माझा आवडता प्राणी: "गाढव"

हरिप्रसाद's picture
हरिप्रसाद in जनातलं, मनातलं
15 Oct 2007 - 2:28 pm

तसे मला सगळेच प्राणी आवडतात पण लांबुनच बघायला ते ठिक वाटतात. पण या सर्व प्राण्यांमध्ये "गाढव " हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे.

गाढवाला २ डोळे, २ कान, ४ पाय व १ शेपूट असते. त्याच्या अंगावर काहि वेळा पट्टे मारलेले दिसतात. त्यावेळी ते मला झेब्र्यासारखे वाटते. आपण रस्ता नेहमी झेब्रा क्रोसिंग वरुनच क्रोस करवा. झेब्रा हा प्राणी प्रामुख्याने जंगलात आढळतो. पण आजकाल मुळी जंगलच आढळत नाही. त्यामुळे झेब्रा कुठे असतो ते मला माहित नाही. कमल हसन च्या "हिदुस्थानी" नावाच्या सिनेमामध्ये खुप सरे झेब्रे दाखवले होते त्यामुळे सिनेमावाले झेब्रे पाळत असल्याची मला शक्यता वाटते.पण सलमान खान नावाचा नट हरणांच्या शिकारीबरोबरच झेब्र्याची सुध्धा शिकार करत असल्याची शक्यता असल्याने सध्या सिनेमात झेब्रे दाखवत नाहित. मला "किंगकॉग" नावाचा अस्वलाचा सिनेमा आवडतो.

ईसापनितीमध्ये गाढवाच्या खुप गोष्टी आहेत. माझी आज्जी मला रोज झोपताना गोष्टी सांगते. पण ईसापनितीमध्ये गाढवाला नेहमीच बावळट म्हणुन दाखविले आहे, हे चुकिचे आहे. त्यामध्ये सांगितल्या प्रमाणे गाढवाला पदार्थांची चव कळत नाही. पण मला गोड पदार्थांची चव खुप आवडते. माझे "बाबा" व "शाळेचे गुरूजी" पण मला नेहमी "गाढव आहेस" असे म्हणतात. त्यांच्यापेक्षा माझी आई माझा खुप लाड करते, म्हणुन ती मला खुप आवडते. ती मला गोड्-गोड पदार्थ खायला देते.

गाढवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ते खुप लाथा मारते. "WWF" नावाच्या खेळात "BATISTA" नावाचा प्राणी सुध्धा खुप लाथा मारतो पण तो गाढव नसुन रेडा आहे. माझा दादा म्हणतो त्या खेळातिल सर्व काही खोटे असते त्यामुळे मला तोच गाढव असल्याची शंका येते. मी त्याला असे म्हटल्यावर त्याने मला गाढवासारख्या लाथा मारल्या.पण मला "WWF" पहायला खुप आवडते. अजुन १ गोष्ट म्हणजे गाढव रात्री खुप जोरात "ढोंच्यु .... ढोंच्यु" असे ओरडत बसते त्यामुळे माझी झोप मोड होते. मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते. त्यामुळे कधिकधी मला खुप रडु येते.

माझे बाबा म्हणतात की "गाढवाच्या मागे व साहेबाच्या पुढे कधी उभे राहु नये" साहेब व गाढव यांच्यातिल संबंध मला काहि कळला नाही. कदाचित ते पण लाथा मारत असावेत. तसा माझा साहेब सुध्धा गाढवच आहे. म्हणुन मी त्यांच्या पुढे ऊभे न राहता शेजारी ऊभे राहतो.

गाढव शक्यतो रस्त्यावर राहते. भारतात रस्त्यावर भिकारी पण राहतात. काहि दिवसांपुर्वी भिकार्‍यांवर "ट्राफिक सिग्नल " नावाचा सिनेमा आला होता. तो मला मुळीच आवडला नाही. खुप घाण सिनेमा होता. आपल्याकडे " आडला हरि गाढवाचे प्पय धरी " अशी १ म्हण आहे. पण तो पुढचे धरतो का मागचे ते मला माहित नाही. अजुन १ गोष्ट म्हणजे त्या म्हणीतिल "हरि" मी नसुन दुसरा कोनी तरी आहे. तो कोण आहे हे मला माहीत नाही.

"गाढवीच्या" अशी एक शिवी सुध्धा आहे. मला अजुन खुप शिव्या येतात पण माझे बाबा मला शिव्या दिल्यावर मारतात. पण एकंदरित शिवीगाळ चांगली नव्हे त्यामुळे मार बसतो. माझी ताई सकाळी पाणी "गाळ" आहे असे ओरडत होती, मी तिला गाढव म्हणतो.

विनोदमुक्तकविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

15 Oct 2007 - 7:10 pm | प्रकाश घाटपांडे

हिंदीत " चूडीवाले बाबा" अशी कथा पाठ्यपुस्तकात वाचली होती. कुणाची होती लक्शात नाही. ( प्रेमचंदच्या नावावर खपवावी अस डोक्यात होतं पण तसं नसेल तर लोक मलाच गाढव म्हणतील या भीतीने मी तसे लिहिले म्हाई) त्यातला तो कासार गाढवाला पण शिव्या देत नाही. कारण त्याच्या व्यवसायाचा संबंध हा स्त्रियांच्या बांगड्या भरण्याशी असतो. त्यामुळे तोंडात वंगाळ भाषा नको. म्हणुन तो गाढवाशी पण प्रेमाने बोलतो.
कोण म्हणतो गाढवाला अक्कल नसते. मी एकदा पाउस आल्यावर बसस्टॊपचा आसरा घ्यायला गेलो तर माझ्या अगोदर गाढव तिथे हजर.
अवांतर- खेचर ( विसोबा नव्हे) कसं काय निर्माण झाल हो?
प्रकाश घाटपांडे

देवदत्त's picture

15 Oct 2007 - 9:34 pm | देवदत्त

मजा आली वाचून...

मला तो आवज चांगला काढता येतो पण तो काढल्यावर माझी आई माझ्या कानाखाली आवज काढते.
धमाल :D

विश्वजीत's picture

17 Oct 2007 - 10:47 am | विश्वजीत

आता पुढचा निबंध कोणावर?

विसोबा खेचर's picture

18 Oct 2007 - 7:23 am | विसोबा खेचर

आता पुढचा निबंध कोणावर?

हेच विचारतो! :)

गाढवावरचा लेख आवडला! साधा, सोपा परंतु तेवढाच सुरेख वाटला..

आपला,
(गाढविचा!) तात्या.

हरिप्रसाद's picture

18 Oct 2007 - 10:08 am | हरिप्रसाद

आपल्याला पुर्वी याच ठिकाणी " माझा आवडता पक्षी : कोंबडी " नावाचा निबंध वाचल्याचे आठवत असेलच.
पाहू पूढ्चा निबंध माणसावर लिहू..............

भाग्यश्री's picture

20 Oct 2007 - 11:43 am | भाग्यश्री

हे सगळं तुम्हीच लिहीले आहे का? कारण हे ऑर्कुटवर कम्युनिटीज मधे वाचल्याचे आठवत आहे... खुलासा करावा...

जालिम लोशन's picture

26 Aug 2019 - 2:04 pm | जालिम लोशन

कोणाला स्फुर्ती मिळाल्यास अजुन विषय मिळतील.