उदय सप्रेंची शाळा ही कविता वाचली आणि तीनेक वर्षांपूर्वी जेव्हा छंदात कविता न लिहिण्याचा छंद होता तेव्हा लिहिलेली ही कविता सहजच आठवली. मनोगतावर व माझ्या जालनिशीवर पूर्वप्रसिद्ध झालेली ही कविता येथे मिपाकरांसाठी देण्याचा मोह आवरता आला नाही.
बावीस वर्षं आतापर्यंतची, सरली कशी कळलंच नाही,
नववी-दहावीत खुरटलेली दाढी, भरभर वाढलेली वळलंच नाही.
दाढीनं नेहमी वाढायचंच असतं,
एकविसानं बावीस व्हायचंच असतं,
आपण मात्र हाती धरून पेनाचा रेझर,
"क्लीन शेव्ह्ड" बालपण सदैव नटवायचं असतं.
इसापनीती हातची जाऊन फ़िजिक्स आलेलं कळलं नाही,
केमिस्ट्रीनं केलेली हकालपट्टी अकबर-बिरबलालासुद्धा वळलीच नाही.
मॅथेमॅटिक्ससुद्धा असंच अभ्यासायचं असतं,
इंजिनिअरींगच्या ऍडमिशन्ससाठी ताटकळायचं असतं,
मेकॅनिक्सचा पेपर देऊन झाल्यावरसुद्धा,
पंचतंत्र पूर्वीसारखंच वाचायचं असतं.
शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा,
पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही,
बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया,
कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत.
कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक,
मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं,
आपण मात्र नंतर देताना ढेकर,
चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं.
बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा,
षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही,
"जाऊद्या जरा, खेळूद्या त्याला,"ची आउची माया,
पडद्याआड कधी सरली समजलंच नाही.
आपणसुद्धा कोणीतरी इंजिनिअर, डॉक्टर काहीतरी व्हायचं असतं,
नोकरीधंदा करून काहीतरी कमवायचं असतं,
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
प्रतिक्रिया
6 Jun 2008 - 9:47 am | विसोबा खेचर
वा! सुंदर कविता...!
आपण मात्र नंतर देताना ढेकर,
चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं.
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
वरील ओळी खासच! :)
तात्या.
6 Jun 2008 - 9:55 am | अरुण मनोहर
लहानपणीच्या गमती. पुन्हा जगायच्या! वाहवा.
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
6 Jun 2008 - 10:30 am | आनंदयात्री
>>चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
>>आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
मस्त बेला .. पेनाचा रेझर,"क्लीन शेव्ह्ड" बालपण हे पण सही. :)
येउदेत मुक्तछंद कविता अजुन :)
6 Jun 2008 - 10:34 am | ऋचा
शाळेतल्या रिकाम्या खिशांची जागा,
पॉकेटमनीनं घेतलेली कळलीच नाही,
बर्थ-डे पार्टीज, रोझ डे, फ़्रेंडशिप डे ची माया,
कबड्डी, खो-खो तेथे रुळलीच नाहीत.
कॉलेजच्या कँटीनचं पेप्सी नि कोक,
मित्रमैत्रिणींसोबतच घशाखाली ढकलायचं असतं,
आपण मात्र नंतर देताना ढेकर,
चिंचा-बोरंवाल्या त्या भैयाला आठवायचं असतं
मस्तच
"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
6 Jun 2008 - 11:57 am | स्वाती दिनेश
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
बालपणाला नटवण्याची कल्पना खास!
स्वाती
6 Jun 2008 - 4:58 pm | चतुरंग
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
ही एकदम झक्कास कल्पना!
चतुरंग
6 Jun 2008 - 5:49 pm | शितल
कविता छानच आहे.
अजुन येऊद्या, वाचायला आवडेल, खर॑च असेच होते ना प्रत्येकाच्या आयुष्यात थोडा फार फरकाने.
20 May 2010 - 11:51 pm | संदीप चित्रे
>> चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून, त्यांचं डबा-दप्तर भरून,
>> आपण आपलं बालपण पुन्हा नटवायचं असतं.
क्या बात है !
21 May 2010 - 12:13 am | फटू
ओळीगणिक बालपण नजरेत उभं राहतं. थोडयाफार फरकाने प्रत्येकजण अशा अनुभवांमधून गेलेला असतो.
असं काही मनाचा वेध घेणारं वाचलं की जगजीतजींच्या कातर स्वरातील "वोह कागज की कश्ती, वोह बारीश का पानी" कानात गुंजू लागतं...
- फटू
21 May 2010 - 1:27 am | शुचि
बालिशपणा आता पुरे झाला एव्हढा", म्हणणारे बाबा,
षष्ट्यब्दीपूर्तीशी आलेले कळलंच नाही,
खरय :(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||