.... उचल ना फोन..

५० फक्त's picture
५० फक्त in जनातलं, मनातलं
7 Mar 2011 - 3:21 pm

ऑफिसात जाताना असं होतं, कधी कधी माझा आणि बायकोचा वाद झालेला असतो, आम्ही तसेच ऑफिसला जातो, चेहरा लगेच कार्पोरेट झालेला असतो, पण आत काहीतरी बोलायचं राहिलेलं असतं, काहीतरी ऐकलेलं डोक्याच्या बाहेर निघायला तयार नसतं. टेबलवर फोन वाजत असतो, टॅण टॅ धॅन टॅ . voice call from **** टॅण टॅ धॅन टॅ ..

मी फोन उचलत नाही तर सायलेंट करुन ठेवतो, पुन्हा ४-५ मिनिटांनी फोन टॅण टॅ धॅन टॅ . voice call f******* टॅण टॅ धॅन टॅ , आता चिडणारा दुसरा कोणितरी असतो पण डायलॉग तोच -'अरे उचल ना फोन ' . मी तरी ही फोन उचलत नाही.

कधी कधी सगळं नेहमीसारखं असतं, म्हणजे बायकोशी वाद वगैरे काही नाही, तरी पण काम जास्त असतं, बॉस सकाळी सकाळी चिडलेला असतो, मग तरी पण मी फोन उचलत नाही.

पण घरी , माझा फोन कुठं तरी ठेवलेला असतो आणि तो वाजतो, आणि तो जर लगेच उचलला नाही गेला तर त्या फोनच्या रिंगटोन मध्ये एक आवाज वाढतो, बायकोचा ' अरे उचल ना फोन ' आणि मी लगेच फोन उचलतो. एकदा माझ्या एका ऑफिसताल्या मित्रानं घरी जेवायला आला असताना हे टिपलं, आणि दुस-या दिवशी लंच झाल्यावर टोचलं, ' का रे बायको म्हणाली की लगेच उचलतो फोन, आणि इथं च्यायला आमचं डोकं उठस्तोवर वाजतो, त्याला हात लावत नाही.

दुसरा मित्र तारे तोडतो ' अरे उगा तो फोन दुस-या कुणाचं तरी नाव घ्यायचा म्हणुन का हां ? मी उत्तर द्यायचं टाळतो आणि नेहमीप्रमाणे माझं मन भुतकाळात जातं,

काळ - डिसेंबर २००७ , स्थळ - जहांगिर हॉस्पिटल, पुणे वेळ - दुपारी ३- ४ च्या दरम्यान.

त्यावेळच्या ऑफिसतर्फे मिळणा-या फुकट वैद्यकीय सवलतींच्या लाभासाठी आम्ही तिथं, जहांगिर मध्ये. ओपिडिच्या जवळच थांबलो आहे, नंबर यायची वाट बघत. तेवढ्यात एक अ‍ॅम्ब्युलन्स येते, टँ टु टँ टु करत, दरवाज्याजवळची गर्दी बाजुला होते, त्यात आम्ही पण. दवाखान्यात आधीच माहीती कळाली असणार आहे, त्यामुळं तयारी आहेच. अर्ध्या मिनिटात ऑक्सिजन, सलाईन, अजुन काय काय बाहेर येतं, मागचा दरवाजा उघडतो रुग्णवाहिकेचा, अन स्ट्रेचर वर पहिल्यांदा चकचकीत पॉलिश केलेले बुट दिसतात अगदि स्वच्छ पांढ-या शुभ्र मोज्यांसहित , मग झक्कपैकी काळी कुळकुळित पँट. नंतर मात्र थोडीशी हिरवी चादर.

स्ट्रेचर पुर्ण बाहेर येतं, वय वर्षे ३०-३२, छान मिश्या छोट्याश्या, दाढी केलेली, आताच्या वॉर्डबॉयच्या हालचालीमुळं दिसणारा चमकदार सिल्कचा टाय. कुठंही रक्त नाही, कसला डाग नाही. तोंडाला मास्क लावलेला ऑक्सिजनचा. स्ट्रेचर पुढं गेलं की अजुन एक त्याच वयाचा आणि तशाच कपड्यातला तरुण उतरतो, त्याच्या हातात एक बॅग प्लॅस्टिकची. झालं पेशंट बाहेर आला अ‍ॅम्ब्युलन्सचं काम झालं ती निघुन जाते. वॉर्डबॉय व नर्सच्या नजरेतुन सरावलेली निराशा दिसत असते.

पेशंट ओपिडित नेतात, एका बेडला इर्मजन्सी साठीचे पडदे टाकले जातात, हे द्या ते द्या चालु होतं. दरवाज्यातुन दिसतंय सगळं, पण आमची चिंता वेगळी, आयला आता आपला नंबर यायला अजुन वेळ लागणार . पण नाहपण, तेवढ्यात दुस-या नर्स बाई बोलावतात. आम्ही आत जातो. त्या पडदा टाकलेल्या बेडच्या समोरच्या बेडवरच मला बसवतात , बिपि आणि काय काय चालु होतं. दोनच मिनिटं जातात. पडद्यामागुन मोबाईलची रिंग ऐकु येते, आत चार पाच जणांचे पाय दिसत आहेत पण कोणिच उचलत नाही. सिनियर नर्स चिडतात, ' अरे इमर्जन्शी में बोलाय ना सबको फोन बंद रखनेको !

दरवाज्यातुन चार माणसं आत येतात, दोन पुरुष, दोन बायका. त्यातली एक २७ - २८ ची. पंजाबी ड्रेस पण ओढणी मॅचिंग नाही,पायात स्लिपर, गळ्यात मंगळसुत्र, हातात महागातला मोबाईल कोणाला तरी लावतेय घाईघाईनं. पुन्हा पडद्याच्या आतुन रिंग येते, यावेळेला सिस्टरच्या अगोदर डॉक्टर चिडतात, ' you bloody, can't keep the phone off in emergency '

एक रडवेला आवाज येतो,' डॉक्टर पण रागावतात..... उचल ना फोन, प्लिज रे ..... उचल ना फोन.
.
.
.
.
म्हणुन मी टॅण टॅ धॅन टॅ . voice call from love टॅण टॅ धॅन टॅ वाजलं की लगेच फोन उचलतो.

समाजजीवनमानतंत्रलेखअनुभव

प्रतिक्रिया

बोलघेवडा's picture

7 Mar 2011 - 3:32 pm | बोलघेवडा

काय कळला न्हाय ! डोक्यावरून गेला न भो

स्वैर परी's picture

7 Mar 2011 - 3:38 pm | स्वैर परी

.

महाबळ's picture

7 Mar 2011 - 3:41 pm | महाबळ

काय सांगायचंय नक्की ते काही केल्या कळलं नाही...

Dhananjay Borgaonkar's picture

7 Mar 2011 - 3:42 pm | Dhananjay Borgaonkar

टॅण टॅ धॅन टॅ ..
काहीच नाही कळाल..

बहुधा
त्या मेलेल्या मुलाचा फोन वाजत असणार!!!!!

प्रास's picture

7 Mar 2011 - 3:57 pm | प्रास

......मी घरून आलेला फोन नेहमीच उचलतो.......

प्रसाद_डी's picture

7 Mar 2011 - 4:03 pm | प्रसाद_डी

२ - ३ वेग-वेगळे वीषय एकत्र झालेत का हो ?
१) उचल .. उचल ..उचल .. उचल .........फोन...उचल ..
२) पाढर पेशा जॉब / कार्पोरेट जीवन जगता-जगता अकाळी मरण किंवा आजारपण...
३) बायको सोबतचे भांडण...

काहीच कळाले नाही.. डोक्यात ढॅण टॅन ढॅण आवाज झाला फक्त...

- पिंगू

आत्मशून्य's picture

7 Mar 2011 - 8:48 pm | आत्मशून्य

जीवाभावाच्या व्यक्तीने जर फोन पहील्या प्रयत्नात ऊचलला नाही तर मन कासावीस होऊ लागते.

वपाडाव's picture

7 Mar 2011 - 4:47 pm | वपाडाव

हर्षदराव... अजुन थोडं सविस्तर लिहा...
म्हंजे तुम्हाला काय लिहायचंय नि आम्ही काय वाचावं ते क्लियर झालं पाहिजे...
थोडंफार समजलं असं वाट्टंय पण तेच सांगायचंय का? हे नाही कळालं.
-(जनहितार्थ) वपाडाव...

आजानुकर्ण's picture

7 Mar 2011 - 5:27 pm | आजानुकर्ण

आमची वॉशिंग मशीण चोरीला गेलेली आहे. सापडल्यास तुम्हीच ठेवुन घ्या.
कॄपया संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये.

मग रजनीकांत त्याच्या चड्ड्या कुठे धुतो?

प्यारे१'s picture

7 Mar 2011 - 5:03 pm | प्यारे१

सॉल्लिड रे....

खतरा झालंय.

वर्णन जबरदस्त ..
खास करुन हॉस्पिटल मधील ..
मात्र निष्कर्ष चुकीच्या संधर्भावरुन घेतलेला आहे असे वाटले ..

५० फक्त's picture

7 Mar 2011 - 5:07 pm | ५० फक्त

ही माझ्यासमोर घडलेली घटना आहे, सिगारेट पिताना ठसका लागला म्हणुन त्यावर पाणि पिताना त्याला काहीतरी झालं होतं. नथिंग सिरियस, दोन पेग पिउन पडल्यावर झोपतात ना तसा पडला होता तो स्ट्रेचरवर.

त्याची बायको ठार वेडी झाली होती त्या क्षणी. बघवत नव्हतं तिच्याकडं. तिचं त्याला फोन करंणं आणि आणि त्याचा तो न उचलणं हे तिच्या समजण्याच्या पलीकडं गेलं होतं. दोघंही नगरचे, त्याच्या नोकरीनिमित्त पुण्यात आलेले, लग्न होउन २ वर्षे झालेली, ती एमबिएच्या शेवटच्या वर्षाला होती असं कळालं नंतर.

तिच्याबरोबर आलेले सगळे शेजारी होते. जवळचं असं कोणिही नाही. डॉक्टरांनी त्याचा फोन काढुन त्याच्या सहका-याकडे दिला तर तिनं त्याला मारुन तो फोन परत त्याच्याकडे दे असं सांगितलं. शेवटी तिला ऑषध देउन झोपवावं लागलं.

त्या दोघांचे नातेवाईक येईपर्यंत आम्ही तिथंच होतो.

हे सगळं स्पष्ट लिहिंणं मला पहिल्यांदा शक्य झालं नाही, पण आता नाईलाजानं लिहितोय. मरण आणि त्यावरची एवढी भयानक रिअ‍ॅक्शन मी पहिल्यांदाच एवढ्या जवळुन अनुभवली.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Mar 2011 - 5:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आत्ता कळले. लिंक लागली. लेखाच्या सुरुवातीची घटना आणि शेवटची यातील दुवा व्यवस्थित साधला, पण मला मुळात ती शेवटची घटनाच नीट नव्हती कळली. चांगला प्रयत्न. सादरीकरणात थोडासा घोळ झाला. बघा, सुधारून टाकता येत का ते? (इथेच कि दुसऱ्या धाग्यात हा वेगळा मुद्दा)

धमाल मुलगा's picture

7 Mar 2011 - 7:35 pm | धमाल मुलगा

आयच्चा घो!

काय डेंजरफुल है राव. आत्ता उलगडा झाला. :(

आता आपण काय बिडी मारल्यावर पाणी पित नसतो बाबा.

ए आरे...बिडी चा आणि पाण्याचा काय संबंध आहे..मला काय भी न्हाय कळ्ळ..

धमाल मुलगा's picture

7 Mar 2011 - 8:00 pm | धमाल मुलगा

"सिगारेट पिताना ठसका लागला म्हणुन त्यावर पाणि पिताना त्याला काहीतरी झालं होतं. "
हा आहे.

च्यामारी अस होय...धन्स खुलाशा बद्दल..

sagarparadkar's picture

7 Mar 2011 - 5:43 pm | sagarparadkar

>> ही माझ्यासमोर घडलेली घटना आहे, सिगारेट पिताना ठसका लागला म्हणुन त्यावर पाणि पिताना त्याला काहीतरी झालं होतं. नथिंग सिरियस, दोन पेग पिउन पडल्यावर झोपतात ना तसा पडला होता तो स्ट्रेचरवर.
.
.
.
.
मरण आणि त्यावरची एवढी भयानक रिअ‍ॅक्शन मी पहिल्यांदाच एवढ्या जवळुन अनुभवली. <<

म्हणजे तो जिवंत होता की गेला होता? "नथिंग सिरियस" म्हणल्यामुळे वाटत होतं कि तो वाचला असावा ... पण त्या शेवटच्या वाक्यामुळे वाटतंय कि तो गेला होता .... नक्की काय झालं होतं ?

नथिंग सिरियस ही त्याच्या सहका-याची रिअ‍ॅक्शन होती रे. आणि त्यांनी त्याला ऑफिसात काहीतरी फर्स्टएड दिले होते, पण जास्त काही होउ नये म्हणुन त्याल दवाखान्यात आणले होते.

प्रचेतस's picture

7 Mar 2011 - 5:46 pm | प्रचेतस

सुन्न.

सखी's picture

7 Mar 2011 - 11:25 pm | सखी

वर काहीजणांनी लिहल्याप्रमाणे खरचं नीट काही कळले नाही. तुम्ही नंतर प्रतिसादात खुलासा केला असला, आणि परत लेख वाचला तरी त्याचा लेखात संदर्भ लागत नाही. तसेच ही वाक्ये गोंधळात अजुन भर टाकतात.

पण घरी , माझा फोन कुठं तरी ठेवलेला असतो आणि तो वाजतो, आणि तो जर लगेच उचलला नाही गेला तर त्या फोनच्या रिंगटोन मध्ये एक आवाज वाढतो, बायकोचा ' अरे उचल ना फोन ' आणि मी लगेच फोन उचलतो. एकदा माझ्या एका ऑफिसताल्या मित्रानं घरी जेवायला आला असताना हे टिपलं, आणि दुस-या दिवशी लंच झाल्यावर टोचलं, ' का रे बायको म्हणाली की लगेच उचलतो फोन.

इथे बायको फोन उचल म्हणत आहे म्हणजे फोन तीचा नसुन तिस-याच व्यक्तीचा आहे असे वाटते, वाटायला जागा आहे.

गोंधळुन गोंधळुन समजुन घ्यायचा प्रयत्न केलाय.

लेख कळला..एका ठिकाणीच गोंधळ झाला होता की ती बाई तिच्या समोरच नवरा (किंवा जवळची व्यक्ती ..भाऊ, प्रियकर)असून ही त्याला पडद्या बाहेरून फोन का करत आहे . पण आपल्या खुलाशानंतर तेही समजले की नवर्‍याची अवस्था पाहुन ती सैरभैर झाली होती आणि ती काय करतेय हे तिला समजत नव्हतं.
बा़की मला तरी खूप अवघड असं काही वाटलं नाही लेख समजायला. चांगलं लिहीलं आहे. फक्त तो खुलासा लेखातच नीट लिहायला हवा होता असे माझं मत आहे.

मीही घरच्यांचा फोन असेल तर तात्काळ उचलतो. बहुतेक जण असेच करत असावेत.

विनायक बेलापुरे's picture

8 Mar 2011 - 2:20 am | विनायक बेलापुरे

हर्षद सुन्न करणारी घटना आहे. आपण केलेला फोन 'उचल ना रे ' म्हणल्या बरोबर नवरा उचलेल अशी बायकोला वाटणारी वेडी आशा , पाहणार्‍याचे मन विदीर्ण करुन टाकते

या लिखाणावर टाकावी का नाही वाटते आहे पण
सगळेच गंभीर झालेत म्हणून एक सत्य घटना .....

आमच्या गावात वृद्धापकाळाने एका आजोबांचा मृत्यू झाला. सगळी तयारी झाली, आता तोंडात तुळशी पत्र आणि गंगाजल घालावे म्हणून तोंड उघडायला गेले तर आजोबांची दातखिळ बसलेली, त्यांचे तोंडच उघडेना. आजोबांचे समवयस्क मित्र म्हणाले त्याच्या तोंडाशी तंबाखूची चिमूट न्या बघा , झट्कन उघडेल. त्याही परिस्थितीत आख्खे घर फटाका फुटावा तसे हसले त्यांच्या घरच्यांच्या सकट.

इन्द्र्राज पवार's picture

8 Mar 2011 - 10:13 am | इन्द्र्राज पवार

सुरुवातीला मूळ लेख वाचून काही वेळ तसाच बसलो होतो, कारण "लिंक" लागेना शिवाय त्याचवेळी आलेल्या तीनचार प्रतिक्रिया वाचल्यावरही समजलो की, मी अगदीच काही एकटा नाही जे गोंधळले आहेत त्यांच्यात. असे वाटले, लेखक 'मोबाईल महात्म्य' सांगत आहेत. पण असो, आज हर्षदचा दुसरा सविस्तर खुलासा वाचल्यावर लक्षात आले की प्रकरण खरंच गंभीर होते. केवळ ठसक्याच्या निमित्ताने घडलेले रामायण समोर पाहिल्यावर जो परिणाम त्यांच्या मनावर झाला आहे तो कायम त्यांच्या लक्षात राहिल.

"...त्या दोघांचे नातेवाईक येईपर्यंत आम्ही तिथंच होतो...."

~ हे उत्तम काम केले तुम्ही मित्रांनी. अशा, विशेषतः दवाखाना, ठिकाणी कुणीतरी आपल्या सोबतीला आहे ही भावना त्या पेशंटच्या प्रियजनांला फार आधार देऊन जाते.

इन्द्रा