आपल्या प्रथा आपण कशासाठी विसरायच्या?

योगप्रभू's picture
योगप्रभू in जनातलं, मनातलं
21 Mar 2011 - 5:20 pm

परवा होळी झाली आणि काल धुळवड. रस्त्यावर सगळेजण रंग खेळत होते. दिवसभर प्रसारमाध्यमांनी 'होली है' टाईप बातम्यांचा आणि नाचगाण्यांचा मारा चालवला होता. आम्ही राहतो तिथेही शेजारच्या इमारतीमधील मराठी लोक मस्त रंग खेळत होते. एकाने विचारले, 'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. ' त्यावर त्याने माझ्याकडे 'काय मूर्ख आहे?' अशा नजरेने पाहिले आणि विचारले, 'रंगपंचमीला काही सुटी नाही. कोण येणार तुमच्याशी रंग खेळायला?' मीपण लगेच उत्तरलो, ' मुलांच्या शाळेला सुटी आहे. कुणी नाही आले तर आम्ही वेळ मिळाल्यावर घरातच खेळू, पण मराठी प्रथा मोडणार नाही.'

मला खरंच नवल वाटते. एकीकडे आपणच आपल्या प्रथा मोडायच्या आणि पुन्हा मराठी संस्कृती कशी आक्रमणाच्या विळख्यात सापडलीय त्याचे गळे काढायचे. होळीलाच रंग खेळण्याची उत्तरेची प्रथा आपण स्वीकारलीय, पण होळी पेटवल्यावर संध्याकाळी त्यात पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची, होळीभोवती तांब्याभर पाण्याचे रिंगण घालत प्रदक्षिणा घालण्याची आणि होलिका राक्षशिणीच्या नावाने बोंब मारण्याची प्रथा अन्य समाजांतील लोकांनी स्वीकारलीय का? असल्यास माझ्या पाहण्यात नाही. मग प्रत्येक समाज आपल्या प्रथा जतन करत असताना आपणच का आपल्या प्रथा मोडतोय?

आणखी एका अनुभवामुळे मी विचारमग्न झालोय. नुकत्याच दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या. आम्ही काय करतो, की आसपासच्या/नात्यातील परीक्षार्थींना घरी जाऊन शुभेच्छा आणि एक पेनसेट देतो. मुलांच्या पाठीवर आश्वासक हात ठेवणे, एवढाच हेतू. तर या खेपेस जवळच राहणार्‍या दोन कन्यांना शुभेच्छा द्यायला गेलो. पहिले घर मराठी. मुलगी हाय-फाय शाळेत शिकणारी. तिने 'थँक्स' म्हटले. आई-वडिलांनी ती कसा जोरात अभ्यास करतीय सांगितले. नंतर दुसर्‍या घरी गेलो. हे कुटूंब परराज्यातून येथे स्थाईक झाले आहे. त्यांच्या मुलीने मला आणि पत्नीला पायावर डोके ठेऊन नमस्कार केला. मी फार ओशाळलो. तिला म्हटले, 'ताई! असा नमस्कार आमच्यात आजी-आजोबांना करतात. इतर मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करायचा असतो.' त्यावर तिचे आई-वडील म्हणाले, 'अहो करु द्या तिला. आमच्या समाजात अशीच प्रथा आहे.' येताना मी पत्नीला म्हटले, 'बघ. आपला समाज कसा लवकर प्रथा विसरतोय ते.' त्यावर ती म्हणाली, 'अरे आताच्या तरुण मुलामुलींना वाकून पाया पडणे, विवाहाआधी दाखवण्याचा कार्यक्रम या गोष्टी रुचत नाहीत. तो काळ मागे पडलाय.'

खरंच तो काळ मागे पडलाय? की मराठी समाज नको इतका पुढे गेलाय?

संस्कृतीसमाजलेख

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 12:28 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शिवजयंती (शिवाजी महाराजांची जन्मतिथी/दिनांक) राहिलच की! शिवाय शंकराचं जन्मस्थान माहित नसावं (मला तरी माहित नाही, डोमिसाईलकडे दुर्लक्ष करू या.), नागपंचमी, गणेशचतुर्थी (जन्म हिमालय, पण डोमिसाईल माहित नाही म्हणून संशयाचा फायदा), नारळी पौर्णिमा, इ. साजरे करता येतीलच ना?

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:38 pm | पंगा

शंकराच्या डोमिसाइलकडे आणि गणपतीच्या जन्मस्थानाकडे काय म्हणून दुर्लक्ष करायचे?

शिवजयंती हा धार्मिक उत्सव नाही, पण ठीक आहे.

बाकी नारळीपौर्णिमा तरी निर्विवादपणे आपलीच का? असावी असे तूर्तास धरून चालू.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 12:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

शंकराच्या डोमिसाइलकडे आणि गणपतीच्या जन्मस्थानाकडे काय म्हणून दुर्लक्ष करायचे?

संशयाचा फायदा.

शिवजयंती हा धार्मिक उत्सव नाही, पण ठीक आहे.

मान्यतेबद्दल धन्यवाद. :p

बाकी नारळीपौर्णिमा तरी निर्विवादपणे आपलीच का? असावी असे तूर्तास धरून चालू.

जर नारळीपौर्णिमा आपलीच तर शंकर आणि गणपतीही चालून जावेत. शिवाय लोकमान्यांनीही गणपतीला मान्यता दिल्यामुळे गणेशचतुर्थीला आपली म्हणू या.

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:49 pm | पंगा

... राम आणि कृष्णांनीच कोणता अश्वमेध केलाय?

शिवाय लोकमान्यांनीही गणपतीला मान्यता दिल्यामुळे गणेशचतुर्थीला आपली म्हणू या.

मग रामदास कोणत्या भावाने?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मग रामदास कोणत्या भावाने?

लोकशाही -- लोकमान्य -- लोकांच्या भावना या भावाने.

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:57 pm | पंगा

म्हटले तर, लोकमान्यांनी गणपतीला मान्यता दिली तशी रामदासांनी रामाला दिली नाही का? मान्यता?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 1:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> म्हटले तर, लोकमान्यांनी गणपतीला मान्यता दिली तशी रामदासांनी रामाला दिली नाही का? मान्यता? <<
लोकमान्यांच्या नावातच लोकांची मान्यता आहे, गणपतीला मान्यता नाही. पण रामदासांच्या नावातच "रामाचा दास" आहे त्यामुळे रामदासांनी दिलेली मान्यता अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त आहे.

>> 'धन्यवाद' भय्यांचे. आपले (मानलेच तर) 'आभार'. <<
धन्यवाद संस्कृतमधून आलेला शब्द नाही का?

पंगा's picture

22 Mar 2011 - 1:07 pm | पंगा

अन्योन्याश्रयदोषाने ग्रस्त

म्हणजे काय बॉ?

धन्यवाद संस्कृतमधून आलेला शब्द नाही का?

थेट आला असण्याबद्दल शंका आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 1:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> म्हणजे काय बॉ? <<
सदर संदर्भ पहाणे. मला अर्थ समजला की मी लगेच सांगेन. ;-)

असो. आता जेवणाची वेळ झाली आहे, तेव्हा माझी टॅम्प्लीज.

पंगा's picture

22 Mar 2011 - 1:23 pm | पंगा

संदर्भ पाहिला. रादर पूर्वीच पाहिला होता. मात्र, 'एक अशक्य कोटीतले लिखाण' यापलीकडे काहीच अर्थबोध झाला नाही.

चर्चा मात्र मनोरंजक. 'प्रगल्भ मनोरंजन' (पक्षी: 'प्रगल्भांचे मनोरंजन') म्हणतात ते हेच असावे बहुधा. असो. प्रगल्भांकडे आणि मनोरंजनाकडे पाहून आमचे मनोरंजन झाले (प्रगल्भ किंवा कसे याची कल्पना नाही), एवढेच नोंदवू इच्छितो.

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:53 pm | पंगा

मान्यतेबद्दल धन्यवाद.

'धन्यवाद' भय्यांचे. आपले (मानलेच तर) 'आभार'.

नितिन थत्ते's picture

22 Mar 2011 - 12:35 pm | नितिन थत्ते

दहिहंडी ही मूळची कोकणातली (आणि तिथून बाले लोकांबरोबर मुंबईत आलेली) प्रथा आहे. देशावरच्या लोकांनी ही परकी प्रथा पाळू नये. आणि मुंबईच्या लोकांनी पाळायला हरकत नाही (किंबहुना विसरू नये) कारण भौगोलिकदृष्ट्या मुंबई हे कोकणच आहे.

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:44 pm | पंगा

... असेच काहीतरी असणार म्हणून.

हे पुण्याचे प्रस्थ नाही, खरे आहे. सांस्कृतिक अतिक्रमण आहे हे नक्की.

मान्य.

विकास's picture

21 Mar 2011 - 8:55 pm | विकास

योगप्रभूंच्या मुद्याशी काहीअंशी सहमत आहे.

रंगपंचमी हा सण जरी मी ऐकलेला असला तरी माझ्या लहानपणी देखील मुंबईत सगळेच धुळवडीस खेळत असत. त्याचा संबंध हा परप्रांतियांशी नसावा. किंबहूना त्यात देखील रंगापेक्षा केवळ पाणीच आणि पाण्याचे फुगे जास्त वापरले जात. मला वाटते धुळवडीच्या दिवशी बर्‍यापैकी सर्वत्र सुट्टी असायची म्हणून त्यादिवशी खेळले जायचे. (धमु ने वर म्हणल्याप्रमाणे आम्हाला मराठी शाळेत देखील "रंगपंचमी"ची सुट्टी असल्याचे आठवत नाही).

तसे बघायला गेलो तर मराठी संस्कृतीमुळे "गोविंदा" आणि "गणपती उत्सव" देखील सर्वत्र पसरलेत. त्यामुळे अशी देवाणघेवाण होतच असते असे वाटते. ती देखील योग्यच आहे, जो पर्यंत इतरांच्या संस्कृतीस तुच्छ लेखत स्वतःचे शहाणपण सांगत कोणी स्वतःचे उत्सव पुढे करत नाहीत अथवा त्याचा तसा वापर करत नाहीत....

काही प्रसंगी मोठ्यांच्या पाया पडण्यात काही गैर आहे असे वाटत नाही. त्यात थोडे जमिनीवर पाय ठेवण्याचे नकळत शिक्षण मिळते असेच वाटते. तुम्ही सांगितलेल्या प्रसंगात तर नक्कीच योग्य वाटते. तसेच नंतर जेंव्हा पेढे देण्याची वेळ येते तेंव्हा देखील...ज्यांना करायचे नाही त्यांना न करुंदेत, पण ज्यांचा त्याला विरोध असतो त्यांनी तसे करणार्‍यांना कमी लेखणे/नावे ठेवणे करू नये कारण त्यातून त्यांचाच संस्कृतीला नावे ठेवत स्वतःबद्दल असलेला न्यूनगंड दिसतो असे कुठेतरी वाटते.

अर्थात त्याचा अतिरेकही होऊ नये. उ.दा. पुर्वी लग्नात नवरा-नवरीला भेटायला येणार्‍या प्रत्येक मोठ्या व्यक्तीस वाकून नमस्कार करावा लागे. आता सिलेक्टीव्हली, फारच मोठे, फारच आदरणीय, खूप जवळचे असे काही इन्स्टंट क्रायटेरीया वापरले जातात आणि ते योग्य वाटतात. तसेच कधी कधी अचानक टोप्या पडल्या सारखे एक जण पाया पडले म्हणून सर्वच पाया पडतात, ते देखील नको वाटते. एकदा एका मोठ्या कार्यक्रमात, संयोजक मंडळातील एकजण लताजींच्या पाया पडले... झाले आता लगेच सर्वजण पाया पडायला लागले! :-)

पाश्चात्यांच्या संस्कृतीत पायापडणे नसले तरी (भिन्नलिंगींमध्ये आणि स्त्रीयास्त्रीयांमध्ये) मिठ्या मारणे आणि गालावर चुंबन घेण्याची प्रथा आहेच. ख्रिसमस आणि इतर अशाच काही विशिष्ठ पार्ट्यांमधे जेंव्हा जाणे होते तेंव्हा असे अनेकांना अलिंगन देणे आणि व्हर्चुअल चुंबने देणे करावे लागते... तसे पार्टीला जाऊन केले नाही तर कितीही लिबरल असले तरी ते त्यांना खटकते... असो.

अन्या दातार's picture

21 Mar 2011 - 10:10 pm | अन्या दातार

स्वरुप थोडे खटकले! "आपल्या प्रथा आपण कशासाठी विसरायच्या" यात प्रथा या विसरायच्याच आहेत हे गृहित धरल्याचे जाणवते.

आजानुकर्ण's picture

21 Mar 2011 - 10:46 pm | आजानुकर्ण

तुका म्हणे उगी राहावे
जे जे होईल ते ते पाहावे

पांथस्थ's picture

23 Mar 2011 - 7:04 pm | पांथस्थ

तुका म्हणे उगी राहावे
जे जे होईल ते ते पाहावे

काय काय पहावे लागणार :)

तुका म्हणे उगी राहावे
झाडावर चढुन वाद पहावे ;)

पक्या's picture

21 Mar 2011 - 11:01 pm | पक्या

आपल्या प्रथा आपणच जिवंत ठेवायच्या असतात. त्यातही अनिष्ट प्रथा न पाळणे हे तर उत्तमच.
त्यामुळे आपल्या लेखाशी काही अंशी सहमत .

अवांतर : या वर्षी होळीपोर्णिमेला आकाशात महाचंद्राचे (सुपरमून) दर्शन झाले.
यावर सामन्यातील फुलोरा मध्ये मिपाच्या विक्षिप्त अदितीबैंचा लेख आलेला आहे.

प्रथा पद्धती बदलत असतात. बदलाची कारणे कधी दृश्य कधी अदृश्य असतात.आपण लोक त्यात आपला अहंकार गुंतवतो आणि तिचं प्रवाहीपण नष्ट करतो.
आमच्या घरी शिकेकाईने केस धुवायची प्रथा होती. गल्लीत शेणी चोरून होळी करायची प्रथा होती. शाळेत खाकी हाफ चड्डीची प्रथा होती.गावात तिकटीवर म्हस पिळून दूध प्यायची प्रथा होती. मे महिन्यात मामानं पत्र घालून बहिणीला-भाचरांना बोलवायची प्रथा होती.
आता शाम्पू , लाकडं ,रंगीत गणवेष,गोकुळ,फोन.
आपला जीव जिथं गुंतलाय त्या प्रथा आपणंच पाळाव्या , त्या सोडून बाकी सार्‍या प्रथा जरी नष्ट झाल्या तरी काहीही बिघडत नाही.

वरच्या त्या दैनंदिन गरजा आहेत , सांस्कृतिक प्रथा नाहीत वगैरे म्हणायचं तर म्हणा. पूजेच्या प्रथेत जसं सोवळं तशी शाळेच्या प्रथेत चड्डी .

(जेवणानंतर बनारसी पान खाण्याची प्रथा पाळणारा ) अडगळ.

सुहास..'s picture

22 Mar 2011 - 12:30 am | सुहास..

अ(न)पेक्षीत धागा, अपेक्षीत प्रतिसाद !!

चा(प) लु द्यात !!

असाही फरक असतो पण :

होली के दिन बच्चन का 'जलसा' जल से भर गया !
होली के दिन युवराज ने मनायी होली अपने प्रियजनोंके साथ ..

होली के रंग मे रंग उठी देल्ही ..

---------

रंगपंचमी च्या दिवशी रंग डोळ्यात गेल्याने नाशिक च्या मुलीचे डोळे रंगहिन ...

रंगपंचमी ला चार जनांना दारुच्या नशेत गाडी चालवताना पकडले ...

रंगपंचमीचा रंग ठरला बेरंग - सावरखेड्यात बालक झुंजतो आहे जीवनाशी

---------------------------

असो .. उत्सव कोणता ही असुद्या .. कोठे ही असुद्या ...
परंतु मुंबई आणि अलिकडेच पुण्यात पसरलेल्या होळी-धुलवडीचे रंगीत वातावरण मात्र
पुर्ण महाराष्ट्रात रंगपंचमीलाच असते ...

अवांतर : प्रथेला महत्व नसतेच तर मग गुढीपाडव्याला ही खुशाल होळी पेटवली तरी काही हरकत नाहिच मुळी कोणाची

सेरेपी's picture

22 Mar 2011 - 4:17 am | सेरेपी

थोडसं वैयक्तिक आहे, पण तुमच्या लेखात उल्लेख आलाय म्हणून लिहिते आहे. पूर्वी म्हणे 'आपल्या' मराठी समाजातील बायका नवर्याला 'इकडची स्वारी', 'अहो', 'हे', 'धनी' इ. म्हणत...गोष्टी बदलतंच असतात, सिलेक्टीवली आपला जुनं तेच बरोबर हा आग्रह का बरं आहे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 10:54 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसाद आवडला.

सेरेपी's picture

23 Mar 2011 - 4:31 am | सेरेपी

धन्यु

पंगा's picture

22 Mar 2011 - 11:13 am | पंगा

मुद्दा ठीक तर आहे.

प्रथा बदलतात. 'आपले' वगैरे जे आपण म्हणतो ते आपण आपल्या सोयीने उचललेले असते. चहा पिणे हे एका जमान्यात काही समाजांत तरी पाप असे. आणि मोठे प्यायले तरी लहानांना तर मुळीच देत नसत. का तर म्हणे हानिकारक असतो, व्यसन असते म्हणून. (म्हणजे माझ्या लहानपणी आमच्या घरात ही अडचण नव्हती, माझे आईवडील मला देत असत, पण एकदा काका घरी आले होते तर त्यांच्यासमोर मी चहा मागितला तर ओरडले होते असे आठवते. लहान मुलांनी म्हणे फक्त दूध प्यायचे.)

तसेच पाहिले तर चहा पिणे, पाव खाणे, शर्टप्यांट घालणे या काही 'आपल्या' प्रथा नव्हेत. मग त्या आपण का बरे पाळतो?

सेरेपी's picture

23 Mar 2011 - 4:30 am | सेरेपी

म्हणजे लेखनावर टीका व्हावी, लेखकावर नव्हे वगैरे येतील म्हणायला, म्हणून तो डिस्क्लेमर ;-). तसा लेखकाने उल्लेख केलाय म्हणजे माझ्या मते वैयक्तिक नसावा.

रमताराम's picture

22 Mar 2011 - 1:48 pm | रमताराम

(हा प्रतिसादही थोडा वैयक्तिक आहे ;) )
पूर्वी म्हणे 'आपल्या' मराठी समाजातील बायका नवर्याला 'इकडची स्वारी', 'अहो', 'हे', 'धनी' इ. म्हणत...गोष्टी बदलतंच असतात,
काही लोक नव्या रूपात जुनेही संभाळून ठेवतात पहा. हल्ली 'धनी' चे अपभ्रंशरूपात 'ध्यान' असे संबोधन प्रचलित आहे.

सेरेपी's picture

23 Mar 2011 - 4:25 am | सेरेपी

;-)

निनाद's picture

22 Mar 2011 - 11:09 am | निनाद

धागा काहिसा पटणारा आहे. म्हणून शोध घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आले की इतका मराठीचा अभिमान असणार्‍या लोकांच्या मराठी विकीवरच्या लेखात या रंग पंचमी सणाविषयी फक्त १ ओळ आहे!
इतकेच वाटते आहे तर किमान हिंदी विकी इतका मजकूर तरी तेथे येऊ द्या! शक्य असेल त्या लेखाचे भाषांतर खरडवहीत द्या, मी विकीवर टाकायला तयार आहे. हेच पान (संदर्भासहीत!) सांगते की रंगपंचमी हा सण महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्यप्रदेश व राजस्थान येथेही साजरा होतो असे दिसून येते.
इंग्रजी विकी तर या महत्त्वाच्या सणाला एका परिच्छेदात आटोपतो, आणि ते ही होली नावाच्याच पानात! रंगपंचमी असा शोध दिला की तो सरळ होली या पानावर घेऊन जातो. हे पान वेगळे करायला हवे. तसा कुणी पुढाकार घ्यायला हवा. या सणाची तपशीलवार नोंद तरी आपण बनवून ठेवले पाहिजेत असे वाटत नाही का? रंग पंचमी हे पान पूर्ण करू या चला, कामाला लागा! :)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 11:49 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

'रंगपंचमी' हा शब्द मराठीत सलग लिहीतात.

पंगा's picture

22 Mar 2011 - 11:53 am | पंगा

...संस्थळ चुकलं का हो हे?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 11:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

या धाग्यापुरतं तरी असं म्हणवत नाहीये. ;-)

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:00 pm | पंगा

ठीक. :)

नंदन's picture

22 Mar 2011 - 1:28 pm | नंदन

प्रथीत-यशत्व [Sic] मिळवण्याकडे वाटचाल? ;)

निनाद's picture

22 Mar 2011 - 2:12 pm | निनाद

मला दोन्ही बरोबर वाटतात. पण जो शब्द योग्य असेल तोच वापरावा याविषयी दुमत नाही. रंग आणि पंचमी दोन वेगळे शब्द वापरणे मराठीत नसेल तर आता मला वर संपादन करणे शक्य नाही. ते शब्द रंगपंचमी असे वाचावेत. तुम्हाला शक्य असेल तर शब्दकोशात, शब्दरत्नाकर किंवा विश्वकोशात काय उल्लेख/माहिती आहे, ते द्याल का?

टारझन's picture

22 Mar 2011 - 12:48 pm | टारझन

मणॉरंजण झाल्या गेले आहे :) आहाहा , काय तो एकेक प्रतिसाद.

बाकी बसवला टेंपोत , जर आमची मित्र मंडळी गोळा होणार असतील तर आम्ही दिवाळीत रंग खेळु :) ( आमच्यातल्या आमच्यात) म्हनजे थत्तेचाचा आणि कर्णाला तरास नको :)
सगळ्याच प्रथा फालतु आहेत. :) ही संस्कृतीच फालतु आहे . सगळे धर्म पण फालतु आहेत्. थोडक्यात काय मणुश्य प्राणी आणि त्याने बनवलेलं सगळं फालतु आहे :)
बाकी आपण् आयबाप सोडुन् कोणाच्या पाया पडत् नाही :)

पंगा's picture

22 Mar 2011 - 1:01 pm | पंगा

सगळ्याच प्रथा फालतु आहेत. Smile ही संस्कृतीच फालतु आहे . सगळे धर्म पण फालतु आहेत्. थोडक्यात काय मणुश्य प्राणी आणि त्याने बनवलेलं सगळं फालतु आहे Smile

च्यामारी मग आम्ही कधी म्हटले की हे सगळे प्रगल्भ आहे म्हणून?

बाकी इथे असलेच मनोरंजन मिळायचे. प्रगल्भ मनोरंजन* हवे असेल तर दुसरीकडची वाट पकडावी लागते. नाही? ;)

(* अडल्ट एंटरटेनमेंट???)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 1:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

च्यामारी मग आम्ही कधी म्हटले की हे सगळे प्रगल्भ आहे म्हणून?

पंगा काका , तुम्ही हे प्रगल्भ आहे असे म्हंटल्याचे मी कुठे णमुद केल्या आहे हे दाखवुन द्या, अन्यथा वाक्य मागे घ्या :)

बाकी इथे असलेच मनोरंजन मिळायचे. प्रगल्भ मनोरंजन* हवे असेल तर दुसरीकडची वाट पकडावी लागते. नाही?

आमचे मणोरंजन तर् आम्ही जाऊ तिथे करुन घेतो. मग ते प्रगल्भ मनोरंजन* असो किंवा असले मनोरंजन :)

- पॅंट्रिस टिकोलो

पंगा's picture

22 Mar 2011 - 2:38 pm | पंगा

पंगा काका , तुम्ही हे प्रगल्भ आहे असे म्हंटल्याचे मी कुठे णमुद केल्या आहे हे दाखवुन द्या, अन्यथा वाक्य मागे घ्या

असले प्रगल्भ रिकामटेकडे उद्योग कोणी सांगितलेत, हं? ;)

मग चालु द्या तुमचे वांझोटे धंदे :) तसाही *ट काही फरक पडत नाही .. खि खि खि :)

-हावरट गासुद्दिन

पंगा's picture

22 Mar 2011 - 2:58 pm | पंगा

:)

टारझन's picture

22 Mar 2011 - 3:01 pm | टारझन

;)

-- पान्डुरंग दादा

महाराष्ट्रात (म्हणजे नुसती मुंबई पुणे नव्हे) माझ्या माहोती प्रमाणे बरेच सणवार नियमित आणि योग्यत्या रितीने पाळले जातात.
पुणे/मुंबईतले मुठभर लोक त्यांच्या प्रथा(?) विसरत चाललेत म्हणुन उर्वरीत लोकांवर आपल्या प्रथा विसरत चालल्याचा ठपका का?

बाकी कुणी कधीही रंग उधळो इकडे शिमगा चांगलाच रंगलाय. :)

शतकवीर योग प्रभुंचे अभिनंदन. :)

पुणे/मुंबईतले मुठभर लोक त्यांच्या प्रथा

श्री गणपा ह्यांनी, अनिवासी असुन सुद्धा, महाराष्ट्रातील जिल्ले/प्रांत्/सीमारेषा इ. मधील वादाची प्रथा कसोशीने पाळल्याचे पाहुन अंतःकरण दुथडी भरुन वाहु लागले आहे. या करता श्री गणपा यांचे समस्त प्रथापालनशील मराठी वर्गातर्फे आभार मानतो.

या अत्यानंदाच्या प्रसंगी एक आठवण देण्याचा मोह आवरत नाही. एका अशाच प्रथापालनशील कोल्हापुरकराने (नाव घ्यावे लागेल, प्रथा आहे हो!) पुलंनी पुणेकर, नागपुरकर आणि मुंबईकरामध्ये कोल्हापुरचा सामावेश केला नाही म्हणुन जाहीरे निषेध "कोल्हापुरकर" वर (खास स्वतःच्याच शैलीत, कुठल्यातरी कोल्हापुरच्याच मासिक-फिसिकात) लिहुन केला होता. असो.

बाकी कुणी कधीही रंग उधळो इकडे शिमगा चांगलाच रंगलाय. Smile

शतकवीर योग प्रभुंचे अभिनंदन.

पुन्हा एकदा. एक अनिवासी असुन सुद्धा टोमणे मारायच्या थोर, आणि अस्सल, मराठी प्रथेचा श्री गणपा यांना विसर पडलेला नाही हे पाहुन अंतरकरणात त्सुनामी आली. श्री गणपा यांचे पुन्हा एकदा एक प्रथापालनशील मराठी मनुष्य या नात्याने आभार मानतो.

साला हल्ली मोकळ्या मनाने कुणाच अभिनंदन करायची पण सोय राहीली नाही.
असो , आमच्या शुभेच्छा देण्यात काही तरी कमी राहीली असावी.

शतकवीर योग प्रभुंचे खर्रे खुर्रे अभिनंदन. :)

(बाकी अनिवासी असलो तरी मनाने पक्का देशी/मर्‍हाठी[महाराष्ट्रीयन]/मुंबईकर) गणपा. :)

बर्‍याच मित्र-मैत्रिणींनी मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या आहेत. उखाळ्या-पाखाळ्या काढणार्‍या काही कॉमेंट्स गंमतीने घेऊ या. पण आणखी विचारप्रवर्तक प्रतिसाद जरुर यावेत.

प्रथा या कुणा एका व्यक्तीने ठरवून निर्माण केलेल्या नाहीत. समाजाची जडण-घडण होत असताना आणि निसर्गातील/हवामानातील बदलांशी समायोजन साधण्यातून काही गोष्टी रुढ होत जातात. हे जगभरच्या विविध संस्कृतींमध्ये आढळून येते. आता मूळ प्रथा हेतूने शुद्ध असली तरी पुढे त्यावर अनेक पुटे चढत जातात. हे थोडेसे तांब्याच्या भांड्यासारखे आहे. शुद्ध तांब्याचे भांडे झळाळते असते, पण वापराने त्यावर डाग पडत जातात आणि ते काळे पडत जाते. आपली चूक कुठे होत असेल तर डाग दूर करण्यापेक्षा आपण पटकन भांडेच वाईट म्हणू लागलोय.

निसर्गातील रंगांचा बहर साजरा करणारा समाज सौन्दर्यपूजक असतो. किंबहुना कोणत्याही समूहाला या अ‍ॅस्थेटिक सेन्सची अनिवार ओढ असते. वैराण वाळवंटी प्रदेशातून भारतावर आक्रमण करुन आलेल्या मुसलमान सम्राटांनी इथे स्थिर झाल्यावर शाही बागा का उभारल्या असतील? बाबरापासून ते औरंगजेबापर्यंत प्रत्येकाला काश्मीरच्या निसर्ग सौन्दर्याची भूल का पडली असेल? शिवाजी महाराजांपासून ते पेशव्यांपर्यंत प्रत्येक राज्यकर्त्याने शिकारीची जंगले, देवराया आणि शहरांत बागा उभारण्यास का महत्त्व दिले असेल? जपानमध्ये चेरीला बहर येतो त्यावेळी सर्वजण घराबाहेर पडतात आणि चेरी ब्लॉझम साजरा करतात. फार कशाला थंड युरोपीय देशांत स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिवस मिळाला तरी लोक फ्रेंच लीव्ह घेतात. ब्रह्मदेशात अगदी आपल्याप्रमाणेच रंगपंचमी (वेगळ्या नावाने) साजरी करतात. हे सर्व कशासाठी?

निसर्गातील बदलांचे सुंदर लालित्यपूर्ण चित्रण दुर्गा भागवतांच्या 'ऋतूचक्र' मध्ये वाचताना आपल्याला मानवी प्रथा आणि निसर्गातील नात्याची ओळख पटते. असो. आपल्या मुद्द्याकडे येऊया. आपल्या प्रथेत होळी वेगळी आणि रंगपंचमी वेगळी का असेल? हा सर्व काळ वसंताच्या आगमनाचा असतो. हिवाळा संपून उन्हाळा सुरु होत असतो. हिवाळ्यात पानगळ होऊन आता झाडांवर कोवळी पालवी तरारत असते. शेतात जमा झालेले पाचट जाळल्याखेरीज भूमी पुढील सृजनाला अनुकूल होत नसते. ही पाने/काटक्या जाळून थंडीच्या उरल्यासुरल्या अंशाला निरोप दिला जातो आणि आपण ग्रीष्माचा दूत वसंताच्या स्वागताला सिद्ध होतो. होळी शांत झाल्यावर दुसर्‍या दिवशी धुलिवंदनाला तिची राख पाणी टाकून स्वच्छ करतात. भूमी शिंपण करुन स्वच्छ होते आणि त्यावर रंगांचा खेळ मांडला जातो.

निसर्गही रंगांची उधळण करत असतो. सुंदर लव्हेंडर छ्टेचा जॅकारांडा, पिवळ्या धम्मक रंगाचा बहावा, शेंदरी पळस, लालभडक गुलमोहर आणि हिरव्या-पोपटी पान-पालवीने मोहरलेली आंब्यासारखी झाडे. निसर्गाच्या या उधळणीला माणसांनी दिलेला प्रतिसाद म्हणजे रंगपंचमी.

प्रतिसाद फार लांबतोय. थोडक्यात सांगायचे तर केरकचरा लोटून शेणसडा टाकेपर्यंत होळी आणि मग त्यावर रेखाटलेली सुंदर रांगोळी म्हणजे रंगपंचमी. :)

प्रतिसादही दिला तर लेखाच्या ताकदीचा....
माण्गये...

पांथस्थ's picture

23 Mar 2011 - 7:13 pm | पांथस्थ

लय भारी.

रेवती's picture

22 Mar 2011 - 6:33 pm | रेवती

कित्ती हे प्रतिसाद!;)

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2011 - 10:54 pm | अप्पा जोगळेकर

त्यावर तिचे आई-वडील म्हणाले, 'अहो करु द्या तिला. आमच्या समाजात अशीच प्रथा आहे.'
हुंडा घेणे, खालच्या जातीच्या माणसाला हाड्तुड करणे, एकाच स्त्रीचा अनेक पुरुषांनी (यापैकी अनेक जण एकमेकांचे भाऊ, बाप असतात. संदर्भ - मातॄभूमी, आक्रोश इत्यादी चित्रपट) उपभोग घेणे अशा असंख्य प्रथा उत्तर भारतीय समाजात अतिशय बलवान आहेत. जर तुलनाच करायची झाली तर मराठी समाज त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त पुरोगामी आहे असे म्हणावे लागेल. या लवचिक मानसिकतेमुळेच आपण आपल्या प्रथा हट्टाने चालवण्यापेक्षा त्यांना मुरड घातली तर ते चांगलेच आहे. कोणताही समाज आधुनिक होत असताना जुन्या प्रथा, परंपरा उध्वस्त करत करतच पुढे सरकत असतो. यात वावगे ते काय आहे?

पण हेही खरे की कारण नसताना अनाठायी खर्च करत गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी करत सुटणे, जे चालत जाण्याजोगे अंतर आहे तिथे उगाचच दुचाकी पळवत जाणे, ताटामध्ये भरमसाट अन्न घेउन ते वाया घालवणे, उठल्या सुठल्या हॉतेलात जेवण्यासाठी धावत सुटणे, रस्त्यात भेटल्यावर उगाचच किंचाळ्या मारत हाय-हेल्लो करणे अशा अनेक आचरट अमेरिकन प्रथा हल्ली रुढ होत चालल्या आहेत.

मराठी संस्थळांवरील धाग्यांवर इंग्रजी भाषेतील मोठ मोठे उतारे कॉपी-पेस्ट करणे हीसुद्धा एक प्रथा आहे.

हां आणि नमस्कार करण्याच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही गाडगेबाबांचा सल्ला मानतो. कोणालाच नमस्कार करत नाही. गाडगेबाबा हे मराठीच असल्यामुळे नमस्कार न करणे ही मराठीच प्रथा आहे नाही का ?

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2011 - 11:00 pm | अप्पा जोगळेकर

या धाग्यापासून स्फूर्ती घेउन मी उद्यापासून पैरण्,पैजमा आणि गांधी टोपी अशा वेशात ऑफिसला जायच्या बेतात आहे. आमच्या भैय्या साहेबाने विचारलं तर सरळ श्री. योगप्रभू यांच्या लेखाची प्रिंट देणार त्याला.

विकास's picture

22 Mar 2011 - 11:12 pm | विकास

मी उद्यापासून पैरण्,पैजमा आणि गांधी टोपी अशा वेशात ऑफिसला जायच्या बेतात आहे.

पण गांधी टोपी मराठी कशी?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

23 Mar 2011 - 10:33 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण गांधी टोपी मराठी कशी?

वर्धा महाराष्ट्रात आहे असा बादरायण डोमिसाईल संबंध लावून! ;-)

वपाडाव's picture

23 Mar 2011 - 11:00 am | वपाडाव

गांधी टोपी
त्यांना कदाचित दाको (दादा कोंडके)टोपी म्हणायचे असेल पण त्वेषाच्या भरात त्यांना आठवले नसावे....

अप्पा जोगळेकर's picture

23 Mar 2011 - 8:52 pm | अप्पा जोगळेकर

त्यांना कदाचित दाको (दादा कोंडके)टोपी म्हणायचे असेल
हां. तेच ते काय ते.

चिप्लुन्कर's picture

26 Mar 2011 - 12:32 pm | चिप्लुन्कर

आमच्या कडे सुद्धा रंगपंचमीलाच रंग खेळण्याची पद्धत आहे. ( मुंबई ची होळी म्हणजे भैय्ये आणि मराठी भैय्ये यांची) .
मी होळी आणि असे आपले महत्वाचे सण गावाला जाऊन साजरे करण्यात आनंद मानतो
---------
आमच्याकडे होळी लागली कि पुढील षष्ठी पर्यंत ग्रामदेवतेचा शिमगा होतो.
पंचमी पर्यंत देव गावच्या चारी सीमांना जाऊन सर्व गावकर्यांची गार्हाणी ऐकतो.
पंचमीला देवाचा पुजारी सकाळी देवास रंग लावतो आणि मग गावातून दुपारी रंगपंचमी सुरु होते .
आणि सर्व गावकरी खेळी मेळी ने रंगपंचमी खेळतात. मुंबई सारखे १५व्या मजल्यावर राहून पिशवीत घाणेरडे पाणी भरून मुलीना तसेच येणाऱ्या जाणार्या लोकांना फेकून मारणे ( तेही होळीच्या १-२ दिवस आधीपासूनच) हि पद्धत नाही.
आमच्या गावाकडे जर असा कोण फालतूपणा करताना मिळाला तर त्याला पोकळ आणि भरीव बांबूने पार्श्व भागावर फटके मारून हाकलून देण्याची पद्धत आहे.
पंचमी नंतर षष्ठीला चव्हाटा (येथे देवाला गावच्या रक्षणा बद्दल गावकर्यान कडून गार्हाणी घातली जातात ) भरला कि देव परत देवळात परत येतो .
आणि मग शिमगा संपतो .
-----------------------------
जाच्या मनात कपट, त्याला ब्वा भैरी ब्वा धोपट .