कूटनतंत्राची (एन्क्रिप्शन) तोंडओळख - १

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जनातलं, मनातलं
24 Feb 2011 - 12:36 am

ब्लॅकबेरी आणि भारतीय सरकारमधल्या वादाला मिसळपाववरही तोंड फुटलेले पाहिले. ती चर्चा व त्यावरील प्रतिसाद पाहताना अनेकांना कूटनतंत्र (एन्क्रिप्शन), पासवर्ड इ. बद्दल जुजबी माहिती असली, तरी ती परिपूर्ण नाही; आणि अनेक संकल्पनांच्या बाबतीत काहीसा संभ्रम आहे, असे दिसून आले. विकिपिडिया आणि आंतरजालावर या विषयावर अनेक माहितीस्त्रोत उपलब्ध असले, अनेक विद्वानांनी यावर अत्युत्तम लेखन केलेले असले, तरी सर्वसामान्यांना कळेलशा पद्धतीने ही तोंडओळख मायमराठीच्या माध्यमातून करून द्यावी, म्हणून ही मालिका लिहिण्याचे धाडस करीत आहे. संगणकीय, आंतरजालीय दळणवळण आणि त्याची सुरक्षिततता यातील पदव्युत्तर शिक्षण आणि गेल्या चार वर्षांचा व्यावसायिक अनुभव जमेस धरून काहीशा अधिकारवाणीने, पण जमेल तितक्या सोप्या पद्धतीने लेखन करावयाचा मानस आहे.

कूटनतंत्राची गरज कोणाला कधी पडली, याबद्दल अनेक मनोरंजक कथा उपलब्ध असतील. पण मला वाटते अगदी पहिल्यांदा कूटनतंत्राची सगळ्यात जास्त गरज 'कबुतर जा जा जा, पहले प्यार की पहली चिठ्ठी साजन को दे आ' म्हणणार्‍या प्रेमवीरांना पडली असावी. यातला सगळ्यात मोठा धोका म्हणजे गरीब, बिचारे ते कबुतर! खलनायकाच्या एका गोळीची शिकार झालेल्या कबुतराकडून ती चिठ्ठी हिसकावून घेतली की झाले. त्यानंतरच्या परिणामांचा तर विचारच करायला नको. पण चिठ्ठी खलनायकाच्या हातात जरी पडली, तरी ती त्याला वाचताच येऊ नये, अशी सोय केली तर? म्हणजे चिठ्ठी असलेले ते पाकिट अशा पद्धतीने बंद करायला हवे की ते नायक/नायिका सोडून कोणाला उघडताच येऊ नये; आणि तिसर्‍या कोणाला उघडता आलेच, तर त्यातील मजकूर नायक/नायिका सोडून कोणाला वाचताच येऊ नये.

असे आपले प्रेमवीर हे केवळ एक उदाहरण झाले. मात्र वास्तव दुनियेत या प्रेमवीरांची जागा अतिरेकी, देशोदेशींची सरकारे, हेर, बहुराष्ट्रीय कंपन्या आणि तुमच्याआमच्यासारखे सर्वसामान्य लोक, कोणीही घेऊ शकते. उद्देश एकच - एकमेकांशी जो संवाद साधायचा, त्याचा अन्वयार्थ फक्त ठराविक लोकांनाच लावता यावा आणि/किंवा असा काही संवाद साधला जात आहे किंवा नाही, हे ठराविक लोक सोडून इतर कोणाला कळूच नये!

समजा, मला माझ्या मित्राला चिठ्ठी पाठवून सांगायचे आहे - रात्री आठ वाजता कट्ट्यावर भेट. पण मला असे वाटते आहे की आम्हा दोघांपैकी कोणाच्याही पालकांच्या हातात ती चिठ्ठी पडली की आम्हा दोघांनाही रट्टे पडणार. मग मी 'रात्री आठ वाजता कट्ट्यावर भेट' हेच 'टभे रवट्ट्याक ताजवा ठआ त्रीरा' असे लिहून पाठवले तर? मित्राला खाजगीत फक्त इतकेच सांगायचे - तुला माझ्याकडून मिळणार्‍या चिठ्ठीतील शब्द उलटे वाच. झाले. आम्हा दोघांचेही पालक आमच्याइतके हुशार नाहीत, असे गृहीत धरले, तर आमच्यातला संवाद त्यांना कळणार नाही. कारण त्यांच्या हाती चिठ्ठी पडलीच, तर त्यांना 'टभे रवट्ट्याक ताजवा ठआ त्रीरा' हे चिठ्ठीत दिसेल; मात्र शब्द 'उलटे' वाचायचे आहेत, हे त्यांना माहीत नाही तर फक्त माझ्या मित्राला माहीत आहे.

हे ठिकाणप्रकटनविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

गोगोल's picture

24 Feb 2011 - 12:51 am | गोगोल

मस्त आयडियेची कल्पना आहे. येउ देत अजुन.
थोडा सर्च केल्यावर ही छान लिन्क मिळाली. बघा काही उपयोग होतो आहे का ते:

http://www.cs.virginia.edu/~shelat/651/www/chap1.pdf

मालिका इंटरेस्टींग असणार हे प्रस्तावना वाचुनच समजयत.
(उत्सुक) गणा

पंगा's picture

24 Feb 2011 - 1:26 am | पंगा

अशीच सविस्तर माहिती येथे पुरवणेचे कोणी जाणकाराने मनावर घ्यावे, अशी सूचना त्या धाग्यावर करण्याच्या विचारात होतो, तोवर हा लेख आला.

स्वागत आहे.

वा.... बेलाशेठ,
सुरवात तर झकास झालीय...
टेनन बमचा चॅप्टर मराठीत वाचतोय असेच वाटतय... ज्ञानेश्वरानी गीता मराठीत आणली त्याच तोडीचे हे कार्य आहे... आजुन येउ द्या....
(नेटवर्क प्रेमी) कवटी

विकास's picture

24 Feb 2011 - 1:24 am | विकास

पहीला भाग अगदी तोंडओळख असला तरी आवडला. पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे.

अथवा या लेखासाठी:

˙ेहआ कुस्तउ ालयाचाव गाभ ेचढुप ˙ालडवआ ीरत ालसअ खळओडंोत ीदगअ गाभ ालीहप

:-)

प्राजु's picture

24 Feb 2011 - 1:24 am | प्राजु

उत्तम! येउदे अजून.

स्वाती२'s picture

24 Feb 2011 - 1:32 am | स्वाती२

पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

आनंदयात्री's picture

24 Feb 2011 - 1:50 am | आनंदयात्री

छान कल्पना. भाग फार लहान वाटला, मोठा येउ देत.

(माझ्या मते व्यावसायिक एन्क्रिप्शन अल्गोरिदम लिहला जायला दुसरे महायुद्ध यावे लागले होते, ते आणले प्रथम जर्मनांनी एनिग्माच्या रुपाने पण नंतर मित्र राष्ट्रांनी (की इंग्लंडने ?) डिक्रिप्शन की जनरेट करायचे लॉजिक शोधल्याने जर्मनांना फार नुकसानही सोसावे लागले होते.)

भडकमकर मास्तर's picture

24 Feb 2011 - 1:52 am | भडकमकर मास्तर

भारी आहे. हे वाचणार आहे.. येऊद्यात अजून

नितिन थत्ते's picture

24 Feb 2011 - 8:09 am | नितिन थत्ते

तोंडओळख आवडली.

धमाल मुलगा's picture

24 Feb 2011 - 7:19 pm | धमाल मुलगा

सहीच रे बेला.
एन्क्रिप्शनच्या ओळखीची सुरुवात एकदम सुटसुटीत!

आवडला हा निर्णय.

असुर's picture

24 Feb 2011 - 8:44 pm | असुर

लंपनचे नकादुचेण्यापकासके आठवलं!

अजून लेखांची वाट पहातोय..

--असुर

रामदास's picture

24 Feb 2011 - 9:49 pm | रामदास

आवडली

नाटक्या's picture

25 Feb 2011 - 12:24 am | नाटक्या

बेलाशेट,

सुरुवात छानच झाली आहे परंतू मला वाटते की आधी जर कुटतंत्राचा संक्षीप्त इतिहास सांगीतला असता तर बरे झाले असते. त्या योगे प्राचीन काळी गुपीते कशी जपायचे आणि कोणकोणत्या क्लुप्त्या योजायचे याची माहिती सांगीतली असती तर मालीका अजुन जरा मनोरंजक झाली असती. जसे की ज्युलियस सिझर याने वापरलेली कुटनतंत्राची पध्दत वगैरे वगैरे वगैरे...

बाकी माहिती उपयुक्त.. (मोकलाया दहि दिशा हे सुध्दा कुटनतंत्राचा एक नमुना म्हणावे काय?)

बेसनलाडू's picture

25 Feb 2011 - 12:48 am | बेसनलाडू

पुढच्या भागात दिलेले सब्स्टिट्यूशन सायफरचे उदाहरण थोडेफार सीझर सायफरच्या जवळ जाणारे आहे. कोणत्याही एका विशिष्ट सायफर किंवा कृतीक्रमावर भर न देता केवळ पूरक उदाहरण म्हणून लिहिणे, या मार्गाने लेखन केले आहे. मूलभूत संकल्पना स्पष्ट व्हाव्यात आणि चुकीचे समज, संभ्रम दूर व्हावेत - अगदीच दूर झाले नाही तर बरेच कमी व्हावेत - या उद्देशाने लिहितो आहे.
(उद्दिष्टाभिमुख)बेसनलाडू

लेखनमूल्याच्या आणि रंजकतेच्या दृष्टीने विचार करता कूटनतंत्राचा इतिहास, थोडीबहुत गोष्टीवेल्हाळ उदाहरणे दिली असती, तर एकंदर लेखनरुक्षता कमी करता आली असती, असे वाटते. त्याबद्दलची तुमची सूचना पूर्ण मान्य! पुढच्या भागात असे करता आले, तर नक्की पाहतो.
(सहमत)बेसनलाडू