आमच्या घरातून दिसणारा सिंहगड... छायाचित्रे...

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
6 Jun 2008 - 1:24 am

मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्‍याचदा ढगाच्या पडद्या आड असते...
पण कधीतरी दिसतो.... पाऊस पडून गेल्यावर अधिक छान वाटतो......

सिंहगड ओळखायची सोपी खूण म्हणजे टीव्ही टॉवर...त्या नारळाच्या झाडाच्या वरतीच डाव्या बाजूला पार्किंगच्या वरच्या कड्याच्या दोन पायर्‍या आणि त्याच्यावर तो टीव्हीचा टॉवर...
गडाच्या मध्यभागी सुद्धा अजून एक टॉवर आहे....हे दोन्ही टॉवर या फोटोत दिसत आहेत...

मुक्तकअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

वरदा's picture

6 Jun 2008 - 1:27 am | वरदा

छान निसर्ग आहे हो तुमच्या घराजवळ्...मस्त आलेत फोटो...

भडकमकर मास्तर's picture

6 Jun 2008 - 1:32 am | भडकमकर मास्तर

हा गडावर जाताना खडकवासल्याच्या पुढून काढलेला...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

6 Jun 2008 - 1:34 am | भडकमकर मास्तर

तसाच अजून एक...रस्त्यातून...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

6 Jun 2008 - 1:38 am | भडकमकर मास्तर

हा मोटारीच्या रस्त्याने वर जाताना ....
भरून आलेलं आभाळ... ते दोन टॉवर... आणि बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची.......

__________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आंबोळी's picture

6 Jun 2008 - 11:51 am | आंबोळी

बारकाईने पाहिलं तर खच्चून गर्दी दिसतेय रस्त्यावर वाहनांची आणि माणसांची
ती घोरपड कुठे दिसत नाही हो...

शेखस्पिअर's picture

8 Jun 2008 - 8:46 pm | शेखस्पिअर

तुम्हीच नाही का कंदील लावला ...
आता कशी दिसेल???

शितल's picture

6 Jun 2008 - 2:06 am | शितल

छान फोटो आले आहेत. किती छान वाटत असेल ना तुम्हाला घरातुन हे दृश्य पाहताना.

मुक्तसुनीत's picture

6 Jun 2008 - 2:15 am | मुक्तसुनीत

सिंहगडदर्शन आवडले. कॅमेर्‍यापुढच्या दृष्यांमधून कॅमेर्‍यामागचा माणूसही दिसतो म्हणतात तो असा. :-)

फटू's picture

6 Jun 2008 - 8:43 am | फटू

छान फोटो काढले आहेत... आणि मजा आहे तुमची... सकाळी उठलं की सिंहगडाचं दर्शन...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

ध्रुव's picture

6 Jun 2008 - 11:12 am | ध्रुव

फोटो मस्तच. रोज सकाळी दर्शन म्हणजे खरोखरीच मजा आहे :)

--
ध्रुव

स्वाती दिनेश's picture

6 Jun 2008 - 11:55 am | स्वाती दिनेश

फोटो आवडले..
सिंहगडचे अनेक ट्रेक,त्यातल्या गमती ,ती कांदाभजी ,दही ..सगळे आठवले.
स्वाती

झकासराव's picture

6 Jun 2008 - 7:05 pm | झकासराव

पावसाळ्यात गडावर गेलच पाहिजे अस वाटत आधीचे अनुभव आठवुन.
पण गर्दीचा विचार करुन गप्प बसाव लागत.
ह्या पावसाळ्यात जावच एकदा. :)
छान फोटो आहेत.
अवांतर : पहिल्या फोटोतील ढग फार छान आले आहेत. :)
अतिअवांतर : मी त्या ढगात कुठे विजुभाउ दिसतात का ते बघत होतो. ;)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

प्राजु's picture

6 Jun 2008 - 7:11 pm | प्राजु

तुम्ही सिंहगडला जाताना काढलेले फोटो जास्टी छान आहेत..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

6 Jun 2008 - 7:38 pm | चतुरंग

हळूहळू झूमइन करत गेलेले सिंहगडाचे चित्रण आवडले! :)

चतुरंग

दंभकुठार's picture

8 Jun 2008 - 7:28 pm | दंभकुठार

चांगले फोटो...