असंच, आपलं कहीतरी.....

नरेशकुमार's picture
नरेशकुमार in जनातलं, मनातलं
1 Feb 2011 - 5:14 pm

एक मुलगा होता. असाच कुठेतरी भटकत असताना त्याला एक सुंदर बगीचा दिसला. त्यात काही मुले आनंदाने खेळत बागडत होती. मुलाची सुद्धा इच्छा झाली कि तिथे जाऊन आपण खेळावे. त्याने त्या बागेत प्रवेश केला. थोडा वेळ खेळून झाल्यावर त्याचे कुणाबरोबर तरी भांडण झाले. मुलगा हिरमुसले तोंड करू परत घरी आला. त्याची बागेत खेळायला जाण्याची इच्छा होती. पण आता कसे जायचे याचा तो विचार करू लागला. काही वेळाने त्याला त्याच्या एक मित्राने एक सुप्पर आयडिया दिली. दुसर्याच दिवशी तो पुन्हा बागेकडे निघाला. वाटेत जाताना त्याने एक मुखवटा विकत घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर चढविला. मग काय, पुन्हा एकदा एक नवीन चेहरा मिळाल्याने तो मुलगा बागेत येऊन आनंदाने खेळू बागडू लागला.

त्याने एक मुखवट घेताघेता आणखी एक मुखवटा घेतला होता. तो मुलगा अधून मधून वेगवेगळा मुखवटा घालून बागेत येऊ लागला. त्याला नवनवीन मित्र मिळाले. दोस्ती यारी जमली. पण आनंदाच्या भरात मुलाने एक चूक केली होती. त्याने एक मुखवटा साधा-भोळा शांत चेहर्याचा घेतला आणि दुसरा एक चलबिचल-मवाली असा मुखवटा घेतला होता. जेव्हा जेव्हा तो साधा-भोळा मुखवटा घालून येत असे त्यावेळेस तो त्या शांत वागत असे आणि जेव्हा कधी दुसरा मवाली मुखवटा घालून येत असे तेव्हा मवालीगिरी करत असे. त्यामुळे झाले काय, त्याच्या मुळ स्वभावात देखील फरक पडू लागला. पन असे सारखे अदलाबदल केल्याने त्याला लवकरच आपण या दोन परस्पर विरोधी व्यक्तीमत्वात अडकत चाललेलो आहोत याची जाणीव झाली. त्याने यावर गंभीर विचार केला, आता यावर उपाय काय ? तो यावर उपाय शोधात राहिला.

एके दिवशी त्याला दूरवर एक ऋषी बसलेले दिसले. त्याने त्यांच्याकडे जाऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली आणि उपदेश मागितला. ऋषींनी स्मित हास्य करून त्याला सांगितले कि, अरे बाबा, तू ज्याला तुझा खरा चेहरा समजतो आहेस, तो सुद्धा तुझा खरा चेहरा नाही. तो चेहरा सुद्धा एक मुखवटाच आहे. तुझा जन्म झाल्या झाल्या लगेच तुझ्या मात्या-पित्यांनी तुला एक धर्म-जात यांचा एक अदृश्य मुखवट चढविलेला आहेच. तो मुखवटा म्हणजे तू नव्हेस. त्या अदृश्य मुखवट्या पलीकडे काय आहे हे तुला देखील माहित नाही. आणि ते मी सुद्धा माहिती करून घेऊन शकत नाही.

मुलाने चिंता व्यक्त केली. तेव्हा ऋषी म्हणाले कि, तू असा उदास होऊ नकोस. तू ज्याला तुझा नकली मुखवटा म्हणत आहेस, त्यात एक जादू आहे. मुलाने विचारले, काय जादू आहे त्यात ? ऋषी म्हणाले, त्यात एक अशी जादू आहे कि त्यामुळे कधीकधी तुझा अदृश्य मुखवट्या पलीकडील तुझा खरा चेहरा त्या मुखवट्यामुळे बाहेर येईल. मी इथून तुझे निरीक्षण करीत आहे. एक ठराविक काळ जाऊंदे त्या नंतर तू माझ्याकडे ये. मग मी तुला तुझा खरा चेहरा दाखविण्याचा प्रयत्न करीन.
असे सांगून ऋषी पुन्हा ध्यानस्थ झाले.

(लेख पूर्णपणे काल्पनिक.)
Character is what we do when no one is watching : Anonymous

मुक्तकसमाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

आय होप ऋषीमुनी ष्याणा होता... कारण हल्ली ह्या वायझेड ऋषीमुणींचे स्तोम माजले आहे. आणि ते उल्लु लोकांना आनखिच उल्लु बनवत आहेत. तेंव्हा ऋषिमुणींकडे जाण्या ऐवजी एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जावे असे माझे प्रांजळ मत आहे. :)

- (वायझेड) टारेशसुमार

नरेशकुमार's picture

1 Feb 2011 - 5:24 pm | नरेशकुमार

आपल्याकडे येउ का ?

स्वानन्द's picture

1 Feb 2011 - 5:29 pm | स्वानन्द

भूतबाधा झाली आहे असे सांगून झाडुने मार मार मारतील !

स्वानन्द's picture

1 Feb 2011 - 5:30 pm | स्वानन्द

प्रकाटाआ

त्यामुळे झाले काय, त्याच्या मुळ स्वभावात देखील फरक पडू लागला.

म्हणुन म्हणतो कशाला डु आयडी घेता लेको. आहेती आयडेंटीटी जपा की. जर आधीचा मुखवटा बदनाम असेल तर त्यातच सकारात्मक बदल घडवुन आणा म्हणजे मग दुहेरी व्यक्तीमत्वात अडकायची पंचाईत होणार नाही .
काय म्हणता? :)

सहज's picture

1 Feb 2011 - 5:58 pm | सहज

गणपाशी सहमत.

गोष्ट छान.

एकवेळ पाकीस्तान भारताच्या कुरापती काढणे थांबवेल पण "सुशिक्षीत मराठी लोक" डु. आयडीतून पालथे धंदे करायचे थांबतील असे काही वाटत नाही :-)

ब्रिटिश टिंग्या's picture

2 Feb 2011 - 3:48 pm | ब्रिटिश टिंग्या

=))

मस्त कलंदर's picture

1 Feb 2011 - 11:45 pm | मस्त कलंदर

आणि काय हो, इथे तर फक्त दोन मुखवट्यांबद्दलच लिहिलेत.. एकूण मुखवट्यांची संख्या त्याहून जास्त असावी... त्याबद्दलही लिहिलं असतंत तरी चाललं असतं हो.

खुद के साथ बातां: इथं मरायला एक आयडी, एक खरडवही आणि व्यनिखातं सांभाळताना मारामार... लोकांना चार-चार मुखवटे सांभाळायला बरा वेळ मिळतो. हे टाईम आणि आयडी मॅनेजमेंटएकदा टिंग्याला विचारायला हवं..

>>>लोकांना चार-चार मुखवटे सांभाळायला बरा वेळ मिळतो.<<<

बहुरुप्यांच तेच काम असत......

युयुत्सु's picture

1 Feb 2011 - 5:33 pm | युयुत्सु

छान गोष्ट!

विनायक बेलापुरे's picture

1 Feb 2011 - 5:55 pm | विनायक बेलापुरे

मिपा वरची आहे का ?
कोण आहे तो सज्जन ?
;)

अवलिया's picture

1 Feb 2011 - 6:20 pm | अवलिया

ऋषीचा मुखवटा धारण केलेला कोण होता रे?

अरुण मनोहर's picture

2 Feb 2011 - 6:19 am | अरुण मनोहर

फक्त तो ऋषीच का बरे?
हडळी, भुते, कंदील, ड्यांबीस, खवीस... शिवाय,
ऋषी-मुनी, संत्-निर्मोही, अवलिया-फकीर.... अशा किती भुमिकांच्या नटसम्राटांची ओळख करून द्यायला हवी!

निलकांता सगळ्यांना यु आय डी दे बाबा.

sneharani's picture

2 Feb 2011 - 3:09 pm | sneharani

छान आहे गोष्ट!

हॅ हॅ हॅ !!

अवांतर : नरेशराव , नाही म्हणजे सगळ्यांना विचारत सुटला होतात म्हणुन ही विचारणा, बायकोला काय दिलत शेवटी ?

नरेशकुमार's picture

2 Feb 2011 - 4:51 pm | नरेशकुमार

धन्यवाद.
आता तो विषय काढलाच आहे तर स्पष्ट करतो, एकतर तो लेख/विचारना खरेच गरज होती म्हनुन टाकली होति. पन काही अवांतर प्रतिसादामुळे ते उडविले गेले. पन असुदे, काही हरकत नाही.
मी एक फुट मसाजर चे मशिन गिफ्ट दिले.
(बजेटच्या खुपच आत आनी बायको पन खुश)