पृथ्वी वरच्या पाककृती

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
3 Jun 2008 - 7:23 am

पृथ्वी वृत्त -- तंत्र
जनास समरा जनास समरा यमाचा ल ग
१७ अक्षरे, ८ यती.

वृत्त जुळवण्या साठी ह्रस्व दिर्घाला काही ठीकाणी नजरेआड केले आहे, तरी भासासुद्दी वाल्यांनी क्श्मा करावी.

पृथ्वी वरील पाककृती

श्रीखंड-
मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी
निथाळुनि जळा.........समग्र गठडी............पुरी दाबुनी
पराति शर्करा............चक्का मिसळुनी.......अहा फेटले
इलायचि.................सुगंध घालुनि..........श्रिखंड हे वाटले

भजी
पिठात चिरले............कांदे मिसळुनी.........जळा ओतले
चवीस मिठ मीरची......मिळुनि घोळ...........फेटीयले
कढाइत भरूनि..........तेल अन आचत्या......लावुनी
भज्यास तळले..........गर्मागरम...............काढले बाहरी

गुलाबजामून (मधप्रदेशात "मावाबाटी")
दुधास अटवू...............खवा करुनि त्या..........मळावा पुरा
करोनि तवगोलकांस.......तळणी....................तळावा बरा
मधूर रसि.................डूबवूनि...................सम गोलकांना अरे
गुलाब जमना.............त्वरीत चखुनी.............जरा पाहिरे

चारोळ्याकवितापाकक्रियातंत्रविरंगुळा

प्रतिक्रिया

मीनल's picture

3 Jun 2008 - 7:31 am | मीनल

गाऊन पाहीले हे पदार्थ.मजा आली.
चविष्ट तर आहेतच आणि तालमय,गेय ही आहेत.

मीनल.

विसोबा खेचर's picture

3 Jun 2008 - 8:36 am | विसोबा खेचर

अरूणराव,

तुमचे पाय कुठे आहेत? तातबडतोब त्यांचा एक फोटू काढून मला स्कॅन करून पाठवा, घरात लावीन म्हणतो! :)

पाकृ वाचून मौज वाटली!

मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी

वा! वा! हे फारच छान...

क्या बात है अरूणराव! श्रीखंड, भजी, आणि गुलाबजामून यांच्या याहून उत्तम पाकृ पृथ्वीवर अन्यत्र कुठे वाचल्या नव्हत्या! :)

आपला,
(श्रीखंडप्रेमी) तात्या.

अरुण मनोहर's picture

3 Jun 2008 - 8:45 am | अरुण मनोहर

तात्याराव तुम्हीच आम्हाला स्फुर्ती दिली. तुमचा मिसळपाव खाल्ल्यानंतर श्रीखंड खायची खूप इच्छा झाली म्हणून हा प्रपंच.
आभार.

प्राजु's picture

3 Jun 2008 - 10:28 pm | प्राजु

मलाइ भरले.............दही तलम.............कापडी टांगुनी

मस्तच..

आवांतर : आता मिपावरच्या सुगरणी त्यांच्या रेसिपिज अशा कवितात्मक देऊ लागल्या नाहीत म्हणजे मिळवलं...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सहज's picture

3 Jun 2008 - 10:12 am | सहज

मजा वाटली.

आता पाठांतर करणे चालु आहे.

मनस्वी's picture

3 Jun 2008 - 11:33 am | मनस्वी

अरुणकाका
अजून येउदेत पृथ्वीवरील पाककृती!

पिठात चिरले............कांदे मिसळुनी.........जळा ओतले
चवीस मिठ मीरची......मिळुनि घोळ...........फेटीयले

अहाहाऽ

मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."

ईश्वरी's picture

3 Jun 2008 - 11:38 am | ईश्वरी

वा वा मस्त. पाककृतींचे काव्य आवडले.
अजूनही येऊद्यात अशाच काव्यात्मक पाककृती
ईश्वरी

स्वाती दिनेश's picture

3 Jun 2008 - 11:42 am | स्वाती दिनेश

मजा आली,तालात म्हणताना अजूनच छान वाटतंय.
स्वाती

रामदास's picture

3 Jun 2008 - 7:46 pm | रामदास

नीमचला गेलो होतो तेव्हा गोपी मिष्टान्न मध्ये मावाबाटी खाल्ली होती.तिथे इतक्या चांगल्या मिठाया खाल्ल्या की आता उदयपूरला जातो ते नीमच मार्गेच.

जयवी's picture

3 Jun 2008 - 10:01 pm | जयवी

रिकाम्या पोटी तर तुमची ही कविता फारच चविष्ट वाटली :)

स्वाती राजेश's picture

3 Jun 2008 - 10:15 pm | स्वाती राजेश

एकाच कवितेत ३ रेसिपी..मस्तच!!!!!!!!!!
रेसिपी लक्षात ठेवायला छान आहे...:)

मन's picture

3 Jun 2008 - 10:42 pm | मन

इ स ७ हजारचा इतिहासः-

भारतीय संस्कृती अति-प्राचीन आहे.चार वेदां मधुन ते दिसुन येतेच.
पण पाचवा वेद-"खाद्य्-वेद" ज्या मध्ये उत्तम पाक्-कृतींचं वर्णन केलय, तो ही नुकताच सापडलाय.
त्यातल्या "पृथ्वी वरच्या पाककृती" ह्या ऋचांमध्ये स्वदिष्ट पदार्थ कसे बनवावेत ह्याचं वर्णन आलय.
आमच्या वैज्ञानिकांनी हे पदार्थही करुन पाहिलेत,आणि अगदि अप्रतिम चव लागतिये ह्याम्ची.
चविष्ट खाद्य, गेय्-सुरेल्-तालबद्ध पाककृती.

रचनाकारांनी गेय रुप देउन खरच खूपच दूरदृष्ती दाखवली आहे.

आपलाच,
मनोबा

चतुरंग's picture

3 Jun 2008 - 10:51 pm | चतुरंग

एकदम झकास आयडिया!
श्रीखंड ओरपण्यात इतका गुंगून गेलो की प्रतिक्रिया द्यायची विसरलोच ;)
गुलाबजामुनही फर्मास झालेत :)

(स्वगत - अजून कोणते पदार्थ आणतोय पाहूया तरी! :W )
चतुरंग

वरदा's picture

4 Jun 2008 - 1:38 am | वरदा

मी मस्तपैकी म्हणून पाहीलं तालात...

अजिंक्य's picture

4 Jun 2008 - 4:04 pm | अजिंक्य

पदार्थ छान,
पदार्थांच्या कृतीही छान,
आणि पदार्थांच्या कृतींच्या कविताही छान!

माझी खात्री आहे, सर्व मिपाकरांना अजूनही बरीच भूक असेल!!
आणखीन येऊ दे!!