जगातली सगळ्यात फंडु मिसळ

सचीन जी's picture
सचीन जी in जनातलं, मनातलं
13 Jun 2008 - 9:58 am

नमस्कार मंडळी,

मी मिपा चा नुकताच सभासद झालो आहे.
नावावरुन आठवलं, जगातली सगळ्यात फंडु मिसळ पुणे - सोलापुर रस्त्यावर भिगवण या गावी मिळते.
ज्योती हॉटेल.
मी केवळ ही मिसळ खाण्यासाठी अनेकदा सोलापुर -पुणे - सोलापुर हा प्रवास कारने केला आहे ( सोपा रेल्वे पर्याय असताना).
मिपाकरांसाठी भिगवण वारी अनिवार्य आहे.

मिपा चा पंखा,
सचीन जी

पाकक्रियाप्रकटनशिफारसअनुभव

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

13 Jun 2008 - 10:02 am | धमाल मुलगा

सर्वप्रथम मिपावर हार्दीक स्वागत!

सचीन जी, भिगवणला नक्की कुठे? नुसतं ज्योतीवरुन कसं कळेल हो?
च्यायला, मी बारामतीचा आहे हो....मलापण नाही माहित :(
सांगा... सांगा लवकर सांगा पत्ता!

सचीन जी's picture

13 Jun 2008 - 10:11 am | सचीन जी

अरे सोप्प आहे.
भिगवण गावात. सोलापूर - पुणे महामार्गावरच. सोलापुरहुन पुण्याला जाताना डाव्या हाताला एक पेट्रोल पंप आहे.
त्याच्या समोर. एकदम फेमस आहे. गावात कोणीही सांगेल.

सचीन जी

अमोल केळकर's picture

13 Jun 2008 - 10:22 am | अमोल केळकर

ब्रेकिंग न्युज -
धमाल मुलाला- आता धमाल मुलीची कॉम्पीटिशन ( रेफः सभा. नं १०८४)
कृ. ह. घ्या.

धमाल मुलगा's picture

13 Jun 2008 - 10:32 am | धमाल मुलगा

श्री. केळकर,
अब आयेगा असली मजा :)
बघुया कोण जास्त वात्रटपणा करतंय. क्काय? :)

अमोल केळकर's picture

13 Jun 2008 - 10:07 am | अमोल केळकर

सचीन जी
जरा जास्त माहिती द्या की राव !
म्हणजे - काय आहे त्या मिसळीत विशेष ? जगातली फंडु मिसळ असे तुम्हाला का जाणवले ? इ.इ
भिगवण मला वाटते एस्.टी चा ऑफीशल स्टॉप आहे.
ज्योती हॉटेल किती दुर आहे?

मिपावर आपले स्वागत.

वेताळ's picture

13 Jun 2008 - 10:07 am | वेताळ

मिसळ-पाव जगातला सर्वोत्तम मिपा सोडुन कुठे मिळत असेल ह्या बद्दल शंका आहे.

(मिपा चा मिसळप्रेमी) वेताळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2008 - 10:12 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सचीन जी मिपावर स्वागत आहे. !!!

अवांतर : सामना दैनिक आम्ही नेहमीच वाचतो, आवडतो. संजय राऊत यांच्या रोखठोक चे आम्ही फॅन. पण त्यांचे स्वतःवरचे नियंत्रण काल सुटल्यासारखे वाटले. आता ते म्हणतात 'सामना' विडंबनाची व्यंगचित्राची परंपरा पुढे चालवत आहे.!!! पाहा नववधु प्रिया ही बावरते.

सचीन जी's picture

13 Jun 2008 - 10:22 am | सचीन जी

धन्यवाद मंडळी !

मी सोलापुरचा ! पण पुण्यनगरीला वांरवार येतो.
मिपा करांना प्रत्यक्ष भेटण्याची उत्सुकता आहे.
कसे जमेल हो ?

मिपा करांना भेटण्यासाठी तळ्मळणारा,
सचीन जी

विसोबा खेचर's picture

14 Jun 2008 - 1:01 am | विसोबा खेचर

भिगवणची मिसळ एकदा अवश्य खाल्ली पाहिजे...

धन्यवाद सचिनराव...!

तात्या.