स्वयंपाकी देता का हो कोणी ??

अभिरत भिरभि-या's picture
अभिरत भिरभि-या in जनातलं, मनातलं
19 Jun 2008 - 12:55 pm

स्वयंपाकी देता का हो कोणी ??
।। श्री अन्नपुर्णा देवी प्रसन्न ।।
बंग़ळूर
ज्येष्ठ कृष्ण १
पोटासाठी दाही दिशा म्हणत अनेक मिपाकरांप्रमाणे आम्ही
बेन्गळुरी चाकरी पत्करली त्याला आता जवळपास दोन वर्षे होत आली.
आता रोज हाटेलातले चापायला मिळणार म्हणुन झालेला आनन्द अजुनही आठवतो.
नव्याच्या नवलाईने पहिला महिना पनिर अमृतसरी, दाल साग, दहीवाले आलु वगैरे मनसोक्त ओरपले. पुण्यात असताना ही मन्डळी फ़ारशी चाखली नव्हती.
तसे हे प्रकार बरेच आवडले अजुनही आवडतात. पण फ़ुल्ल मिल्स
अर्थात पूर्ण जेवणाची सर यापैकी कशालाच नव्हती. पण आता बंगळुर मधे मराठी
(किमान उत्तर हिन्दुस्तानी) पद्धतीचे जेवण कुठे मिळणार? इथल्या सर्व हाटेलात उ भा. खाणे म्हणजे मैद्याच्या रोट्या हेच समिकरण आहे.(बरे याला पर्याय म्हणुन घरगुती खानावळी सारखी सोय आमच्या भागात तरी उपलब्ध नव्ह्ती. शिवाय आम्हा चौघा रुममेट्सचे पाक कलेतली गती यथायथाच)

यत्र तत्र सर्वत्र पसरलेल्या बिहार्‍ंयाच्या रुपाने आम्हाला सुटकेचा मार्ग दिसला. आणि आमच्या घरी जेवणाचा डब्बा येऊ लागला. फ़ुलके, भात, भाजी असे ब-यापैकी घरचे वाटणारे जेवण मिळु लागले. डब्ब्याची कंटाळवाणी गोष्ट म्हणजे त्याच त्याच भाज्या. समस्त मेसवाल्यांना "बटाटा" हा प्रकार इतका प्यारा का आहे याचे गुढ मला अजुनही उमगले नाही.
आणखी लिमिटेड क्वांटिटीमुळे पोट भरले आहे असे वाटायचे च नाही.

हपिसातल्या एका सहका-याच्या डब्ब्यातुन तेव्हा दररोज सुग्रास पदार्थ निघु लागले
आणि या सा-या समस्येवरचा रामबाण तोडगा सापडला .. कुक अर्थात आचारी !!
तुम्हाला हवे ते हवे तितके बनविणारा बल्लवाचार्य म्हणजे देवदुत च जणु !
आणि आचारी शोधण्याची आमची मोहीम सुरु झाली.

उपाय जरी सापडला तरी बेन्गळुरसारख्या दक्षिणी शहरात उ. हि. आचारी सापडणे तितके सोप्पे नव्हते.आता मुम्बई वा दिल्लीत राहणारा कोणी मुत्थुस्वामी सुब्र्हमण्ण्यम अय्यरही हेच उलट्या पद्धतीने म्हणेल हे मी समजु शकतो.

नशिबाने एक पोरगेलासा तरूण आम्हाला मिळाला. या वल्ली चे नाव - चंदन . चंदनच्या हाताला भन्नाट चव होती. शिवाय जेवण बनविण्याचा त्याचा वेग ही लाजवाब होता.
या लाजवाब वेगाचे प्रतिबिम्ब ओट्यावर पोळ्या लाटताना पसरलेल्या पिठीतुन वा हिंदकळलेल्या वरणातुन हि दिसायचे. 'जादा पढाई करके का होगा ? ' या practicle विचारामुळे चंदन शाळा फ़ारशी शिकली नव्हता आणि पैसा कमावायचा म्हणुन
बेंगळुरची वाट धरली होती. आम्ही दिलेले पैसे कमीवाटतात म्हणून की काय किंवा आमचे घर दूर पडते म्हणून की काय चंदनने एका महिन्यानंतर घरी येणे बंद केले आणि आम्ही एका चांगल्या कुकला मुकलो :(
पंधरवड्याच्या भटकंती नन्तर एक ओडिसीबाबुंचा शोध लागला व आम्ही पंढरपुरच्या पांडुरंगाला व पुरीच्या जगन्नाथाला एकसाथ thank you म्हटले." होम पंद्रा शालसे खाना बनाता ह्या" असे experince certificate या ओडिसीबाबुंकडे होते.जेवण महत्वाचे असल्याने आम्ही ही पैशांसाठी फ़ारसे ताणुन धरणार नव्हतो. उडियाबाबु जवळ राहणारे असल्याने ते या कामाने खुष वाटले अर्थात आम्ही ही खुष होतो. पहिल्याच दिवशी या महाशयांनी ३ जणांचे साधे जेवण बनविण्यास तीन तास घेतले वर चव यथा यथा. १५ वर्षांचा अनुभव दाखवुन सिस्टिम अनालिस्ट म्हणुन मिरविणारे लोक आय.टी. मधे पाहिले होते. यांचे भाउबंद सर्व क्षेत्रात होते म्हणायचे. :D
या नंतरही बरेच दिवस गेले. शेवटी आम्हीही कंटाळुन परत डब्बाच लावला. एक दिवस योगयोगाने अबिदाबाईंचा शोध लागला.कर्नाटकातल्या सत्तरुढ धर्मनिरपेक्ष जनता दलाप्रमाणे आम्ही ही धर्मनिरपेक्ष असल्याने आमच्या रांधाघरावर आता अबिदाबाईंची वर्णी लागली . बाईचा हात घराला लागला म्हणजे सारे रुप पालटते म्हणतात.
अगदी त्याप्रमाणे च आमचे किचनही आता चकाचक राहु लागले. अबिदाबाई सांबार सुन्दर बनवायच्या. अबिदाबाईंची एक गम्मत लौकरच ध्यानी आली. भाजी कुठलीही असो , अबिदाबाईंची बनविण्याची पद्धत एकच होती. तेल गरम करायचे, त्यात चिरलेली भाजी टाकायची, मसाला व पाणी टाकुन वर झाकण ठेवायचे.यामुळे एक लगदा तयार होत असे. शेवटी काय तर पुन:श्च हरिओम

ताजा कलम:
मध्यंतरी राज साहेबांनी आन्दोलन करुन ब-याच बिहा-यांना उत्तरेत पाठवल्याचे कळते.त्यांनी थोडे बिहारी बेन्गळुरी धाडावेत. बहुतांश बिहरी उत्तम कुक असतात. याने आमच्या सारख्या भुकेल्या जनतेचे कल्याण होईल.
धंद्यात पडण्याची (!) इच्छा असणा-यांना एक मौलिक टीप:
बेन्गळुरात मराठी पदार्थांच्या हाटेलास तुफ़ान वाव आहे. (मागेपुढे हाटेल काढण्याचा आमचाही विचार आहे). दरम्यान पाक कलेच्या प्रान्तावर चढाई करण्याचे काही यशस्वी व काही अयशस्वी प्रयत्न आम्ही ही केले आहेत त्याबद्दल सविस्तर पुन्हा केव्हा तरी. पूर्वी ज्याला मी नाके मुरडायचो ती मेथीची भाजी, भाकरी आता कधी गेल्यावर कौतुकाने खातो हे पाहुन मासाहेबांना घरी नवल वाटते.
तुर्तास एका सरदारजीची मेस आम्हास गावली आहे.बटाट्याचे तुकडे आम्ही तिकडे जाऊन तोडत आहोत.तरिही "बचेन्गे तो और लडे.ग़े" बाण्याने आमची "आचारी शोध मोहिम" जारी आहे.

तळटीप:
(अजुनही) हवे आहेत: स्वैपाकी
पदसंख्या: १
अर्हता : .......

संस्कृतीदेशांतरनोकरीअनुभव

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

19 Jun 2008 - 1:35 pm | अनिल हटेला

वाह राजे वाह !!!

आम्ही आचा-याच्या शोधात पडत नसतो..

आम्ही स्वतः (जातीने) स्वय्म्पाक करतो म्हटल....

तुम्ही आमच्या पाक कलेचा ऑन्लाइन क्लास अटेन्ड क्रु शकता....

आणी आमची कोठेही शाखा नाही......

अन्या दातार's picture

19 Jun 2008 - 2:39 pm | अन्या दातार

घरी आपण खाण्याच्याबाबतीत जो काही रुबाब्/माज करतो तो अशावेळेस खाडकन उतरतो बघा.......

सचीन जी's picture

19 Jun 2008 - 2:52 pm | सचीन जी

अविरत जी, बंगळुरचा एका वर्षाचा आमचाही अनुभव फारसा वेगळा नाही.
नारायण अम्मा नामक आचारणीने आम्हाला सगळ्या भाज्या एकाच चविने खायची निरपेक्ष वॢत्ती शिकवली.
शेवटी मी इतका निरपेक्ष झालो की बंगळुर शहराला राम राम ठोकत सोलापुरला परत फिरलो.

सचीन जी

अन्जलि's picture

19 Jun 2008 - 3:00 pm | अन्जलि

आता कस आइने केलेले कहिहि गोड लागेल बाहेर रहायला लागल्यावर घरच्या अन्नाचि चव खरि कळते. ह्.घ्या. माझा मुलगा पण असाच आहे चेन्नइला असतो अशिच तक्रार आहे ..... म्हनुन वाचुन हसु आले देव करो तुला लौकर छान कुक मिळू दे.

चावटमेला's picture

19 Jun 2008 - 6:35 pm | चावटमेला

राणीच्या देशात असताना आम्ही केलेल्या अनेक (नसत्या) उद्योगांपैकी स्वयंपाक करणे हा सुद्धा होता.
आईच्या हातच्या खाण्याची किंमत कळली ती तेव्हाच..
http://chilmibaba.blogspot.com

वरदा's picture

20 Jun 2008 - 5:15 am | वरदा

हातचं पण जेवून पहा छान असते चव एकदम्...स्वतःला भयानक खावं लागलं की दुसर्‍या दिवशी आपण स्वतःहून शिकतो.....

विश्वजीत's picture

20 Jun 2008 - 10:19 am | विश्वजीत

अपना हाथ जगन्नाथ. अनुभव मस्त लिहिले आहेत. मजा आली.