आम्ही कविता करतो

असुर's picture
असुर in जे न देखे रवी...
14 Jan 2011 - 3:14 pm

हल्ली सरळ काही सुचत नाही
एक वाक्य धड लिहीता येत नाही
पण व्याकरणावर रण माजवतो
सध्या आम्ही कविता करतो

चार ओळी इकडून उचलून
चार ओळी तिकडून उचलून
तरीही वामनाचे आम्हीच वारस
आम्हीदेखील कविता करतो

कुणी वाचो, अथवा न वाचो
कुणी निंदो, कुणी वंदो
घंटा कुणाला फरक पडतो
म्हणूनच आम्ही कविता करतो

मदत, कौल, काथ्याकुटाचा
आता जरी का कंटाळा आला
वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो
त्यासाठीच तर आम्ही कविता करतो

कुणा काही बोलणे त्याज्य, कुणा काही सांगणे त्याज्य
बोर्डावरच्या खेळातही आपल्यावरच राज्य
'हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा' समजतो
बोर्ड भरवण्यासाठी आम्ही कविता करतो

कवितेच्या खेळात या
लेख जगती, लेख मरती
चांगल्या लेखाच्या स्मृतीत आम्ही
अजून चार कविता करतो!!

हास्यकवितामुक्तकमौजमजा

प्रतिक्रिया

सहज's picture

14 Jan 2011 - 3:16 pm | सहज

अजून चार कविता करतो!!

बापरे! केवढे हे क्रौर्य!!!

सहमत .
[कविता] दिलगीरी लिहा आता.

परिकथेतील राजकुमार's picture

14 Jan 2011 - 3:39 pm | परिकथेतील राजकुमार

मदत, कौल, काथ्याकुटाचा
आता जरी का कंटाळा आला
वाचनीय तरी हल्ली कोण वाचतो
त्यासाठीच तर आम्ही कविता करतो

आणि आम्ही अवांतर करतो ;)

पण काही मिपा प्रगल्भ बनवण्याचा ठेका घेतलेल्यांना ते बघवत नाही, मग ते बिचार्‍या कांताला आम्हाला समजवायला पाठवतात ;) तो बिचारा अध्यात मध्यात नसतो कुणाच्या, मग आम्हाला गप ऐकुन घ्यावेच लागते.

नरेशकुमार's picture

14 Jan 2011 - 3:31 pm | नरेशकुमार

कविता छान

मी प्रतिसाद देतो.

यशोधरा's picture

14 Jan 2011 - 3:35 pm | यशोधरा

:)

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jan 2011 - 3:40 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद!

मितान's picture

14 Jan 2011 - 4:42 pm | मितान

लगे रहो । असुरभाय !!!! :)

मेघवेडा's picture

14 Jan 2011 - 7:28 pm | मेघवेडा

कूणी निंदा अथवा वंदा
कविता करण्याचा अमुचा धंदा

अशी सही लावतोस की काय बाबा आता? :P

स्पा's picture

18 Jan 2011 - 10:32 am | स्पा

खतरनाक कविता..........

अश्या कवितेवर.. फक्त ८ प्रतिसाद..
बहुत ना इंसाफी हे रे....