आपल्या प्रथा आपण कशासाठी विसरायच्या?

योगप्रभू's picture
योगप्रभू in जनातलं, मनातलं
21 Mar 2011 - 5:20 pm

परवा होळी झाली आणि काल धुळवड. रस्त्यावर सगळेजण रंग खेळत होते. दिवसभर प्रसारमाध्यमांनी 'होली है' टाईप बातम्यांचा आणि नाचगाण्यांचा मारा चालवला होता. आम्ही राहतो तिथेही शेजारच्या इमारतीमधील मराठी लोक मस्त रंग खेळत होते. एकाने विचारले, 'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. ' त्यावर त्याने माझ्याकडे 'काय मूर्ख आहे?' अशा नजरेने पाहिले आणि विचारले, 'रंगपंचमीला काही सुटी नाही. कोण येणार तुमच्याशी रंग खेळायला?' मीपण लगेच उत्तरलो, ' मुलांच्या शाळेला सुटी आहे. कुणी नाही आले तर आम्ही वेळ मिळाल्यावर घरातच खेळू, पण मराठी प्रथा मोडणार नाही.'

मला खरंच नवल वाटते. एकीकडे आपणच आपल्या प्रथा मोडायच्या आणि पुन्हा मराठी संस्कृती कशी आक्रमणाच्या विळख्यात सापडलीय त्याचे गळे काढायचे. होळीलाच रंग खेळण्याची उत्तरेची प्रथा आपण स्वीकारलीय, पण होळी पेटवल्यावर संध्याकाळी त्यात पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची, होळीभोवती तांब्याभर पाण्याचे रिंगण घालत प्रदक्षिणा घालण्याची आणि होलिका राक्षशिणीच्या नावाने बोंब मारण्याची प्रथा अन्य समाजांतील लोकांनी स्वीकारलीय का? असल्यास माझ्या पाहण्यात नाही. मग प्रत्येक समाज आपल्या प्रथा जतन करत असताना आपणच का आपल्या प्रथा मोडतोय?

आणखी एका अनुभवामुळे मी विचारमग्न झालोय. नुकत्याच दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या. आम्ही काय करतो, की आसपासच्या/नात्यातील परीक्षार्थींना घरी जाऊन शुभेच्छा आणि एक पेनसेट देतो. मुलांच्या पाठीवर आश्वासक हात ठेवणे, एवढाच हेतू. तर या खेपेस जवळच राहणार्‍या दोन कन्यांना शुभेच्छा द्यायला गेलो. पहिले घर मराठी. मुलगी हाय-फाय शाळेत शिकणारी. तिने 'थँक्स' म्हटले. आई-वडिलांनी ती कसा जोरात अभ्यास करतीय सांगितले. नंतर दुसर्‍या घरी गेलो. हे कुटूंब परराज्यातून येथे स्थाईक झाले आहे. त्यांच्या मुलीने मला आणि पत्नीला पायावर डोके ठेऊन नमस्कार केला. मी फार ओशाळलो. तिला म्हटले, 'ताई! असा नमस्कार आमच्यात आजी-आजोबांना करतात. इतर मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करायचा असतो.' त्यावर तिचे आई-वडील म्हणाले, 'अहो करु द्या तिला. आमच्या समाजात अशीच प्रथा आहे.' येताना मी पत्नीला म्हटले, 'बघ. आपला समाज कसा लवकर प्रथा विसरतोय ते.' त्यावर ती म्हणाली, 'अरे आताच्या तरुण मुलामुलींना वाकून पाया पडणे, विवाहाआधी दाखवण्याचा कार्यक्रम या गोष्टी रुचत नाहीत. तो काळ मागे पडलाय.'

खरंच तो काळ मागे पडलाय? की मराठी समाज नको इतका पुढे गेलाय?

संस्कृतीसमाजलेख

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 5:32 pm | धमाल मुलगा

१. अर्ध्या हळकुंडात पिवळे होणे.
२.'घर की मुर्गी दाल बराबर' (किंवा ज्याला म्हणीचा योग्य अर्थ पटत/कळत असेल त्यानं सुंदर बायको दुसर्‍याचीची ही म्हण ह्या जागी वाचली तरी चपखल असेल.)

आपल्या प्रथा पाळताना मराठी माणसांना लाज वाटते. होय, बरोबर वाचलंत, लाज वाटते. 'श्शी:! काय ते जुन्नाटपणा करायचा' वगैरे वाटते. आपल्यातल्याच चार-चौघांपेक्षा निराळं करुन 'मी कसा शाणा.' हे मिरवायला जास्त आवडते.

मला अचानक एक आठवण झाली, हा मराठी-अमराठी वाद प्रसिध्द झाला नव्हता तेव्हाची गोष्ट. एका संक्रातीला मित्राकडे तीळगुळ घ्यायला गेलो आणि हातात लाडू असल्यानं काकूंना एका हातानं (फिल्लमी ष्टाईलीत ) नमस्कार करायला लागलो, तेव्हा काकूंनी कान पकडून 'हा सिनेमा नाहीए, नीट नमस्कार करायला पुन्हा शिकवायला हवं का रे' असं विचारलं होतं. त्यानंतर आजतागायत कुणाला एका हातानं नमस्कार करणं घडलं नाही.

म्हणलं तर तुमचा प्रश्न फार साधा आहे, म्हणलं तर खूपच खोलवर विचार करण्यासारखा. इथं सांस्कृतिक आक्रमण नाहीए, अतिक्रमण आहे. अगदी पध्दतशीर हळूहळू भिनवलेलं.

बाकी, रंग खेळण्याबाबतच्या विचित्र नजरांची चिंता नको. आम्हीही त्याचे धनी आहोतच. :)
तुम्ही सभ्य भाषेत सांगता, आम्ही आमच्या भाषेत. अति आग्रह करायला लागलाच कोणी तर सरळ सांगतो, "पंचमीला या. तेव्हा रंग खेळू..आम्हाला यु.पी. बिहार्‍यांनी जन्माला घातलेलं नाही.' आपण फटकळ म्हणवले जातो, पण परत लोक नादी लागत नाहीत. :)

मराठमोळा's picture

22 Mar 2011 - 11:00 pm | मराठमोळा

+++++++++++१
१००% सहमत.. असे बरेच अनुभव आहेत, प्रथा सोडाच, मराठी बोलायची लाज वाटते आजकाल काही लोकांना.
जाऊ द्या, उद्या आपण धर्मपरिवर्तन करणार नाही याची काय गॅरंटी?

अमोल केळकर's picture

21 Mar 2011 - 5:40 pm | अमोल केळकर

छान धागा
अजुनही धुळवडीला रंगपंचमी खेळायची हे रुचत नाही

( मुंबईकर ) अमोल

पंगा's picture

21 Mar 2011 - 5:43 pm | पंगा

'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे.

विदर्भात* (आणि नक्की खात्री नाही, पण बहुधा मुंबईलासुद्धा**) होळीलाच रंग खेळला जातो असे वाटते. आणि हे मराठी-अमराठी वाद पेटण्याच्या कित्येक वर्षे आधीपासून. (चूभूद्याघ्या.)

*संदर्भ: कोणे एके काळचे नागपूरकर (मराठीभाषक) हॉस्टेलमित्र.
**संदर्भ: कोणे एके काळचे मुंबईकर (मराठीभाषक) हॉस्टेलमित्र.

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 5:55 pm | धमाल मुलगा

नागपूर (पर्यायाने विदर्भ)ची कल्पना नाही.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण इत्यादी ठिकाणी होळीपौर्णिमेनंतर येणार्‍या पंचमीला रंग खेळतात.
मराठी दिनदर्शिकांमध्येही ह्या पंचमीचा उल्लेख 'रंगपंचमी' असा केलेला असतो.
बहुतांश शाळांना (मराठी शाळांना तर १०१%) ह्यादिवशी सुट्टी असते.
ज्यांच्या रंगपंचमीच्या अलिकडे पलिकडे परिक्षा असतात त्यांचे कपडे शाईनं हमखास रंगलेले असतात आणि पंचमीदिवशी रंग खेळताना येणार्‍या पेपराची धाकधुक छळत असते.

धुळवड ह्या नावातच धुळ आहे, रंग नव्हे. ह्या दिवशी आदल्या दिवशीच्या होळीतली राख आणि माती ह्यांचं मिश्रण एकमेकांना लावलं जातं. (सध्या ह्यामागचं कारण्/अख्यायिका आत्ता आठवत नाही.)

कोकणात ग्रामदैवताची पालखी रंगपंचमीदिवशी गावातून वाजत गाजत फिरवण्याची प्रथा आहे असं आठवतं. त्या पालखीच्या मार्गावर रंग शिंपतात. आणि त्यानंतर रंग खेळला जातो असेही आठवते. (कोकणाबद्दलच्या रंगपंचमीसंदर्भात जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. कदाचित माझे संदर्भ थोडेसे चुकत असावेत असं वाटतंय.)

पंगा's picture

21 Mar 2011 - 6:08 pm | पंगा

...रंगपंचमीला रंग खेळणे (पर्यायाने, होळीला रंग न खेळणे) ही प्रथा महाराष्ट्रात, 'मराठी समाजात' सार्वत्रिक नसावी, आणि याचा यूपी-बिहार्‍यांच्या सांस्कृतिक अतिक्रमणाशी निश्चित असा अन्योन्यसंबंध असावाच, असेही नाही, एवढेच दाखवून द्यायचे होते.

बाकी, कोणी कधी रंग खेळावेत हा ज्याचात्याचा/जिचातिचा सांस्कृतिक प्रश्न असल्यामुळे, चालू द्या.

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 6:32 pm | धमाल मुलगा

आमचा मुद्दा इतकाच, की काही फरक असला तरी हे लोण मोठ्या प्रमाणावर पसरवण्यात हातभार वैदर्भिय जनतेचा नाही. ती जनता पुर्वीही इथे तिथे विखरुन होतीच.
उत्तरभारतीयांचे झुंडीनं झालेलं अतिक्रमण आणि त्यांसोबत त्यांनी आणलेल्या प्रथा ह्यामध्ये हे लोण पसरलं गेलं असा आहे.

(आणखी काही वर्षांनी सामुहिक छट पूजा पाहून मराठी घरांघरांमध्येही छटपूजेचे प्रकार चालले तरी नवल नाही.)

तुम्हाला भारी पुळका ह्या युपी बिहार वाल्यांचा !!

सहज's picture

22 Mar 2011 - 5:34 am | सहज

आणि तुम्हाला तुमच्या भावंडांचा* पुळका येत नाही का?

*- संदर्भ, आपली प्रतिज्ञा = सारे भारतीय माझे भाई बांधव आहेत.

शिल्पा ब's picture

22 Mar 2011 - 7:28 am | शिल्पा ब

आपण पंगा यांचे बंधु आहात हे कळविल्याबद्द्ल धन्यवाद.

सहज's picture

22 Mar 2011 - 7:32 am | सहज

पण ताई तुम्ही पंगाभाऊचा, भैय्यांवरुन राग राग का करत आहात?

आणी वरच्या प्रश्नाला बगल?

शिल्पा ब's picture

22 Mar 2011 - 8:24 am | शिल्पा ब

अय्या गडे!!! मी कुठे कोणाचा राग राग करतेय? काहीतरीच बै!!

पंगा's picture

22 Mar 2011 - 9:23 am | पंगा

मी भय्यांबद्दल काही तरी बोललो?

विदर्भातले मराठी बांधव दीर्घ काळापासून होळीच्या दिवशी रंग खेळतात अशी माझी मराठीभाषक नागपुरी हॉस्टेलमित्रांकडून (१९८०च्या दशकात) मिळालेली ऐकीव माहिती आहे. तसेच माझ्या मराठीभाषक मुंबईकर हॉस्टेलमित्रांकडून त्याच काळात 'ते रंगपंचमीला रंग खेळणे वगैरे तुम्ही मागासलेले पुणेकर करत असाल - आमच्याकडे नेहमी होळीलाच रंग खेळतात' असेही वाक्य ऐकलेले आहे.

(हे माझे मुंबईकर मराठीभाषक हॉस्टेलमित्र मुंबईतल्या - निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी - मराठीबहुल भागातले. कदाचित त्यांचे म्हणणे खरे असेल, किंवा कदाचित त्यांच्या(च) भागात तशी प्रथा असेल, किंवा कदाचित ते ढाकाही लावत असतील. मला माहीत नाही. मी जे ऐकले ते सांगितले, आणि 'आपल्या मराठी माणसां'बद्दलच सांगितले, भय्यांबद्दल नव्हे.)

१९८०च्या दशकात - १९८४-१९८५च्या सुमारास - मुंबईत भय्यांच्या अतिक्रमणाबाबत ओरड माझ्या आठवणीप्रमाणे तरी सुरू झालेली नव्हती. नक्की आठवत नाही, पण मुंबईत तो जमाना बहुधा मद्राशी आणि मुसलमान यांच्या नावाने शंख करण्याचा होता, भय्यांच्या नावाने नव्हे. भय्यांच्या नावाने शंख करण्याची प्रथा बर्‍याच नंतर रूढ झाली. (आणि, इन स्टार्क काँट्रास्ट टू द प्रेझेंट सिच्युएशन, 'सुंदर मुंबई मराठी मुंबई' वगैरे प्रकार तेव्हा सुरू जरी झालेले असले, तरी अनेक मराठीभाषक मुंबईकर 'आमची बाँबे* कशी कॉस्मोपॉलिटन आहे' (थोडक्यात, 'तुमच्या xxxसारखी घाटी नव्हे') हे कुठल्याही बिगरमुंबईकरावर अभिमानाने ठसवण्यात धन्यता मानत असत, असेही आठवते. नंतर काळ बदलला, विचारही बदलले.

* (हो 'बाँबे'च! 'मुंबई' नव्हे. 'बाँबे' म्हटले की अनेक मराठीभाषकांनासुद्धा - विशेषतः तरुणांना - तेव्हा 'पॉश', 'कॉस्मोपॉलिटन' वगैरे वाटे. 'मुंबई'ला तेव्हा एका प्रकारची 'देशी'पणाची छटा होती.)

असो. तर सांगायचा मुद्दा, मी भय्यांच्या होळीबद्दल काहीही बोललेलो नाही. जे काही बोललो आहे ते केवळ वेगवेगळ्या भागांतल्या मराठी बांधवांबद्दलच बोललेलो आहे. तेव्हा बाकी चालू द्या.

शिल्पा ब's picture

22 Mar 2011 - 9:42 am | शिल्पा ब

अहो तुम्ही का उगाच चिडताय एवढं?

<<<मी भय्यांबद्दल काही तरी बोललो? नाही...माझी चुक झाली..खुश?

तुमच्यासारख्यांनी अशा गोष्टी मनाला लाउन घेतल्या तर इतरांनी धागेच काढले पाहीजेत ;)

पंगा's picture

22 Mar 2011 - 9:55 am | पंगा

.

मी ऋचा's picture

22 Mar 2011 - 11:55 am | मी ऋचा

>>विदर्भातले मराठी बांधव दीर्घ काळापासून होळीच्या दिवशी रंग खेळतात

अगदी बरोबर. आम्च्या शाळेला सुटीपण धुळवडीची असायची. रंगपंचमीला सुटी असणे हे मी इथेच प्रथम ऐकते आहे..यात उत्तर भारतीयांचा काही संबंध असेल असे वाटत नाही. धूळवडीलाच आमच्याकडे रंगपंचमी म्हणतात काही लोक. मात्र होळी नंतरच्या पंचमीला ( इथे जी रंग पंचमी म्हणताय तिला) आम्ही देवाला गुलाल वाहातो..

पैसा's picture

21 Mar 2011 - 8:03 pm | पैसा

होळीच्या दिवशी कोकणात "फाका घालणे" अर्थात एकामेकांच्या नावाने बोंबाबोंब करणे ही जशी प्रथा आहे, तशीच मनातली सगळी जळमटं, धुळीच्या रूपाने एकामेकांना लावणे ही पण एक प्रथा आहे. मनातली सगळी घाण अशी बाहेर निघून गेली, की मग रंगपंचमीला एकामेकाना रंग लावायचा, आणि मनातल्या आणि बाह्य घाणीची जागा रंगांनी भरून काढायची हे या प्रथेचं कारण असावं.

विदर्भातली पद्धत माहिती नाही. पण कोकणात होळीपौर्णिमेच्या दिवशी पालखी होळीच्या मैदानात (मांडावर) ठेवलेली असते, ती दुसर्‍या दिवशी लोकांच्या घरोघरी जायला सुरुवात होते. प्रत्येक गावातली पालखी कोणत्या दिवशी 'घरं घ्यायला' सुरुवात करणार, हे ठरलेलं असतं. सगळ्या गावच्या पालख्या एकाच दिवशी बाहेर पडत नाहीत. काही गावात दुसर्‍या गावातले देव पालखीतून भेट द्यायला येतात आणि पालख्या नाचवणे वगैरे जोरदार कार्यक्रम असतो!

गोव्यातला शिमगा आणखीच वेगळा असतो. इथे प्रत्येक गावचा शिमगा म्हणजे मिरवणूक आणि रंग खेळण्याचा दिवस ठरलेला असतो. म्हार्दोळचा शिमगा सगळ्यात आधी असतो, तर फोंडा आणि पणजीला प्रतिपदेला. (प्रत्येक गावाने असा वेगवेगळा दिवस ठरवायचं कारण मात्र मला माहिती नाही. त्याचा उगम कदाचित पोर्तुगीजानी घातलेल्या निर्बंधांमधे असावा.) त्या दिवशी सकाळपासून दुपारी ४ पर्यंत रंग खेळला जातो. नंतर गावच्या मुख्य रस्त्यावरून रोमटामेळ, चित्ररथ, सोंगं वगैरेंची मिरवणूक असते आणि ती बघायला लोक गर्दी करतात.

श्रावण मोडक's picture

21 Mar 2011 - 9:24 pm | श्रावण मोडक

इथे प्रत्येक गावचा शिमगा म्हणजे मिरवणूक आणि रंग खेळण्याचा दिवस ठरलेला असतो. म्हार्दोळचा शिमगा सगळ्यात आधी असतो, तर फोंडा आणि पणजीला प्रतिपदेला.

असाच अनुभव मी सातपुड्यातील आदिवासी समुदायांमध्ये घेतला आहे. गावोगावची होळी वेगळ्या दिवशी असते. एकूण पाच दिवसांमध्ये ही होळी ठरत जाते. त्यात पुन्हा मानाची गावे असतात. तिथल्या होळीला पंचक्रोशी गेलीच पाहिजे असेही चित्र असते. अर्थात, या नियोजनात तिथी वगैरे असते किंवा नाही हे मात्र आत्ता मला सांगता येणार नाही.

नन्दादीप's picture

22 Mar 2011 - 12:44 pm | नन्दादीप

कोकणच्या शिमग्याबद्दल +१.

बाकीच्यांच माहीत नाही...

प्रीत-मोहर's picture

22 Mar 2011 - 1:58 pm | प्रीत-मोहर

आम्च्या मामाकडे पंचमीला तर आम्च्या गावात सप्तमीला रंग उधळुन एकमेकांना रंगवतात .... या दिवसाला न्हावणाचो दिस अस म्हण्टल जात

नन्दादीप's picture

22 Mar 2011 - 12:39 pm | नन्दादीप

>>>>>कोकणात ग्रामदैवताची पालखी रंगपंचमीदिवशी गावातून वाजत गाजत फिरवण्याची प्रथा आहे असं आठवतं. त्या पालखीच्या मार्गावर रंग शिंपतात. आणि त्यानंतर रंग खेळला जातो असेही आठवते. (कोकणाबद्दलच्या रंगपंचमीसंदर्भात जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. कदाचित माझे संदर्भ थोडेसे चुकत असावेत असं वाटतंय.)>>>>

त्यालाच "शिंपणे" असेही म्हणतात. या शिंपण्याच्या कलर लर भारी असतो ब्वॉ....साला लहान असताना षष्ठी पासून एकादशी पर्यंत शाळेत, घरी सगळीकडून मार खायचो. दगडाने पण घासून जात नसे. त्यात म्हणे काजूच्या बोंडाचा रस असतो, त्यामुळे रंग पक्का होतो...!!!

sagarparadkar's picture

21 Mar 2011 - 5:51 pm | sagarparadkar

योगप्रभुंशी पूर्णपणे सहमत ...

हाच अनुभव काल मलापण आला. आमचे शेजारी मुंबईकर (आला आला तोच तो चिरंतन वाद पुन्हा डोकं वर काढून आलाच) मराठी भाषिक, पण ते सकाळीच नैसर्गिक रंग घेवून रंग खेळायला आले होते. म्हणून आम्ही फक्त 'औपचारिकता' म्हणून एकमेकांच्या कपाळाला रंग लावून शुभेच्छा दिल्या व चहापान केले :) आमच्या छोट्याशा मुली काल पण रंग खेळल्या आणि रंगपंचमीला पण खेळतील .... त्यांची ड्ब्बल मज्जा :)

मला वाटते हिंदी चित्रपट सृष्टीत आणि मालिकांमधे होळी आणि रंग खेळणे ह्याची जी अभेद्य सांगड घातली गेली आहे त्याचा हा परिणाम असावा.

चला या वर्षी मिपाची रंगपंचमी कशी साजरी करायची ते सांगा बरं, बाकी या सणात मजा भारी आहे बाबा.

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 6:01 pm | धमाल मुलगा

मला हा सण एकाच कारणासाठी आवडत नाही हल्ली...
नेमका सुट्टी नसलेल्या दिवशी येतो. :(

सूर्यपुत्र's picture

21 Mar 2011 - 6:28 pm | सूर्यपुत्र

फक्त रंग उधळण्यासाठी/दाखवण्यासाठी रंगपंचमीची आणि चिखलफेकीसाठी धुळवडीच्या दिवसांची वाट पहाणे मिपावर शक्य नसावे... ;)
अशी मजा वर्षभर या ना त्या निमित्ताने चालूच असते की... ;)

-सूर्यपुत्र.

कच्ची कैरी's picture

21 Mar 2011 - 6:12 pm | कच्ची कैरी

आम्ही लहाणपणी रंगपंचमीच्या दिवशीच रंगांनी खेळायचो पण मोठे झाल्यावर बिघडलो ,आता तुम्ही आठवण करुन दिलीत तेव्हा पुन्हा रंगपंचमीला रंग उधळु :)
पण मला वाटत ग्रामीण भागात अजुनही सर्व प्रथा नेटाने पाळल्या जातात .

वसईचे किल्लेदार's picture

21 Mar 2011 - 11:31 pm | वसईचे किल्लेदार

हो आमच्या गावात (वज्रेश्वरीला) आज देखील नाना सोगे काढतात. रात्री नाटक सुध्धा असते.
आवतान दिले तर येणार काय?

प्रदीप's picture

21 Mar 2011 - 6:35 pm | प्रदीप

संपूर्ण सहमत.

मलाही नाही आवडत धुळवडीला रंग खेळणं!
धुळवडीला होळीची राखच फासतात.
आमच्या इथे कुठलासा हॉल भाड्याने घेउन लोक मागल्यावर्षी 'होली' खेळले असल्याचे ऐकले. नंतर साफसफाईला बराच खर्च येणार असल्याने कार्यक्रमाचे तिकिट जरा जास्तच होते म्हणून माझ्या दोन मैत्रिणी बाथटबमध्ये रंगपंचमी खेळल्या असे समजले.

माझीही शॅम्पेन's picture

21 Mar 2011 - 7:30 pm | माझीही शॅम्पेन

लेख छान आहे पण .... प्रत्येक गोष्टीची व्यवहरर्यता तपासून बघीवी लागेल पण ह्या लेखाच्या निमित्ताने धूळवाड आणि रंग पंचमी पूर्णपणे वेगळ्या आहेत हे कळल ..

म्हणून माझ्या दोन मैत्रिणी बाथटबमध्ये रंगपंचमी खेळल्या असे समजले

भलताच रोचक .....काय दिवस आलेत !!! (क्रु. ह घ्या)

दिवा-स्वप्न पाहणारी

वपाडाव's picture

22 Mar 2011 - 10:24 am | वपाडाव

अगदी असंच...
कारण लहानपणापासुन नित्य नेमाने धुळवडीला रंग खेळत आलोय. (अज्ञानी म्हणाल्यास हरकत नाही)
बाजुच्या शहरात(का खेड्यात हा वाद गौण ?) {लातुर} पंचमीला रंग खेळायचे असे ऐकुन होतो. पण सुट्टी नसायची त्या दिशी म्हणुन मग कधी जाउन पाहिले नाही. अन्यथा त्याचाही उपभोग घेतलाच असता.
- मज्जा म्हणुन रंग खेळणारा.

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2011 - 6:55 pm | नगरीनिरंजन

मनातला मुद्दा! पण हे 'होळी खेळण्याचा' प्रकार मी फक्त पुण्या-मुंबईत पाहिला. मुंबैत भैय्यांमुळे आणि पुण्यात परप्रांतीय विद्यार्थ्यांमुळे हा प्रकार चालू झाला असावा. इतर गावांतही हे लोण पसरण्याआधीच याला आळा घालणे आवश्यक आहे.

हिंदी सिनेमामुळे हा प्रकार रुढ झाला असावा असा विचार कुणाच्याच डोक्यात येउ नये!!

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2011 - 7:19 pm | नगरीनिरंजन

हिंदी सिनेमामुळे करवा चौथ का नाही रूढ झाला बरे?

तसंच विचारायचं तर मग त्या लोंढ्यांमुळे करवाचौथ का बरं रूढ नाही झाला?

नगरीनिरंजन's picture

21 Mar 2011 - 7:27 pm | नगरीनिरंजन

कारण करवा चौथ सार्वजनिक नाही.

मग तेच कारण सिनेमामुळे करवाचौथ रूढ न होण्याला असु शकेल.

रमताराम's picture

22 Mar 2011 - 1:25 pm | रमताराम

करवा चौथला बरेच विरोध आहेत कारण हा सण पातिव्रत्याच्या कल्पनेशी निगडित आहे.

एक म्हणजे पातिव्रत्य ही कल्पना कालबाह्य ठरली आहे. (हेल्मेट... हेल्मेट द्या आधी माझे) स्त्रियांचा आक्षेप हा की असले बंधन हे फक्त स्त्रियांनाच काय म्हणून, 'पत्निव्रत्य' (चुकून व्रात्य लिहिले होते) नावाचे बंधन पुरूषांना काही? पुरूषांचा पातिव्रत्याला विरोध नाही, पण ते फक्त 'आपल्या पत्नीपुरते' मर्यादित असावे असे वाटते. (आता वर्तुळाच्या न्यायाने कोणत्याच स्त्रीसाठी नको असा अंतिम तर्क निघतो). तस्मात् कोणालाच नकोसे असलेल्या तत्त्वाशी निगडित असलेल्या या सणाचे अस्तित्व अखेर हिंदी चित्रपटापुरते राहील (वाघ जसे फक्त डिस्कवरी वा नॅशनल जिओग्रफिक च्या डाकुमेंट्रीत राहिले आहेत तसेच. बघा म्हणजे हिंदी चित्रपट संस्कृतीरक्षकाची भूमिका बजावतात नि म्हातारे उगाचच ' संस्कृतीहीन... संस्कृतीहीन' म्हणून त्यांना दूषणे देत असतात.) असे आमचे - कोणतीही कुंडली, नाडीपट्टी, हस्तरेखा वगैरे न पाहता - केलेले भविष्य आहे. (तसेही भविष्य हे खरे होण्यासाठी थोडेच वर्तवायचे असते... दाम पडले खिशात, भविष्य पहा ढगात.)

Nile's picture

22 Mar 2011 - 2:18 pm | Nile

स्त्रियांचा आक्षेप हा की असले बंधन हे फक्त स्त्रियांनाच काय म्हणून, 'पत्निव्रत्य' (चुकून व्रात्य लिहिले होते) नावाचे बंधन पुरूषांना काही?

काय सांगता!! म्हणजे "धनी माझा देवासमान" ह्या थोर मराठी प्रथेचा र्‍हास होउन राह्यला आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला रराआजोबा? याविषयी कोणी बोलत कसे नाही? रराआजोबांना इनंती आहे की त्यांनी इथे प्रकाश पाडावा. (लिहताय काय नविन लेख यावर.. शतकाचं भाकित आम्ही करतो ;-) )

रमताराम's picture

22 Mar 2011 - 11:06 pm | रमताराम

या विषयावर आमचे स्वतःचे काहीच म्हणणे नाही. ('बाजरीवरील कीड' याविषयात आम्हाला जेवढा रस नि गति आहे तेवढीच याही विषयात.) आम्ही आपले एक निरीक्षण नोंदवले.

(शतकी धागा ठेव तुझ्यापाशीच, त्या मोहापायी हातपाय मोडून घ्यायचे की काय या वयात.)

ओ ननि, करवाचौथ निदान फ्याशन म्हणून तरी करून बघू असे म्हणणार्‍या माझ्यासारख्या बर्‍याच दिसल्या.;)
पहाटेपासून उपास करून, रात्री चंद्राला चाळणीतून पाहून झाले की नवर्‍याच्या हातून पाणी पिऊन उपास सोडायचा.
मी पहाटे पहाटे भरपूर जेवण करून घेतले.;)
रात्री जेवणात द्विदल धान्ये, उदा. कडधान्ये तीही स्प्लिट न केलेली.
चंद्र दिसायला उशीर होत होता म्हणून एकीने परराज्यात फोन करून "तुमच्याकडे दिसतोय कागं चंद्र? दिसत असला तरी आम्ही जेवण सुरु करू" असे म्हटले होते.;)
दुसर्‍या दिवशी आईला फोन करून फुशारकी मारली तर मलाच रागावली. "हरताळका नका करू.......तो उपास चालत नाही आणि कुणाचं तरी काहितरी करत बसता ते चालतं वाट्टं?" अशी बोलणी बसल्यानं पुन्हा मी करवाचौथ आणि हरताळकेचा उपास नाही केला.
हां , पण तुम्ही म्हणता तशी करवाचौथ रूढ नाही झाली. यावर्षी करवाचौथ किती बायकांनी करायची ते ठरवणारे दिग्दर्शक वेगळे असतात हो! मागल्या वर्षीचा आढावा घेउन ते शिनेमात तसा एखादा प्रसंग घालतात........लग्गेच पुढच्यावर्षी सणवार साजरे करणार्‍यांची संख्या वाढते.;)

प्रदीप's picture

21 Mar 2011 - 7:34 pm | प्रदीप

हिंदी सिनेमात पूर्वापार होळी खेळणे, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत रहात असलेल्या आईने, थकून भागून घरी परतेलल्या मुलासाठी 'गाजर का हलवा' बनवणे, मुलाने वेळीप्रसंगी आईला मिठी मारणे, असे अनेक प्रकार होत आले आहेत. माझ्या माहितीत तरी मराठी समाजाने त्यातील अनेक प्रकार अंगिकारले नाहीत, व होळी खेळणे हेही अलिकडेच सुरू केले आहे. 'होली आयी रे, आयी रे, रंग भर दे, सुना दे जरा बाँसूरी' हे 'मदर इंडिया'तील गीत,माझ्या आठवणीतले हिंदी चित्रपटातील पहिले होळी-गीत (१९५७). गाण्यांवर चित्रपट चालायचे त्या काळांत ह्या गाण्याच्या यशामुळे असल्या गाण्यांची प्रथाच मग निर्माण झाली.

मुंबईत पूर्वी होळी बर्‍यापैकी पारंपारीक पद्धतिने (योगप्रभूंनी वर्णिल्याप्रमाणे) साजरी केली जायची. मग ऐशीच्या दशकापासून ते सगळे बदलू लागले.

आम्ही सुद्धा, शाळेत असताना रंग रंगपंचमीलाच खेळत असु. होळीला रंग खेळतात हे मला तरी वर्तमानपत्रांमध्ये नट-नट्यांचे होळीला रंग खेळण्याचे फोटो पाहुनच कळाले. त्यावरुन मी तो तर्क बांधतो आहे. नसुही शकेल.

पण त्याविरुद्ध स्थानिक लोकसंख्येच्या काही टक्के येण्यार्‍या लोकांचा प्रभाव हिंदी नट नट्यांच्या वागण्यापेक्षा जास्त असेल हे अधिक असंभाव्य वाटते.

Nile's picture

21 Mar 2011 - 7:35 pm | Nile

मला तरी काय प्रॉब्लेम आहे कळले नाही.

ही प्रथा मोडण्याने काय होत आहे?

मुळात रंगपंचमीचा उद्देश काय आहे? जर तो आप्तजनांनी एकत्र येउन रंग खेळणे, आनंद लुटणे हा असेल तर तुम्ही फक्त तुमच्या कुटुंबात रंग खेळुन तो आनंद मिळवणार नाहीच आहात. म्हणजे लाक्षणिक अर्थाने तुम्ही रंगपंचमी साजरी करणार नाहीच आहात.

कुठलाही दिवस घ्या, सण साजरे करण्याशी मतलब. (अर्थात काही सणांचा भौगोलिक परिस्थिती, वातावरण इ. नुसार ठराविक वेळेस करण्यात अर्थ असु शकेल.. तरी एक दोन दिवस पुढे मागे झाल्याने फरक पडु नये)

आमच्या इथे रंग दोन पैकी कुठल्याही दिवशी खेळत नाहीत. जो दिवस (अर्थातच सुटीचा) सर्वांना सोयीस्कर असेल असा निवडुन रंग खेळले जातात.

तीच गोष्ट पाया पडण्याची. मेकॅनिकली प्रत्येक मोठ्यांच्या पाया पडण्यात काय हशील आहे? पाया पडणं ही एक सवय झाली तर त्यामध्ये मोठ्यांबद्दल आदराची भावना कशी उत्त्पन्न होईल? आणि पाया पडणं हाच काही आदर व्यक्त करण्याचा एकमेव मार्ग नाही. माझ्या मते तर पाया पडणं ही एक अत्यंत घाणेरडी प्रथा आहे.

इथे आमच्या गुर्जींच, ही प्रथेची सिस्टीम फार माजलीए साली हे वाक्य देण्याचा मोह आवरत नाही.

प्राजु's picture

21 Mar 2011 - 9:28 pm | प्राजु

मी सहमत आहे... पूर्णपणे.
उगाचच केवळ वयाने मोठे आहेत या एका कारणासाठी पाया पडणे.. मला पटत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

21 Mar 2011 - 10:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

थोडी जास्त चिरफाड करायची तर, कोणाचा तरी जन्म आपल्या आधी झाला या कारणासाठी पाया पडणं आणि आदर दाखवणं मलाही पटत नाही.

आमच्या लहानपणीसुद्धा कधी रंगपंचमीला सुट्टी मिळाल्याचं आठवत नाही, पण धुळवडीला आवर्जून सुट्टी असायची. अर्थात आम्ही रंग, पाणी वापरून धुळवडीलाच दंगा करायचो. त्यातून शहरातली मुलं असल्यामुळे "न जाणो त्या मातीत काय काय असेल आणि काल होळीत सुद्धा तुम्ही पोरांनी काय जाळलंत माहित नाही" या कारणामुळे राख आणि माती वापरण्याला साफ मनाई होती.
कालनिर्णय वाचता येण्याएवढी मोठी झाल्यानंतर मी रंगपंचमी आणि धुलिवंदन यांच्यातला फरक विचारला होता आणि आई-वडीलांनी लगेच त्याचं उत्तरही दिलेलं होतं.

पंगा's picture

22 Mar 2011 - 11:57 am | पंगा

कोणाचा तरी जन्म आपल्या आधी झाला या कारणासाठी पाया पडणं आणि आदर दाखवणं मलाही पटत नाही.

या कारणासाठी नव्हे, मान्य. पण एकंदर कोणीही कोणालाही आदर दाखवण्यात काय गैर आहे? इवन इफ दॅट पर्सन जस्ट हॅपन्स टू बी एल्डर दॅन यू?

बाकी पाया पडण्याबद्दल काहीसा सहमतीकडे कल.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 12:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कोणत्याही दुसर्‍या, वयाने मोठ्या आणि लहान, माणसाला, एक व्यक्ती म्हणून, जेवढा आदर द्यावा तेवढाच द्यायला माझी ना नाही; नव्हे मी देतेच. पण कोणी "फक्त" माझ्या आधी जन्माला आला/ली आहे म्हणून पाया पडायचं, आदर दाखवायचा* हे मला पटत नाही.

*=> लहान मुलांवर 'दादागिरी' करायची.

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:05 pm | पंगा

.

रेवती's picture

22 Mar 2011 - 6:32 pm | रेवती

माझ्या मैत्रीणीच्या सासूबाईंनी त्यांच्याकडून निघताना कुंकू लावले म्हणून मी नमस्कार केला. माझी मैत्रीण नमस्काराच्या अगदी विरुद्ध! मी गेल्यावर म्हणे त्या दोघींचं नमस्कार या एका विषयावरून बरच काय काय झालं. पण मला सवय आहे. दिसलं कुणी की कर नमस्कार!:) शक्यतो वडील आणि सासरे सोडून इतर पुरुषवर्गाला नमस्कार करत नाही. म्हणून माझ्या आईनं मुलाच्या मुंजीत आधीच बजावलं होतं, सगळ्यांना नमस्कार करण्याबद्दल! मी दे दणादण नमस्कार केले.

क्लिंटन's picture

23 Mar 2011 - 1:24 pm | क्लिंटन

थोडी जास्त चिरफाड करायची तर, कोणाचा तरी जन्म आपल्या आधी झाला या कारणासाठी पाया पडणं आणि आदर दाखवणं मलाही पटत नाही.

अगदी १००% मान्य.

अवांतर: रामायणातही वनवासात असताना लक्ष्मण रामाचे पाय चेपत असल्याचे उल्लेख आहेत असे वाचल्याचे आठवते.तसेच रामाला वनवासात जावे लागले म्हणून लक्ष्मणालाही "आपला मोठा भाऊ वनवासात असताना आपण राजवाड्याचे वैभव उपभोगणे योग्य नाही" असे वाटलेले काव्यात दाखविणे तत्कालीन पध्दतींना अनुसरून होते का? हे सगळे प्रकार वाचून मला तर नेहमी प्रश्न पडतो--की आपल्याआधी काही मिनिटे/तास/दिवस/महिने जन्माला आलेल्या रामाचे पाय लक्ष्मणाने आयुष्यभर का चेपावेत?आणि लक्ष्मणही पराक्रमात किंवा कर्तुत्वात रामापेक्षा कमी होता असेही म्हणायला जागा नाही.मग केवळ लहान भाऊ म्हणून जन्माला आला म्हणून लक्ष्मणाने कायम दुय्यम भूमिका का स्विकारावी? यावर अजूनही लिहिता येईल पण आवरते घेतो.

योगप्रभू's picture

23 Mar 2011 - 5:52 pm | योगप्रभू

<<कोणाचा तरी जन्म आपल्या आधी झाला या कारणासाठी पाया पडणं आणि आदर दाखवणं मलाही पटत नाही. >>

ज्यांनी आपल्याला या जगात आणले ते आई-वडील, आपल्याला घडवणारे शिक्षक, 'दुधावरची साय' म्हणत मायेचा वर्षाव करणारे आजी-आजोबा यांच्याबाबतीत हाच नियम लागू पडतो नाही का?

इथे स्पष्टोक्ती करणारे कितीजण हे वाक्य जाहीरपणे आपल्या पालकांसमोर बोलून दाखवू शकतील. प्रामाणिकपणे सांगा.

प्रेम, आपुलकी, आदर दाखवण्यासाठी प्रत्येक संस्कृतीत काही संकेत पाळले जातात. कुणी हस्तांदोलन करतात, कुणी सलाम करतात, कुणी घट्ट मिठी मारतात, कुणी गालाचे चुंबन घेतात. भारतात नमस्कार करतात. त्याचेही ३ प्रकार आहेत.

१) अभिवादन - छातीशी हात जोडून केलेला नमस्कार. नवीन ओळख होताना, समान वयाच्या व्यक्ती समोर आल्यास किंवा स्त्रिया व पुरुष परस्परांसमोर आल्यास हा नमस्कार केला जातो.
२) वाकून पाया पडणे - आपल्यापेक्षा वयाने, मानाने, अधिकाराने ज्येष्ठांना करायचा नमस्कार. याला एक अपवादही आहे. घरी ब्राह्मण म्हणून बोलवलेला बटू किंवा कुमारिका, तीर्थयात्रेला जाऊन आलेली व्यक्ती यांचे वय लक्षात न घेता त्यांच्या वाकून पाया पडतात. वारकरी संप्रदायात सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात.
३) साष्टांग नमस्कार - देव आणि घरातील वृद्धांना करायचा नमस्कार.

नमस्कार हा केवळ आपल्यापेक्षा कुणी आधी जन्माला आला म्हणून करायचा नसतो. छातीशी हात जोडून करायच्या नमस्कारातही उदात्त अर्थ आहे. ह्रदयात परमेश्वराचा निवास आहे, असे आपली संस्कृती मानते. तळव्याचे अंगठे छातीला लावून आणि जोडलेली बोटे समोरच्या दिशेला वेधून अभिवादन करणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सांगत असते, की 'हा माझ्या व्यक्तीमत्वातीला दैवत्वाने तुमच्या व्यक्तीमत्वातील दैवत्वाप्रती दाखवलेला आदर आहे.'

आता कुणाला नमस्कार करायचा, की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मुले घडवताना आमच्यासारख्या पालकांना मूल्यशिक्षणाचा विचार करावाच लागतो. त्यामुळे नमस्काराचे महत्त्व आमच्यासाठी कायम राहील.

नितिन थत्ते's picture

23 Mar 2011 - 6:14 pm | नितिन थत्ते

>>इथे स्पष्टोक्ती करणारे कितीजण हे वाक्य जाहीरपणे आपल्या पालकांसमोर बोलून दाखवू शकतील. प्रामाणिकपणे सांगा.

मी अनेकदा माझ्या पालकांसमोर हे म्हणतो/म्हटलेले आहे. तसेही आमच्या घरी आम्हाला उठसूट पाया पडण्यास शिकवले गेले नाही. तरीही कधीकधी मी आदरणीय व्यक्तींना उदा. काही शिक्षक, वाकून नमस्कार करतो. विद्यार्थीदशेत बर्‍याचदा वाकून नमस्कार केले आहेत ते घरच्यांनी सांगण्यापेक्षा इतर करतात म्हणून (पिअर प्रेशर?)

>>वाकून पाया पडणे - आपल्यापेक्षा वयाने, मानाने, अधिकाराने ज्येष्ठांना करायचा नमस्कार. याला एक अपवादही आहे. घरी ब्राह्मण म्हणून बोलवलेला बटू किंवा कुमारिका, तीर्थयात्रेला जाऊन आलेली व्यक्ती यांचे वय लक्षात न घेता त्यांच्या वाकून पाया पडतात. वारकरी संप्रदायात सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात.

यातले मानाने आणि अधिकाराने ज्येष्ठ असलेल्यांना नमस्कार करण्याला कोणीच आक्षेप घेतला आहे असे वाटत नाही. वयाने मोठा असलेल्याला (केवळ आधी जन्मला म्हणून) नमस्कार करण्याला आक्षेप घेतला गेला आहे. त्यातही आपले आई वडील ज्यांनी आपले पालन पोषण केले त्यांना नमस्कार करणे वेगळे आणि कोणतरी लांबचे काका/मामा/आजोबा घरी आल्यावर त्यांना नमस्कार करणे वेगळे. ब्राह्मण म्हणून बोलावलेल्या बटू किंवा कुमारिकेच्या पाया पडणे तर कंप्लीट आक्षेपार्ह.

नमस्कार करण्याने मूल्यशिक्षण होते हे धाडसी विधान आहे.

योगप्रभू's picture

23 Mar 2011 - 8:57 pm | योगप्रभू

नितीनजी,
तुमचीच २ विधाने पाहा.

१) तसेही आमच्या घरी आम्हाला उठसूट पाया पडण्यास शिकवले गेले नाही.
२) ब्राह्मण म्हणून बोलावलेल्या बटू किंवा कुमारिकेच्या पाया पडणे तर कंप्लीट आक्षेपार्ह.

सिलेक्टिव्हिटीचे आपण कटाक्षाने पालन करत असू तर उर्वरित गोष्टींवर आक्षेप कसा काय घेता येईल? जर तुम्ही बटू/कुमारिका/ब्राह्मण यांना नमस्कारापासून लांब असाल तर फार फार तर नापसंती दाखवू शकाल. जे ती प्रथा पाळतात त्यावर आक्षेप घेणे, हेच आक्षेपार्ह ठरु शकते.

>>नमस्कार करण्याने मूल्यशिक्षण होते हे धाडसी विधान आहे.

.. असे तुम्हाला वाटते. आमच्यासाठी ते अनुभवसिद्ध गृहितक आहे.

क्लिंटन's picture

23 Mar 2011 - 6:42 pm | क्लिंटन

माझे हे म्हणणे केवळ आपल्यापूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीला नमस्कार करण्यापुरताच मर्यादित नाही तर लहान म्हणून जन्माला आलेल्यांनी दुय्यम भूमिका स्विकारण्याविषयी आहे.नमस्कार हा आदर दाखविण्यासाठीचा मार्ग असेल तर त्याविषयी काही म्हणणे नाही पण प्रश्न हा की आपल्या आधी काही दिवस किंवा महिने किंवा वर्षे जन्माला आलेल्यांविषयीच हा आदर का व्यक्त करावा?म्हणजे लहान आदर व्यक्त करण्यायोग्य नाहीत का?आणि कालचक्र कायम पुढेच जात असल्यामुळे लहान भावंड हे कायम लहानच राहात असल्यामुळे असा आदर आयुष्यभर केवळ लहानानेच मोठ्याविषयी दाखवावा (पण मोठ्याने मात्र लहानाविषयी कधीच दाखवू नये) हे मात्र पटत नाही.म्हणजे वय हा एकमेव घटक कर्तुत्व कमी/जास्त हे ठरवायला पुरेसा आहे असे गृहित धरण्यासारखे नाही का?म्हणजे सरकारी कार्यालयात एकाच श्रेणीत २३ मार्च २०११ रोजी जॉईन झालेला कर्मचारी २४ मार्च २०११ रोजी जॉईन झालेल्या कर्मचाऱ्यापेक्षा (काही मूठभर जागा सोडल्यास) पूर्ण कारकिर्दीत वरीष्ठ असतो आणि सगळ्या पदोन्नती प्रथम या "वरीष्ठाला" मिळणार (मग भले तो वरीष्ठ बिनडोक का असेना) तसलाच हा प्रकार नाही का?

नमस्कार हा केवळ आपल्यापेक्षा कुणी आधी जन्माला आला म्हणून करायचा नसतो.

शास्त्रांमध्ये (किंवा इतर ठिकाणी) काय लिहिले आहे याविषयी मला माहित नाही पण practically आज कायम लहान भावंड मोठ्या भावंडांना नमस्कार करतात ही सत्य परिस्थिती नाही का?भले लहान भावंडांनी अधिक जग पाहिले असेल, अधिक अनुभव घेतला असेल, अधिक कर्तुत्व दाखविले असेल पण केवळ वयाने काही महिने/वर्षे मोठा या एका कारणासाठी असे नमस्कार केले जातात किंवा तशी अपेक्षा असते हे समोरच दिसत नाही का?अनेकदा अशा काही गोष्टी मुळातल्या शास्त्रात वेगळ्या असतात पण त्याचे प्रत्यक्ष implementation वेगळे होते असे म्हणणे ही पळवाट नाही का?मला शास्त्रात काय लिहिले आहे यावर अजिबात भाष्य करायचे नाही तर दैनंदिन गोष्टींमध्ये काय अनुभवास येते याविषयी माझा मुद्दा आहे.

नमस्काराचे महत्त्व आमच्यासाठी कायम राहील.

अगदी जरूर. तसा तो तुमचा अधिकारच आहे.पण अशा काही गोष्टी न मानणे हा माझ्यासारख्यांचाही अधिकार आहे याचीही जाणीव ठेवली जावी ही अपेक्षा.तेव्हा ज्या गोष्टी मान्य नाहीत त्या केवळ "आपल्या" या एका कारणासाठी चालू ठेवल्या पाहिजेत अशी अपेक्षा केली जाऊ नये असे वाटते.

..पण अशा काही गोष्टी न मानणे हा माझ्यासारख्यांचाही अधिकार आहे याचीही जाणीव ठेवली जावी ही अपेक्षा.तेव्हा ज्या गोष्टी मान्य नाहीत त्या केवळ "आपल्या" या एका कारणासाठी चालू ठेवल्या पाहिजेत अशी अपेक्षा केली जाऊ नये असे वाटते.

क्लिंटनसाहेब,
माझे वाक्य आपण वाचले नाहीत का?

कुणाला नमस्कार करायचा, की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

आता इतक्या स्पष्ट शब्दात आपला 'न मानण्याचा' अधिकार मान्य केला आहेच ना?

हा अनुभव मांडताना मला कुणावर आपले म्हणणे लादणे अभिप्रेतच नाही. म्हणूनच मी मला विचारले गेल्यानंतरच शेजार्‍याला सांगितले, की होळीला रंग खेळणे ही उत्तरेकडची प्रथा आहे. त्यांना ती पाळू दे. मी आमच्या परंपरेत राखून ठेवलेल्या दिवशीच रंग खेळणार (यातही मी दुसर्‍याचे स्वातंत्र्य मानलेच आहे की)

नमस्काराबाबतही तेच. तुम्ही नका करु नमस्कार. ते तुमचे स्वातंत्र्य/अधिकार आहेच, पण मी तुम्हाला नमस्कार केला तर दुर्लक्ष करा. कारण मी माझी परंपरा पाळणार, तुम्ही तिचा अव्हेर करु शकता.

ज्यांनी आपल्याला या जगात आणले ते आई-वडील, आपल्याला घडवणारे शिक्षक, 'दुधावरची साय' म्हणत मायेचा वर्षाव करणारे आजी-आजोबा यांच्याबाबतीत हाच नियम लागू पडतो नाही का?

मोठे हा एक सेट झाला, त्या सेटचा एक सबसेट आहे मोठे ज्यांबद्दल आदर आहेत असे. तुमचा पाया पडायचा संस्कार मोठ्या सेट साठी आहे आमचा त्याच्या सबसेट साठी.

उदाहरणच द्यायचे झाले तर आमचा एक हेडमास्तर होता, आम्ही तुमच्या त्या सो कॉल्ड मुल्यशिक्षणाच्या तासाला साफसफाईचे धडे प्रात्यक्षिकासह घेत असतानाच आमच्या समोर ग्राउंडवर तंबाखु खाऊन पचापच थुंकायचा. अशा लोकांच्या पाया न पडण्याचं मुल्यवान शिक्षण आम्हाला केव्हाच अवगत झालं याबद्दल त्या मास्तराचे आभारच मानतो.

इथे स्पष्टोक्ती करणारे कितीजण हे वाक्य जाहीरपणे आपल्या पालकांसमोर बोलून दाखवू शकतील. प्रामाणिकपणे सांगा.

मी बोलुन दाखवु शकतो, दाखवले आहे.

एक प्रसंग आठवतो. तसं आमचे पालक बर्‍यापैकी लिबरल असल्याने त्यांनी आम्हाला केव्हाच मोकाट सोडलं हा भाग निराळा. (अर्थात, हे पोळ काही बांधले जायचे नाहीत असे त्यांना लवकर कळले असण्याचीही शक्यता आहेच म्हणा). पण आमच्या आजोळी मात्र परीस्थिती बिकट (सकाळी शौचाला जाउन येत नाही तोवर चहा सुद्धा मिळायचा नाही हो तिथे.. नुसता फ्लश करुन आलो तरी खत्रुड आजीला कसे कळायचे माहित नाही. काय करणार पुन्हा जावे लागायचे आत!). मिसरुड फुटायच्या आधीचे दिवस होते, असच कुठल्यातरी धार्मिक कौटुंबिक कार्यक्रमात आम्हाला कुणीतरी पाया पडायला हवे अशी जरा दरडावुन आठवण करुन दिली, त्यांनंतर आम्ही दिलेल्या उत्तराची आठवण मात्र त्यांना जन्मभर पक्की राहीली असेलच.

प्रेम, आपुलकी, आदर दाखवण्यासाठी प्रत्येक संस्कृतीत काही संकेत पाळले जातात. कुणी हस्तांदोलन करतात, कुणी सलाम करतात, कुणी घट्ट मिठी मारतात, कुणी गालाचे चुंबन घेतात. भारतात नमस्कार करतात. त्याचेही ३ प्रकार आहेत.

नाही हो, मुद्दा तो नाहीच आहे. आदर, प्रेम, आपुलकी दाखवायची असल्यास प्रश्नच नाही आहे. तुम्ही लेखात उल्लेख केला होता "तो पाया पडण्याच्या प्रथेचा", आदर व्यक्त करण्यास पाया पडणे ही क्रिया योग्य की अयोग्य याचा नव्हे.

नमस्कार हा केवळ आपल्यापेक्षा कुणी आधी जन्माला आला म्हणून करायचा नसतो.

तोच मुद्दा मांडलेला आहे. फक्त मोठा असणे हा क्राईटेरीअन नाही.

आता कुणाला नमस्कार करायचा, की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मुले घडवताना आमच्यासारख्या पालकांना मूल्यशिक्षणाचा विचार करावाच लागतो

आँ!!! ही विसंगती नाही का? तुमच्या लेखातील उदाहरणात ते कुटुंब त्या मुलाला त्याच्या इच्छेविरुद्ध पाया पडायला सांगत आहे. तुम्ही सुद्धा आदर असलेल्या व्यक्तीच्या पाया पडण्याच्या शिकवणीचा उल्लेख केलेला नाही. तुम्ही कुणाच्या पाया पडावे हे तुमच्या मुलांच्या बाबतीत वैयक्तिक आहे असे मानत नाही असे दिसते.

हा अनुभव मांडताना मला कुणावर आपले म्हणणे लादणे अभिप्रेतच नाही

छे हो, लादुन कोण घेतोय इथे? इथे विचारसरणी चुक आहे असे मत व्यक्त केले आहे इतकेच.

पण मी तुम्हाला नमस्कार केला तर दुर्लक्ष करा.

अरेच्चा हे कसे? तुम्ही नमस्कार करायचा की नाही हे तुमचे वैयक्तिक आणि आम्ही नमस्कार स्विकारायचा की नाहीचा चॉईस मात्र आम्हाला नाही?? आम्ही दुर्लक्ष न करता नमस्कार अस्विकार करु.

नाईल,
मला वाटते आतापर्यंतच्या माझ्या लेखन आणि प्रतिसादावरुन मला नक्की काय म्हणायचे आहे, हे सर्वांच्या लक्षात आलेले आहे.
विचारप्रवर्तक अधिक प्रतिसाद यावेत, अशी अपेक्षा मी व्यक्त केली होती. विचारसरणी चूक आहे, असे मत तुम्ही व्यक्त केल्यानंतर प्रश्नच मिटला.
तुमच्या भाषेचा एकंदर सूर पाहता संवादापेक्षा वादाकडे कल जाणवतो आहे.
या टप्प्यावर मला थांबणे भाग आहे.

(त्यातून आज रंगपंचमी. आमचा सण आहे. भारत-ऑस्ट्रेलिया मॅच सुरु झाल्यावर कुणी रंग खेळायला सापडणार नाही. तेव्हा मी रजा घेतो. :))

क्लिंटन's picture

24 Mar 2011 - 11:31 am | क्लिंटन

आता इतक्या स्पष्ट शब्दात आपला 'न मानण्याचा' अधिकार मान्य केला आहेच ना?

नमस्कार योगप्रभू, माझे मिपावर तुमच्याबरोबर जेवढा संपर्क आला आहे त्यावरून तुम्ही "लादणाऱ्यांपैकी" नाही याविषयी पूर्ण खात्री आहे.पण दुर्दैवाने हेच सगळ्यांविषयी बोलता येत नाही.अनेकांना कोण हिंदू समर्थक आणि हिंदू विरोधक हे ठरवायची ठेकेदारी केवळ आपल्यालाच दिली आहे असे वाटते.अशी मंडळी माझ्यासारख्यांचा "न मानण्याचा" अधिकार मान्य करत नाहीत.माझे म्हणणे व्यक्तिश: तुमच्याबद्द्ल नक्कीच नाही तर असा "न मानण्याचा" अधिकार मान्य न करणाऱ्या प्रवृत्तीबद्दल आहे.

क्लिंटन

नितिन थत्ते's picture

24 Mar 2011 - 12:16 pm | नितिन थत्ते

>>अनेकांना कोण हिंदू समर्थक आणि हिंदू विरोधक हे ठरवायची ठेकेदारी केवळ आपल्यालाच दिली आहे असे वाटते.

त्यांच्यातल्या काहींनी नुकतीच आत्महत्या केली.

नगरीनिरंजन's picture

23 Mar 2011 - 6:53 pm | नगरीनिरंजन

योगप्रभू, जग फार व्यवहारी आहे. आईबापानी पालनपोषण केलं म्हणून त्यांना नमस्कार. बाकी परंपरा वगैरे आम्ही ओळखत नाही. ज्याचा फायदा तोच कायदा. कोणाशी हस्तांदोलन करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तो साहेबी प्रकार आहे ना? साहेबाची जर गुडघ्यावर बसायची पद्धत असती तर आम्ही तेही केलं असतंच. पण ते सुद्धा फक्त फायदा बघूनच. शिवाय हे नमस्कार वगैरे बंद करून आम्ही आधुनिक झालो की नाही? भले इतर खरोखर अनिष्ट प्रथा बंद करायची धमक असो वा नसो.

नितिन थत्ते's picture

23 Mar 2011 - 7:08 pm | नितिन थत्ते

>>कोणाशी हस्तांदोलन करायला आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तो साहेबी प्रकार आहे ना? साहेबाची जर गुडघ्यावर बसायची पद्धत असती तर आम्ही तेही केलं असतंच.

उगाच कांगावा कशाला?

१. आम्ही फक्त बाहेरच्या माणसांशी हस्तांदोलन करतो. घरातल्यांशी (आधुनिकता दाखवण्यासाठी) हस्तांदोलन करीत नाही.

२. शिवाजी महाराज जिजाऊंना आणि शहाजी राजांना "आपल्या पद्धतीने" साष्टांग नमस्कार न करता तेव्हाच्या साहेबी (पक्षी- मुस्लिम/मोगल) पद्धतीने मुजरा करत असावेत. (निदान चित्रपटात तरी असेच दाखवतात).

नगरीनिरंजन's picture

23 Mar 2011 - 7:22 pm | नगरीनिरंजन

>>उगाच कांगावा कशाला?
काका, मामा, मोठा भाऊ आणि इतर ज्येष्ठ लोक यांच्यासमोर वाकल्याने कमीपणा येतो हे म्हणणे मला कांगावा वाटतो. राहिली गोष्ट साहेबी प्रकारांची तर साहेब गुडघ्यावर बसत असता तर आम्हीही बसलो असतो यात तिळमात्रही अतिशयोक्ति नाही. आणि पुर्वी राजाला मुजरा करतो म्हणून इतरांना नमस्कार करायला नकार देत नसावेत असं वाटतं.

योगप्रभू's picture

23 Mar 2011 - 9:40 pm | योगप्रभू

नगरी निरंजन,
महाभारताचे युद्ध लढले गेले तेव्हाचा एक प्रसंग. समोर आपले काका, मामा, आजोबांसम भीष्म, गुरु द्रोण असे नातलग उभे पाहिल्यावर अर्जुनाचा उत्साह मावळला. कृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुन युद्धाला तयार झाला. पण पहिला बाण चालवण्याआधी तो रथातून उतरला आणि गुढग्यावर बसून मान लववून त्याने समोरच्या सर्व ज्येष्ठांना वंदन केले. त्याही प्रसंगात तो संस्कार विसरला नाही.

जुने लोक काही संकेत कटाक्षाने पाळत असत. मला आठवते, की आमच्याच घरी माझी थोरली काकू खरेतर माझ्या आईपेक्षा वयाने लहान होती, पण सणावाराला आई तिला वाकून नमस्कार करत असे. काकू संकोचाने म्हणे, 'अहो जाऊबाई! मी लहान आहे तुमच्यापेक्षा' त्यावर आई सांगे ' अगं तू वयाने लहान असलीस तरी मानाने मोठी आहेस. म्हणून मी बहिणीसारखी तुला अगं तुगं म्हणते, पण थोरली जाऊ म्हणून नमस्कारही करते.'

महाभारताचे युद्ध लढले गेले तेव्हाचा एक प्रसंग. समोर आपले काका, मामा, आजोबांसम भीष्म, गुरु द्रोण असे नातलग उभे पाहिल्यावर अर्जुनाचा उत्साह मावळला. कृष्णाच्या उपदेशानंतर अर्जुन युद्धाला तयार झाला. पण पहिला बाण चालवण्याआधी तो रथातून उतरला आणि गुढग्यावर बसून मान लववून त्याने समोरच्या सर्व ज्येष्ठांना वंदन केले. त्याही प्रसंगात तो संस्कार विसरला नाही.

वावावावा! काय प्रसंग आहे, डोळे पाणावलेत इथे.

बाकी अर्जुन पाया पडल्यावर सगळे नातलग अगदी खुशीनी मरायला तयार झाले असतील नाही?? यावरुन स्फुर्ती घेउन,इथुन पुढे कुणा जेष्ठाचा अपमान करायची दुर्दैवी वेळ चुकुन आमच्यावर आलीच तर आम्ही सुद्धा आधी गुडघे टेकुन नमस्कार करु अन मगच यथेच्छ अपमान करु असा निर्धार आम्ही केला आहे हे सांगताना आमचा ऊर भरुन आला आहे!

रमताराम's picture

26 Mar 2011 - 1:54 pm | रमताराम

उपहासाआडच्या मुद्याशी सहमत.

नगरीनिरंजन's picture

22 Mar 2011 - 7:46 am | नगरीनिरंजन

कौनो फरक नाही पडत है. मराठी लोगन को तो कौनोही फरक नाही पडत है. उ दिवाली के दिन शिमगा करत रहे और शिमगा के दिन दिवाली करत रहे तो का हुवा? भॅलंटाईन डे, करीसमस, छटपूजा वगैरा तो सब तरीके से टैम टू टैम हुई रहा है ना? तो बस. और इ घाटी लोगन दशहरे के दिन कौनो सीमोल्लंघन करत रहे. बेअकल ससुरे. अब हम उनका सिखावत है की दशहरे के दिन रावण को जलाया जावत है. ससुरे होली के दिन रंग लगाना छोड लकडी-कूडा जलावत है.

sagarparadkar's picture

21 Mar 2011 - 7:31 pm | sagarparadkar

>> हिंदी सिनेमामुळे करवा चौथ का नाही रूढ झाला बरे?

कारण अगदी सोप्पं आहे, ते एक व्रत आहे ज्यात दिवसभर उपास करावा लागतो. मानवी स्वभावाला आपणहून स्वतःवर अशी बंधने लादून घेणे कसे आवडेल? अशा गोष्टी 'त्यांच्या' म्हणून दूर ठेवणे अगदीच सोपं आहे :)

या उलट रंग खेळणे ही एक आनंद वाढवणारी गोष्ट आहे, मग होळीनंतर ४-५ दिवस वाट कशाला पाहायची? नाहीतरी देशाच्या काही भागांत होळीलाच रंग खेळतात ना मग आपणच कशाला ४-५ दिवसांनी रंग खेळायचे, त्यापेक्षा खेळू आत्ताच, काय हरकत आहे अशी त्यामगील विचारधारणा असावी ...

राही's picture

21 Mar 2011 - 7:34 pm | राही

'रंग खेळणे ' हा वाक्प्रचार मराठीत आहे का? आपण 'रंग उडवणे' म्हणतो असे वाटते.' होळी खेळणे' हा वाक्प्रचार तर आपला नाहीच. रंगपंचमीची काही गाणी आठवतात त्यातही 'खेळणे' शब्द नाही. 'उडवणे' किंवा 'फेकणे' च आहे.
उदा. नको रे कृष्णा रंग फेकू चुनडी भिजते; उडवू नको रे रंग; रंग उडवू चला (हे 'रंग खेळू चला' आहे का?)
ही सर्व जुनी गाणी आहेत. त्या मानाने अलीकडच्या अशा 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' मधे मात्र हरी रंग खेळतो. हा मध्य प्रांत,वर्‍हाडचा प्रभाव असावा का?

प्रदीप's picture

21 Mar 2011 - 7:40 pm | प्रदीप

'रंग खेळणे ' हा वाक्प्रचार मराठीत आहे का

Nile ह्यांच्या युक्तिवादानुसार पुढे जायचे तर 'काय फरक पडतो?' शेवटी कसलीही भेसळ भाषेत झाली तरी समोरच्याला आपण काय म्हणतो आहोत हे समजल्याशी कारण! की फर्क पैंदा?

फरक आहे.

एक समान सर्वमान्य नियम असलेल्या भाषेची अनेकांमध्ये सुसंवाद साधण्यास गरजेची असते हे मान्य आहे, तेव्हा ती भाषा तितक्या लोकांच्यापर्यंत एकाच माध्यमात पोहचत असेल तरच अशा नियमांची गरज, आवश्यकता आहे. दर २०० मैलांवर बोलीभाषा बदलते, आणि ही स्थिती ८०च्या दशकानंतरची नाही हे आपण जाणतात.

तस्मात, बदलणारी भाषा आणि अशुद्ध भाषा यात फरक आहे. पण दोन माणसांच्या संवादात अडचण येत नसेल तर भाषा अशुद्ध असल्याने , माझ्या मते, की फर्क पेंदा बरोबरच आहे.

धमाल मुलगा's picture

21 Mar 2011 - 8:02 pm | धमाल मुलगा

>>दर २०० मैलांवर बोलीभाषा बदलते,
मी ऐकलेल्या बोलण्यांमधून दर १२ मैलावर बोली बदलते असं होतं.
इतर बाबींशी बहुतेक सहमत असेन असं वाटतंय. :)

रमताराम's picture

22 Mar 2011 - 1:29 pm | रमताराम

साडेअकरा रे धम्या... साडेअकरा मैलावर बदलते. अगदी अचूक सांगायचं तर ११.४७ मैलावर.

आजानुकर्ण's picture

21 Mar 2011 - 10:42 pm | आजानुकर्ण

'रंग खेळणे ' हा वाक्प्रचार मराठीत आहे का?

माझ्या मते आहे. 'सामना' चित्रपटामधील 'सख्या चला बागामधी रंग खेळू चला' ही रचना पारंपरिक आहे. तसाही सामना हा चित्रपट बऱ्यापैकी जुना आहे. (35 हून अधिक)

बाकी लेखातील भावनेशी सहमत आहे. मला होळी-धूलिवंदन अशा दोन्ही दिवशी रंग खेळणाऱ्यांचा रागच येतो. रंगपंचमीला रंग खेळणाऱ्यांचाही राग येतो.

नितिन थत्ते's picture

21 Mar 2011 - 10:45 pm | नितिन थत्ते

सहमत.

"आज गोकुळात रंग खेळतो हरी" हेही बरेच जुने आहे

चावटमेला's picture

21 Mar 2011 - 7:59 pm | चावटमेला

जाऊ द्या हो, काय फरक पडतो? अहो, लोक कुठलेही असोत, उ. भारतीय, मराठी, द. भारतीय, बंगाली इ. इ. आणि कुठलाही सण असो, त्याचा अर्थ एकच होतो, मित्र, आप्तेषट, वडीलधारे, लहान मुले, सर्वांनी एकत्र येणे आणि आनंद साजरा करणे.मग रंग केव्हाही खेळा, मी तर म्हणतो कि, धुळवड आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी रंग खेळा आणि हा आनंद द्विगुणित करा

वपाडाव's picture

22 Mar 2011 - 10:35 am | वपाडाव

धुळवड आणि रंगपंचमी दोन्ही दिवशी रंग खेळा आणि हा आनंद द्विगुणित करा

एक दिवस खेळला तर 'द्विगुणित' मग दोन्ही दिवशी खेळुन आनंद 'चौगुणित' होइल...

तुम्ही म्हणता तसेच आम्ही तरी होळी करतो अजुन ..
आणि रंग रंगपंचमीलाच खेळला जातो ...

आणि मोठ्या माणसांना आदर ही दिला जातो

अवांतर : वेळे अभावी वरील एकही रिप्लाय वाचला नाहिये ..

नितिन थत्ते's picture

21 Mar 2011 - 8:54 pm | नितिन थत्ते

योगप्रभूंशी काहीसा सहमत आहे.

पण आता आपल्या~ प्रथा* कोणत्या हे कसं ठरवायचं हे एकदा ठरवायला हवं. वर पैसा यांनी कोकणातल्या (रत्नांग्रीच्या) आणि गोब्यातल्या वेगवेगळ्या प्रथा सांगितल्या आहेत. त्यातली कोणती पाळायची हे ठरलं की मग बाकीच्या** बंद पाडता येतील.

~उत्तर भारतीय "आपले" नाहीत ही रोचक माहिती कळली. आम्ही तर हिंदू-हिंदू म्हणून त्यांना जवळ केले होते. ;)
*दिवाळीला पहाटे जुनीच भावगीते ऐकण्याची प्रथा "आपली" आहे का?

**राखी पौर्णिमा न साजरी करता नारळी पौर्णिमा साजरी करावी लागेल आणि पुण्यात अलिकडे वाढलेली दहीहंडी बंद करावी लागेल. गणपतीप्रमाणे चौकाचौकात देवी बसवण्याची प्रथा आपली की बंगाल्यांची याचाही तपास करावा लागेल.

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:03 pm | पंगा

पुण्यात अलिकडे वाढलेली दहीहंडी बंद करावी लागेल.

का बुवा?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Mar 2011 - 12:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कृष्ण आणि राम हे भय्या देव आहेत म्हणून! ;-)

(तसा विठोबा कन्नडीगा म्हणायचा का?)

मृत्युन्जय's picture

22 Mar 2011 - 12:10 pm | मृत्युन्जय

रामाचा आणि दहीहंडीचा काय संबंध?

Nile's picture

22 Mar 2011 - 12:16 pm | Nile

दहीहंडी फोडताना यांचं नारळ फुटलं तर हे राम करावं लागतं म्हणून असेल....

थोडक्यात हे राम म्हणायची प्रथा तरी पाळावी का? ;-)

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:17 pm | पंगा

प्रथा??????

म्हणजे फक्त हे राम नाही हो.. राम नाम घ्यायची प्रथा म्हणतोय मी. ;-)

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:34 pm | पंगा

रामनामाच्या सत्यतेबद्दल काही म्हणत होतात काय?

Nile's picture

22 Mar 2011 - 1:25 pm | Nile

नाही, म्हणजे तुमचा प्रश्नच कळला नाही. मी फक्त मराठी मनुष्याच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेवेळी परप्रांतीय-प्रेरीत वाक्प्रचार प्रथा तर सुरु नाही ना अश्या चिंतेकडे लक्ष वेधु इच्छित होतो.

पंगा's picture

22 Mar 2011 - 1:30 pm | पंगा

मराठी मनुष्याच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेवेळी

'आयुष्यातील घटना' या शब्दप्रयोगाच्या औचित्याबद्दल साशंक आहे.

अश्या चिंतेकडे लक्ष वेधु इच्छित होतो.

उत्साहाच्या भरात एखादा अनुस्वार चुकून जास्तीचा तर पडला नाही ना?

अ मराठी मनुष्याच्या आयुष्यात ब मराठी मनुष्याच्या 'राम' नामाची घटना असु शकत नाही काय?

"शेवटी" अस्मितेची फिकीर करायला "वेळ" आहे कोणाला? म्हणुन ब ला चिंता नसेल, अनुस्वार नसतेचेवेळी, पण बरोबर दिलेला अनुस्वार ज्याकरता आहे त्याकडेच लक्ष वेधु इच्छितो.

पंगा's picture

22 Mar 2011 - 12:16 pm | पंगा

या हिशेबाने एक तरी मेनस्ट्रीम उत्सव आपला राहील की नाही, शंका आहे.

(बाय द वे कृष्ण जन्माने म्हणून भय्या की डोमिसाइलने म्हणून गुजराती?)