ताडपत्रीच्या नेमकी खाली फटाक्याची माळ फुटायला लागल्यामुळे त्यावर बसलेल्या पोरींची जाम टाणाटाण झाली. पाचेक मिनिटांत सगळ्या गॅद्रिंगची शाळा झाली. पोरापोरींमधलं दोराचं कुंपण तुटलं. तुडवातुडवीत खूपजण चेंगरले. पोरांनी पण तातडीचा फायदा म्हणून गर्दीत हाती लागेल त्या पोरीला झेझरुन घेतलं. आम्ही स्टेजच्या मागून बाहेर पडलो. बेडगीकर त्याचे ड्रम आणि आमच्या गिटारी ऑर्केस्ट्राच्या टेंपोत टाकून पळाला. मी गर्दीत घुसून मराठेला शोधायला लागलो. फार वेळ शोधायलाच लागलं नाही. जाधव मराठेचा बॉडीगार्ड असल्यासारखा तिला गर्दीतून बाहेर काढत होता.
जाधवने नुसता गॅद्रिंगचा शो उधळला नव्हता. त्याउप्पर जाऊन मराठेवर छाप पाडायचा तो प्रयत्न करत होता. तिला गर्दीतून बाहेर काढण्याच्या निमित्ताने तिचा दंडही एकदा धरलान. मी मनात वेड्यासारखा चवताळलो. आयमायवरुन शिव्या तोंडात आल्या. गर्दीला बाजूला ढकलत मी त्यांच्या दिशेने घुसलो. एकदोघेजण तर माझ्या धक्क्याने एकदम आडवे पडले. पण माझा तोल सुटला होता आणि मला त्याची पर्वा नव्हती. मी जाधवमागे जाऊन त्याचा शर्ट मागून पकडला आणि ओढला. तसा जाधवचा मागे तोल गेला आणि तो खालीच पडला. मराठेनं एकदम दचकून मागे पाहिलं.
जाधव मान झटकत उठला. त्याच्या नाकपुड्या फुलल्या होत्या, आता जे काय व्हायचं ते आत्ताच होणार होतं.
पण मराठेसमोर एकदम शिवीगाळीवर किंवा हातघाईवर येणं मला आणि जाधवला दोघांनाही अवघड होतं.
"का रे.. मला हात लावतो तू ? जीव वर आला का रे तुझा साल्या?" जाधव मला बोलला. "भेंचोत" ऐवजी "साल्या" अशी साधी शिवी देताना त्याने जे जबरदस्त तोंड आवरलं होतं त्यामुळे त्याच्या तोंडात चळचळून आलेली लाळ मला दिसली.
सगळं पब्लिक गोळा व्हायला लागलं.
"साल्या गॅद्रिंगमधे येऊन घाण केलीस आणि वर तोंड करुन मला विचारतोस? मला काय धंदे कळत नायत का तुझे?",
आत्ता तो विषय नको असं ठरवलेलं असूनही माझ्या तोंडातून बाहेर पडलंच.
इथे "गॅद्रिंगमधे येऊन हगलास" ऐवजी "घाण केलीस" म्हणताना मलाही जाम कष्ट पडले होते.
"गॅद्रिंगमधे काय आम्ही घाण केली काय? केळ्या, हितं गाडीन जास्ती बोलशील तर..", जाधव माझ्यावर धमकला.
आम्हाला मराठेची तिथे अडचण व्हायला लागली. दोघांनाही अशा वेळी ती तिथे नको होती.
"तू जा घरी..", मी मराठेकडे वळून स्पष्टच म्हणालो. ती आमच्या भांडणात कारण आहे असं कॉलेजात कोणाला वाटायला नको होतं. एकदम कुत्री भांडतात त्या लेव्हलला आपण आलोय असं वाटायला लागलं.
"तू पण चल. जाऊ दे आता..", मराठे चक्क माझा हात धरुन ओढत म्हणाली. मी एवढा अचंबलो की माझा आ झाला. सुखही खूप वाटलं.
मग मला एकदमच अवसान आलं. मी तिला म्हणालो, "थांब जरा, याच लोकांनी हे फटाके लावण्याचे धंदे केलेत. मला माहीत आहे. साले करुन सवरुन सावाचा आव आणतात हरामखोर.."
"मार खातोयस बघ आता तू भर रस्त्यात कुत्र्यागत..", जाधव मला बोलला.
तेवढ्यात बापटसर मागून आले आणि त्यांच्या अगोबाई आवाजात म्हणाले, "काय हो जाधव, कसली हो घाणेरडी भाषा तुमची..अं ?"
एरवी कोणाच्या एवढ्या नाजुक बोलण्याने जाधवला शाट फरक पडला नसता. पण शेवटी प्रोफेसर म्हणून बापटांची पत्रास ठेवणं आलं. शिवाय बापटसर सर्व पोरांना अहोजाहो करतात.
"नाय सर, काय नाय सर..", म्हणत जाधव तिथून चालता झाला.
"चला निघा इथून, बास करा आता गोंधळ", असं बापटसरांनी म्हटल्यावर मग माझा अपमान व्हायच्या आत मीही मराठेला खूण करुन तिथून निघालो. तीही माझ्यासोबत निघाली.
सायकल स्टँडवर जाधव असणार हे मला माहीत होतं, आणि तसंच झालं.
मी त्याच्याकडे न बघता ल्यूना काढली. मराठे माझ्या बाजूला झाल्यामुळे त्याला तिथल्यातिथे काही करता येईना. तरी तो फर्रकन कायनेटिक काढून आमच्याजवळ आला.
बराच वेळ तो घुटके गिळत होता. गुटख्याचे घुटके असणार तेच्या आयला.
मग धीर करुन एकदम त्याने मराठेला म्हटलं, "सोडू का?.. घरापर्यंत?".. आणि त्याने मागच्या सीटकडे इशारा केला.
मराठेने "नको" एवढंच म्हणून थोडीशी स्माईल दिली. सावध वागत होती असं वाटलं. जाधव खट्टू झाला आणि पडलेला चेहरा घेऊन त्याने कायनेटिकचा अॅक्सिलेटर जोसात पिळला. त्याने इतका स्पीड घेतला की कॉलेजच्या गेटपर्यंतच तो घसरुन खाली पडणार असं मला वाटायला लागलं. मी मनापासून तशी इच्छा केली. पण जाधव सुसाटत दूर निघून गेला.
मी पण जाधवच्याच बरोबरीचा होतो. त्याचं मन मला कळत होतं. जाताजाता पोरीवर लाईन मारायची आणि स्पीडमधे गाडी ताणवत मर्दानगी दाखवायची हाच उद्देश त्याचाही होता. मी आणि परांजप्यापण मोमीनच्या बाबांची सीडी हंड्रेड घेऊन सकाळी क्लासला जाणार्या पोरींसमोरुन अशीच भैसाटल्यागत हाणायचो. तो स्पीड बघून पोरींची छाती दडपत असणार आणि त्या नक्कीच एकमेकींमधे आपल्याविषयी बोलत असणार हे आम्हाला माहीत होतं. "काय मारतो ना तो गाडी मस्त..ए..पण फुल कंट्रोल आहे हां त्याचा गाडीवर..", अशी वाक्यं मी पोरींच्या तोंडी इतर पोरांविषयी ऐकली पण होती.
मग जाधव निघून गेल्याने तात्पुरतं सगळं शांत झालं. गर्दीही कमी होत होती. मराठेची सायकल असल्यामुळे तिला ल्यूनावर घेणं शक्य नव्हतं. पण आज तिच्यासोबत चालत जायलाच हवं होतं. तिलाही मी सोबत येण्याविषयी हरकत नव्हती.
शेवटी ती हातात सायकल धरुन आणि मी ल्यूना ढकलत, असे चालत निघालो. अंधार पडला होताच.
मराठेसोबतचा हवा तसा मोका आला होता पण मला हवी होती तशी मनाची शांती नव्हती. माझी खूपच फाटली होती. आत्ता जाधव निघून गेला असला तरी तो आता मला तसा सुका सोडणार नव्हता.
तरीपण आत्ता मराठे माझ्यासोबत चालत होती. माझ्याकडे अर्धा तास होता आणि मी काही ना काही बोलणार होतो. जसा विषय वाढत जाईल तसं बोलता बोलता मी तिला स्पष्ट विचारणार होतो. मी वेगवेगळे शब्द काढून ठेवले होते.
म्हणजे ,मी तुझ्यात इन्व्हॉल्व आहे, नुसती मैत्री दोस्ती वाटत नाहीये, तुझं आधी कोणाशी काही असेल तरी बिंधास सांग, तुझा नो असेल तरी पण मैत्री तशीच राहील, आमच्या घरच्यांकडून काही प्रॉब्लेम येणार नाही, मी कितीपण थांबायला तयार आहे..असं खूप काही काही..
तिच्यासोबत चालत राहिलो आणि खूप वेळ झाला तरी थंड शांतता.
"कसा वाटला प्रोग्रॅम?", मी काहीतरी सुरुवात व्हावी म्हणून म्हटलं.. नाहीतर तेच्यायला तिच्या घरापर्यंत असेच स्मशानशांततेत पोचायचो आणि नुसतंच गुडनाईट व्हायचं. मग चाललो आम्ही एकटे घरी ल्यूना डुरकवत.
..................
(टू बी कंटिन्यूड..)
प्रतिक्रिया
5 Apr 2011 - 6:47 pm | गणेशा
अप्रतिम हा ही भाग .. थोडा लह्ना वाटतोय भाग .
लवक्र येवुद्या ना पुढचे लिखान ..
वाचण्यास उत्सुक ...
5 Apr 2011 - 6:49 pm | ५० फक्त
गवि, जबरा भाग हा सुद्धा, पण सगळे सुरुवातीला टिझर टाकतात, तुम्ही मध्येच टाकत आहात. काय राव.
असो, तुम्ही लिहित रहा, आम्ही वाचत राहु.
5 Apr 2011 - 6:54 pm | रेवती
वाचतिये.
5 Apr 2011 - 7:35 pm | धमाल मुलगा
नुसतीच सिझलर्सची डिश तोंडासमोर नाचवून घेऊन गेलं राव हे गवि!
ह्या:! निषेध!!
ष्टुरीची मागणी असल्यानं संथ होणं वगैरे समजु शकतो. पण त्यासाठी एक भाग तसाच मुद्दाम टाकायचा हा छळवादीपणा आज्याबात खपवून घेतला जाणार नाय. :)
5 Apr 2011 - 7:46 pm | प्रीत-मोहर
वर्ड तू वर्ड शमत
6 Apr 2011 - 12:24 am | आनंदयात्री
दुसर्यांदा वाचलं. गगनशेठ अगदी फिल्मी आहे कहानी !! जल्दी लिख्खो ..
5 Apr 2011 - 7:38 pm | निनाद मुक्काम प...
@झेझरुन घेतलं,
का रे.. मला हात लावतो तू ? जीव वर आला का रे तुझा साल्या?" जाधव मला बोलला. "भेंचोत" ऐवजी "साल्या" अशी साधी शिवी देताना त्याने जे जबरदस्त तोंड आवरलं होतं त्यामुळे त्याच्या तोंडात चळचळून आलेली लाळ मला दिसली..
गावी तुमच्या लिखाणास प्रणाम
मागे एकदा मिपावर रेडियोवर कथाकथनाचा एक लेख आला होता .( त्यात मिपावरील कथेचे सादरीकरण केले होते .)
ह्या लेखमालेचे रेडियोवर वाचन झाले तर सॉलिड मज्जा येईन
5 Apr 2011 - 7:41 pm | असुर
जाधव चिडण्यापलिकडे या भागात काहीही झालेलं नाहीये. गवि, सिरियलसाठी पटकथा लिहायच्याच्या मार्गावर आहात का? ;-)
लवकर लवकर लिहून काय ते हिरोला आणि त्या मराठेला मोकळं करा पाहू! उगाच किती दिवस त्या दोघांना आणि त्यांच्यापायी त्या जाधवला टांगून ठेवणार आहात? :-)
--असुर
5 Apr 2011 - 7:42 pm | स्मिता.
वाचतेय सगळे भाग. पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
5 Apr 2011 - 7:58 pm | गवि
क्षमस्व.
हा भाग अजून मोठा होता पण आम्ही आमच्या तत्वानुसार केवळ हपीसातूनच टंकत असल्यामुळे हपीसची वेळ संपली आणि टंकण्यास ब्रेक लागला.पुढचा भाग मोठा लिहीतो.वाचक मायबापांची माफ़ी,छोट्या भागाबद्दल.वेंजॉय.
5 Apr 2011 - 8:27 pm | विशाखा राऊत
वाचतेय...
5 Apr 2011 - 8:44 pm | इरसाल
छान ....
लव्कर लवकर लिहा..........
5 Apr 2011 - 8:55 pm | ईन्टरफेल
पहिले सगळे भाग वाचले
आता...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत... :-)
5 Apr 2011 - 10:11 pm | चिगो
एकदम संपुर्ण वाचुन मग हुल्ल्ड करायचा विचार आहे.. वाचनखुणा साठवत आहे, हे वे.सां.न.
गवि झिंदाबाद...
5 Apr 2011 - 10:48 pm | आनंदयात्री
>>पोरांनी पण तातडीचा फायदा म्हणून गर्दीत हाती लागेल त्या पोरीला झेझरुन घेतलं.
आयला काय रे हे गगन्या !!! हसुन हसुन मुरकुंडी वळली ना रे भेंडी !! अरे झेझरुन काय !!!
=)) =)) =))
6 Apr 2011 - 10:39 am | वपाडाव
गविंना अन त्यांच्या (विकसित केलेल्या) शब्दसामर्थ्याला सलाम...
शप्पथ सांगु का ?
एकदम ट्युशन संपवुन शिरोडकर सोबत घराच्या कोपर्यापर्यंत चालत होतो मी....
- जोश्या..
5 Apr 2011 - 11:21 pm | गोगोल
???
हे क्रियापद आधी ऐकलेले नाही.
बाकी गविंच्या लिखाणाबद्द्ल काय बोलणार.
6 Apr 2011 - 2:02 am | प्राजु
नो कॉमेंट्स!!
किति ताणायचं ते! लवकर लिहा ना.
6 Apr 2011 - 10:10 am | साबु
ते "झेझरुन घेतलं." लै भारि....ह्ह्पुवा....
6 Apr 2011 - 10:22 am | sneharani
लिहा लवकर! वाचतेय!!
6 Apr 2011 - 10:35 am | llपुण्याचे पेशवेll
चायला लई भारी. पुढे काय नडानडी होऊ घातली आहे याबद्दल उत्सुकता आहे.
6 Apr 2011 - 10:32 am | विजुभाऊ
झकास. ष्टाईल मस्त आहे ल्हायची
6 Apr 2011 - 10:44 am | प्रास
लई भारी....... गगनविहारी!
:-)
6 Apr 2011 - 10:56 am | निनाद
झक्कास नचिकेत!
असलेच लोचे असतात पण गॅदरींग मध्ये. नसले तर गॅदरींग कसले? ;)
मस्त, काय मजा आली वाचून. पुढच्या भागाची आस आहेच. मराठे चे काय होणार?
हे आणि रामदास यांचे लेखनाही एकदम आवडणारे आहे.
पण आम्ही आमच्या तत्वानुसार केवळ हपीसातूनच टंकत असल्यामुळे हपीसची वेळ संपली आणि टंकण्यास ब्रेक लागला.पुढचा भाग मोठा लिहीतो. एकदम भारी तत्त्व! आम्हीही हे तत्व लागू केले आहे. त्यामुळे आमचे लिखाण सध्या थांबल्यात जमा आहे. :)
6 Apr 2011 - 11:20 am | स्पंदना
वर स्गळ्यांनी सांगितलेल सार सार मला पण म्हणायच आहे!!!!!!!!!!