PAN ची गंमत

गौरव व्यवहारे's picture
गौरव व्यवहारे in जनातलं, मनातलं
9 Feb 2011 - 1:07 pm

मला ही गोष्ट बरिच उशिरा कळली, आता CA असुनही ही गोष्ट एवढ्या उशिरा कळणे म्हणजे खरच लाज आहे, पण म्हणतात ना Its never too late. तर ठिक आहे, तर गंमत अशी की तुम्ही तुमचा PAN ज्याला काही लोक PAN नंबर सुद्धा म्हणतात, आता पॅन म्हणजे Permanant Account Number मग त्याला पुन्हा नंबर का म्हणायचे, काही लोक tds कापला का अस म्हणतात, आता tds म्हणजे tax deducted at source, मग अजुन काय कापणार आहे त्यात, हे म्हणजे दळण दळुन आणल्या सारखे आहे.
तर तुमचा जो PAN आहे, तो अशा प्रकारे असतो की,

१ ते ५ फिल्ड हे अल्फाबेट्स असतात
६ ते ९ फिल्ड हे नंबर असतात
१० वे फिल्ड हे पुन्हा अल्फाबेट असते

आता PAN चे ५ वे अक्षर जे आहे ते तुमच्या आडनावाचे पहिले अक्षर असेल, म्हणजे जोशी असेल तर J, पाटिल असेल तर P या प्रकारे, आणि जर कंपनीचा PAN असेल तर कंपनीच्या नावाचे पहिले अक्षर हे कंपनीच्या PAN चे ५ वे अक्षर असते. ही गोष्ट तर अनेकांना माहित आहे, पण अजुन एक गोष्ट आहे.

तुमच्या पॅनचे ४ थे अक्षर जे आहे तो आहे तुमचा Income tax status, म्हणजे जर तुम्ही individual असाल तर तो P असेलच आणि कंपनी असेल तर C, पार्टनरशिप असेल तर F, Trust असेल तर T, या गोष्टीवर बर्‍याच लोकांचा विश्वास नाही बसत पण ते खरे आहे, हव तर स्वत: चेक करुन बघा.
PAN तुमची identity आहे, ती जपुन ठेवा उगाच कोणालाही PAN देऊ नका, PAN चा दुरुपयोग करणे शक्य आहे, ते कसे आहे ते नाही सांगत, पण काळजी घ्या आणि कोणी खोटा PAN देत असेल तर त्या पासुन सुद्धा सावध राहा, आता काही गोष्टी तर आहेतच आपल्या हातात. आणि हो इतरांच्या हातात सुद्धा.

अर्थकारणविचारसल्लामदत

प्रतिक्रिया

टारझन's picture

9 Feb 2011 - 1:14 pm | टारझन

आपण सी ए आहात हे कळले :) भविष्यात आपल्याला मिपामधुन एखाद दुसरा क्लायंट भेटण्यासाठी शुभेच्छा :)

बाकी सगळी माहीत आधीच माहिती असल्याने नवे काही नाही. पॅन आपण तसा ही कोणाला देत नाही , ड्युप्लिकेट वापरण्याचा संबंधच नाही :)

बाकी एफ सी कॉलेज रोड ची आठवण ताजी झाली :)

- गैर व्यवहारे

परिकथेतील राजकुमार's picture

9 Feb 2011 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार

PAN तुमची identity आहे, ती जपुन ठेवा उगाच कोणालाही PAN देऊ नका, PAN चा दुरुपयोग करणे शक्य आहे, ते कसे आहे ते नाही सांगत, पण काळजी घ्या

का बॉ ? अहो ते कळले तर हा लेख वाचणारे मिपाकर थोडे सावध होणार नाहीत का? खरेतर हेच सगळ्यात आधी तुम्ही सांगायला हवेत. ति आकड्यांची जादू द्या सोडून.

अवांतर :-

बाकी सगळी माहीत आधीच माहिती असल्याने नवे काही नाही.

साला आमच्या टार्‍या म्हणजे CA च्या चार पावले पुढे असतो.

टारझन's picture

9 Feb 2011 - 1:35 pm | टारझन

PAN चा दुरुपयोग करणे शक्य आहे, ते कसे आहे ते नाही सांगत,

येथे अधिक माहिती हवी असल्यास अधिक आकार पडेल असे वाटुण युयुत्सु अण्णांची आठवण येते काय ?

- कौरव सबहारे

वपाडाव's picture

9 Feb 2011 - 3:49 pm | वपाडाव

साला आमच्या टार्‍या म्हणजे CA च्या चार पावले पुढे असतो.

असणारच की हो...
फांद्या नाही का लोंबकळत...
चार पावले काय मी तर म्हणतो ४ मैल पुढ असाव माणसाने...

रजनिकांत च्या धोब्याशी सहमत . :)

श्री परिकथेतील राजकुमारांना त्यांची एक घोडचुक लक्षात आणुन देऊ इच्छितो.

तो ड्वायलॉक
'साला जिथे सारे CA संपतात तिथे आमचा टार्‍या सुरु होतो'
असा आहे. धनुर्वात

प्रचेतस's picture

9 Feb 2011 - 1:21 pm | प्रचेतस

एफ सी कॉलेज रोड पाठोपाठ पुणे (PUNE) चे दिर्घरूपही आठवले.

गौरव व्यवहारे's picture

9 Feb 2011 - 2:53 pm | गौरव व्यवहारे

मी सी ए जरी असलो तरी सध्या नोकरी करतो त्यामुळे क्लायंट भेटण्याची सध्यातरी गरज नाही. :)
आपल्याला सर्व माहिती आधीच असल्याने आपले अभिनंदन.
बाकी एफ सी कॉलेज रोड बरोबर "बी एम सी सी कॉलेज" हे सुद्धा म्हणणारे आहेतच की :)

धन्यवाद, पॅन नंबर कोणाला देऊ नये हे ठाऊक होते पण पॅनची अक्षरे - त्यांचा अर्थ वगैरे ठाऊक नव्हता.

मुलूखावेगळी's picture

9 Feb 2011 - 1:26 pm | मुलूखावेगळी

तुम्ही सी.ए. तुमचे नाव पण व्यवहारे.
क्या बात है!!!!!!!!

बाकि असेच मोबाइल चे १० आकड्यांचेही असेच विश्लेषण सांगते १२३४५६७८९०
ह्यापैकि १२ हे मोबाइल कंपनी ओळखायला.
३४ हे विभाग ओळखयला (सिम जिथुन डिस्ट्रीब्युट झाले ते सध्या वापरणार्‍याचा नव्हे)
आनि ५६७८९० हा उर्वरीत नं दिलेला/चॉइस करुन घेतलेला.

निवेदिता-ताई's picture

9 Feb 2011 - 1:48 pm | निवेदिता-ताई

धन्यवाद....पॅन आणी मोबाईल नंबर चे अधिक माहिती बद्दल.

गौरव व्यवहारे's picture

9 Feb 2011 - 2:58 pm | गौरव व्यवहारे

ही माहिती आगळीच की !

विश्वनाथ मेहेंदळे's picture

9 Feb 2011 - 3:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

MNP आल्यापासून हे आता रद्दबातल होणार. म्हणजे निदान पहिले दोन आकडे पाहून ओळखता नाही येणार कंपनी. हा थोडा तोटाच झाला त्या MNP चा.

मुलूखावेगळी's picture

9 Feb 2011 - 4:51 pm | मुलूखावेगळी

MNP आल्यापासून हे आता रद्दबातल होणार. म्हणजे निदान पहिले दोन आकडे पाहून ओळखता नाही येणार कंपनी. हा थोडा तोटाच झाला त्या MNP चा

हो बरोबर आहे.इथे अ‍ॅप्लिकेबल नाहीये.

वपाडाव's picture

9 Feb 2011 - 3:51 pm | वपाडाव

मी आजतागायत ४ नं. बदलले आहेत,
आणी ३ राज्य फिरलो आहे,
प्रत्येक वेळी वेगळ्या कंपनीची सेवा वापरली आहे,

१२३४५६७८९०
ह्यापैकि १२ हे मोबाइल कंपनी ओळखायला.

97xxxxxxxx हा क्रमांक गुजरातेत AIRTEL, VODAFONE & IDEA या तीनही कंपन्या देतात...
तसेच 9881xxxxxx- IDEA MH, 9860xxxxxx-AIRTEL MH, 9823xxxxxx-VODAFONE MH..

कदाचित तुमची गफलत, विभाग आणी सेवा पुरविणारी कंपनी यामधील क्रमांक देण्यात झाली असावी...
पण असे स्पष्टीकरण तर मुळातच लागू होत नाही....

चुणुक आगळी

मुलूखावेगळी's picture

9 Feb 2011 - 4:23 pm | मुलूखावेगळी

बाय द वे
हे मला मी १ मोबाइल ऑपरेटर कंपनी च्या टेकनिकल ट्रेनिन्ग मधेसांगितलेले.२००६ ला आनि ते सत्य आहे.

कदाचित तुमची गफलत, विभाग आणी सेवा पुरविणारी कंपनी यामधील क्रमांक देण्यात झाली असावी...
पण असे स्पष्टीकरण तर मुळातच लागू होत नाही...

पन आता आधिकधिक नम्बर्स च्या वाढत्या मागनी मुळे क्रायटेरिया बदललेला असु शकतो.
पन पुर्वी हेच होते.
जरा मोबाइल कम्पनीत अनुभवी/जुना ओफिसर ओळखीचा असेल तर विचारा.
-फस्लाडाव

वपाडाव's picture

9 Feb 2011 - 4:34 pm | वपाडाव

माझे वडील २००४ पासून 9823XXXXXX असलेला VODAFONE(त्या वेळचे HUTCH) वापरतात
नि मी 9860XXXXXX AIRTEL अगदी तेव्हापासूनच वापरतो...
आता सांगा.
सालाचा उल्लेख फक्त आपल्या माहिती साठी होता....

बात चाहे इतनीसी क्यू ना हो,
अक्लमंदी समझदारी मे है..

मुलूखावेगळी's picture

9 Feb 2011 - 4:52 pm | मुलूखावेगळी

मी रीलायन्स CDMA चे ट्रेनिन्ग घेतलेले आनि तिथे तसेच सांगितलेले
पन मग हे GSM ला अप्लाय होत नसेल कदाचित.
पन चुकिचे आहे असे नाही.
पन लॉजिक वाप्रुन बघा हीच किन्वा अशी काहीतरी सिस्टीम असल्याशिवाय का नम्बर्स चा ट्रॅक ठेवता येत असेल कम्पन्यांना.
जसे सगळ्या धुण्याची WASHING MACHINE अ‍ॅटोमॅटिक आनि सेमी अ‍ॅटोमॅटिक असत्तात तसेच ना

वारकरि रशियात's picture

9 Feb 2011 - 4:57 pm | वारकरि रशियात

संमं. ला विनंती आहे की ही सर्व चर्चा 'mobile number ची गंमत' या शीर्षकाने मौजमजा / विरंगुळा या खाली हलविण्यात यावी.

मुलूखावेगळी's picture

9 Feb 2011 - 4:59 pm | मुलूखावेगळी

+१००

वपाडाव's picture

9 Feb 2011 - 5:32 pm | वपाडाव

मग तसे म्हणा ना...
आमचा मुळी या CDMA प्रणाली वर विश्वास नाहीच..
मी तुमच्या ट्रेनर किंवा ट्रेनिंगवर ताशेरे ओढत नाहीये...
फक्त माझे जे निरीक्षणाअंती निष्कर्ष आहेत ते सांगतोय...
तुमच्या ट्रेनिंग बद्दल यत्किंचितही शंका नाहीये मला....

अशी काहीतरी सिस्टीम असल्याशिवाय का नम्बर्स चा ट्रॅक ठेवता येत असेल कम्पन्यांना.

अर्थातच त्यात लॉजिक असणार...

कृ.क.ह.घ्या.

छोटा डॉन's picture

9 Feb 2011 - 2:03 pm | छोटा डॉन

माहितीसाठी धन्यवाद :)

>>PAN चा दुरुपयोग करणे शक्य आहे, ते कसे आहे ते नाही सांगत,
ह्याबाबत जरा अधिक सांगावे.
दुरुपयोग कसा होऊ शकतो आणि झाला तर काय करावे ?

त्याचे काय आहे की एक जुना 'याहु ग्रुप' होता / आहे, त्यावर म्हणे लोकांचे 'पॅन नंबर ( आम्ही असेच म्हणतो)' हॅक केले जात होते, खरे खोटे काकांना माहित, आजकाल त्यांचे दर्शन पण दुर्लभ झाले आहे :)

- छोटा डॉन

गौरव व्यवहारे's picture

9 Feb 2011 - 2:47 pm | गौरव व्यवहारे

तर असे होऊ शकते, की माझ्या कंपनीत मला घरभाडेची पावती द्यायची आहे, त्यात मी १५००० भाडे दाखवले आणि घरमालक म्हणुन तुमचा PAN दिला, किंवा मला खरच कोणाची लावायची असेल तर मी इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर तुमच्या नावाने खाते उघडुन तुमचे रिटर्नसुद्धा फाइल करु शकतो, अनेक गोष्टी जिथे PAN देणे आवश्यक असते तिथे मी तुमचा PAN सुद्धा देऊ शकतो आणि एकदा का PAN दिला की ती माहिती डायरेक्ट इन्कम टॅक्सच्या डिपा. कडे जाते..

छोटा डॉन's picture

9 Feb 2011 - 2:57 pm | छोटा डॉन

तुम्ही म्हणता ते शक्य आहे.
तसा लफडा होऊ शकतो.

मात्र ते इन्कमटॅक्सवाले 'वार्षिक १० लाख' च्या आत उत्पन्न असणार्‍यांची फाईल पहातही नाहीत असे ऐकले आहे.
असो, काळजी घेतलेलीच बरी. माहितीसाठी आभार ...

- छोटा डॉन

एकदा का PAN दिला की ती माहिती डायरेक्ट इन्कम टॅक्सच्या डिपा. कडे जाते..

क्रॉसचेक करता येत नाही का?

गौरव व्यवहारे's picture

9 Feb 2011 - 3:12 pm | गौरव व्यवहारे

भाडे प्रकारात तरी नाही, पण इतर प्रकारात होऊ शकेल

लावायचीच असेल तर इतरही मार्ग आहेत की हो....
फक्त PAN माहिती झाल्यावरच लागेल असे थोडीच आहे...
आता बघा ना,परवाच,
असं व्हायला नको होत,
पण चीपळून्कारांची लागलीच नाही का?
त्यांची लौकरात लौकर या प्रकरणातून सुटका होवो अशी इच्छा...
पण हे सांगितल्याबद्दल शत शत धन्यवाद....

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Feb 2011 - 12:13 pm | ज्ञानोबाचे पैजार

आ. व्यवहारे साहेब,

माझ्या माहीती प्रमाणे इन्कम टॅक्सच्या वेबसाईटवर तुमच्या नावाने खाते उघडण्या साठी तुमच्या PAN बरोबर ईतरही माहीती द्यावी लागते जसे तुमची जन्म तारीख. वडीलांचे नाव इत्यादी. ज्या व्यक्तीला तुमची संपुर्ण माहीती असेल, आणि ज्याला माहीत असेल की सध्या तुमचे खाते नाही तोच हा उद्योग करु शकेल.

असे बनावट खाते तयार करुन कोणाचाही काही फायदा होत असेल असे मला वाटत नाही. बनावट PAN ने नक्की होउ शकतो. अशा काही केसेस आयकर खात्याने मधे पकडल्या होत्या.

कायद्या प्रमाणे आवश्यक तेथे PAN देणे गरजेचे असते. नाही तर उत्पनाच्या स्त्रोता मधुन होणारी वजावट २०% पर्यंत सुध्दा जाऊ शकते.

सर्वात महत्वाचे म्हणजे समजा असे बनवट खाते जर कोणी काढलेच तर तुम्ही ते आपल्या आयकर अधिकार्‍याचा निदर्शनास आणुन ताबडतोब बंद करु शकता.

आयकर खात्यापासुन कोणतीही माहीती लपवणे (आणि ते सुध्दा काहीही कारण नसताना) ईष्ट नाही असे मला वाटते. विशेषतः पगारदार माणसाने तर खात्याचा अजिबात बाऊ करु नये. कारण त्याच्या मालकावरच आयकरखात्याने सर्व जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे आपले काम एकच १६ नंबर मिळाला की विवरण पत्र भरायचे.... बास.....

सर्वात महत्वाचे म्हणजे माझ्या कडे तुमची थोडीशी माहीती असेल तर तुमचा PAN शोधुन काढणे काहीही अवघड नाही.
त्या मुळे तो क्रमांक उगाचच लपवण्यात काहीही हशील नाही.

महेश काळे's picture

9 Feb 2011 - 2:07 pm | महेश काळे

धन्यवाद...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2011 - 5:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पॅनची ही भानगड माहिती नव्हती. :)

माहितीबद्दल आभार.

-दिलीप बिरुटे

धमाल मुलगा's picture

9 Feb 2011 - 10:02 pm | धमाल मुलगा

भारीए की. हे माहितीच नव्हतं! (स्वगतः जसं काय सगळं माहिती असतंच असा आव आणतोय की मी. :) )

PAN तुमची identity आहे, ती जपुन ठेवा उगाच कोणालाही PAN देऊ नका, PAN चा दुरुपयोग करणे शक्य आहे,

मी बर्‍याचदा आयडी म्हणून PANची फोटोकॉपी देतो.. उदा. नेट जोडणी/मोबाईल/क्रेडिटकार्ड इत्यादींसाठी.
ते कितपत धोकादायक असु शकतं?

शिल्पा ब's picture

10 Feb 2011 - 3:37 am | शिल्पा ब

त्यापेक्षा ड्रायव्हींग लायसन्स असेल तर त्याची फोटो कॉपी देत चला...जास्त सुरक्षीत.

रविंद्र प्रधान's picture

10 Feb 2011 - 12:30 pm | रविंद्र प्रधान

त्यापेक्षा ड्रायव्हींग लायसन्स असेल तर त्याची फोटो कॉपी देत चला...जास्त सुरक्षीत >>>
बॅंकेत खाते उघडताना पॅनकार्डाचीच प्रत द्यावी लागते. तसच TDS वेळीही पॅनकार्डाचीच प्रत द्यावी लागते.

माझं शाळेतलं लायब्ररीचं आयकार्ड चालु शकेल का ? मी ते रिटर्न न केल्यामुळे अजुनही माझ्याकडेच आहे :)

कापूसकोन्ड्या's picture

9 Feb 2011 - 10:08 pm | कापूसकोन्ड्या

तुमचा पॅन आठवत नाही का?
पहीले नाव आडनाव आणि जन्मतारीख आठवत असेल तर खालच्या लिन्क वर आपल्याला नंबर इन्स्टंटली मिळेल.
ही साईट खुद्द इन्कम टॅक्स डिपार्टमेन्ट ची आहे. स्वतः अनुभव घ्या.
https://incometaxindiaefiling.gov.in/portal/knowpan.do

कापूसकोन्ड्या's picture

9 Feb 2011 - 11:12 pm | कापूसकोन्ड्या

चुकून चुक झाली दोनदा प्रतिक्रीया दिली म्हणून काढून टाकला.

कापूसकोन्ड्या's picture

9 Feb 2011 - 11:04 pm | कापूसकोन्ड्या

खरच मजेशीर माहीती आहे.
आता १ ते ३ आणि दहा या स्थाना बद्दल पण लॉजिक सांगा. ( नेमिंग कन्वेन्शन)

-Now find out logic for 1st to 3rd, and 10th

सुनील's picture

10 Feb 2011 - 12:43 am | सुनील

ही गोष्टदेखिल मला बरेच उशीरा कळली.

आपल्या नावाचे पहिले फिल्ड हे अल्फाबेट असते. शेवटचे फिल्डही अल्फाबेट असते. शिवाय मधली सगळी फिल्ड्सदेखिल अल्फाबेट्सच असतात.

आपल्या टेलिफोन नंबरचे पहिले फिल्ड हे नंबर असते. शेवटचे फिल्डही नंबरच असते. शिवाय मधली सगळी फिल्ड्सदेखिल नंबरच असतात.

कापूसकोन्ड्या's picture

10 Feb 2011 - 1:12 am | कापूसकोन्ड्या

ही गोष्टदेखिल मला बरेच उशीरा कळली.

आपल्या नावाचे पहिले फिल्ड हे अल्फाबेट असते. शेवटचे फिल्डही अल्फाबेट असते. शिवाय मधली सगळी फिल्ड्सदेखिल अल्फाबेट्सच असतात.

आपल्या टेलिफोन नंबरचे पहिले फिल्ड हे नंबर असते. शेवटचे फिल्डही नंबरच असते. शिवाय मधली सगळी फिल्ड्सदेखिल नंबरच असतात.

काय सांगता?
वा वा काय प्रतिक्रिया आहे. हा शोध लावल्या बद्दल आपले अभिनंदन
आपला इतका गाढा अभ्यास आणि प्रचंड कष्ट आणि एखाद्या गोष्टीसाठी खोलात जाउन संशोधन करणे याला इतिहासात याला तोड नाही.
असा अभ्यास कसा करतात ते आम्हाला सांगा बरे.

सुनील's picture

10 Feb 2011 - 1:22 am | सुनील

वा वा काय प्रतिक्रिया आहे. हा शोध लावल्या बद्दल आपले अभिनंदन
धन्यवाद!

आपला इतका गाढा अभ्यास आणि प्रचंड कष्ट आणि एखाद्या गोष्टीसाठी खोलात जाउन संशोधन करणे याला इतिहासात याला तोड नाही.
कसचं कसचं!

एखाद्या इग्नोबल पुरस्काराकरीता वशिला लागतो का हे बघाल का?

कापूसकोन्ड्या's picture

10 Feb 2011 - 1:33 am | कापूसकोन्ड्या

वशीला कशाला?
इतक्या स्प्ष्टपणे केलेल्या विधानामुळे आता पर्यंत तुमच्या नावाने पुकारा झालाही असेल.
अगोदरच अभिनंदन करून ठेवतो.
भविष्यात कदाचीत आम्हालाच तुमचा वशीला लावावा लागेल!

नरेशकुमार's picture

10 Feb 2011 - 12:23 pm | नरेशकुमार

आपल्या नावाचे पहिले फिल्ड हे अल्फाबेट असते. शेवटचे फिल्डही अल्फाबेट असते. शिवाय मधली सगळी फिल्ड्सदेखिल अल्फाबेट्सच असतात.

not necessary.
काही नावे इथे पहा,
प्रकाश१११
प्यारे१
शानबा५१२
Bhushan11