभू रामचंद्र की जय!

रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले.
सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे.

रघुकुलवीर श्रीराम आपल्या कृपेने समस्त लोकांचे सर्वार्थाने कल्याण करोत हीच प्रार्थना.

श्रीराम जयराम जयजय राम।

श्रीराम जयराम जयजय राम।

श्रीराम जयराम जयजय राम।

श्रीराम जयराम जयजय राम।

श्रीराम जयराम जयजय राम।

धर्मसद्भावनाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

सहज's picture

12 Apr 2011 - 10:07 am | सहज

सुंठवडा आठवून ड्वोळे पाणाव्ले

श्रीराम जयराम जयजय राम।

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 10:17 am | शिल्पा ब

स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कोण्या धोब्याच्या मताचा आदर म्हणून तिला परत वनवासात पाठवणाऱ्या रामाचा मला अजिबात आदर नाही.
आजकाल असे राम याही पुढे जाऊन बायकोचा खून करायला मागे पुढे पहात नाहीत. आपले महत्त्व ओळखून असलेल्या रामाने आपल्या स्त्रीवर विश्वास दाखवावा असा आदर्श निर्माण करण्याऐवजी उगाचच एखाद्या अनोळखी माणसाने संशय घेतल्या कारणाने तिला (पोटुशी असतानाही आणि १४ वर्ष काहीही चूक नसताना वनवासात काढले तरी) सोडून देण्याचा आदर्श ठेवला यातच काय ते आले.

तरीही ज्यांना तो अनुकरणीय वाटतो त्यांना शुभेच्छा.
(शेवटी इतिहास पुरुषांनी लिहिलेला आहे.)

प्यारे१'s picture

12 Apr 2011 - 10:24 am | प्यारे१

नवीन धागा काढावा.

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 10:27 am | शिल्पा ब

निर्णय घ्यायला मी समर्थ आहे, काळजी नसावी.
धन्यवाद.

प्यारे१'s picture

12 Apr 2011 - 10:41 am | प्यारे१

कल्याणमस्तु!

नरेशकुमार's picture

12 Apr 2011 - 10:47 am | नरेशकुमार

शिल्पा ताई, (निदान आजच्या दिवशी तरी) थोडं दमानी घ्या.
रामाच्या नावानी आज घरात माझी ही गोड्धोड करुन राहीली आहे.

बादवे रामानी सितेला सोडली नव्हती, सिताच निघुन गेली होति. : इती : लव-कुश बाय रामानंद सागर.
पन जे काय झालतं ते लयी वाईट झालं (होत). पन आपन त्यातुन चांगल घेउया. हो ना ?

श्री राम जय राम....जय जय राम !

गवि's picture

12 Apr 2011 - 10:50 am | गवि

हे राम..

१००+

(+१०० नव्हे हे कृ ल घे.)

प्रचेतस's picture

12 Apr 2011 - 11:00 am | प्रचेतस

स्वतःच्या बायकोला पळवून १ वर्ष कैदेत ठेवणार्‍या रावणाविरुद्ध समुद्रापार जाउन युद्ध करून तिला परत आणणारा तो मर्यादापुरुषोत्तम श्रीरामच.

रामनवमी आहे म्हणुन मोठ्या उत्साहाने धागा उघडला होता. पण त्याचे अधीच मातेरे झालेले पाहुन अतिशय वाईट वाटले.

कदाचीत झालीही असेल चुक रामाची, पण त्या मुळे त्याने केलेल्या इतर कार्याचे महत्व कमी होते असे मला वाटत नाही.

पुरुष स्त्री हा वादाचा उल्लेखही अप्रस्तुत वाटला.

आजच्या कलीयुगात रामाची जशी गरज आहे तशी शुर्पणखेचे नाक कापणार्‍या लक्ष्मणाची पण आहे याची प्रकर्षाने जाणिव झाली.

राम सर्वांचे कल्याण करो.

प्यारे१'s picture

12 Apr 2011 - 11:48 am | प्यारे१

माऊलि, धोबी (वृत्ती) फक्त रामकालातच होते/ ती असे कोणी सांगितले तुम्हाला....????

चालायचंच.

मोराच्या फुललेल्या पिसार्‍याकडे लक्ष न देता त्याच्या मागे उभे राहून नको त्या गोष्टी बघणे आवडत असेल तर काय करणार????

<<<आजच्या कलीयुगात रामाची जशी गरज आहे तशी शुर्पणखेचे नाक कापणार्‍या लक्ष्मणाची पण आहे याची प्रकर्षाने जाणिव झाली.

अशा लोकांची कमी नाहीच...स्वतःचे मत असणारे फारच थोडे लोक असतात.
बाकी रामाने काय मोठे काम केले आहे? रावणाशी युद्ध त्याची स्त्री परत मिळवण्यासाठीच केले लोकसेवा म्हणुन नाही.

मराठमोळा's picture

12 Apr 2011 - 11:44 am | मराठमोळा

जय श्रीराम!!! जय सीताराम!!

शिल्पा ताई,
रामाचा तो निर्णय एका पतीचा नव्हता. तो निर्णय पतीपेक्षा मोठ्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या राजाला घ्यावा लागला होता. स्पायडर मॅन सिनेमामधला एक ड्वायलॉक आठवला.. Great Power comes with Great Responsibility.

रामाला स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर कणभरही शंका नव्हती, पण त्यावेळच्या परिस्थितीमधे एका राजाने जे करणे योग्य होते तेच रामाने केले, रामाला किती यातना झाल्या असतील ते प्रभू श्रीरामच जाणे.

आपण जसे रामाच्या निर्णयावर पटकन शंका घेतलीत आणि अनादर करुन मोकळ्या झाल्यात तशीच एका त्या अनोळखी व्यक्तीने विचार न करता सीतामाईच्या चारित्र्यावर पटकन शंका घेतली होती.

यशोधरा's picture

12 Apr 2011 - 11:49 am | यशोधरा

ममो, मस्त आणि नेमके.

सीतेला वनवासात सोडायचा आदेश दिल्यापासून श्रीरामानेही वैयक्तिकरीत्या राजवाड्यात राहून "वनवासातले" जिणे पत्करले होते असे वाचलेले आठवते.

<<<आपण जसे रामाच्या निर्णयावर पटकन शंका घेतलीत

अगदी अगदी...कालपरवाच घडलेली घटना आहे त्यामुळे शंका जरा पटकनच घेतली म्हणायची. आता जरा स्पायडरमॅन पाहुन ज्ञान वाढवते. Great Power comes with Great Responsibility. याच्याशी सहमत.
बाकी नेमका काय विचार करून बायकोला सोडायचा निर्णय घेतला म्हणता? आणि तो जर योग्य असेल तर धन्यच म्हणायचे.

पक्का इडियट's picture

12 Apr 2011 - 1:09 pm | पक्का इडियट

स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या कोण्या धोब्याच्या मताचा आदर म्हणून तिला परत वनवासात पाठवणाऱ्या रामाचा मला अजिबात आदर नाही.

अगदी सहमत आहे.
रेल्वे अपघातात स्वतःचा काही संबंध नसतांना नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा देणारे लालबहादूरशास्त्रींबद्दल सुद्धा मला आदर नाही. *

पण काय करणार ? मी रहातो त्या परिसरातील बिनडोक लोकांना दोघांबद्दल आदर आहे. :)

वर तुम्ही उद्धृत केलेला धोब्याचे मत, त्याचा परिणाम, सीतेचा त्याग इत्यादी वाल्मिकी रामायणातील कोणत्या कांडात, कोणत्या सर्गात आहे, ते श्लोक, तो सर्ग, ते कांड तज्ञ लोक मूळ रामायणातले मानतात का? भवभुतीच्या नाटकाचा रामायण कथेवर काय परिणाम झाला असले प्रश्न मी विचारणार नाही. कारण तुम्हाला त्याची उत्तरे माहित नसणार याची पूर्ण खात्री आहे.

जय श्रीराम !!

* शास्त्रींबद्दलचे वाक्य उपरोधाने होते हे सुज्ञांना कळले असेलच, बाकीच्यांना आता कळावे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 1:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वर तुम्ही उद्धृत केलेला धोब्याचे मत, त्याचा परिणाम, सीतेचा त्याग इत्यादी वाल्मिकी रामायणातील कोणत्या कांडात, कोणत्या सर्गात आहे, ते श्लोक, तो सर्ग, ते कांड तज्ञ लोक मूळ रामायणातले मानतात का?

आपणच आमचे आणि मिपाकरांचे रावनवमीनिमित्त प्रबोधन करावे ही नम्र विनंती.
बाय द वे, जालावर वरीजनल रामायण कुठे वाचायला मिळेल. सुबोध अर्थासहित.

-दिलीप बिरुटे

पक्का इडियट's picture

12 Apr 2011 - 1:26 pm | पक्का इडियट

तज्ज्ञांच्या मते दशरथाकडे विश्वामित्रांनी केलेली रामाची मागणी इथपासून सुरु झालेले रामायण (राम + अयन ) {अयन म्हणजे प्रवास} रामाने लंकेत रावणाचा वध केल्यावर अयोध्येला परत आल्यावर झालेला राज्याभिषेक हाच मूळ रामायणाचा गाभा आहे. बालकांडातील रामलीला, उत्तर कांडातील सीतेचे डोहाळे, त्याग, जंबुकाचा वध, लक्ष्मणाचा त्याग, रामाचे सरयु नदीत आत्मसमर्पण हे सर्व तसेच मधल्या कथेतील अनेक भाग हे प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते.

मात्र सर्वसामान्य माणुस (माझ्यासह) हे सर्व असेच घडले होते असे मानतो. रामाला देव मानतो. त्याला रामकथा काल्पनिक आहे की खरी याचा काहीही फरक पडत नाही.

>>बाय द वे, जालावर वरीजनल रामायण कुठे वाचायला मिळेल. सुबोध अर्थासहित.

संस्कृत शिकाच. ;)

जय श्रीराम

मराठमोळा's picture

12 Apr 2011 - 1:36 pm | मराठमोळा

>>तज्ज्ञांच्या मते दशरथाकडे विश्वामित्रांनी केलेली रामाची मागणी इथपासून सुरु झालेले रामायण (राम + अयन ) {अयन म्हणजे प्रवास} रामाने लंकेत रावणाचा वध केल्यावर अयोध्येला परत आल्यावर झालेला राज्याभिषेक हाच मूळ रामायणाचा गाभा आहे. बालकांडातील रामलीला, उत्तर कांडातील सीतेचे डोहाळे, त्याग, जंबुकाचा वध, लक्ष्मणाचा त्याग, रामाचे सरयु नदीत आत्मसमर्पण हे सर्व तसेच मधल्या कथेतील अनेक भाग हे प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते.

मात्र सर्वसामान्य माणुस (माझ्यासह) हे सर्व असेच घडले होते असे मानतो. रामाला देव मानतो. त्याला रामकथा काल्पनिक आहे की खरी याचा काहीही फरक पडत नाही.

ही शैली ओळखीची आहे असे राहुन राहुन का वाटते ब्वॉ?

पक्का इडियट's picture

12 Apr 2011 - 1:39 pm | पक्का इडियट

>>>>ही शैली ओळखीची आहे असे राहुन राहुन का वाटते ब्वॉ?

रामकथा कुणीही गायली तरी लवकुशांच्या मुखातुनच ऐकत आहोत असे श्रोत्यांना वाटते असे म्हणतात.

जय श्रीराम

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 1:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>संस्कृत शिकाच.
हाहाहा. लै भारी .....!

बालकांडातील रामलीला, उत्तर कांडातील सीतेचे डोहाळे, त्याग, जंबुकाचा वध, लक्ष्मणाचा त्याग, रामाचे सरयु नदीत आत्मसमर्पण हे सर्व तसेच मधल्या कथेतील अनेक भाग हे प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते.

रामायणाचे खरे अभ्यासक-तज्ञ कोण आहेत ? च्यायला, आम्ही वर्षानुवर्ष जे रामायण ऐकत आलो ते खोट म्हणायचं का ?

वरीजनल रामायण कोणतं ? रामायणातला प्रक्षिप्त भाग कोणता यावर एकदा जोरदार काथ्याकूट झाला पाहिजे, असो. आज नको.

-दिलीप बिरुटे

पक्का इडियट's picture

12 Apr 2011 - 1:42 pm | पक्का इडियट

>>>>रामायणाचे खरे अभ्यासक-तज्ञ कोण आहेत ? च्यायला, आम्ही वर्षानुवर्ष जे रामायण ऐकत आलो ते खोट म्हणायचं का ?

ते कशाला खोटे मानायचे? बौद्धांच्या जातक कथेत रामायणाची वेगळी आवृत्ती आहे. जैनांच्या आगमात वेगळे उल्लेख आहेत. राम सर्वांचा आहे. आपल्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी रामकथा प्रत्येकाने गायली आहे.

इतिहास तज्ज्ञांना त्यांचे काम करु द्या. ते सांगतील कशी कशी राम कथा बदलत गेली. आपण मान डोलावुन होकार भरायचा आणि जय श्रीराम आवाज द्यायचा.

>>>वरीजनल रामायण कोणतं ? रामायणातला प्रक्षिप्त भाग कोणता यावर एकदा जोरदार काथ्याकूट झाला पाहिजे, असो. आज नको.

काथ्याकुट करुन फायदा नाही. कोंबडे अंडयाप्रमाणे प्रलंबित प्रश्न आहे तो. कशाला वेळ घालवायचा?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 1:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> रामायणाचे खरे अभ्यासक-तज्ञ कोण आहेत ?
या विषयी जर काही माहिती मिळाली असती तर बरे झाले असते.
आम्ही डॉ.प.वि.वर्तकांचे वास्तव रामायण आणले होते. काही विवेचन वाचल्यावर वेड लागायचे बाकी राहीले होते. [माझं मत आहे] बाकी, खर्रच काही तज्ञांची नावे आणि काही पुस्तके सांगितली असती तर वाचन होईल तेव्हा होईल पण अशी पुस्तके संग्रही ठेवली असती असे म्हणायचे होते...!

-दिलीप बिरुटे

मुलूखावेगळी's picture

12 Apr 2011 - 2:07 pm | मुलूखावेगळी

आम्ही डॉ.प.वि.वर्तकांचे वास्तव रामायण आणले होते. काही विवेचन वाचल्यावर वेड लागायचे बाकी राहीले होते. [माझं मत आहे] बाकी,

+११
हो
मी पण वाचले थोडेसे, माझ्या घरी हे पुस्तक आणले होते . ५-७ पाने वाचुनच मी बंद केले असले वाचने.

पक्का इडियट's picture

12 Apr 2011 - 2:12 pm | पक्का इडियट

पून्हा सांगतो. कोणत्याही तज्ज्ञाचे मत वाचू नका.

वाल्मिकी रामायण संस्कृत आणि त्याचा मराठी अनुवाद उपलब्द्ध आहे. ७ कांडांची १० पुस्तके आहेत. साधारणतः ७००-८०० रु खर्च येईल. (सहावा आयोग नो टेन्शन)

वाचा. त्यातुन तुमच्या बुद्धीनेच ठरवा काय घ्यायचे; काय सोडायचे.

विकास's picture

12 Apr 2011 - 7:14 pm | विकास

आम्ही डॉ.प.वि.वर्तकांचे वास्तव रामायण आणले होते.

ते "वर्तकी रामायण" ;) जे "वाल्मिकी रामायणा" नंतरचे आहे :-)

त्यात त्यांनी रामाने सीतेचा त्याग केला या संदर्भातील मुद्दा मांडताना, सीतेने कसे वनवाश्यांबरोबर निषेध मोर्चा काढला नाही वगैरे शब्दप्रयोग करत करमणूक केली होती.

बाकी, सीतात्यागा संदर्भात अनेक वर्षांपुर्वी दुर्गा भागवतांनी मला वाटते लोकसत्ता का (माधव गडकरी असतानाच्या) मुंबई सकाळच्या रविवार आवृतीमधे एक खुप छान लेख लिहीला होता, त्याची आठवण झाली.

असो. रामनवमीच्या शुभेच्छा!

सुहास..'s picture

12 Apr 2011 - 7:33 pm | सुहास..

बौद्धांच्या जातक कथेत रामायणाची वेगळी आवृत्ती आहे. >>>

सहमत

चिंतामणी's picture

13 Apr 2011 - 12:01 am | चिंतामणी

तज्ज्ञांच्या मते दशरथाकडे विश्वामित्रांनी केलेली रामाची मागणी इथपासून सुरु झालेले रामायण (राम + अयन ) {अयन म्हणजे प्रवास} रामाने लंकेत रावणाचा वध केल्यावर अयोध्येला परत आल्यावर झालेला राज्याभिषेक हाच मूळ रामायणाचा गाभा आहे. बालकांडातील रामलीला, उत्तर कांडातील सीतेचे डोहाळे, त्याग, जंबुकाचा वध, लक्ष्मणाचा त्याग, रामाचे सरयु नदीत आत्मसमर्पण हे सर्व तसेच मधल्या कथेतील अनेक भाग हे प्रक्षिप्त असल्याचे मानले जाते.

१०० % बरोबर आणि सहमत.

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 7:44 pm | शिल्पा ब

काही हरकत नाही...आपणच ज्ञानप्रबोधन करावे ही विनंती (आपल्याला ही सगळी माहीती असेलच असे गृहीत धरते, त्यानिमीत्ताने खरे रामायण कोणते याचा तरी उलगडा होईल.)

हा हा हा :) शिल्पा काकुंचे कॉमेडी प्रतिसाद मला नेहमीच भुरळ घालत असतात ... अगदी पोट दुखेस्तो हसवलेत .
अजुन एक अशीच कॉमेडी करण्याचा छोटासा प्रयत्न

सिता ही मुर्ख स्त्री होती. तिचा आघाऊपणा लक्षात घेऊनच रामाने लक्ष्मणाला कुटी मधे प्रोटेक्शन साठी ठेवले होते. नंतर जेंव्हा मारिच ने रामाची मिमिक्री करुन "लक्ष्मणा धाव .. " अशी आरोळी टाकली तेंव्हा ही मंद सिता मैय्या लक्ष्मणाला तिकडे भाग पाडते . श्रीराम कोण आहेत हे सितेलाच ठाऊक नव्हते काय ? श्रिरामाच्या पराक्रमावर खुद्द सितेचा विश्वास नव्हता हे यातुन दिसते . दोन पावले पुढे जात सिता लक्ष्मणाच्या नितिमत्तेवर पण टिपण्णी करण्यास विसरत नाही. तो डायलॉग बोलताना सितेची चिड न येता स्त्रीबुद्धीची किव वाटते. बिचारा लक्ष्मण , मुर्खापुढे काय डोकं लावणार म्हणुन जातो , पण जाताना लाईन मारण्याचे कर्तव्य विसरत नाही. ह्या नंतर ची हाईट म्हणजे भिक्षुकाला भिक्षा देण्यासाठी लाईन क्रॉस करुन जाणे . एवढा सगळा मंदपणा करण्यात बिचार्‍या श्रीरामाचा काही हात नव्हता . पण हे झाले स्त्रीहट्टामुळे ..
नंतरचे रामायण आपणास ठाऊक आहे. ह्या एका स्त्री साठी पुर्ण रामायण घडले . एका स्त्रीमुळेच महाभारतही घडले . ह्या महायुद्धांत जिव केला तो करोडो अरबो पुरुषांचाच . ह्याचा शिल्पा काकुंनी विचार केला आहे का ? उत्तर रामायणात सितेचा मुर्खपणा पुढे जाऊन अहंकारात परिवर्तीत होतो . रामाने जे कृत्य केले ते समाजाचे डोळे उघडण्यासाठी केले होते असे जाणकार सांगतात . परंतु आपल्याच नवर्‍याला समजुन न घेता आपलंच घोडं दामटंत स्वतःच्या पोरांना घेऊन पुन्हा वनवास भोगण्यास गेलेल्या सिते ला रामाने रोखण्याचा खुप प्रयत्न केला होता असे ही जाणकार सांगण्यास विसरत नाहीत .

थोडक्यात काय ? रामाची ( सो कॉलड् ) एक चुक सितेच्या १०० मुर्खपणांवर भारी पडते असे आज की नारी i.e. शिल्पा काकुंचे म्हणने आहे . खुप एंटरटेनमेंट झाली

एवढं असुनही राम आणि सिता दोघे ही आमच्या साठी आयडीयल स्त्री - पुरुष आहेत . एवढे बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो , जय हिंद जय महाराष्ट्र

- (आधुनिक जां'ब'वंत ) टारझन

आपण आंतरजालीय लालुप्रसाद आहात हे कायम सिद्ध करता, पण तो मान आपलाच आहे.

बाकी शूर्पणखा नावाच्या स्त्रीने रामाला माझा हो अशी मागणी घातल्यावर तिला स्पष्ट "नाही " असे न सांगता तिच्या भावनांशी खेळ करून माझ्या भावाकडे जा मग त्याने परत राम तुला नक्की स्वीकारेल असे काहीसे सांगितले अन त्यामुळे तीचा तोल गेला, मग तिचे नाक-कान कापण्यात आले अन मग पुढचे काय ते घडले असे काहीसे ऐकून आहे.

आपण आंतरजालीय लालुप्रसाद आहात हे कायम सिद्ध करता, पण तो मान आपलाच आहे.

तर तर !! आपणही एक टॉप च्या ललिता पवार आहात ना :)

बाकी शूर्पणखा नावाच्या स्त्रीने रामाला माझा हो अशी मागणी घातल्यावर

< फालतु> राम ही तिला मिरिंडा हो म्हणाला होता , ऐकलं का तिनं ? < / फालतु>

तिला स्पष्ट "नाही " असे न सांगता तिच्या भावनांशी खेळ करून माझ्या भावाकडे जा मग त्याने परत राम तुला नक्की स्वीकारेल असे काहीसे सांगितले अन त्यामुळे तीचा तोल गेला, मग तिचे नाक-कान कापण्यात आले अन मग पुढचे काय ते घडले असे काहीसे ऐकून आहे.

तिचा तोल गेला म्हणजे काय ? जाणकारांच्या मते शुर्पणखेचा बोळा तुंबलेला होता. त्यात पाकिटांची सोय नसल्याने पुरुषांनी जबाबदारीने वागणे जरुरी असते. आणि राम-लक्ष्मण हे मर्यादा पुरुषोत्तम होते . त्यांच्या हातुन असं पाप घडणं अशक्यंच ! ह्या उलट त्यांच्यापैकी कोणी जर शुर्पणखेवर अतिप्रसंग केला असता तर तुमच्या सारख्या आज की नारी .. आयोध्येत "लाटणं मोर्चा" घेउन आल्या असत्या !

बाकी शुर्पणखा तुमची आयडोल आहे काय ? =))

- चाकु

विकास's picture

12 Apr 2011 - 9:03 pm | विकास

अवांतर, कुणाशीही वाद म्हणून नाही! :-)

अजून थोडे मागे गेले तर...

कैकयीने हट्ट केला (कारण की मंथरेने सुचवले) म्हणून राम वनात गेला. ;) जाताना सीता म्हणाली "जेथे राघव तेथे सीता" म्हणून तिला पण नेले. तो थोडेच म्हणत होता चल माझ्याबरोबर म्हणून? जर नंतर ती, "जसे राघव तशीच सीता" असे म्हणाली असती तर कदाचीत वेगळे झाले असते. पण तिला तसे वाटले नसावे. :-)

त्याहूनही मागे गेले तर दशरथाने एक्स्पायरी डेट नसलेले दोन वर कैकयीला दिले म्हणून रामायण घडले असे देखील म्हणता येईल. ;)

बाकी एकदा आमच्या एका तामिळ मित्राकडून समजले: काही तामिळवासीय, रावण हा सीतेचे पिता होता असे समजतात. आणि त्यांच्यात रावण आपल्या मुलीला केवळ माहेरपणासाठी घेऊन गेला होता असे समजले जाते, असे कळले! खरे खोटे माहीत नाही, पण अनेक कथात ही देखील असल्यास नवल नाही. फक्त ऐकल्यावर ह.ह.पु.वा. झाली. एखादे वडील आपल्या मुलीला माहेरपणास कसे नेऊ शकतात हे कळले! ;)

टारझन's picture

12 Apr 2011 - 9:25 pm | टारझन

असेच म्हणतो .. ह्या मंथरा , कैकै , द्रौपदी , सिता , इत्यादी स्त्रीया नेहमी महाविनाशाला कारणीभुत ठरल्या आहेत असे जाणकार सांगतात. तसेच आजकाल घरामधे दुही पडायला की "कोण ब" रं कारणीभुत असतं ? चाळा पाने ?

बाकी करडा मजकुर वाचुन लोळलो =))

शिल्पा ब ह्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे हिडिंबा म्हणण्यात येत आहे :) शिवाय रामाने स्त्रीयांशी रुड पणे न वागता म्हणजेच "नाही"म्हणुन तोडुन न फेकता त्या मंद स्त्रीला समजदारीची भाषा वापरली म्हणुन रामाची चिड आली.

- ( यदाकदाचित ) बलभिमं

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 9:52 pm | शिल्पा ब

समजदारीच्या भाषेत काय सांगीतलं हे सांगाल का? तुम्हाला भलतीच माहीती आहे म्हणुन विचारलं.
बाकी मागणी न करता पुरवठा करणारे आपण अगदीच दानशुर म्हणायचे!!

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 9:51 pm | शिल्पा ब

<<<त्याहूनही मागे गेले तर दशरथाने एक्स्पायरी डेट नसलेले दोन वर कैकयीला दिले म्हणून रामायण घडले असे देखील म्हणता येईल.

यात कैकयीची काय चुक? वर देणार्‍यानी नको विचार करायला?

विकास's picture

12 Apr 2011 - 10:06 pm | विकास

यात कैकयीची काय चुक? वर देणार्‍यानी नको विचार करायला?

काहीच नाही! म्हणूनच तर तेथे म्हणले होते ना की या (म्हणजे त्या) प्रतिसादात कुणाशिही वाद नाही म्हणून! :-)

शिल्पा ब's picture

12 Apr 2011 - 9:06 pm | शिल्पा ब

<<<बाकी शुर्पणखा तुमची आयडोल आहे काय ? =))

शुर्पणखा ही ललिता पवारची आयडोल कशी असेल? हीडींबा म्हंटलं तर ठीक कदाचीत ;)

बाकी बोळे तुंबुन राहु नाहीतर अजुन काही होवो पण स्पष्ट "नाही" म्हणायला पाकीटांची गरज का पडावी हा एकच प्रश्न पडला आहे.

Nile's picture

13 Apr 2011 - 4:32 am | Nile

चर्चा वाचुन रामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजेच मराठीत हॅप्पी बड्डे करतो.

सिता ही मुर्ख स्त्री होती. तिचा आघाऊपणा लक्षात घेऊनच रामाने लक्ष्मणाला कुटी मधे प्रोटेक्शन साठी ठेवले होते. नंतर जेंव्हा मारिच ने रामाची मिमिक्री करुन "लक्ष्मणा धाव .. " अशी आरोळी टाकली तेंव्हा ही मंद सिता मैय्या लक्ष्मणाला तिकडे भाग पाडते .

अरे रे रे, कीती तो अरसिकपणा! मागे मी याच ओळी कीती काव्यत्मक लिहल्या होत्या (अन त्या कीती चटकन हवेत विरल्या) याची आठवण झाली.

असो. त्या ओळी मागू मात्र नका, सभ्यतेच्या उल्लंघनाचं अजून एक तिकिट मिळायचं आम्हाला.

चिंतामणी's picture

12 Apr 2011 - 10:20 am | चिंतामणी

श्रीराम जयराम जयजय राम।

डावखुरा's picture

12 Apr 2011 - 10:33 am | डावखुरा

"राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे l
सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने ll"

तर्री's picture

12 Apr 2011 - 11:45 am | तर्री

श्री राम हा आदर्श राजा होता. ह्या कालातील " स्त्री - वादी , मानवता वादी " द्रुष्टीने तो आदर्श पती नसेलही. पण आदर्श पती पेक्षा आदर्श राजा असणे माझ्या द्रुष्टीने खूप मोठे आहे.
सामान्य नागरिकाच्या भावनेबाबत संवेदनशील पण तरिही कर्तव्य कठोर प्रभूरामचन्द्राना प्रणाम.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 12:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. चर्चा चालू ठेवा.........! :)

-दिलीप बिरुटे

श्रीराम जयराम जयजय राम।
बाकीचे प्रतिसाद आय मीन चर्चा वाचत आहेच!
:)

मृत्युन्जय's picture

12 Apr 2011 - 1:19 pm | मृत्युन्जय

रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि या धाग्याचे रामायण होउ नये ही सदिच्छा.

सुप्रिया's picture

12 Apr 2011 - 2:01 pm | सुप्रिया

श्रीराम जयराम जय जय राम.
श्रीराम जयराम जय जय राम.
श्रीराम जयराम जय जय राम.

एकंदर काय तर टाक्याचे घाव सोसल्या शिवाय देवाला देवपण येत नाही याची खात्री झाली.

पुष्करिणी's picture

12 Apr 2011 - 2:41 pm | पुष्करिणी

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे ।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ॥
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम् ।
रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥

श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि|
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि|
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि|
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये||
-श्रीरामरक्षास्तोत्रातून

ज्याला जे हवे ते मिळो, प्रत्येकाला सद्सद्विवेकबुद्धी लाभो हीच त्या श्रीरामाला विनंती!
श्रीरामाला शरण जायचे नसेल, हरकत नाही. त्याच्यातल्या मर्यादापुरुषोत्तमाला शरण जा. अर्थात, शेवटी ज्याची त्याची समज आणि ज्याची त्याची इच्छा!!!

--असुर

प्यारे१'s picture

12 Apr 2011 - 3:43 pm | प्यारे१

'असुर' 'रामरक्षा' म्हणतो हे पाहून ड्वाळे पाणावले.

नाशकातला काळ्या रामाचा उत्सव आठवला.

'काळा राम' मंदिर फार आवडतं आपल्याला. आणि मंदिरातील उत्सव! आहाहाहाहा!!! पद्मजा फेणाणी काल येऊन मैफिल करुन गेल्याचं कळलं!

--असुर

पक्का इडियट's picture

12 Apr 2011 - 7:23 pm | पक्का इडियट

नाशिकमधील काळ्यारामाचा महिमा अपार आहे.

अनेकांना देवपूजेला लावतो... http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/7932241.cms

ईन्टरफेल's picture

12 Apr 2011 - 9:12 pm | ईन्टरफेल

महारस्ट्रात आलेला पहिला

भैया कोन?

योगप्रभू's picture

12 Apr 2011 - 9:41 pm | योगप्रभू

हनुमान कुणाचा यावरुन एक हिंदू, एक मुसलमान व एक सरदार यांच्यात वाद सुरु असतो. हिंदू म्हणतो, की हनुमानाच्या गळ्यात जानवे आहे आणि कपाळाला टिळा आहे, म्हणजे तो हिंदूच आहे. त्यावर मुसलमान म्हणाला, ' पण त्याचे नाव बघा. ही अशी नावे म्हणजे रहमान, सुलेमान आमच्यातच असतात. पुन्हा आम्ही मुसलमान म्हणून ओळखले जातो. म्हणून हनुमान पण मुसलमान असणार. शेवटी सरदारजी म्हणाला, 'अरे यारो! झगडा मत करो. किसी दुसरेकी बीबी, भगाई किसी तिसरेने और इसने खामखा अपनी पूंछ जला डाली. यकीनन हनुमान तो सरदारही होगा.' (विनोद आहे हलके घ्या)

तर ही चर्चा वाचताना मनात आले, की बायको रामाची, तिला वनात सोडल्यावर ते दोघे आणि त्यांचे नातलग बघून घेतील की. आपला संबंध नाही तिथे कशाला पिसे फुलवून थयथयाट करायचा? एकतर राम काही शाळा कॉलेजात गेला नव्हता. तेव्हाच्या प्रचलित रुढींच्या चौकटीत त्याने जे केले त्याची चिकित्सा पाच हजार वर्षानंतरच्या सुधारित निकषांवर करणे अजबच आहे.

तसं बघायला गेलं तर मलाही कृष्णाचा फार फार म्हणजे फारच राग येतो. आमच्या नशिबात एकच, पण याला मात्र खुशाल १६१०८ बायका. सरासर नाईन्साफी :)

यशोधरा's picture

12 Apr 2011 - 9:45 pm | यशोधरा

LOL! भारी!

एकीचे नखरे भागवा मग पुढचं बघु ;) =))

योगप्रभू's picture

12 Apr 2011 - 10:00 pm | योगप्रभू

श्रीकृष्णाच्या बायका कशा आज्ञाधारक होत्या. सेवा करायला नाही म्हणायच्या नाहीत. फार नखरेपण नसायचे. :)

जाऊदे असतं एकेकाचं नशीब.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Apr 2011 - 10:06 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

श्रीकृष्ण जन्माष्टमीला श्रीकृष्णाच्या मागे लागूया ! :)

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

12 Apr 2011 - 11:07 pm | टारझन

" बिरुटे पंचमी " कधी आहे ? :)

प्रीत-मोहर's picture

12 Apr 2011 - 9:59 pm | प्रीत-मोहर

जय श्रीराम!!!

बाकी चालुद्यात
----------

प्राजु's picture

12 Apr 2011 - 11:21 pm | प्राजु

काय सॉल्लिड चालू आहे सिनेमा!!
चालूद्या!
माझ्यासाठी ,श्रीराम हा एक आदर्श राजपुत्र आणि मग नंतर आदर्श राजा होता. बस्स!

धमाल मुलगा's picture

12 Apr 2011 - 11:28 pm | धमाल मुलगा

प्रभु रामचंद्रांनी हे सगळं वाचलं तर म्हणतील, 'बा हनुमंता, उचल ती गदा आणि हाण माझ्याच डोक्यात!'

अरे, काय चाललंय काय? कशाचा कशाला काही धरबंध? हे म्हंजे, 'रानात लावली कपाशी अन पोरं घरी उपाशी' अशी गत झाली की!

असो!
हे दयाघना, हे नीलकांती पुरुषोत्तमा,
ह्या अजाण लेकरांना माफ कर.
आजच्या मुहुर्तावर माझा तुला प्रणाम!

हे रघुनंदना, तुझ्या अंगच्या गुणांपैकी एक सहंस्त्रांश तरी मज अंगी बाणवले जावे असा आशिर्वाद दे भगवंता!!!!

चतुरंग's picture

12 Apr 2011 - 11:34 pm | चतुरंग

नगरच्या लेले ह्यांच्या देवळातला रामनवमीचा उत्सव आठवला! सकाळपासून गडबड असायची. आम्ही लवकर आंघोळी करुन देवळात जायचो. फुलांची सजावट, मखर करणे सगळे मन लावून बघायचे. त्यादिवशी देवाला नवीन वस्त्रे असत. पाळणा बांधून फुलांची सजावट असे. मग हळूहळू गर्दी होई. देवळात पाय ठेवायला जागा उरत नसे. कीर्तन असे. बाराला रामजन्म झाला की मोठ्या आवाजात रामनामाचा गजर होई. घंटा, थाळे, झांजा ह्यांचा मोठा आवाज फार भारी वाटायचा! गीतरामायण लावलेले असे. सुंठवडा वाटला जाई. लेले आजी खडिसाखर द्यायच्या.
चटचटणार्‍या उन्हातून चपला न घालता पळत पळत घरी यायचं. मग जेवणं करुन खेळायला पळायचं. कैर्‍यांचे दिवस असल्याने आईने स्वयंपाकातच कैर्‍या उकडलेल्या असत त्याचं पन्हं व्हायचं. वेलदोडा, गूळ घालून केलेलं तांबूस पिवळसर कैरीचे पन्हे हाणून पोटोबा थंड करायचा की पुन्हा खेळायला पळायचे. संध्याकाळी कैरीची डाळ खायची आणि मगच दिवस संपायचा! सगळं सगळं अगदी आत्ता घडल्यासारखं आठवतंय! :)

-चैत्ररंग

चिंतामणी's picture

12 Apr 2011 - 11:43 pm | चिंतामणी

हे मिपावर, हे नीलकांत घुमारेकुलोत्पन्ना,
ह्या अजाण लेकरांना माफ कर,
आजच्या मुहुर्तावर फक्त पोस्ट डिलीट कर!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

13 Apr 2011 - 3:02 am | निनाद मुक्काम प...

लहानपणी डोंबिवली वेस्ट येथे घैसास ह्यांच्या पाळणाघरात आमच्या मावश्या दुपारी आम्हाला( कमीत कमी ४० पोर ) दामटवून झोपवत व मग वहीत '' श्रीराम जयराम जयजय राम '' असे लिहित '' त्या माझ्या मते १५ वर्षाहून अधिक काळ भर दुपारी हे लिखाण करत असे मग जरा मोठे झाल्यावर कळले .( त्यांनी लहानपणी रामरक्षा, बालोपासना) शिकवली ) आज रामरक्षा आठवत नाही ह्याबद्दल स्वतःची लाज वाटते .)

आमचे अकोल्याचे मामा कारसेवक. .मंदीर झाले नाही पण ह्यांच्या केसेस झाल्या .
मुंबईत केस ची तारीख असली की कुर्ल्यात आमच्याकडे मुक्काम असायचा .( जुन्या आठवणीना उजाळा मिळाला .)
आज रामनवमी होती हेच मुळी मला माहीत नव्हते .( वृत्तपत्रात पहिल्या पानावर पांडे पुराण पण रामनवमीचा उल्लेख नाही )
लेख मालकाचे विशेष आभार .
''जय श्रीराम ''

प्यारे१'s picture

19 Apr 2013 - 6:05 pm | प्यारे१

श्रीराम जयराम जयजय राम!

(हसू येतंय आज वरचं सगळं वाचून. डॉ. बाबासाहेब काय नि राम काय! दोघांनाही तोफांच्या तोंडी देणं चाललंय.)

महेश हतोळकर's picture

19 Apr 2013 - 7:10 pm | महेश हतोळकर

+१

उपास's picture

19 Apr 2013 - 6:38 pm | उपास

श्रीरामचंद्रचरणौ मनसा स्मरामि|
श्रीरामचंद्रचरणौ वचसा गृणामि|
श्रीरामचंद्रचरणौ शिरसा नमामि|
श्रीरामचंद्रचरणौ शरणं प्रपद्ये||

गिरगावातले काळ्यारामाचे/ गोर्‍यारामाचे रामजन्माचे उत्सव म्हणजे थाटच. सुंठवडा, पन्हे.. जुने दिवस आठवले..
राम जन्मला ग सखे राम जन्मला हे गीत आकाशवाणीवर लागायचेच..
- उपास

चैत्रमास, त्यांत शुद्ध नवमि ही तिथी
गंधयुक्‍त तरिहि वात उष्ण हे किती !
दोन प्रहरिं कां ग शिरीं सूर्य थांबला ?
राम जन्मला ग सखी राम जन्मला

खरच इवलासं देखणं बाळ पाहायला सूर्यही पळभर थांबला - काय गोड कल्पना आहे.

भटक्य आणि उनाड's picture

19 Apr 2013 - 7:24 pm | भटक्य आणि उनाड

श्रीराम जयराम जयजय राम!
श्रीराम जयराम जयजय राम!
श्रीराम जयराम जयजय राम!
श्रीराम जयराम जयजय राम!
श्रीराम जयराम जयजय राम!

सस्नेह's picture

19 Apr 2013 - 11:05 pm | सस्नेह

आपण शरयूप्रवेश का केलात याचं खरं कारण आज समजलं...! a

अप्रतिम's picture

19 Apr 2013 - 11:39 pm | अप्रतिम

राम ही तो करुणा में हैं, शान्ति में राम हैं
राम ही हैं एकता में, प्रगती में राम हैं
राम बस भक्तों नहीं, शत्रु की भी चिंतन में हैं
देख तज के पाप रावण, राम तेरे मन में हैं
राम तेरे मन में हैं, राम मेरे मन में हैं

राम तो घर घर में हैं, राम हर आँगन में हैं
मन से रावण जो निकाले, राम उसके मन में हैं....

अर्धवटराव's picture

20 Apr 2013 - 2:06 am | अर्धवटराव

राम... बस नाम हि काफि है.

बाकि सीतेसंबंधी रामाने केलेल्या अत्याचारांच्या कहाण्या वाचुन भडभडून येतं. राम व सीता... पति-पत्निच्या नात्यात गुंफलेली दोन शरीरे - एक मन. त्या दोघांची सुख-दु:खे स्वतंत्र तपासणे हे मुळातच चुक. व्यक्तीस्वातंत्र्याच्या अपरिपक्व कल्पना विलासामुळे एका अत्यंत तरल पण प्रचंड सशक्त अशा भावबंधाच्या मुकतो आपण. असो.

अर्धवटराव

यशोधरा's picture

20 Apr 2013 - 1:00 pm | यशोधरा

+१

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

20 Apr 2013 - 2:25 am | निनाद मुक्काम प...

रामनवमी च्या उत्सव आमच्या बटाट्याच्या चाळीत नेहमीच उत्साहात साजरा करतात.
मराठमोळी रामनवमी तर वर्षोवर्ष मुंबईत राहणारे आमच्या चाळीचा अविभाज्य भाग असणारे काही उत्तर भारतीय कुटुंब सुद्धा रामनवमी उत्साहात साजरी करायचे.
तेव्हा त्याच्याकडे ऐकलेल्या ह्या भजनाची आज ह्या धाग्याच्या निमित्ताने आठवण झाली.

टळटळित दुपारी जन्मला रामराणा |
म्हणुनि सकळ गाती ठाउके हे पुराणां |
दशरथगृहमाथां सूर्य आला अहो तो |
कुलतिलक पहाया तोचि मध्यान्ह होतो ||

- वामनपंडित.

बाकी यथेच्छ रामायण झालेले पाहून मजा वाटली.

अवांतरः रामही भारी, पण आमचे मत द्वारकाधीशाला :) त्याच्यावर असला प्रसंग आला असता तर उलटी युक्ती करून त्या धोब्यालाच अयोध्येतून हाकलला असता :)

त्याच्यावर असला प्रसंग आला असता तर उलटी युक्ती करून त्या धोब्यालाच अयोध्येतून हाकलला असता

हे बाकी खरं ... स्यमंतक मण्याची गोष्ट, जयद्रथाचं शीर त्याच्या बापाच्या मांडीत पडेल अशी ऐड्या काढणे वगैरे भारी डोकं लावतात किसनराव...

बॅमॅ अन आबां शी अत्यंत सहमत!!!

प्यारे१'s picture

20 Apr 2013 - 7:00 pm | प्यारे१

कुणी नीलकांत कुणी तात्या .... चालायचंच! ;)

सहमत ताई! यावरुन मला प्रेशित मुह्म्मद सलम आठवले. त्यांची पत्नी आयेशावरदेखील त्यांनी संशय घेतला होता. पण प्रेषितांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर ईश्वराकडून त्यांच्यावर हा श्लोक अवतरीत झाला-
''जे लोक शीलवान, अजाण श्रद्धावंत स्त्रियांवर आळ घेतात त्यांचा इहलोक व परलोकात धिक्कार केला गेला आणि त्यांच्यासाठी मोठा प्रकोप आहे. त्यांनी त्या दिवसाला विसरू नये की जेव्हा त्यांच्या स्वत:च्या जिभा, त्यांचे हात, पाय त्यांच्या कृत्यांची साक्ष देतील. त्या दिवशी अल्लाह तो बदला त्यांना पुरेपूर देईल ज्याला ते पात्र आहेत आणि त्यांना माहीत होईल की अल्लाहच सत्य आहे, खNयाला खरे करून दाखविणारा. - कुराण २४ : २३/२५

कृपया इथे एक चूक दुरुस्त करा, त्यांनी ऐवजी काही लोकांनी पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

20 Apr 2013 - 12:00 pm | श्रीगुरुजी

>>> रामनवमीच्या दिवशी मर्यादा पुरुषोत्तम राम जन्मले. सर्वार्थाने आदर्श एक माणूस आणि त्याचे चरित्र म्हणूनही जर रामचरित्राचा वापर केला तरी आपली नैय्या पार व्हावी एवढी शक्ती त्यामध्ये आहे.

श्रीप्रभूरामचंद्र गेली अनेक सहस्त्रके भारतीयांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. प्रभू श्रीरामांना भारतीयांच्या जीवनापासून विलग करता येणार नाही. एखादी व्यक्ती गेली की "त्याने/तिने शेवटचा राम म्हटला" असे म्हटले जाते. एखाद्या गोष्टीचे महत्त्व संपले की "आता त्याच्यात काही राम नाही राहिला" असे साहजिकच तोंडात येते. गांधीजींचे शेवटचे शब्द "हे राम" होते असे म्हणतात. श्रीरामनवमीच्या (उशिराने का होईना) सर्वांना शुभेच्छा!

>>> मोराच्या फुललेल्या पिसार्‍याकडे लक्ष न देता त्याच्या मागे उभे राहून नको त्या गोष्टी बघणे आवडत असेल तर काय करणार????

सहमत

नौशाद उस्मान's picture

20 Apr 2013 - 12:13 pm | नौशाद उस्मान

''इश्वर का जनम होता है ऐसा कनेवाले की जिभ जल कर राख हो जाये'' - गुरुनानक जी

अर्धवटराव's picture

21 Apr 2013 - 9:07 am | अर्धवटराव

आजन्म रामभक्ती केली.

अर्धवटराव

इ.स.सनाच्या १६ व्या शतकात माझ्या एका देवाचा जन्म झाला ज्याने या भारतभुमीला स्वराज्य आनुन दाखवल.आणी दुसरा देव सध्या कसोटी क्रिकेट मध्ये भारताकडुन ४ थ्या नंबरवर फलंदाजी करतो.त्यामुळे देव जन्म घेतो आपला तर विश्वास आहे बुवा....

नौशाद उस्मान's picture

20 Apr 2013 - 1:22 pm | नौशाद उस्मान

जो जन्मतो तो मरतोच! भावनेच्या भरात कुनि कबुल करत नाहि, पन जन्मनार्या प्रत्येक महापुरुशाला, पैगम्बराला म्र्युतु तालता आलेला नाहि, हे कतु सत्य आहे. जिवन्त फक्त निर्गुन निराकार इश्वरच (अल्लाहच)!

सुजित पवार's picture

20 Apr 2013 - 1:50 pm | सुजित पवार

इथे फक्त चर्चाच होते.. त्यातुन निश्पन्न काहि होते असे आजिबत वाटत नाहि...दिवसिन्दिवस इथे यायला नको वाटते आहे.....खुप आपुलकि आहे या स्थला बद्दल्... ति नक्किच कमि होते आहे

श्रीराम जय राम जय जय राम !